यशस्वी उद्योजकाचा ‘मार्व्हलस’ प्रवास...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या भूमीत उद्योजकतेचेस्वप्न पेरले. त्यामुळेच येथे उद्योग क्षेत्राचा विस्तार झाला. कोल्हापूरच्या उद्यमशीलतेची मोहर उद्योजक संग्राम पाटील यांनी मार्व्हलस या महाब्रँडच्या रूपाने आंतरराष्रीट्य स्तरावर उमटवली. त्यांनी केवळ उद्योगाचा विस्तार केला असेनाही, तर कामागार हिताचे धोरण राबवून मार्व्हलस हाएक परिवार बनवला. या यशस्वी उद्योजकाचीही यशोगाथा.

एका खासगी कंपनीत नोकरीसाठी मुलाखत सुरू होती. अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केलेला एक तरुण मुलाखतीसाठी खुर्चीवर बसला होता. मुलाखत घेणाऱ्याने विचारले, ‘हीनोकरी का करायची आहे? तो तरुण म्हणाला,स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी अनुभव पाहिजे म्हणून काही काळासाठी ही नोकरी करणार आहे. त्याचेस्पष्ट उत्तर ऐकून मुलाखत घेणारेच गोंधळले. त्यांनी त्या तरुणाला त्यांच्या वरिष्ठांकडे पाठवले. तेथेही या तरुणाने तितक्याच ठामपणेतेच उत्तर दिले. त्याचा आत्मविश्वास पाहून त्यांनी त्याला ती नोकरी दिली. नऊशेरुपयेपगाराची नोकरी त्या तरुणाला मिळाली. मात्र आज तो वर्षाला ११८ कोटी उलाढाल असणाऱ्या कंपनीचा मालक आहे. पश्चिम महाराष्राट्तील प्रमख निर्यातदार आहे. एक नोकरदार तेमालक हा यशस्वी उद्योजकाचा त्याचा प्रवास ‘मार्व्हलस’ म्हणजेच अद्‍भूत आहे.

