प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अनिल अवचट, अनुरूप संस्थापिका अंजली कानिटकर, अनुरूप संचालिका डॉ. गौरी कानिटकर.

लग्न जमण्यापासून ते सहजीवन
फुलण्यापर्यंत ! ‘अनुरूप’

लग्न हा भारतीय समाजात अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच नाजूक विषय. आपल्या समाजव्यवस्थेचा पाया लग्न आणि कुटुंब व्यवस्थेवर अवलंबून आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. साहजिकच अशा विषयात काम करणं सोपं नाही. दोन दशकांपेक्षा जास्त काळ लग्न या विषयांत कार्यरत असणाऱ्या डॉ गौरी कानिटकर यांच्याशी त्यांच्या प्रवासाविषयी आणि अनुरूपच्या वाटचालीविषयीच्या या गप्पा.

आपुलकी, जिव्हाळ्याने सेवा

अनुरूपच्या सुरुवातीबद्दल सांगताना डॉ. कानिटकर म्हणाल्या, “१९७५ मध्ये माझ्या सासूबाई म्हणजे अंजली कानिटकर यांनी पुण्यात ‘अनुरूप’ची सुरुवात केली. अत्यत आपुलकी आणि जिव्हाळ्याने त्या या क्षेत्रात काम करायच्या. लग्नानंतर अनेकदा मी त्यांना मदत करायला जायचे आणि बघायचे की त्यांना सगळी स्थळं अक्षरशः मुखोद्गत असत. अशा या व्यक्तिगत सेवेमुळे ‘अनुरूप’चं नाव सर्वदूर पसरलं आणि अनुरूपच्या कामाचा पाया भक्कम झाला. माझे सासरे लेखक-प्रकाशक माधव कानिटकर यांनी ‘अनुरूप’हे आमच्या विवाहसंस्थेला अतिशय अनुरूप नाव सुचवलं.”

घरातूनच व्यवसायाचं बाळकडू

मी जवळपास वीस वर्षं बँकेत नोकरी करत होत. माझ वडील म्हणजे पुण्यातले सुप्रसिद्ध खाऊवाल पाटणकर. व्यवसायाचं बाळकडू मला घरातूनच मिळालं होतं. नोकरी सोडून घरच्या व्यवसायात लक घालावं, असं माझ्या मनात येऊ लागलं होतं. त्याच सुमारास विसावं शतक उलटून एकविसाव्या शतकात आपण प्रवेश केला तसं लग्न हा विषयही वगळ्या पद्धतीनं हाताळण्याची गरज आहे, हे मला जाणवलं. ‘अनुरूप’च्या ऑफिसमध्ये दिसणारी स्थळलिखित पारंपरिक रजिस्टर्स कालबाह्य होत चालली होती. काळाबरोबर विवाहसंस्था म्हणून अनेक गोष्टी बदलून नव्या आव्हानांना समोरं जात पुढे जेयला हवं, हे माझ्या लक्षात आलं. लग्न जमवण्याच्या श्रेत्रात ‘अनुरूप’संस्था गेल्या दोन दशकाहून अधिक काळ काम करत असली तरी वाढणारे घटस्फोट, मुला-मुलींच्या बदललेल्या अपेक्षा, एकूणच सगळ्या समाजाची बदललेली जीवनशैली या सगळ्याचा विचार करून पुढे जाण्याची आवश्यकताहोती. यात मी स्वतः योगदान देऊ शकेन, अशी खात्री मला वाटली आणि मग मी बँकेतून नोकरी सोडून पूर्णवेळ ‘अनुरूप’चं काम बघायचं ठरवलं, असं डॉ. कानिटकर यांनी सागिंतलं.

