रूग्णसेवेचे / आरोग्यसेवेचे माणिक – रूबी हॉल क्लिनिक

रूग्णसेवेचा वसा घेतलेल्या ध्येयवादी डॉ. के. बी. ग्रांट यानी पुण्यात जगभरातील उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या अथक प्रयत्नांतून साकारलेले रूबी हॉल क्लिनिक जगातील जागतिक दर्जाचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते.

डॉ. के. बी. ग्रांट यांची दूरदृष्टी

1959 साली जनरल डेव्हिड ससून यांच्या मालकीच्या एका बंगल्यामध्ये फक्त दोन खाटांसह वैद्यकीय सेवा सुरू केली. आज याच जागी त्यांच्या स्वप्नाचे परिवर्तन 800 बेडससह जागतिक दर्जाच्या मोठ्या रूग्णालयात झाले. पुण्यातील ससून रोडवर असलेल्या मूळ रुबी हॉल क्लिनिकसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या हिंजवडी आणि वानवडी भागातील हॉस्पिटल्स अशा एकूण तीन हॉस्पिटल्समध्ये आता 900 खाटांची क्षमता आहे. जवळपास 4000 लोक इथे काम करतात. देशातील अनेक नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ या हॉस्पिटलशी जोडलेले आहते. आज इथे सर्व प्रकारच्या स्पेशालिटी उपचारांची सुविधा आहे. उपचारच नव्हेतर आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणे इथे उपलब्ध आहे. पश्चिम भारतातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल म्हणून रुबी हॉल क्लिनिक ओळखले जाते.

वैद्यकीय क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व

डॉ. के. बी. ग्रांट यांनी ह्रदयरोग तज्ज्ञ म्हणून पुण्यात सेवेला सुरुवात केली. रुग्णसेवा हाच त्यांच्या जीवनाचा उद्श दे होता. फक्त पुण्यापर्तयं त्यांनी आपली सेवा मर्यादित न ठेवता रुग्ण सेवेसाठी ते सातारा, सांगली, मिरज अशा त्यावेळी असलेल्या दूरवरच्या भागातही सतत फिरत असत. सकाळी 8 वाजता त्यांचे सुरू झालेले रात्री 11 वाजेपर्तयं सुरू असे. जवळपास 30 वर्षे अखंड त्यांचा हाच दिनक्रम होता. खेड्यापाड्यातल्या असंख्य रुग्णांना त्यांनी नवे जीवन दिले. शेवटच्या क्षणापर्तयं ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये येऊन रुग्ण सेवा करत होते. रूग्णालयाच्या कामकाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्यांचा सहभाग होता,मग त्यामध्ये दैनंदिन कामकाज असो, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधणे असो, त्यांच्या समस्या जाणून घेणे असो, प्रत्येक कामामध्येते सक्रीय असायचे. त्यांचे घर ते रूग्णालय असा प्रवास ते रोज पायी करत असत आणि कायमच ते या सक्रीयतेमुळे, आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीमुळे आणि कामकाजात तरूणांसारखा उत्साह असल्यामुळे तंदुरूस्त राहायचे. 4 जानेवारी 2011 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांची अद्वितीय वाटचाल आणि दिशादर्शक कामामुळे त्यांना एका नियतकालिकाने यंग मेडिकल आर्किटेक्ट म्हणून संबोधले होते.

रूग्णांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानावर भर

रूबी हॉल क्लिनिकने आपल्या 7 दशकांच्या अस्तित्वामध्ये नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधांवर भर दिला आहे.त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा पहिला मान अनेक वेळा रूबी हॉल क्लिनिकला मिळाला आहे. 1969 साली रूबी हॉल क्लिनिकने पुण्यात प्रथमच अतिदक्षता विभाग आणि हृदयचिकित्सा विभाग स्थापन केले. पुण्यातील पहिले मुत्रपिंड प्रत्यारोपण, पहिले हृदय प्रत्यारोपण, पहिले यकृत प्रत्यारोपण, पहिले टेस्ट ट्युब बेबी,पहिले पेट स्कॅन, सीटी स्कॅन/एमआरआय सुविधा, पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया आणि एअर अँबुलन्स यांसह अनेक सुविधा शहरात प्रथमच प्रस्थापित केल्या आहेत.

