‘जे कराल तेमनापासून करा. जिथे जाल तिथेसर्वोच्च बना,’ असा संदेश पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) नेहमी देतात. ते कोल्हापूरच्या मातीतले रांगडे व्यक्तिमत्त्व. आयुष्यातील चढ-उतार त्यांनी अनुभवले. मात्र, न डगमगता त्याला तेसामोरेगेले. इंजिनिअर होण्याचे त्यांचेस्वप्न होते. घरच्या परिस्थितीनेतेसाकार झाले नाही.
डी. वाय. पाटील ग्रुप : शिक्षणाचा वटवृक
शेकडो शिक्षण संस्थांचेव्यापक नेटवर्क असलेला व गुणवत्तेमुळेराज्यातच नव्हे, तर देशभरात ओळखला जाणारा डी. वाय. पाटील ग्रुप शैक्षणिक वटवृक्ष बनला आहे. ग्रुपच्या विविध संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेलेलाखो विद्यार्थी आज देश-विदेशांत उच्चपदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देतानाच परंपरा जतन करून सुजाण नागरिक बनवण्यासाठी ग्रुपतर्फे नेहमीच प्रयत्न केला जातो
शेती सांभाळतच त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. अध्यात्म त्यांच्या ीवनाचेअविभाज्य अंग. कसबा बावड्यातील श्रीराम सेवा सोसायटीची निवडणूक जिंकून तेसंस्थेचेअध्यक्ष झाले. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. पुढे कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचेउमेदवार म्हणून ते विजयी झाले. त्यानंतर १९६७ व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. पुढे १९८३ ला विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांचा निर्णय झाला आणि त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे वैद्यकीय, आर्किटेक्चर, फार्मसी, कृषी इत्यादी अनेक महाविद्यालये सुरू केली. तरुणांना शिक्षकाचेसन्मानजनक काम मिळाले. या कार्याची दखल घेऊन त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्माननीय डॉक्टरेट देऊन बहुमान करण्यात आला.
भारत सरकारनेत्यांचा ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरव केला आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६२ शिक्षण संस्थांचे काम चालते. त्या संस्थेत सोळा हजारांवर कर्मचारी असून, ६७ हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. आजपर्यंत ३ लाख ५३ हजार विद्यार्थी पदवीधर झालेआहेत. असामान्य कर्तुत्त्वानेत्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. बिहार, पश्चिम बंगाल व त्रिपुराचेमाजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दूरदर्शी नेतृत्वात, या ग्रुपनेपायाभूत उपक्रम आणि कार्यक्रमांसह शिक्षण क्षेत्रात आपली मुळे मजबूत केली आहेत. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी विकासाची चाकेगतिमान केली. उत्तम शिक्षणामुळेच प्रगतीचा, विकासाचा मार्ग सुकर होतो, असेम्हटले जाते. हे विधान डी. वाय. पाटील ग्रुपला तंतोतंत लागूहोते. गेल्या चार दशकांच्या अविश्रांत परिश्रमातून डी. वाय. पाटील ग्रुप गुणवत्तापूर्ण शिक्षण असेदृढ समीकरण झालेआहे. पद्मश्री डॉ.पाटील यांनी स्थापन केलेलाउच्च शिक्षण क्षेत्रात अतिशय वेगाने विस्तारत असलेला ग्रुप म्हणून नावाजला जातो. उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या शेकडो शिक्षण संस्थांचेव्यापक नेटवर्क असलेला व गुणवत्तेमुळेराज्यातच नव्हे तर देशभरात ओळखला जाणारा डी. वाय. पाटील ग्रुप शैक्षणिक वटवृक्ष बनला आहे. ग्रुपच्या विविध संस्थांमधून माध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेलेलाखो विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देतानाच मुली व परंपरा जतन करून सुजाण नागरिक बनवण्यसाठी नेहमीच प्रयत्न केला जातो.
