बीएपीएस अक्षरधाम संस्थेचे विश्ववंदनीय श्री. प्रमुख स्वामी महाराज यांनी १२ जानेवारी १९७७ ला पुण्यातील शुक्रवार पेठेमधील श्री रामकृष्ण ऑइल मिल्स येथे भेट दिली असता. प.पु.श्री.प्रमुख स्वामी महाराजांनी तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आमचे तेल वापरुन आम्हाला कृतार्थ केले.

भारतीय घाणा संस्कृतीचे पुनरुज्जीवक श्री रामकृष्ण ऑइल मिल

पणजोबांनी रोवली व्यवसायाची मुहूर्तमेढ प्राचीन भारतीय संस्कृती-परंपरेत चौरस आहाराला अतिशय महत्व दिले गेले आहे. दररोजच्या आहाराचा म्हणजेच स्वयंपाकाचा खाद्यतेल हे मूळ पाया आहे. हा पायाच शुद्ध, सात्विक आणि नैसर्कगि असेल तर त्यापासून तयार होणारे खाद्यपदार्धही गुणवतेचे बनतात. हे लक्षात घेऊन पुण्यातील शुक्रवार पेठेत श्री. धनजीभाई पटेल यांनी १९४९ ला श्री रामकृष्ण ऑइल मिल्सची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळेस, लाकडी घाण्याला बैल जुंपून त्याद्वारे विविध खाद्यतेलांची निर्मिती केली जात असे. शेंगदाणा तेल, करडई तेल, खोबरेल तेल, बदाम, तीळ आणि मोहरी तेलांचे उत्पादन त्यांनी सुरु केले. तेव्हा, रेडिमेड पॅकिंगची चलती नव्हती. त्यामुळे, हातात ॲल्युमिनियमच्या किटल्या घेऊन दुकानापुढे तेल खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागत असत. पुढे आजोबा श्री. दवे चंदभाई पटेल, वडील श्री. श्रवणकुमार पटेल यांनीही व्यवसायात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यानंतर श्री. आनंद पटेल हे आता व्यवसायाची धुरा संभाळत आहेत. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ध्रुव पटेल हे विदेशात सॉफ्टवेअर इंजिनिअरींग करत असून कनिष्ठ चिरंजीव घनश्याम यांच्या माध्यमातून पाचवी पिढी पारंपारिक लाकडी घाण्याच्या व्यवसायात लक्ष देऊ लागली आहे.

श्री. धनजीभाई पटेल
श्री. देवचंदभाई पटेल
श्री. श्रवणकुमार पटेल
श्री. आनंद श्रवणकुमार पटेल

अखेर जुने तेच सोने ठरल

१९८०-८२ च्या सुमारास बाजारात रिफाईंड खाद्यतेले येण्यास सुरुवात झाली. तेव्हा, लाकडी घाणा उद्योगाला त्याची बरीच झळ बसली. विसाव्या शतकात म्हणजे साधारणतः २००० पासून पुन्हा लोक भारतीय संस्कृती-परंपरेकडे वळु लागले. स्वतःच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली. आयुर्वेद, योगासने यासारखा पुरातन ठेवा जपण्याकडे त्यांचा कल वाढू लागला. त्यामुळे, त्यापाठोपाठ खाद्यसंस्कृतीतही पारंपरिक लाकडी घाण्यावरील खाद्यतेलांना लोक प्राधान्य देऊ लागले. हेच चित्र आजही कायम दिसून येत आहे. सातत्यपूर्ण उच्च दर्जाची गुणवत्ता, आरोग्यवर्धक, नैसर्गिक घटकयुक्त खाद्यतेलांच्या निर्मितीमुळे श्री रामकृष्ण ऑइल मिल्सचा लाकडी घाणा पारंपारिक खाद्यतेलांच्या निर्मितीत पुण्याचा एक ब्रॅन्डच बनला आहे. केवळ सर्वसामान्य ग्राहक, गृहिणींच नव्हे तर आयुर्वेदिक वैद्य आणि नैसर्गिक उपचार केंद्रांकडूनही त्यांच्या उत्पादनांना पहिली पसंती मिळाली आहे. पुण्यात तब्बल ७२ वर्षांची उज्वल परंपरा असलेला हा एकमेव लाकडी घाणा आहे.