जागतिक दर्जाच्या आधुनिक सोयी-सुविधा

रूबी हॉल क्लिनिकमध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमध्येतीन कार्डियाक कॅथलॅब्स, कमलनयन बजाज कॅन्सर सेंटर हा कर्करोग उपचारांसाठी अद्ययावत विभाग, आधुनिक अतिदक्षता विभाग, पेडियाट्रिक मल्टीस्पेशालिटी सेंटर हा लहान मुलांसाठी चिकित्सा विभाग, पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव इन्स्टिट्युट ऑफ न्युरो सायन्सेस, कमलनयन बजाज न्युक्लिअर मेडिसिन सेंटर, कविता अँड गोपाल निहलानी सुपर स्पेशालिटी सेंटर, कल्याणी सेंटर ऑफ युरोलॉजी, रूपा राहुल बजाज सेंटर फॉर रोबोटिक एक्सलन्स, मदर अँड चाईल्ड केअर सेंटर, अद्ययावत आयव्हीएफ व एंडोस्कोपी विभाग, मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर, कार्डिआक सायन्सेस, सेंटर फॉर अडव्हान्स्ड ब्रेस्ट केअर, न्युक्लिअर मेडिसिन सेंटर, रेडिओलॉजी, अपघात व आपात्कालीन चिकित्सा, क्रिटिकल केअर मेडिसिन, न्युरो ट्रॉमा युनिट, न्युरोसायन्सेस, आर्थोपेडिक्स अँड जॉईंट रिप्लेसमेंट, डायबेटोलॉजी व एंडोक्रिनोलॉजी, व्हॅस्क्युलर केअर, नेफ्रॉलॉजी, बेरिअट्रिक अँड मेटाबोलिक सर्जरी, गॅस्ट्रोइंटेरोलॉजी, हेमॅटोलॉजी आणि कॉस्मेटिक व प्लास्टिक सर्जरी अशा अनेक बहुआयामी सुविधा आहेत. या सर्व सेवांमुळे एरवी गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या शहरांत किंवा परदेशी धाव घेणाऱ्या लोकांना येथे एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध आहेत.

व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी रूबी हॉल क्लिनिकचा विस्तार

रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी देश-विदेशातून रूग्ण पुण्यामध्ये येत असतात. त्यात पुणे शहराचाही मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे, हे लक्षात घेऊन रूबी हॉल क्लिनिकने वानवडी आणि हिंजवडी येथे शाखा सुरू केल्या असून मोठी रूग्णालये सुरू केली आहते. लवकरच पुण्याच्या पूर्व भागात अमेनोरा येथे नवीन रूग्णालय सुरू करण्यात येणार असून त्यापाठोपाठ सातारा येथे देखील रूबी हॉल क्लिनिकची शाखा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहते. महाराष्ट्रात 15 ठिकाणी जवळजवळ 22 आधुनिक निदान केंद्र रूग्णालयाने सुरू केली आहते, तसेच राज्यातील निमशहरी भागात छोट्या रूग्णालयांशी सहयोग करून व्हर्च्युअल क्लिनिक्स आणि ओपीडीद्वारे ग्रामीण भागातील लोकांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय पुण्याच्या पश्चिम भागातील उपनगरात राहणाऱ्या लोकांना सोयीस्कररित्या त्यांच्याच घराजवळ निदानाची सुविधा उपलब्ध व्हावी या हतेूने वारजे येथे डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

जागतिक दर्जाची रक्तपेढी

1 जानेवारी 1979 मध्ये प्रस्थापित झालेली रुबी हॉल क्लिनिकमधील रक्तपेढी ही शहरातील एनएबीएच ब्लड बँक मानांकन असलेली पहिली रक्तपेढी आहे. 24 तास 365 दिवस कार्यरत असणाऱ्या या रक्तपेढीमध्ये रक्त गोळा करण्यासाठी, प्रक्रियेसाठी व साठवण्यासाठी तसेच रक्त व रक्तगट गरजू रूग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान व उपकरणे आहेत. तज्ञ, कार्यकुशल कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेद्वारे गरजू रूग्णांना योग्य वेळेस, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रक्रियेद्वारे सेवा पुरविली जाते.

