सामाजिक बांधिलकी जपत व्यवसायाची गौरवशाली परंपरा - परांजपे स्कीम

परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि. ही कंपनी राज्यातच नव्हे, तर देशात अग्रगण्य स्थानावर असून तीन दशकांहून अधिक काळ बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विश्वासाच्या जोरावर कंपनीनेग्राहकांशी पिढ्यान्‌पिढ्यांचे नाते जोडले आहे.

गुणवत्ता जपल्याने कंपनीने आजवर २०० हून अधिक प्रकल्प बांधून हस्तांतरित केलेले आहेत. सध्या कंपनीचे देशभर ३२ हून अधिक प्रकल्प ८ शहरांमध्ये सुरू आहेत. त्यामध्ये पुणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूण, नाशिक, बंगळूर, वडोदरा यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांत राहणाऱ्या ८० हजार नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करीत त्यांच्या जीवनातील आनंदात कंपनीनेभर घातली आहे. त्यामुळेच कंपनीवरील ग्राहकांचा विश्‍वास द्विगुणित झाला आहे. या प्रकल्पांमध्ये १ आर.के. पासून पेंट हाउसेस, रो हाउसेस, व्हिलाज यांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात आजवर २३ दशलक्ष चौरस फुटांचेबांधकाम कंपनीनेकेलेअसून यापैकी १८.५ दशलक्ष चौरस फूट बांधकाम हे निवासी तर ४.५ दशलक्ष चौरस फूट बांधकाम हे व्यावसायिक आहे. याशिवाय कंपनीनेपुनर्विकास, टाउनशिप प्रकल्प, अफोर्डेबल हाउसिंग, एसईझेड क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था यासाठी काम केलेआहे. टाउनशिप प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे पुणे हिंजवडी येथील १३८ एकरावर विस्तारलेली ब्ल्यू रिज टाउनशिप आणि १७० एकरांवर असलेली भूगावमधील फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिप यांचा समावेश आहे. गेल्या सात वर्षांपासून विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक म्हणून एकाच छताखाली, ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ हा गृहमहोत्सव आयोजित केला जातो. या गृहमहोत्सवाच्या माध्यमातून घरखरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्सचा लाभ मिळतो. गेलेदोन वर्ष गृहप्रदर्शनाचा हा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला. या वर्षी नवीन प्रकल्पांमध्ये ब्ल्यू रिज हिंजवडी येथील द-ग्रोव्ज, फॉरेस्ट ट्रेल्स भूगाव येथे ‘एव्हरग्लेड्स’, सिंहगड रस्त्यावरील ‘मधुकोष’, ताथवडे येथे ‘अझ्युर’, राजाराम पुलाजवळील ‘गार्डीयन सिटीस्केप’ आणि ठाणे येथील ‘ऑप्ल्युलस’ या निवासी प्रकल्पांचा तसेच बाणेर येथील मॅग्नोलिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक प्रकल्पाचा समावेश होता.

यशस्वी व्यवसायासोबत संवेदनशील समाजभान

परांजपेस्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडची बांधकाम व्यवसायात आज चौथी पिढी काम करतेय. पुढच्या पिढीनेही हा व्यवसाय असाच वृद्धिंगत ठेवत विस्तार करावा. यात एक सर्वोत्तम दर्जाचे व्यावसायिक व्यवस्थापन यावे. मात्र ही वाटचाल करताना तत्त्व जपणं तितकेच महत्त्वाचेआहे. हाच आमचा भविष्यकालीन दृष्टिकोन असल्याचे श्री.श्रीकांत व श्री. शशांक परांजपे यांनी सांगितले.

ग्राहक खरंच देव असतो

परांजप्यांची चांदी म्हणजे ९९ टक्के शुद्ध चांदी अशा रीतीने आजोबांनी व्यवसाय केला. तेच तत्त्व वडील व काकांनी बांधकाम व्यवसायात आचरले. आम्ही आणि आमची पुढची पिढी देखील त्याच मार्गावरून जातेआहे. आपण दोन वर्षे उभारणी केलेल्या घरात ग्राहक आयुष्यभर राहतो. म्हणून खरंच ग्राहक हा देव असतो. केवळ जमीन घेणे, घरंउभारणेहा व्यवसाय नाही, तरहा ऋणानुबंध असल्याचे आम्ही मानतो. आम्ही ग्राहकांशी असलेला संपर्ककधी कमी होऊ दिला नाही. आमच्यावरील या संस्कारानेगुणवत्ता, सचोटीसह ग्राहकांचा विश्वास आम्हाला दिला. वेळेत घराचा ताबा दिला व पारदर्शक व्यवहार ठेवला तर ग्राहक तुमचा सादिच्छादूत बनतो.

