कोविड-19 च्या साथीनं सगळया विश्वाची आणि प्रत्येक व्यक्तीच्या विचारांची पध्द्त बदलून टाकली आहे, त्यास बँकिंग क्त्रही अपवाद नाही. आपण सगळयांनी कोविडच्या पूर्वीचं आपलं जीवनमान बघितलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यावेळचं बँकिंग बघितलं आहे. कोविडमुळे जे बँकींग आपल्याकडे 15 ते 20 वर्षांनी येईल असं वाटलं होतं, ते कोविडमुळे 15-20 वर्ष आधीच आलेलं आहे. या कोविडच्या काळात सर्व बँकांमध्ये डिजिटल व्यवहारांचं प्रमाण खूप मोठया प्रमाणात वाढललं आहे. सहकारी बँकाही यात मागे नाहीत. कोविडमुळे निर्माण झालल्या परिस्थितीचा आणि लोकांच्या बदलत्या मानसिकतेचा उपयोग करुन घेण्यासाठी म्हणून बँकांनी त्याप्रमाणेतयारी केली असून, त्यांचे डिजिटल प्रॉडक्टस् नवीन पध्द्तीने बाजारात आणले आहेत. आता याची सवय लोकांना लावणंसुध्दा सोपं झालंय कारण विचारांच्या पध्दती बदलल्यात, मिटींगच्या, व्हिजिटच्या पध्द्ती बदलल्यात आणि सर्व डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यामागे आता आपण लागलो आहोत. त्याचा एक चांगला परिणाम असा होणार आह की, ज्याप्प्रमाणे आय.टी. कंपन्या घरून चालतात. त्याचप्रमाणे पुढच्या 5 वर्षात बँकेच जे वळपास 75 टक्के व्यहार घरूनच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता गृहित धरून सर्व बँकांनी त्याकरता तयारी सुरू केली आहे. प्रि-कोविड आणि पोस्टकोविड हे शब्द प्रत्येकाच्या बोलण्यात येत आहेत. बँकिंगसुध्दा त्याचप्रमाणे बदलतयं . बदललल्या विचार पध्द्तीमध्ये आता प्रत्येकाला डिजिटल बँकिंग हे सुरक्षित, गरजेचं, उपयक्तु , वेळ वाचवणारं, श्रम वाचवणारं आहे हे खरंच पटलेलं आहे. कोविडन हे काम सोपं केलं आहे. प्रत्येक परीस्थिचा आपण सकारात्मक पध्दतीन विचार केला पाहिजे. पोस्टकोविड परीस्थितीत बँकिंग व्यवस्था जागतिक बँकिंग स्तरावर न्यायची असेल तर फक्त आणि फक्त तंत्रज्ञान मदतीला येणार आहे. सर्व सहकारी ऑपरेटिव्ह बँका यामध्ये सरसावल्या आहेत. कॉसमॉस तर पहिल्यापासूनच आयटी क्षेत्रामध्ये नावाजलली बँक आहे . कॉसमॉस बँकेची स्वतःची कॉसमॉस ई. सोल्शन ही 100 टक्के स्वमालकीची कंपनी आहे. ती फक्त कॉसमॉस करताच नाही तर अन्य छोट्या बँकांनासुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. पहिल्यापासूनच आमच्या बँकेमध्ये वेगवेगळे डिजिटल प्रॉडक्टस् आहेत. त्यांची क्षमता, गुणवत्ता व अनुभव सिध्द्ता वाढविण्यासाठी आपण आता प्रयत्न करत आहोत आणि हे नुसतं कॉसमॉस स्वतःकरिता करत नाही, तर कॉसमॉस बरोबर सहकारी क्षेत्रातल्या इतर बँकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कॉसमॉस ई. सोल्शन प्रा. लि. कंपनी अत्याधुनिक सुविधा सहकारी क्षेत्रातल्या छोटया बँकांना पुरवणार आहे.
