सूर्यदत्त :  भविष्यवेधी पिढी घडविणारी जागतिक संस्था

जग सातत्याने आणि वेगाने बदलते आहे, हे आपण सगळेच अनुभवतो आहोत आणि अजूनही वेगाने बदलणार आहे, याची जाणीव सगळ्यांनाच झालेली आहे. या अस्थिर आणि अनिश्चित काळात तंत्रज्ञानाने स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण के ली आहे. व्यवसाय, कामाचे स्वरूप आणि पद्धतीही बदलत आहे. म्हणूनच एकापेक्षा जास्त कौशल्ये असणाऱ्या, वेगाने कौशल्य आत्मसात करणाऱ्या व्यक्तींना अधिक प्राधान्य दिले जाते आहे. जीवन-कौशल्ये अवगत असणे, ही देखील काळाची गरज झाली आहे. थोडक्यात, मुख्य प्रवाहातील शिक्षणाबरोबरच जीवन-कौशल्य आधारित सर्वांगीण शिक्षण देणे आवश्यक झाले आहे. काळाची ही पावले लक्षात घेऊनच ‘सूर्यदत्त एज्युके शन फाऊं डेशन’ची वाटचाल गेली चोवीस वर्षे अविरतपणे सुरू आहे.

‘सूर्यदत्त’ परिवाराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केवळ एका महिन्याच्या अंतराने भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली

सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन’ अंतर्गत ७ फेब्रुवारी १९९९ ला ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ची स्थापना झाली. आता संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. ‘सूर्यदत्त’ हा तीसहून अधिक मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा एक समूह आहे, ज्यामध्ये ‘केजी टू पीजी’चा समावेश आहे. ही संस्था शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्था, पीजी अभ्यासक्रम, संशोधन-प्रशिक्षण केंद्रे, कन्सल्टन्सी अँड इनोव्हेशन, व्यवसाय व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान, फिटनेस, थिएटर, परफॉर्मिंग आर्ट्स, सायबर सुरक्षा, फिजिओथेरपी, कायदा, फार्मसी, गृहविज्ञान, शिक्षक शिक्षण, कला आणि वाणिज्य यांसारख्या विषयांमध्ये अध्यापनाचे काम करीत आहे. संस्थेच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या शाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या आघाडीच्या विद्यापीठांशी संलग्न आहेत. ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’मधील प्रमुख नेतृत्वसंघात वरिष्ठ व्यावसायिकांचाही समावेश आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञ, उत्तम सल्लागार मंडळ, अभ्यास मंडळे, संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन मार्गदर्शन हे संस्थेचे वेगळेपण सांगता येईल. थोडक्यात, कमी कालावधीत संस्थेने मारलेली भरारी थक्क करणारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत विविध उपक्रम राबविणे, पुरस्कार प्रदान करणे, मान्यवरांना भेटणे, समाजोपयोगी कार्य करणे, ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.‘

संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी ‘सूर्यदत्त’च्या माध्यमातून शिक्षणाला नवीन तंत्रज्ञान आणि मूल्यांची जोड दिली. तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात नवीन बदलांना आपलेसे करीत शिक्षण देण्याचे ध्येय निश्चित केले. गेली चोवीस वर्षेया ध्येयाच्या दिशेने त्यांची अथक वाटचाल सुरू आहे. या प्रयत्नांना अनेक अंगांनी यश येते आहे, असेच या संस्थेचा मागोवा घेताना म्हणावेसे वाटते. नवोन्मेष, स्टार्टअप संस्कृती आणि उद्यमशीलतेचा विकास, राष्ट्रप्रेम ही या संस्थेची मूल्ये आहेत.

राष्ट्र भक्ती : प्रथम सेवा

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती हा गुण असायलाच हवा, हे संस्थापक म्हणून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे ठाम मत आहे. देशभक्ती रुजण्यासाठी महान नेत्यांची जयंती-पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिवस, राष्ट्रीय एकता दिवस हे आवर्जून साजरे केले जातात. तसेच वर्षभर भाषणे, काव्यथॉन, तालयोगथॉन, वीररत्न पुरस्कार, शौर्य पुरस्कार यांसारखे देशभक्तिपर उपक्रम राबविले जातात. त्यामध्येविद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे भाग घेतात.

वृक्ष रक्षाबंधन

‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी पाचशे झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. या विषयी सांगताना संस्थेचे कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया म्हणतात, झाडे आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावी आणि सदैव कृतज्ञ राहावे, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला.

