अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानात अग्रेसर साईश्री

उत्तम आणि सुदृढ आरोग्य हेच सुखी कुटूंबाचे खरे गमक आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असल्यास सर्व कुटूंबच आनंदी असते. मात्र, एखाद्या व्यक्तीला शारिरीक व्याधी, आजार अथवा आकस्मिक अपघात झाल्यावर हे चित्र बदलते. त्याचा कुटूंबाच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत रुग्ण आणि त्याच्या कुटूंबाला नकारात्मक विचारांमधून बाहेर काढणे गरजेचे ठरते.

शक्य त्या उत्तम वैद्यकीय सेवा-सुविधा देऊन रुग्णाला लवकर बरे करणे हीच बाब महत्वाची ठरते. हे लक्षात घेऊन मागील १३ वर्षांपासून औंध येथील साईश्री हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत आहे. सर्वप्रकारचे अत्याधुनिक वैद्यकीय उपचार रुग्णाला परवडेल अशा दरात हॉस्पिटलद्वारे दिल्या जात आहेत. रुग्णाची सेवा हीच ईश्वरसेवा मानून साईश्री हॉस्पिटल, त्यातील अनुभवी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा चमू अथक परिश्रम घेत आहे. रुग्णाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैद्यकीय सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. जगातील सर्वोत्तम अशा क्युविस या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर अस्थिव्यंगरोग शस्त्रक्रियेसाठी केला जात आहे. या प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारे साईश्री हे देशातील दुसरे आणि पश्चिम भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे.

साईश्री हॉस्पिटलची स्थापना

पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर छोट्याशा चारशे चौरस फूट जागेत सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. नीरज आडकर यांनी क्लिनिकद्वारे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. पुण्यातील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये काही काळ काम केले. त्यानंतर, कालांतराने म्हणजे २००९ ला पुण्याच्या पश्चिम भागातील औंध परिसरात साईश्री हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर हॉस्पिटलची चार मजली इमारत उभी राहिली. एकाच छताखाली आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास रुग्णसेवा सुरु झाली. औंध भागातील नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) मान्यता प्राप्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून साईश्री हॉस्पिटल हे प्रसिद्ध आहे. दुर्बिणीतील शस्त्रक्रिया (आॅर्थोस्कोपी सर्जरी), रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट (गुडघा, खुबा, खांदा) च्या यशस्वी शस्त्रक्रियांसाठी हे हॉस्पिटलचे प्रामुख्याने ओळखले जाते. याखेरीज, हॉस्पिटल क्रीडा क्षेत्रातील दुखापती (स्पोर्टस इन्जुरी सर्जरी), मणक्याच्या किरकोळ तथा गंभीर स्वरुपाच्या आजार-व्याधी, सर्व प्रकारच्या अपघातातील तातडीक वैद्यकीय सेवा, कर्करोग शस्त्रक्रिया आणि आयव्हीएफ विभाग कार्यरत आहेत. रुग्णांसाठी कमी वेदनादायी, परिणामकारक अचूक तसेच तत्पर वैद्यकीय उपचार आणि उपचारानंतर त्यांच्या पुर्नवसनासाठी देखील हॉस्पिटल कडून भर दिला जातो.

अत्याधुनिक जनरल सर्जरी विभाग

मागील ५ वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी विभाग कार्यरत आहे. लॅप्रोस्कोपी, लेझर आणि ओपन सर्जरी इथे यशस्वीपणे केल्या जातात. पोटाचे विकार त्यातही प्रामुख्याने, पित्ताशय, अपेंडिस तसेच हर्निया, मूळव्याध यावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रुणांना शस्त्रक्रियेपूर्वी आणि त्यानंतरही वैद्यकीय सल्ला देण्यासाठी दररोज बाह्यरुग्ण विभाग कार्यरत आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैद्यकीय सुविधा या रुग्णांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत. अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष (ओटी), दुर्बिण, लेझर शस्त्रक्रियेतील अधिकाधिक चांगले तंत्रज्ञान रुग्णांना देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन नेहमीच कटिबद्ध राहत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेसह (सीजीएचएस) सर्व प्रकारच्या आरोग्य विमा अंतर्गत रुग्णांना इथे उपचार घेता येतात.

कर्करोगावर अद्ययावत उपचार

हॉस्पिटलच्या सुरुवातीपासूनच कर्करोग उपचार विभाग (ॲंकोसर्जरी) कार्यरत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञान या विभागाने वेळोवेळी आत्मसात केले आहे. लॅप्रोस्कोपी, फ्रोजन सेक्शन, किमोथेरपी यासारख्या उपचार पद्धतीचा इथे अवलंब केला जातो. या विभागात कर्करोगाच्या सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार केले जातात. जबडा, मोठे आतडे, स्तन, अन्ननलिका, मूत्रपिंड यासारख्या कर्करोगांवर इथे यशस्वीपणे उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्णाचे वेदनारहित दैनंदिन जीवन लवकरात लवकर कसे पूर्ववत होईल यावर विभागाकडून भर दिला जातो.

