गुणवंत विद्यार्थी घडविणार नागपूरची सेंट पॉल स्कूल

विद्यार्थ्यांना चांगले वातावरण, सोयी-सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यावर चांगले संस्कारही व्हावेत या उद्देशाने डॉ. राजाभाऊ टांकसाळे यांनी नागपुरात अकरा वर्षांपूर्वी ‘सेंट पॉल स्कूल' सुरू केली. आज इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत. तसेच शाळा २.७५ एकरात विस्तारली असून १६० वर्गखोल्या आहेत. शाळेत आज ७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेचे कार्य एवढयावर थांबलेले नाही. काही वर्षांपूर्वी धामना येथे सेंट पॉल इंटरनॅशनल स्कुलची स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व-सुविधायुक्त अत्याधुनिक वातावरणात शिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे.

ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा मौज मस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा

शाळेबाबतच्या या चार ओळीतून तिचे आयुष्यातील स्थान किती महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात येते. शाळा चांगली तर विद्यार्थीही चांगले घडतात. अशा शाळांतून घडलेले विद्यार्थी वयैक्तिक आयुष्यासोबतच समाज निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतात. विद्यार्थ्यांना कवेळ सोयी-सुविधा न देता, त्यांना एक जबाबदार आणि चांगला व्यक्ती करण्याची जबाबदारी शाळेवर असते. त्यामुळेच पालक आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत दाखला कसा मिळेल यासाठी प्रयत्नरत असतात. विद्यार्थ्यांना त्यात चांगले वातावरण मिळावे, सोयी-सुविधा आणि त्यांच्यावर संस्कार व्हावेत या उदेयशाने डॉ. राजाभाऊ टाकं साळे यांनी नागपुरात अकरा वर्षांपूर्वी ‘सेंट पॉल स्कूल’ सुरू केली. शाळा २.७५ एकरात विस्तारली आहे. १६० वर्गखोल्या आहेत. त्यातून ७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेचे कार्य एवढयावर थांबलेले नाही. काही वर्षांपूर्वी धामना येथे सेंट पॉल इंटरनॅशनल स्कुलची स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व-सुविधायुक्त असलेल्या वातावरणात शिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे.

संस्थेचा प्रवास

डॉ. राजाभाऊ टाकं साळे हे एका प्रकल्पाचे स्वप्न बघून दिल्लीला गेले होते. मात्र तेथे निराशा हाती आली. तरीही, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. एक प्रकल्प हातून गेला म्हणून काय झाले. दुसरा एखादा प्रकल्प हाती घेऊन समाजात सकारात्मक बदल घडविता येईल, असा विचार त्यांनी केला. दुसऱ्याच दिवशी वत्तृ पत्रात त्यांना एक जाहिरात दिसली आणि आपले स्वप्न साकार करण्याची संधी चालून आल्याचे त्यांना वाटले. ती जाहिरात शाळा सुरू करण्यासंदर्भात होती. लगेच त्यांनी अर्ज केला. शाळा सुरू करण्याच्या त्यांच्या संकल्पावर काही परिचितांना हसू आले. पण, आपला निर्धार ढळू न देता डॉ. राजाभाऊ टाकं साळे यांनी शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यातूनच २००० साली त्यांनी ‘सेंट पॉल स्कुल’ची स्थापना केली. सुरवातीला शाळेचा प्रवास बराच खडतर होता. मार्गक्रमण करीत असताना शाळेसमोर अनेक संकटे आली. संकटांशी दोन हात करीत, शाळेने आपले नाव आज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. विशेष म्हणजे, १५०० चौरस मीटरमध्ये शाळा सुरू झाली. त्यावेळी शाळेत कवेळ ५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, राजाभाऊ यांनी जिद्द आणि मेहनतीने शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थी वाढविण्याचे काम केले. एकवेळ शाळेत जायला रस्ता नव्हता. वीज नव्हती. स्वतः संस्थेचे प्रमुख डॉ. राजाभाऊ टाकं साळे आणि इतर शिक्षक पायी चालत जायचे, नंतर त्यांनी स्वतः खर्च करून रस्ता केला. वेळोवेळी शाळा चालविण्यासाठी येणारी पैशाची चणचण यामुळे अनेकदा त्याची झळही बसली. मात्र, मनात पक्का निर्धार करीत, त्यांनी येणाऱ्या संकटांना सामोरे जात त्यावर मात केली. त्यातूनच २०१० साली त्यांनी हायस्कूलची मान्यता मिळविली. अगदी दुसऱ्याच वर्षी कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. लगेच २०११ साली केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाची सुरूवात केली. एकवेळ कवेळ पाचवीपर्यंत असलेली शाळा आता १६० खोल्यातून ७ हजारावर विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा वटवृक्ष झाला आहे.

सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल

एक होतकरू तरुण म्हणून आपला कार्यास सुरुवात करणारे डॉ. राजाभाऊ टाकं साळे यांनी नेहमीच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण तेही कमी खर्चात मिळावे हे स्वप्न बघितले. त्यातून सुरू केलेल्या शिक्षण संस्थेतून त्यांनी सेंट पॉल स्कूल सुरू केली. या स्कुलच्या माध्यमातून गरुडझेप घेत, त्यांनी मुलांच्या खांद्यावर दप्तराचे ओघे नसावे, त्याने शाळेत येताना, कुठलेही दडपण घेऊन येऊ नये या प्रकारची शाळा सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातून धामना, चिकना येथे ‘सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल’ नावाची अनोखी शाळा २०१९ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली. संपूर्णतः बॅगलेस शाळा अशी या शाळेची ओळख आहे. शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून इमारत, संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अभ्यासेत्तर कौशल्याचे मार्गदर्शन, इ-लर्निंग, जलतरण तलाव आणि घोडेस्वारी प्रशिक्षदेखील विद्यार्थ्यांना दिले जाते. सुमारे १० एकर परिसरात असलेल्या शाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. त्यात एकूण १२०० विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था प्रथम टप्प्यात करण्यात आली आहे. या शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांना अल्पोपहारापासून तर संपूर्ण शिक्षण, गृहपाठ व सर्वगिां ण विकास करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे मुले कुठलेही दडपण घेऊन न जाता, शाळेत येतात आणि घरी जातात. जाताना त्यांना कायम शाळेची ओढ असते. सकाळी ९ वाजता शाळेत आलेला विद्यार्थी हा पाच वाजता सुद्धा आपल्या ॲक्टीव्हीटीमध्ये गुंग असल्याचे दिसून येते.

