मानव रांका, वस्तुपाल रांका, तेजपाल रांका, अनिल रांका, शैलेश रांका, श्लोक रांका, श्रेयस रांका.
सात पिढ्यांची विश्वासार्ह सुवर्ण परंपरा : रांका ज्वेलर
संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्ण व्यवसायातील तब्बल 143 वर्षांची विश्वासार्हतेची लखलखती परंपरा असणारी सुप्रसिद्ध सुवर्णपेढी आहेती म्हणजेरांका ज्वेलर्स. आता या घराण्याची सातवी पिढी हा बावनकशी वारसा पुढंनेत आहे. आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर मिलाफ घडवून ही पेढी सुवर्ण व्यवसायात यशाची नवनवी रंपादाक्रांत करत आहे. सुवर्ण व्यवसायाला नवेआयाम देण्यात रांका ज्वेलर्सचा मोलाचा वाटा आहे. सात पिढ्या एकाच व्यवसायात असणारी ही एकमेव सुवर्ण पेढी पुण्याच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या गौरवात भर घालत आहे.
अवघ्या 30 चौरस फुटाच्या जागेतून सुरुवात झालेल्या रांका ज्वेलर्सची आज पुण्यात 11 आणि ठाणे इथे एक अशी एकूण 12 दालने आहेत. हा विस्तार स्तिमित करणारा आहे. रांका ज्वेलर्सचे प्रमुख आधारस्तंभ फतेचंद रांका यांनी रांका ज्वेलर्सचा प्रदीर्घ प्रवास उलगडून सागिं तला. 1879 मध्ये म्हणजे 143 वर्षांपूर्वी राजस्थानमधूनपुण्यात आलेल्यास्व. चतरींगजी रांका यांनी या व्यवसायाचा पाया घातला. 1908 मध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यांचेपुत्र वालचंदजी यांनी हा वारसा पुढेनेला. वयाच्या 15 व्या वर्षी नगराजजी रांका यांनी हा वारसा पुढेनेला. 1968 मध्ये दोन भावामंध्ये वाटण्या झाल्यामुळेनगराजजी रांका यांनी स्वतंत्रपणेआपला व्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्यांच्या वाट्याला आली होती फक्त एक 30 चौरस फुटाची जागा. नागराजजी रांका यांनी हिमंत न हारता आपल्या वाट्याला आलेले 200 ग्रॅम सोनेव 2 लाख 76 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 2 किलो चांदी या एवढ्याच भांडवलावर आताच्या रांका ज्वेलर्सची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यातील गोविंद हलवाई चौकात अवघ्या 30 चौरस फूट जागेत रांका ज्वेलर्सची सुरुवात झाली. त्या वेळी महापालिकेकडून परवानगी घेऊन एक फळी टाकून दोन ग्राहक बसूशकतील अशी सोय करण्यात आली. कालांतरानेनगराजजी रांका यांच्या पुखराज, फतेचंद, ओमप्रकाश, अशोक आणि महेंद्र या पाच मुलांनी व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि बघता बघता या व्यवसायाचा झपाट्यानं विस्तार झाला. आज तर याचा वटवृक्ष झाला आहे. फतेचंद रांका आणि ओमप्रकाश रांका यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातवी पिढी हा वारसा पुढेनेत आहे. नगराजजी रांका यांनी आपल्या मुलांना एकच शिकवण दिली होती ती म्हणजे, कधीही आपल्या ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. हाच मूलमंत्र सगळ्या पिढ्यांनी जपला आहे. रांका ज्वेलर्स म्हणजे डोळे झाकून खरेदी असे समीकरण लोकांच्या मनात पक्के झाले आहे.