सहकार क्षेत्रातील लखलखता तारा कॉसमॉस बँक
महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सहकारी बँकिंग क्षेत्राचीही पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. महाराष्ट्रात याचा प्रसार करण्यात यात मोलाचा वाटा आहे तो कॉसमॉस बँकेचा. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ही उक्ती सार्थ ठरवत सर्वसामान्य ग्राहकाला पिढ्यानपिढ्या विश्वासाच्या नात्यानं जोडून ठेवणारी शतकोत्तर पंरपरा असणारी ही बँक महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही आपला विस्तार करत आहे. त्यामुळं ही बँक खऱ्या अर्थानं महाब्ड आहे.
वेध भविष्यातील बँकिंगचा
खातेदाराला सेवा सुविधा पुरवण्याच्या पध्दती, पमेंट सिस्टीम, कलके्शन सिस्टीम, या सगळयामध्ये अतिशय गतीने अमुलग्र बदल होतो आह. हे याचबरोबर ग्राहकांचे अनुभव, ग्राहक शिक्षण, ग्राहक सुरक्षितता याची सुध्दा काळजी घेण्यात येत आहे, भविष्यातही त्याकरिता विशेष उपक्रम राबवले जातील. ते कदाचित काही बँका एकत्र येऊनही राबवतील. कोविडच्या सुरूवातीच्या काळातच बँकींग रेग्युलेशन अकॅ्टमध्ये बदल झाला आहे आणि त्यामुळ रिझर्व्ह बँकेकडे खूप नियंत्रण आलले आहे. रिझर्व्ह बँकेलाअपेक्षित असलेली सहकारी क्षेत्रातील बँकांना हवी असलेली शिस्त मात्र काही बँकांना लागलेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये रिझर्व्ह बँकेची ही अपेक्षा सहकारी क्ष्रेत्र पूर्ण करू शकलेले नाही. सहकारी क्षेत्राला शिस्त लागण्याच्या दृष्टीने व्यावसायिक धोक्यांचे विभाजन, मोठ्या कर्जवाटपाला बंधन आणि छोटया कर्जवाटपाची सक्ती, या गोष्टी अंमलात आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. मार्च 2024 पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्याची मुदत बँकांना देण्यात आलली आहे. त्यामुळं विविध व्यवसायांची आवश्यकता, पर्याय याबद्दल विचार करण्याची वेळ आलली आहे. मोठया कर्जदारापेक्षा छोटयाच कर्जांची आवश्यकता आहे आणि त्यामुळेते एकमकेत शेअर करू या, अशा विचारावंर आता बँका येऊन ठेपलेल्या आहेत.
एवढंच नाही तर, येत्या पाच वर्षाच्या काळात सहकारी बँकांनी जिथे जिथे सहज शक्य आहे आणि सोयीचं आहे तिथ खासगीकरण करावे, अशी रिझर्व्ह बँकेची अप्रेक्षा आहे. त्यामुळे रेिझर्व्ह बँकेला नियंत्रण आणखी वाढविता येईल. त्या दृष्टीने पावले उचलण्यास बँकेनं सुरूवात केली आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. विलीनीकरणाबाबतही रिझर्व्ह बँकेनं मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. आपल्या देशात साधारणतः 1500 सहकारी बँका आहेत. किमान 300 ते 400 सहकारी बँका पुढच्या 5 वर्षात आपापसातं किवा मोठया बँकांमध्ये विलीन होतील, असं मला वाटतं. यामुळे बँकाचा आकार वाढेल. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ही प्रक्रिया सुरू झालली आहे. केद्राची निर्णय घेण्याची क्षमता, ताकद आणि राजकीय इच्छा यामुळे हे शक्य झालं आहे; पण सहकार क्षेत्रामध्ये हे आणणं अवघड होतं, पण त्यादृष्टीने आता पाऊलं उचलायला सुरूवात झालली आहे. बँकानाही या एकत्रीकरणाची आवश्यकता आहे, त्यामुळे बँकांचीच ताकद वाढणार आहे. आता डिजिटल सेवेमध्ये एरिया ऑफ ऑपरेशन याला काहीच अर्थ राहणार नाही. या सर्व बदलामध्ये सहकारी बँका कुठेही कमी पडतील असं मला वाटत नाही. कॉसमॉस बँकसुद्ध आता त्यादृष्टीने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची तयारी करू लागलेली आहे. बँक सहकारी बँकांना बरोबर घेऊन सहकाराचा गाभा तसाच ठेऊन या एकत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, प्रगतीमध्ये आणि बदलत्या काळानुरूप धोक्याचं विभाजन, कर्ज वाटपाचं विभाजन करेलच, त्याचबरोबर ऑनलाइन ठेवी स्वीकारणे, ठेवीवर कर्ज काढणे, ठेवीवरील कर्ज खात्यात पैसे भरणे, ठेव खाते बंद करणे या सर्व सेवा देण्याच्या दुर्ष्ट्रीने आपण तयारी करत आहोत आणि याचीच पूर्तता करणे हेच पुढील 5 वर्षांचे कॉसमॉसबँकेचे ध्येय आहे.