जागतिक नकाशावर पुण्याचे नाव

आज देशातूनच नव्हेतर जगभरातून असंख्य रुग्ण उपचारासाठी पुण्यात रूबी हॉल क्लिनिकमध्ये येतात. त्यामध्ये इराण, इराक, सीरिया, ओमान, आफ्रिकेतील देश यांसह अनेक देशातील रूग्णांचा समावेश आहे. जागतिक दर्जाची अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, निष्णात डॉक्टर्स, सेवाभावी कर्मचारी, आपुलकीची वागणूक आणि तुलनेने अत्यंत किफायतशीर खर्च यामुळे पूर्वी पाश्चात्य देशांकडे वळणारा रुग्णांचा ओघ आता भारताकडे वळला आहे. त्याचप्रमाणे देशातील लोकांनाही अनेक दुर्धर आजारांवरील उपचार इथेच उपलब्ध झाले आहेत. जागतिक स्तरावरील रूग्णांची केलेल्या सेवेकरिता रूबी हॉल क्लिनिकला केंद्र शासनाकडून भारतातील सर्वोत्कृष्ट मेडिकल टुरिझम सुविधा या पुरस्काराने गौरविण्यात आले.2011 या वर्षासाठी असलेला हा पुरस्कार राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. या सगळ्या बदलाचे श्रेय रुग्णसेवेचा वसा आयुष्यभर निभावणार्‍या डॉ. के. बी. ग्रांट यांच्यासारख्या साधकांचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या शहराचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळक करणाऱ्या या संस्थेबद्दल अभिमान वाटतो. रुबी हॉल क्लिनिकच्या या यशस्वी वाटचालीत डॉ. के. बी. ग्रांट यांचा वारसा निष्ठेनं चालवणारे त्यांचे पुत्र डॉ. परवेझ ग्रांट यांचाही मोठा वाटा आहे.

अद्ययावत कॅन्सर केअर युनिट

जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार केंद्र म्हणून रुबी हॉल क्लिनिकची ओळख आहे. इथे एका स्वतंत्र इमारतीत कर्करोग उपचार केंद्र म्हणजेच कनॅ्सर केअर युनिट असून, सर्व अत्याधुनिक उपचार यंत्रणा इथे आहते. रुबी हॉल क्लिनिकच्या कनॅ्सर केअर युनिटची ख्याती सर्वदूर पसरली आहे. परदेशातूनही रुग्ण इथे उपचार घेण्यासाठी येतात. अत्यंत दुर्मिळ कर्करोगावरही येथे यशस्वी उपचार करण्यात येतात.

पुण्यातील पहिले आयसीयू युनिट

कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आयसीयू युनिट हे अत्यंत महत्त्वाचे युनिट असते. अनेक नवीन गोष्टींचा पाया घालणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकने याबाबतीतही आपली आघाडी कायम राखली आहे. इथले जागतिक दर्जाचे आयसीयु युनिटही खास वैशिष्ट्य आहे. 25 पेक्षा अधिक वर्षे झालेले हे युनिट देखील डॉक्टर के. बी. ग्रांट यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देते. 1992 मध्ये डॉ. प्राची साठे यांच्या नेतृत्वाखाली हे युनिट सुरू करण्यात आले. या आयसीयू युनिटमध्ये कोणत्याही अती गंभीर रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अत्यावश्यक यंत्रणा, उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत अवघड शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची देखील या अद्ययावत युनिटमुळे आवश्यक ती काळजी घेतली जाते. या युनिटमध्ये प्रत्येक रूग्णाकरिता अत्यंत प्रगत साधने सज्ज आहेत. यामध्येव्हेंटीलेटर्स, सीआरआरटी, डायलिसीस, बीएलएस, एसीएलएस, ईसीएमओ अशा अनेक सुविधा आहेत. सुसज्ज कार्डीयाक अँम्ब्युलन्सही उपलब्ध आहे. या युनिटमध्ये असणाऱ्या काही सुविधा तर पुणे शहरात देखील तेव्हा पहिल्यांदा उपलब्ध झाल्या होत्या. या युनिटमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत. जागतिक दर्जाची उपकरणे, यंत्रणा, खास प्रशिक्षित कर्मचारी असलेल्या या युनिट ने रुबी हॉल क्लिनिकला वेगळी ओळख दिली आहे. 2009 मध्ये स्वाईन फ्ल्यू साथ आणि आता कोविड महामारीमध्ये या आयसीयु युनिटचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. या अद्ययावत अतिदक्षता विभागात 200 पेक्षा अधिक आयसीयू बेडसची सुविधा आहे.

