लघुउद्योजक ते प्रतिथयश अथर्व उद्योग समूह

आई-वडिलांनी केलेले कष्ट आणि त्या कष्टातून केलेल्या संस्कारांतून पुढे जात असताना देखील आई-वडिलांनंतर कोणीतरी आदर्श व्यक्ती समोर असली पाहिजे. त्याप्रमाणे शांत, संयमी, अभ्यासू व उत्तुग व्यक्तिमत्वम असलेले आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन मला लाभले आणि तेथूनच माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला.

शून्यातून विश्व उभेकरणाऱ्या व्यक्तींचा जीवनप्रवास हा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असतो. काहींसाठी आशेचा एक किरण असतो. येथे आपण अशाच एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या म्हणजेच मानसिंग पाचुंदकर पाटील या अवघ्या 40 वर्षांच्या युवा उद्योजकाच्या यशस्वी जीवनप्रवासाचा आढावा घेत आहोत.

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुका महाराष्राट्तील सर्वात जास्त दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. अशा या दुष्काळी परिस्थिती मध्ये सर्वसामान्य शेतकरी असलेल्या सौ. चंद्रभागा व श्री. नानासाहेब दिनकर पाचुंदकर पाटील हे कोरडवाहू शेती करुन चार मुलांचा सांभाळ करीत होते. या बेताच्याच परिस्थितीत नानासाहेबांच्या कुटुंबामध्सुद्ये धा मनातील जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, कामातील प्रामाणिकपणा, लहानपणापासूनच आकाशात झेप घ्यायची स्वप्ने पाहणारा एक तरुण काहीतरी वेगळेकरून दाखविण्याची जिद्द मनात बाळगून आपली वाटचाल करीत होता. तो तरुण म्हणजेआजचे यशस्वी युवा उद्योजक मानसिंग पाचुंदकर पाटील. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिदोरी म्हणजे, आई वडिलांनी प्रामाणिकपणेकेलेलेकष्ट व त्यांची पुण्याई आणि त्यांनी दिलेलेसंस्कार होय. त्याच बरोबर आनंदराव, सोहनराव व बाळासाहेब या चुलत्यांचे व काकींचेआशिर्वाद, तसेच प्रत्कये निर्णयामागे ठामपणे उभे राहणारे मोठे बंधु डॉ. भाऊसाहेब, चंद्रशेखर, दत्तात्रय व अॅड. प्रतापराव यांचेत्यांना लाखमोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर छोटेबंधुरावसाहेब, ज्ञानेश्वर, मंदार व अॅड. रविंद्र यांची मोलाची साथ मिळाली. प्रत्कये यशस्वी पुरुषापाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, त्याच प्रमाणेत्यांच्या पत्नी सौ. ज्योती यांनी खांद्याला खांदा लावून व्यवसायिक वाटचालीत मोलाची साथ दिली. छोटासा लेबर कॉन्ट्रॅक्टर ते तब्बल पाचशेकोटींची उलाढाल असलेल्या ४ कंपन्यांचा मालक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि यवुकांना प्रेरणादायी आहे. आजच्या मराठी यवुकांमध्ये व्यवसायाबद्दल आकरण्ष निर्माण करणारा हा लेख नक्कीच कात्रणाच्या रुपात जतन करून ठेवण्यासारखा आहे. 1994-95 साली रांजणगाव येथेएम.आय.डी.सी.ची स्थापना झाली. इथे इतरांसारखेच नोकरी शोधण्यापेक्षा काही काम (कंत्राट काम) मिळत आहेका हा आगळा वेगळा विचार मानसिंग यांच्या मनात घोंगावूलागला. घरची शेती, शेतीतील भाजीपाला विक्री व गावात दूध पोहोचवण्याच्या कामासोबतच एम.आय.डी.सी.च्या रूपात आलेल्या संधीचेसोनेकरायचेअसेत्यांनी ठरवले. संघर्ष आणि अनंत अडचणी यांच्यावर मात करीत ते वाटचाल करीत राहिले. मनातील जिद्द, इच्छाशक्ती, कामातील प्रामाणिकपणा आणि प्रचंड कष्ट करायची असलेली तयारी यामुळेकदाचित महागणपतीने देखील त्यांना त्यांच्या कष्टाचं फळही भरभरून दिले.

