सिंबायोसिस : आंतरराष्ट्रीय ‘सहजिवनातील’ अग्रेसर संस्था

‘सिंबायोसिस’ म्हणजे सहजीवन. ‘दोन भिन्न प्रवृत्तींच्या सजीवांनी एकमेकांवर अवलंबून जीवन मार्गक्रमण करणे म्हणजे सिंबायोसिस.’ खरंतर, ही जीवशास्त्रातील उच्चारायला कठीण अशी एक संज्ञा. पण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांचे सामंजस्य घडवून आणले ते ‘सिंबायोसिस’ या नावाने. सांस्कृतिक केंद्र, इंग्रजी भाषा शिकवणारी संस्था, महाविद्यालये, अभिमत विद्यापीठ ते आता रुग्णालय आणि संशोधन केंद्र असे विविध टप्पेपार करत ‘सिंबायोसिस’ संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवत सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने ‘सिंबायोसिस’च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी घेतलेला हा मागोवा.

symbiosis-img-4

पुण्यात ५० वर्षांपूर्वी, १९७१ साली माझ्या वडिलांनी, म्हणजेच डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सिंबायोसिस’ संस्थेची स्थापन केली. डॉ. मुजुमदार फर्ग्युसन महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘सिंबायोसिस’ शब्दाचा अर्थ सहजीवन असा होतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब असावे, अशी त्यांची धारणा आहे. म्हणूनच ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थेची अव्याहतपणे वाटचाल सुरू आहे. सुरवातीला आमच्या घरातच संस्थेची स्थापना झाली. माझी आई, वडील आणि त्याचे काही विद्यार्थी यांनी एकत्र येऊन संस्थेची नोंदणी केली, परंतु संस्थेला म्हणावे तसे मूर्त स्वरूप नव्हते. कोणताही परदेशी विद्यार्थी आजारी पडला, त्यांच्याकडे पैसे नसतील, तर आई त्याला बरे वाटेपर्यंत आमच्या घरी ठेवायची. त्याकाळी पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये इराण आणि आफ्रिकेतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये इराणचे विद्यार्थी तुलनेने जास्त असायचे. त्या मुलांशी बोलून आई खूप छान पर्शियन शिकली. अशा घरात माझे आणि माझ्या लहान बहिणीचे संगोपन झाले. त्यामुळे घरात नेहमीच एक वेगळे धर्मनिरपेक्ष वातावरण असायचे. यात परप्रांतीय, परजातीय विद्यार्थ्यांना घेऊन राहणे असे सगळे वातावरण होते. एक अमेरिकन मुलगा आमच्याकडे एक वर्ष वास्तव्यास होता. तो कुटुंबात इतका एकरूप आणि समरस झाला, की कालांतराने शुद्ध शाकाहारी झाला. त्यानेपुण्यातील एका मराठी मुलीशी लग्न केले. आता त्याला देवेंद्र, जानकी आणि सिद्धार्थ अशी तीन मुले आहेत आणि तो आता अमेरिकेत स्थायिक झाला आहे. असंख्य परदेशी विद्यार्थी आई-वडिलांनी घडविले. हे सगळे विद्यार्थी त्यांच्या देशात उच्चपदस्थ झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ

‘जागतिकीकरणाचे पडसाद अभ्यासक्रमावर देखील उमटायला हवेत’ असे आपण आता बोलत आहोत. पण डॉ. मजुमदारांच्या मनात हा विचार पन्नास वर्षापूर्वीच आला होता आणि त्यातून संस्थेची स्थापना केली. सुरवातीच्या काळात सांस्कुतिक कार्यक्रमांवर भर दिला जायचा. त्यासाठी ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय संस्कृतीक केंद्राची’ची स्थापना झाली. याद्वार भाऊबीज, दिवाळी, ख्रिसमस असे सण एकत्रितरीत्या साजरे होत होते. मात्र, भारतीय आणि परदशी विद्यार्थ्यांच्या सहजीवनाची संकल्पना जागतिक स्तरावर विकसित करायची असेल, तर त्याला शिक्षणाची जोड द्यायला हवी, हे डॉ. मजुमदारांनी ओळखल. म्हणून त्यांनी इंग्रजी शिकविण्यासाठी ‘एलटिस’ (इंग्लिश लॅग्वेज टीचिंग इन्स्टिट्ट ऑफ यू सिंबायोसिस) ही संस्था सुरु केली. पुढे त्यातून एक-एक संस्था विकसित होत गेल्या. त्यातून ‘सिंबायोसिस’ला २००२ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जामिळाला. त्यानंतर व्यवस्थापनशास्त्र, आर्किटके्चर, डिझाईन, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा सगळ्याच क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केल. आता ‘सिंबायोसिस’च्या ७१ पेक्षा जास्त संस्था असून, त्यातून जवळपास ४४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर पुण्याबाहेर ‘सिंबायोसिस’चा विस्तार झाला. देशभरातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी शिक्षण देणे शक्य नसल्याने संस्थेच्या बंगळूर, नोएडा, नाशिक, नागपूर, हैदराबाद, कोल्हापूर या शहरांमध्ये शाखा प्रस्थापित झाल्या. आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत ‘सिंबायोसिस’ हेशिक्षण देणारे विद्यापीठ होते. आता आपण संशोधनावर प्रचंड भर देत आहोत. उद्योजकता, नाविन्यपूर्णता आणि संशोधन या तीन शब्दांना प्राध्यान्य दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता विकसित होण्याबरोबरच त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. उद्योजक कसे घडवायचे, त्यासाठी स्वतंत्र शाखा सुरु केली आहे. त्यात स्टार्टअपचा सुद्धा समावेश आहे. यासाठी केंद्र सरकारनेनिधी उपलब्ध करुन दिला आहे. ओमान देशाच्या राजधानीत, म्हणजेच मस्कत शहरात संस्थेचे ‘कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर’ आहे. या देशातील कॉर्पोरेट क्षेत्राची गरज ओळखून आणि कंपन्यांच्या मागणीनुसार हे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. ‘सिंबायोसिस’चा अद्याप परदेशात कोठेही कॅम्पस नाही, परंतु लवकरच त्यादृष्टीने विचार करावा लागणार आहे हे मात्र नक्की.

आरोग्य सेवेचा वसा

संस्थेने आरोग्या सेवेकडे लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले आहे. डॉ. मुजुमदारांनी ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पाहिला व त्यातूनच प्रेणा घेऊन एक नवीन विचार समोर आला. ‘आजही भारतात डॉक्टर होणाऱ्या मुलीचे प्रमाण केवळ १७ टक्केच आहे. मग आपण मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे आणि त्याला जोडून एक सुसज्ज रुग्णालय उभारावे असे त्यांना वाटले. त्यामुळे ‘सिंबॉयोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राची निर्मिती झाली. जानेवारी २०१९ साली बांधकामाची सुरवात झाली व याच वर्षाच्या अखेरीस रुग्णालय सुरू झाले. मार्च २०२० मध्ये कोरोना बाधितांसाठी आपण ५०० खाटा आरक्षित करुन उपचार सुरु केले. आजपर्यंत ४५०० कोरोना बाधित यशस्वीरित्या बरे होऊन घरी परतले आहेत. आता हे ९०० खाटांचे रुग्णालय असून साधारणत: ८०० खाटांसाठी निःशुल्क सेवा दिली जाते. ‘स्पेशॅलिटी विंग’मध्ये देखील कमी दरात उपचार उपलब्ध आहे. आरोग्य सेवेला लक्ष्य करत आता ‘सिंबायोसिस’ने वेगळे वळण घेतले आहे. आरोग्यसेवा, वितरण आणि संशोधन याला प्राधान्य देण्यात येत आहे.