कोविडच्या काळातील आव्हाने पेलताना

महामारीमुळे संपूर्ण जगातील आरोग्यसेवा यंत्रणेवर ताण पडला. रूबी हॉल क्लिनिकच्या सर्व डॉक्टर्स, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सर्व सीमारेषा ओलांडून रूग्णसेवेसाठी अथक प्रयत्न केले. नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊन इतर रूग्णांचे उपचार देखील सुरळीतपणे सुरू राहावेत, यासाठी प्रयत्न केले. इतका ताण पडत असताना खंबीर राहत नवनवीन तत्रांचा वापर करून जास्तीत जास्त रूग्णांवर उपचार केले गेले.

कॅन्सर सर्जरीचा पाया

आज कॅन्सर अर्थात कर्करोग हा शब्द सरसकट सर्वांना माहित झाला आहे; पण ज्या काळात भारतात सामान्य माणसाला कर्करोग ऐकून देखील माहिती असण्याची शक्यता नव्हती, अशा काळात म्हणजे 1965-75 च्या काळात डॉ. के. बी. ग्रांट यांनी कर्करोग शस्त्रक्रियांचा पाया घातला आणि उपचारांना प्रोत्साहन दिले. मेडिसिन आणि कार्डीओलॉजी बरोबर बाकीच्या सर्जिकल शाखा विशेषतः कर्करोग सर्जरीसारख्या विशेष सर्जरीजवर भर दिला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. त्या काळात मुंबई आणि मिरज सोडल्यास राज्यात कुठेही कर्करोगावर उपचार करण्यासाठी रेडिओथेरपी उपचार यंत्रणा कुठेही नव्हती. 1978 मध्ये पहिल्यांदा रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओथेरपीसाठी कोबाल्ट युनिट सुरू केले. कॅन्सरवर सर्जरी आणि रेडिओथेरपी अशा दोन्ही उपचार पद्धती रुबी हॉल क्लिनिकमध्ये सुरू झाल्या. औषधांद्वारे म्हणजे केमोथेरपीद्वारे जे उपचार केले जातात त्याची सुरुवात रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाली. नंतर साधारण दहा वर्षे या तीन पद्धतीद्वारे कर्करोगावरील उपचार होत राहिले. दरम्यान, डॉ. के. बी. ग्रांट यांच्या पत्नीला कर्करोग झाला. त्यावेळी पेट स्कॅन आदी तपासणीची गरज होती, पण पुण्यात कुठेच ती सुविधा उपलब्ध नव्हती.त्यामुळे वारंवार मुंबईला जावे लागे. त्या काळात डॉ. के. बी. ग्रांट यांना आपले कर्करोग उपचार केंद्र अजूनही परिपूर्ण नसल्याचे लक्षात आले. जगातील सर्वोत्तम उपचार यंत्रणा आपल्या हॉस्पिटलमध्ये असली पाहिजे अशी त्यांची भूमिका असे. त्यामुळे त्यांनी या विभागातील त्रुटी दूर करण्याचा चंग बांधला आणि यातूनच या कॅन्सर केअर युनिटची कल्पना पुढे आली. मेडिकल आँन्कोलॉजी, कोबाल्ट युनिटच्या जोडीला पेट स्कॅन यंत्रणाही आली. 2005 मध्ये स्वतंत्र युनिट उभे राहिले. रेडिएशन थेरपीसाठी 4 मशीन्स, 40 रुग्णांची केमोथेरपी होऊ शकेल अशी सोय असणारे दोन वॉर्ड आणि सहा सर्जरी युनिट उभारले. फक्त रूग्णांची काळजी घ्या, बाकी सर्व ठीक होईल.

