चितळे -जागतिक दर्जा, महाराष्ट्राचा अभिमान

समृद्ध संपन्न सांगली जिल्ह्यात महाराष्ट्राच्या दुग्धक्रांतीची मुहूर्तमेढ १९३९ मध्ये रोवली गेली. आठ दशकांहून अधिक काळ अवघ्या महाराष्ट्राला सकस व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा करणाऱ्या या उद्योगाचा प्रवास मोठा प्रेरणादायी आहे. चितळेंच्या चार पिढ्यांनी साकारलेली ही धवलक्रांती महाराष्ट्राच्या महाब्रँडला साजेशी आहे.

बारमाही वाहणारी कृष्णामाई, पशुपालनास उपयुक्त हिरवेगार शिवार, नजीकच मुंबईसारख्या बाजारपेठेला जोडणारी रेल्वेची सुविधा हेरून चितळे उद्योग समूहाचे जनक भास्कर गणेश चितळेतथा बाबासाहेब चितळेयांनी १९३९ मध्ये सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे दुधाचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. मुंबईची जबाबदारी ज्येष्ठ मुलगा भाऊसाहेबांच्या वर सोपविली. दोन वर्षांनंतर मुंबई हे स्थलांतरितांचे शहर व नियमित ग्राहक नसल्याने त्यांनी चोखंदळ अशा पुणे शहराची या व्यवसायासाठी निवड केली. तेथील जबाबदारी भाऊसाहबांबरोबर बंधू राजाभाऊ चितळे पाहू लागले, तर भिलवडीतील दुग्ध संकलन व प्रक्रियेची जबाबदारी नानासाहेब व काकासाहेब चितळे पाहू लागले. सुरुवातीच्या काळात अन्य विक्रेत्यांना ही उत्पादने पुरविली जायची. कालांतराने त्याची स्वतःच विक्री करत पुणेयेथे ‘चितळे’ ब्रँडची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा ब्रँड ग्राहकाभिमुख करण्यासाठी दुग्ध व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील शास्त्रशुद्ध शिक्षण नानासाहेबांनी घेतले. त्यांनी बंगळूर येथे डेअरी डिप्लोमा केला, तर बंधू काकासाहेबांनी मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल याची पदविका घेतली. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करीत या उद्योगाची मोट बांधली. त्यातून आज घडीस पन्नास हजाराहून अधिक शेतकरी चितळे उद्योगाशी जोडले गेले आहेत.

आपल्या उद्योगाबरोबर शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांना जातिवंत दुधाळ जनावरेपुरवली. त्या जनावरांसाठी स्वतंत्र अशी आरोग्य सुविधा उभी केली. गाई म्हशींच्या वंशावळीपासून शरीर रचनेचेप्रशिक्षण दिले. त्यांना नाबार्डच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. यासाठी उदय, किरण, भास्कर अशा तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले. गोठा व्यवस्थापन, तंत्रज्ञान व जैविक तंत्र याचा समावेश आहे. तंत्रज्ञानामध्ये सायलेज मेकींग, दूध काढण्यासाठी मशिनरीचा वापर, तर जैविकमध्ये उत्तम जनावराची निवड, सॉर्टेड सिमेन त्यातून उच्चप्रतिची पाडी गोठ्यातच तयार करणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा व्यवस्थापन खर्च कमी होऊन दोन-तीन वर्षात दूध उत्पादन दुपटीने वाढले. त्यासाठी चितळेडेअरी नेABS व GENUS या जागतिक कंपन्यांच्या सहकार्यानेउच्चदर्जाची सिमेन निर्मिती केली आहे. यामध्ये कमी खर्चात अधिक दुग्ध उत्पादन करण्याचा मूलमंत्र शेतकऱ्यांना दिला. त्यातून हा व्यावसाय केवळ शेतीपूरक न राहता तो असंख्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय झाला,त्यांच्या संसाराचा आधार बनला आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक शेतकरी स्वतः उद्योजक बनलेआहेत.