ग्रुपचे पहिले डी. वाय. पाटील इंजिनियरींग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज कसबा बावड्यात स्थापन झाले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पहिले प्रायव्हेट मेडिकल कॉलेज १९८९ला सुरू झाले. डॉ. डी. वाय. पाटील यांचेज्येष्ठ सुपुत्र डॉ. संजय डी.पाटील यांनी तळसंदेयेथील १४८ शेतकऱ्यांनी एकत्रित केले. तसेच २०५ एकर जमीन १९८८-८९ला खरेदी केली. सुरवातीला या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती. जेसीबीच्या साह्यानेया परिसरातील मोठ-मोठेदगड बाजूला करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करुन हा परिसर हिरवागार करण्यात आला. त्यासाठी टँकर व बैलगाडीने पाणी आणण्यात आले. फळपिकांच्या लागवडीसाठी या मूरमाड जमिनीवर नदीकाठची माती आणून टाकण्यात आली. येथे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेकृषी विज्ञान केंद्र साकारण्यात आले.
शिक्षण क्षेत्राबरोबरच शेती डॉ. पाटील यांचा अत्यंत आवडीचा अन जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी तळसंदे परिसर हिरव्यागार नंदनवनात रुपांतरीत केला आहे. या ठिकाणी स्वत: लक्ष घालून विविध झाडे, भाजीपाला यांचे प्रयोग करून आज तेथेमोठ्या प्रमाणावर त्याचेउत्त्पन्न घेतले जाते. पाटील यांचा परीसस्पर्शानेहा परिसर कृषीक्षेत्र व शिक्षण केंद बनला आहे. या ठिकाणी आज तीस प्रकारचा भाजीपाला व विविध वीस प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जाते. यात काही विदेशी जातींचाही समावेश आहे. या ठिकाणी साडेचार हजारांहून अधिक नारळाची झाडे आहेत. येथील काही क्षेत्रावर सेंद्रिय शेतीही केली जाते. कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करण्यावर व वेगवेगळी पिके घेण्यावर डॉ. पाटील यांचा नेहमीच भर असतो. त्यांच्या या कार्याची दखला घेत अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेआहे. आजघडीला तळसंदे येथे तीन ॲग्रीकल्चर कॉलेज, प्रत्येकी एक इंजिनियरींग, पॉलिटेक्निक, आर्किटेक्चर कॉलेज आहे. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्रातील पहिले ॲग्रीकल्चर ॲंड टेक्निकल विद्यापीठ सुरू होत आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाला २००५ला केंद्र शासनानेअभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. पुण्यातील आकुर्डी येथे शिक्षणाचा विस्तार झाला. पुण्यात चौदा महाविद्यालयेसुरू झाली. आकुर्डीच्या सेंटरमध्ये १६ हजार विद्यार्थी आहेत. कोल्हापूर शहरात साळोखेनगरात इंजिनियरींग कॉलेज, शांतिनिकेतन स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज, गारगोटी येथेआयटीआयसह कनिष्ठ महाविद्यालय, कदमवाडीत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज सुरू केले. अभिमत विद्यापीठांतर्गत नर्सिंग, फिजिओथेरपी व हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरू केले. ग्रुपच्या शैक्षणिक संस्थांतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेअसून, जगाच्या कानाकोपऱ्यात तेकाम करत आहेत. ग्रुपच्या शाळांत दोन हजार शिक्षक, तर अडीच हजार शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. दोन विद्यापीठे व तीसहून अधिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा महायज्ञ सुरु आहे. डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेत्रुत्वखली या ग्रुपने शिक्षणाबरोबरच आरोग्य, क्रीडा, कृषी, करमणूक, रिटेल, हॉटेल आदी विविध क्षेत्रांतही विस्तार केला आहे.
डॉ. संजय डी. पाटील : असामान्य कर्तृत्व...
