सराफी व्यवसायात सर्वांत महत्त्वाचा असतो, तो ग्राहकांचा विश्वास आणि हीच मौल्यवान गोष्ट ‘पीएनजी ज्वेलर्स’नं जपलेली आहे. विश्वासार्हतेचा वारसा कायम राखल्यानं एकेकाळी पुण्यातील सराफी पेढी अशी ओळख आता ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडमध् रूपांत ये रित झाली आहे. ग्राहकांना काय हवं आहे, याची जाणीव ठेवनू काळानुरूप बदलत असताना आम्ही हीच एक गोष्ट कायम राखली. त्यामुळंच आज आम्ही केवळ महाराष्ट्राचा नाही तर भारताचा ब्रँड बननू परदेशातही ही परंपरा पोहोचवली आहे. १८३२ मध् सुरू झालेला ये हा प्रवास आता २०३२ च्या दिशेनं सुरू झाला आहे. त्यासाठी परंपरा जपतानाच आम्ही आधुनिकतेचा वसाही जोपासला आहे. बदलत्या काळात नवी पिढी तंत्रज्ञानाच्या आधारे मिळणाऱ्या सेवांना प्राधान्य देते, त्यामुळं जुन्या आणि नव्या पिढीला आम्ही त्यांना हव्या त्या माध्यमातून सेवा देत आहोत. आमच्या या धोरणामुळं कोविड साथीच्या काळातही आम्ही ग्राहकांना सेवा देऊ शकलो. काळानुरूप ग्राहकांच्या वडीनिवडी, अपेक्षाही बदलत जातात. ते बदल जाणून घेऊन आम्ही ग्राहकांना नवनवीन गोष्टी देत असतो. त्यामुळं ग्राहकांच्या पिढ्यानपि् ढ्या आमच्याशी आजही जोडलेल्या आहेत.
पीएनजी ज्वेलर्स : विश्वासार्हतेचे दुसरे नाव
कोणत्याही व्यवसायात महत्त्वाचा असतो, तो ग्राहकांचा विश्वास! ग्राहकांचा विश्वास जिंकणारी कंपनी पुढं जाऊन ब्रँड बनते. या विश्वासार्हतेच्या बळावरच १८३२ पासूनचा वारसा असणाऱ्या ‘पीएनजी ज्वेलर्स’नं सुवर्ण व्यवसायातील बावनकशी नाममुद्रा ठरण्याचा मान पटकावला आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर साता-समुद्रापार ‘पीएनजी ज्वेलर्स’ हा ब्रँड पोहोचला आहे. लखलखत्या परंपरेचा वारसा असाच अबाधित ठेवण्यासाठी ही बावनकशी नाममुद्रा सज्ज आहे.
परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ साधत भविष्याकडे वाटचाल : सौरभ गाडगीळ
तंत्रज्ञानाचा लाभ :
कोविड संकटाच्या काळात व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मदतीला आलं, ते आधुनिक तंत्रज्ञान. अर्थात तंत्रज्ञानाचा वापर आम्ही आधीपासूनच सुरू केला आहे. नवनवीन तंत्रज्ञान अवलंबवणे आणि ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे आमचे धोरण पहिल्यापासूनच आहे. त्यामुळं कोविड काळात आम्ही ग्राहकांना अगदी तत्पर सेवा देऊ शकलो. ऑनलाइन दागिने खरेदीची सोय उपलब्ध करून दिल्यामुळं अगदी राज्याबाहेरच्या ग्राहकांनाही सेवा देऊ शकलो. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात सेवा देणं कठीण होतं; पण राज्याबाहेर सेवा देणं शक्य होतं. त्यावेळी इतर राज्यात जवळपास ५ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा दिली. राज्याबाहेरच्या ग्राहकांनी आमच्याकडून दागिने मागवले, यावरूनच आपल्या ब्रँडची विश्वासार्हता स्पष्ट होते. कारण ऑनलाइन दागिन्यांची खरेदी करणं मोठं धाडसाचं असतं. अशावेळी ग्राहक ब्रँड पाहून मगच खरेदी करतात. त्यामुळं ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीसाठी आमची निवड केली, ही फार महत्त्वाची बाब आहे. आम्ही ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला वस्तू घरपोच पाठवतो. आता ही सुविधाही लोकांच्या पसंतीला उतरली आहे. कारण या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या निवांतपणे खरेदी करता येते. मुख्य म्हणजे, ‘पीएनजी ज्वेलर्स’वर विश्वास असल्यानं ग्राहकही अगदी निर्धास्तपणे खरेदी करतात. पूर्वी ऑनलाइन खरेदी करताना ग्राहक अल्प प्रमाणात करत असे; पण आता ही सुविधा सवयीची झाल्यानं अगदी २०, २५ ग्रॅम सोन्याची खरेदीही ऑनलाईन केली जाते.