समृद्ध सहजीवनासाठी प्रयत्न

बदललेला काळ आणि लग्नव्यवस्था यामुळे नवनवीन आव्हानं येत होती. त्याला आपण कशा पद्धतीने सोमोरे गेले, याबाबत सांगताना डॉ. कानिटकर म्हणाल्या, की आम्हाला असं दिसलं, की समाज बदलतो आहे, मुला-मुलींचं आकाक्षांचं क्षितीज विस्तारतंय आणि त्याबरोबर त्यांच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षाही बदलत आहेत. त्यामुळे त्याला थेट न भिडता पारंपरिक पद्धतीन लेग्न जमवण्याकड बघून चालणार नाही आणि लग्न जमवण्याबरोबर जमणार लग्न टिकवण्यासाठी, जोडप्यांचं सहजीवन समृद्ध करण्यासाठीही प्रयत्न करायला सुरुवात केली. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे मी मानसशास्र आणि समुपदेशनाचे अनेक धडे घेतले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात मी समुपदशक म्हणून कामही केलं होतं. माझं हेज्ञान आणि अनुभव मी ‘अनुरूप’च्या कामात वापरायचं ठरवून विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन आणि मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली. पहिल्याच काही दिवसांत जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यावरून विवाहविषयक मार्गदर्शनाची किती जास्त गरज आहे, हे अधोरेखित झालं.

खुल्या अन् मोफत कार्यक्रमांची पर्वणी

‘अनुरूप’कडून अनेक कार्यक्रम घतले जातात याबाबत सांगताना डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘‘आम्हाला जाणवलं की वैयक्तिक मार्गदर्शनाच्या पुढे जात कामाची व्याप्ती वाढवायला हवी आणि त्यातून कल्पना आली ती ‘अनुरूप’च्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांची. व्यवसाय हा एक भाग झाला. पण लग्नव्यवस्थेचं आपल्या समाजातलं महत्त्व लक्षात घेऊन ‘अनुरूप’ची सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम करावं, असं आम्ही ठरवलं आणि म्हणूनच आमचे सगळे मार्गदर्शनाचे कार्यक्रम सर्वांसाठी खुल आणि मोफत असतात. यात मोलाची साथ मिळाली ती माझे पती महेद्र कानिटकर यांची. आम्ही दोघांन मिळून पहिला जाहीर कार्यक्रम घेतला, ज्याचं नाव होतं ‘शोध अनुरूप जोडीदाराचा.’ लग्नासाठी आपल्या जोडीदाराचा शोध घेत असताना काय करावं-काय करू नये? काय पाळावं-काय टाळावं? याविषयी मार्गदर्शन करणाराहा कार्यक्रम. याला भरघोस प्रतिसाद मिळाला. आपल्या मुला-मुलीचं लग्न हा सगळ्या पालकांसाठी मोठ्या चिंतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. साहजिकच पालकांसाठीही कार्यक्रम घेण्याची गरज होती. त्यातून ‘अनुरूप’ने दुसरा कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली, खास पालकांसाठी, ज्याचं नाव आहे ‘लग्न मुलामुलींची, चिंता पालकांची!’ आणि मग अशा रंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची मालिकाच तयार झाली. ‘सासू सासरेहोताना’,‘फंडा लाइफ पार्टनरचा’,‘सोशल मीडिया आणि लग्न’,‘लग्न आणि पत्रिकेचं गौडबंगाल’,‘रंग लग्नाचे, लग्नापूर्वीच जाणायचे’,‘वधू-वर गप्पा’,‘रिलशने शिप: मनातलं ओठांवर’,‘लग्नापूर्वीच हेशिकायला हवं’,‘स्वभाव: पत्रिकेतला आणि मानसशास्त्रातला’, ‘लग्नसंवाद’ असे वेगवेगळ्या विषयांना धरून एकसो एक कार्यक्रम आम्ही घ्यायला सुरुवात केली.’’