कुलपती, डी. वाय. पाटील एज्के शन सोसायटी अभिम यु त विद्यापीठ, कोल्हापूर, कुलपती, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर, कुलपती, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी, पुण
अत्युच्चकर्तृत्व अन् जमिनीशी घट्टनाळअसणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. संजय पाटील ओळखले जातात. सिव्हील इंजिनिअर असलेले डॉ. पाटील हे शैक्षणिक संस्थांना आकार देतानाच विद्यार्थ्यांना घडवण्याच्या कामात आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून लक्ष घालतात. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान, सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी तेप्रयत्नशील असतात. डॉ. संजय डी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील या ग्पचरु ्या मेडिकल,नर्सिंग, फिजिओथेरपी, अॅग्रीकल्चर, मॅनेजमेन्ट,हॉस्पीटॅलिटी क्षेत्रासहराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळाकार्यरतआहेत.कसबा बावडा येथेडी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठ कार्यरत असून, तळसंदेयेथेयाच शैक्षणिक वर्षापासून डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा प्रारंभ होत आहे. विविध शिक्षण संस्थाबरोबरच कदमवाडी येथे८०० बेडचेसुसज्ज डी. वाय. पाटील हॉस्पीटल सुरु करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना किफायतशीर दारात आरोग्य सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी डॉ. पाटील यांच्या संकल्पनेतून या हॉस्पिटलने आकार घेतला. आज हेहॉस्पीटल कोल्हापूरकरांचेआरोग्यसेवेसाठीचेहक्काचे ठिकाण बनले आहे. ख्यातनाम डॉक्टर्स आज या ठिकाणी सेवा देत असून, विश्वासार्ह रुग्णसेवा म्हणजे डी. वाय. पाटील हॉस्पिटल अशी ओळख बनली आहे. ही ओळख बनवण्यात अर्थातच डॉ. संजय डी पाटील यांची प्रचंड मोठी मेहनत आहे. २००३ मध्ये हॉस्पिटल उभारणीचे काम हाती घेतल्यापासूनइमारत उभारणीपासून तेथेसोयी-सुविधापर्यत प्रत्येक गोष्टीत त्यांचा पुढाकार राहिला आहे. याच मेहनतीचेफळ म्हणूनहॉस्पिटलला “एनएबीएच” कडूननुकतीच अधिस्वीकृती मिळाली आहे.ही अधिस्वीकृती म्हणजेहॉस्पिटलच्या सुरक्षित व गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेची पोचपावतीच आहे. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात हॉस्पिटल उत्कृष्टरीत्या काम करत आहे. कृषी व शिक्षण क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रांमध्येही त्यांचा लीलया वावर असतो. कोल्हापूरचा वाढता विस्तार व भविष्यकालीन गरजा ओळखून डॉ. पाटील यांनी डी.वाय.पी. सीटी मॉल या अत्याधुनिक मॉलची रचना केली असून, दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य शॉपिंग सेंटर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. खरेदीचा आनंददायक व क्रांतिकारक अनुभव देणाऱ्या या मॉलनेकोल्हापूरच्या वैभवात अधिकच भर घातली आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील पहिलेपंचतारांकित हॉटेल उभारण्याचा व तेयशस्वीपणे चालवून दाखवण्याचा बहुमानही डॉ. पाटील यांच्याच नावावर आहे. एक व्यक्ती किती क्षेत्रात यशस्वीपणेकाम करु शकते, याचेआदर्श उदाहरणच डॉ. पाटील यांनी घालून दिले आहे.नवनवेव्यवसाय यशाच्या शिखरावरनेतानाच कुटुंब,नातेवाईक, मित्रमंडळीं यांच्याही स्नेहाचेबंध त्यांनी घट्ट जुळवून ठेवलेआहेत. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेसमर्थपणेसांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या आईसाहेब शांतादेवी पाटील, पत्नी वजै यंती पाटील यांचेमोलाचेसहकार्य मिळत आहे. सौ. पूजा ऋतुराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील हि पाटील कुटुंबातील नवी पिढी डॉ. संजय डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढेयेत आहे. धाकटी बहिण राजश्री काकडेशांतीनिकेत स्कूल आणि ज्यू. कॉलेजचा कारभार सांभाळत आहे. तसेच मुलगा पृथ्वीराज डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कामात योगदान देत आहेत. शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात वावरत असताना दिग्गज राजकीय नेतेगृहराज्यमंत्री सतेज पाटीलसाहेब यांच्या पाठीशी तेमोठा भाऊ म्हणून भक्कमपणेउभेआहेत. तसेच पुत्र आमदार ऋतुराज पाटील यांच्या राजकीय प्रवासातही सतत भक्कम साथ व मार्गदर्शन तेकरत आहेत. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांवर मोफत उपचार करण्याचा उपक्रम असो किवं ा गरज विद्या ू र्थ्यांच्या फी माफीचा विषय असो सामाजिक बांधीलकीला तेनेहमीच प्राधान्य देतात. मात्र, हेसर्व कार्य करत असताना नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा तेप्रयत्न करतात. याच साधेपणात त्यांचेयश सामावलेआहे.