सर्वोत्तम क्युविक जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान

साईश्री हॉस्पिटलमध्ये जगातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम असे क्युविस जॉईंट हे स्वयंचलीत अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे साईश्री हे देशातील दुसरे आणि पश्चिम भारतातील पहिलेच हॉस्पिटल ठरले आहे. या तंत्रज्ञानाआधारे, अस्थिव्यंगरोगाच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. या तंत्रज्ञानासमवेत विशेष प्रकारचे सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे, शस्त्रक्रियेच्या आदल्यादिवशी रुग्णाच्या सिटी स्कॅन अहवालाच्या मदतीने संगणकावर रुग्णाच्या दुखापतग्रस्त हाडांचे थ्री-डी इमेज मॉडेल तयार होते. शस्त्रक्रियेचे आभासी प्रतिरुप निश्चित करुन त्याआधारे, दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली जाते. भविष्यात रुग्णाला पुन्हा शारिरीक त्रास उद्‍भविण्याची शक्यता कमी होते. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेच्या दिवसापासूनच रुग्णाला हलचाल करणे शक्य होते. या तंत्रज्ञानाच्या आधारे बसविण्यात आलेला नवा सांधा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता अधिक असते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रख्यात मुख्य रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने ६ हजारांपेक्षा अधिक सांधे प्रत्यारोपण आणि अस्थिव्यंगरोग शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.

रुग्णसेवेसाठी विविध विभाग कार्यरत

अत्याधुनिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सुविधायुक्त ऑर्थोपेडिक्स विभाग, तातडीक बाह्यरुग्ण सेवा विभाग(ट्रॉमा), सर्वसाधारण शस्त्रक्रिया (जनरल सर्जरी), आयव्हीएफ, स्पाईन (मणका), कर्करोग शस्त्रक्रिया (आन्को सर्जरी) असे निरनिराळे विभाग हॉस्पिटल अंतर्गत कार्यरत आहेत. सर्व प्रकारच्या अस्थिव्यंगरोगांवर एकाच छताखालील विशेषोपचार देणारे साईश्री हे पश्चिम पुण्यातील एकमेव हॉस्पिटल आहे.

ट्रॉमा विभागात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार आयसीयू विभागाचे सक्षम पाठबळ देखील रुग्णसेवेसाठी दिले जाते. रस्ते अपघातामधील किरकोळ-गंभीर दुखापतग्रस्त रुग्णांवर इथे यशस्वी उपचार झाले आहेत.

अनुभवी समर्पित डॉक्टरांचा चमू

हॉस्पिटलच्या विविध विभागात तज्ञ डॉक्टर कार्यरत असून त्या त्या क्षेत्रातील २० वर्षांपेक्षा अधिक अनुभव त्यांना आहे. हा डॉक्टरांचा चमू रुग्णसेवेसाठी समर्पित आहे. अल्पकाळात डॉक्टरांनी आत्तापर्यंत एकूण मिळून सुमारे २८ हजारांपेक्षा अधिक छोट्या आणि मोठ्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. त्याद्वारे, रुग्णाला त्याच्या दुखापतीपासून मुक्त असे जीवन जगण्यास मदत होत आहे. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी अस्थिव्यंगरोग तज्ज्ञ डॉ. नीरज आडकर, ट्रॉमा सर्जन डॉ. मंगेश पाटील, स्पाईन सर्जन डॉ. केतन देशपांडे, आयव्हीएफ सेंटरचे आयव्हीएफ स्पेशलिस्ट डॉ.गिरीश पोटे, जनरल सर्जरीसाठी डॉ.रोहित शूळ तर कर्करोग विभागासाठी ॲंकोसर्जन डॉ. गजानन कानिटकर आदी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेत कार्यरत आहेत.

विविध पुरस्कार आणि सन्मान

समर्पित रुग्णसेवेबरोबरच रुग्णाच्या पुर्नवसनाच्या कार्यात यशस्वीपणे योगदान दिल्याबद्दल, साईश्री हॉस्पिटलला बेस आर्थोपेडिक हॉस्पिटल २०१७, बेस्ट आयव्हीएफ सेंटर २०१८ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राज्य आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने, आयोजित कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मागील वर्षी २०२१ मध्ये हॉस्पिटलचे प्रमुख रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांना सन्माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बेस्ट रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. बेस्ट ट्रॉमा ॲन्ड ॲक्सिडेंट केअर सर्जन म्हणून डॉ. मंगेश पाटील यांना तर बेस्ट स्पाईन सर्जन म्हणून डॉ. केतन देशपांडे यांना गौरविण्यात आले आहे.

