भारत फोर्ज लिमिटेडची हीरक महोत्सवी, लखलखती वाटचाल

वैशिष्ट्यपूर्ण इतिहास, सह्याद्रीच्या पर्वतरांगांइतकाच वैविध्यपूर्ण भूगोल आणि जिवाला जीव देणारी मराठी संस्कृती, ही महाराष्ट्राची शान आहे... तर संपन्न औद्योगिक परंपरा आहे महाराष्ट्राचा अभिमान! महाराष्ट्रातील या वैभवशाली उद्योगविश्वामध्ये स्वयंतेजाने झळाळणारा लखलखता तारा म्हणून संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर नेणारी उद्योगसंस्था म्हणजे... ‘भारत फोर्ज लिमिटेड’!

इवलेसे रोप लावियले द्वारी…

महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक क्षेत्रात योगदान देणारे डॉ. नीलकंठराव कल्याणी यांनी साठ वर्षांपूर्वी भारत फोर्जलिमिटेड या उधोगसंस्थेची स्थापना केली. अभियत्रित उत्पादने आणि यत्रं भागांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाच्या उत्पादन क्षमतते लक्षणीय भर घालू शकेल, असा फोर्जिंग उद्योग देशांतर्गत स्तरावर उभारण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज आहे ती अत्याधुनिक तत्रं ज्ञानाची, हे जाणून नीळकंठरावांनी बिट्स पिलानी संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतलेले सुपुत्र बाबा कल्याणी यांना अमेरिकेतील बोस्टन स्थित मंसेच्युसेटस विद्यापीठाच्या एमआयटी या बहुप्रतिष्ठित शिक्षणसंस्थेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवले. तथेून अद्ययावत ज्ञान मिळवून भारतात परतलेल्या बाबासाहेबांनी प्रखर बुद्धिमत्ता, व्यवसायाचे सखोल ज्ञान आणि अचूक निर्णयक्षमतेच्या जोरावर भारत फोर्जला जागतिक स्तरावर नेऊन औद्योगिक क्षेत्रात इतिहास घडवला. भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या बाबासाहेब कल्याणी यांनी वडिलांनी लावलेल्या भारत फोर्जरूपी रोपाचे विशाल वटवृक्षात रूपांतर केले. वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्पासून सुरू झालेला हा थे प्रवास अद्ययावत तत्रं ज्ञानाच्या अनुसरणातून वाहतूक, ऊर्जा, संरक्षण, अवकाश, खाणकाम, बांधकाम, हायड्रोकार्बन आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित इतर अनेक उद्योगांपर्यंत पोहोचला आहे. आधुनिक तत्रं ज्ञानाची परिपूर्ण माहिती असलेले १०,००० हून अधिक तत्रंकुशल अभियंते आणि तत्रज्ञांचे जागतिक स्तरावर पसरलेले जाळे हे भारत फोर्जचे बलस्थान आहे. त्यांच्या सहकार्याने कंपनीने आपली वार्षिक उत्पादन क्षमता तब्बल ६,००,००० टनांपर्यंत वाढवली असून, जागतिक स्तरावरील हा एक विक्रमच म्हणायला हवा. १९९९ मध् बाबासाहेबांचे सुपु ये त्र अमित कल्याणी कंपनीत चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम करू लागले. त्यांच्यामुळे कंपनीला नव्या युगातील आधुनिक विचारांचा आणि उद्योजकीय कौशल्यांचा लाभ झाला आहे. आज डेप्टयुी मनेॅजिंग डायरेक्टर म्हणून कंपनीच्या प्रगतीत ते मोलाचा वाटा उचलत आहेत

तीन पिढ्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाला कर्मचाऱ्यांची तत्पर साथ