सतेज पाटील
(पालकमंत्री, कोल्हापूर), उपाध्यक्ष, डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अतुलनीय कर्तृत्वाचा वारसा कोल्हापूर जिल्ह्याला आहे. इथली भौगोलिक परिस्थिती वविै ध्यपूर्ण आहे. कोल्हापूरचा माणूसही विविध क्षेत्रात आपलेकर्तृत्व सिद्ध करताना दिसतो आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी काम केले. तोच वारसा आम्ही चालवत आहोत. कोल्हापुरी ब्डरँ जगभरात ओळखला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डॉ. डी. वाय. पाटील ग्परु वेगवेगळी आव्हानेस्वीकारत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात नवनवेप्रयोग करत आहे. ग्रामीण भागातील टॅलेंट विविध क्षेत्रात चककावे, हा आमचा प्रयत्न आहे.
आमची चौथी पिढी सामाजिक कार्यात अग्सर रे आहे, कार्यरत आहे. आजोबा यशवंतराव पाटील, वडील डाॅ. डी. वाय.पाटील, भाऊडाॅ. संजय डी.पाटील यांच्यासह मी सर्वसामान्यांना केंद्रबिंदूमानून वाटचाल करत आहे. राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी आमची नाळ जोडली गेली आहे. सर्वसामान्यांचा विकास हेच माझे व्हिजन आहे. त्यासाठी शेती हा आमचा पाया आहे. शिक्षणाचेमहत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोचलेपाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे. इथल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण येथेच उपलब्ध झालेपाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न केलेआणि त्यात यशस्वीही झालो आहोत. या पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही पावलेउचलत आहोत. जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार केलेआहेत. यासह भारतातील विद्यार्थी जसे शिक्षणासाठी परदेशात जातात, त्याच पद्धतीने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी यावेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
ऋतुराज पाटील
(आमदार, कोल्हापूर दक्षिण), विश्वस्त, डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, कोल्हापूर
सर्वसामान्यांचा विकास, हेच ध्येय आमच्यासमोर आहे. ज्या गतीने तंत्रज्ञान बदलत आहे किंबहुना सर्वच क्षेत्रात बदल घडत आहेत, ते आत्मसात करण्याची ही वेळ आहे. जगाच्या प्रवाहाबरोबर चालण्यासाठी तेआवश्यक आहे. समाजातील दरी वाढण्याआधी त्यात रचनात्मक काम करण्याची गरज आहे. शेती हा ग्रुपचा पाया आहे. त्याचबरोबर वैद्यकीय, क्रीडा, शिक्षणातही ग्रुप काम करत आहे. शेतीत वेगवेगळेतंत्रज्ञान येऊ पाहत आहे. त्याची जाणीव ठेवून ग्रुप कार्यरत आहे. भविष्यात ॲग्री टेक्निकलमध्ये वाढ करण्याचा आमचा मानस आहे.