सर्व्हिस इंडस्ट्री : व्यवसायातील पहिले पाऊल :

कुठलेही काम करण्याची लाज न बाळगता पडेल ते काम यशस्वीरीत्या पूर्ण करणेहा त्यांचा जीवनक्रमच झाला होता. आज आपण जेकरीत आहोत तेकालच्या पेक्षा चांगले असावे ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. त्यांची चिकाटी व मेहनत त्यांना त्यांचे स्वतःचे अस्तित्व मिळवून देऊ लागले. सन 2001 साली एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये हाऊस कीपिंगचा एक कंत्राटी कामगार पुरवण्याच्या कामापासून त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. अल्पावधीतच मिळविलेल्या विश्वासाच्या जोरावर त्याच कंपनीमध्ये कॅन्टिन वेस्टची विल्हेवाट लावण्याचे दुसरे काम मिळाले. ते वेस्ट उचलण्यासाठी ४० रु. प्रमाणे पैसे मिळायचे. तेपैसे वाचविण्यासाठी ते सायकलवर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावायचे. हे ‘हाऊस कीपिंग’ चेकाम ते एका कामगाराला सोबत घेऊन तेस्वतः करायचे. हळुहळू आपल्या वैचारिक वैविधतेच्या बळावर त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. लवकरच त्यांना कंपनीच्या कॅन्टीनमध्ये दूध, बिस्किटे व + कोल्ड्रिंक पुरविण्याचे काम मिळाले आणि येथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. या छोट्या छोट्या कामातून मोठ्या यशाचा पाया पक्का होत गेला. केवळ गुणवत्तेच्या आधारावरच त्यांनी प्रत्येक ठिकाणी यशाला गवसणी घातली. आज त्यांच्या अथर्व ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये सुमारे २ हजाराहून अधिक कामगार कार्यरत आहेत. आजपर्यंत विविध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हजारो हातांना काम देणं हे देखील एकप्रकारे समाजकार्यच आहे.

बस व्यवसायापासून यशाच्या गाडीने धरला वेग :

कंपन्यांना कंत्राटी कामगार तर पुरवले परंतु कामगारांची ने-आण करण्यासाठी बस ची गरज होती. अंगी असलेली प्रामाणिकता व काम करण्याची चिकाटी हेगुण ओळखून त्यांना एका कंपनीनेबस घेण्यासाठी प्रोत्साहित करुन आर्थिक साहाय्य केले. एका कंपनीनेएका छोट्या कंत्राटदारावर टाकलेला हा विश्वास नक्कीच महत्त्वाचा होता. असामान्य कौशल्य, जिद्द व ईश्वरावर विश्वास ठेवून त्यांनी पुढील व्यवसाय वाढीसाठी कर्ज काढले. यावेळीही त्यांच्या नशिबात यशाने कुठलीच कसर ठेवली नाही. अल्पावधीतच चांगली सेवा, वेळेचे अचुक नियोजन, विनम्रता आणि व्यवसायातील प्रामाणिकपणा यांचे फळ म्हणून आज सुमारे 400 बसेस पुणे- अहमदनगर ते रांजणगाव या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी राजमुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. पुढे त्यांचे बंधू ज्ञानेश्वर यांच्या हाती त्यांनी या कंपनीचा कारभार सोपवला. आज रोजी हा बसेसचा व्यवसाय ज्ञानेश्वर यशस्वीरित्या पार पाडीत आहेत. आज पुणे जिल्ह्यातील कंपन्यांना कामगार वाहतूक करणा- या व्यवसायात राजमुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. कंपन्यातील कामगार वाहतूकीबरोबच त्यांनी मालवाहतूकीची गरज ओळखून राजमुद्रा ट्रान्सपोर्ट प्रा.लि. या कंपनीची स्थापना करुन मालवाहतूकीच्या माध्यमातून विविध कंपन्यांना सेवा देण्यास सुरुवात केली. चांगल्या सर्व्हिसमूळे एका कामापासून अनेक कामांचे कॅान्ट्रॅक्ट त्यांच्या कंपनीला मिळत गेले. आज सुमारे 200 हून अधिक मालवाहू वाहने या कंपनीच्या ताफ्यात आहेत. ट्रान्सपोर्ट कंपनीचा विस्तार होत असताना कंपनीची जबाबदारी त्यांनी त्यांचेदाजी सचिन दुंडे यांच्यावर सोपविली. आज राजमुद्रा ट्रान्सपोर्ट प्रा. लि. ही कंपनी संपुर्ण देशभऱामध्ये माल वाहतुकीचे काम यशस्वीरित्या पार पाडत आहे.