काय आहे क्युविस जॉईंट प्रणाली?

सांधे प्रत्यारोपण (जॉईंट रिप्समेंट) शस्त्र ले क्रियेचा इतिहास पहाता पारंपारिक उपचारापासून कॉम्पुटर गाईडेड जीपीएस तसेच संपूर्ण स्वयंचलित रोबोटिक जॉईंट रिप्समेंट ले प्रणालीपर्यंत वद्यै कीय क्षेत्रात वापर केला जातो. वद्यै कीय क्षेत्रातील नवनवीन प्रगत तंत्रज्ञान निर्माण करण्यात दक्षिण कोरिया देश अग्रेसर आहे. याच देशाने, क्विक जॉईंट हे पू यु र्णपणे स्वयंचलित सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रणाली विकसित केली आहे. हे रोबोटिक्स तंत्रज्ञान रुग्णासाठी पूर्णपणे सुरक्षित असून उपचारात अचूकता आणि उत्तम परिणामकारकता साधण्यात अतिशय यशस्वी ठरले आहे.

साईश्रीची सामाजिक बांधिलकी

साईश्री हॉस्पिटलने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विनामूल्य कोविड-१९ लसीकरण केले आहे. कोविड काळात (२०२०) समाजातील केशरी शिधापत्रिकाधारक वंचित समाज घटकासाठी अक्षय योजना कार्यान्वित करुन अस्थिव्यंगरोगावर मोफत उपचार केले. साईश्री हॉस्पिटलमध्ये नाममात्र शुल्कात सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. लहान बालके आणि मुलांना त्यांचे जीवन सामान्यपणे व्यतीत करता यावे यासाठी फाटलेल्या टाळू तसेच ओठांवरील शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात. वर्षभरात २ ते ३ वेळा नियमित रक्तदान शिबिरे, अस्थिव्यंगरोग तज्ज्ञांकडून लष्कर, नौदल आणि पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना विनामूल्य बाह्यरुग्ण उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सांधेदुखी आणि मणक्यांच्या समस्यांसाठी नियमित मोफत आरोग्य तपासणी शिबिरेही भरविली जातात.

रुग्णाशी वैयक्तिक संपर्क साधून उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यावर साईश्री हॉस्पिटलचा दृढ विश्वास आहे. आॅर्थोपेडिक (अस्थिव्यंगरोग) क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा रुग्णाला लाभ देण्यावर आमचा भर असतो. पश्चिम भारतातील पहिली क्युविस ही स्वयंचलित रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीम देखील आम्ही त्यादृष्टीने, रुग्णांना उपलब्ध करुन दिली आहे. मिनीमली इनव्हान्स स्पाईन सर्जरी (एमआयएसएस) चे सर्वात प्रगत स्वरुप म्हणजे युबीई स्पाईन सर्जरी होय. आम्ही त्या यशस्वीपणे के ल्या आहेत. केवळ आर्थोपेडिकच नव्हे तर रुग्णांच्या गरजेनुसार सर्वसाधारण शस्त्रक्रिया आणि कर्करोगावरील शस्त्रक्रियेतही क्युविसची सुविधा पुरविली जात आहे. आमची आयव्हीएफ उपचार पद्धती ४ वर्षांच्या काळात १००० पेक्षा अधिक कु टुंबियांसाठी टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय म्हणून वरदान ठरला आहे. यावरुन, आम्ही रुग्णाचे सुदृढ आणि निरोगी आरोग्य कायम रहावे यासाठी आम्ही सर्वजण भविष्याच्या दिशेने सर्वोत्तम आरोग्य सुविधांसह दमदार वाटचाल करत आहोत, असे म्हणता येईल. साईश्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्ये तसेच उत्कृष्टता याचा सुंदर मेळ घातला आहे, असे आम्ही अभिमानाने सांगू शकतो.

– डॉ. नीरज आडकर, व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन

प्रमुख फायदे

  • रुग्णाच्या आरोग्यासाठी सुरक्षित तंत्रज्ञान
  • शस्त्रक्रियेवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो.
  • शस्त्रक्रियेत वेळेची बचत
  • हॉस्पिटलमध्ये कमीत कमी रहावे लागते.
  • शस्त्रक्रियेत अचूकता रहाते.
  • संपूर्ण रॉम सांध्यांचे उत्तम संतुलन साधता येते.
  • रुग्णाच्या दुखण्यावर सातत्यपूर्ण उत्तम परिणाम.
  • दुःखापतग्रस्त सांध्याच्या वेदना कमी होऊन हालचाली वाढतात
  • पारंपारिक उपचारांपेक्षा रुग्ण जलद बरा होतो.
  • रुग्णाचा दैनंदिन जीवनस्तर उंचाविण्यास मदत करते.