ई-कचऱ्यातून नवनिर्ती

दिवसेंदिवस वाढणाऱ्या ई-कचऱ्यावर तोडगा म्हणून ‘सूर्यदत्त’च्या कॅम्पसमध्ये ई-कचऱ्याचे तुकडे एकत्र करून ई-चित्ता साकारण्यात आला आहे. यासाठी मुख्यतः मोबाईलचा वापर करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशील विचारधारेला योग्य व्यासपीठही मिळते, आत्मविश्वास वाढतो, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सांगतात. मंगळयान, फ्लाईंग हॉर्स, शार्क आणि हॉर्सविथ कॅरिअट अशा प्रतिकृतीही विद्यार्थ्यांनी ई-कचऱ्यापासून तयार केल्या आहेत.

केजी टू पीजी कोर्सेस

‘सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन’ अंतर्गत केजी टू पीजी, संशोधन शिक्षणाची दर्जेदार व्यवस्था करण्यात आली आहे. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबर चांगली मूल्ये, सामाजिक भान, देशभक्ती यांची ओळख करू दिली जाते. या विषयी सांगताना संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया म्हणतात, ‘‘मुलांमध्ये संस्कारांची बीजे लहान वयातच पेरली पाहिजेत. शिक्षक हा केवळ अभ्यासी ज्ञान देण्यापुरता मर्यादित नसावा, तर मुलांना जगाचे भान देणाराही असावा, ही विचारसरणी संस्थेत कसोशीने पाळली जाते. म्हणूनच तर मुलांच्या सहलीसाठी आयएनएस – लोणावळा यांसारख्या ठिकाणांची निवड करतो. दरवर्षी आंतर राज्य बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजनही केले जाते. या वर्षी या स्पर्धेत शहाण्णव शाळांतील पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. एम. बी. ए., एम. ए. जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, एम. ए. सायकॉलॉजी, एम. एस्सी. कम्प्युटर सायन्स, एम. सी. ए., एम. एस्सी. डेटा सायन्स, एम.एस्सी. स्टॅटिस्टिक्स, एम. कॉम., एम. एस्सी. मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज्, असे अभ्यासक्रम संस्थेच्या वतीने चालविले जातात. याशिवाय काही सर्टिफिकेट कोर्सेसही उपलब्ध आहेत. सॅप/ईआरपी, डेटा सायन्स, एन. एस. ई., बी. एस. ई. बिझनेस ॲनॅलिटिक्स, ॲडव्हान्स एक्सेल, सिक्स सिग्मा इत्यादींचा त्यात समावेश आहे.’’

‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’

दरवर्षी स्थापना दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा हा पुरस्कार आत्तापर्यंत ५०० हून अधिक मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मभूषण शिव नादार, पद्मभूषण मोहन धारिया आदींचा समावेश आहे. याशिवाय संस्थेतर्फे गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड्स, सूर्यदत्त स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अवॉर्ड्स, सूर्यभारत इंटरनॅशनल अवॉर्ड्सही प्रदान केले जातात.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्तेविज्ञान भवन, नवी दिल्ली येथे इंडियन अचिवर्स अवॉर्ड् स्वीकारताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

वर्ल्डवुमन लीडरशीप पुरस्कार

संस्थेच्या उभारणीपासून संस्थेचा विस्तार आणि प्रगतीत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या पत्नी सुषमा चोरडिया यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या संस्थेच्या उपाध्यक्षपदावर कार्यरत आहेत ‘वर्ल्ड वुमन लीडरशिप, महिला नेतृत्व २०२२’ हा पुरस्कार देऊन त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. ‘निर्मिती ॲवॉर्ड फॉर एस. डी. सी.- २०२३’ हा पुरस्कारही त्यांना नुकताच मिळाला आहे.

नावाजलेले जागतिक विक्रम

  • ट्वेंटी फोर अवर्स सायलेंट रीडेथॉन
  • अन्फोल्ड हिडन पोटेन्शियल थ्रू ब्लाईंड फोल्ड
  • सलग पंचवीस तास देशभक्तिपर गाणी गाणारी काव्यथॉन
  • लायनिग द मॅप ऑफ इंडिया थ्रू १,१०० तुलसी सँपलिग्ज
  • सात हजार किलो पुणेरी महामिसळ गरजूंना दान
  • कलाआरोग्यम् योगथॉन
  • तालआरोग्यम् योगथॉन
  • नवरात्री : भारताचे रंग

देणे समाजाचे…

  • प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या एकसष्टीनिमित्त एकसष्ट दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपर्सचे वाटप
  • आंबी येथील जनसेवा फाऊंडेशनशी संलग्न वृद्धाश्रमास ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची भेट; वृद्धांशी संवाद व रजई वाटप
  • हृदयाशी संबंधित आजारांविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी जागतिक हृदय दिनानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन; चारशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
  • मावळ तालुक्यातील गावांमध्ये महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप. महिला आपल्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी त्यांना शिवणकामाशी संबंधित प्रशिक्षण
  • महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुधारावे, यासाठी संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी
  • सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून व्यसनमुक्ती मोहिमेचे आयोजन
  • ऑस्टिओपॅथी मोफत शिबिराचे आयोजन