रांका ज्वेलर्सने ग्राहकांचा हाच विश्वास इतक्या प्रदीर्घ वाटचालीत कायम राखला आहे. विश्वासार्हता, गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सचोटी यामुळेत्यांच्या कामाची कीर्ती आपोआपच चहूकडेपसरली आहे. आजही ग्राहक इथून दागिनेखरेदी केल्यावर ते मालकांनी आपल्या हातात द्यावेत असा आग्रह धरतात. कारण इथलेसोनेलाभतेतसेच सोनेम्हणजे लक्ष्मी व शुभशकुन अशी आजही अनेकांची भावना आहे. त्यांची ही भावना जपण्याचेकाम रांका ज्वेलर ध्ये आवर्जून केलेजाते. ग्राहकांना मिळणारी ही आपुलकीची वागणूक त्यांना सुखावतेआणि तेकायमचे जोडलेजातात. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचेधडे गिरवलेल्या रांका बंधूंनी 1979 मध्ये महाराष्ट्रातील पहिलेवातानुकूलित दालन सुरू केलं. त्या काळात संपूर्ण वातानुकूलित पेढी ही अत्तयं आगळीवेगळी गोष्ट होती. पहिल्याच दिवशी ग्राहकांची एक किलोमीटरची रांग लागली होती. ग्राहकांचा हा प्रतिसाद म्हणजेसचोटी, विश्वासार्हता ही मूल्य जपून केलेल्या अथक हनतीचेप्रतीक होते. त्या वेळी पुण्यातील बहुसंख्य ग्राहक मुंबईला सोने, चांदी व हिऱ्यांचेदागिनेखरेदीसाठी जात. मात्र रांका ज्वेलर्सकडे सोने, हिऱ्यांचेदागिने, चांदीच्या वस्तूंची प्रचंड व्हरायटी मिळूलागल्यानंहा सगळा ग्राहकवर्ग पुण्यातच खरेदी करू लागला. सोने, चांदीचेव हिऱ्यांच्या दागिन्यांसह इतर रत्नांचेदागिने, पोलकी, जडाऊ दागिनेही देखील रांका ज्वेलर्सची खासीयत आहे. संपूर्ण भारतात दागिन्यांच्या कारागिरीसाठी प्रसिद्ध कोलकाता, राजस्थान, गुजरात, कोईमतूर अशा विविध ठिकाणचे कारागिर त्यांच्याकडेअसल्यानं डिझाइन्समध्ये सतत नावीन्य असते. पुणे शहरातील वातावरण कॉस्मोपॉलिटिन होत आहे, त्याची दखल घेत नवीन पिढीला आवडतील असे दागिने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यास सुरुवात केल्यानं नव्या पिढीतील मोठा ग्राहकवर रांका ज्वेलर्सशी जोडला गेला. पारंपरिक अलंकारांबरोबरच आजच्या काळातील तरुणाईची मागणी असणारे आधुनिक डिझाइन्सचेदागिन्यांचीही मोठी व्हरायटी उपलब्ध असते. त्यामुळेनवी आणि जुनी अशा दोन्ही पिढ्या इथे आनंदाने खरेदी करतात. ग्राहक हीच संपत्ती हे तत्व जपत रांका ज्वेलर्सने नेहमीच ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य दिले. त्यासाठी नवनवीन संकल्पना राबवणेही रांका ज्वेलर्सची खासियत. रांका ज्वेलर्सनेजेव्हा आपल्या व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली तेव्हा अगदी दालन उभारण्यापासून तिथल्या दागिन्यांपर्यंत अनेक बाबीमध्ये नावीन्यता आणली. रांका ज्वेलर्सची सर्व दालनेही अत्तयं प्रशस्त, बहुमजली आणि वातानुकूलित आहेत. कालानुरूप बदल करण्याचेकसब त्यांनी आत्मसात केल्यानं रविवार पेठेतील एका दालनापासून सुरू झालेला हा प्रवास 53 वर्षांत पुण्यातील लक्ष्मी रोड, कर्वेरोड, पिंपरी चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, सातारा रोड, बंडगार्डन, बाणेर, पिंपळे सौदागर (रहाटणी) आणि कोंढवा अशा 11 ठिकाणी आणि पुण्याबाहेर ठाणे इथे असलेल्या एका दालनासह एकूण 12 दालनांपर्यंत पोहोचला आहे. सुमारे 1०00 पेक्षा जास्त कर्मचारी इथे काम करत आहेत. कर्मचाऱ्यांची काळजी घेणारी पेढी अशी ही या पेढीची ओळख आहे. रात्री उशीरा महिला कर्मचाऱ्यांना घरी सोडण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळेइथेग्राहक वर्गाला मिळणाऱ्या सेवेतही आपुलकी, तत्परता असते. वातावरणात सकारात्मकता, उत्साह असतो.