कै. डॉ. के. बी. ग्रांट , पद्मभूषण

रूबी हॉल क्लिनिकचा विस्तार

  • 1959 : चार खाटांसह एका छोट्या बंगल्यात रूबी हॉल क्लिनिकचा प्रवास सुरु
  • 1966 : ग्रांट मेडिकल ट्रस्टची स्थापना
  • 1999 : रूबी हॉल क्लिनिकचा 250 खाटांवरून ते 600 खाटांपर्यंत विस्तार
  • 2000 : तेहमी ग्रांट इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युके शनची स्थापना
  • 2004 : कॅन्सर सेंटरची स्थापना
  • 2013 : रूबी हॉल क्लिनिकचा महत्त्वपूर्ण विस्तार – वानवडी येथे अद्ययावत रूग्णालयाची स्थापना
  • 2014 : येरवडा येथे नर्सिंग हॉस्टेल स्थापन
  • 2017 : रूबी हॉल क्लिनिक तर्फे हिंजवडी येथे अद्ययावत रूग्णालय सुरु
  • 2017 : विलू पुनावाला नर्सिंग हॉस्टेल
  • 2019 : सुपर स्पेशालिटी सेंटर

ग्रांट मेडिकल फाऊंडेशनचे तेहमी ग्रांट इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन

वैद्यकीय क्षेत्रात कु शल मनुष्यबळाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मुख्य म्हणजे परिचारिकांची वैद्यकीय सेवेमध्ये मध्यवर्ती भूमिका असते. याचे महत्त्व लक्षात घेऊन रूबी हॉल क्लिनिकने तेहमी ग्रांट इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युके शनची स्थापना केली.

पुरस्कार

रुबी हॉल क्लिनिकने आपल्या या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीत अनेक मैलाचे दगड निर्माण केले असून, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून, अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

  • रुबी हॉल क्लिनिक हे एनएबीएच मानांकन लाभलेले पुण्यातील पहिले हॉस्पिटल आहे.
  • मेडिकल टुरिझम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल (2011)
  • देशातील सर्वोत्कृष्ट करिअर सेंटर म्हणून दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अदुब्ल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार
  • देशातील क्वालिटी कौन्सिल द्वारे आठ मानांकने मिळवणारे एकमेव हॉस्पिटल
  • अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी तर्फे कार्डिओलॉजी मधील जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट कें द्राचा सन्मान
  • नॅशनल ऑर्गन अ‍ॅन्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (नोट्टो) तर्फे देशातील सर्वोत्कृष्ट मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल म्हणून गौरव (2016)
  • आयजीबीसी तर्फे गोल्ड रेटेड ग्रीन हॉस्पिटलचा पुरस्कार
  • इकोनॉमिक टाईम्स तर्फे बेस्ट हेल्थ के अर ब्रँड सन्मान
  • सर्वोत्कृष्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुरस्कार

हृदयशील व्यक्तिमत्त्व/सहृदय व्यक्तिमत्व

डॉ. के. बी. ग्रांट यांचा समृध्द वारसा पुढे नेत स्वत:निष्णात हृदयरोग तज्ञ असलेले त्यांचे चिरंजीव डॉ. पी. के. ग्रांट यांनी रूबी हॉल क्लिनिकची वाटचाल आधुनिक काळात पुढे नेण्याबरोबरच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे.