शाखा विस्तार :
संपूर्ण महाराष्टभर बँकेच्या शाखाचे जाळे विेस्तारलले आहे. पुणे, मुंबई, सातारा, फलटण, कराड, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगावं , सोलापूर, अमरावती, यवतमाळ, भुसावळ, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये बँक सेवा देत आहे. त्या शिवाय अन्य सहा राज्यांमध्ये बँकेनं विस्तार केला आहे. एकूण सात राज्यांमधील 39 प्रमुख शहरांमध्ये 140 शाखांचे भव्य जाळे निर्माण केल आहे. आज अखेर बँकेचा व्यवसाय 27 हजार 500 कोटींचा असून, बँकेचे नेटवर्थ 2000 कोटींच आहे. रिझर्व्ह बँकेनं 20 हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असणाऱ्या सहकारी बँकांना खासगीकरणाचे दरवाज खुले केले आहेत, अर्थात त्यासाठी आणखी काही निकष आहेत. ते निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी क्षेत्रातील पाच बँकांमध्ये कॉसमॉस बँकेचा समावेश आहे.
पहिले पाऊल :
संपूर्ण महाराष्भर बँकेच्या शाखाचे जाळे विेस्तारलले आहे. पुणे, मुंबई, सातारा, फलटण, कराड, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगावं , सोलापूर, अमरावती, यवतमाळ, भुसावळ, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये बँक सेवा देत आहे. त्या शिवाय अन्य सहा राज्यांमध्ये बँकेनं विस्तार केला आहे. एकूण सात राज्यांमधील 39 प्रमुख शहरांमध्ये 140 शाखांचे भव्य जाळे निर्माण केल आहे. आज अखेर बँकेचा व्यवसाय 27 हजार 500 कोटींचा असून, बँकेचे नेटवर्थ 2000 कोटींच आहे. रिझर्व्ह बँकेनं 20 हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असणाऱ्या सहकारी बँकांना खासगीकरणाचे दरवाज खुले केले आहेत, अर्थात त्यासाठी आणखी काही निकष आहेत. ते निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी क्षेत्रातील पाच बँकांमध्ये कॉसमॉस बँकेचा समावेश आहे.
अत्याधुनिक सेवा अग्रक्रमाने उपलब्ध करून देऊन तरुण पिढीशी सहजपणे जोडल्या जाणाऱ्या या बँकेनं आधुनिक युगातील सोशल मीडियाशीही आपली नाळ जोडली आह. फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा तरुणाईच्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर बँकेच्या सेवासुविधा, उपक्रम, नवीन घडामोडी याची माहिती मिळत असते. बँकेची वेबसाइटही अत्यंत अद्ययावत आणि युझर फ्रेडली आहे. तसेच बँकेच अखंड सेवा देणारे कॅल सेंटरही आहे.