वेअर हाउसिंग या व्यवसायात पदार्पण :

अनेक कंपन्यांचा माल वेळेत न पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान व्हायचे. तसेच, तयार झालेला माल साठवून ठेवण्यासाठी जागेची कमतरता असल्यानेकंपन्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. हे ओळखून त्यांनी तब्बल सहा लाख स्वेअर फुटाची इंडस्ट्रीयल वेअर हाऊसेस उभारुन ‘अथर्व लॅाजिस्टिक’ च्या माध्यमातून वेअर हाऊसिंग च्या व्यवसायात पदार्पण केले. या व्यवसायात शहाजी शेळके, माणिकराव लांडे, भास्करराव लांडे व सुर्यकांत लांडे या नातेवाईकांना सोबत घेऊन वेअर हाऊस व्यवसायाचे जाळेउभेकेले. यामध्ये कार मॅन्युफॅक्चरिंग करणा-या एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कार पार्किंगसाठी देशातील पहिले आदर्शवत असेचाळीस एकर परिसरात कारयार्ड उभेकेले.

मॅनेजमेंटचे धडे :

त्यावेळी पुणे जिल्ह्यामध्ये देशामधील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या उद्योगाचेजाळे निर्माण होत होते. त्या उद्योगांना लागणारे सुटेपार्ट्स पुरविण्यासाठी छोटेमोठे उद्योग वेगाने उभे राहत होतेतसेच काही पार्ट्स इम्पोर्ट केले जात होते, याची गरज ओळखून त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व उच्चपदस्थ अधिकारी यांच्या कडून मॅनेजमेंटचे धडे घेण्यास सुरुवात केली. निर्णय क्षमता, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सारख्या आवश्यक पैलूंचा विस्तृत अभ्यास करीत हे पैलूस्वतःच्या व्यक्तीमत्वामध्ये भिनवले. त्यांनी व्यक्तीमत्वामध्ये आवश्यक तो बदल घडवून व्यावसायिक स्पर्धेसाठी स्वतःला सक्षम केले. आता उत्तुंग भरारी घेण्यासाठी या गरुडानेआपल्या स्वप्नांच्या पंखांना बळकट केले होते.

मॅन्युफॅक्चरिंग क्त्षेरातही मिळविले अफाट यश :

वाढत्या अनुभवानुसार विविध क्षेत्रे त्यांना खुणावत होती. या मधील अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. यामधील जोखीम माहिती असताना देखील स्वत:च्या कर्तृत्वावर अपार विश्वास असल्यामुळेत्यांनी सन २००८ साली प्लॅस्टिकचेसुटेपार्ट्स बनविणा-या पहिल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा श्रीगणेशा केला. अथर्व पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्वदेशी व विदेशी अॅटोमोबाईल कंपन्यांना टु व्हिलर आणि फोर व्हिलर बनविण्यासाठी लागणा-या प्लॅस्टिकच्या सुट्या भागांची निर्मिती करु लागली. होम अप्लायसेंस मध्ये अनेक स्वदेशी व विदेशी कंपन्यांचे टिव्ही, फ्रिज, वॅाशिंग मशीन, वॅाटर हिटर, एसी व कुलर साठी लागणारेप्लॅस्टिकचेसुटेपार्ट्स बनविण्याचे काम या कंपनीमध्ये केलेजाते. अनेक स्वदेशी व विदेशी कंपन्यांना कॉर्पोरेट ऑफिस मध्ये लागणा-या सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी प्लॅस्टिकचे सुटे पार्ट्स बनविलेजातात. टु व्हिलर व फोर व्हिलर, होम अप्लायंस व फर्निचर बनविण्यासाठी लागणारेप्लॅस्टिकचेपार्ट्स ही कंपनी युरोप, अमेरिकेसह इतर देशांना एक्सपोर्ट करते. या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मानांकन देऊन गौरविले आहे.