देशातील पहिली प्रायव्हेट ॲग्रो युनिव्हर्सिटीची स्थापन झाली आहे. शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, जेटेक्निकल रिलेटेड असतील. विशेषत:परदेशातील विद्यार्थ्यांना इथल्या शेती पद्धतीची माहिती कळावी, असा आमचा आग्रह आहे. शिक्षणाच्या निमित्ताने तेयेथेयावेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. केवळ भारतातील विद्यार्थ्यांनी परदेशात धडे गिरवायला जाण्यापेक्षा परदेशातील विद्यार्थ्यांना इथली कृषी संस्कृती कळायलाहवी. प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचेअसून, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचणेआवश्यक आहे. येत्या काही वर्षांत दोन तेतीन शहरात हॉटेल इंडस्ट्री सुरू करण्याचा विचार आहे. त्या माध्यमातून लोकांच्या मनातील भावना समजून घेता येतात. डॉ. संजय डी. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या माध्यमातून आणखी नवेकाय करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
पृथ्वीराज पाटील
विश्वस्त, डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, कोल्हापूर
कृषी क्षेत्रातील आधुनिक शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील नवनवीन शाखा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून आंतरशाखीय शिक्षण पद्धतीला बळकटी येईल. त्यामुळेकृषी क्षेत्रात शिक्षणाचेअनेक पर्याय तयारहोतील. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती तसेच शेतीपूरक व्यवसायाची माहिती यशस्वीपणेआम्ही पोचवत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे५३९ खेड्यांमधील १ लाख ३९ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. ऊसाच्या नवीन जाती, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, गहू आणि ज्वारी यांचे वेगवेगळे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून ऊस रोपवाटिका, डेअरी, शेळीपालन, कुकुटपालन, गांडूळ खत निर्मिती, रेशीम उद्योग, मशरूम लागवड, मधमाश्या पालन, मत्स्य शेती यांचेप्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांना दिलेआहे. सेंद्रिय भाजीपाला व फळांचेउत्पादन आम्ही करत आहोत आणि तेथेट ग्राहकांपर्यंत पोचण्याची व्यवस्था केली आहे. आधुनिक प्रकारच्या डेअरी फार्म आम्ही उभारला असून, त्यातून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना दूध उत्पादन व दूध प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती दिली जाते. शासनानेआमच्या संस्थेच्या खासगी कृषी व तंत्र विद्यापीठास नुकतीच मान्यता मिळाली आहे. या माध्यमातूनउच्च दर्जाचे कृषी व तंत्र शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्याची भरभराट व्हावी हाच आमचा हेतूआहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती व्यवसायात तंत्रज्ञानाच्या साह्याने बदल घडवून विकासालाहातभार लावावा, अशी आमची इच्छा आहे.
हिमाचल विद्यापीठातर्फे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डी.लिट. पदवी स्वीकारताना. शेजारी कुलपती शर्मिला सिंग व कुलगुरू बाजपेयी.
कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे फीत कापून उद्घाटन करताना काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी. शेजारी (डावीकडून) डॉ. संजय डी. पाटील, सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील, सुशीलकुमार शिंदे.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भारत गौरव अॅवॉर्ड स्वीकारताना डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील.