ग्राहकहिताला प्राधान्य देणारी बँक
कॉसमॉस को. ऑपरेटिव्ह बँकेला ग्राहकसेवेची ११५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. ११ दशकांहून अधिक कालावधीत बँकेने अनेक स्थित्यंतर अनुभवली आहेत. काळानुरूप ग्राहकाभिमूख कामकाजात आणि तंत्रज्ञानात बदल करत राहणे आणि ग्राहकांना सर्वतऱ्हेच्या नाविन्यपूर्ण सेवा देण्याचे काम आजही अविरतपणे सुरू आहे. बँकेच्या स्थित्यंतरांविषयी सांगायचे झाल्यास १९९० मध्ये शडेयुल्ड बँकेचा दर्जा, १९९७ मध्ये मल्टिस्टेट शडेयुल् बँक, २००३ साली कोअर बँकिंग सोल्शन, २००६ मध्ये ऑथराईझ डीलरशिप लायसन्स (फॉरके्स), २०१३ मध्ये इंटरनेट व मोबाईल बँकिंग सेवा तर २०१४ मध्ये भव्य कॉर्पोरट ऑफिसमध्ये स्थलातंर हे सर्व महत्त्वपूर्ण टप्पे बँकेने यशस्वीरित्या पार केले आहेत. बँकेच्या शाखांचा विस्तार ७ राज्यात असून १८ लाखाहून अधिक ग्राहकांना बँक अत्याधुनिक सेवा देत आहे. आकर्षक व्याजदराच्या विविध ठेव योजना आणि अत्यंत किफायतशीर व्याजदराच्या सुटसुटीत कर्जयोजना बँकेनेग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी सादर केलेल्या आहेत. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, रूपे डेबिट कार्ड, डिमट सर्व्हिसस, फॉरके्स सर्व्हिससे अशा सर्व आधुनिक सेवा बँक आपल्या ग्राहकांना देत आहे. बँकेच्या या सर्व सेवासुविधा इतर कोणत्याही खासगी बँकांच्या तोडीच्या आहेत, हे आवर्जून नमूद करण्यासारखे आहे. ग्राहकहिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने बँकेने आत्तापर्यंत आर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या १५ लहानमोठया सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. बँकेचे संचालक मंडळ हे उच्च विद्याविभूषित असून व्यावसायिक दृष्टीकोन असलले आहे. अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वतःच्या प्रगतीबरोबरच इतर लहान लहान सहकारी बँकांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. आगीमी काळात डिजिटल बँकिंग, रिटल, अग्रक्रम क्षेत्रातील कर्ज वितरण यावर बँकेचा प्रामुख्याने भर राहणारे आहे. या दोन्ही क्षेत्रातील उद्दिष्टये साध्य करण्यासाठी मी आणि माझे सहकारी नक्कीच यशस्वी होऊ, याची मला खात्री आहे.
बँकेच्या इतर सर्व जमेच्या बाजूबरोबरच बँकेचा सेवकवर्ग ही बँकेची एक महत्वपूर्ण जमेची बाजू आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. आत्तापर्यंतच्या वाटचालीत अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देताना बँकेच्या सर्व सेवकांनी जे धैर्य दाखवले आहे. ज्या सचोटीनं, निष्ठेनं त्यानी सेवा बजावली आहे. त्याचमुळे बँकेची इतकी भरभराट झाली असून, बँकेला स्थैर्य लाभले आहे. आर्थिक संस्था म्हणून काम करत असताना आवश्यक असणारे गुडविल, विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.