कोविडकाळातील बदलते ट्रेंड :
आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य आहे. केवळ चकाकणारा धातू म्हणून सोनं घेतलं जात नाही, तर ती एक परंपरा आहे. आपल्या देशात शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं. सोन्यातील गुंतवणूक ही लाभदायी समजली जाते; पण कोविड साथीच्या संकटानं आर्थिक परिस्थिती बिघडल्यानं सोने खरेदीवरही त्याचा परिणाम झाला. पहिल्या लॉकडाउनच्या काळात लोक आर्थिक बाबतीत चिंताग्रस्त होते; मात्र दुसऱ्या लॉकडाउनच्या काळात आर्थिक स्थितीही रुळावर येत असल्यानं लोक गुंतवणुकीकडे वळू लागले. त्यातही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. दरम्यानच्या काळात आयटी, हेल्थकेअर, फार्मा आदी क्षेत्रात वाढ झाल्यानं या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांची क्रयशक्ती वाढली. त्यामुळं सोने खरेदीकडे या क्षेत्रातील मंडळींचा कल अधिक आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी नाणी, वळी, बिस्किटे घेतली जात आहेत; त्याचबरोबर तरुण नोकरदार मुली सोन्याचे लाइट वेट दागिने घेण्याला पसंती देत आहेत. त्याचप्रमाणं हिऱ्यांचे दागिने घेण्याकडेही तरुण पिढीचा कल वाढतो आहे. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील मंडळी हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी आवडीने करत आहेत. विशेष म्हणजे, तरुण मुली मंगळसूत्र घेताना हिऱ्याचे मंगळसूत्र घेण्याला अधिक प्राधान्य देत आहेत.
‘मेक टू ऑर्डर’वर भर :
या काळात ग्राहकवर्गाचा भर ऑर्डर देऊन दागिने करून घेण्याकडे वाढल्याचे दिसत आहे. सध्याच्या काळात लोकांना घरी राहण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे. त्यामुळं दागिने करून घेण्यासाठी आवश्यक तेवढा अवधी मिळत आहे. आपल्या आवडीनुसार हव्या त्या वजनातील, डिझाइन आणि बजेटनुसार दागिने करून घेणं शक्य होत आहे. घाईनं तयार असतील ते दागिने घेण्याची गरज सध्या भासत नाही. त्यामुळं हौशी ग्राहक वर्ग आपल्या आवडीचं डिझाइन देऊन दागिने घडवण्यावर भर देत आहे.