तज्ज्ञांकडून मोलाच्या टिप्स

हे कार्यक्रम कोणत्या स्वरूपात असतात, त्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं जात, यावर बोलताना डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘‘गरजेनुसार कार्यक्रमांचं रूप बदलत जातं. कधी परिसंवाद, कधी मुलाखत, कधी थेट गप्पा, कधी व्याख्यान. विषयानुसार हे ठरतं. डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, अनुराधा करकर, डॉ. संदीप अवचट, दीपक शिकारपूर, डॉ. लीना पाटणकर, डॉ. शशांक सामक असेकित्येक नामाकिं त तज्ज्ञ या कार्यक्रमांत मार्गदर्शन द्यायला आजवर आले आहेत. अर्थातच हे कार्यक्रम नुसती कंटाळवाणी मार्गदर्शनाची व्याख्यानं बनू नयेत, तर ते आजच्या पिढीलाही रंजक आणि उपयक्तु वाटावेत यावर आमचा कटाक्ष असतो. म्हणूनच सहजीवनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक जोडप्यांच्या मुलाखतीही घतो. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले आणि अनिता भोगले, अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि सुमीत राघवन, लेखक-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि गायिका संहिता चांदोरकर, अभिनेते अभिषेक देशमुख आणि कृतिका देव, नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि तबलावादक निखिल फाटक, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि निर्माता हृषीकेश देशपांडे अशा अनेक जोडप्यांनी ‘अनुरूप’च्या मुलाखतींमध्ये फार रंजक पद्धतीन से हजीवनाविषयी मोलाच्या टिप्स उपस्थितांना दिल्या आहेत.’’

कार्यक्रम पाहा यूट्ब चॅनेलवर

सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हे कार्यक्रम करत असतो. ते सगळ्यांसाठी खुले आणि विनामूल्य असतात आणि आताही कोणाला बघायच असतील तर त्यांचे व्हिडिओज ‘अनुरूप’च्या युट्युब चॅनलवर सहज उपलब्ध आहेत. हा क्युआर कोड स्कॅन करून तुम्ही ते कार्यक्रम पाहू शकता, असे कानिटकर यांनी सागिंतले.

दरवर्षी १०० पेक्षा जास्त कार्यक्रम

‘अनुरूप’चे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अनेक माध्यमांचा वापर करत असतो. फेसबुक, यूट्यूब असे सोशल मार्ग तर आहेतच. पण प्रत्यक्षातल्या कार्यक्रमांची संख्याही आम्ही वाढवली. सुरुवातीला ‘अनुरूप’च वर्षातून दोन-तीन कार्यक्रम व्हायचे. आता वर्षाला १०० पेक्षा जास्त कार्यक्रम होतात. कोरोनाच्या आधीच्या वर्षाचा, म्हणजे २०१९चा विचार केला तर ३ देशांतल्या २२ शहरांत मिळून तब्बल १०९ कार्यक्रम आम्ही घेतले. हे सांगताना मला अभिमान वाटतो, की मुला-मुलींना आणि पालकांना व्यक्तिगत मार्गदर्शन देण्याबरोबरच सातत्याने एवढी वर्षं जाहीर कार्यक्रमांतून हजारोंना लग्नविषयक मार्गदर्शन विनामूल्य देणारी ‘अनुरूप’ही कदाचित देशातली एकमेव विवाहसंस्था असेल, असे डॉ. गौरी कानिटकर अभिमानाने सांगतात.

टीव्ही, रेडिओवर मुलाखती अन् दैनिकांत लेखन

जाहीर कार्यक्रम आणि व्यक्तिगत समुपदेशनाबरोबर डॉ. गौरी कानिटकर या लेखनही करत आहेत. त्या म्हणाल्या ‘‘मला असं वाटतं की शक्य त्या सर्व माध्यमांतून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जाहीर कार्यक्रम होत गेले तसं मला टीव्ही चॅनेल्सवरही बोलावणं आलं. रेडियोवरही लग्नाबद्दल मी अनेकदा बोलले. आजवर मराठीतील आघाडीच्या जवळपास सगळ्या दैनिकांत आणि नियतकालिकांत मी लेखन केले आहे. मी लिहिलेली ‘शोध अनुरूप जोडीदाराचा’ आणि ‘लग्नाआधी’ ही लग्नविषयक दोन पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. माझा धाकटा मुलगा तन्मय कानिटकर हाही ‘अनुरूप’चं काम पूर्णवेळ बघतो. तोही अनेक दैनिके आणि नियतकालिकांत सातत्याने लेखन करतो. त्याचं ‘लग्नकल्लोळ’ नावाचं लग्न आणि नातेसंबंध याविषयीचं पुस्तक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित झालं आहे. याशिवाय महाविद्यालये, कॉर्पोरेट कंपन्या इथेही आम्ही लग्न आणि नातेसंबंध याविषयी कार्यक्रम घेतो. विषयच एवढा मोठा आहे की तो एकाच कोणत्या माध्यमातून हाताळून चालणार नाही.’’

