संतवचनांचेवाचन, पठन मनन करत असताना ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे काम शिवसमर्थ परिवार करत आहे. 15 ऑगस्ट, 2006 रोजी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली आज शेकडो संसार गुण्यागोविंदानेनांदत आहेत. अॅड. बोत्रे यांनी शिववसमर्थपरिवार ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून जोडलेलेखातेदार, ठेवीदार यांचेसह संस्थेमध्ये/घटक संस्थेत काम करणारा कर्मचारी हा केवळ कर्मचारी न राहता तो आपल्या कुटूंबाचा भाग आहेअसेसमजलेजाते. यामुळेसर्व घटक सुखदुखात सहभागी होतात. हेवेगळेपण आहे. आज कार्पोरेटच्या जगतात केवळ पैसा किंवा भौतिक सुविधांकडेलक्ष देत असताना मानवाची नैतिक मुल्ये जपण्याचेकाम सर्वार्थानेसंस्थेेच्या माध्यमातून केले जाते.
‘‘सामर्थ्य आहेचळवळीचेजो जो करील तयाचे, परंतूतेथेभगवंताचेअधिष्ठान पाहीजे’’ हेब्रीद वाक्य घेवून संस्था वाटचाल करत आहे. या ब्रीद वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ कृतीत आणण्याचे काम शिवसमर्थपरिवारात केलेजात आहे.
अँड. जनार्दन बोत्रे यांचा जन्म पाटण तालुक्यातील काढणे येथे आजोळी आई स्व. सौ. पार्वती बोत्रे आणि वडील स्व. लक्ष्मण कोंडाजी बोत्रे यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुढे, माध्यमिक शिक्षण तळमावले येथेल श्री वाल्मिकी विद्यामंदीर तळमावले येथेल विद्यालयात झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी इतरां प्रमाणे मुंबई गाठली. मुंबई या ठिकाणी ‘कमवा व शिका’ या तत्वाचा जीवनात वापर करुन मुंबई येथेल सिद्धार्थकाॅलेजमध्ये आपली वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर हे करत असताना त्यांनी बांद्रा येथे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात शासकीय नोकरीस प्रारंभ केला. तसेच दोन वर्षे मुंबई येथे वकीली केली परंतूसहकारातील वाढत्या जबाबदारीमुळेत्यांनी पूर्ण वेळ सहकार क्षेत्र व आपल्या संस्थेकडे दिले. सदर नोकरी करत असताना समाजसेवा व सहकारात काम सुरु होते तसेच पुढील शिक्षण घेत त्यांनी जी.डी. सी.अँण्ड.ए आणि एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली.
कालांतराने त्यांनी शासकीय नोकरीत 25 वर्षे घालवून नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ सहकार क्षेत्र निवडले. त्यांनी सहकार्याचा हात पुढेकरत अनेकांचेसंसार फुलवण्याचेकाम केले आहे. हेकरत असताना समाजाविषयी असणारी प्रचंड तळमळ आणि आस्था त्यांना गप्प बसूदेत नव्हती. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात सुरवात केली. अँड.जनार्दन बोत्रे यांनी मुंबई सारख्या ठिकाणी तीन दशकेसहकारात वाहून घेवून अनेक सहकारी संस्था मोठया केल्या आहेत.
विभागामध्ये कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो जळीत ग्रस्त असो अथवा कोणतेही संकट असो. त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करत आपल्यालाही काही मदत करता येईल याचा ते विचार करतात. मग त्यासाठी पदर मोड झाली तरी त्याचा अँड. बोत्रे साहेब कधीही विचार करत नाहीत.