संकल्पना ‘हॅपिनेस’ची :
व्यवसायाच्या वाढीत ग्राहक हा महत्त्वाचा घटक असतोच, त्याचप्रमाणं कर्मचारी, कारागीरही अत्त म यं हत्त्वाचे असतात. त्यामुळं त्यांच्यासाठीही कामाच्या ठिकाणी वातावरण उत्तम राहील, हा आम्ही प्रयत्न करत असतो. यातूनच आम्ही ‘हॅपिनेस’ ही संकल्पना राबवली आहे. आमच्या कार्पोरेट ऑफिसमध् माझ् ये यासह कोणालाही स्वतंत्र केबिन नाही. सर्व कर्मचाऱ्यांना समानतेची वागणूक दिली जाते. त्यामुळे कोणताही कर्मचारी अगदी सहजपणे आपल्या वरिष्ठांना भेटू शकतो. या खुल्या वातावरणामुळं मोकळेपणा वाढला आहे. याचा परिणाम आपसूकच कामावर दिसून येत आहे. अशा संकल्पना राबवणं व्यवसायाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे
हॉलमार्किंगची सुरुवात १५ वर्षापूर्वीच :
सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेचं प्रमाणीकरण करणारी हॉलमार्किंग ही एक सरकारमान्य, कायदेशीर पद्धत आता सगळीकडे अनिवार्य आहे. प्रत्येक दागिना हॉलमार्किंग केलेला असणं सराफ व्यावसायिकांसाठी बंधनकारक आहे. ग्राहकही त्याबाबत जागरूक झाले आहेत. यामुळं सराफ व्यवसायातील फसवणुकीला आळा बसला आहे. ग्राहकांच्या हिताची ही बाब आहे. त्यामुळं असे नियम येण्याआधीपासूनच आम्ही त्याबाबत दक्षता घेत आहोत. १५ वर्षांपूर्वीच आम्ही हॉलमार्किंगला सुरुवात केली होती. दाजीकाका गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली बहरलेल्या या व्यवसायात ‘पीएनजी ज्वेलर्स म्हणजे शंभर टक् शुद्धता’ अशी आमची ओळख झाली के होतीच; पण त्यावर अधिकृत प्रमाणीकरणाचे शिक्कामोर्तबही आम्ही खूप आधीच केले. एवढंच नव्हेहिऱ्यांच्या दागिन्यांचं सर्टिफिकेशनही आम्ही फार पूर्वीपासूनच देत आहोत. राष्ट्रीय पातळीवर या व्यवसायात जे स्टँडर्डस् आहेत, ते आम्ही खूप आधीच अवलंबले, त्यामुळं ग्राहकांना ‘पीएनजी ज्वेलर्स’कडून खरेदी करताना आपण सर्वोत्तम खरेदी करत असल्याचं समाधान मिळत गेलं आणि ग्राहक ‘पीएनजी ज्वेलर्स’मध्ये खरेदी करणं, ये हे अभिमानाचे समजू लागले.
पेढीपासून ब्रँडपर्यतचा प्रवास :
‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ अर्थात ‘पीएनजी ज्वेलर्स’ची सुरुवात झाली ती १८३२ मध् सांगली इ ये थं. तिथनू पुण्यात लावलेल्या या पेढीच्या रोपट्याचा आज परदेशापर्यंत पसरलेल्या वटवृक्षात झालेलं रुपांतर म्हणजे १८८ वर्षांच्या लखलखत्या कारकिर्दीचा वस्तुपाठ आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ओळख पुण्यात या पेढीची स्थापना करणारे दाजीकाका गाडगीळ यांच्याशिवाय अपूर्ण आहे. १९५८ मध् दाजीकाका पुण् ये यात आले आणि लक्ष्मी रोडवर ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’चं पहिलं दालन त्यांनी सुरू केलं. अनेक नवीन संकल्पना, उपक्रम त्यांनी राबवले आणि या व्यवसायात आमूलाग्र बदल घडवले. हीच सुरवात होती ‘पीएनजी ज्वेलर्स’ची एक ब्रँड म्हणून ओळख निर्माण होण्याची. सचोटी, पारदर्शकता आणि आपुलकी यामुळं ‘पीएनजी ज्वेलर्स’ घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचले. लोकांच्या विश्वासाच्या बळावर ‘पीएनजी ज्वेलर्स’ची व्याप्ती वेगानं वाढू लागली. २००१ मध् पौड रोड ये वर दुसरं दालन उभं राहिले. त्यानंतर पुण्याच्या चहू दिशेला ‘पीएनजी ज्वेलर्स’नं विस्तार केला. आज पुण्यात ‘पीएनजी ज्वेलर्स’ची १० दालने आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात ३० दालने आहेत. तर गोव्यात दोन दालने आहेत. साता-समुद्रापार अमेरिकेतही ‘पीएनजी ज्वेलर्स’नं आपला झेंडा रोवला आहे. एवढंच नव् तर दुबईत हे ही ‘पीएनजी ज्वेलर्स’ची नाममुद्रा झळाळत आहे.