नावीन्याची आस
नवनवीन प्रयोग हे रांका ज्वेलर्सचे वैशिष्ट्य आहे. यातूनच नवनवीन संकल्पना राबवण्याचे धाडस त्यांनी केले आहे. यातीलच एक धाडसी कल्पना म्हणजे बिनडागी दागिने. पूर्वी सोन्याचे बहुतांश सर्व दागिने डागाचे असायचे. बिनडागी दागिने फक्त निर्यातीसाठी वापरले जात असत. त्यामुळे दागिने मोडताना ग्राहकांना मोठी तूट येत असे. त्यावेळी रांका ज्वेलर्सने इथल्या ग्राहकांसाठी देखील बिनडागी दागिने तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. बिनडागी दागिने विक्री सुरू करणारी रांका ज्वेलर्स ही महाराष्ट्रातील पहिली पेढी आहे.
सोन्याच्या नावीन्यपूर्ण डिझाइन्ससाठी सुप्रसिद्ध असलेल्या रांका ज्वेलर्सने या क्षेत्रातही आपली ‘क्रिएटिव्हिटी’ सर्वांना दाखवून दिलेली आहे. रांकांनी बनवलेला ‘सोन्याचा शर्ट’ आजही अनेकांच्या स्मरणात असेल. त्यापाठोपाठ तयार केलेल्या ‘सोन्याच्या साडी’ने महिलावर्गाचे लक्ष वेधून घेतले होते. आता कोविडकाळातही चक्क ‘सोन्याचा मास्क’ तयार करून रांकांनी पूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
हॉलमार्किंग सक्तीचा कायदा 2020 पासून; पण रांका ज्वेलर्समध् मात्र हॉलमार्किंग ये 1906 पासूनच
हॉलमार्किंग हेआताच्या पिढीला माहीत आहे, सरकारनेही आता सराफ व्यावसायिकांवर त्यासाठी सक्तीचेकेलेआहे; पण पुण्यात रांका ज्वेलर्सने 1906 पासूनच आपल्या ग्राहकांना हॉलमार्किंग केलेले दागिनेदेण्यास सुरुवात केली होती. पूर्वीच्या काळी दागिनेखरेदी केली जात असेती त्या सराफाच्या विश्वासावर. सोन्याची शुद्धता तपासून पाहण्याचेत्यांचेजेतंत्र असेत्यावर डोळेझाकून विश्वास ठेवून लोक दागिनेखरेदी आणि विक्री करत असत. त्या काळातही कोणत्या पेढीचे दागिने आहेत, त्याची शुद्धता याची माहिती देणाऱ्या, स्वतः हॉलमार्किंग केलेलेदागिनेदेण्याची पद्धत रांका ज्वेलर्सनेराबवली होती. या व्यवसायातील आधुनिकतेची ती पायाभरणी होती. आजसुद्धा ग्राहक हॉलमार्कपेक्षा रांका ज्वेलर्सच्या लोगोची मागणी करतात. यावरून ग्राहकांचा किती मोठया प्रमाणात आमच्या पेढीवर विश्वास आहेहे सिद्ध होते. फतेचंद रांका, अनिल रांका व वस्तुपाल रांका हेगव्हर्नमेंट अप्रुव्हड व्हॅल्अर यु असून, त्यांनी केलेल्या सोन्याच्या व्हॅल्युएश बँकेसहीत इनकॉमेटॅक्स व इतर सरकार दरबारी प्रमाण मानलेजाते. इतर सराफी व्यावसायिकही रांका ज्वेलर्सकडील सोने असेल तर डोळेझाकून तेखरेदी करतात
चांदीचा नवा आविष्कार – सिल्व्होग ब्रँड
पूर्वीच्या काळी चांदीचा वापर हा पूजेची उपकरणे, देवदेवतांच्या मूर्ती, काही ठरावीक दागिने यासाठीच केला जात असे. मात्र रांका ज्वेलर्सने चांदीच्या वस्तूंमध्ये इतकेनावीन्य आणलेकी आज संपूर्ण महाराष्ट्रात चांदीच्या नावीन्यपूर्ण वस्तूंसाठी त्यांची पेढी अव्वल मानली जाते. चांदीचेफर्निचर ही संकल्पना तर त्यांनीच प्रथम सादर केली. चांदीचेकपाट, डायनिंग टेबल, झोपाळे, खुर्च्या, सोफा अशा एकापेक्षा एक देखण्या राजेशाही वस्तू त्यांच्या दालनात पाहायला मिळतात. ‘सिल्व्होग’ हा चांदीचा ब्डरँ अल्पावधीत प्रसिद्ध झाला आहे. चांदीचे अत्तयं सुंदर कलाकुसरीचे, अँटीक व वेगवेगळ्या डिझाइनमध्ये भांडी, भेटवस्तू यांना सर्व थरातून चांगली पसंती व मागणी आहे. दागिनेतर सर्वांनाच मोहात पाडतात. चांदीची कॉश्च्युम ज्वेलरी ही त्यांची खासीयत आहे. चांदीचा सिल्व्होग हा दागिन्यांचा ब्डचरँ त्यांनी दाखल केला आहे. या अंतर्गत सादर करण्यात येणाऱ्या आकरक्ष दागिन्यांना महिला वर्गाची विशेष पसंती मिळत आहे. भेटवस्तू देण्यासाठी तर चांदीमध्ये तर असंख्य आकरक्ष वस्तू त्यांच्याकडेउपलब्ध असतात.