परांजपे कुटुंबाविषयी

परांजपेकुटुंबीय मुळचेमुंबईतील पार्ले भागातील. ते१९८७ मध्ये पुण्यात आले. त्यांनी कोथरूडमध्ये श्रीराम अपार्टमेंट नावाने सहा सदनिकांचा पहिला प्रकल्प उभारला. श्री. श्रीकांत परांजपेहे सीए आहेत, तर श्री. शशांक परांजपेहेवाणिज्य शाखेचेपदवीधर आहेत. दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यांचेएकमत होत असते, यातच त्यांचेबलस्थान आहे. याच बळावर आज कंपनीने २०० निवासी व व्यावसायिक प्रकल्पांच्या रूपानेदोन कोटी चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण केलेआहे. दरम्यान ३२ प्रकल्पांचेकाम सुरू आहे. श्री. श्रीकांत परांजपे यांचेज्येष्ठ चिरंजीव राहुल यांनी मेलबर्न (ऑस्टेलिया) मध्ये फायनान्स या विषयात एमबीए केलेआहे. तर कनिष्ठ चिरंजीव साहिल यांनी सिंगापूरमध्ये प्रॉडक्ट डिझाइन या विषयात पदवी घेतली आहे. श्री. शशांक परांजपे यांचेमोठे चिरंजीव अमित यांनी अमेरिकेतील परड्यू युनिव्हर्सिटीमधून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट विषयाची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी आयएसबी हैदराबाद येथून फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्सहीपूर्ण केला आहे. तर धाकटे चिरंजीव यश यांनी लंडन येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटीमधून बीआर्कचे (आर्किटेक्ट) शिक्षण घेतले आहे. या चौघांनीही परदेशात उच्च शिक्षण घेऊन व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे. कंपनीच्या दृद्धीत परांजपे कुटुंबांच्या बरोबरीने कंपनीतील ८०० कर्मचारी व इतर विभागातील तज्ज्ञ तसेच ठेकेदार, व्हेंडर, विविध वस्तुंचेपुरवठादार यांचीदेखील महत्त्वपूर्ण साथ मिळाली आहे.

हॅपिनेस नेटवर्क

माणूस हा कुटुंब आणि समुदायात रमणारा जीव आहे. त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा एकवटावी आणि त्यातून सर्वांचीच प्रगती व्हावी या हेतून आम्ही हॅपिनेस नेटवर्क सुरू केलेआहे. ग्राहकाने परांजपे स्कीम्समध्ये घर घेतल्यावर तो ‘हॅपिनेस नेटवर्क’ चा सदस्य बनतो. ‘हॅपिनेस नेटवर्क’च्या माध्यमातून सर्वग्राहकांसाठी कंपनी वर्षभर अनेक सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करते. ज्यामुळे ग्राहकांचा शेजार त्याचे मित्र आणि कुटुंब बनतात आणि एक आनंदी, चैतन्यशील समूह तयार होतो. परांजपे स्कीम्सचे हे हॅपिनेस नेटवर्क कुटुंब आज १२ हजार कुटुंबाचं आहे. या संकल्पनेचाच एक भाग म्हणून गणपती उत्सवादरम्यान सोसायटी-सोसायटी दरम्यान स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करतो. यामुळेएकोपा वाढतो. शेजार धर्माचे धागेआणखी घट्ट होतात आणि नेटवर्कदेखील मजबूत राहते. वाढता कुटुंब विस्तार लक्षात घेऊन दोन घरंझालेली असली तरी आमचं आजही संयुक्त कुटुंब आहे. सण-वार, परंपरेनुसार एकत्र साजरे करतो, असे परांजपे सांगतात.

परांजपे स्कीम्सच का निवडावे?

  • घराचे पझेशन दिल्यानंतर आवश्‍यक सर्व बाबींचा पुरवठा व मदत
  • हॅपिनेस नेटवर्कच्या माध्यमातून डिजिटल सोसायटी मॅनेजमेंट
  • सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अनेक सांस्कृ तिक स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन
  • आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हॅपिनेस नेटवर्कच्या माध्यमातून प्रसिद्ध
  • घर भाड्याने देण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा
  • ग्राहकांना अद्ययावत ठेवण्यासाठी कंपनीचे स्वतःचे मासिक
  • आंतरसोसायटीत क्रिकेट, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

फॉरेस्ट ट्रेल्समधील बंगलो

paranjape-img-2

स्वत्व जपत नवेपणा स्वीकारावा

आजही पुण्यात अनेक ग्राहक असे आहेत, की जे ‘आम्ही परांजप्यांच्या स्कीममध्ये राहतो’ हे अभिमानाने सांगतात, हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. मात्र मराठीपणा, मराठी संस्कृती, अस्मिता जपत नव्या गोष्टींचा स्वीकार आम्ही करीत आलेलो आहोत. आमच्या सर्व गहप्रकल्पांमधून अमराठी कुटुंबं मराठी सण-उत्सवांत सहभागी होतात, तसेच मराठी मंडळी आपले स्वत्व जपत अमराठी सणांमध् रंगून गेलेली दिसतात. आम्ही या ग्राहकांकडूनच शिकलो, की जगातलं जे जे चांगलं ते ते स्वीकारावं, असे श्री. श्रीकांत व श्री. शशांक परांजपे अभिमानाने सांगतात.

