जीवनशैली उंचविणाऱ्या गृहप्रकल्पांमागील चेहरा : अनिरुध्द देशपांडे

स्वतःचे हक्काचे असे घर असावे, त्याठिकाणी मुबलक वीज, पाणी, स्ते, रुग्णालये यांसारख्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि तणावमुक्त जीवन जगता यावे अशी स्वप्ने अनेकांनी पाहिली... शिवाय सध्याच्या ‘कोविड १९’च्या जागतिक महामारीच्या काळात या सोयी-सुविधा आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत, याचा प्रत्यय देखील प्रत्येक नागरिकाला आला. मात्र, या सोयी-सुविधांचे महत्त्व पुण्यातील अनिरुद्ध देशपांडे यांनी फार पूर्वीच ओळखले होते. इतकेच नव्हे, तर देशपांडे यांनी ‘अमनोरा पार्क टाऊन’च्या रूपात हे भविष्य सत्यात उतरविले हे विशेष.

अमनोरा-एक पर्यावरणपूरक टाऊनशिप आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची पोचपावती

अमनोरा टाऊनशिपच्या अगदी सुरुवातीपासूनच्या नियोजनापासून पर्यावरणाशी बांधिलकीचा विचार आम्ही केला होता. टाऊनशिपला आवश्यक असलेल्या पर्यावरण संबंधित मंजुरीवेळी ‘प्रबुद्ध व्यावसायिक दृष्टिकोन असलेला प्रकल्प’ अशा शब्दांत पर्यावरण मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर अमनोराचे जाहीर कौतुक केले होते. सुरवातीपासूनच पर्यावरण व्यवस्थापन नियोजनाची कडक अंमलबजावणी आम्हीहाती घेतली. याचा सन्मान म्हणून २०१३मध्ये ‘सीआयआय’ने अतिशय नावीन्यपूर्ण पर्यावरणीय प्रकल्प म्हणून ‘एन्व्हार्नमेंटल बेस्ट प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ देत अमनोराचा सन्मान केला.

अमनोरा पार्क टाऊनविषयी

सार्वजनिक श्रेत्रातील प्रकल्प ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत, असे पं. जवाहरलाल नेहरू १९५०-६० साली म्हणत असत, त्याचप्रमाणे सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा टाऊनशिप या नजीकच्या भविष्यात देशाचे भवितव्य आहेत, हे देशपांडे यांनी केवळ सरकारच नाही तर नागरिकांच्या देखील लक्षात आणून दिले. आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पनेबरोबरच महाराष्राट्तील सर्वांत मोठी टाऊनशिप म्हणून पुण्यातील अमनोरा टाऊनशिप ओळखली जाते. आज अनेक खासगी टाऊनशिप या पुणे शहराची ओळख बनल्या आहेत. मात्र, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील राहणीमानाची व सोयी-सुविधांची जी अपुरी व गोंधळलेली अवस्था आहे, ती लक्षात घेत बदलत्या शहरी निवासी शैलीची ओळख अमनोरामुळेच पुणेकरांना झाली, हे विसरून चालणार नाही. पुणे शहरात असे काही तरी भव्य दिव्य व्हावे, ही अनिरुद्ध देशपांडे यांचीच दूरदृष्टी होती आणि ती त्यांनी सत्यात देखील उतरविली. कुटुंबाला राहण्यास सुसज्ज अशा घरांबरोबरच अमनोरामध्ये हिरवीगार उद्याने, पाणीपुरवठा, वीज, गस, सुरक्षाव्यवस्था, प्रशिक्षित मनुष्यबळ असलेले अग्निशमन केंद्र, सीबीएसई, आयसीएसईसारख्या शाळा, मनोरंजनाची साधने, रेस्टॉरंट, कॅफे आदी नव्या उपनगरासारख्या सुविधा देशपांडे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज ५५०० पेक्षा जास्त कुटुंबे अमनोरामध्ये राहत येथील सामाजिक व पायाभूत सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत. याशिवाय टाऊनशिपमध् आरोग् ये याच्या चांगल्या दर्जाच्या सुविधादेखील उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील एक टाऊनशिप या दृष्टीने अमनोरा एक स्मार्ट टाऊनशिप म्हणून देखील उभी राहिली आहे.