केवळ विद्यार्थिंनींना शिक्षण देणारे स्वतंत्र महिला वैद्यकीय महाविद्यालय यावर्षीपासून सुरु करण्यात आले. पहिल्याच वर्षी १५० विद्यार्थिंनींना प्रवेश दिला असून गुणवत्तेवर आधारीत पहिल्या ५ मुलींना ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली आहे आणि त्यांचे संपूर्ण शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ ‘डॉक्टर’च घडवू नयेत, तर आरोग्य सेवेत मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट, नर्सेस, पॅरा मेडिकल कर्मचारी लागतात, तेही घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी कित्येक वर्ष आधी आरोग्य सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. आम्ही २००४ पासून आरोग्य विज्ञानाशी संबंधित संस्था टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या. आरोग्य सेवेचा कणा म्हणजे नर्सिंग. म्हणूनच पहिल्यांदा नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यात आले. त्यानंतर मेडिकल टेक्नॉलॉजीवर भर देण्यात आला. त्यामध्ये कुशल पॅरा मेडिकल कर्मचारी (टेक्निशियन) तयार करण्याला प्राधान्य दिले गेले. प्रत्येक रुग्णालयामध्ये प्रशिक्षित मेडिकल टेक्निशियन्सही गरजेचे असतात. त्यामुळे बी.एस्सी आणि एम.एस्सी मेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम २००५-०६ मध्ये सुरू केला. ‘सिंबायोसिस’ने फक्त वैद्यकीय महाविद्यालयाला प्राधान्य दिले नाही, तर त्याला आवश्यक असणाऱ्या अन्य सुविधा देणारा कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग घडविण्यावर भर दिला. मी आणि डॉ. राजीव येरवडेकर दोघेही डॉक्टर असल्यामुळे आम्हाला या क्षेत्रातील गरजा काय आहेत याची माहिती आहे. संस्थेने एखाद्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचे तातडीचे उपचार आवश्‍यक असल्यास रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वी ‘प्री हॉस्पिटल क्रिटिकल केअर’ शिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू केले. ‘आरोग्य कौशल्या’वर सर्वाधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्राला गरज असलेले रोजगारक्षम मनुष्यबळ विकसित करणे शक्य होत आहे. पुढील काही वर्षे हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अधिक सक्षमपणे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

राष्ट्रीय धोरणात स्थान

देशात नामांकित, दर्जेदार शिक्षण देणारी विद्यापीठे असताना केवळ ४७ हजार परदेशी विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात. त्याउलट तब्बल दहा लाख भारतीय विद्यार्थी परदेशी विद्यापीठांमध्ये शिकत आहेत. व्यावसायिक आणि परराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे शिक्षण घेण्यासाठी आले पाहिजे. हे का होत नाही? हे कसे वाढविता येईल? यावर नवीन धोरणात लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे संशोधनाची कुवत आहे. उच्चशिक्षित प्राध्यापक आहेत. तर दुसऱ्या बाजूला युरोप, अमेरिका असो जिथे संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाते, अशा विद्यापीठांसमवेत एकत्रित येऊन संयुक्त संशोधन प्रकल्प, अभ्यासक्रमाची आखणी आपण करू शकतो का, हेपाहायला हवे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समित्या स्थापन केल्या असून त्यात माझाही समावेश आहे. या समितीद्वारे आंतरराष्ट्रीय शिक्षण संयुक्तिक पदवी कशी देता येईल यावर भर दिला जात आहे.

समाजाचे देणे…

विद्यापीठाच्या आवाराच्या आजूबाजूला असलेल्या समाज घटकाला विद्यापीठाचा काय उपयोग होऊ शकतो, या विचारातून ‘स्कोप’ (सिंबायोसिस कम्युनिटी आऊटरिच प्रोग्रॅम ॲण्ड एक्सटेन्शन) ही संकल्पना उदयास आली. जगभरातील मोठ-मोठी विद्यापीठे ‘कम्युनिटी आऊटरिच’ उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबवितात. ही संकल्पना आपल्याकडेही असावी, या उद्देशानेसिंबायोसिसने काही वर्षांपूर्वी ‘स्कोप’ उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत लवळे येथील सिंबायोसिस संस्थेच्या आवाराच्या आजूबाजूला असणाऱ्या २३ खेड्यांना दत्तक घेण्यात आले. त्यात ‘मोबाईल मेडिकल युनिट’ चालविले जाते. गावातील नागरिकांना विनामूल्य आरोग्य तपासणी, आरोग्य सेवा दिली जाते. या खेडेगावातील शाळा देखील संस्थेने दत्तक घेतल्या आहेत. गावातील घनकचरा व्यवस्थापनावर काम केले जात आहे. तसेच या गावांमधील गरजू मुलींना अभियांत्रिकी, कॉम्प्युटर सायन्स, नर्सिंग, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा त्यांच्या आवडत्या क्षेत्रातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी साधारणत: सात ते आठ मुलींच्या संपूर्णशिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते.