संग्राम विष्णू पाटील हेत्यांचेनाव. हा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटातील कथेसारखा जरी वाटला तरी तो तितका सोपा आणि सरळ नाही. संग्राम यांनी आपल्या करत्तृ्वाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. अनेक संकटांवर मात करून उद्योग क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. सांगली जिल्ह्यातील कुंडल हे संग्राम पाटील यांचेमूळ गाव. लाड-पाटील हेत्यांचे गावातील आडनाव. या कुटुंबातील बाबूराव लाड हे स्वातंत्र्य सैनिक आणि सरकारचेसदस्य होते. औंध संस्थानचे महसूलमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचेपुत्र विष्णू पाटील हेप्रख्यात वालचंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे सिव्हिल इंजिनिअर होते.पुढेते शासकीय सेवेत रुजूझाले. संग्राम पाटील हे त्यांचे चिरंजीव. संग्राम यांचा जन्म १३ सप्टेंबर १९६५ मध्ये झाला. यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर आणि पुण्यात झाले. पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये तेहोते. त्यानंतर त्यांनी एम.आय.टी महाविद्यालयातून १९८७ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवून उत्तम गुण मिळवून घेतली. संग्राम यांचे आजोळ कोल्हापूर आहे. त्यांचेमामा मानसिंगराव जयसिंगराव जाधव हेएकदा संग्राम यांना म्हणाले, ‘आपल्या कष्टाचा उपयोग दुसऱ्यांना मोठे करण्यात झाला. पुढच्या पिढीने स्वतःहून मोठे झाले पाहिजे.’ त्यांचेहे वाक्य संग्राम यांना भावले. आपण उद्योजक व्हायचे हे त्यांनी ठरवले. शिक्षण झाल्यावर अनुभवासाठी काही काळ नोकरी केली. त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एम. आय. डी. सी.मध्ये एक प्लॉट घेऊन ठेवला होता. संग्राम यांनी १९९० साली स्वतःची मार्व्हलस इंजिनिअर्स प्रा.लि. ही कंपनी सुरू केली. त्यावेळी टाटा, महिंद्रा यांच्या सारख्या मोठ्या कंपन्या कास्टगिं विकत घ्यायच्या आणि मशिनिंगसाठी दुसरीकडे पाठवायच्या. त्यांना फिनिशिंग केलेल्या प्रॉडक्टची गरज होती. चाणाक्ष संग्राम पाटील यांनी हे ओळखलेआणि कास्टगिं मशिनिंग करण्याचेकाम सुरू केले. संग्राम यांचेकाम जरी स्थानिक स्वरूपात सुरू असलेतरी त्यांचा दृिष्टकोन व्यापक होता. जागतिक बाजारपेठेतील संधी ओळखूनत्यांनी १९९५-९६ पासून निर्यात करण्यास सुरुवात केली. त्यांनी इटलीमधील कंपन्यांना पुरवठा करण्यास प्रारंभ केला. काही वेळा त्यांना नुकसानही सहन करावेलागले. पण संकटांशी दोन हात करत त्यांनी निर्यात सुरू ठेवली. आज ते इटली सोबत फ्रान्स, ब्राझील, रशिया, चीन, रुमेनिया या दशे ांमधील कंपन्यांबरोबर व्यापार करत आहेत. त्यांच्या एकूण उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादने ते निर्यात करतात. संग्राम यांच्यातील व्यावसायिक कसब ओळखून इटली येथील विमरकट्टी यांनी स्वतःसाठी स्वतंत्र मशिन शॉप सुरू करण्याची मागणी केली. यासाठी व्यावसायिक भागिदारी करण्याची तयारीही दर्शवली. संग्राम यांनी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी एका परदेशी कंपनीबरोबर भागिदारी करून ‘मार्व्हलस मशिनिस्ट प्रा.लि.’ ही कंपनी सुरू केली. ही भागिदारी इतकी पारदर्शक आहेकी विमरकट्टी यांच्या निधनानंतरही त्यांची पुढची पिढी या कंपनीच्या माध्यमातून संग्राम यांच्याबरोबर व्यवसाय करत आहे. संग्राम यांच्या व्यावसायिक यशातील पुढचा टप्पा म्हणजे स्वतःची फौंड्री सुरू करणे. व्यवसायासाठी त्यांना कास्टगिं बाहेरून आणावेलागे. त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. इतरांवरचेहे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी ६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून २०१० मध्ये कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत ‘मार्व्हलस विमरकट्टी फौंड्री प्रा. लि.’ ही नवी कंपनी सुरू केली. यामुळेएकाच छताखाली सर्व गोष्टी होऊ लागल्याने संग्राम यांना व्यवसायात स्थिरता आली. आज त्यांच्या ‘मार्व्हलस इंजिनिअर्स प्रा. लि.’, ‘मार्व्हलस मशिनिस्ट प्रा. लि.’, ‘मार्व्हलस विमरकट्टी फौंड्री प्रा. लि.’ या तीन कंपन्या आहेत. यामध्ये सुमारे ५०० कामगार काम करतात. वाहन उद्योगासाठी लागणारे २७० प्रकारचे पार्टस्तेबनवतात. २०२१ साली संग्राम पाटील यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे ११८ कोटी इतकी आहे. पुढील वर्षभरात प्लाँट आणि यंत्रसामुग्रीमध्ये २० कोटींची गुंतवणूक त्यांच्याकडून केली जाणार आहे. त्या जोरावर २०२४-२५ पर्यंत मार्व्हलसची एकूण वार्षिक उलाढाल २०० कोटी करण्याचेउद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