बिझनेस दिवसेंदिवस वाढत होता. अथर्व पॅालिमर्स कंपनीची उत्पादन क्षमता कमी पडू लागल्याने सन २०१६ साली शिरवळ एमआयडीसीत ‘अथर्व पॅालिप्लास्ट’ या नावानेपॅालिमरची दुसरी कंपनी त्यांनी सुरु केली. या कंपनीमध्येही टु व्हिलर व फोर व्हिलर, होम अप्लायंस व फर्निचरसाठी लागणारे प्लॅस्टिकचेपार्ट्स उत्पादन सुरु केले. पुढे या ही कंपनीतून टु व्हिलर व फोर व्हिलर, होम अप्लायंस व फर्निचर बनविण्यासाठी लागणारे प्लास्टिकचेपारस्ट्‌ युरोपीय देश, अमेरिकेसह इतर अनेक पाश्चिमात्य देशात एक्सपोर्ट केलेजात आहेत. या कंपनीनेअल्पावधीमध्ये प्रचंड यश मिळवले. या कंपनीस देखील आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मानांकन देऊन गौरविले आहे.

पॅकेजिंग कंपनीची स्थापना :

उत्कृष्ट दर्जाचेपॅकेजिंग हेकुठल्याही प्रकारच्या उत्पादनाची पहिली ओळख व प्राथमिक गरज असते. या क्षेत्रात आपण आपला ठसा प्रभाविरित्या उमटवूशकतो याची खात्री त्यांना होती. त्यातून एक नवेउद्योगक्षेत्र त्यांना खुणावूलागले. त्यानंतर उद्योग क्षेत्रातील अनुभवी संजयकुमार मचे यांना सोबत घेऊन पॅकेजिंग इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकले. औद्योगिक क्षेत्रात प्रगत अशा पुणे जिल्ह्यात तेंव्हा फक्त सेमी ओटोमेशनवर काम करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात होत्या. त्यांच्या उत्पादनावर येणाऱ्या मर्यादा ओलांडणारा फुल्ली आटोमेशनवर चालणारा ‘अथर्व कोरोगेशन प्रा.लि.’ हा सुमारे २.२ मीटर डेक्कल असणारा, पूर्ण ऑटोमेटिक प्रॅाडक्शन लाईन, महिन्याला अंदाजेदोन हजार टन उत्पादन करणारा कोरोगेशन लाईन, फुल्ली ऑटोमेटिक प्रिटिंग, स्टीचिंग आणि ग्लोईंग मशिन लावून अत्याधुनिक कोरोगेशनचा प्लांट उभारुन कोरोगेशन पुरवठा सुरु केला. त्यामुळेपुर्वी ऑटोमोटिव्हसाठी त्यांचेस्पेअर पार्ट पॅकिंगसाठी व एक्सपोर्टसाठी लागणारेकोरोगेशन बॅाक्स त्याच प्रमाणेहोम अप्लायन्स मध्ये फ्रिज, टिव्ही, वॅाशिंग मशीन, एसी, कुलर व वॅाटर हिटर यांना पॅकिंगसाठी लागणारे कोरोगेशन बॅाक्स टूपीस मध्ये बनविलेजायचे. परंतु अथर्व कोरोगेशन कंपनीनेउभ्या केलेल्या सुविधांमुळेहेबॅाक्स सिंगल पीस मध्ये बनविलेजाऊ लागले. अशा प्रकारे सिंगल पीस मध्ये कोरोगेशन बॅाक्स बनविणारा हा देशातील बहुधा पहिला प्रकल्प ठरला असावा. या कंपनीला देखील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मानांकन देऊन गौरविले आहे.