सामाजिक नेतृत्वातन शाळेची संकल्पना

डॉ. राजाभाऊ टाकं साळे यांचा जन्म वर्धाजिल्ह्यातील गाडेगाव या लहानशा खेड्यात झाला. वडील शेतकरी, पाच भाऊ, दोन बहिणी, आई असे कष्टाळू कुटुंब. शालेय शिक्षण वर्धेत झाले. शाळेसाठी रोज १४ कि.मी.ची पायपीट. सुरुवातीचे दिवस कष्टाचे होते. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. नागपूरच्या ख्यातनाम जीएमसी कॉलेजमध्ये एमबीबीएसला त्यांना प्रवेश मिळाला. पण गरिबीमुळे अतिशय संघर्ष करावा लागला राहणे व जेवणाचा खर्च निघावा म्हणून कॉलेज संपल्यावर ते सायकाळी ऑटोरिक्षा चालवीत. गरीब विद्यार्थ्यांची शिकवणीही ते घेऊ लागले. इतर डॉक्टरांच्या तुलनेत आपल्याला काहीतरी वेगळे करून दाखवायचे, असे त्यांना नेहमी वाटायचे. ‘आरोग्यसेवा हीच लोकसेवा’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वतःची ‘विवके शील मित्र परिवार संस्था‘ स्थापन केली. पिपळा हुडकेश्वर येथे ते साप्ताहिक आरोग्य शिबिर घेत, लोकांना आरोग्याबाबत शिक्षित करण्याच्या उदेशाने त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या या संस्थेला विदेशातूनही देणग्या मिळत होत्या. महिला व बालविकास, स्वावलंबन, पंचायत राज, आदिवासी उत्थान आदी मुद्यांवर त्यांनी कार्यशाळाही घेतल्या. या आपल्या सामाजिक उपक्रमांना मदत व्हावी म्हणून त्यांनी हळूहळू मेडिकल प्रॅक्टिसही सुरू केली. गरीब कुटुंबाची वाताहत करणारी गंभीर समस्या म्हणजे दारूचे व्यसन, कामगारातील या व्यसनापायी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त व्हायचे. राजाभाऊ यांनी सामाजिक समस्येमागील कारणांचा शोध घेतला. जागृती व्यसनमुक्ती कद्रें म्हणून त्यांनी स्वतःची संस्था स्थापन केली. समुपदेशन आणि उपचारामुळे अनेकांना दारूपासून मुक्ती मिळण्यास मदत झाली. नंतर त्यांनी वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि अकोला येथे ही कद्रें स्थापन केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमांची महाराष्ट्र शासनानेही दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केले. आजघडीला दर्जा आणि माफक शुल्कात शिक्षण ही दोन मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना राजाभाऊंनी शाळा सुरू करण्याचे ध्येय्य उराशी बाळगून कामास सुरूवात केली. आज ते स्वप्न साकार झाले आहे. डॉ. राजाभाऊ टाकं साळे सामाजिक नेते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची विविध पातळीवर दखल घेतली गेली. दलित मित्र पुरस्कार, शाहू महाराज पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, नेहरू युवा कद्रें पुरस्कार यासारखे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले. तेंदूपत्ता चळवळ असो, लाँग मार्च, बाबा आमटे चळवळ, अंधश्रद्धा विरोधी मोहीम असो त्यांनी सक्रियपणे त्यात भाग घेतला. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्ह्याचे निरिक्षक आहेत. शिवाय महाराष्ट्र एनजीओ कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून तसेच मेस्टा अन्ड कायम अनुदानित शाळा संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

कोरोना काळातही शाळेचे योगदान

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण संस्थांना बसला. आजही शाळा नियमित सुरू झालेल्या नाहीत. गरीब कुटुंबाकडे सोयी-सुविधा नसल्याने त्यांचे शिक्षण अर्ध्यावर राहण्याची शक्यता निर्माण झाली. अनेक शाळांनी शुल्क मिळाले नाही म्हणून पालकांनी त्यांचे शिक्षण बंद करण्याचे काम केले. मात्र, याउलट सेंट पॉल स्कूलने शाळेच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ऑनलाइन शिक्षणाची सुविधा प्रदान केली. याशिवाय शुल्कासाठी कुठल्याच पालकाला तगादा लावला नाही. तसेच ज्या पालकाकं डे ॲन्ड्राईड मोबाईल नाही, त्या पालकांना मोबाईल देत, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची अडचण दूर केली. शिवाय संस्थेच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. टाळेबंदीच्या काळात गरजूंना मदत म्हणून जवळपास पाच ते सहा हजारावर कुटुंबांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप करुन दिलासा देण्याचे काम केले. याशिवाय स्वतः डॉ. राजाभाऊ टाकंसाळे यांनी दिवसरात्र शेकडो रुग्णांची सेवा म्हणून ऑक्सिजन सिलिंडरची सोय करुन देणे, रुग्णांसाी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्याचे काम केले.

शिस्त ही शाळेची ओळख

शिस्त ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आचारसंहितेचा एक महत्त्वाचा भाग असून राजाभाऊ टाकं साळे संस्थापक असतानाही ते शिक्षकांच्या अनुपस्थितीत स्वतः वर्ग घेतात. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी ते थेट संपर्कात असतात.

