हिन्दुस्तान फीड्सचे संस्थापक श्री. हंबीरराव माने शिक्षणासाठी रहिमतपूर यथेून सातारा नतरं पुणेआणि नतरं मुंबई येथे स्थायिक झालेहोते. त्यांनी आपल्या दोन मुलांसह आपल्या जन्मभूमीची सेवा करण्याचा आणि साताऱ्यात स्थायिक होण्याचा विचार केला. १९८८ मध्ये श्री. नितीन माने, श्री. सचिन माने यांनी त्यांचेवडील श्री. हंबीरराव माने यांच्या सोबत हिन्दुस्तान फीड्स मॅनुफॅसिटुरिंग कंपनीची सुरुवात एमआयडीसी सातारामध्ये ८ गुठंयाच्या अशा छोट्या जागेवर केली. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयानेकंपनी वाढवली आणि समृद्ध झाली. ८ एकरांच्या मोठ्या जागेवर स्थलांतरित आणि विस्तारित करण्यात आली. त्यानतरं दरवर्षी कंपनीची प्रगती होत राहिली व जसेभांडवल निर्माण झाले. तसेउत्पादन क्षमता वाढवत नेली. आधनिु क काळासोबत हातमिळवणी करताना हिन्दुस्तान फीड्स अत्याधनिुक यंत्रसामुग्री, गोडाऊन इ. मार्गाने विस्तारित होत गेली. पशुखाद्यात गुणवत्ता आणि ग्राहकांचा मिळणारा उदडं प्रतिसाद या जोरावर हिन्दुस्तान फीड्सने १९९३ मध्ये बारामती येथे दुसरा, २०१७ मध्ये श्रीरामपूर यथे तिेसरा आणि २०२०-२१ मध्ये बारामतीमध्चये अजून एक नवीन कारखाना सुरू केला. एवढेच नाहीतर २०२१-२२ मध्ये हिन्दुस्तान फीड्स प्रथमच महाराष्ट्र राज्याबाहेर पशुखाद्य उत्पादन करण्यासाठी पोचले. मेडता सिटी, जि. नागौर, राजस्थान या ठिकाणी आपला चौथा कारखाना सुरू केला व महाराष्ट्राचेपशुखाद्य राजस्थानमध्ये उपलब्ध करून दिले. आज हिन्दुस्तान फीड्स ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पशुखाद्य तयार करणारी कंपनी आहे. कंपनीचेसातारा, बारामती, श्रीरामपूर आणि मेडता – राजस्थान येथे चार कारखानेअसून, त्यांची एकत्रित पशुखाद्यनिर्मिती क्षमता प्रतिदिवस २५०० मेट्रिक टन पेक्षा जास्त असून, दरमहा ४०,००० मेट्रिक टन पशुखाद्य बनविले जाते. हिन्दुस्तान फीड्स ग्रुपचे कारखानेचोवीस तास चालूअसतात आणि प्रत्कये पाच सेकंदाला महाराष्ट्रातील कोणत्यातरी गावातील एक शेतकरी आपल्या गाई, म्हशींसाठी प्रेमाने हिन्दुस्तान फीड्सचेपशुखाद्याचेपोते विकत घेत असतो. हिन्दुस्तान फीड्स ही कंपनी गेल्या तीन दशकांहून जास्त काळ पशुखाद्यनिर्मिती क्षेत्रात निरतरं कार्यरत आहेव शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. आज पशुखाद्य क्षेत्रात हिन्दुस्तान फीड्स हेएक अग्रणी नाव असून, शेतकऱ्यांना आपुलकीचे व परिचित आहे.