रूबी हॉल क्लिनिकमधील कार्डीआक सेंटर हे भारतातील सर्वोत्कृष्ट हृदयरोग उपचार केंद्रांपैकी एक आहे. डॉ. पी. के. ग्रांट हे स्वत: याचे नेतृत्व करीत असून गेल्या चार दशकांत हृदयरोग उपचार क्षेत्रामध्ये जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. पुण्यातील पहिल्या कार्डिअॅक केअर सेंटरच्या स्थापन करण्यापासून ते भारतातील सर्वांत मोठ्या कार्डिअॅक सेंटरच्या स्थापनेपर्यंत त्यांचे हे कार्य अद्वितीय आहे. आजवर रूबी हॉल क्लिनिकमध्ये तीन लाखहून अधिक अँजिओग्राफी, एक लाख अँजिओप्लास्टी, कोरोनरी बायपास सर्जरीसह सुमारे ऐंशी हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून डॉ. पी. के. ग्रांट यांनी पुण्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण केंद्र स्थापन करण्यामध्ये नेतृत्व केले आहे. रूग्णांच्या गरजा समजून घेऊन डॉ. पी. के. ग्रांट हे प्रत्येकासाठी निरंतर काम करीत असतात. त्यांच्यासाठी हृदय हे फक्त शरीरशास्त्रातील केवळ एक रचना नसते तर कुटुंब, मैत्री आणि भावना यांनी जोडलेले एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. व्याधींशिवाय या सर्व गोष्टी समजून,योग्य व त्वरित निर्णय घेत आपल्या प्रफुल्लित व्यक्तिमत्त्वासह रूग्णांच्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधतात. डॉ. पी. के. ग्रांट यांच्यासोबत काम करणार्यांसाठी ते एक प्रेरणास्थान आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ डॉ. ग्रांट हे समाजातील सर्व घटकांसाठी निरंतर रूग्णसेवा देत आहेत. आपला वारसा म्हणजे करूणा आणि दृढ ऐक्याचे प्रतिक असावे या दृढ निश्चयाने ते आपले कार्य सुरू ठेवत असतात आणि त्याच हेतूने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतात. निमशहरी व ग्रामीण भागात अद्ययावत तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी यासाठी रुबी हॉल क्लिनिक ने अनेक छोट्या रूग्णालयांशी सहयोग केला आहे. तसेच महाराष्ट्र व कर्नाटकात डायग्नोस्टिक्स व इमेजिंग केंद्रे स्थापित केली आहेत. ते स्वत: टेलिमेडिसिनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 35 हून अधिक ठिकाणांमधील लोकांना मोफत सल्ला देत असतात. त्यांनी युकेस्थित सामाजिक संस्था असलेल्या हिलिंग लिटिल हार्टसशी सहयोग केला असून दरवर्षी 30 गरजू लहान मुलांच्या शस्त्रक्रिया मोफतकेल्या जातात.

रूग्णसेवेमध्ये आपले कार्य सुरू ठेवत असताना डॉक्टरांची नवीन पिढी तयार करण्यासाठी देखील ते नेतृत्व करीत असतात. त्यासाठी अनेक वैद्यकीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध, लेख आणि जगभरात व्याख्याने देत असतात. त्यांच्या या हृदयरोगचिकित्सा वैद्यकीय क्षेत्रामधील कामगिरीमुळे त्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी या प्रतिष्ठित संस्थेकडून फेलोशिप प्रदान करण्यात आली. ही या क्षेत्रात सर्वोत्तम व्यावसायिक कामगिरी मानली जाते. त्याशिवाय त्यांना फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर अँजिओग्राफी अॅन्ड इंटरव्हेंशन यु.एस.ए., फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन युके आणि ऑनररी फेलो ऑफ एशिया पॅसिफिक सोसायटी ऑफ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी यांच्याकडून देखील फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर त्यांना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, लायन्स युवा सेवा रत्न पुरस्कार आणि मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

डॉ. परवेझ ग्रांट, व्यवस्थापकीय विश्वस्त, रूबी हॉल क्लिनिक

आमच्या संस्थापकांनी रूग्णालय व्यवस्थापनाचा एक अनोखा वारसा आम्हाला सोपविला आहे. त्यामुळेच आम्हाला एक प्रगतीची दिशा मिळाली असून सक्षमीकरण व वाटचाल सुरू ठेवण्यास प्रेरणा मिळाली आहे.

बोमी भोट , रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी

रूबी हॉल क्लिनिकमधील कमलनयन बजाज कॅन्सर सेंटर हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व व्यापक कर्करोग चिकित्सा केंद्र आहे. कर्करोगाशी निगडीत सर्व उपचार सुविधा येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

डॉ. अशोक भणगे , अध्यक्ष, कमल नयन बजाज कॅन्सर सेंटर

एक प्रगतीशील व एक आघाडीचा वैद्यकीय समुहाच्या नात्याने आम्ही नेहमीच तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि उच्च दर्जाच्या करूणामय वैद्यकीय सेवेशी समानार्थी आहोत.

डॉ. मनिषा करमरकर , रूबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कामकाज अधिकारी

अधिक माहीतसाठी संपर्क : ९८९००३३०४७, + ९१ २०६६४५५१००
www.rubyhall.com

English