विश्वप्रिय व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक व अध्यक

‘सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष, उत्तम शिक्षणतज्ज्ञ, जागतिक दर्जाचे मारद्ग र्शक, एक द्रष्टे आणि दूरदृष्टी असलेले परोपकारी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया. समाजाच्या सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना परवडणाऱ्या शलु्कात शिक्षण मिळावे, त्यांचा दृष्टिकोन अर्थपूर्ण व्हावा, यासाठी डॉ. चोरडिया प्रयत्नशील असतात. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडन, युके येथील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘एशियन युके एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२’, ‘द ग्लोबल एज्युकेशनिस्ट ऑफ द इयर’, ‘महागौरव परुस्कार २०२२’, ‘ग्लोबल एज्युकेशन २०२२ ॲवॉर्ड’ ‘इंडियन अचिवर्स ॲवॉर्ड’ या सगळ्या परुस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण, अध्यात्म, सामाजिक आणि जागतिक शांतता या विषयी डॉ. चोरडिया यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना अनेक परुस्कार मिळालेले आहेत. अलीकडेच त्यांना ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री’चे संरक्षक सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे. दिल्लीतील ‘सेंटर फॉर एज्युकेशन अँड रीसर्च’चे (सीईजीआर) राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची निवड झाली आहे. तसेच ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालया’च्या योजना बोर्डवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. अमेरिकास्थित ग्लोबल चेंबरमध्ये ‘चेअर ऑफ द युनिव्हर्सिटी इंडस्ट्री पार्टनरशिप प्रोग्रॅम’मध्येही त्यांची निवड झाली आहे. विविध देशांतील शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन तेथील दर्जेदार शिक्षण आपल्या संस्तील थे विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी ते अविरतपणे प्रयत्नशील असतात.

व्यवस्थापनातील सहकारी

सौ. सुषमा चोरडिया
उपाध्यक्षा आणि सचिव सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन

प्रा. स्नेहल नवलखा
सहाय्यक उपाध्यक्षा, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

इंजि. सिद्धांत चोरडिया
कार्यकारी विकास आधिकारी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

डॉ. किमया गांधी
सहाय्यक उपाध्यक्षा, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

‘सूर्यदत्त’चेवेगळेपण

  • वैश्विक दृष्टिकोनातुन ज्ञानदान
  • शिक्षणतज्ज्ञांची कोअर टीम आणि सल्लागार मंडळ. दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भारतात आणि भारताबाहेर अभ्यास दौरे करण्यावर संस्थेचा भर
  • मूल्याधारित शिक्षण
  • संस्थेस सतत तज्ज्ञ मंडळींच्या भेटी आणि व्याख्यान
  • ‘नॅक’ मान्यताप्राप
  • पुस्तकी ज्ञानाऐवजी आणि उद्योगांची गरज ओळखून रोजगारक्षम शिक्षणाची कास
  • राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे मूल्य रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत
  • ISO 2009:2015 प्रमाणित विविध रँकिंगमध्येसतत आघाडीवर

वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल

विश्वासार प्लेसमेंटचा इतिहास

उमेदवारांच्या शाश्वत वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासावर भर देणारी ही संस्था विद्यार्थ्यांना आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअरचे पर्याय उपलब्ध करून देते. बीएफएसआय, ई-कॉमर्स, रिटेलिंग, आयटी, आयटीईएस यांसारख्या उच्च वाढीच्या क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांशी अनेक सामंजस्य करार केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी कार्यरत आहेत.

स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन

संस्थेमार्फत इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस बळ मिळण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील उद्योजक प्रतिभा ओळखण्यासाठी आणि तिचे पोषण करण्यासाठी संस्थेमार्फत स्टार्टअप फेस्ट, शिक्षण सत्र, कार्यशाळा, व्यवसाय कल्पना स्पर्धा, आयपीआर, सेमिनार, हॅकाथॉन यांसारख्या इव्हेंट्सचे आयोजन केले जाते. ‘सूर्यदत्त’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठीही टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात आली आहे. ५० हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत.