सहकार चळवळ आणि बँकिंग
आर्थिक क्षेत्रामध्ये सहकारी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. जगातल्या अनेक देशांमध्ये सहकारी चळवळी आहेत; परंतु भारतातल्या सहकारी चळवळीची काही खास वैशिष्टये आहेत. सहकारी चळवळ भारतामध्ये सुरू होऊन जवळपास १०० वर्षं होऊन गेली. यामध्ये सहकारी साखर कारखाने, सहकारी गिरण्या, सहकारी बँका अशा अनेक वेगवेगळया क्षेत्रांचा समावेश होतो. भारतामध्ये सध्या १५०० सहकारी बँका आहेत. बँकींग रेग्युलेशन अक्ट हया भारतातील जुन्या कायद्यामध्ये भारत सरकारतर्फे अलीकडेच दरूस्तु ्या करण्यात आल्या आणि सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे जवळपास 99 टक्के नियंत्रण आलं आहे. सहकारी क्षेत्रातील माझा अनुभव जवळजवळ ४५ वर्षांचा आहे. मी ज्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या समितीवर होतो, त्यावेळी मी भारतभर प्रवास केला आणि तेथील सहकारी बँकांशी व्यावसायिक आव्हानं, अडीअडचणी, स्पर्धा, नियंत्रणं याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी मला जाणवलं, अनेक सहकारी बँका खूप चांगलं काम करत आहेत. मात्र गेल्या महिन्याभरात रिझर्व्ह बँकेन सहकारी बँकांबद्ल्द एक नवीन फतवा काढलेला आहे. राज्यातील काही सहकारी बँकांना महाराष्ट्र स्टे को ऑपरेटिव्ह बँकेमध्येविलीन करायचे आहे. रिझर्व्ह बँक १५०० बँकांमधील जवळपास १०० तरी बँका या चालू वर्षात लिक्विडेट तरी करेल किंवा दुसऱ्या कुठल्या बँकेमध्येविलीन करेल, असा माझा अंदाज आहे. एकूण सहकारी बँकांपैकी ४०० ते ५०० बँका छोटया आहेत आणि त्यांच्यावर बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे या बँका हळूहळू नेस्तनाबूत होऊन त्यांचं अस्तित्व नष्ट होईल, असं मला वाटतं. सहकार क्षेत्राचं भवितव्य काय ? असा प्रश्न सर्वांच्या मनात होईल, असं मला वाटतं. सहकार क्षेत्राचं भवितव्य काय ? असा प्रश्न सर्वांच्या मनात उभा राहत असतो, पण ज्या बँका आव्हानांवर मात करतील त्या नेहमीच आघाडीवर राहतील. सहकारी बँकिंग क्षेत्र हे ग्राहकांना खूप चांगली सेवा देत आहे.
कॉसमॉस बँकही आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे वैयक्तिक सेवा देत आहे. सहकारी बँकांमध्ये ग्राहकांना बँकेबद्दल जिव्हाळा आणि आपुलकी वाटत असते. त्यामुळे लोकांना सहकारी बँकेत पैसे ठेवावेसे वाटतात. लोक चांगल्या सहकारी बँकांमध्ये अजूनही पैसे ठेवतात. अनेक बँकांनी सहकार क्षेत्राचं नाव हे कायम चांगलं ठेवलं आहे. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञान, किरकोळ कर्जवितरणावर भर, कमीत कमी एनपीए, उत्तम ग्राहक सेवा, नफा क्षमतेत वाढ इ. गोष्टी आत्मसात करून ज्या सहकारी बँका वाटचाल करतील, त्या कु ठल्याही इतर बँकांच्या स्पर्धेस तोंड देण्यास सक्षम आणि समर्थ असतील, असे मला वाटते.