संग्राम पाटील यांनी उत्कर्षा यांच्यासोबत १९८९ मध्ये लग्न केले. त्यानंतर नोकरी सोडून १९९० मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या व्यावसायिक वाटचालीत उत्कर्षा यांची सुरुवातीपासून साथ आहे. त्या स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अडँ टेलिकम्युनिकेशन अभियंता आहेत. मात्र व्यवसायाची गरज ओळखून त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापनाचे (ह्मनयु रिसोर्स मॅनेजमेंट) काम स्‍वीकारले. २० कामागारांपासून सुरू झालेले त्यांचे हे काम आता ५०० कामगारांच्या नियोजन करण्यापर्यंत पोहचलेआहे. त्या कामगारांशी थेट संवाद साधतात. त्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवतात. मार्व्हलसच्या सर्व कंपन्यांमध्ये व्यावसायिकता जपून त्यांना पारिवारिक वातावरण तयार केले आहे. यामुळे कर्मचारी, अधिकारी, कामगार वर्षानुवर्षे मार्व्हलसशी जोडले गेले आहेत. संग्राम यांचा मुलगा गौरव यानेही अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून व्यवसायाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी काळाची पावलेओळखून व्यवस्थापन, उत्पादन निर्मिती यामधील नव्या संकल्पनांची अंमलबजावणी मार्व्हलसमध्ये केली. त्यामुळे व्यवसायवद्धी बरोबरच येथील कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. त्यांनी भविष्यातील आव्हाने ओळखून व्यवसाय वद्ृ धीचेसूक्ष्म नियोजन केलेअसून गौरव त्यासाठी सज्ज आहेत. संग्राम यांची कन्या साक्षी यांनी लंडनमधून एम.बी.ए केले असून त्यांनी स्वतःचा मार्व्हलस बेकर्स हा स्टार्टअप सुरू केला आहे. मधुमेह असणाऱ्यांसाठीची केक अशी अभिनव संकल्पना घेऊन त्या स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. णत्याही व्यावसायिकाचेजीवन हेसरळ एकरेषीय नसते. त्याचा दिवस रोज एक नवी समस्या घेऊन उजाडतो. पण या सर्वावर मात करून तो उद्दिष्ट साध्य करत असतो. याचेमूर्तिमंत उदाहरण म्हणजेसंग्राम पाटील आहेत. तेपहिल्या पिढीतील उद्योजक असूनही त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती पिढीजात असणाऱ्या उद्योजकांना थक्क करायला लावणारी आहे. तरुणांनी स्वतंत्र आणि वेगळा विचार करावा. जीवनाच्या सुरुवातीला त्यांनी पैशाबरोबर कामातील गुणवत्ता, कौशल्य विकास आणि अनुभव घेण्याची तयारी याला महत्त्व दिलेपाहिजे. असेसंग्राम पाटील यांचे मत आहे. तरुणांसाठी त्यांचा यशस्वी उद्योजकाचाहा प्रवास अद्‍भूत आणि प्रेरणादायी असाच आहे.

कौशल्य विकास, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील

संग्राम पाटील हे त्यांचा व्यवसाय आणि सामाजिक कामाबरोबरच विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यासाठीही तेप्रयत्न करतात. शासनाने स्थापन केलेल्या इन्स्टिट्टयू मॅनेजमेंट कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. या द्वारे शासनाचा जो निधी येतो त्याच्या नियोजनाचे काम संग्राम पाटील करतात. त्याचबरोबर ते घोडावत इन्स्टिट्टयू आणि कोल्हापूर इंजिनिअरिंगच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर देखील संग्राम पाटील आहेत. सेंट्र्ल एक्साईज आणि कस्टम पब्लिक ग्रिव्हियन्स कमिटीचेही तेमेंबर आहेत. या शिवाय संग्राम पाटील यांना विविध महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते. विविध महाविद्यालयांच्या कौशल्य विकास उपक्रमांना तेमुक्त हस्तानेआर्थिक मदत करतात. युवा पिढीने उद्योजक बनून देशाच्या उत्पादकतेत वाढ करावी, असेसंग्राम पाटील यांचे म्हणणे आहे.

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संग्राम पाटील यांना ‘द बेस्ट स्मॉल स्केल एंटरप्रेनर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते संग्राम पाटील यांना स्पेशल रेकग्‍नायजेशन नॅशनल अॅवॉर्ड देऊन २००८ साली सन्मानित करण्यात आले.
मार्व्हलस विमरकट्टी फौंड्री.
मार्व्हलसचे मशिन शॉप.

माव्हर्लस  महाब्राड

संग्राम पाटील यांची कल्पकता, कष्ट, गुणवत्तापूर्ण उत्पादने, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, निकोप व्यावसायिक दृष्टिकोन, कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी केलेजाणारेप्रयत्न आणि कामगार स्नेही धोरण यामुळेमार्व्हलसची व्याप्ती वाढली आहे. कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीमध्ये विकसित झालेला हा ब्रँड आता आंतराष्रीट्य स्तरावर गेला आहे. मार्व्हलस हेनाव केवळ नफा आणि उत्पादनांचे आकडे म्हणूनच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचेनवेमानांकन बनलेआहे.म्हणून‘सकाळ’नेयाची निवड महाब्रँड म्हणून केली आहे.