‘फोर्जिंग क्षेत्रातील जागतिक दर्जाची अग्रगण्य उद्योगसंस्था’ हा किताब कंपनीला सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठी कल्याणी कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या मार्गदर्शनांतर्गत कंपनी व्यवस्थापनाच्या दूरदर्शी निर्णयांना अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी नेहमीच उत्तम साथ दिली आहे. ग्राहक उद्योग संस्थांच्या आवश्यकतांनुसार संकल्पनेपासून रचनेपर्यंत, उत्पादनापासून मशिनिंग, टेस्टिंग, आणि व्हॅलिडेशनपर्यंत संपूर्ण पुरवठा करण्याचे सामर्थ्य भारत फोर्जकडे असल्याने जागतिक स्तरावर नेहमीच सर्वाधिक पसंतीचे पुरवठादार म्हणून कंपनीकडे पाहिले जाते. यामुळे भारत फोर्जने मोठमोठ्या बहुराष्ट्रीय उद्योग समूहांशी उत्पादन विकासाशी संबंधित दीर्घकालीन व शाश्वत सुसंबंध विकसित केले आहेत. ‘नावीन्याचा ध्यास घेणाऱ्यांना संधींचे आकाश नेहमीच खुणावत असते,’ ही बाबासाहेब कल्याणी यांनी दिलेली शिकवण त्यांचे पुत्र व कंपनीचे डेप्टयुी मनेॅजिंग डायरेक्टर अमित कल्याणी व कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्ररेणा ठरली आहे. त्या जोरावर आजवर अनेक संकटांचा भारत फोर्जने एकदिलाने मुकाबला केला असून, अभिनव कल्पनांना कंपनीने यशस्वीरीत्या साकार केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात घोंगावणाऱ्या कोरोना महामारीच्या संकटाचे उदाहरण यथे पुरेसे बोलके ठरावे. प्रोडक्शन लाइन कधीच बंद होऊ नये अशा पद्धतीने केलेले आजवरचे नियोजन या काळात कंपनीला बदलावे लागले. लॉकडाउनमुळे कर्मचारी घरून काम करीत होते. निर्धारित उत्पादन स्तर गाठण्यास अडथळे यते होते. अशा अवघड परिस्थितीत सर्वत्र कर्मचारी कपातीच धोरण स्वीकारले जात असतानाही कंपनी ठामपणे कामगार व कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आहे त्या परिस्थितीशी लढण्याचे बळ व्यवस्थापनाने दिले. पुढे निर्बंध कमी झाल्यावर शासकीय स्तरावरील सर्वनिर्बंधांचे काटेकोरपणे पालन करीत कंपनीने ग्राहकांना निर्धारित वेळेत उत्पादन पुरवठा करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या कसोटीच्या काळात कंपनी व्यवस्थापन सतत कर्मचारी व कामगार वर्गाशी विविध माध्यमांतून संवाद साधत असल्याने कर्मचाऱ्यांची कंपनीप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ होण्यास मदत झाली आणि विश्वासाने भारलेले सक्षम व कुशल कर्मचारी अशक्य ते शक्य करू शकतात, याचे प्रत्यंतर भारत फोर्जने अनुभवले.

