विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला ‘सतत प्राधान्य देणारी ‘सुर्यदत्त’

एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा, मनाचा व आत्म्याचा सर्वांगीण विकास म्हणजेखऱ्या अर्थाने शिक्षण असेराष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात. सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत ‘सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ याच तत्त्वावर विश्वास ठेवते. या संस्थेचे मार्गदर्शक सिद्धांत अनेक करिअरचे मार्ग सांगतात. शिक्षणाचा उपयोग केवळ पदवी व नोकरी मिळवण्यासाठीच आहे, या संकुचित मानसिकतेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यावर संस्था भर देते. संस्कृती, उत्कृष्टता, श्रद्धा, निष्ठा, देशभक्ती, सर्जनशीलता, क्रियशीलता, कौशल्यविकास, मानवी मूल्ये, संवाद, नाविन्यता अशा विविध मूल्यांवर संस्था कार्यरत आहे.

सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत १९९९ मध्ये सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची स्थापना झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी स्व-प्रवृत्त व्यवसाय व्यवस्थापक आणि उद्योजक विकसित करण्याच्या उद्देशाने अनेक इन्स्टिट्यूट्सचा समूह असलेली ही संस्था आहे. केजी टूपीजी म्हणजेच अगदी शाळेपासून, महाविद्यालय, भल्या मोठ्या शैक्षणिक संस्था असा सुर्यदत्त ग्रुपचा विस्तार आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम, इंटिरिअर अँड फॅशन डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, फिजिओथेरपी, ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ अँड फिटनेस, परफॉर्मिंग आर्टस्, मास कम्युनिकेशन, ॲनिमेशन अशा विविध शाखांमधील नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमउपलब्ध आहेत.

समकालीन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रेरणेतून उच्च दर्जाचे संशोधन, कौशल्याधारित प्रशिक्षण, औद्योगिक क्षेत्राच्या सध्याच्या गरजा लक्षात घेऊन जवळपास ३० इन्स्टिट्यूट्सची स्थापना सुर्यदत्त ग्रुपनेकेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेली दोन दशके एकनिष्ठपणे ही संस्था कार्यरत आहे. यातील १५ हुन अधिक इन्स्टिट्यूट्स सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट्स ऑफ सोशल सायन्स, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यासह विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असलेल्या संस्थांशी संलग्न आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), राज्य सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्रालय) मान्यता दिली आहे. संस्थेला आयएसओ ९००१: २०१५, एनव्हीटी-क्यूसी, एएनएबी आणि आयएएफची मान्यता आहे. एआयसीटीई-सीआयआय उद्योग तांत्रिक संस्थांशी जोडलेल्या क्रमवारीत संस्थेनेसलग सहा वर्षे रौप्य श्रेणीत स्थान मिळवले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत ७० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेअसून तेराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत

५० हून अधिक संस्थाशी झालेला सामंजस्य करार :

अध्यापन शास्त्रात वेगानेहोत असलेल्या बदलांचा वेध घेत संस्नेथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केलेआहेत. ऑलइंडिया मॅनेजमेंट असोसिएशनशी सहकार्य करार केला आहे. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एआयएमए बिझलॅब’ ही लॅब उभारली आहे. तसेच केब्रजिं इंग्लिश असेसमेंट, आयआयएमबीएक्स, हार्वर्ड बिझनेस स्कूल ऑनलाइन, हार्वर्ड बिझनेस पब्लिशिगं , लंडन ॲकॅडमी ऑफ प्रोफेशनल टन्रेिगं, असोसिएशन ऑफ इंटर्नल कंटरो्ल प्रॅक्टिशनर्स, रिस्क मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ इंडिया, लिंकन युनिव्हर्सिटी (मलेशिया), टीसीएस आयॉन, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, कलाम सेंटर अँड आविष्कार लॅब्स, इंडियन सायबर आर्मी, बायजजू अशा बऱ्याच संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत.

suryadatta-img-7

उत्कृष्ट प्समेंट रेकॉर्ड :

संस्थेच्या स्थापनेपासनचू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातनू विद्यार्थी भारतात तसेच परदेशातही अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत. बीएफएसआय, ई-कॉमर्स, रिटलिेगं, आयटी, आयटीईएस, हॉस्पिटलिटी अशा विविध क्षेत्रात विद्यार्थी आपले उत्तम करिअर करत आहेत. सुर्यदत्त संस्थेने अनेक कंपन्यांसोबत करार केले आहेत. संस्थेशी सातशेहून अधिक कंपन्या संलग्न असून जास्तीत जास्त प्लेसमेंट होते. दोन दशकांहून अधिक काळात गणुवत्तापूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडलेले जवळपास ७० हजार विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान, दुबई, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, आफ्रिकन देशांत माजी विद्यार्थी आहेत. संस्तथे सक्रिय प्लेसमेंट व माजी विद्यार्थी विभाग आहे.