वैद्यकीय कार्यातील माईलस्टोन

  • देशातील पहिली संपूर्ण अनसिमेंटेड दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (टोटल नी रिप्लेसमेंट) करण्याचा बहुमान
  • गुघडे-सांधे प्रत्यारोपणासाठी संपूर्ण स्वयंचलीत क्युविक जॉईंट या ॲक्टिव्ह रोबोटिक सिस्टिमचा वापर करणारे पश्चिम भारतातील पहिले हॉस्पिटल
  • ९९ वर्षीय आजींच्या दखु ापतग्रस्त खुब्यावरील यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
  • राज्यात कार्टिलेज रिकन्स्ट्रक्शन पहिली यशस्वी कॉन्ड्रानेट ग्राफ्ट नेट तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रिया
  • देशातील पहिले सर्विकल युबीई ॲन्ड युबीई फ्यूजन
  • देशात युबीई प्रकरणात आत्तापर्यंत सर्वाधिक यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. मंगेश पाटील, ट्रॉमा सर्जन

सर्व प्रकारच्या आकस्मिक किरकोळ अथवा गंभीर अपघातांवरील तातडीच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये उच्चतम दर्जा असलेले बहुद्देशीय ट्रॉमा सेंटर सदासर्वदा काळ कार्यरत आहे. थ्री-सी आर्म्ससारखी आधुनिक तंत्रज्ञानाने हे कें द्र अद्ययावत करण्यात आले आहे. मेंदवूिकार (न्यूरो) ह्दय, मणका किं वा हाडाच्या गंभीर जखमा किं वा आघातांवर काळजीपूर्वक उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा संच नेहमी रुग्णाच्या सेवेत असतो. अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कु शलतेने हाताळून त्या यशस्वी के ल्या आहेत.

डॉ. के तन देशपांडे, स्पाईन सर्जन

मणक्यांच्या दुखापतींसाठी युबीई तंत्रज्ञानावर आधारित दुर्बिणीमधून शस्रक्रिया (एमआयएसएस) केल्या जातात. यात, रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी कमी जखम होऊन त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते. अवघ्या २४ तासांत त्याला घरी जाण्यासाठी परवानगी दिली जाते. युबीई किं वा बिनटाक्याच्या आत्तापर्यंत पाचशे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आजाराचे निदान झाल्यावर रुग्णावर फिजिओथेरपी, वेदना व्यवस्थापन (पेन मॅनेजमेंट) आणि आवश्यकतेनुसार सर्जरी याप्रमाणे उपचार के ले जातात. युबीई तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी देशी-विदेशी डॉक्टरांना प्रशिक्षणही दिले जात आहे.

डॉ. यशवंत माने, डॉ. गिरीश पोटे, आयव्हीएफ स्पेशलिस्ट

आयव्हीएफ तंत्रज्ञानात अलीकडे काहिसा बदल झाला असून त्यात एम्ब्रियो बायोएफसीद्वारे संतानविरहीत दांपत्यांना निरोगी मूलं जन्माला घालणे शक्य झाले आहे. या उपचारपद्धतीमध्ये, सदोष मूळ गर्भपेशींऐवजी (एम्ब्रियो) निरोगी मूळ गर्भपेशी आईच्या गर्भाशयात सोडल्या जातात. त्यामुळे, दांपत्याचे अनुवांशिक आजार टाळणे काही प्रमाणात शक्य होत आहे. सध्या कमी वयांतील महिलांच्या शरीरातील स्त्रीबीज संख्या कमी होण्याची समस्या दिसून येऊ लागली आहे. त्याचे दुष्परिणाम पुढे गर्भधारणेवर होत असतात. त्यामुळे, महिलांनी एएमएच आणि एएफसी चाचण्या करुन घेतल्या पाहिजेत. ज्या स्त्रीचे गर्भाशय निरोगी किं वा नॉर्मल असेल त्यांना आयव्हीएफ तंत्राद्वारे गर्भधारणा करुन घेण्यात वाढते वय अडसर ठरत नाही. ५३ वर्षाच्या महिलेने आमच्याकडील आयव्हीएफ तंत्रज्ञानाआधारे काही वर्षांपूर्वी तीळे जन्माला घातले.

साईश्री हॉस्पिटल, संचलित द्वारा साईसेवा चॅरिटेबल ट्रस्ट

सर्वे क्र.१५७, सिटी सर्वे क्र.११०४-०३, प्लॉट क्र.२६, डीपी रोड,
शिवसागर हॉटेलजवळ, औंध, पुणे – ४११००७,
दूरध्वनी क्रमांक – 020-25888600, 020-67448600;
+91 9689930612, +91 9689930608
ई मेल – info@saishreehospital.org,
वेबसाईट – https://www.saishreehospital.org

मराठी