व्यवसायातील उत्कृष्टतेचा पुरस्कार :
एखादा दागिना घडवताना त्याच्यावर अनेक कलाकुसरीचे संस्कार होत असतात. व्यवसाय वाढवताना नजाकतीने काम करणाने कारागीर पासून थेट ग्राहकांशी हसतमुख संवाद साधणारे कर्मचारी यासर्वांच्या सहकार्यामुळे अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या टीमला सन्मानित करण्यात आले आहे. २०२०साठी ‘मदर इंडिया’ या अडॅफिल्मला डिजिटल प्टफॉ लॅ र्मवरील २०२० ची ‘सर्वोत्कृष्ट अडॅफिल्म’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. त्याचप्रमाणे ‘आयकॉन ऑफ पुणे, सर्वोत्कृष्ट गोल्ड ज्वेलरी कलेक्शन २०१९, सर्वोत्कृष्ट प्लॅटिनम ज्वेलरी २०१९, सातव्या जीजेटीसीआय उत्कृष्टता पुरस्कार २०१९ मध्ये ‘इन्फ्एनलुर ऑफ इंडस्ट्री’ पुरस्कार, अवॉर्ड फॉर व्हिजनरी इन ज्वेलरी रिटेल, पाचव्या इंडियन बुलियन अड ज्वेलरी अवॉर्ड २०१८ मध्ये ‘बेस्ट प्रॉमिसिंग जेम्स अड ज्वेलरी कंपनी’ पुरस्कार, इंडियाज मोस्ट प्रीफर्ड ज्वेलर्स २०१७-१८, रिटेलर ऑफ जेम्स अनॅ्ड ज्वेलरी इंडस्ट्री ऑफ इंडिया २०१६ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आपुलकी, जिव्हाळा हेच ‘पीएनजी ज्वेलर्स’चं लेणं!
१९८९ पासून म्हणजे गेली २५-३० वर्षं आम्ही लक्ष्मी रोडवरील ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या दालनातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची, वस्तूंची खरेदी करत आहोत. मी व्यवसायानं ऑडिटर असून माझं ऑफिस लक्ष्मी रोडवरच आहे. त्यामुळं इथल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या दालनातून दागिने खरेदी करणे अगदी सोपं होतं. पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिक दागिन्यांपर्यंतच्या सर्व प्रकारांतील अनेक डिझाइन्स इथं पहायला मिळतात. त्यामुळं खरेदी करताना आपल्या आवडीचा दागिना मिळण्याची खात्री असते. तसंच इथले कर्मचारी उत्तम तऱ्हेनं प्रशिक्षित असून, ग्राहकांना अत्यंत आदरानं आणि आपुलकीनं सेवा देतात. त्यामुळं खरेदी करणं आनंददायी होतं. हीच आपुलकी, जिव्हाळा हेच ‘पीएनजी ज्वेलर्स’चं लेणं आहे, तसंच ‘पीएनजी ज्वेलर्स’मधून दागिन्यांची खरेदी करणं म्हणजे जसा पैठणीवर कोल्हापुरी साज! श्रावण महिन्यात ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे मंगळसूत्र महोत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यात असतो सणांचा उत्सव तसा, ‘पीएनजी ज्वेलर्स’मध्ये असतो मंगळसूत्र महोत्सव, असं मला म्हणावंसं वाटतं.