विद्यार्थ्यांना सर्वसोयीयुक्त शाळा मिळावी हे वडीलांचे ध्येय्य होते. जिथे तो शाळा म्हणून नाही तर स्वतःचा परिवार म्हणून वावरेल. त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल, तो सर्वकलागुणात निपूण होईल. मुलांच्या खांद्यावर दप्तराचे ओझे नसावे, त्याने शाळेत येताना, कुठलेही दडपण घेऊन येऊ नये या प्रकारची शाळा सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या रुपाने पूर्णत्वास आले. एका इंटरनॅशनल शाळेत असलेल्या प्रत्येक सुविधा आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल हाच उद्श दे मनात ठेवून कार्य करीत आहोत. शाळेमध्ये ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत, त्या एका विद्यार्थ्याला समाजातील एक चांगला नागरिक आणि यशस्वी व्यक्ती म्हणून घडविण्यास निश्‍चित उपयोगी ठरतील. शाळेचा हेतू साध्य करण्यासाठी शिक्षकही सचोटीने कार्यकरतात.

– विपीन राजाभाऊ टांकसाळे, संचालक, सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल

प्रत्येकाला शिक्षण मिळावे या हेतूने शाळेची स्थापना केली. त्यातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. आज ते प्रयत्न फळाला आले आहेत. चाळीस टक्के मिळविणारा विद्यार्थी शाळेत आल्यावर ९० टक्क्याच्या पुढे गेला. त्याचे यश बघून मनाला समाधान मिळत असून आपण त्याच्यासाठी काही करू शकलो याचा अपार आनंद आहे. आज येथील विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. आयुष्यात हेच कमावले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शाळा मोठी झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

– डॉ. राजाभाऊ टांकसाळे, संचालक, सेंट पॉल स्कूल.

सेंट पॉल स्कुलची वैशिष्टये

  • २.७५ एकराचा भव्य परिसर
  • १६० वर्गखोल्य
  • ७००० ७००० विद्यार्थी
  • विद्यार्थ्यांच्या सेवेत १४ बसेस
  • भव्य गॅदरिगं हॉल
  • भव्य लायब्ररी व अभ्यासिका
  • प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा
  • ३०० शिक्षकांचा प्रचंड ताफा
  • विद्यार्थ्यांसाठी संगीत वर्गासाठी विशेष सुविधा
  • क्रीडांगण, बास्केटबॉल ग्राऊंड, हॉलीबॉल ग्राऊंड, विविध खेळांच्या सुविधा
  • अतिरिक्त वर्ग घेऊन विशेष लक्ष देणे

शाळेच्या अचिव्हमेंट्स

  • अत्याधुनिक ऑनलाइन शिक्षण
  • सीबीएसई, राज्य मंडळाचा १०० टक्के निकाल
  • जेईई, नीटमध्ये राज्यातील गुणवत्ता यादीत स्थान
  • एमएचसीईटीमध्ये विद्यार्थी राज्यात टॉपर
  • जिल्हा व राज्यस्तरीय अथलेटिक्स, क्रिकेट, बास्केटबॉल क्रीडास्पर्धेत यशस्वी वाटचाल
  • जिल्हा पातळीवर नृत्य व वादविवाद स्पर्धेत यश
  • राज्य पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम स्थान पटकाविले
  • राष्ट्रीय पातळीवर द्वितीय स्थानावर

सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलची वैशिष

  • १० एकरचा भव्य परिसर
  • सर्व विषयांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा
  • सुसज्ज लायब्ररी आणि ई-लायब्ररीची सोय
  • आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज इमारत
  • बॅगलेस शाळा
  • ई-लर्नगिं सुविधा
  • जलतरण तलाव
  • अभ्यासेत्तर कौशल्याचे मार्गदर्शन
  • घोडेस्वारी प्रशिक्षण
  • क्रीडांगण, बास्केटबॉल ग्राऊंड, हॉलीबॉल ग्राऊंड, विविध खेळांच्या सुविधा
  • अल्पोपहारापासून जेवणाची सुविधा
  • संपूर्णशिक्षण, गृहपाठ व सर्वांगिण विकास करण्यावर भर देणारी स्कूल
मराठी