सन्मान/ पुरस्कार
- १९९१ – महाराष्ट्रसरकारचा वनश्री पुरस्कार
- २००१ – कोल्हापूर भूषण पुरस्कार
- २००४ – राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार
- २००४ – महाराष्ट्रसरकारचा कृषिनिष्ठ पुरस्का
- २००७ – विद्याभारती ॲवॉर
- २००८ – कोहिनूर ऑफ इडिया ॲवॉर
- २०१३ – राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार
- २०१३ – नॅशनल एज्युके शन लीडरशिप ॲवॉर
- २०१८ – भारत गौरव ॲवॉर
- १९९६ – बेंगळूर येथील अखिल भारतीय आंबा प्रदर्शनात प्रथम क्रमांक
ग्रुपच्या विविध संस्थ
- डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर
- डी. वाय. पाटील कृ षी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर
- डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा (स्वायत्त)
- डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर
- डी. वाय. पाटील इटरनॅशनल य ं ुनिव्हर्सिटी, आकुर्डी, पुण
- डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंद
- डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा
- डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटर, कदमवाडी
- डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चरल पॉलिटेक्निक, तळसंद
- डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालय, तळसंदे
- डी. वाय. पाटील कृ षी महाविद्यालय, तळसंद
- डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय, तळसंद
- डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा
- डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय, तळसंदे
- डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज, कदमवाडी
- शांतीनिके तन ज्युनिअर कॉलेज, हायस्कूल, कोल्हापूर
- डी. वाय. पाटील फिजिओथेरपी महाविद्यालय, कोल्हापूर
- डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटीलिटी, कोल्हापूर
- डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, कोल्हापूर
- डी. वाय. पाटील एज्युके शनल कॅम्पस, आकुर्डी, पुणे-इंजिनिरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एमबीए, अॅप्लाईड आर्ट अँड क्राफ्ट्स आणि सीबीएसई स्कूल
डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर काॅलेज
- डिप्लोमा होल्डर्स – ७००
- ग्रामसेवक – ३२
- ॲग्रिकल्चर असिस्टंट इन ॲग्रिकल्चर गव्हर्न्मेंट ऑफ महाराष्ट्र – २५
- ॲग्रिकल्चर बेस्ड प्रायव्हेट कं पनीत काम करणारे – २००
- यशस्वी उद्योजक – १००
- कृ षी सेवा केंद्र ओनर – २५
- उच्च कृषी शिक्षणाकरिता प्रवेश – १००
- थेट द्वितीय वर्षात कृ षी पदवीसाठी प्रवेश – ६५
- वीसहून अधिक ॲकॅडेमिक/इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन
- दोन गोल मेडलिस्ट
- राष्ट्रीय व राज्य स्तरीय कॉमन एंट्रन्स टेस्ट रँकर्स – एमसीएईआर रँकर्स – १००
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांत प्रवेश मिळविलेले – १२५
- विविध राष्ट्रीय स्तरावरील संस्थांतून पीएच.डी. मिळविणारे – ४ माजी विद्यार्थ
- राज्य व विद्यापीठस्तरीय रिसर्च स्पर्धांतील विजेते – ५
- विद्यापीठ खेळाडू – ५०
- राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरीसाठीचे विद्यार्थी ॲवॉर
- ज्ञानेश्वर दरडे – बेस्ट स्टुडंट – ह्मन यु सर्व्हिस फाउंडेशन
- ज्ञानेश्वर दरडे -यंग इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्युअर ॲवॉर्ड – ह्मन यु सर्व्हिस फाउंडेशन
- इस्राईलमधील हिब्रूविद्यापीठातून समर प्रोग्रॅम पूर्ण के लेले विद्यार्थी – १२
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी – २५
- कार्पोरेटर सेक्टरमध्ये कार्यरत – ३००
- बँके त काम करणारे – ५०
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
- आठशे बेडसचे अद्ययावत हॉस्पिटल
- १७५ तज्ज्ञ डॉक्टर्स व १९१ एम. बी. बी. एस डॉक्टर
- कोविड सेंटरसाठी 200 बेड्स चा वाॅर
- 30 बेड कोविड आयसीयू
- २५ एनआयसीयू/पीआयसीय
- स्वॅब टेस्टिंग, अटिजेन टेस
- अपघात आणि ट्रॉमा के अर
- २४ तास रक्तपेढी
- थैलासीमिया वाॅर
- मेडिसीन, स्त्रीरोग, बालरोग, हाडांचे आजार, गुडघा, सांधा रोपण
- शहरातील अद्ययावत असे सिटीस्कॅन १२८ स्लाइस/ 3 टेसला एम.आर.आय. मशिन
- सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया
- पॅथॉलॉजी लॅबोरेटरी
- नेफरोलॉजी
- फिजिओथेरपी
- एकमेव अद्ययावत सिम्युलेशन लॅब
- वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव बायोस्किल लॅब * मोफत आरोग्य तपासणी शिबिर
- मोफत शवगृह सेवा