नवी पिढी नवी दृष्टी
रांका ज्वेलर्सच्या विस्तारात नव्या पिढीचा मोठा वाटा आहे. नगराजजी रांका यांची नातवंडेअनिल, तेजपाल, वस्तुपाल, शैलेश, श्रेयस, पणतू मानव, श्लोक, रुषभ आणि विवान रांका या घराण्याची सातवी पिढी आता या व्यवसायाचा वैभवशाली वारसा समर्थपणे पुढेनेत आहे. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आणि वाडवडिलांनी कसोशीनं जपलेली व्यवसाय मूल्ये जोपासतानाच त्याला आधुनिकतेचा साज चढवत हा व्यवसाय तेपुढेनेत आहेत. या नव्या पिढीनं आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा, ग्राहकांच्या आवडी निवडीचा, बदलतेट्रेंड्स, बदलत्या फॅशन्सचा अभ्यास करून दागिनेदेण्यावर तसंच आधुनिक सेवांवर भर दिला आहे. आधुनिक काळातील मागणीनुसार त्यांनी ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध केली असून, त्यांच्या वेबसाईटवरून घरबसल्या खरेदी करता येते.
नव्या पिढीच्या विशेष कौशल्याचा उपयोग व्यवसाय विस्तारासाठी होत आहे. सीए असलेले मानव रांका आर्थिक व्याप चोख राहण्यासाठी तत्पर आहेत. तर इटलीमधून ज्वेलरी डिझाइनचे शिक्षण घेतलेले श्लोक रांका हिऱ्यांचेनाविन्यपूर्ण दागिने घडवण्यावर भर देत आहेत. शैलेश रांका यांनी मँचेस्टरमधून इंडस्ट्रीयल व बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एम.एस.सी. आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हची पदवी संपादन केली असून त्यांनी पारंपरीक व्यवसायामध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट आणली आहे. त्यामुळे रांका ज्वेलर्सची खासीयत आणखी वृद्धींगत होण्यास हातभार लागत आहे. पूर्वी सर्वसामान्य ग्राहक वर्ग सोन्याच्या वजनदार दागिन्यांनाच प्राधान्य देत असे; पण आता आधुनिक काळातील पिढी सोन्याचे
भारदस्त दागिनेव हलक्या वजनाच्या नाजूक नक्षीच्या दागिन्यांना पसंती देते. हिऱ्यांच्या दागिन्यांनाही आता अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे नवीन पिढीनं हेबदल हेरून आपल्या दालनांमध्ये हिऱ्यांचे, प्लॅटीनमचेदागिनेउपलब्ध केले. हिऱ्यांचेदागिने मान्यताप्राप्त संस्थेच्या प्रमाणपत्रासह दिलेजात असल्यानेग्राहकांना अस्सल हिरेच मिळाल्याची खात्री असते. त्याशिवाय तुमच्या आवडीप्रमाणे डिझाइन तयार करून देण्याचीही सुविधा आहे. याशिवाय माणिक, मोती, पाचू, पुष्कराज, हिरा, पोवळा, निलम, गोमेद, कॅट्स आय अशी सर्व अस्सल रत्नेही इथे मिळतात. ‘चोझन डायमंड ब्यूटिक’ ही एक अनोखी संकल्पना रांका ज्वेलर्सनेनुकतीच पिंपरी चिंचवड येथील दालनात सादर केली आहे. चिंचवड येथील शोरूमचेतेजपाल रांका यांची ही संकल्पना असून याच धर्तीवर कर्वेरोडचेवस्तुपाल रांका यांचे‘रेअर ज्वेल्स’, तसेच बंडगार्डन शोरूमचेश्लोक रांका हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा डायमंड ज्वेलरीच्या ‘रांका हेरिटेज’ या ब्यूटिकचेव्यवस्थापन पाहत आहेत. डायमंड ज्वेलरीच्या चोखंदळ ग्राहकांसाठी अत्यंत प्रशस्त दालन तयार करण्यात आलेअसून, तिथेत्यांना निवांतपणेबसून हवी ती डिझाइन्स बघून आवडत्या दागिन्यांची खरेदी करता येईल. पार्किंगची सुविधा, वातानुकूलित दालन, तत्पर हसतमुख सेवा देणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि अत्यंत खास डिझाइन्स ही या ब्यूटिकची वैशिष्ट्ये आहेत. अपॉइंटमेंट घेऊनच ग्राहकांना इथेसेवा दिली जाते. ही अनोखी संकल्पना उच्चभ्रू ग्राहक वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय ठरत आहे.