ध्येय शिक्षणातून ‘वसुधैव कुटुंबकम्’च

संस्थापकाला संस्थेचा सुवर्णमहोत्सव पाहायला मिळणे याच्याइतका आनंद कुठलाच नाही. हे भाग्य सर्वच संस्थापकांना मिळतंच असं नाही. आज मागे वळून पाहताना मन कावरे-बावरे होते. पन्नास वर्षांतील अनेक प्रसंग, घटना, अडी-अडचणी, अवमान, अपमान, मान, भय, पराजय, आनंद आठवतात. अगदी जसेच्या तसे. मनात नको तेवढी गर्दी करतात. यांना शिस्त लावून सुसंगत शब्दांत मांडणी करणे अवघडच नव्हे तर केवळ अशक्य होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार (संस्थापक-अध्यक्ष)

पर्व पहिले

मी वयाच्या २७ व्या वर्षी फर्ग्युसन महाविद्यालयांत वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील एका छोट्या बंगल्यामध्ये आमचं छोटं कुटुंब राहत होतं. बंगल्याच्या शेजारी मुलांचं वसतिगृह होतं. प्राचार्यांनी वसतिगृहाचा रके्टर म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. अधून-मधून वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांना भटणं, कुणी आजारी असेल त्यास त्यांची विचारपूस करणं, त्याच्या औषध-पाण्याची वसतिगृहाच्या डॉक्टरांना विचारून सोय करणं, रोज रात्री विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहणं, अशी जुजबी कामं मला दिली. १९६९ मध्ये दिवाळीच्या दिवसांत एक घटना घडली आणि तिनं माझ्या आयषु्याला कलाटणी दिली.

दिवाळीच्या सुट्या सुरू होत्या. या सुट्टीत एक मुलगी वसतिगृहाच्या खिडकीतून आत काही तरी देत असल्याचं दिसलं. ते पाहून मी अवाक झालो आणि त्या खोलीत गेलो. तेथे मॉरिशअसमधील सखाराम हा विद्यार्थी राहत होता. खोलीत गले्यावर पाहिलं, तर त्याला कावीळ झाली होती आणि त्याची बहीण त्याला दोन वळचे जेवण आणून देत होती. या परदेशी विद्यार्थ्यांच्या अश्रुनी माझ्या मनात अनुकंपांचे बीज रोवले गेल. त्यांच्या अश्रुनी माझ्या आयषु्याला कलाटणी मिळाली. त्यावळी मी महाविद्यालयात शिकवत होतो. तसंच पुणे विद्यापीठात अभिसभेवर देखील होतो. पुण्यात आफ्रिका, आखाती देश, थायलंड, व्हिएतनाम अशा ३२ देशांमधील जवळपास ८०० त ८५० परदेशी विद्याथी शिक्षण घेत होते. मी या विद्यार्थ्याशी संवाद साधायला सरवात केली. मग या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना सरुक्षित वाटावं म्हणून संस्था काढायचं ठरवलं. भिन्न प्रजाती एकत्र यऊन होणारी वाढ असे सहजीवन म्हणजे ‘सिंबायोसिस’ ही मूळ जीवशास्त्रातील व्याख्या. हेच नाव संस्थेला द्यायचं ठरवलं. २६ जानवारी १९७१ मध्ये ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रा’चं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पाला अनेकांनी सकारात्मकता दर्शविली. मात्र तत्कालीन बांधकाम व्यावसायिक अतुल संगतानी, उद्योगमहर्षी ज. आर. डी. टाटा यांच्यासह काही उद्योजकांनी आर्थिक हातभार लावला आणी संस्थेच्या उभारणीचं भूमिपूजन झालं. मुला-मुलींचं वसतिगृह, असेंब्ली हॉल, हले्थ केअर सेंटर आणी कॉमन किचन अशी इमारत १९७६ मध्ये पुर्ण झाली.