– राधा सुनील तुंग
‘पीएनजी ज्वेलर्स’ म्हणजे शुद्धता
‘पीएनजी ज्वेलर्स’ यांची ख्याती सर्वत्र आहे. कारण ‘पीएनजी ज्वेलर्स’ म्हणजे ‘शंभर टक् शुद्ध’ अशी खा के त्री ग्राहकांना असते. सौंदर्य खुलवणारे सोन्या-चांदीचे, हिऱ्यांचे दागिने हा स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आपल्या संस्कृतीत दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळं उत्कृष्ट दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ‘पीएनजी ज्वेलर्स’. मी गेली १५ वर् ‘पीए षं नजी ज्वेलर्स’मध्च खरेदी करत ये आहे. इथं दागिन्यांची नवनवीन डिझाइन्स असतातच; पण प्रत्येक दागिना हॉलमार्किंग केलेला असतो. तसंच इथलं वातावरणही अतिशय प्रसन्न आहे. प्रत्क क ये र्मचारी हसतमुख चेहऱ्यानं ग्राहकांच्या सेवेत तत्पर असतो. त्याचप्रमाणं मी इथंच खरेदी करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं सोनं लाभतं, असा माझा अनुभव आहे. स्त्रियांसाठी दागिने म्हणजे तिचं स्त्रीधन असतं. मी इथं दागिने घ्यायला लागले तेव्हापासून माझ्या दागिन्यांच्या संग्रहात भरच पडत गेली. वेळप्रसंगी याच दागिन्यांनी अडचणही दूर केली. ‘पीएनजी ज्वेलर्स’मध्येहव्या त्या डिझाइनचे दागिने बनवनहू ी मिळतात. कमी वजनातील दागिन्यांचीही मोठी व्हरायटी इथं असते. त्यामुळे अनेक महिलांचे दागिन्यांचे स्वप्न पूर्णहोते. तसंच इथली टेम्पल ज्वेलरी, कोलकाता पटॅर्न, मीना वर्क अशा अनेक पद्धतीचे दागिने अतिशय सुंदर आहेत. यंदा मंगळसूत्र महोत्सवाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मला आमंत्रित करून सन्मान दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.
– सुचित्रा विठ्ठल साठे
श्रावणाचा आनंद द्विगुणित करणारे मंगळसूत्र महोत्सव, पैंजण महोत्सव :
श्रावण महिना सुरू झाला, की सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. व्रतवैकल्यं, सणवार यामुळं सगळीकडे नुसता उत्साह ओसंडून वाहत असतो. महिलांसाठी तर हा श्रावण मास अगदी खास असतो. रक्षाबंधन आणि अन्य अनेक सण-उत्सवांनिमित्त दागिने, कपडे यांची खरेदी करण्याची पर्वणी असते. त्यामुळं याच काळात सुरू होणाऱ्या ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या ‘मंगळसूत्र’ महोत्सवाची, पैंजण महोत्सवाची महिलावर्ग आतुरतेनं वाट पाहत असतो. ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या या महोत्सवांमध्ये मनपसंत खरेदी करता आली, की महिलावर्गही ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ अनुभवतो. यंदाही ९ ऑगस्टपासून हे महोत्सव सुरू झाले असून ते ५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या महोत्सवांमध्ये मंगळसूत्र, पैंजणाच्या विविध डिझाइन्सची रेलचेल आहे. त्याचबरोबर या महोत्सवाअंतर्गत सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत, तर हिऱ्याच्या मंगळसूत्राच्या पेंडंटच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत तर चांदीच्या पैंजणांच्या घडणावळीवर २५ टक्के सवलत दिली जात आहे. आकर्षक मंगळसूत्रांची हजारांहून अधिक डिझाइन्स ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या विविध दालनांमध्ये उपलब्ध आहेत. हीच डिझाइन्स www.pngjewellers. com या वेबसाइटवरही सादर केली गेली आहेत. याप्रसंगी बोलताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे दरवर्षी उत्सवकाळाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात येणारा ‘मंगळसूत्र महोत्सव’ हा आमच्यासाठी प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. सध्याचा काळ हा सर्वांसाठी सामान्य नसला, तरी उत्सवकाळ हा नेहमीच घराघरांत आनंद घेऊन येतो. म्हणूनच मंगळसूत्र, पैंजण यांच्या विविध श्रेणींच्या माध्यमातून ग्राहकांना सकारात्मकता आणि आनंद देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