कुटुंब रमलंय सामाजिक कार्यात…

संग्राम पाटील यांच्या व्यावसायिक यशाबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यदेखील उल्खनीय ले आहे. रोटेरियन ते डिस्ट्रीक्ट गव्हर्नर हा त्यांचा प्रवासही थक्क करणाराच आहे. १९९३-९४ मध्ये तेरोटरी क्लबचे सदस्य झाले. सामाजिक कामाची त्यांची ओढ आणि धडाका पाहून २००७-८ मध्ये तेरोटरी क्लब मिडटाऊनचेकोल्हापूर प्रेसिडेंट बनले. त्यांच्या सामाजिक कामामुळेत्यांना त्या वर्षीचा बेस्ट प्रेसिडंट अॅवॉर्ड मिळाला. त्यानंतर डिस्ट्रीक्ट अस्टिटंट गव्हर्नर पदाची धुरा त्यांच्याकडे आली. त्या वर्षीचा बेस्ट अस्टिटंट गव्हर्नरचा पुरस्कार त्यांना मिळाला. १ जुलै २०२० पासून संग्राम पाटील यांची रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणून निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी साडेसोळा कोटी रुपयांची सामाजिक कामेकेली. त्यांच्या कार्यकाळात कोविडचेसंकट सुरू झाले. मात्र, संकटाचेसंधीत रुपांतर करण्याचा हातखंडा असलेल्या संग्राम पाटील यांनी रोटरीच्या निधीचा उपयोग कोविड मदत कार्यासाठी कौशल्यानेकेला. यासाठी त्यांनी कोल्हापुरात ६०-६५ लाख रुपयांचा निधी उपयोगात आणून ५०० बेडचेसुसज्ज कोविड सेंटर उभारले.

मिरज मेडिकल कॉलेजला स्वॅब टेस्टिंगसाठी आवश्यक असणारी साधने पुरवली. त्यामुळे ज्या ठिकाणी दररोज ३०० टेस्ट व्हायच्या तेथे ८०० टेस्ट होऊ लागल्या. अशाच प्रकारचेकाम त्यांनी बेळगाव, गोवा या ठिकाणीही केली. मदत निधी गरजूंपर्यंत कशा प्रकारे पोहचेल याचे उत्तम नियोजन त्यांनी केले. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणात मदत व्हावी, यासाठी १२ हजार शिक्षकांना रोटरी तर्फेव्हर्च्युअल प्टलॅफॉर्मवर प्रशिक्षण देण्यात आले. रोटरीनेहॅपी स्कूल ही संकल्पना राबवताना ‘बोलक्या भिंतीची शाळा’ केल्या. कोल्हापूर महापालिकेला कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये रोटरीनेसर्व प्रकारची मदत केली. याचे नियोजन आणि अंमलबजावणी संग्राम पाटील यांच्या नेततृ्वाखाली झाली. कॅन्सरग्रस्तांसाठी ‘होप एक्स्प्रेस’ नावाचा अभिनव उपक्रम रोटरीनेयाच काळात राबवला. यामध्ये कॅन्सरच्या उपचाराची सर्व अत्याधुनिक साधनेअसणारी व्होल्वो बस इंडियन कॅन्सर सेंटरनेरोटरीला दिली. या माध्यमातून १२०० महिलांची तपासणी अत्तापर्यंत करण्यात आली. माझ्या आईनेकृतीतून आमच्यावर इतरांना मदत करण्याचा संस्कार केला. त्यामुळेआपल्याकडून जे शक्य आहेते इतरांसाठी करणे एवढाच विचार मी करतो. असेसंग्राम पाटील सांगतात.

संग्राम पाटील यांच्या पत्नी उत्कर्षा या देखील घर, व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य करतात. त्या मुळच्या बेळगावच्या. त्यांचे  आजोबा गुरु अण्णा नाथाजीराव हलगेकर (देसाई) हे महापौर होते. मदतीच्या अपेक्षेनेयेणाऱ्या प्रत्येकाला मदत करणेहा त्यांच्या घरचा शिरस्ता होता. हेच गुण उत्कर्षा यांच्यात आहेत. त्यांनी रोटरी आणि इनरव्हील क्लब या माध्यमातून त्या विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतात. सध्या त्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्नर काऊन्सिलर आहेत. या पदावरून काम करताना एकही गरजूमुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी त्या घेतात. त्यांनी बऱ्याच मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावला आहे. रोटेरियन म्हणूनही त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. सामाजिक कामात त्या समरस होतात. संग्राम पाटील यांचे सारे कुटुंबच सामाजिक कार्यात रमले आहे.