घाण्यातून थेट खाण्यात

लाकडी घाण्यात तेलबियांपासूनच तेल निर्मिती करता येते. ही तजवीज खरी निसर्गानेच केली आहे. त्यामुळे, श्री रामकृष्ण ऑईल्स मिल्सच्या लाकडी घाण्यातून केवळ भारतीय पारंपारिक तेलबियांपासूनच खाद्यतेले तयार केली जातात. शेंगदाणा, करडई, तीळ, खोबरे, जवस, मोहरी, बदाम आणि आक्रोड यांचा त्यात समावेश आहे. चुलीवरची आणि गॅसवरच्या भाकरीच्या चवीत जसा फरक पडतो. अथवा पाट्यावरची चटणी आणि मिक्सरवरची चटणी यांच्या चवीतही फरक आहे. तसाच फरक लाकडी घाण्यावरील खाद्यतेल आणि रिफाईंड तेलांच्या चवीत पडतो. लाकडी घाण्यात तेलनिर्मिती करताना तेलबियांवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे, नैसर्गिक, आरोग्यदायी पोषक तत्वे, रंग, चव हे घाण्याच्या तेलात जसेच्या तसे राहतात. त्यामुळे, या तेलांना साधारण फेस येतो. हे तेल थोडेसे जाडसर असते. मात्र, रिफाईंड तेलाच्या तुलनेत स्वयंपातील कातही फार कमी लागते. त्यातील आरोग्यवर्धक नैसर्गिक घटक दररोजच्या जेवणातन शरीराला उपयुक्त ठरत असतात. नैसर्गिकदृष्ट्या पोषकमूल्यांनी भरपूर आणि दर्जेदार उत्पादनांमुळे त्यांचे काही ग्राहक पिढीजात बनले आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त विदेशात स्थायिक झालेले काही ग्राहक त्या देशात जाताना आवर्जून श्री रामकृष्ण ऑईल्स मिल्सच्या लाकडी घाण्याची उत्पादने नेत असतात.

कोथरुड शाखेची सुरुवात अन् खेडशिवापूरला कारखान्याचे स्थलांतर

नैसर्गिक घटकांची उपयुक्तता पटल्याने चोखंदळ पुणेकरांकडून लाकडी घाण्यावरील खाद्यतेलांना मागणी वाढली. हे पाहून श्री. आनंद पटेल यांच्या पुढाकाराने कोथरुड येथे २००६ ला श्री रामकृष्ण ऑइल मिल्सची नवीन शाखा सुरु करण्यात आली. येथे आजही बदाम, तीळ, अक्रोड यांची लाकडी घाण्यावर तेल निर्मिती सुरु आहे. बदाम तेल व अक्रोड तेल हे केवळ सौंदर्य टिकविण्यासाठीच मर्यादित नाही. त्यांचा दैनंदिन आहारातही कसा वापर करावा याची ओळख करुन देणारे व त्याबाबतची जागृती करुन ते लोकांपर्यंत पोहचविणारे पुण्यातील श्री रामकृष्ण ऑइल मिललाकडी घाणा हे एकमेव आहेत. मोठ्या स्वरुपात उत्पादन करण्यासाठी वारजे येथील उत्पादन केंद्र खेडशिवापूरला स्थलांतरित करण्यात आले. तसेच लाकडी घाण्यांची संख्याही वाढविण्यात आली. त्यात, आनंद यांच्या सुविद्य पत्नी सौ. भावना पटेल यांची मोलाची साथ लाभली. सध्या त्यांच्या देखरेखीखाली कारखाना आणि शाखेचे कामकाज चालविले जात आहे. कारखान्यात तेलाची शुद्धता तपासून घेण्यासाठी प्रयोगशाळाही आहे.

बदाम तेलाचा ‘आहारात’ वापर करण्याची संकल्पना रुजविणारे श्री रामकृष्ण ऑइल मिल्स!