लाइट स्टाइल – लाइटवेट ज्वेलरी कलेक्शन :
‘पीएनजी ज्वेलर्स’ ग्राहकवर्गाच्या बदलत्या आवडीनिवडींचा अभ्यास करून त्यानुसार सतत वेगवेगळी ज्वेलरी कलेक्शन्स सादर करत असते. पारंपरिक पद्धतीचे दागिने पसंत करणारा एक वर्ग आहेच, त्यांच्यासाठी पिढ्यान्पिढ्यांचा ठेवा असलेली असंख्य डिझाइन्स आमच्याकडे आहेत. पण नवीन पिढीसाठीही कधीही कमतरता भासणार नाही इतकी डिझाइन्स आम्ही घडवत असतो. आजकालच्या पिढीला पूर्वीचे वजनदार दागिने रोज वापरण्यासाठी नको असतात. त्यांना वजनाला हलकी, आधुनिक काळाला साजेशी स्टायलीश ज्वेलरी हवी असते. त्यांच्यासाठी आम्ही ‘लाइट स्टाइल’ हे खास लाइटवेट ज्वेलरी कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनच्या माध्यमातून आम्ही आजच्या पिढीला दैनंदिन जीवनात वापरता येतील, असे दागिने सादर केले आहेत. या कलेक्शनमधील ब्रेसलेट, अंगठ्या, कर्णफुले, पेंडट्स आणि नेकलेस अतिशय नावीन्यपूर्ण आणि कलात्मक आहेत. हे दागिने हॉलो बीड्स आणि अल्ट्रा-लाईट सीएनसी कट हॉलो डायमंड बीडससह लेझर फिलीग्री या अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत. हे दागिने रोज वापरण्यासाठी तसेच कुठल्याही समारंभासाठीही योग्य आहेत. हे दागिने आजच्या पिढीच्या स्वावलंबी महिलांचा आत्मविश्वास आणि लावण्य यांचे प्रतीक आहेत. सध्याच्या कोविड काळातही अशा लाइटवेट ज्वेलरीला पसंती वाढली आहे. त्यामुळं या ‘लाइट स्टाइल’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फार गुंतवणूक न करता दागिन्यांची हौस भागवणेही तरुण पिढीला शक्य होत आहे.
सिल्व्होस्टाइल : चांदीच्या दागिन्यांचा ब्रँड
दागिने घडवायचे म्हणजे सोन्यातच, अशी प्रथा अगदी अलीकडच्या काळापर्यंत प्रचलित होती. चांदीचे काही ठरावीक दागिनेच आपल्याकडे वापरले जातात. मुख्यतः चांदीचा वापर होतो तो पूजेचे साहित्य, भांडी, देवांच्या मूर्ती यासाठी. पण चांदीचे कलात्मक दागिने घडवून ते एका विशिष्ट ब्रँडनेमखाली सादर करण्याचा प्रयोग ‘पीएनजी ज्वेलर्स’नं केला. ‘सिल्व्होस्टाइल’ या ब्रँडअंतर्गत चांदीचे अनेक प्रकारचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आधुनिक, नावीन्यपूर्ण डिझाइन्स असल्याने मॉडर्न पिढीलाही या दागिन्यांनी भुरळ घातली. नावीन्यपूर्ण आणि सतत नवीन दागिने घेण्याची हौस पुरवण्याची सोय झाली. त्याचबरोबर एक स्टाईल स्टेटमेंट निर्माण करण्याची संधी या दागिन्यांनी दिली. यात ऑक्सिडाईज दागिन्यांनी पुरातन काळातील दागिन्यांशी नातं जोडत महिला वर्गाला एक आगळा अनुभव दिला. आधुनिक आणि पारंपरिक डिझाइन्स यात अतिशय सुंदर दिसत असल्यानं अगदी माफक किमतीत दागिन्यांची हौस पुरवणं शक्य झालं.
विस्ताराची ध्वजा पेलणाऱ्या पिढ्या
दाजीकाकांनी दिलेला वारसा जपत गाडगीळ कुटुंबाच्या पुढील पिढ्यांनी या व्यवसायात आपला ठसा उमटविला. दाजीकाकांनी घालून दिलेल्या आदर्शांवर चालत हा ब्रँड जगभर नेण्याचा वसा पुढील पिढ्यांनी घेतला. दाजीकाकांचे चिरंजीव कै. विद्याधर गाडगीळ यांनी मोलाचा वाटा उचलला. आज गाडगीळ कुटुंबाची सहावी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. दाजीकाकांचे नातू सौरभ गाडगीळ आणि पराग गाडगीळ हे या व्यवसायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. दुरदृष्टी, ग्राहकांच्या अपेक्षांबाबत सजगता, नावीन्याचा ध्यास घेत ‘पीएनजी ज्वेलर्स’ यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. आज अनेक नामवंत लोक या ब्रँडशी जोडले गेले आहेत. या ब्रँडशी नातं जोडणं, हे त्यांना अभिमानाचं वाटतं.