सामाजिक कार्याचा वसा
रांका ज्वेलर्स सामाजिक कार्यातही नेहमीच आघाडीवर असते. नुकत्याच राज्यात आलेल्या पुराच्या संकटात कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील पूरग्रस्तांसाठी रांका परिवाराच्यावतीनं आठ टन जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. 19 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले 1000 संच एका दिवसात तयार करून पाठवण्यात आले. ओमप्रकाश रांका हे पुणे पांजरपोळ ट्रस्ट या गोशाळेच्या माध्यमातून गायींची देखभाल करीत आहेत. सुरुवातीला इथे 90 गायी होत्या आता तिथं 2100 गायी आहेत. कोविडकाळात दररोज 1200 लोकांना मोफत जेवण दिलेजात होते.
‘रांका हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक सोईसुविधा
रांका परिवारातील डॉ. रमेश रांका यांनी वैद्यकीय क्षेत्राची वेगळी वाट चोखाळत या क्षेत्रात रांका परिवाराच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेला आहे. आर्थोपेडिक तज्ज्ञ असलेले डॉ. रमेश रांका मुकुं दनगर इथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे 101 बेड्सची क्षमता असलेले मल्टिस्पेशालिटी रांका हॉस्पिटल चालवत आहेत. हे हॉस्पिटल या भागातील नागरिकांना अत्युत्तम वैद्यकीय सेवा देत आहे.
पुरस्कारांनी कार्याचा गौरव
रांका ज्वेलर्सनी सुवर्ण व्यवसायात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अनिल रांका, शैलेश रांका, वस्तूपाल रांका, तेजपाल रांका आणि श्रेयस रांका यांना राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांनी सर्वोत्कृष्ट व्यावसायिक म्हणून गौरवण्यात आले आहे. वकिलीचेशिक्षण घेतलेले फतेचंद रांका सुवर्ण व्यवसायातील व्यावसायिकांच्या अडचणी दुर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पुणेव्यापारी महासंघ, पुणेसराफ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, ऑल इंडिया टास्क फोर्स याचे नेतृत्व करत आहेत. ओमप्रकाश रांका हेसध्या जीतो (पुणे चॅप्टर) व जैन दादावाडी टेम्पल ट्रस्ट या संस्थेत चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. फत्तेचंद रांका यांना समाजातील विविध संस्थांकडून २०० च्या वर ॲवॉर्डस, स्मृतिचिन्हे, सन्मानपत्र, ॲप्रिसिएशन सर्टिफिकीट, मेडल्स त्यांच्या कार्याची पावती म्हणून मिळाली आहेत. ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमॅस्टिक कौन्सीलच्यावतीने पुणेसराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्स समूहाचे मालक फत्तेचंद रांका यांना ‘जेम ऑफ दि ईयर’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. तसेच ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सीलतर्फे आयोजित केलेल्या सर्वोत्तम इअर रिंग्ज् स्पर्धेमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सनेडिझाइन केलेली इअर रिंग्ज सर्वोत्कृष्ट ठरली.