पर्व दुसरे

देशातील आणि परदेशातील विद्यार्थी एकाच वर्गात एकत्रित शिक्षण घेतील, या उदधेशानं शैक्षणिक संस्था सुरु करण्याचा निश्चय केला. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रातील विधी महाविद्यालय सुरू केलं. त्याकाळी पुण्यात आय.एल.एस हे एकमेव विधी महाविद्यालय होते. महाविद्यालयात केवळ सकाळच सत्रे होते. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि अन्य विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रातील महाविद्यालयात शिक्षण घेता येत नव्हतं म्हणून महाराष्ट्रातील पहिले दोन सत्रातील विधी महाविद्यालय ‘सिंबायोसिस’नं सुरु केलं. त्यानंतर व्यवस्थापनशास्त्र, संगणक, कला व वाणिज्य अशी विद्यापीठाशी (अर्थात, तत्कालीन पुणे विद्यापीठ) संलग्न महाविद्यालयं सुरु केली. ‘सिंबायोसिस’ने संस्कृतीक केंद्रातून शैक्षणिक संस्थेकडं वाटचाल सरू केली.

संस्थेची व्याप्ती दिवसागणिक वाढत होती. तोपर्यंत मी फर्ग्युसन महाविद्यालयात नोकरी करत होतो. आता २२ वर्षे करत असलेली नोकरी आणि ‘सिंबायोसिस’ संस्था चालवणं अशा दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं. माझ्या कौंटुबिक आयषु्यात आणि संस्थेच्या उभारणीत मोलाची साथ देणारी माझी सहचारिणी संजीवनी मुजुमदार हिच्याशी चर्चा केली आणि मोठ्या धाडसानं नोकरीचा राजीनामा देऊन संस्था चालविण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आणि विविध समित्यांच्या सभासदत्वाचा मी राजीनामा दिला. त्यावेळी ‘सकाळ’सह अन्य वर्तमानपत्रांनी माझ्या राजीनाम्याची मोठी बातमी केली होती. त्यानंतर संस्थेचा पुर्णवेळ संचालक झालो आणि ‘‘सिंबायोसिस माझा श्वास झाला.’’

१९९६च्या दरम्यान भारती विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. २९ डिसेंबर २००२ मध्ये ‘सिंबायोसिस’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठ’ झालं. आता विद्यापीठाच्या कक्षेचा विस्तार करणं आवश्यक होतं. म्हणून बंगळूर, हैदराबाद, नोएडा, नाशिक, नागपूर येथे जागा घेतल्या आणि संस्था सुरु केल्या. त्याशिवाय आधी सुरु केलेल्या ६-७ संस्थांना विद्यापीठाशी संलग्नित करुन घेतले. लवळे येथील जागेची निवड करुन ३५० एकरमध्ये विद्यापीठाचे आवार विकसित केले. हे करत असताना दुसरीकडे सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबडकर स्मारक व संग्रहालय, अफ्रो एशियन कल्चरल म्युझियम अशा संस्था सुरु केल्या. ‘आनंदी गोपाळ’ चित्रपट पाहिला आणि त्यातून मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर ‘सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाची’ स्थापना करण्यात आली.