देशातील पहिली स्मार्ट टाऊनशिप

भारतात २०१४ मध्ये ‘स्मार्ट सिटी’ या संकल्पनेबद्दल बोलले जाऊ लागले, मात्र त्याही कितीतरी आधी ‘अमानोरामध्ये स्मार्ट सिटी’मध्ये येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान, तांत्रिक सुलभता, पायाभूत सुविधा, सुरक्षा, स्वच्छ व हरित जीवन, सुलभ व त्रासमुक्त जीवनशैली या बहुतांश बाबींचा समावेश झालेला दिसून येतो. ‘देशात किमान १०० स्मार्टसिटी असाव्यात,’ या पंतप्रधानांच्या स्वप्नाला साकार करण्याच्य उद्देशाने आम्ही विस्तार करीत असल्याचे अनिरुद्ध देशपांडे यांनी आवर्जून नमूद केले. १२ सप्टेंबर २०१४ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ‘स्मार्ट सिटी’ विषयक राज्यांच्या मंत्री व प्रधान सचिवांच्या राष्रीयट् परिषदेत अमनोराने ‘ग्लोकलायजेशन ऑफ स्मार्टसिटी इन इंडियन कॉन्टेस्ट’ या विषयावर ‘अमनोराच्या उभारणीविषयीचा शोधनिबंध’ सादर केला होता. याचे कौतुक केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केले. इतकेच नव्हे तर हे ही माहिती ‘यु डी वेबसाइट’वर देखील प्रदर्शित करण्यात आली. याबरोबरच अनेक राज्यांच्या नगरविकास खात्याच्या टीमबरोबरच महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अमनोरा भेट देत स्मार्टसिटी व त्या अंतर्गत करण्यात येत असलेला विकास समजावून घेतला. नंदन नीलेकणी यांच्या संकल्पनेमधून साकारलेले राष्रीयट् ओळखपत्राप्रमाणे अमनोराने आपल्या नागरिकांसाठी खास स्मार्टकार्ड देखील बनविले आहे. या कार्डच्या आधारे त्यांचे दैनंदिन व्यवहार तणावमुक्त होतात. देशात आधारकार्ड सर्वत्र लागू होण्याआधी अमनोरामध्येहे स्मार्टकार्ड कार्यरत देखील होते.

अमनोराची वैशिष्ट्ये

राज्य सरकारच्या टाऊनशिप धोरणानुसार एखाद्या टाऊनशिपमध्ये पायाभूत सोयीसुविधा, पाणी, वीज, रस्ते, गॅस आणि घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेत राज्य वीज नियमन मंडळ, ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस’बरोबर (एमएनजीएल) करार करीत अमनोरामध्येया सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधुनिक अग्निशमन दल आणि त्याच्याशी संबंधित सोयी देखील राज्य अग्निशमन दलाच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये प्रशिक्षित अग्निशमन मनुष्यबळाचा देखील समावेश आहे. नुकत्याच सिरम इन्स्टिट्यूट येथे घडलेल्या आगीच्या घटनेवेळी अमनोरामधील अग्निशमन दल, अधिकारी व सर्व दलाने कौतुकास्पद कामगिरी पार पाडली होती.

हाकेच्या अंतरावर शाळा, मॉल व रुग्णालय

वैशिष्ट्यपूर्णरित्या बांधलेल्या रस्त्यांनी तुम्ही शाळेत जाऊ शकाल, असे वचन देशपांडे यांनी टाउनशिपमधील लहानग्यांना दिले होते. आज अमनोरामध्ये सीबीएसई व आयसीएसईच्या दोन शाळा आधीच सुरू असून, यामध्ये तब्बल ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अमनोरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्राधान्याने प्रवेश दिला जातो.