पूर्वीपासून बदाम तेलाचा वापर सौंदर्यटिकविण्यासाठी केला जात आहे. बदाम तेलाचा वापर दैनंदिन आहारातही व्हावा, यादृष्टीने श्री रामकृष्ण ऑईल मिल्सने प्रथमच ही संकल्पना वास्तवात आणण्यास सुरुवात केली. वरणभात, पोळ्या, शिरा अथवा विविध प्रकारचे पराठे, थालपीठे, खाकरा, पुरणपोळी इत्यादींवर साजूक तुपासारखे टाकून बदाम तेलाचे सेवन करतात. याशिवाय, खोबरे-लसूण, जवस, कारळे, शेंगदाणे आदी सर्वप्रकारच्या चटण्या, कोशिंबिर, सॅलेड ड्रेसिंगची देखील हे तेल चव वाढवते. नवजात शिशुंची बदाम तेलाने टाळू भरल्यास किंवा लहान मुलांची मालीश केल्यास त्यांच्या बुद्धीला तसेच शरीराला पोषक ठरते. याशिवाय, त्वचाही तजेलदार दिसते.

आरोग्य टीप

सर्वसाधारणपणे आम्ही डॉक्टर असे सुचवितो की, दैनंदिन स्वयंपाकासाठी वापरली जाणारी घाण्यावरील भारतीय खाद्यतेले आलटून-पालटून वापरावीत किंवा खालील प्रमाणे मिक्स करुन वापरावीत.

  • ३ लिटर शेंगदाणा तेल
  • १ लिटर करडई तेल
  • १ लिटर तीळ तेल
  • २०० मिली खोबरेल तेल
  • २०० मिली खोबरेल तेल.

अशा प्रकारे मिक्स तेल वापरल्याने चौरस आहाराचा समतोल राखला जातो.

-डॉ. अशोक चव्हाण, कोथरुड, पुणे

नैसर्गिक पोषकमूल्यानी भरपूर अक्रोड तेल

अक्रोड तेलाने स्काल्प टाईट होऊन केसांची मुळे घट्ट होण्यास मदत होते. केसांचा शुष्कपणा जाऊन कोंडा कमी होतो. केसांचे गळणे कमी होऊन त्यांची वाढ चांगली होते. हे तेल खाण्यासाठी वापरले जाते.

दिवा तीळ तेल

भारतीय संस्कृतीत दिवा तीळ तेल हे पवित्र मानले गेले आहे. देवघरातील दिव्यांसाठी हे तेल वापरले जाते. हे तेल मशीनवर काढले जाते. देवघरातल्या दिव्यांसाठी हे तेल वापरल्याने सकारात्मक उर्जा लहरी निर्माण होऊन आनंदी आणि मंगलमय वातावरण तयार होते. हे तेल दर शनिवारी मारुतीला आणि श्री शनी देवाला अर्पण केले जाते.

नैसर्गिक गुळ पावडर

नैसर्गिक गुळ हा आहारात अधिक आरोग्यवर्धक मानला गेला आहे. गुळ हा पावडर स्वरुपात वापरण्यास सोयीस्कर ठरतो.

सैधव मीठ

आयुर्वेदात सैंधव मीठालाच महत्व दिले गेलेले आहे. खास करुन हे मीठ उपवासाला आवर्जून वापरतात.

१९४९ पासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेली श्री रामकृष्ण आॅईल मिल्सची शुक्रवार पेठ शाखा.
तेल खरेदीसाठी ग्राहकांच्या दुकानापुढे त्याकाळात लागत असलेल्या रांगा.

एकूण २१ प्रकारची दर्जेदार उत्पादने

श्री रामकृ ष्ण आॅईल मिल्सची तीळ, शेंगदाणा, करडई, खोबरेल, जवस, मोहरी, दिवा तीळ, काळे -पांढरे तीळ तेल, गुळ पावडर, सैंधव मीठ, आवळा-आले किस, हळदयुक्त भाजलेले जवस, कोकोनट नॅचरल स्क्रब, खोबरे पीठ, जवस पीठ, बदाम-अक्रोड पीठ आदींसह एकू ण २१ प्रकारची उत्पादने आहेत.