इंडस्टी-इन्स्टिट्यूट्स इंटरफेस :

संस्थेमध्ये यरोजगाराभिमुख विद्यार्थ्यांसाठी ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट्स इंटरफेस’ वर अधिक भर दिला जातो. सातत्याने उद्योगांना भेटी, सेमिनार्स, अभ्यागत व्याख्याने, शैक्षणिक सहली, प्रकल्प, चर्चासत्रे, विविध स्टुडंट चॅप्टर्स आदी उपक्रम सुरु आहेत. उद्योगातील तज्ज्ञ आणि मान्यवर मंडळी संस्थेच्या सल्लागार मंडळावर आहेत. नियमित स्वरूपात त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवनू आणला जातो. त्यातनू विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळतोच; शिवाय उद्योगांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळण्यास मदत होते. याशिवाय, उद्योगांतील नोकरदारांना उच्च शिक्षण घेऊन त्यांचे करिअर आणखी वरच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी सुर्यदत्तमध्ये नोकरदारांना गेल्या नऊ वर्षांपासनू शिष्यवृत्ती दिली जाते. जागतिक करियरसाठी ‘ग्लोबल फोकस’ सुर्यदत्त संस्थेत शिकणेही एक पर्वणी असते. जागतिक दर्जाचे गणुवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण येथे दिले जाते. जगभरातील असलेल्या करियरच्या संधीचा अंदाज घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी कौशल्याचे प्रशिक्षण येथे उपलब्ध आहे. संस्थेत पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे आयोजन झाले. त्यामध्ये स्लोव्हेनिया, नेदरलँड, होंडुरास, फ्रेंच रिपब्लिक, झेक प्रजासत्ताक, आफ्रिका आदी देशांतून प्रतिनिधी सहभागी झाले होते.

उद्योजकता केंद्र :

संस्थेत स्वतंत्र उद्योजकता केंद्र उभारले असनू त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिलेजाते. त्यासाठी योग्य मारद्ग र्शन, व्याख्यानेव वरिष्ठांकडून प्रकल्प आयोजिलेजातात. त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुरवली जाते.

हरित व पर्यावरण प्रेमी कॅम्पस

प्रशस्त, स्वच्छ कॅम्पसमध्ये आरोग्यदायी आणि शैक्षणिक वातावरण हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. संस्थेत शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समकालीन आणि ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानातभर पडत आहे.

इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर :

विद्यार्थ्यांतील उद्यमशीलतेला चालना देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी संस्तथे स्टार्टअप संस्कृती रुजवली जात आहे. त्यासाठी इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर उभारलेआहे. आयमा बिझ लॅब, इनोव्हेशन नेक्स्ट लॅब, एआय लॅब यांसारख्या संस्थांतील उद्यमशील व तज्ज्ञ व्यक्तींना बोलावनू विद्यार्थ्यांना मारद्ग र्शन केलेजाते. विविध सत्रे डिझाईन थिकिंग कार्यशाळा, व्यवसाय कल्पनांवर चर्चा, विविध उपक्रम राबविले जातात.

संस्कृतीतील वैविध्य जपण्याचा प्रयत्न :

फिलिपिन्स, इजिप्त, सिगंपूर युएई, नायजेरिया, सुदान, इथिओपिया, नेपाळ, थायलंड अशा ३० पेक्षा अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक परदेशी विद्यार्थी सुर्यदत्त संस्तथेनू उत्तीर्ण झालेआहेत. सुर्यदत्त इंटरनॅशनल एज्युकेशनल कल्चरल सेंटरच्या माध्यमातनू परदेशी विद्यार्थ्यांना
पुण्यात सहकार्य केले जाते.