‘मेटल इंडस्ट्री’मध्ये प्रवेश :

सन २०१९ साली ‘अथर्व मेटल’ या कंपनीची स्थापना करुन मेटल इंडस्ट्रीज मध्ये त्यांनी प्रवेश केला. या इंडस्ट्री च्या उभारणीसाठी अविनाश भिसे यांना सोबतीला घेऊन मेटल उद्योग उभारला. मेटल क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान जागतिक दर्जाच्या मशीन लावून ही कंपनी सुरु केली. या कंपनीतून सुद्धा अॅटोमोटिव्ह व फर्निचर मध्ये लागणारे मेटलचे सुटेपार्ट्स बनविण्याचे काम केले जाते. त्याच प्रमाणे फर्निचर व होम अप्लायन्स मध्ये सुद्धा फ्रिज, टिव्ही, वाशिॅ ंग मशीन, एसी, कुलर, फॅन व वाॅटर हिटर बनविण्यासाठी लागणारेमेटलचेसुटेपारस्ट् बनविण्यात येतात. उत्पादनाची गुणवत्ता, वेळेवर डिलेव्हरी व योग्य दर या तीन गोष्टींच्या जोरावर कंपनीने आज मेटल इंडस्ट्रीजमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कंपनीतील उत्पादित केलेलेपारस्ट् युरोप व अमेरिकेसह इतर अनेक पाश्चिमात्य देशात एक्सपोर्ट केलेजात आहेत.

औषधनिर्मिती क्त्षेरात पदार्पण :

सन २०२० साली डाॅ. जालिंदर पडवळ यांना सोबत घेऊन ‘अथर्व बायोफार्मा प्रा.लि.’ ही कंपनी रजिस्टर्ड केली आहे. या औषध निर्मिती कंपनीतून अँटीडायबिटिक, कॅन्सर व सर्दी या आजारांवर लागणा-या मॉलिक्युल्सचे उत्पादन केले जाणार आहे. याचेसंपूर्ण संशोधन पुर्ण झालेले असून सन २०२१-२२ मध्ये सुपा एमआयडीसी मध्ये प्रत्यक्ष औषध निर्मिती व उत्पादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा थोडक्यात आढावा…

    • ‘अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ ची वाषिर्क उलाढाल सुमारे पाचशे कोटी रुपयांची असून, सन २०२४-२५ पर्यंत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
    • ‘अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून सुमारे दोन हजार कामगारांना रोजगार.
    • आंतरराष्ट्रीय दर्जाची फॅ सिलिटी व क्वालिटी पार्ट्स उत्पादित करीत असल्यामुळेच आज ही कंपनी अनेक देशांना आपले पार्ट्स एक्स्पोर्ट करते.
    • जगातील अनेक टॉपच्या कं पन्यांची पुण्यातील ज्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये ऑफिसेस आहेत, त्याच ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये ‘अथर्व ग्रुप ऑफ कं पनी’चे जागतिक दर्जाचे कॉर्पोरेट ऑफिस.
    • डिझाईन अँड  डेव्हलपमेंट, मार्केटिंग, एक्सपोर्ट मॅनेजमेंट कॅर्पोरेट टीम.
    • ‘अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ची सर्व्हिस इंडस्ट्री : टूर्स अँड  ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्ट, हॉस्पिटल, इंडस्ट्रियल वेअर हाउसिंग, पेट्रोलपंप, हॉटेल व टायर एजन्सी.
    • ‘अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्री’ च्या प्रगतीत एचडीएफसी, अक्सेस, शामराव विठ्ठल सहकारी बॅंक, जनता सहकारी बॅंक, शरद सहकारी बॅंक व जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बॅंक यांचे मोलाचे सहकार्य.
    • विमाननगर (पुणे) येथे मार्व्हल एज टॉवरमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री कॉर्पेरेट ऑफिस

आजपर्यंत ‘अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ला मिळालेली आंतरराष्ट्रीय नामांकने…

  • बेस्ट डिलिव्हरी अवॉर्ड
  • पर्यावरण अवॉर्ड
  • बेस्ट सप्लायर्स अवॉर्ड
  • बेस्ट रिस्पॉन्स अवॉर्ड
  • बेस्ट डेव्हलपमेंट अवॉर्ड
अथर्व पॉलिमर
अथर्व कोरोगेशन