आजमितीस मे. बी. जी. चितळेडेअरी ग्रामीण भागातून रोज सात लाख लिटरहून अधिक दुधाचेसंकलन करतात. त्यातील सत्तर टक्के दुधाचेपॅकिंग पिशवीमधून वितरण होते, तरउर्वरित दुधापासून श्रीखंड, तूप,दही, लोणी, चक्का, लस्सी, चीज, पनीर, ताक, दूध पावडर अशी उत्पादनेतयार होतात. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह नगर, औरंगाबाद येथे चितळेंचेदूध पोहचलेआहेते महाराष्ट्रभर वितरीत करण्याचा मानस आहे. चितळेफुडस्मार्फत इन्सटंन्ट मिक्स मध्ये गुलाबजाम मिक्स, खमण मिक्स, मेदुवडा मिक्स, इडली मिक्स, जिलेबी मिक्स, तर चितळेॲग्रोची मँगो पल्प, टोमॅटो केचअप, फ्लेवर्ड मिल्क, मँगो जॅम व मिक्स फ्रुट जॅम, व पुणेयेथील चितळेबंधू मिठाईवालेयांची बाकरवडी, मिठाई, नमकीन अशा अनेकविध उत्पादनांनी देशासह परदेशातील बाजरपेठ आपलीशी केली आहे. श्रीखंडासह काही उत्पादनेयुरोपीयन देशासह सिंगापूर, दुबईसह या प्रमुख देशांमध्ये पोहचली आहेत. बाकरवडीच्या चवीतील वैशिष्ट्यानेबाकरवडी खावी तर चितळेंचीच, असेसमीकरण होऊन तो चितळेंचा ब्रॅन्ड प्रॉडक्ट बनला आहे. जगभरातून होणाऱ्या मोठ्या मागणीमुळे तिचेउत्पादन स्वयंचलीत यंत्राद्वारे केलेजाते. या डेअरीनेभारतीय दुग्ध व्यवसायास ॲटोमेशनचा मार्ग दाखविला.

चितळे उद्योग समूह भिलवडी येथील विहंगम दृश्‍

या डेअरीनेभारतीय दुग्ध व्यवसायास ॲटोमेशनचा मार्ग दाखविला. या क्षेत्रात प्राधान्यानेआधुनिकीकरणाबरोबर पदार्थाची स्वच्छता, गुणवत्ता व हायजेनिक सांभाळलेआहे. भारतीय मिठाईचा खवा हा मुख्य आधार आहे. तो शुद्ध, सकस व गुणवत्तापूर्ण असावा,हेयेथेकटाक्षानेपाहिलेजाते. जगात सर्वाधिक श्रीखंडाचेउत्पादन करणारा समूह म्हणून चितळेडेअरीचा नावलौकीक आहे. तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पॅकींगमुळे विश्वासार्ह बनला आहे. श्रीखंडाबरोबरच, तूप, लोणी, दही, चक्का ही उत्पादनेयांत्रिकीकरणानेहोत असल्यानेती ही ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत.

आज कायद्यानेदुग्ध उत्पादनात मानकेआवश्यक असली तरी चितळेउद्योगाने अगदीउत्पादनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्याचा आंगिकार केला आहे. त्यामुळे चितळेंच्या उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय दर्जा टिकून आहे. त्यामुळेपुणेयेथील चितळे बंधू मिठाईवालेहे१९९९ मध्ये HACCP चेअनुपालन रणारेदेशातील पहिले रिटेल स्टोअर ठरले.

पुणे येथील १९५०पासून सेवा देणारे चितळे उद्योग समूहाचे दालन.

चितळेंची सर्व उत्पादनेग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावीत या हेतुने चितळेएक्सप्रेस ब्रॅन्ड शापी या संकल्पनेची सुरवात कोल्हापूर येथून झाली. सध्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरसह राज्यात सुमारे२१ ब्रँड शॉप व पुणेयेथील स्वतःची २ शॉप व १८ फ्रॅचॉईसी कार्यरत आहेत. यासर्व ठिकाणी जास्तकाळ टिकणारी पॅकबंद मिठाई उपलब्ध आहे. त्यास मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता देशभरात सुमारे२००हून अधिक शॉपी लवकरच सुरू होत आहेत. कोरोनासारख्या जागतिक महामारीत या स्टोअर्सनी घरपोच सेवा देत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. बाबासाहेबांनी मुहुर्तमेढ रोवलेल्या या उद्योगाचा वटवृक्ष दुसऱ्या पिढीतील चौघांनी वाढविला तिसऱ्या पिढीतील माधवराव, श्रीकृष्ण, श्रीपाद, संजय, विश्र्वास, अनंत, गिरीश व मकरंद यांनी समर्थपणे वाढवून त्यास आकार दिला. तर चौथ्या पिढीचेकेदार, इंद्रनील, निखिल, अतुल, रोहन, पुष्कर यांनी काळानुरूप आलेलेनवेबदल स्विकारत हा उद्योग वृद्धिंगत करत आहेत. या उद्योगाचा आवाका मोठा असला तरीही ग्राहकांना दूध आणि दुग्धजन्य उत्पादनेताजी व नेमाने मिळावीत याकडेकटाक्षानेलक्ष दिलेजाते. गुणवत्ता हा मूलमंत्र ठेवून या उद्योगानेत्याच्याशी कधीच तडजोड केली नाही.