‘सुर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ने दिग्गजांचा सन्मान :

संस्थेला आजवर पाचशेहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. प्रत्येक वर्षी संस्थेच्या स्थापना दिवशी ‘सुर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केलेजातो. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव योगदान देणाऱ्या महान व्यक्तींना सन्मानित केले जाते. यात पंडित भीमसेन जोशी, योगाचार्य डॉ. बीकेएस अय्यंगार, अभिनेते अनुपम खेर, शिव नाडर, शहनाज हुसेन, किरण बेदी, मोहन धारिया, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अनेक विक्रमांनी गवसणी :

संस्थेने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामध्ये ‘अनफोल्डहिडन पोटेशियल थ्रू ब्लाईंडफोल्ड’ आणि ‘२४ अवर्स सायलेंट रेडेथॉन’ या संस्थेच्या उपक्रमांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. तर ११०० तुळशीच्या रोपांनी भारताचा नकाशा तयार करण्याचा आणि ‘काव्याथॉन २०१९” या कार्यक्रमाचीही नोंद वर्ल्ड रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ‘सुर्यदत्त-विष्णू महामिसळ-२०२१’ महोत्सवाने गिनीज, लिम्कासह अन्य रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळवले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती :

सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनेएज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवत्ता आणि आर्थिक निकषांवर आधारित विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यंदाच्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना जवळपास दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. तसेच, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या नावाने १३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि ‘राज्यघटना व भारतीय मूल्ये’ यावर क्रेडिट कोर्स सुरु केला आहे.

सामाजिक उपक्रमांत अग्सर :

दिवंगत रत्नाबाई आणि बन्सीलालजी चोरडिया यांच्या प्रेरणेतनू संस्नेथे अनेक सामाजिक उपक्रम सुरु केलेआहेत. ‘सुर्यदत्त एज्यु सोशियो कनेक्ट इनिशिटीव्ह’अंतरत्ग कौशल्य विकासाचे कार्यक्रम, जागृतीपर उपक्रम, गरजूंसाठी मोफत शिक्षण अशा उपक्रमांचा समावेश आहे. फूड बँक, क्लोदिग बँक, नॉलेज बँक अशा विविध उपक्रमांतनू सामाजिक योगदान देत आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना, तसेच नोकरदारांना शिष्यवृत्ती देऊनत्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

कोर्सेसची माहिती

  • सुर्यदत्त नॅशनल स्कूल (एसएनएस)
  • सुर्यदत्त ज्युनिअर कॉलेज (एसजेसी), सुर्यदत्त पब्लिक स्कूल (एसपीएस)
  • सुर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी
  • सुर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्व्हल टूरिझाम
  • सुर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी
  • सुर्यदत्त इन्स्टिट्यूटस् ऑफ मॅनेजमेन
  • पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नोलॉजी
  • सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
  • सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ व्होके शनल अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज
  • सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्
  • सुर्यदत्त रिसर्च सेंटर
  • करिअर मार्गदर्शनासाठी आपले नाव, शहर आणि अभ्यासक्रमासह ९८८१४९००३६ या क्रमांकावर संपर्क करावा.
  • प्रवेशासाठी ८९५६९३२४१९/१७/९७६३२६६८२९ या क्रमांकावर संपर्क साधावा
  • अधिक माहितीसाठी: www.suryadatta.org भेट द्यावी.

संकल्पना निर्मितीकार : डॉ. संजय चोरडिया

सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि चेअरमन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हेआहेत. वरिष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे. उत्तम व्यवसाय प्रशिक्षक, इनोव्हेटर आणि संकल्पना निर्मितीकार, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी व्यक्ती आहेत. तत्कालीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यथूेन त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिगं ची पदवी घेतली आहे. तसेच मार्टिकेग मॅनेजमेंट, मटेरिअल मॅनेजमेंट,इंडस्ट्रिअल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयांत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेआहे. तर पर्यावरण शास्त्रात त्यांनी पीएच. डी केली आहे.