ग्राहक नव्हे, नागरिक

अमनोरामध्ये गृहखरेदीदाराकडे ग्राहक म्हणून नव्हे, तर नागरिक म्हणून पाहिले जावे असा अनिरुद्ध देशपांडे यांचा सुरवातीपासूनच आग्रह होता आणि आजवर त्यांनी तो पाळला आहे. नागरिकांसाठीच्या सर्वहक्कांबरोबर २४ तास पाणी, वीज, उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठीच्या सोयी, हरित पर्यावरण, आवश्यक सामाजिक पायाभूत सुविधा आदी पुरविण्यात येतात.

पारदर्शकता महत्त्वाची

घरांच्या किमती आणि व्यवहार यामध्ये सुरवातीपासूनच आम्ही पारदर्शकता ठेवली. ज्यामुळे अगदी रहिवाशांना देखील छापील किंमतीहून वेगळा डिस्काउंट मिळत नाही. आमच्याकडे ब्रोकर नाही, त्यामुळे गेली इतकी वर्षे आम्ही आमची मार्केटमधील गुणवत्ता व पत टिकवून आहोत. यामुळे आम्हाला फारसा लाभ झाला नसला, तरीही जनतेमध्ये आमच्याबद्दल विश्वास नक्की निर्माण झाला आहे, असे देशपांडे सांगतात.

जगातील पहिलेच पर्यावरण मंदिर

५ जून २००८ साली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अमनोरामध्ये जगातील पहिल्या व एकमेव पर्यावरण मंदिराचे उद्‍घाटन करण्यात आले. याची दखल युनायटेड नेशन्स एन्व्हार्नमेंट प्रोग्रॅमच्या (UNEP) संकेतस्थळाने घेतली. हे मंदिर २३ एकरांच्या संपूर्ण हिरवळीमध्ये वसले असून, याठिकाणी ग्लास प्रिझममध्ये ‘गोल्डन ट्री’ स्थापित करण्यात आली आहे. आता दरवर्षी येथे जागतिक पर्यावरण दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

पुण्याचे बदलते क्षितिज

जमिनीची वाढती टंचाई लक्षात घेत मुंबईव्यतिरिक्त महाराष्राट्त १०० मीटर उंच अशा ‘अस्पायर टॉवर्स’ची उभारणी करणारी अमनोरा ही पहिलीच टाऊनशिप झाली, त्यानंतर अनेकांनी अशा इमारती बांधल्या. मात्र, आजही १५० मीटर उंच ‘गेट वे टॉवर्स’ देखील अमनोरा येथेच साकारत आहे.

भारतातील सर्वाधिक पुरस्कारप्राप्त टाऊनशिप

अर्बन डिझाईन, गुणवत्ता, बांधकाम, पर्यावरणपूरक, ब्रँडिंग-मार्केटिंग, वास्तुकलेच्या नावीन्यपूर्ण बाबी, सामाजिक व पायाभूत सोयीसुविधा, स्मार्ट लिव्हिंग, सीएसआर प्रकल्प आदी अनेक पातळीवर राष्ट्रीय स्तरावर अमनोराला सन्मानित करण्यात आले आहे. आजवर मिळालेल्या ३०० हून पुरस्कारांपैकी ३० हून जास्त पुरस्कार हे प्रामुख्याने पर्यावरणाशी संबंधित बाबींसाठी आहेत. हे विशेष. यामध्ये ‘सीआयआय’तर्फे २०१३मध्ये ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट ऑफ वेस्ट टू एनर्जी अंड झिरो वेस्ट मॅनेजमेंट’साठी देण्यात आलेल्या प्रतिष्ठीत पुरस्काराचा देखील यामध्ये समावेश आहे.

