फिनोलेक्स – विद्युत क्षेत्रातील संपूर्ण उत्पादन श्रेणी देणाऱ्या शक्तिकें द्राच्या दिशेने 'महा'परिवर्तन!

ग्राहक दर्जाबाबत अधिक चोखंदळ झाले असून एकत्रित खरेदीवर भर देत असल्याचे व त्यांचा स्पष्ट कल आभासी संवाद, इ कॉमर्स, इ शॉपिंग, आणि इ एंटरटेनिंगकडे असल्याचे कंपनीला जाणवले. फिनोलेक्सला डिजिटल होण्यासाठीची ही नामी संधी आहे. ग्राहकांच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी ‘फिनोलेक्स स्मार्टविझ’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स कॅल्सी’ ही नवी ऍप्स प्रस्तुत केली आहेत. पैकी फिनोलेक्स स्मार्टविझ हे ए आर (वास्तवाचा आभास) ऍप असून त्याद्वारे संमिश्र दृश्याच्या साहाय्याने ग्राहक पंखे, वॉटर हीटर्स, स्विचेस, आणि लायटिंग उत्पादनांची छायाचित्रे घरात/कार्यालयीन वातावरणात लावल्याचा अनुभव घेऊन ती उत्पादने त्यांच्या घराला / न्हाणीघराला शोभून दिसतात का, हे तपासून अचूक निवड करू शकतात.

प्रल्हाद पी. छाब्रिया आणि किशन पी. छाब्रिया
श्री. दीपक के. छाब्रिया

स्थापनेचा काळ

‘फाईन’ (बारीक) आणि ‘फ्लेक्झिबल’ (लवचिक) या शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘फिनोलेक्स’ हा शब्द तयार झाला असून स्थापनेनंतर तांब्याच्या बारीक तारेपासून उत्पादित लवचिक केबलशी हे नाव जोडले आहे. १९५८ मध्ये प्रल्हाद पी. छाब्रिया आणि किशन पी. छाब्रिया बंधूंनी ‘फिनोलेक्स केबल्स लिमिटेड’ या इलेक्ट्रिकल व टेलिकम्युनिकेशन केबल्स क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना केली. त्यांनी पहिल्यापासूनच उत्पादनाचा दर्जा आणि सरुक्षिततेबाबत तडजोड केली नाही. कार्यसंस्कृतीत रुजलेल्या या नैतिक मापदंडांमुळे फिनोलेक्सची गणना भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँडमध्ये होते. अद्ययावत तात्ंरिक सुधारणा, अत्याधुनिक उत्पादन सुविधा, गुणवत्ता व सेवेशी संबंधित सर्वोच्च निकषांचे पालन करून गेल्या सहा दशकांमध्ये कंपनीने नेतृत्त्व देणारे दर्जेदार उत्पादक म्हणून आपला ठसा उमटवला.

परिवर्तन

१९९० च्या दशकात दीपक छाब्रिया अमेरिकेतील शिक्षण पुर्ण करून फिनोलेक्स केबल्समध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून रुजू झाले. तोवर फिनोलेक्स एक ग्राहक आणि एकल उत्पादक होती. त्यांनी टप्प्याटप्प्याने बहुविध उत्पादनकक्षा आणि विस्तृत ग्राहकपट विकसित केला. कंपनीच्या उत्पादनशृंखलेत वैविध्यपुर्ण उत्पादनांची भर पडली, विविध केबल्सचे उत्पादन झाले. वैविध्य व विस्तार कार्यक्रम कंपनीत नित्याचेच झाले. दशकापेक्षा कमी कालावधीत वायर व केबल्सशी संबंधित ही कंपनी इलेक्ट्रिकल उत्पादनांचे वैविध्य देणाऱ्या उद्योगसंस्थेत बदलली. सध्या कंपनीत वायर्स व केबल्सच्या वैविध्यपुर्ण शृंखलेबरोबरच रोषणाई साधने, विधुत साधने, स्विचेस, स्वीच गियर, पंखे व वॉटर हीटर्सचे उत्पादन केले जाते. कंपनीचे अत्याधुनिक चाचणी सुविधांनी परिपुर्ण पाच कारखाने पुण्यातील पिपंरी व उर्से येथे, गोवा व उत्तराखंडातील रुरकी येथे आहेत.