उत्पादक, निर्माता तेथेट ग्राहक अशी गुणवत्तापूर्ण शृंखला नेहमीच अबाधित ठेवली आहे. ती जपण्यासाठी संशोधन व गुणवत्ता नियंत्रणावर सातत्यानेभर दिला आहे. त्यासाठी डेअरीनेस्वतःचेप्रक्रिया आणि शेती तंत्र विकसित केले आहे. दूध उत्पादनेनाशवंत असल्यानेत्यांच्यावर नैसर्गिक वातावरणाचा परिणाम होऊ नये, याचा सातत्यानेव गांभीर्याने विचार केला जातो. त्याबरोबरच शाश्वत पर्यावरण संवर्धन चिकित्सेनेकेलेजाते. या उद्योगात दुध उत्पादक शेतकरी प्रमुख घटक आहे, त्यालाही श्रमाचा चांगला व रास्त मोबदला मिळावा यासाठी चितळे उद्योग नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कमी खर्चात अधिक दूध उत्पादनसाठी अनेक योजना कार्यरत आहेत. शेतकऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचेयोगदान महत्त्वाचे मानून त्यांना पोषक व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून दिले आहे. त्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यात चितळेउद्योग समूह अग्रेसर आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आग्रहानेस्वीकार करीत, काळानुरूप होणाऱ्या बदलाना सामोरे जाण्याची भूमिका नेहमी राहिली आहे. अत्याधुनिक दूध पॅकिंगची यंत्रणा देशात प्रथमच चितळेडेअरीनेआणली व त्यामध्ये उत्पादनांच्या वितरणासाठी स्वतःची अशी गतिमान व सुरक्षित वाहतूक यंत्रणा कार्यरत करून तंत्रज्ञानाचा सतत स्वीकार करण्याची कास धरली आहे.

पुण्यासह सर्वत्र चितळेंची उत्पादने मिळण्यासाठी सुरू केलेले ब्रॅन्ड शॉप.

पर्यावरण संतुलनासाठी महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा ॲवॉर्ड.

सामाजिक बांधिलकीचे भान….

चितळे उद्योग समूहाने व्यवसाया बरोबरच सामाजिक बांधिलकी अखंड जोपासली आहे. उद्योगातील प्रगती इतकाच त्यांचा सामाजिक कार्याचा आलेख उंचावलेला आहे. समाजात काम करताना चितळेकुटुंबाचा नेहमी प्रत्यक्ष सहभाग असतो. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना त्यांनी निरंतर ठेवली आहे, त्यामुळे समाजा प्रती त्यांची वीण घट्ट आहे. हा उद्योग परिसरातील अनेक कुटुंबाचा पोशिंदा बनला आहे. ग्राम स्वच्छता अभियानात या समूहाची कामगिरी ठळक राहिली. त्यांच्या प्रेरणेने अनेक गावे उद्क्तयु झाली, अनेक गावांना पुरस्कार मिळाले. विकासकामे टिकाऊ स्वरूपाची असावी असा त्यांचा नेहमीच आग्रह राहिला आहे. भूकंप, नसैर्गिक वादळे, महापूर, दुष्काळासारख्या अस्मानी संकटात या समूहाचा मदतीचा हात सदवै पुढे राहिला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री निधी, विविध रिलीफ फंडासाठी भरीव स्वरूपाची देणगी ते सातत्याने देत आहेत.

चितळे उद्योग समूहातर्फे श्री. व सौ. नानासाहेब चितळे व इतर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करताना.

चितळे उद्योग समूहातर्फे काकासाहेब चितळे व इतर यांच्या उपस्थितीत चारा छावणीला मदतीचा हात.