पर्व तिसरे

‘सिंबायोसिस’ने आता पर्यंत सांस्कृतिक केंद्र – शिक्षण-विद्यापीठ-आरोग्य सवुिधा या दिशेनं वाटचाल केली. आता भारतीय शिक्षणानं विश्वाची झेप घ्यावी, किंबहुना शिक्षणाचं वैश्विकिकरण करायला हवं, यादृष्टीनं पुढील काही (पाच ते पंधरा) वर्षे वाटचाल करण अेपेक्षित आहे. आपल्या देशात बुद्धीमत्ता असूनही एकही जागतिक दर्जाचं विद्यापीठ नाही. त्यामुळे आता विद्यापीठ म्हणून केवळ संख्यात्मक वाढीकडे न पाहता गुणात्मक शिक्षणावर भर देणे आवश्‍यक आहे. ‘सिंबायोसिस’ जागतिक स्तरावर ठसा उमटवत आहे. परंतु आता शिक्षणातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ साध्य करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ‘सिंबायोसिस’ पुढील वाटचाल करल.

‘सिंबायोसिस’ शिक्षण संस्थेची वाटचाल

  • सिंबायोसिस संस्थेची स्थापना : १९७१
  • सिंबायोसिसच्या एकूण संस्था आणि विभागांची संख्या : ७९.
  • सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ म्हणून २००२ मध्ये मिळाला दर्जा.
  • व्हीजन : गुणवत्तापूर्ण शिक्षणातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण.
  • विद्यापीठात – ३७ कॉन्स्टिट्एंट, ११ डिपार्टमेंट्स ऑफ स्किल्स अँड कॅन्टीनुइंग एज्कयुेशन, ९ सपोर्ट डिपार्टमेंट्स, ७ रिसर्चसेन्टर्स.
  • संस्थेचे पुण्यातील “कॅम्पस”- सेनापती बापट रस्ता, लवळे, मॉडेल कॉलनी, विमान नगर, खडकी, हिजेवाडी.
  • संस्थेचे पुण्याबाहेरील कॅम्पस: नाशिक, नागपूर, बंगळूर, हैदराबाद, नोएडा.
  • सामंजस्य करार : देशान्तर्गत ३२ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ७० पेक्षा अधिक.
  • पूर्णवेळ अभ्यासक्रम ११० पेक्षा अधिक.
  • ८५ पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी घेत आहेत शिक्षण.
  • प्राध्यापक संख्या- १३०० पेक्षा अधिक.
  • शिक्षकेतर कर्मचारी- सुमारे ३ हजार.
  • एकूण विद्यार्थी संख्या- जवळपास ४४ हजार

काय म्हणतात परदेशी विद्यार्थी…

भारत सरुक्षित आणि वैविध्यपुर्ण संस्कृती असणारा देश असल्याची अनभूती मला जगातील एका उत्तम असणाऱ्या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठान देिली. विविध देशातून येणार्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार हे विद्यापीठ आहे. विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर मी पुन्हा युगांडाला परतलो आणि माझ्या देशात एक यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे.

– जजूंजू इब्राहिम, युगांडा

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठ ही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांतून शिक्षण देण्याचा उद्देश ठेवून कार्यरत असणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्या-त्या क्षेत्रातील प्रात्यक्षिकांचा अनुभव आणि औद्योगिक भेटी घडवून आणत सक्षम बनविणारे हे विद्यापीठ आहे. मला एक व्यावसायिक म्हणून घडविण्यासाठी सिंबायोसिस अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर्व सुविधा पुरविल्या. घरापासून दूर राहूनही घरात राहण्याचा अनुभव या ठिकाणी मला आला.

– सोनम देकी, भुतान

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठात शिक्षण घेत असल्याचा मला आनंद आहे. अफगाणिस्तान सरकारच्या शिष्यवृत्तीच्या सहकार्याने मी २०१५ मध्ये बीसीए करण्यासाठी विद्यापीठात आले. आता एमबीए पूर्ण केले आहे. सिंबायोसिसतर्फे शिष्यवृत्ती मिळणाऱ्या काही मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश आहे. माझ्यासारख्या सामान्य मुलीला वैश्विक नागरिकामध्ये परावर्तित करण्यात ‘सिंबायोसिस’ची भूमिका मोलाची आहे.

– हबिबा हुस्सैनी, अफगाणिस्तान

English