संग्राम पाटील यांना मिळालेले पुरस्कार

  • केंद्र सरकारच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या ‘स्पेशल रेकग्‍नेशन नॅशनल अॅवॉर्ड – २००८ फॉर एंटरप्रेनरशिप इन एस.एस.एस.ई’ या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
  • महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘द बेस्ट स्मॉल स्केल एंटरप्रेनर’ या पुरस्काराने गौरवले. तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित
    करण्यात आले.
  • महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज यांच्या तर्फे त्यांना ‘एम.एल. डहाणूकर अॅवॉर्ड फॉर एंटरप्रेनरशिप’ पुरस्कार देण्यात आला.
  • इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्थेतर्फे त्यांना ‘बेस्ट इंजिनिअर’ हा पुरस्कार देण्यात आला.
  • वुमन वेल्‍फेअर असोसिएशन यांच्याकडू न २००७-०८ साली उद्योग भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • नॅशनल चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे ‘नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलन्स’ या पुरस्काराने गौरवले.
  • रेडिओ सिटी तर्फे ‘सिटी का सितारा’ हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
  • क्वाॅलिटी ब्रँड टाइम्सतर्फे ‘क्वाॅलिटी ब्रँड्स अॅवॉर्ड’ पुरस्कार २०१५ साली मिळाला
  • गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि निर्यात या बद्दल स्टार परफॉर्मर ऑफ द इयर अॅवॉर्ड देण्यात आला.
  • महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या तर्फे २०१७ साली मराठा ‘बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
  • महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी) संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘ज्वेल ऑफ एम. आय.टी’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • अमेरिकेतील फेअरफेल्ड कं पनीने त्यांना ‘द बेस्ट क्वाॅलिटी’ पुरस्काराने २०१० साली त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • झेड.एफ इंडिया प्रा.लि. यांच्याकडू न ‘लाँग असोसिएशन विथ झेड.एफ’ ने सन्मानित.
  • कै. रेवतीबाई दत्तात्रय एकवड चे ॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘द उद्योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित.

मी शिक्षण पूर्ण करून २०१५ पासून व्यवसायामध्ये उतरलो. उद्योगामध्ये सिस्‍टीमला महत्त्व आहे. यासाठी मार्व्हलसच्या सर्वच कंपन्यांमध्ये आम्ही ‘स्टँडर्ड ऑपरेशन सिस्‍टीम’ अमलात आणली आहे. यामुळे मनुष्यबळावरचे अवलंबित्व कमी झाले. उत्पादनांची गुणवत्ता आणखी वाढली. ग्राहकांना उत्पादनांबरोबरच व्हॅल्यू ॲडेड सेवा दिली जाते. त्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. उत्पादनांची गुणवत्ता निर्यातक्षम असल्याने सुरुवातीपासूनच निर्यातीकडे अधिक लक्ष दिले गेले आहे. सर्व युनिटमधील समन्वय, कामगारांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण वर्ग यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कौशल्याने उपयोग करून उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मार्व्हलसचा पाया आता इतका भक्कम झाला आहे, की भविष्यातील आव्हानांना तोंड देऊन व्यवसायवृद्धी होईल याची खात्री वाटते.

– गौरव पाटील,
(संचालक, मार्व्हलस मशिनिस्ट प्रा. लि.)

मार्व्हलसचे युनिट प्रमुख, कर्मचारी आणि कामगार ही आमची खरी ताकद आहे. संग्राम पाटील हे माणसातील गुण पटकन
ओळखतात. त्याच्याकडील कौशल्याप्रमाणे त्याला काम दिले जाते. कामगारांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कामगारांच्या सर्व आर्क अप थि ेक्षा त्यांच्या मागणीच्या आधीच पूर्ण झाल्याने बहुतांशी कर्मचारी वर्षानुवर्षे मार्व्हलसशी जोडले गेले आहेत. कोणताही कामगार कधीही थेट संचालकांशी बोलूशकतो. त्यामुळे मार्व्हलसमध्ये पारिवारीक वातावरण तयार झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट ते पूर्ण करतातच; पण कामही आपुलकीच्या भावनेने करतात. हेच आमच्या यशाचे सूत्र आहे.