नवी क्षेत्रे पादाक्रांत करण्यास सज

उत्पादकता, खर्च, गुणवत्ता आणि सुरक्षितता या चतुःसूत्रीला प्राधान्य देत, त्यामध्ये एकसुत्रता आणत भारत फोर्जने आपल्या सर्वच आस्थापनांमध्ये कामगिरी उंचावण्याच्या दृष्टीने कंपनीअंतर्गत स्तरावर सर्वोत्तम प्रणाली स्थापित केली आहे. नवनवीन संधींचा शोध घेऊन त्यामधील आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करण्याच्या दृढनिश्चयामुळे भारत फोर्जने – मोबिलिटी, अवकाश (एअरोस्पेस) आणि संरक्षण (डिफेन्स) सारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांतही उच्च गुणवत्ता आणि सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. देशाच्या संरक्षण विभागासाठी उत्पादने विकसित करण्यास दहा वर्षांपूर्वीच भारत फोर्जने सुरुवात केली असून, आता संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक शस्त्रास्त आणि साधने विकसित करणारी जगातील अग्रगण्य उद्योगसंस्था म्हणून कंपनीने आपला ठसा उमटवला आहे. संरक्षण आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने होत असलेल्या अद्ययावत सुधारणांच्या अनुषंगाने ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्सलिमिटेड’ (केएसएसएल) ही पायाभूत उद्योगसंस्थाच स्थापन करण्यात आली असून, व्यावसायिक उद्दिष्हटेी निर्धारित करण्यात आली आहेत. रचना, अभियांत्रिकी, धातुकाम आणि उत्पादन क्षेत्रातील भारत फोर्जचा गेल्या पाच दशकांचा तज्ज्ञ अनुभव केएसएसएलच्या पाठीशी असून त्या जोरावर संरक्षण आणि अवकाशाशी संबंधित उत्पादनांची निर्मिती करण्याची प्रस्थापित क्षमता असलेली भारतातील सर्वाधिक वेगवान उद्योगसंस्था म्हणून केएसएसएल नावारूपाला आली आहे. केएसएसएलचा उत्पादन कारखाना अत्याधुनिक संरक्षण तत्रं ज्ञानाधारित उत्पादन शृंखलेने सुसज्ज आहे. यामध्ये आर्टिलरी सिस्टिम, प्रोटेक्टेड वेहिकल्स, आर्माउंड व्हेहिकल्स अपग्रेट, दारूगोळा, अण्वस्ते, हवाई संरक्षण साधने, छोटी शस्ते, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाशाशी संबंधित साधनांचा समावेश आहे. तत्रंज्ञान आणि नावीन्य यांच्या जोरावर केएसएसएलने भारतीय सैन्यदलासाठी भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती देशांतर्गत स्तरावर करीत आहे. उद्योग संस्थेच्या अद्ययावत तत्रंज्ञानाने परिपूर्ण उत्पादन शाखा भारतभरात मोक्याच्या ठिकाणी पसरलेल्या असून, ग्राहकांना संकल्पनेपासून अंतिम उत्पादनापर्यंत संपूर्ण सेवा देण्यास सज्ज आहेत. भारतीय पायदळ, हवाई दल आणि नौदलाकडून केएसएसएलकडे विविध स्वरूपाच्या प्रतिष्ठित मागण्या नोंदवल्या जात आहेत. भारतातील संरक्षण सुविधा जागतिक स्तरावरील सर्वोत्तम ठरावी, याकरिता तसेच भारतीय संरक्षण दलांना शस्त्रास्त्रांच्या बाबत स्वयंपूर्ण नविण्यासाठी केएसएसएलने जागतिक स्तरावरील संरक्षण साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांशी सहकार्य करार केले आहेत. तसेच विविध स्टार्ट अप्स आणि शैक्षणिक संस्थांशी सातत्याने संवाद साधत भारतात तत्रं ज्ञानाच्या संदर्भात अद्ययावत वातावरणनिर्मिती करण्यासाठीही ती प्रयत्नशील आहे. भारत फोर्जचा विश्वास देशाच्या युवा शक्तीच्या सामर्थ्यावर असून इंडस्ट्री ४.० सारखे अत्याधुनिक तत्रं ज्ञान वापरून संभाव्य संधींची दारे उघडण्यासाठी व त्याद्वारे नवे भविष्य घडवण्यासाठी कंपनी सज्ज आहे.

शिक्षण… प्रशिक्षण !

सातत्याने शिक्षणाचा ध्यास आणि आधुनिक तत्रांचे दैनंदिन प्रशिक्षण, ही भारत फोर्जची कार्यप्रणाली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, म्हणून भारत फोर्जने बिट्स पिलानी संस्थेशी करार करून त्यायोगे अद्ययावत तांत्रिक ज्ञानाने परिपूर्ण उच्चशिक्षित गुणवंत कर्मचाऱ्यांची फौज तयार केली. शिक्षण आणि प्रशिक्षणाला पर्याय नाही, हे ओळखून कंपनीने कल्याणी सेंटर ऑफ टेकनॉलॉजी अँड इनोव्हेशन (केसीटीआय) या संस्थेची स्थापना केली. येथील हीट टरीटमेंट, मेटोलोग्राफी, फटिग अँड क्रिप टेस्टगिंशी संबंधित अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये येथे कार्यरत उच्च गुणवत्ताधारित कर्मचारी स्टील आणि फोर्जिंग प्रक्रियांचा अधिकतम कार्यक्षम वापर कसा करता येईल, यावर संशोधन करतात. याखेरीज, केसीटीआयमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, थ्रीडी प्रिंटेड मेडिकल इम्प्लांट्स, ॲडिटिव्ह उत्पादन आणि आडव्हान्स्ड मटेरियल रिसर्च प्रयोगशाळाही उपलब्ध आहेत. भारत फोर्जने कल्याणी सेंटर फॉर मनुफाक्टुरिंग इनोव्हेशन (केसीएमआय) ही संस्थाही सुरू केली आहे, जिथे केसीटीआय संस्थेत होणाऱ्या संशोधनाच्या आधारे उपयोजित स्तरावरील प्रोटोटाइप जलदगतीने विकसित केले जाऊ शकतात.