कृष्णेच्या प्रलयंकारी महापुरात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, निवास व्यवस्था, औषधोपचार, पुरानंतरची सार्वजनिक स्वच्छता, पशुधनाला चारा व आरोग्य सुविधा पुरविण्यात हा उद्योग पुढे असतो. दुष्काळात पशुधन वाचावेया भावनेतून चारा छावण्याना त्यांची नेहमीच मदत राहिली. कोरोनासारख्या जागतिक महामारीत त्यांचा मदतीचाहात मागेराहिलानाही. धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, साहित्यिक, पुरातन वास्तूंचेसंवर्धन व सार्वजनिक उपक्रमात हा उद्योग अग्रभागी आहे. जिल्ह्यातील खेळाडूआणि क्रीडा मंडळांना मदत व शिक्षण क्षेत्रातसाठी त्यांचे अखंड योगदान आहे. देहदान, रक्तदान, नेत्रदान अशा चळवळींच्या प्रचार व प्रसारात ते सक्रिय आहेत. खेडोपाडी रस्ते, सार्वजनिक स्वछतागृहे, पिकअप शेड अशा सुविधा,हॉस्पिटले, ताकारी-म्हैशाळ पाणी योजनांना मदत केली आहे. वृक्षारोपण चळवळीत सातत्य ठेवून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचा सहभाग नेहमीच सक्रीय असतो. अशा या सर्वसमावेशक प्रगतशिल उद्योगास यापुढील काळात उज्वल परंपरा आहेव महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निश्चितच या उद्योग समूहाचे योगदान राहिल. राज्य व केंद्र सरकार याचीनक्कीच नोंद ठेवेल याबाबत खात्री आहे.

नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी ॲवॉड

नावीन्य, आधुनिकीकरण आणि ऑटोमेशन

  • या उद्योग समूहाने सुरवातीपासूनच व्यवसायात नाविन्यपूर्णता आणली, त्यामुळे उद्योगाला प्रतिष्ठा मिळाली. आधुनिकीकरण व यांत्रिकीकरणच्या सुरेख समन्वयाची अनेक उदाहरणे आहेत.
  • १९३९ ते १९६४पर्यंत सर्व प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने सुरू होत्या. बर्फ पुण्याहून आणावा लागे. १९६४ मध्ये विद्तीकरण झाल् यु याने मशीनचा वापर सुरू झाला.
  • १९७४ – भारतात प्रथमच दधाच्ु या पॅकींगसाठी पॉलीथिनच्या पाऊचचा वापर केला. त्यासाठी आवश्यक क्रेटस् निर्मिती व वाहतुकीसाठी इन्शुलेटेड ट्रक सुरू केले. त्यामुळे दुधाची गुणवत्ता अधिक काळ टिकू लागली. या दरम्यान जनावरांचे दुध काढण्यासाठी मशीनचा वापर सुरू केला.
  • १९७६ – बाकरवडी उत्पादनास सुरवात झाली.
  • १९८० – जागतिक तुलनेत भारतात २२ टक्के दुधाचे उत्पादन होते ते वाढवण्यासाठी गुजरात येथून म्हैसाणा, मुऱ्हा जातीच्या म्हशी व बंगळूर येथून जर्सी व होस्टन जातीच्या गायी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आणून दिल्या. त्याचे संगोपन, औषधोपचाराची जबाबदारी घेऊन दुग्ध उत्पादन वाढवल.
  • १९८४ –कॉम्प्युटरची जगाला ओळख होत असतानाच चितळे उद्योग समूहाने सर्व विभागात कॉम्प्युटरचा वापर करून उत्पादकता, अचुकता, गुणवत्ता वाढवली, शेतकऱ्यांना संगणकीकृत दुधाची बिले देण्यास सुरवात केली.
  • १९९६ – गुरांचे निदानसाठी व त्यांच्या वैज्ञानिक प्रजनन प्रयोगशाळा सुरू झाली. त्यामुळे गोठवलेले सिमेन उपलब्ध होऊ शकले, तसेच रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफीके शन (RFRD) टॅगचा वापर करून प्राण्यांचे रेकॉर्ड ठे वणे सुरू के ले. त्यासाठी कॉल सेंटरची निर्मिती के ली व “Cow to Cloud” हा उपक्रम राबविला. याद्वारे प्रत्येक जनावराचा डेटा उपलब्ध होऊन प्रजनन क्षमता, दुध उत्पादन त्याची प्रत याची माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागला. ११९९ मध्येनिदान प्रयोगशाळा व गुरांच्या जाती, चयापचय यावर संशोधन सुरू केले.
  • १९९८ – चितळे फुडस् या नावाने नवीन कंपनी स्थापन करून ग्राहकांची इन्सटंट फुडची वाढती मागणी लक्षात घेता इन्सटंट गुलाबजाम मिक्स बाजारात आणले. त्याबरोबर इडली, मेदु वडा, खमण मीक्स व जिलेबी मिक्स याची उत्पादने सुरू केली.
  • २००१ – चितळे ॲग्रोची निर्मिती होऊन आंब्याच्या रसावर प्रक्रिया करून मॅंगो पल्पचे उत्पादन सुरू झाले. त्याची विक्री युरोपातील देश व जपान येथे होवू लागली. पुढे आम्रखंडची निर्मिती झाली. त्याबरोबर टोमॅटो केचअप, जाम, फ्लेवर्ड मिल्क उत्पादित होवू लागले
  • २०१० – श्रीखंड व दही उत्पादन FFS पॅके जिंगमध्ये आले. आधुनिक हायड्रॉलि क पद्धतीने चक्का उत्पादन करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली. असाच वापर दही, चीज, श्रीखंड, पनीर, तूप यांसाठी सुरू झाला. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारी चितळे डेअरी जगभरात मार्गदर्शक ठरली.
  • २०११ – चितळे डेअरीने जनुकीय मेटींग सिस्टीम (जी.एम.एस.) नावाचा कार्यक्रम क्लाऊडवर आला. त्याद्वारे जनावराला अनेक मापदंडावर रेटींग देते व त्या डेटाचे विश्लेषण करून त्याचा वापर योग्य संयोग करणेसाठी सुरू झाला. परिणामी भारतीय म्हशींच्या दुधाचे सरासरी उत्पादन वार्षिक ८०० लिटरवरून २५०० ते ३००० लिटरपर्यंत वाढण्यास मदत झाली. त्यासाठी ABS व GENUS या कं पन्यांच्या संयुक्त विद्यमाने निवडक भारतीय बैल व रेडे यापासून उच्च दर्जाचे सिमेनची निर्मिती सुरू आहे.
  • २०१५ – उत्कृष्ट वंशावळीचे वळू आणून त्यापासून उच्चप्रतिचे सिमेनची निर्मिती सुरू केली.
  • २०१८ – उत्कृष्ट वंशावळीच्या रेड्यापासुन सेक्सेल सिमेन वापरून जगातील पहिली दुर्गा रेडी जन्मास आली.
  • २०१९ – चितळे एक्सप्रेस या ब्रँडशॉपची सुरवात.

उच्च तंत्रज्ञान व स्वयंचलित यंत्रांद्वारे उत्पादन प्रक्रिया करणारा भिलवडी येथील चितळे उद्योग समूह.

सिमेन तंत्रज्ञानासाठीचा उत्कृष्ट वंशावळीचावळू (२०१५)

सेक्सेल सिमेन तंत्रज्ञानाद्वारे तयार झालेली जगातील पहिली दुर्गा रेडी (२०१८)

दूध आणि बरेच काही

चितळे यांनी १९५० मध्ये पुणे येथे कुं टे चौकात भाडेतत्त्वावर जागेमध्ये मिठाईचे दुकान सुरू केले व त्याची दसरी शाखा १९५४ मध्ये डेक्कन जिमखाना येथे सुरू झाली. १९६१ च्या महापुरानंतर कुटे चौकातील दकान बाजीराव रोड येथे सुरू केले व ते आजही सुरू आहे.

आपणास माहीत आहे काय ?

  • चार पिढ्या आणि ८१ वर्षाचा प्रवास.
  • ५० हजार शेतकरी चितळे दग्धशाळेशी संलग्न आहेत.
  • जगातिल सर्वात जास्त श्रीखंड तयार करून विकणारा ब्रॅन्ड.
  • चितळे बंधू मिठाईवाले यांचा बाकरवाडी ब्रॅन्ड प्रोडक्ट – प्रतिदिन पाच हजार किलो उत्पादन.
  • प्रती वर्षी चार लाख सॉर्टेड सिमेनसह पस्तीस लाखापेक्षा जास्त डोसचे भारतभर वितरणासाठी निर्मिती.
मराठी