गावकऱ्यांना सोबत घेत विकास

साडेसतरा नळी गावातील २०० कुटुंबीयांकडून अमनोराने प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली. त्यावेळी यातील १५० शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत त्यांना अमनोराने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करीत ठेकेदार व व्यावसायिक बनविले. विशेष म्हणजे, हे सर्वच जण टाऊनशिपमधील बांधकाम, पुरवठा, लणॅ्डस्केप/ गार्डन मनेजमेंट बरोबरच दूध, वर्तमानपत्रे व लांद्री अशा संबंधित व्यवसायात कार्यरत आहेत. गावातील महिला सक्षमीकरणावर देखील विशेष भर देण्यात आला असून, त्यासाठी ‘जेव्ही हॉस्पिटॅलिटी’ कंपनीची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामध्येप्रामुख्याने गावातील महिला असल्याने त्यांचा विकास झाल्याने सामाजिक व आर्थिक बदल दिसून येत आहे. याबरोबरच अनेकांनी स्वत:चे व्यवसाय देखील सुरू केले आहेत.

अमनोरा मॉल- डे डेस्टिनेशनसाठी पुणेकरांचे आवडते ठिकाण

आपली भव्यता, विविधता, गुणवत्ता यांच्या आधारे आज अमनोरा मॉल हा देशातील मोठ्या मॉल्सपैकी एक असून, भेट देण्यासाठी एक सर्वोत्तम जागा आहे. आधुनिक पर्यायांबरोबरच भारतीय बाजार या संकल्पनेवर आधारित असलेल्या अमनोरा मॉलला केवळ पुणेकरच नाही, तर परिसरातील व इतर शहरातील नागरिक देखील भेट देत असतात. याबरोबरच ‘अमनोरा टाऊन सेंटर’ हे १५ लाख स्क्वेअर फूट इतक्या जागेत पसरलेले एक शॉपिंग डेस्टिनेशन असून, ग्राहकांना खरेदीसाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणून ते प्रसिद्ध आहे. यामुळे भरपूर पार्किंग असलेले मॉल, दुकाने, मनोरंजनाचे पर्याय हे ‘डे डेस्टिनेशन’ म्हणून समोर येऊ शकतील. ‘अमनोरा टाऊन सेंटर’ येथे ३०० हून अधिक नामवंत कंपन्यांची दुकाने असून, यामध्ये कपडे, घरगुती वस्तू, मनोरंजन, रेस्टॉरंट, कॅफे, फाईनडाईन यांसारखे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत.

amanora-img-4

अनिरुध्द देशपांडे यांच्याविषयी

मूळचे पुण्याचे असलेले अनिरुध्द देशपांडे हे पहिल्या पिढीचे व्यावसायिक असून, ३० वर्षांपूर्वी पुणे शहरात त्यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. नवनवीन आव्हानांना सामोरे जात त्याचे संधीत रूपांतर करत बांधकाम व्यवसाया व्यतिरिक्त क्रीडा, शिक्षण, महिला व दुल्बळ घटक आदी क्षेत्रांबरोबरच समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व आघाड्यांवर ते नेहमीच कार्यरत राहिले आणि अजूनही आहेत. सध्या पुण्यातील ‘सिटी ग्रुपचे’ व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते काम पाहत आहेत. बांधकाम व्यवसाय क्षेत्राशिवाय सॉफ्टवेअर, मनोरंजन आदी क्षेत्रांशी देखील ते संबंधित आहेत.