‘पीएनजी ज्वेलर्स’चेच दागिने हवे
लग्नासाठी दागिने घ्यायचे असतील तर पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक वधू-वरांची, त्यांच्या कुटुंबीयांची पहिली पसंती असते ती ‘पीएनजी ज्वेलर्स’ला. सुंदर डिझाइन्स, चोख सोने, वेळेत मिळण्याची हमी आणि आपुलकीची सेवाअशा अनेक कारणांसाठी सोने, हिरे यांचे दागिने, चांदीच्या वस्तू घेण्यासाठी ‘पीएनजी ज्वेलर्स’च गाठलं जातं. ‘पीएनजी ज्वेलर्स’चे दागिने म्हणजे आनंदाचा शुभारंभ अशीही भावना असते. अगदी अभिनेत्री सोनाली कु लकर्णीलाही हेच वाटतं. त्यामुळं तिनं तिच्या लग्नासाठी दोन्ही मंगळसूत्रंही ‘पीएनजी ज्वेलर्स’चीच घेतली. या दागिन्यांबाबत बोलताना ती म्हणाली, “माझा लग्नसंस्थेवर’ खूप विश्वास आणि श्रद्धा आहे; आणि लग्नबंधनातली गुंफण ज्या पवित्र धाग्याने गुंफली जाते, तो धागा म्हणजे ‘मंगळसूत्र’. माझ्यासाठी ‘मंगळसूत्र’ हे सौभाग्याचं लेणं, माझ्या नवीन नात्याचं, संसाराचं प्रतीक म्हणून खूप महत्त्वाचं आहे. माझ्या या नव्या प्रवासाची सुरूवात ‘पीएनजी ज्वेलर्स’ सोबत होत आहे, याचा मला भरपूर आनंद आहे. कारण मला पारंपरिकपासून ते फॅशनेबल, एव्हरीडे वेअर, स्पेशल ऑके जन ते पार्टी वेअर अशा सगळ्या ओके जन्सला, कपड्यांवर आणि सणासुदींना विशेष, अशा सगळ्या प्रकारचे ‘मंगळसूत्र’ घालायला आवडतात आणि या सगळ्या डिझाइन्स ‘पीएनजी ज्वेलर्स’मध्ये उपलब्ध आहेत. मंगळसूत्रातलं मांगल्य आणि पावित्र्य तसंच जुन्या आणि नव्या, अशा दोन्ही पिढीला अनुसरून ‘पीएनजी ज्वेलर्स’चा मंगळसूत्र महोत्सव खरंच खास आहे. मी, माझी आई आणि व्हिडिओ कॉलवर माझ्या सासूबाई, अशा आम्ही तिघींनी मिळून खरेदीदेखील केली.”
वसा सामाजिक कार्याचा
चिरंतन मूल्यांवर विश्वास ठेवून वाटचाल करणारे ‘पीएनजी ज्वेलर्स’ सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असते. देशावर आलेल्या कोणत्याही संकटात ‘पीएनजी ज्वेलर्स’ आपला खारीचा वाटा उचलत असते. आताच्या कोविड साथीच्या संकटातही ‘पीएनजी ज्वेलर्स’चे मदतकार्य सुरूच आहे. नुकत्याच चिपळूण आणि अन्य ठिकाणी आलेल्या पुराच्या संकटातही ‘पीएनजी ज्वेलर्स’ने मदतीचा हातभार लावला आहे. याशिवाय गुरुद्वारात अन्नधान्याचं वाटप के लं. पुणे महापालिके ला रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स पुरवली. हॉस्पिटल्सना पीपीई किट्स दिली. निसर्ग चक्रीवादळानं नुकसान झालेल्या दापोलीतील ५०० लोकांना घरं उभारण्यासाठी मदत के ली. बालकांसाठी काम करणाऱ्या ‘एकलव्य बालन्यास’ या संस्थेला मुलांच्या हॉस्टेल प्रकल्पासाठी मदत करण्यात आली. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना जागृत असलेला ‘पीएनजी ज्वेलर्स’ परिवार संकटाच्या काळात समाजाच्या मदतीसाठी नेहमीच सज्ज असतो. आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.