सामाजिक बांधिलकी जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व

आज मानसिंग पाचुंदकर पाटील हे नाव औद्योगिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. कमालीची कार्यक्षमता व विश्वासार्हता या गुणांच्या जोरावर त्यांनी आपले औद्योगिक योगदान सिद्ध के लेच… परंतु सामाजिक योगदान देण्यातही ते कायम अग्रेसर राहिले आहेत. ‘अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून (सीएसआर फं ड) ते कायमच विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. अडल्या-नडलेल्यांना मदतीबरोबरच शैक्षणिक, धार्मिक कार्यातही ते हातभार लावत असतात. कोरोनाच्या संकटात ज्या वेळी पीडितांना मदतीची खरी गरज होती, त्या वेळी त्यांनी सढळ हस्ते मदत केली. या लॉकडाउनची झळ सर्वप्रथम सर्व कामगार वर्गाला बसली. त्यांनी काय करावे? आपल्या घरी परतावे की इथेच तग धरून बसावे, हा प्रश्न होता. एका मागून एक कंपन्या बंद पडत गेल्या. या कामगार वर्गाची कुचंबणा होऊ लागली. परप्रांतातील भयभीत कामगार घराकडे परतू लागले. प्रवासाच्या साधनांअभावी आणि न्नपाण्यावाचून त्यांचे खूप हाल झाले. अशावेळी, ‘राजमुद्रा ग्रुप’ च्या कार्यकर्त्यांनी मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करून रांजणगाव मआयडीसीतील विविध कं पन्यांत कार्यरत असलेल्या हजारो परप्रांतीय कामगारांना प्रशासनाच्या मदतीने आपल्या वाहनांतून त्यांच्या गावांपर्यंत, अनेकांना त्यांच्या घरापर्यंत पोचविले. हातचा रोजगार गेल्याने भयभीत झालेल्या कामगारांच्या निवासाची व्यवस्था करताना महिनोन्महिने त्यांची अन्नपाण्याचीही सोय के ली. कडक लॉकडाउनच्या काळात अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूव किराणा किट वाटप केले.

पत्रकारांबरोबरच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांना ऑक्सिमिटर, सॅनिटायझर, उच्च प्रतीचे मास्क, हॅण्डग्लोज आदी उच्च दर्जाचे साहित्य असलेले ‘मेडिकल किट’ भेट दिले. चिपळूण, महाड येथील पूरग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब व शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी के लेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भरभरून मदत के ली. याकामी परिसरातील ग्रामपंचायतींचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, सन २०१९ साली पुरस्थितीत कोल्हापुर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सर्वतोपरी मदत पाठविली. आज मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी अल्पावधीतच यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ पण पाय जमिनीवरच असावेत या उक्तीप्रमाणे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी योजना राबविल्या. म्हणतात ना आई-वडिला नंतर कोणीतरी आदर्श व्यक्ती समोर असली पाहिजे. संयमी राजकारणी असलेले दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. अडी-अडचणीत आणि संकटात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कर्तव्य समजून मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. संपुर्ण अथर्व ग्रुप ऑफ कं पनीची धुरा संभाळताना सामाजिक बांधिलकी जपत रांजणगाव आणि परिसरातील नागरिकांची ते आस्थेने चौकशी करतात. परिसरातील प्रत्येकाला आपल्या हक्काचा आणि जवळचा आधार वाटावा असं यशस्वी युवा उद्योजक मानसिंग पाचुंदकर पाटील यांचं व्यक्तिमत्त्व आहे. जो कोणी त्यांच्या संपर्कात जाईल तो नक्कीच त्यांचा कायमस्वरूपी चाहता होतो.

मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी लेबर कॅन्ट्क्टर ते एक यश रॅ स्वी उद्योजक म्हणून केलेला प्रवास नक्कीच आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे. असंख्य अडचणी समोर असताना ही आज मिळविलेलं उत्तुंग यश अभ्यासलं तर कोणत्याही युवकाला ते ‘युथ आयकॉन  वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा सर्वांसमोर आयकॅन असलेल्या मानसिंग पाचुंदकर पाटील यांना मानाचा मुजरा…

अथर्व इंडस्ट्रीज : ऑफिस नंबर 215 , 2nd Floor, WTC टॉवर -2 . खराडी, पुणे-411014
टेलिफोन : 20-68195200 मो – 9822954545
mansing.pachundkar@gmail.com
www.atharvaindustries.in

मराठी