बांधकाम क्षेत्र

मागील ३० वर्षांपासून अनिरुद्ध देशपांडे बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आपल्या टीमसोबत महाराष्ट्रातील पहिली टाऊनशिप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अमनोरा’ या टाऊनशिप व्यतिरिक्त पुणे आणि परिसरात आजवर १ कोटी (१० दशलक्ष) स्क़ेअर फूट इतक्या जागेत अतिउच्च श्रेणीतील निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची निर्मिती केली आहे. या बरोबरच स्वातंत्रोत्तर काळातील पहिले खासगी हिल स्शटेन म्हणून परिचित असलेल्या लवासाच्या लेक सिटी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे मूळ प्रवर्तक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

सामाजिक बांधिलकीचे बाळकडू

कुटुंबाला डॉक्टरी पेशाची पार्भूमी असलेले अनिरुद्ध देशपांडे हे बांधकाम व्यवसायाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, समाजातील दुल्बळ घटकांना मदत, शहरीकरण, ग्रामीण व शहरी विभागीकरण या क्षेत्रांत देखील कटिबद्धतेने कार्यरत आहेत. आपला व्यवसाय नतिैकदृष्ट्या आणि विशिष्टतेसह करण्याबरोबरच अनिरुध्द देशपांडे हे आपल्या सामाजिक कार्यांसाठी देखील वचनबद्ध आहेत, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे.

प्रगल्भ समाजासाठी एक पाऊल-अमनोरा येस फाउंडेशन

समाजातील वंचित घटकांना एक चांगले आयुष्य मिळावे या दृष्टीने ‘अमनोरा येस फाउंडेशन’ ही ना ‘नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणारी संस्था २००५ पासून कार्यरत आहे. फाऊं डेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन आदी विविध विषयांवर काम सुरू आहे. मागील चार वर्षांत अमनोरा येस फाउंडेशनतर्फे ३२५ शिबिरांच्या व कार्यक्रमांच्या माध्यमातून तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांना फायदा झाला आहे. अशाच पद्धतीने नजीकच्या भविष्यात फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू राहणार असून, जास्तीत जास्त वंचित घटकांना सामावून घेत विस्तार करण्याचा फाउंडेशनचा विचार आहे.

याबरोबरच मानसिकदृष्ट्या दुल्बळ प्रौढांसाठी कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय करीत ‘नवक्षितीज’ ही संस्था गेली पाच वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेला आथिक मदत करण्याबरोबरच व्यवस्थापन पातळीवर देखील अनिरुद्ध देशपांडे हे कायम मदत करीत असतात. या बरोबरच पारधी समाजाला गुन्हेमुक्त करण्याच्या हेतूने देशपांडे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सज्जनपुरी यथे आदिवासी पारधी समाज आश्रमशाळा चालवायला घेतली आहे. ही आश्रमशाळा निवासी स्वरूपाची असून आजवर परिसरातील ८०० विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकत आहेत. या शाळेत ई लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. शिवाय पीक लागवड, क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांच्या आवडी या देखील जोपासल्या जातात. स्पोर्ट्स मॅपिंगच्या आधारे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचे प्रशिक्षण देखील या आश्रमशाळेत देण्यात येते. देशाचे एक आदर्शनागरिक होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण याठिकाणी विद्यार्थ्यांना मिळते. आजवर ही मुले विभागीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पातळीवर चमकल्याचा अभिमान देशपांडे यांना असल्याचे यांच्याशी बोलताना जाणवतो. याबरोबरच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे ३०० लोकसंख्चे गाव काही वर्षांपूर्वी दुदेवाने पावसामध्ये माती खचल्यामुळे जमिनीखाली गाडले गेले. अनिरुद्ध देशपांडे हे या गावाच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र सरकारला मदत केली.

क्रीडा क्षेत्रातील योगदान

स्वत: एक खेळाडू असलेल्या अनिरुद्ध देशपांडे यांनी शहर, जिल्हा व राज्य पातळीवर खेळांशी संबंधित संस्था स्थापन केल्या असून, ते क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कार रेसिंग, कुस्ती आदी खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत. सिंबायोसिस या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शैक्षणिक संस्च्या वती थे ने त्यांचा क्रीडाभूषण पुरस्कार देत गौरव करण्यात आला आहे.

मराठी