अनुरूप कार्यक्रमात अभिनेते सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत.
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षभोगले, अनिता भोगले आणि क्रीडा पत्रकार सुनंदन लेले

‘कोविड मध्येही ऑनलाइन जुळली अनुरूप लग्नं

२०२० मध्ये कोविडचं अभूतपूर्व संकट आलं आणि सगळं जगच जणू ठप्प झालं. पण लग्न ही अत्यावश्यकच सेवा आहे, नाही का! साहजिकच, ‘अनुरूप’चं काम एकही दिवस बंद नव्हतं. आमचा सगळा स्टाफ घरून काम करत होता. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ असल्याने ‘अनुरूप’चे सगळे कार्यक्रम ऑनलाइन सुरू झाले. अगदी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि समुपदेशनही व्हिडिओ कॉलमधूनच होऊ लागलं. मेलबर्नचा मुलगा आणि आष्ट्याची मुलगी ‘अनुरूप’च्या ऑनलाइन कार्यक्रमांत भेटून लग्न जमू लागली! असेकितीतरी छान अनुभव आम्हाला या काळात आले, असे त्यांनी सांगितले.

तुम्हाला हे माहित आहे का?

  • ४७ वर्षांची समृद्ध परंपरा
  • ३ पिढ्यांचे योगदान
  • ९०,००० पेक्षा जास्त सुखी जोडपी
  • विविध शहरांत १३ अनुरूप कार्यालये
  • सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्याला अग्रक्रम
  • लग्नाशी संबंधित अनेक विषयांवर गेली दोन दशकेसातत्यानेशिक्षण देणारी एकमेव विवाहसंस्था
खुल्या अन् मोफत कार्यक्रमांची पर्वणी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे अनुरूप ऑफिसमध्येस्वागत करताना तन्मय कानिटकर.

न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, शिकागोत कार्यक्रम

गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य मराठी माणसंपरदेशात शिक्षण-कामानिमित्त गेली आहेत, स्थायिक झाली आहेत. आजही हा ओघ कमी झालेला नाही.साहजिकच या परदेशातल्या लग्च्छू ने मुला-मुलींसाठी काम करायला अनुरूप न सरसावतेतरच नवल! २०१४ पासून सलग सहा वर्षंआम्ही अमेरिके तल्या मुला-मुलींसाठी न्यूयॉर्क , कॅलिफोर्निया आणि शिकागो येथेथेट-भेट कार्यक्रम घेत आहोत. २०१८ पासून तर मार्च आणि सप्टेंबर असेवर्षातून दोनदा हेकार्यक्रम घ्यायला सुरुवात झाली. २०१६ पासून ऑस्ट्रेलियातही ‘अनुरूप’चेकार्यक्रम सुरू झाले.जून २०२० मध्ये जर्मनी आणि इंग्डलं येथेही कार्यक्रमांचंनियोजन होतं. कोविडच्या संकटामुळे ते पुढे ढकलले गेले खरे. पण आता एकदा प्रवासावरची बंधनंदरू झाली की हेही कार्यक्रम होतील,अशी माहिती डॉ. कानिटकर यांनी दिली.

व्यवसायाला संशोधनात्मक जोड

डॉ. कानिटकर म्हणाल्या, की जवळपास चौदा-पंधरा वर्षंलग्न विषयात काम करताना मला जाणवलं की हा विषय एवढा मोठा आहेकी यावर सविस्तर अभ्यासच करायला हवा. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आम्ही काम करतोच. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये लग्नव्यवस्तथे काय काय बदल होत गेले ? याचाही मागोवा घ्यायला हवा, यासाठी मी पीएचडी करायचंठरवलं.समाजाचंप्रतिबिंब कलाकृ तींमध्ये पडतंआणि मराठी माणसू नाट्यप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळेमी नाटक या कलाप्रकाराची निवड के ली आणि माझ्या प्रबंधाचा विषय ठरवला, ‘गेल्या शंभर वर्षांतली मराठी नाटकं आणि बदललेली विवाहसंस्था’. आमच्या अनुभवसमृद्ध कामाला संशोधनात्मक अभ्यासाचीही जोड देण्याचा माझा प्रयत्न आहे.