अडचणीच्या वेळी धावून येणारी बँक : अक्षय गाडगीळ, पीएनजी ब्रदर
पीएनजी ब्रदर्स आणि कॉसमॉस बँकेच्या नात्याला आज १० वर्षं पूर्ण होत आहेत. कॉसमॉस बँकेबरोबर सुरूवातीस आम्ही लहान स्वरूपाची प्रपोजल्स् देऊन काम सुरू केले, परंतु त्यांची ग्राहकांना सेवा देण्याची पध्द्त आणि आर्थिक नियोजन बघता संबंध अधिक दृढ झाले आणि आमचे आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणात विस्तारत गेले. आमच्या पिढीजात व्यवसायला १०० वर्षांहून जास्त काळ झालेला आहे. तसेच कॉसमॉस बँक ही ११५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेली सहकारी बँक आहे. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळेयांच्या नेतृत्वाखाली बँक अत्यंत उत्तम प्रकारेग्राहकसेवा देत आहे. व्यवसायात अनेक वेळा असे काही प्रसंग येतात की, या आर्थिक अडचणींमधून बाहेर कसे पडायचे किंवा त्यावर सोल्युशन कसे काढायचे हे प्रश्न उभे राहतात. अशा अडचणीच्या वेळी आम्ही कधीही बँकेकडे अडचण मांडली तर त्याचं सोल्युशन त्यांनी आम्हाला दिलं आहे. कॉसमॉस बँकेच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
उद्योगाच्या यशात मोलाचा वाटा : सुप्रिया बडवे, बडवे इंजिनिअरिंग प्रा. लि.
बडवे इंजिनिअरिंग आणि कॉसमॉस बँक यांचं नातं १५ वर्षाहून अधिक काळाचं आहे. आमच्या व्यवसायाची उलाढाल जेव्हा छोटया स्वरूपाची होती, तेव्हापासून हे नातं सुरू झालं आहे. आजमितीला बडवे इंजिनिअरिंगची उलाढाल पाच हजार कोटींच्या घरात गेली आहे. आमच्या या यशस्वी वाटचालीत कॉसमॉस बँकेची आम्हाला सदैव साथ राहिली आहे.
बँकेने वेळोवेळी आम्हाला आमच्या प्रोजेक्टससाठी औद्योगिक कर्ज देऊन योग्य तऱ्हेने आर्थिक मदत दिल्यामुळे आमचेप्रोजेक्टस् वेळेत पूर्ण करता आले. व्यवसायाव्यतिरिक्त आमचे वैयक्तिक खातेही याच बँकेत आहे. या दोन्ही खात्यांकरिता बँकेने आम्हाला आत्तापर्यंत उत्तम सेवा दिलेली आहे. ग्राहक हिताला प्राधान्य देत तत्पर सेवा देणारे बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. कॉसमॉस बँकेचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो हीच आमची सदिच्छा आहे.
धडपडीला साथ देणारी बँक : जगदीश कदम, राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.
कॉसमॉस बँकेचे आणि माझे दुहरी ऋणानुबंध आहेत. एक कर्जदार म्हणून आणि दुसरे बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्याशी असलेले आपुलकीचे संबंध. कॉसमॉस बँकेच्या बाबतीमध्ये मला एक नक्की सांगावसं वाटतं की काही बँकांचा पैसा हा धंद्यासाठी लाभतो असं म्हणतात. त्याचा मी अनुभव घेतला आहे . अगदी थोडक्यात सांगायच तर, आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक राज्य मार्गाचं काम मिळालं. त्याच्यासाठी बँकेच्या कर्जाची गरज होती. त्यावेळी मी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांना भटलो आणि याबाबत चर्चा केली. काही दिवसांमध्येच बँकेनं आमचं कर्ज प्रकरण मंजूर केले. त्यावेळेला कोरोनाची दुसरी लाट सुरू होती. त्यामुळे सर्वांनाच त्रास होत होता. या नकारात्मक परिस्थितीत आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करूयात असं मी ठरवलं. ३० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ३१ मे २०२१ रोजी सकाळी ७ या अशा २४ तासांमध्ये राजपथने,