अनेक पिढ्यांशी जोडलेला दर्जेदार ब्रँड

उत्तम दर्जामुळे श्री रामकृष्ण ऑइल मिल्सचे अनेक पिढीजात ग्राहकही आहेत. के वळ पुणेकर नव्हे तर आयुर्वेदिक वैद्य, तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडूनही त्यांच्या उत्पादनांना पूर्वीपासून पसंती मिळाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही लाकडी घाण्यावरील नैसर्गिक खाद्यतेलांचा फायदा होत असल्याचे दिसून येते. गांधीजींनी स्थापन केलेल्या उरळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्राकडूनही रुग्णांच्या मालीश व औषधांसाठी बदाम, खोबरेल व तिळाच्या तेलाची नेहमी मागणी असते.

रोजचा स्वयंपाक रुचकर आणि पौष्टिक असावा यासाठी लाकडी घाण्यावरील आरोग्यवरक घटक ्ध युक्त खाद्यतेले वापरावीत. तसेच नैसर्गिक गुळ पावडर आणि सैंधव मीठाचाही वापर करावा. आमची सर्व आरोग्यदायी उत्पादने वापरून आपल्या कु टूंबाची काळजी घ्या.

– सौ. भावना पटेल

पुर्वजांनी लावलेले व वडिलांनी आजवर अथक प्रयत्नांनी जोपासलेल्या भारतीय घाणा संस्कृतीचा वारसा जपेन व घाणावरील भारतीय खाद्यतेले परदेशात पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

– कु. ध्व पटेल

आमच्या मागील चार पिढ्यांनी भारतीय घाणा संस्कृती जपली. तिचा बहुमूल्य वारसा मला मिळाला आहे. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणारी ही परंपरा आहे. भविष्यात तिचे जतन करुन, जगाला ओळख करुन द्यायची आहे.

– कु. घनःश्याम पटेल

आईला शुद्धतेची चांगली पारख असल्याने माझी आई आवर्जुन के वळ पुण्याच्या मंडई येथील श्री रामकृष्ण ऑइल मिल्समधील लाकडी घाण्याचेच तेल घ्यायला जात असे. त्यावेळी आईसोबत मी देखील जात असायचे. त्यामुळे मला श्री रामकृष्ण ऑइल मिल्समधील उत्पादनांची खात्री असल्याने मी त्यांच्या मयूर कॉलनी, कोथरुड येथील शाखेतून आजही तेल घेते. याच खाद्यतेलांची सवय माझ्या मुलीलाही आहे. त्यामुळे, ती मुंबईत घरबसल्या यांची ऑनलाइन उत्पादने खरेदी करत आहे.

– सौ. निश्चला जोशी, ग्राहक

भविष्यातील उध्दिष्टे

  • भारतीय घाणा संस्कृतीची माहिती, ती कशी होती किं वा आताही तिचे कार्य कशाप्रकारे चालते हे नव्या पिढीला समजावे यासाठी श्री रामकृ ष्ण आॅईल मिल्सचे भारतीय घाणा संस्कृतीचे संग्रहालयउभारण्याचे स्वप्न आहे.
  • भारताबाहेर घाण्यांवरील भारतीय पारंपारिक खाद्यतेलांची निर्यात करण्याचा मानस आहे.

ऑनलाइन ऑर्डर करा; घरपोच डिलिव्हरी मिळवा

  • बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन २०१४ पासून आॅनलाइन शॉपिंगद्वारे खाद्यतेले घरपोच पुरवणारे श्री रामकृष्ण ऑइल मिल्स हे कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात ऑनलाइन शॉपिंगद्वारे www.lakdighana.com या साईट वरुन घरपोच सेवा दिली जात आहे.

वितरक नेमणे आहेत

  • व्‍यवसायाचा आणखी विस्तार करण्याच्यादृष्टीने, पुणे-मुंबईबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात वितरक नेमणे आहेत. वैद्यकीय क्त्षेरातील डिस्ट्रिब्टयुर्स आणि डिलर्सयांनी संपर्क साधावा. E-mail : woodenchurner@gmail.com

श्री रामकृष्ण ऑइल मिल्स् लाकडी घाणा

मडंई : श्रीनाथ सिनेमासमोर, शुक्रवार पेठ, पुणे २
कोथरुड : मयूर कॉलनी, जोग शाळेशेजारी, पुणे ३८
दूरधनी : +91 8007000739 / +91 9021310822
ईमेल : woodenchurner@gmail.com
ऑनलाईन शॉपिंगसाठी : www.lakdighana.com

मराठी