फिनोलेक्स – भारतीय विद्युत उद्योगासमोर मापदंड उभारण्यात अग्रेसर

मल्टि स्ट्रॅंड वायर्स उत्पादित करणारे भारतातील पहिले उत्पादक घराघरांत व कार्यालयांतील इलेक्ट्रिकल वायर्सच्या उत्पादनासाठी मल्टि स्ट्रॅंड कंडक्टर्सचा वापर करण्याची कल्पना फिनोलेक्स केबल्सची होती. यामळे वायर्सची लवचिकता वाढून त्यांची हाताळणी सुलभ झाली. इतर व्यावसायिकांनीही अनुकरण केल्याने ही व्यावसायिक प्रथा बनली. उद्योगासाठीचे निकष निश्चित करताना बीआयएसने फिनोलेक्स वायर्संना प्रमाण मानले. धूररोधक अग्निरोधके (एफआरएलएस) व हॅलोजन विरहित ज्वालारोधके (एचएफएफआर) तयार करणारे पहिले उत्पादक भारतात उंच इमारती आल्यानंतर फिनोलेक्सने सर्वप्रथमज्वालारोधक – फ्म ले रिटार्डंट (एफआर), धूररोधक अग्निरोधके (एफ आर एल एस) आणि हॅलोजन विरहित फ्म ले रिटार्डंट वायर्सची निर्मिती करून बाधं कामांची सरुक्षितता राखली. प्रचलित पीव्हीसीपेक्षा एफआरएलएस पीव्हीसी इन्स्लेशनमध्ये ज्वालारोधी तत्त्वे अधिक प्रमाणात असून आग लागल्यास धुराचे प्रमाण कमी होते. आत्मनिर्भर भारतासाठी दिग्गज उद्योगसंस्थांशी सहयोग : सुमिटिहो, जपान आणि जीई, अमेरिका जे पॉवर सिस्टिम्स कॉर्पोरेशन (जपान) : वाढत्या शहरीकरणामुळे ओव्हरहेड ट्रान्समिशनचा तारा जमिनीखालून नेण्याची गरज होती. सुलभ वीजवहन आणि सरुक्षिततेच्या दृष्टिकोनातून उच्च दाबाच्या (एचव्ही) / अतिउच्च दाबाच्या (इएचव्ही) वीजवाहक तारांच्या उत्पादनासाठी जपानमधील सुमिटोमो इलेक्ट्रिक इंडस्ट्रीजची सहसंस्था, जे-पॉवर सिस्टिम्स कॉर्पोरेशन (जपेीएस) आणि फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या साह्यर्यातून भारतात व परदेशांत इएचव्ही केबल सिस्टिम्सचे एकत्रित पर्याय उपलब्ध झाले. जे व्ही – फिनोलेक्स जे पॉवर सिस्टिम्स लि. (एफजपेीएस) या सहयोगी उद्योगसंस्थेला रचना, उत्पादन, चाचणी, प्रकल्प आखणी, अंमलबजावणी आणि परदेशांतील विक्री याबाबत जपेीएसचे तांत्रिक तसेच संशोधन व विकासाचे अनुभवी पाठबळ लाभले.

ही उत्पादन सुविधा भारतात अग्रगण्य असून इएचव्ही एक्सएलपीइ (एक्स्ट्रा हाय व्होल्टेज क्रॉस लिंक्ड पॉलिइथीलिन) इन्स्लेटेड यु पॉवर केबल्सचे उत्पादन येथे होते. शहरी भागांत पॉवर केबल्स इएचव्हि पॉवर ट्रान्समिशन ग्रिड्सच्या लाईनमध्ये स्थापित केल्याने सर्वाधिक गुणवत्ता व विश्वासार्हता गरजेची असते. तांत्रिकदृष्टया फजेपीएस स्पर्धकांच्या पुढे आहे, तिची मातृसंस्था व केबल तंत्रज्ञानाची जनक इएचव्हीला संशोधन व विकास कार्याचा पाच दशकांचा अनभव आहे. कंपाऊंड्ससाठी अमेरिकेतील जीई आणि वाईंडिंग वायर्ससाठी जर्मनीतील एन एस डब्ल् : यू फिनोलेक्स केबल्सने कंपाउंडींगसाठी तारांसाठी अमेरिकेतील जीई तर सबमर्सिबल पपं उद्योगात पाण्याखाली कार्यरत पीव्हीसी वाइंडिंग वायर्ससाठी जर्मनीच्या एनएसडब्ल्यू संस्थेचे साहचर्य स्वीकारले. एन एस डब्ल्यूविशिष्ट श्रेणीतील पीव्हीसीचा वापर करत असून त्यांचे उत्पादन व विक्री भारतात फक्त फिनोलेक्स करत आहे. वायर व केबल उद्योगातील अग्रमानाकिं त फिनोलेक्स केबल्सने इलेक्ट्रिकवॉटर हीटर्स, पंखे, लहान आकाराचे सर्किट ब्रेकर्स (एमसीबीज), स्विचेस आणि लाईटींग उत्पादनांमधून इलेक्ट्रिकल क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे.

पंख

फिनोलेक्सने सीलिंग, टेबल, पडिे स्टल, वॉल, एक्झॉस्ट आणि बहुविध वापरासाठीच्या पंख्यांची श्रेणी आणली आहे. हे पंखे आकर्षक व उत्तम कामगिरी प्रदर्शित करतात. ‘प्रिमियम’, ‘डेकोरेटिव्ह’ आणि ‘स्मार्ट’ ही पंख्यांची श्रेणी विश्वासार्हता व प्रभावी कामगिरीबरोबरच मोठी पाती (वाईड टिप ब्लेड), धूळ प्रतिबंधनासाठी प्रसिद्ध आहे.

वैविध्यपुर्ण उत्पादन परंपरा सांभाळत फिनोलेक्स केबल्सने उत्पादन शृंखलेत ऑलसांड्रा अँटिव्हरस अँटि बॅटेरिया पंख्यांचाही समावेश केला असून त्यांवर पारदर्शक नॅनो कोटिंगचा थर देतात, ज्यामुळे जिवाणू किंवा विषाणपाूं सून ९९.९ टक्के संरक्षण मिळते. हे कोटिंग घातक जिवाणूंचा नाश करून त्यांच्या वाढीला प्रतिबंध करून सूक्ष्मजीवापासून संरक्षण देते. अजिबात आवाज न करणाऱ्या सुपर सायलेंट बूमरॅंग सीलिंग फॅनमध्ये वापरलेल्या एबीएस ब्लेड्समुळे पंख्याची पाती आवाज न करता हवेवर स्वार होतात फिनोलेक्स द्वारा प्रस्तुत सीलिंग पंख्यांच्या स्टायलिश श्रेणीत फ्लीनॉर, ग्लॅडिएटर, एनएक्सजी व ॲलेसांडरा एनएकसजी सीलिंग पंखे येतात. या पंख्यांचे आकारर्शक रूप व एअरोडायनॅमिक रचनेमळे हे पंखे नेत्रसुखद ठरतता. शक्तिशाली कॉपर मोटरचा वापर केल्यामुळ अति गतिशील पंखे खोलीच्या प्रतेक कोपऱ्यात हवा पोचवतात.

पंख्यांच्या वैविध्यपुर्ण श्रेणीत जिवाणू व विषाणू रोधक पंख्यांची भर टाकल्याबद्दल फिनोलेक्स केबल्स लि. चे कार्यकारी अध्यक्ष श्री. दीपक के. छाब्रिया म्हणाले, “ग्राहककेंद्री उद्योगसंस्था या नात्याने फिनोलेक्स केबल्स ग्राहकांच्या आवडीनिवडींचा आढावा घेत असते. आम्हाला असे दिसले की, ग्राहकांमध्ये आरोग्य व स्वच्छता या घटकांबद्दल जागरूकता व लक्ष वाढले आहे. त्यानसुार आम्ही जिवाणू व विषाणू रोधक, धूळ प्रतिबंधक पंखे आणले, जे ग्राहकांचे घातक जिवाणू, विषाणू आणि जीवजंतूंपासून रक्षण करतात. पंखे स्वच्छ करताना होणारी गैरसोयही टाळता येत असल्याने ग्राहकांसाठी हा सुलभ उपाय ठरला आहे.”

एमसीबी

फिनोलेक्सच्या स्विचगियर व्यवसायाने तंत्रज्ञानाधारित गुणवत्वर भर देत एमसीबीज, आरसीसीबीज व डिस्ट्रिब्यूशन बोर्ड्सची वैविध्यपुर्ण शृंखला पेश केली आहे. ‘सरुक्षित, विश्वासार्ह आणि ऊजार्क्षम’ स्विचगियर शैलीतील विविध उत्पादने नव्या पिढीच्या विधुत सरुक्षाविषयक गरजेनसुार तयार करण्यात आली आहेत. फिनोलेक्स एमसीबीज उच्चतम ब्रेकिंग क्षमता देते आणि अतिरिक्त भार व शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देऊन विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करते. रेसिड्अल करंट सर्कट ब्रेकर (आरसीसीबीज) विद्युत धक्के व आग नियत्ंरित करते. आकर्षक बनावटीचे व उच्च कामगिरी करणारे डिस्ट्रीबुशन बोर्डस आहेत.

नुकतेच फिनोलेक्सने ऑटोमोटिव्ह सोर्स चेंज ओव्हर करंट लिमिटर (एसीसीएल) आणले असून वीजबिघाड झाल्यास एसीसीएल युनिट स्वयंचलित पद्धतीने विद्युत पुरवठा मेन्सवरून जनरेटरकडे वळवते. जनरेटरवरील विद्युत भार पुर्वनिर्धारित मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास विद्युत प्रवाह नियत्रंक म्हणून जनरेटरवरील संभाव्य ओव्हरलोड टाळते. फिनोलेक्सचे हेवी ड्युटी एसीसीएल्स तब्बल २५,००० कार्यप्रक्रियांची पुर्तता करण्यासाठी विकसित केले आहेत. त्यांच्यामध्ये स्वचालित पुनर्स्थापन सुविधा असून नव्या इमारती तसेच पुनर्निर्मिती प्रकल्पांसाठी त्यांचा वापर होऊ शकेल. फिनोलेक्सद्वारा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादित एमसीसीबीज वीजखांबांनसुार ६३ ते ८०० एएमपीज अशा विभिन्न प्रकारांत उपलब्ध होतात. रिटेल व पॅनेल बिल्डर ग्राहकांना
सेवा देता यावी, म्हणून स्विचगियर्स ५ फ्मरे्समध्ये उपलब्ध आहेत.

कॉन्ड्यूट्स

ग्राहकांना संपुर्ण इलेक्ट्रिकल उपाय देण्यासाठी फिनोलेक्स कॉन्ड्टयू्स व फिटिंग्जचेही उत्पादन बी आय एसच्या सर्वाधिक काटेकोर निकषांच्या कसोटीस उतरण्याच्या दृष्टीने गोव्यातील कारखान्यात विशेषत्वाने सूत्रबद्ध यपूीव्हीसीद्वारे होते. फिनोलेक्स पाईप्ससह जंक्शन बॉक्स, इन्स्पेक्शन बेंड्स अशा सर्वसाधारण फिटिंग्जचेही उत्पादन करते. शासनाचा वाढता रोख पायाभूत सुविधांवरील खर्चावर व परवडणाऱ्या घरांमधून मिळणाऱ्या वाढीवर आहे, हे जाणून हा व्यवसाय आगामी काळात वाढेल, अशी कंपनीला आशा आहे. या उत्पादनाच्या उदघाटनाप्रसंगी फिनोलेक्स केबल्स लि. च्या सेल्स ॲंड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अमित माथूर म्हणाले, “वायर व केबल उद्योगाचे संस्थापक म्हणून आम्ही वर्षानवुर्षे ग्राहक, व्यावसायिक आणि चॅनल भागीदारांसमवेत असलेले नाते जपतो. आमच्याकडे असलेले १.५ लाख रिटेलर्स उत्पादनवैविध्य वाढवण्यास सांगतात. कॉन्ड्टयू्सने बाजारपेठेतील हिस्सा वाढवत ग्राहकांशी असलेला नात अधिक दृढ करण्याची नवी संधी दिली.”