जागतिक स्तरावरील २५ हून आधिक नामांकित विद्यापीठांना डॉ. चोरडिया यांनी आजवर भेटी दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय लीडरशिप प्रोग्मरॅ ऑन हायर एज्युकेशन मध्ये सहभागी होत त्यांनी उच्च शिक्षण घेतलेआहे. अनेक शासकीय समित्यांवर, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांचेतेसक्रिय सभासद आहेत. शिक्षण, अध्यात्म, सामाजिक कार्य व विश्वशांतीसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल विविध नामवंत संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेआहे. कॅबिनेट मंत्री एचई करण सिग याच्या हस्ते रामकृष्ण विवेकानंद इंटरनॅशनल ॲवॉर्ड, एआयसीटीईचे व्हाइस चेअरमन पुनिया यांच्या हस्ते ‘आस्मा ॲवॉर्ड’, २०१८ मध्ये टाइम्स पॉवरमेन ऑफ द इयर ॲवॉर्ड, टॉप मॅनेजमेंट ऑफ कन्सोर्टियम ॲवॉर्ड, अल्युमिनि ऑफ सीओईपी ॲवॉर्ड, लायन्स क्लब सेंटेनरी ॲवॉर्ड, रोटरी पॉल हॅरिस फेलोशिप यांसह अन्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

नवी दिल्लीतील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्चचे (सीईजीआर) राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून डॉ. चोरडिया यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यांना आयएमसी माईलस्टोन मेरिट ॲवॉर्डने कस्टमर फोकस कॅटगेरीसाठी पुरस्कार दिला आहे. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टरी्जच्या वतीनेहा पुरस्कार देण्यात आला. डॉ. चोरडिया यांनी २०२०-२१ या वर्षांत ५०हुन अधिक स्टार्टअप स्थापन केले आहेत.

संस्थेचे भक्कम आधारस्तंभ

असलेल्या सुषमा चोरडिया सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव आहेत. सुर्यदत्तमध्ये जागतिक स्तरावर दर्जेदार शिक्षणाची केंद्रे बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशासन, अर्थविभाग, सांस्कृतिक उपक्रम विभाग प्रमुख म्हणून त्या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहेत. त्यांच्यातील कामाची तळमळ, इच्छाशक्ती आणि समर्पण भावना विद्यार्थ्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान देऊन जाते. सर्वसामान्यांना परवडेल अशापद्धतीचे गणुवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ‘सुर्यदत्त’ कार्यरत आहे.दर्जा, मलू्ये आणि कौशल्यांचा आधार येथील शिक्षणाला आहे. शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम संस्थेत राबविण्यात येतात. चांगलेआणि सर्वांगीण विकासाचेउपक्रम राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. संस्तीलथे सर्व कर्मचारी, विद्यार्थी आणि संस्शी थे संबधिं त लोकांचेजीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असते. दर्जेदार शिक्षण सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध झाले, तर विद्यार्थ्यांचा, कुटुंबियांचा, समाजाचा आणि पर्यायानेदेशाचा विकास होणार आहे. त्यादृष्टीने संस्था कार्यरत आहे.

– सुषमा चोरडिया,
उपाध्यक्षा सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स : व्यवस्थापन समिती

या संस्तथे शिकणेही नियमित प्रक्रिया आहे. सध्याच्या जागतिक पातळीवरील गरजा लक्षात घेत दर्जेदार विद्यार्थी आणि रोजगाराभिमुख, उद्यमशील तरुणांना घडविण्याचेकाम संस्थेमार्फत केले जात आहे.

– सिद्धांत चोरडिया,
कार्यकारी विकास अधिकारी, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्

परिणामकारक शिक्षण देणाराहा केवळ विद्यार्थ्यांच्या बाबतीत समर्पित असण्यापुरता मर्यादित असू नये, तर एकूणच शिक्षकी पेशाबाबतही त्याच भावना असायला हव्यात. व्यावसायिक वचनबद्धता तुम्हाला तुमच्या कार्याच्या श्रेष्ठते कडे घेऊन जाते.

– प्रा. स्नेहल नवलाखा,
संचालिका, फॅमिली मॅनेज्ड बिझनेस अँड इंटरनॅशनल रिलेशन विभाग

एका निरोगी मनाला निरोगी शरीराची नितांत गरज असते, यावर आमचा दृढ विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीवर अधिक भर देतो. ‘सुर्यदत्त’मध्ये व्यसनमुक्ती चळवळ राबविली जाते. त्यातून आम्ही सामाजिक बांधिलकीची भावनाही जपतो.

– डॉ. किमया गांधी,
संचालिका, सुर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ सायन्स

English