– उत्कर्षा पाटील,
(संचालक, मार्व्हलस इंजिनिअर्सप्रा. लि.)

मार्व्हलस मधील एच. आर. विभाग आई सांभाळतात. त्यामुळे संचालक म्हणून त्यांचा सर्वच कर्मचाऱ्यांशी चांगला संवाद आहे. येथे कर्मचाऱ्यांचे प्रश्न हाताळताना व्यावसायिक मूल्यांबरोबर पारिवारिक जिव्हाळाही जपला जातो. परिणामी कामगारांचे सोडू न जाण्याचे प्रमाण कमी आहे. मार्व्हलसचे सर्व संचालक स्वतः कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधतात. त्यांच्या सुख, दु:खात सहभागी होतात. त्यामुळे मार्व्हलसमध्ये समूहभावना तयार झाली असून व्यवसायवृद्धीसाठी संघटित प्रयत्न होतात. व्यवस्थापनाच्या दृिष्‍टकोनातून हे महत्त्‍वाचे आहे.

– साक्षी पाटील,
(संचालक, मार्व्हलस इंजिनिअर्सप्रा. लि.)

मी १५ वर्षांपासून मार्व्हलसमध्ये आहे. एवढ्या कालावधीत कोणाला नोकरीवरून काढून टाकल्याचे कधी पाहिले नाही. काम कमी आहेम्हणून कामगारांना काही दिवसांसाठी येऊ नका असेही कधी सांगितले नाही. त्यामुळे कामगार नोकरीबाबत निश्चत आह िं ेत. इथे प्रत्येकाचा कौशल्य विकास करण्यावर भर दिला जातो. मलाही प्रशिक्षणाकरिता कं पनीच्या खर्चाने ब्राझीलला पाठवले होते. चांगले काम करणाऱ्यांना नेतृत्वाची संधीही दिली जाते. मार्व्हलस बरोबरच्या या पंधरा वर्षांत स्वतःमध्ये अामूलाग्र बदल झाल्याचे जाणवते.

– प्रशांत क्षीरसागर,
(वरिष्ठ व्यवस्थापक, मार्व्हलस इंजिनिअर्सप्रा. लि.)

आपली एखादी कल्पना प्रत्यक्षात येऊन त्याचा फायदा कंपनीला झाला की प्रत्येकालाच आनंद होतो. याचा अनुभव मार्व्हलसमध्ये आम्ही वारंवार घेतो. संग्राम पाटील सर आम्ही केलेल्या सूचना, नवीन कल्पना समजावून घेतात. त्याची जशीच्या तशी अंमलबजावणी करतात. त्याचे श्रेय आम्हाला देतात. त्यामुळे कामाचे समाधान मिळते. इथे प्रत्येकाचा सन्मान केला जातो. नेतृत्वगुण ओळखून त्याला अधिक जबाबदारीचे काम दिले जाते. मी आणि संग्राम पाटील सर पूर्वी एका कंपनीत काम करत होतो. पुढे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मग काही वर्षांनी त्यांनी मला मार्व्हलसमध्ये काम करण्याबाबत विचारले. गेली २१ वर्षे आम्ही एकत्र काम करतो आहोत. कधीही येथून दुसरा विचार करावा असे वाटले नाही.

– सुधीर बकर,
(संचालक, तांत्रिक विभाग, मार्व्हलस इंजिनिअर्सप्रा. लि.)

सूक्ष्म नियोजन, त्याची काटेकोर अंमलबजावणी, कामगारांशी सुसंवाद, गुणवत्तापूर्ण उत्पादने यामुळे मार्व्हलसच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. इथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कामाचे अचूक मूल्यमापन केले जाते. कामगारांच्या कौशल्य विकासावर भर दिला जातो. व्यवसायवृद्धीबरोबरच कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे प्रत्येकाला काम करण्याचा उत्साह येतो. कामगार आणि संग्राम पाटील यांचा थेट संवाद होत असल्याने संवादातील त्रुटी राहात नाही आणि कामातही पारदर्शकता येते.

– विठ्ठल पाटील,
(संचालक, मार्व्हलस विमरकट्टी फौंड्री प्रा. लि.)

मराठी