व्यावसायिक विकास

‘‘संस्थेच्या स्थापनेपासूनच जागतिक मानवी भांडवलाचे पालनपोषण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ते देखील वर्षभर आणि कोणतेही मूल्य न आकारता! विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक मंचाचे सदस्य आहेत. तेथे त्यांना प्रोफेशनल्सबरोबर काम करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना विकासात्मक कौशल्ये वाढविण्यासाठी निश्चितपणे होतो,’’ असे सहाय्यक उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा यांनी सांगितले.

ग्लोबल फोकस

जागतिक करिअरसाठी ‘सूर्यदत्त’मधून शिकण्याचा अनुभव सध्याच्या जागतिक स्तरावर एक जागतिक दर्जाचा टॅलेंट पूल तयार करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरत आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम, जागतिक अभ्यास दौरा, प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, परदेशी भाषा प्रशिक्षण यांचे आयोजन केले जाते. एकविसाव्या शतकातील आव्हानांवर जागतिक परिसंवाद आयोजित करणे, यासाठीही संस्थेमार्फत प्रयत्न केले जातात. त्यामध्ये लॅम्बोर्गिनी आणि सर्वोच्च भारतीय नोकरशाहांपासून ते ‘सूर्यदत्त’च्या ज्येष्ठ मान्यवरांचा समावेश होतो.

भविष्यवेधी शिक्षण

अत्याधुनिक व्यावसायिक तयार करणे, हा ‘सूर्यदत्त’चा अंतिम हेतू आहे. त्यासाठीच संस्थेच्या सर्व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये समकालीन अभ्यासक्रमांचा समावेश केला जातो आणि तो वेळोवेळी अद्ययावत केला जातो. त्यासाठी नवीन क्षेत्रातील स्पेशलाईज्ड टूर्स, केस स्टडी, प्रायोगिक शिक्षण, प्रकल्प यांचे आयोजन केले जाते. थोडक्यात, स्वप्न बघणे, त्यासाठी शिकणे आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही संपूर्णप्रक्रिया विद्यार्थ्यांना करिअरमध्येयशस्वी होण्यासाठी सहाय्यक ठरते.

झायरोपॅथी आणि ऑस्टिओपॅथी

‘‘ ‘सूर्यदत्त एज्युकेशन’ अंतर्गत ‘सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ अल्टर्नेटिव्ह थेरपीज अँड रीसर्च’ आणि झायरोपॅथी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही संस्थांमध्ये संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. तसेच मूल्यवर्धित प्रमाणपत्र देण्यात येईल. झायरोपॅथी हे निसर्गाचे विज्ञान आहे. यामध्ये वनस्पतीच्या अर्काचा वापर केला जातो. कालसुसंगत आणि आजच्या काळाची गरज असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लवकरच शिकता येणार आहे. तसेच ऑस्टिओपॅथी अभ्यासक्रमही शिकता येणार आहे. अशा अनेक शाखांचा विचार करून संस्थेत नवे नवे अभ्यासक्रम तयार केले जातील,’’ असे सहाय्यक उपाध्यक्षा डॉ. किमया गांधी यांनी सांगितले.

सर्वोत्तम व्यक्तींकडून अध्ययन

विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. मीडिया, फिल्म मेकिंग, अभिनय, ॲनिमेशन, व्हीएफएक्स या क्षेत्रांशी टाय-अप करून संस्थेने शिक्षणाचे अनेक पर्याय खुले केले आहेत. ‘सूर्यदत्त’च्या माध्यमातून संशोधन केंद्रेस्थापन करण्यात आली आहेत.

माजी विद्यार्थ्यांचे जागतिक नेटवर्क

‘सूर्यदत्त’च्या ऐंशी हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांचे, जे सध्या प्रतिष्ठित भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करीत आहेत, व्यापक जागतिक व्यावसायिक नेटवर्क आहे. आज संस्थेत शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा भारताबरोबरच यूएस, कॅनडा, आफ्रिकन देश, युरोपियन देश, चीन, जपान, दुबई यांसारख्या देशांत उमटविला आहे.

उत्तम पायाभूत सुविधा

आधुनिक सेमिनार हॉल, कम्प्युटर लॅब, म्युझिकसाठी मल्टी ॲक्टिव्हिटी हॉल यांसारख्या पायाभूत सुविधा आहेतच. प्रशस्त प्रेक्षागृह, सुसज्ज जिम, योग हॉल, उत्तम ग्रंथालय, ग्रीन कॅम्पस या संस्थेच्या जमेच्या बाजू म्हणता येतील. हरित आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर संस्थेचा भर आहे. ‘सूर्यदत्त’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचा ‘सायलेन्स झोन’ तयार होत आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक गॅझेटशिवाय राहण्यास प्रोत्साहित करणे, ध्यान करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आत्मनिरीक्षण करणे, हा यामागील हेतू आहे.

मराठी