मंदिरांमध्ये सेवा रुजू
रांका ज्वेलर्सचे चोख काम त्यांची प्रसिद्धी करत असते, त्यामुळे हाराष्ट्रातील 125 पेक्षा अधिक देवळांतील चांदीची सजावट, देवदेवतांचे दागिने, मूर्ती घडविण्याचा मान रांका ज्वेलर्सला मिळाला आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीची 85 किलोची चांदीची मूर्ती, दागिने, न्याचेसिंहासन, मंडई इथल्या शारदा गणेशाची चांदीची मूर्ती, चांदीची सजावट, जेजुरी कडेपठार येथील श्री मार्केडेय यांच्या गाभाऱ्यातील चांदीची आरास, प्रभावळ इत्यादी, श्री खंडोबाचा सोन्याचा 1500 ग्रॅमचा हार, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिरातील सजावट, श्री महालक्ष्मी देवीची सोन्याची साडी, सारसबाग इथल्या गणपती मंदिराची चौकट व सिंहासन, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचा चांदीचा रथ आणि पालखी, त्रिपुरा इथल्या माता बरी त्रिपुरा सुंदरी देवीच्या गाभाऱ्याचे चांदीचे दरवाजे, सासवड येथील सोपान देवांची चांदीची पालखी, कात्रज येथील आगम मंदिर, पद्मावती देवी, मणिभद्र देव, आळंदी येथील श्री भैरवनाथ मंदिर यासह जैन तीर्थकर व देवीदेवतांच्या मूर्ती आणि मंदिरेही उभारली आहेत.
विठ्ठल मंदिराच्या स्वच्छतेचा वसा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचेश्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल मंदिराची आषाढी वारीच्या दरम्यान स्वच्छता करण्याचा वसा गेली 18 वर्षेरांका ज्वेलर्सनी सांभाळला आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या आधी रांका ज्वेलर्सच्या 250 कर्मचाऱ्यांची तुकडी आणि रांका परिवारातील सर्व सदस्य सर्व मंदिराची विनामोबदला स्वच्छता करतात. मंदिर झाडून, पुसून, धुऊन लखलखीत के लेजाते. भगवंताच्या चरणी अतिशय भक्तिभावानेसर्वजण आपली सेवा रुजूकरून कृ तज्ञता व्यक्त करतात.
नव्या पिढीतील महिलाशक्तीचा सक्रिय सहभाग
रांका ज्वेलर्सच्या प्रगतीत या कु टुंबातील नव्या सुनांचाही मोलाचा हातभार आहे. कर्मचारी टिकवून ठेवणं, दालनातील व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणं, चोरीसारखे प्रकार बंद होणं, महिला कर्मचाऱ्यांमध्ये अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण होणं, महिला ग्राहकांचा ओघ वाढणं अशा अनेक बाबतींत या घरातील महिलांच्या सहभागाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. डॉ. रमेश रांका यांच्या पत्नी मोनिका या रांका हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहतात, त्याचबरोबर रविवार पेठ, बंडगार्डन रोड व कोंढवा येथील सुवर्णदालनांच्या दैनंदिन कामकाजातही उत्साहाने भाग घेतात. वस्तुपाल रांका व त्यांची पत्नी शीतल रांका हे कर्वे रोड, सातारा रोड, बाणेर, हडपसर आणि ठाणे इथली दालनेसांभाळतात. तेजपाल रांका यांच्या पत्नी आशा रांका या पिंपरीतील दालनाचे व्यवस्थापन यशस्वीपणेसांभाळत आहेत. अनिल रांका यांच्या पत्नी ज्योत्स्ना रांका रविवार पेठ, कोंढवा आणि बंडगार्डन इथल्या दालनांचे कामकाज सांभाळतात. शैलेश रांका यांची पत्नी विमिशा व श्रेयस रांका यांची पत्नी रूचिता (सी.ए.) या लक्ष्मी रोड, सिंहगड रोड व पिंपळेसौदागर येथील व्यवसायात सक्रिय सहभाग घेतात. मानव रांका यांची पत्नी गहना रांका यांची कौटुंबिक पार्श्वभूमी हिरेव्यापाराची असल्यानं त्याही त्या क्षेत्रातील आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग रांका ज्वेलर्ससाठी करण्याकरिता सज्ज झाल्या आहेत. रांका परिवारातील सुना यांचा व्यवसायवृद्धीसाठी मोठा हातभार आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडींचा अभ्यास करणे, त्याप्रमाणे व्यवसायात बदल करणे, नवीन संकल्पना व व्यवस्थापन कुशलतेने सर्वजणी पार पाडत आहेत. रांका परिवाराने आपल्या घरातील सुनांना आपलेशिक्षण, कौशल्य यांचा उपयोग व्यवसायासाठी करण्याची संधी दिली, त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे.