परदेशातील शिक्षणाचे स्वप्न करा साकार! ‘दिलीप ओक्स’ ॲकॅडमी

अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीमधील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविणे, हे तुमचे स्वप्नं आहे का?, मग तुम्हाला खुद्द त्या विद्यापीठात शिक्षण घेताना पाहणे आणि तुमच्या स्वप्नांना पंख देऊन ते प्रत्यक्षात उतरविणे हे ‘दिलीप ओक्स’ ॲकॅडमी’चे एकमेव ध्येय आहे. या ध्येयापोटी गेल्या तीन दशकांपासून अव्याहतपणे मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षण देणाऱ्या ‘दिलीप ओक्स’ ॲकॅडमी’चा आजवरच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

दिलीप ओक हेव्यवसायानेचार्टर्ड अकाउंटंट तसेच कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट आहेत. त्यांनी मास्टर्स इन कॉमर्स आणि बॅचलर्स इन लॉ पूर्ण केलेआहेत. टाटा मोटर्स, थॉमस स्मिट (लिबिया) आणि थर्मॅक्समध्ये त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात जवळपास 10 वर्षेकाम केले. परंतु शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळे आणि नावीन्यपूर्ण काम करावेअशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, १९८९ मध्ये अमेरिकेच्या एका अधिकृत दौऱ्यावर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे भेट दिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बहुतेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चीनमधून आलेले आहेत. भारतातील विद्यार्थी अतिशय थोड्या प्रमाणात होते. तेही मुख्यतः आयआयटी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून आलेलेहोते. इतकेकमी भारतीय का आहेत, याची विचारपूस केली असता, तेथील प्राध्यापकांनी त्यांना सांगितलेकी अमेरिकेत उच्च शिक्षणाबद्दल भारतीयांमध्ये जागरूकता नाही. श्री. ओक यांना हेही समजलेकी अमेरिकेत शिक्षणाचा खर्च खूप जास्त असला, तरी भारतातील विद्यार्थी हेबुद्धिमत्तेच्या जोरावर येथे शिष्यवृत्तीच्या साहाय्यानेकमी खर्चात अगदी सहजपणे शिक्षण घेऊ शकतात. फक्त आपल्याकडील विद्यार्थ्यांपर्यंत त्याबाबत आवश्यक ती माहिती पोहोचत नाही. कारण त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती देणारी कुठलीही संस्था भारतात अस्तित्वात नव्हती. त्या क्षणी दिलीप ओक यांना अशी संस्था सुरू करण्याचा विचार सुचला. अमेरिकेत घडलेल्या या एका विलक्षण प्रसंगानेत्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.

‘दिलीप ओक्स’ ॲकॅडमी’ची रोवली मुहूर्तमेढ

भारतात परत आल्यावर त्यांनी आपली पत्नी किशोरी यांच्याशी यावर चर्चा केली आणि त्यांनीसुद्धा कॉर्पोरेट नोकरी सोडून अशी संस्था सुरू करण्यास प्रोत्साहित केले. पण ते फार सोपे नव्हते. अमेरिकन विद्यापीठांविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यावेळेस इंटरनेट नव्हतेआणि त्यांची प्रवेश प्रक्रिया जटिल होती. म्हणूनच त्यांना सर्व अमेरिकन विद्यापीठांकडून पोस्टाद्वारेमाहितीपत्रके मिळवावी लागली कारण कुरिअर सेवा खूप महाग होती. जवळजवळ ४ वर्षेसर्व प्रसिद्ध विद्यापीठांची माहिती आणि त्यांचेरँकिंग, उपलब्ध अभ्यासक्रम आणि व्हिसाची औपचारिकता इत्यादी गोष्टी समजून घेण्यात गेली. तसेच त्यांना स्वतः चार्टर्ड अकाउंटट असल्यामुळे विविध अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानाची माहिती करून घ्यावी लागली. या दरम्यान त्यांनी तात्पुरता व्यवसाय म्हणून १ जानेवारी १९९० रोजी एमबीए प्रवेश परीक्षेसाठीचे वर्ग सुरू केलेजेत्यावेळी भारतातील भरभराटीचेक्षेत्र होते. आणि अल्पावधीतच त्यांच्या वर्गांना पुण्यात लोकप्रियता मिळाली. नव्वदीच्या दशकात देशात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये हळूहळूवाढत होती. त्यामुळेइंजिनिअरिंग पदवीधारकांची संख्या वाढायला लागली होती. दरम्यान, १९९४-९५ मध्ये ट्रायल बॅच घेतली. त्यानंतर १९९६ पासून त्यांनी पूर्णपणे या कामात स्वत:ला झोकून दिले. सुरवातीला अमेरिकेत मुलांना शिक्षणासाठी पाठविण्यास पालकांना तयार करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावेलागले. मुख्यत: पालकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ‘दोन लाखांत अमेरिका’ असेघोषवाक्य केलेआणि तेअल्पावधीतच प्रसिद्ध झाले. २५ विद्यार्थ्यांपासून सुरु केलेला पहिला वर्ग बघता-बघता दर वर्षी ३५०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढत गेला आणि २५ वर्षांत तब्बल ३०,००० मुलांना अमेरिकेला उच्चशिक्षणासाठी पाठवले. विशषेतः मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचेअमेरिकेला जाण्याचेस्वप्न त्यांनी कमी खर्चात पूर्ण करण्याची किमया करून दाखवली आणि या क्त्षेरातील भारतातील सर्वात मोठी संस्था झाली. परदेशात विशषेत: अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी ॲकॅडमीमध्ये पूर्णत: प्रोफेशनल टिम कार्यान्वित आहे. अमेरिकेबरोबरच कॅनडा आणि जर्मनीमध्ये उच्चशिक्षण घेण्यासही मार्गदर्शन केलेजाते.

aks-img-3

जर्मनी आणि कॅनडामध्ये शिक्षणाची संधी

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेइतकेच जर्मनी आणि कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. दोन्ही देशांत स्थानिक तरुणांची संख्या कमी होत असल्यामुळे तेथे तांत्रिक ज्ञान असलेल्या परदेशी लोकांची गरज भासत आहे. त्यांना कायमस्वरूपी नागरिकत्व मिळणेसुद्धा सोपे जाते. कॅनडातील विद्यापीठांमध्ये अमेरिकेइतकेच उत्तम शिक्षण, इतर सुविधा आणि नोकरीच्या संधी आहेत. मात्र, या दोन्ही देशांतील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे भारतातील पदवी शिक्षणाचेगुण अतिशय चांगले असावे लागतात. त्याशिवाय जर्मनीसाठी जर्मन भाषा शिकणे गरजेचे आहे. प्रवेशप्रक्रियेसाठी किमान A1, A2 या लेव्हल चेजर्मन भाषेचे शिक्षण पूर्ण होणेआवश्यक असते. पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीकडून शक्षै णिक शुल्क आकारलेजात नाही. काही उच्च दर्जाची विद्यापीठे GRE परीक्षेचा स्कोअर ग्राह्य धरतात.

बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याकडे वाढतोय कल

आजकाल आयआयटी आणि एनआयटी सारख्या नामांकित संस्थांमध्ये जाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा असते. दर वर्षी १० लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त ३०,००० (३%) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. मात्र त्या तुलनेत अमेरिकेच्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवणे नक्कीच सोपे आहे. शिवाय बरेच पालक आता आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी सहजपणे खर्च करू शकतात. कित्येक विद्यापीठेपात्र उमेदवारांना गुणवत्ता-आधारित शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य देतात. त्यामुळे मध्यमवर्गीय परंतु हुशार विद्यार्थ्यांनासुद्धा जाणे शक्य आहे. भारतात विद्यार्थ्यांना पदवीच्या सुरुवातीलाच त्यांची आवश्यक असलेली अभ्यासाची शाखा निवडणे आवश्यक असते. उदा. मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स. त्यानंतर ते त्यांचे अभ्यासाचे क्षेत्र बदलू शकत नाहीत. तथापि, अमेरिकेमध्ये पहिल्या एक-दोन वर्षांसाठी तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची परवानगी असते. दुसऱ्या या किंवा तिसऱ्या या वर्षी स्पेशलायझेशन निवड शूकता. ही लवचिकता विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास संधी देते. “पदवी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात पाठवायचे असेल, तर त्याची सुरवात अगदी शाळेपासूनच व्हायला हवी. म्हणजे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना त्याची तोंड ओळख करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेणे गरजेचे असते. कारण, अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेशासाठी याचेफार महत्व असते,” असे दिलीप ओक यांचे म्हणणे आहे.

aks-img-4
aks-img-5

भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविणे, हे केवळ आमचे उद्दिष्ट नाही. तर तेथील नामांकित विद्यापीठांत आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यापासून ते तेथे पोहोचेपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन करतो. विद्यार्थी आणि पालकांच्या या विश्वासामुळे गेली २५ वर्षे या व्यवसायात सर्वोच्च स्थानावर टिकून आहोत. आतापर्यंत आम्ही जवळपास ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तम विद्यापीठांत पाठविले आहे.

-दिलीप ओक,
संस्थापक-संचालक, दिलीप ओक्स ॲकॅडमी

‘दिलीप ओक्स’ ॲकॅ डमी’चे वैशिष्ट्ये…

  • उच्च शिक्षणासाठी अमेरिका, कॅ नडा आणि जर्मनीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन.
  • दरवर्षी सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.
  • अमेरिके तील विविध विद्यापीठांशी प्रवेशाबाबत tie-up.
  • मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना परवडतील अशा कमी खर्चाच्या परंतु चांगल्या विद्यापीठांत आर्थिक मदतीसह प्रवेश मिळवून देणे.
  • शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय.
  • फक्त नामांकित विद्यापीठांमध्येच शिक्षणासाठी पाठविल्यामुळे उत्तम नोकरी मिळण्याची खात्री.
  • व्हिसा मिळवण्यासाठी अचूक मार्गदर्शन आणि तयारी के ल्यामुळे ९९ % विद्यार्थ्यांना व्हिसा मिळतो.
  • अमेरिके त जाण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार.

दिलीप ओक्स’ ॲकॅ डमी’मध्येदेण्यात येणाऱ्या शैक्षणिक सेवा

  • ॲडमिशन सेंटर सर्व्हिसेस : अमेरिका, कॅ नडा आणि जर्मनीमधील चांगल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शन
  • GRE, SAT, TOEFL, IELTS परीक्षांसाठी क्लासरूम आणि ऑनलाईन कोचिंग
  • जर्मन लॅंग्वेज कोचिंग : A1, A2, B1, B2, C1 लेव्हल साठी
  • GRE परीक्षेचा सराव करून घेण्यासाठी ‘ओक्स ऑनलाइन GRE टेस्ट’ Oak’s Vocabulary App
  • ऑनलाईन प्रॅक्टिस मटेरियल : ‘Oak’s Focused Practice, Oak’s Test Prep
  • चांगला GRE स्कोअर मिळविण्यासाठी ‘ओक्स स्टडी प्लॅन्स’

दिलीप ओक्स’ ॲकॅ डमी’चे आतापर्यंत मिळालेले यश

  • गेल्या २५ वर्षांत जवळपास ३0 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
  • दरवर्षी ॲकॅ डमीचे सुमारे एक हजार विद्यार्थी अमेरिके तील प्रमुख १२५ विद्यापीठांत प्रवेश घेतात.
  • यात स्टॅनफर्ड, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कार्नगी मेलॉन, कॉर्नेल, कोलंबिया, जॉर्जिया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी, टेक्सास ऑस्टीन इत्यादी नामांकित विद्यापीठांचा समावेश आहे.
  • गेल्या ५ वर्षांपासून कॅ नडा तसेच जर्मनीमधील विद्यापीठांसाठी वेगळा विभाग स्थापन के ला आहे. त्यातही आता विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे.
  • गेल्या ३ वर्षांपासून १२ वी नंतर अमेरिके तील बॅचलर डिग्रीच्या प्रवेशासाठी वेगळा विभाग स्थापन के ला आहे. पुढील काही वर्षांत त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

‘दिलीप ओक्स’ ॲकॅ डमी’च्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया…

मी १५ वर्षांपूर्वी अमेरिकेमध् उच्च ये शिक्षणा करता आले. M.S. Computer Science (Indiana University) केल्यानंतर Software Engineering च्या क्षेत्रात मी गेले १३ वर्षे नोकरी करत आहे. मी दिलीप ओक अकॅडमीमध् २००७ साली प्र ये वशे घेतला. अकॅडमीचा फायदा मला GRE च्या तयारीसाठी झाला. शिवाय उत्तम कॉऊन्सेलिंग मुळे मला यनिुव्हर्सिटी निवडण्यासाठी तसेच आवश्यक कागदपत् तरे यार करण्यासाठी मदत झाली. दिलीप ओक अकॅडमीचा माझ्या अमेरिकेतील उच्च शिक्षणाच्या स्वप्नास साकार करण्यात सिंहाचा वाटा होता! खूप आभारी.

– नम्रता लेले,
Atlassian, सॅन फन्सीस्को

अमेरिकेतील विद्यापीठामधून मास्टर्स डिग्री मिळवावी, अशी माझी मनापासून इच्छा होती. तेथील शिक्षकांनी माझी GRE ची उत्तम तयारी करून घेतली. स्टेटमेंट ऑफ पर्पस (SOP) ची योग्य रचना करायला शिकवली आणि यनिुव्हर्सिटीची निवड करताना साजेसा Resume बनवायला मदत केली. आणि मला Georgia Institute of Technology या विद्यापीठामध् M.S. Computer ये Science ला प्रवशे मिळाला. अमेरिकेत जाऊन आपले आयुष्य घडविण्याची पहिली पायरी म्हणजे चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवशे मिळवणे. यासाठी मला उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल मी ओक अकॅडेमीचा आभारी आहे.

– अश्विन कोल्हे,
Senior Engineering Manager, NVIDIA Corp. सॅन फन्सीस्को

विद्यापीठांची निवड आणि स्टेटमेंट ऑफ पर्पससाठी केलेले मार्गदर्शन अत्यंत फायदेशीर ठरले. तसेच व्हिसा प्रक्रियेसाठी पद्धतशीर आणि प्रभावी समुपदेशन आणि ओक सरांसमवेत व्हिसा मुलाखतीच्या उत्तम सरावामुळे कोणते प्रश्न उद्भवू शकतात हे समजण्यास मदत झाली. या उत्तम मार्गदर्शनामुळे मला अमेरिकेतील नामवंत Yale विद्यापीठामधे PhD, Computer Science साठी संपूर्णशिष्यवृत्ती (वार्षिक रु. ४६ लाख) मिळवण्यासाठी झाला.

– केतकी जोशी,
PhD, Computer Science

मला GRE प्राध्यापकांचे खूप कौतुक वाटते ज्याने आम्हाला काय अभ्यास करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे शिकवले. माझ्या समुपदेशकाने मला अत्यत टेकनिकल SOP तयार करण्यास मदत केली. माझे GRE परीक्षेतील उत्तम गुण आणि SOP ने मला Stanford, New York, Cornell, Michigan State इत्यादी ९ विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला. Stanford सारख्या जगातील सर्वोच्च विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याचे माझे स्वप्न दिलीप ओक अॅकॅडेमीच्या मदतीने साकार झाले.

– अन्वेश बदामीकर,
Stanford University, M.S. Civil Engineering

अकॅडेमीतील GRE कोचिंगचा मला भरपूर फायदा झाला. माझे Verbal Section कमकुवत होते परंतु शिक्षकांच्या योग्य
मार्गदर्शनामुळे मला GRE परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले. ओक सरांनी माझ्या प्रोफाइलवर आधारित विद्यापीठे सुचविली ज्यासाठी त्यांनी केवळ माझे GRE चे गुण मानले नाही तर विद्यापीठांकडून मिळणारी आर्थिक मदत आणि त्यांचा अभ्यासक्रमदेखील विचारात घेतला. ह्यामुळे मला Virginia Tech ह्या नामवंत विद्यापीठामध्ये M.S. Mechanical Engineering मध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती (वार्षिक रु. ३९ लाख) प्राप्त झाली. अकॅडमीच्या बहुमूल्य मदतीबद्दल धन्यवाद.

– मृणाल भालेराव,
Stanford University, M.S. Mechanical Engineering

तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे…

अमेरिकेतील आणि कॅनडातील विद्यापीठांत विविध प्रकारची भरघोस आर्थिक मदत दिली जाते. त्याचप्रमाणे कॅम्पस जॉब करून राहण्याचा खर्च सहजपणे निघू शकतो. त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त रुपये ३५ लाख खर्च येतो. पण बहुतेक विद्यार्थ्यांचा रुपये १० ते १५ लाखांपेक्षा जास्त खर्च येत नाही. यासाठी बँकांचे शैक्षणिक कर्ज सहज उपलब्ध असते. जर्मनी मध्ये बहुसंख्य विद्यापीठांत Tuition Fee आकारली जात नाही. त्यामुळे फक्त राहण्याचाच खर्चयेतो. जो साधारणपणे १५ लाखांपेक्षा जास्त नसतो.

परदेशात, विशेषत: अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीमध्ये नोकरीच्या उद्देशाने शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक असलात तर, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनिअरिंग या विद्याशाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणे योग्य ठरेल. त्याचबरोबर इतरही शाखांमध्ये उच्चशिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण बरेच आहे. उदा. व्यवस्थापन, जीवशास्त्र, फायनान्स आणि अर्थशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी

अमेरिकेमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणि तसेच सरकारने अब्जावधी डॉलर्सची मदत केल्यामुळे जॉब मार्केट ‘नॉर्मल’ होत आहे, तसेच कोरोनानंतर अमेरिकेतील बेरोजगारीचा दर एप्रिल २०२० मध्ये १४.८% पर्यंत वाढला होता. आता तो ५.५% पर्यंत कमी झाला आहे. नजीकच्या भविष्यात तो आणखीनही खाली येईल. त्याचप्रमाणे नोकरीच्या नव्या संधीसुद्धा निश्चितच निर्माण होत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत घेतलेल्या उच्च शिक्षणामुळे नोकरी मिळणे सहज शक्य आहे.

अमेरिकेतील विद्यापीठांमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य कोट्याव्यतिरिक्त 20,000 वर्कपरमिटचा विशेष कोटा आहे. शिवाय ग्रीन कार्डसाठीचेनवीन विधेयक लवकरच मंजूर होईल. ज्या योगे ग्रीन कार्डचा देशनिहाय कोटा निघून जाईल आणि यामुळेभारतीयांना तीन तेचार वर्षांत ग्रीन कार्ड मिळणे सोपेहोईल.

साधारणत: पदवी शिक्षण सुरू असताना तृतीय वर्षात ही परीक्षा दिली जाते. पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षांच्या पहिल्या सत्रातसुद्धा ही परीक्षा दिली तरी चालते. पदवी शिक्षणानंतर तत्काळ तुम्ही पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेऊ शकाल. तसेच GRE परीक्षेचा तुमचा स्कोअर पाच वर्षांसाठी ग्राह्य धरला जातो.

1) GRE 2) TOEFL / IELTS स्कोअर 3) भारतातील पदवी अभ्यासक्रमातील शैक्षणिक कामगिरी 4) अभ्यासाशी संबंधित इतर गोष्टी उदा. प्रोजेक्ट, सेमिनार, इंटर्नशिप. 5) संबंधित विषयातील नोकरीचा अनुभव

मराठी