विकासाधिष्ठित इतिहास

वाहन उद्योगात अत्याधुनिक तत्रं ज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन सुधारणा करीत भारत फोर्जने देशाचे नाव जागतिक नकाशावर नेले. १९८० च्या दशकात भारत फोर्जचे नाव फोर्जिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून प्रस्थापित झाले होते. स्थानिक बाजारपेठेत आपले स्थान अधिकाधिक बळकट करीत कंपनीला अधिकाधिक निर्यातीभिमुखतेचा टप्पा गाठायचा होता. याच वेळी काळाची पावले ओळखत भारत फोर्जने अत्याधुनिक तत्रं ज्ञानाची कास धरत स्वयंचलितीकरण आणि कुशल मनुष्यबळामध्ये गुंतवणूक केली. १९८० च्या दशकात परदेशातून यंत्रे आयात करणे महागडे व कठीण होते. मात्र बाबासाहेब कल्याणी यांचे काळाच्या पुढचे द्रष्टेविचार आणि त्यानुसार तत्पर कृतीमुळे हे शक्य झाले. सर्वप्रथम वापरातील अप्रचलित यंत्रेप्रयोगासाठी मागवण्यात आली आणि त्यांमध्ये गरजेजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. पुढे, बाबासाहेबांच्या मार्गदर्शनांतर्गत, कंपनीत अत्युच्च दर्जाच्या रोबोटिक्स तत्रं ज्ञानाचा वापर सुरू झाला आणि अत्याधुनिक ज्ञान असलेले मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला गेला. त्याची गोड फळे आज कंपनी चाखत आहे. योग्यवेळी योग्य ते निर्णय आणि त्यांची सर्वदूर त्वरित अंमलबजावणी केल्यामुळे भारत फोर्ज कायमच स्पर्धकांच्या पुढे राहिली. जागतिक स्तरावरील बहुराष्ट्रीय उद्योगसंस्थांशी केलेल्या सहकार्य करारांमुळे तत्रं ज्ञानाचे आदानप्रदान होऊन कंपनीला नवनव्या संधी नेहमीच मिळत गेल्या आणि कंपनीने त्यांचे सोने केले.

कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक आणि कौशल्यविकास कार्यक्रम

कौशल्यविकास
  • बिट्स पिलानीच्या सहकार्याने इंजिनिअरिंग पदवी शिक्षण
  • व्यवस्थापन विकास – वॉर्विक विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम
  • एमटेक (डिझाइन इंजिनिअरिंग) बिट्स पिलानी
  • एमटेक (मटेरिअल्स इंजिनिअरिंग) DIAT, पुणे
  • तंत्रज्ञान विकास – फ्रॉनहॉफर, आरडब्लूटीएच विद्यापीठ, सीओईपी, द इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डग, डिकीन विद्यापीठ आणि ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅ क्चरिंग रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने
  • प्रगत तांत्रिक कौशल्य – इंडस्ट्री संदर्भातील आधुनिक प्रशिक्षण
  • हायड्रोलिक्स, न्यूमॅटिक्स, ह्यूमन मशिन, इंटरफे स, पीएलसी आणि कंट्रोलविंग, मेकॅट्रॉनिक्स, एआर आणि व्हीआर, बिग डेटा अनालिसिस इत्यादी
  • इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानात प्रशिक्षित कर्मचारीवर्ग १००० हून अधिक
  • एकूण प्रशिक्षित कर्मचारी वर्ग – ८५ टक्के

कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी

कर्मचाऱ्यांसाठी कामाचे सुरक्षित वातावरण असावे, यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत असतो. त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणाचीदेखील सोय केली जाते. सुरक्षाविषयक सर्व कार्यक्रमांचे वेळच्या वेळी मूल्यमापन केले जाते व संस्थेच्या प्रगतीवर लक्ष ठे वले जाते. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन, कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहिती आणि आरोग्य सुविधा पुरवतो.

सामाजिक उपक्रमांत अग्रेसर

गेल्या साठ वर्षांच्या काळात ज्ञानाची अविरत तहान, उपायकेंद्री विचारसरणी, व्यवसायाभिमुख अथवा समुदायाभिमुख कृतींमधून कर्मचाऱ्यांची मने जिंकत निर्माण केलेला विश्वास… ही कल्याणी कुटुंबातील तिन्ही पिढ्यांमध्ये दिसून आलेली काही साम्यस्थळे सांगता येतील. भारत फोर्जचे व्यावसायिक यश एकंदरीत समाजावर आणि समुदायावर सकारात्मक परिणाम करणारे आहे. भारत फोर्जने महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांतील एकूण १०० गावांचा विकास करण्याची कामे हाती घेतली आहेत. महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य आणि स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि कौशल्य विकास, सामाजिक जागरूकता आणि स्वच्छ भारत अभियान… या आणि अशा अनेक ध्येयांवर आधारित ग्रामविकासासाठी भारत फोर्ज योगदान देत आहे.

सध्या सगळे जग आणि भारतही कोविड महामारीशी लढा देत आहे. भारत फोर्ज या लढ्यामध्ये सक्रियपणे सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १,००,००० एन ९५ मास्कचे वितरण, गरजूंना दोन्ही वेळचे जेवण मिळावे म्हणून दररोज दोन वेळा १००० अन्न पाकिटांचे वितरण, भारत फोर्जच्या स्टील प्लॅन्टमधून विविध रुग्णालयांमध्ये १२० मेट्रिक टन क्षमतेचा द्रवरूप ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा, याबरोबरच संशोधन आणि विकास विभागाच्या सहकार्याने हाय प्रेशर अल्युमिनियम ऑक्सिजन सिलिंडर्सच्या उत्पादनासाठीच केवळ विशेष उत्पादन सुविधा विकसित करण्यापर्यंत आणि हाय फ्लो नेझल ऑक्सिजन उपकरणासारखी महत्त्वपूर्ण वैद्यकीय साधने विकसित करून त्यांचा पुरवठा पुण्यातील विविध रुग्णालयांना करणे, जेट प्रॉपल्शन लॅब (NASA) मध्ये तयार करण्यात आलेले प्री-आयसीयू श्रेणीचे व्हेंटिलेटर्सचे उत्पादन व पुरवठा, तसेच आयसीयू श्रेणीचे ‘पफरफिश’ नावाचे व्हेंटिलेटर्सविकसित करून त्यांचा मुक्त पुरवठा करणे, अशा कृतींमधून भारत फोर्जने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान प्रकर्षाने दाखवून दिले आहे. या साथीमुळे भारत फोर्जला नव्या व्यावसायिक धोरणांचा पुनर्विचार करणे भाग पडले, जी देशाच्या कोविड विरोधी लढ्याला बळ देतील. या ठिकाणी बाबासाहेब कल्याणी यांचे वाक्य प्रकर्षाने सांगावेसे वाटते. ते म्हणतात, “गेल्या ५० वर्षांत समाजाने आपल्या कंपनीच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे, त्याची थोडी तरी परतफेड करण्यासाठी आपण समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” त्यांच्या या विचारांमुळे भारत फोर्जने सामाजिक कार्याचा आदर्शनिर्माण केला आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत फोर्जलिमिटेड सदैव योगदान देत राहील.

मराठी