सामाजिक कार्यातील रुजवात पार्ले टिळक विद्यालय

परांजपेंच्या आधीच्या पिढ्यांनी पार्ल्यामध्ये अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यांची रुजवात केली. हाच वारसा जपत श्री. श्रीकांत व श्री. शशांक परांजपे यांनी पुण्यात अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यांत मोलाचे योगदान दिले आहे. पुण्यात भारती विद्याभवनमध्ये परांजपे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, कोथरूडमधील परांजपे विद्या मंदिर, महाराष्ट्रविद्या मंडळाची मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर यांच्या, तसेच ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल यांच्या उभारणीत परांजपे स्कीम्सचा मोलाचा वाटा आहे. सांस्कृ तिक क्षेत्राला चालना मिळावी यासाठी पुलोत्सव, सवाई गंधर्व अशा कार्यक्रमांना परांजपे स्कीम्सने नेहमी सक्रिय पाठिंबा दिला आहे. तरुण कलाकारांना चालना मिळावा म्हणून फिरोदिया करंडक स्पर्धेचे प्रायोजकत्व अनेक वर्ष परांजपे स्कीम्सने घेतले आहे. ‘सोशो इकॉनॉमिक ट्रस्ट’च्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांत पायभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाची जपवणूक करण्यासाठी ‘स्मृतिवन’ हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. स्वमग्न (आटिस्टिक) मुले व त्यांच्या पालकांसाठी अतिशय वेगळा रहिवासी प्रकल्प व मुलांसाठी तेथेच शाळा. तर मोठ्या मुलांसाठी व्यावसायिक प्रकल्प लवकरच सुरू करण्याचा परांजपे स्कीम्सचा मानस आहे.

वृद्धांना जगण्याची ऊर्जा देणारे अथश्री

२००१ मध्ये परांजपे कीम्स (कन्स्ट्रक्शन) लि. यांनी देशामध्ये प्रथमच खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अथश्री’ नावाचा निवासी प्रकल्प सुरू केला. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधांचा समावेश केला गेला आजवर २००० हून अधिक ज्येष्ठ यांचे जीवन ‘अथश्री’ मध्ये अत्येत सुरक्षित आणि सुख-समाधानाने व्यतीत करीत आहेत. आज ‘अथश्री’ प्रकल्प पुण्यामध्ये ८ ये ठिकाणी आहे, तसेच बंगळूर आणि वडोदरा येथेही पूर्णत्वास येत आहेत. अथश्री हा वद्धाश्रम नाही तर एक निवासी सोसायटी आहे. त्यातील प्रतेक प्रकल्पामध्ये २४ तास सुरक्षा, नामवंत रुग्णालयांबरोबर टायअप, रुग्णवाहिका व डॉक्टरांची त्वरित उपलब्धता, स्वतंत्र कॅफे टेरिया, उत्तम हाउसकीपिंग आणि दरुस्ती व देखभाल या सुविधा तेथे पुरविल्या जातात. तर ‘आस्था’ या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयासारख्या सुविधा असलेल्या रूम्स निर्माण करण्यात आल्या आहेत. ज्या भाडेतत्त्वावर घेता येतात.

परांजपे स्कीम्सने के लेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना मिळालेले काही पुरस्कार

पुरस्काराचे नाव पुरस्कारार्थी वर्ष
वेल बिल्ड स्ट्रक्चर वसंत विहार टॉवर्स २०१२
बेस्ट कमर्शिअल प्रोजेक्ट ब्ल र्यूिज एसईझेड २०१३
आउटस्डिटँग कॉन्क्रीट स्ट्रक्चर ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट पुनर्वसू २०१४
सुपर लक्झरी सेगमेंट होम स्काय वन २०१६
सर्टिफिकेट ऑफ मेरिट (एलआयजी कॅ टेगिरी) हॅपिनेस हब २०१९
यंग अचिव्हर अमित परांजपे २०१७ | २०२१
फॉरेस्ट टेल्स :
  • बेस्ट रेसिडेन्शिअल टाउनशिप – २०१६
  • आयकॉनिक टाउनशिप – २०१८
  • बेस्ट टाउनशिप – २०१९
परांजपे स्कीम्स :
  • डिझाइन इन एक्सलन्स इन आयटी पार्क – २०१३
  • इडिंयाज टॉप इनो व्हिजनरी बिल्डर – २०१४
  • बेस्ट रिएलटर – २०१६ | २०१८
  • मोस्ट ट्रस्टेड ब्रांड – २०१७
  • बेस्ट ब्रांड – २०१८
ब्ल्यू रिज :
  • बेस्ट रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट – २०१३
  • बेस्ट टाउनशिप प्रोजेक्ट ऑफ इडिंया – २०१५
अथश्री :
  • बेस्ट रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट – २००७
  • सिनिअर सिटीझन हाउसिंग प्रोजेक – २०१५
  • सिनिअर सिटीझन हाउसिंग प्रोजेक्ट – २०१६
  • रिअल इस्टेट आयकॉन – २०१८

ब्लू राइड

मराठी