म्हणजे आमच्या कंपनीनं एका दिवसात ३९.६० किलोमीटर रस्त्याचं काम करून एक नवा विश्वविक्रम स्थापित केला. बँकेने वेळोवेळी केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे हा विक्रम आम्ही करु शकलो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आपल्याला काही बँकांचा पैसा लाभतो, त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. संचालक मंडळ हा सहकारी बँकांचा चेहरा असतो. कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळामध्ये अध्यक्ष मिलिंद काळे आणि त्यांचे इतर काही सहकारी सनदी लेखपाल आहेत. डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्यासारखे सहकारातील जाणकारही आहेत. कॉसमॉस सहकारी बँकेतले सेवक अतिशय प्रेमान आपुलकीने वागतात. कॉसमॉस बँक सहकारी बँक असली, तरी केवळ या राज्यातच नाही देशातील अनेक राज्यांमध्ये तिच्या शाखा आहेत. अतिशय चांगल्या पध्द्तीने काम करणारी सहकारी बँक म्हणून ही बँक ओळखली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानातही ही बँक कुठेही कमी नाही. नेट बँकींग असो किवा रूपे कार्ड असो किवा कुठल्याही आधुनिक व्यवस्था असो, बँकेनं अत्यंत तातडीनं ग्राहकांना, त्यांच्या सभासदांना, ठेवीदारांना या सुविधा पुरवल्या आहेत आणि त्यामुळेया बँकेवर सर्व ठेवीदारांचा आणि सभासदांचा अढळ विश्वास आहे. पुढील काळात बँकेची अशीच प्रगती होत राहो, हीच सदिच्छा.
वाटचाल शतकाची
कॉसमॉस बँकेची स्थापना १८ जानेवारी १९०६ रोजी सहकारी पतसंस्था म्हणून झाली. ११५ वर्षांची परंपरा असणारी या बँकेची स्थापना कृष्णाजी सदाशिव गोरे आणि शंकर हरी बर्वे यांनी केली. पदार्पणातच बँकेनं सर्वसामान्य नागरिकांना आपुलकीची सेवा देऊन त्यांचे मन आणि विश्वास जिंकला. त्यामुळे अल्पावधीतच बँकेचा ग्राहकवर्ग झपाट्यानं वाढला. अवघ्या २० वर्षात या पतसंस्थेचं सहकारी बँकेत रुपांतर झाले. बँक म्हणून कार्यरत झाल्यावर कॉसमॉसच्या प्रगतीचा वारू चौखूर उधळला. १९३१ मध्ये बँकेनं रौप्यमहोत्सव साजरा केला तर १९५६ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला. २००६ या वर्षात बँकेला १०० वर्ष पूर्ण झाली
रिटेल लोन्स मॉन्सून बोनांझा
सध्या बँकेने सर्व ग्राहकांकरिता रिटेल लोन्स मॉन्सून बोनांझाचे विशेष आयोजन केले आहे. या अंतर्गत सर्व प्रकारच्या रिटेल लोन्सवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. गृह कर्ज ६.७०%, कार कर्ज ७.४०%, प्रॉपर्टी मॉर्गेज ८.७५%, प्रोफेशनल कम्फर्ट लोन ८.२५% आणि कॉस्मो स्मॉल बिझनेस लोन ८%, व्याजदराने ग्राहकांकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
जाहिरातीतून घडणारे बदलाचे दर्शन
सप्टेंबर १९८८ मध्ये दैनिक सकाळमध्ये बँकेने जाहिरात प्रसिध्द् केली होती. आमच्या ग्राहकांकरिता आणि वाचकांकरिता ही जाहिरात आम्ही पुनर्मुद्रित केलेली आहे. सामान्य माणूस हाच ग्राहकसेवेच्या केंद्रस्थानी त्यावेळीसुध्दा होता, हे या जाहिरातीमधून सहज लक्षात येते. बचत आणि बँकेत खाते उघडणे हे आजही अतिशय महत्वाचे आहे, हा संदेश ३३ वर्षांपूर्वी बँकेने आपल्या जाहिरातीमधून अधोरेखित केला होता.
वर्ष 2021 जाहिरात :
आजच्या काळातील ही जाहिरात बँकेचे कालानुरूप बदलण्याचे, नाविन्याचा स्वीकार करण्याचे धोरण स्पष्ट करते.