डॉ. विजय भटकर आणि डॉ. गौरी.
डॉ. आनंद नाडकर्ण
मृणाल कुलकर्ण
अमेय कानिटकर

आधुनिक तंत्रज्ञानामुळे लग्न ठरवणं सुकर

या व्यक्तिगत आपुलकीच्या सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आलेल्या आव्हानांबाबत डॉ. कानिटकर सांगतात, की एक गोष्ट आमच्या लक्षात आली की एकविसाव्या शतकात काम करायचं, तर तंत्रज्ञानाला टाळून चालणार नाही. याबाबत माझा मोठा मुलगा अमेय कानिटकर याला याचंबरंच श्रेय जातं. कॉलेजमध्ये असतानाच त्यानेस्वतः ‘अनुरूप’ची पहिली वेबसाइट २००१ मध्चये सुरू केली. तेव्हापासून सातत्याने‘अनुरूप’च्या तांत्रिक बाजू हाताळताना त्यानेमदत केली आहे. २०१५ मध्ये अनुरूप’नेआपलं अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अप्लिकेशनही तयार केलं. माझा आग्रह होता की वेबसाइट आणि अॅप्लिके शन पालकांनाही सहज वापरता येईल,असंच असलं पाहिजे.साहजिकच त्या दृष्टीन विे चार के ल्यामुळेआमचंसोपं,सुटसुटीत अप्लिकेशन ही खासियत बनली.सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा अमेय आजही अमेरिके त बहुराष्ट्रीय कं पनीत काम करता करता ‘अनुरूप’ची तांत्रिक बाजू खंबीरपणेबघतो आहे. व्यक्तिगत आणि आपुलकीच्या ‘अनुरूप’सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि लग्न ठरवणंअधिकच सुकर झालं.

‘इथे लग्न जमते’अन् बहरतेही

आम्ही नेहमी म्हणतो, की आमची टॅगलाइन ‘इथेलग्न जमते’असली तरी तो आमच्या कामाचा फक्त एक भाग आहे.“जमणारंलग्न टिकायला हवंआणि नुसतं टिकायला हवंअसं नव्हे तर तेफु ललं पाहिजे, सहजीवन बहरलं पाहिजे, नातंप्रगल्भ व्हायला हवं” ही आमची विचारधारा आहे. आमच्या कामाचा दुसरा आणि जास्त महत्त्वाचा भाग म्हणजेआमच्या विचारधारेला धरून चालू असणारेअनेक प्रकारचे प्रयत्न. नुसता डेटाबेस असेल, वेबसाइट-अॅप्लिके शन असेल तर व्यवसाय चांगला चालेलही. पण त्याला अशा मूल्यनिष्ठ विचारधारेची जोड नसेल तर काय उपयोग?

अन् ‘अनुरूप’चे नाते विस्तारले

‘अनुरूप’ची सुरुवात पुण्यात झाली असली तरी त्याच्या कामाची कीर्ती सर्वदरू पसरली होती. बाहेरून ‘अनुरूप’मध्ये नोंदणीसाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्याही वाढत होती. त्यामुळेमी ‘अनुरूप’ बघायला लागल्यावर पुण्याबाहेर विस्तार करायचंनियोजन केलं आणि २००४ मध्ये अनुरूप’चंपुण्या बाहेरचं पहिलं कार्यालय सांगलीला सुरू झालं. आता सांगलीसह मुंबई, ठाणे, डोंबिवली, नाशिक, नागपुर, औरंगाबाद,अहमदनगर, कोल्हापुर, सातारा या महाराष्ट्रातल्या शहरांत, तर महाराष्ट्राबाहेर इंदौरलाही ‘अनुरूप’विस्तार झाला आहे. पुढच्या काळात सोलापूर, अमरावती, रत्नागिरी,जळगाव, गोवा, बडोदा, बेळगाव येथेही कार्यालयेसुरू करण्याचा आमचा मानस असल्याचेडॉ. कानिटकर यांनी सांगितल.

मराठी