स्विचेस व परक उपकरणे

श्री. अमित माथूर

फिनोलेक्सद्वारा उत्पादित स्विचेस फेरिहा व प्रिमियम प्लस या आकर्षक व आधुनिक वैविध्यांत उपलब्ध आहेत. निमुळती, रिबलेस रचना व डायमंड कट फेरिहा जोडणीच्या वैविध्यपूर उपायांची विस्तृत शृंखला प्रस्तुत करते. ग्लॉसी भागामुळे कार्यक्षमतेची जोड लाभल्याने तुमचे घर अधिक उजळून निघेल. प्रिमियम प्लस उच्च दर्जाच्या पॉलिकार्बोनेटपासून बनते व आधुनिक स्विचेससाठी वापरलेल्या सिल्व्हर कॅडमियम ऑक्साइडचे लेपन केलेले कॉन्टॅक्ट पॉइंट्स, स्क्रू व टर्मिनल्स ही तिची वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षित, टिकाऊ आणि तब्बल १००,००० क्लिक पर्यंत कार्यरत राहण्यासाठी फिनोलेक्स प्रिमियम प्लस स्विचेस आगळ्यावेगळ्या फ्लुरोसंट स्ट्रिपमध्ये उपलब्ध असून अंधारातही मार्गदर्शन करतात. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी फिनोलेक्सने दर्जेदार इलेक्ट्रिकल उत्पादनांची मागणी ओळखून डोअर बेल, एक्सटेन्शन बॉक्स, स्पाइक गार्ड, ॲंगल होल्डर, बॅटन होल्डर, इ. इलेक्ट्रिकल साधनेही आणली आहेत. कालसुसंगत रचना आणि सर्वोत्तम गुणवत्ताप्राप्त उत्पादने आजच्या ग्राहकांच्या अपेक्षांनुसार आहेत. सेल्स व मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अमित माथूर म्हणाले, “हे उदघाटन म्हणजे बाजारपेठेतील हट के व दर्जेदार उत्पादन साहित्याची गरज ओळखून आम्ही केलेल्या लक्षणीय गुंतवणुकीचे फलित आहे.” ते पुढे म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, या केंद्रीभूत प्रयत्नांमुळे गतिमान इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्रात ही आमचा ठसा उमटेल” १.५ लाख रिटेल ग्राहकांच्या विनंतीवरून फिनोलेक्सने या वर्षी हेवी ड्यूटी इन्स्युलेशन टेप्सचे उत्पादन केले. आरओएचएस कंप्लायंट व ज्वालारोधी टेप्सना बाजारपेठेतून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून पुन्हा पुन्हा मागण्या नोंदवल्या जात आहेत.

ऑटो केबल्सचे भारतातील पहिले उत्पादक

  • दरसंचार विभागासाठी जेली फिल्ड टेलिकॉम केबल्सचे (जेएफटीसी) पहिले खासगी उत्पादक व वितरक
  • ५०० केव्ही क्षमतेच्या पॉवर के बल्सचे भारतातील पहिले व एकमेव उत्पादक
  • फिजिकल फॉर्म प्रक्रियेचा वापर करून को- ॲक्सिअल के बल्सचे पहिले उत्पादक
  • एरियल केबल्सचे रचनाभूत आराखडे तयार करणारे पहिले उत्पादक
  • यू एल प्रमाणिकरण प्राप्त लॅन केबल्सचे पहिले उत्पादक

वॉटर हीटर्स

फिनोलेक्सकडे भारतीय स्नानघरे व स्वयंपाकघरासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाचे उत्पादन साहित्य आहेत. उत्पादित इलेक्ट्रिक इन्स्टं व स्टोअरेज वॉटर हीटर्सची संपूर्ण शृंखला आहे. जागतिक दर्जाचे चौकोनी आकाराचे क्युबरडॉन प्लस स्टोअरेज वॉटर हीटर्स प्रस्तु करण्यात आले असून त्यामुळे जागेची बचत होते व जागेला आटोपशीर व अत्याधुनिक रूप मिळते. औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम सुरक्षा, कामगिरी आणि ऊर्जारक्षक वैशिष्ट्यांनी हे पंचतारांकित वॉटर हीटर्स युक्त आहेत. सहा टप्प्यांचे हेक्सा संरक्षक तंत्रज्ञान, हाय प्रिसिजन थर्मोस्टॅ आणि थर्मल कट आऊट, उत्पादन साहित्यासाठी आयपीएक्स ४ संरक्षक हेवी गेज टॅंक आणि प्रेशर रिलीज वॉल्व्हसह मल्टि फं क्शन सेफ्टी वॉल्व्हज या वॉटर हीटर्सची बलस्थाने आहेत. फिनोलेक्स स्टोअरेज वॉटर हीटर्स ब्लू टोपाझ ग्लासलाइन्ड एनेमल टॅंक सुविधेमुळे गंज व वाळवीपासून संरक्षण देतात. नव्या श्रेणीतील जुबिटो प्लस वॉटर हीटरचा दर्जा आणि अफलातून कामगिरीसाठी कं पनीने ७ वर्षांची वॉरंटी देऊ केली आहे.

लायटिंग उत्पादन

फिनोलेक्स एलइडी लाईटिंग श्रेणी ऊर्जाक्षम, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम उत्पादनांचे वैविध्य देत असून यात विविध प्रकाश क्षमतांचे बल्ब्ज, ट्युब्ज, अंतर्गत वापरासाठीचे डाऊन लाईट्स, सार्वजनिक वापरासाठीचे फ्लड लाईट्स, पदपथांवरील दिवे, बागेतील दिवे, यांचा समावेश आहे. कंपनीद्वारा प्रस्तु इन्व्हर्टर एल इ डी बल्ब्ज व एल इ डी कन्सिल्ड डाऊन लाईट्स वीजप्रवाह खंडित झाल्यावर आपोआप इन्व्हर्टर मोडवर जातात. हे दिवे सामान्य वीजप्रवाहामध्ये प्रति वॅट १०० ल्युमेन्स प्रकाश देतात आणि वीज नसताना ४० -५० टक्के कमी ल्युमेन्स वरही काम करतात. फिनोलेक्स के बल्स लि. चे कार्यकारी अध्यक्ष श्री. दीपक के . छाब्रिया म्हणाले,” व्यवसायाला सामर्थ्यव व्याप्ती देण्यासाठी नवनव्या उत्पादनांचा संच प्रस्तु करण्याचा आमचा प्रयास आहे.” ते पुढे म्हणाले, “एक ग्राहकें द्री ब्रॅंड म्हणून फिनोलेक्स के बल्स प्रयोगशील कल्पकतेला महत्त्व देते. इन्व्हर्टर एल इ डी बल्ब्जमुळे अनपेक्षितपणे वीजपुरवठा खंडित झाल्यास निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा मिळाला आहे.

हे बल्ब्ज विशेषतः ग्रामीण भागात आणि जिथे वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी उपयुक्त आहेत.’ नव्या एल इ डी कन्सील्ड डाऊन लाइट्समध्येफ्लिकर्डदिव्यांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे फ्लिकर रिडक्शन तंत्रज्ञान वापरले असून दिव्यांच्या त्रासापासून ग्राहकांना असलेला धोका कमी होतो. हे दिवे आंतरराष्ट्रीय निष्कर्षांच्या अभ्यासातून विकसित झाले आहेत. यानुसार हाय फ्लिकर एल इ डी दिव्यांमधून बाहेर पडणाऱ्या अतिरिक्त भकभकाटाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. विशेषतः फोटोसेन्सिटिव्ह व्यक्तींना डोके दुखी, अर्धशिशी, डोळ्यांवर ताण, धूसर दृष्टी किंवा थकवा जाणवतो.

फिनोलेक्स हाऊस

फिनोलेक्सने वर्दळीच्या इलेक्ट्रिकल बाजारपेठे त उभारलेल्या स्वतंत्र विक्री दालनांमध्ये वायर्स व केबल्स, पंखे, वॉटर हीटर्स, लायटिंग उत्पादने, स्विचेस आणि स्वीचगियरची विक्री होते. या विक्री दालनांमध्ये ग्राहकांना आरामदायी वातावरणात सहकु टुंब येऊन उत्पादने हाताळण्याची संधी मिळते. प्रशिक्षित तज्ज्ञांकडून शंकासमाधानही होते. यामुळे खरेदीचा अनुभव संस्मरणीय ठरतो.

भविष्याकडे मार्गस्थ होताना…

ग्राहक दर्जाबाबत अधिक चोखंदळ झाले असून एकत्रित खरेदीवर भर देत असल्याचे व त्यांचा स्पष्ट कल आभासी संवाद, इ कॉमर्स, इ शॉपिंग, आणि इ एं टरटेनिंगकडे असल्याचे कंपनीला जाणवले. फिनोलेक्सला डिजिटल होण्यासाठीची ही नामी संधी आहे. ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘फिनोलेक्स स्मार्ट विझ’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स कॅल्सी’ ही नवी ऍप्स प्रस्तुत केली आहेत. पैकी फिनोलेक्स स्मार्ट विझ हे ए आर (वास्तवाचा आभास) ऍप असून त्याद्वारे संमिश्र दृश्याच्या साहाय्याने ग्राहक पंखे, वॉटर हीटर्स, स्विचेस, आणि लायटिंग उत्पादनांची छायाचित्रे घरात / कार्यालयीन वातावरणात लावल्याचा अनुभव घेऊन ती उत्पादने त्यांच्या घराला / न्हाणीघराला शोभून दिसतात का, हे तपासून अचूक निवड करू शकतात. फिनोलेक्स के बल्स कॅल्सी हे ऍप ग्राहकांना प्रकल्पासाठी किती केबल आणि स्वीचगियर्स लागणार आहेत, याचा अचूक अंदाज देते. या ऍपमध्ये प्रकल्पासाठीच्या संभाव्य विद्युत भाराची व इतर आवश्यक तपशीलाची नोंद के ल्यास वायर्सव के बल्सचा सुयोग्य आकारही सुचवते. हे ऍप हातात असल्यास अवघड हिशेबही चुटकीसरशी होतात. ग्राहकांच्या मागण्यांचे समाधान आणि स्पर्धात्मक क्षेत्रात टिकण्यासाठी कं पनीने वर्कफ्रार्म होम ग्राहकांची मागणीच्या पूर्ततेसाठी इलेक्ट्रिकल वायर्सच्या तुलनेत ओएफसी के बल्सच्या उत्पादनास प्राधान्य दिले. सध्याचे स्मार्ट तंत्रज्ञान किफायतशीर किमतीत देण्यासाठी आधीच्या स्विचेसवर स्थापित आयओटी चलित लायटिंग उत्पादने आणि पंखे उपलब्ध करण्यासाठी कं पनी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना मूल्याधारित सेवा बहाल करण्यासाठी फिनोलेक्सची नवी व कल्पक उत्पादने आणण्याची योजना असून बाजारपेठांशी सुसंगत व किफायतशीर उत्पादनांची भर यामुळे पडेल. इलेक्ट्रिक कं त्राटदार आणि इलेक्ट्रिशियन्सना अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, सर्वोत्तम कार्यप्रथा, सेवांचा दर्जा याबाबत प्रशिक्षित के ले जाईल. निर्धारित दोन ते तीन शहरांमध्ये कं पनीचा विस्तार कार्यक्रम सुरु राहील. आगामी काळात ग्रामीण भागाकडून अर्थपूर्ण योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.

मराठी