प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची ‘मॉडर्न’ वाटचाल

आपल्या भारतवर्षाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षण क्षेत्रात काम करून सुसंस्कृत, सुसंस्कारित, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यसंपन्न नागरिक घडविणे , हा राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रसेवेचा उत्कृष्ट मार्ग आहे. या पवित्र उद्देशाने पुण्यामध्ये माननीय गुरुवर्यशंकररावजी कानिटकर आणि त्यांच्या ५ सहकारी शिक्षकांनी प्रोग्रेसिव्ह एज्केयुशन सोसायटी, पुणे ५ या शिक्षणसंस्थेची थापना दि. १६ मे १९३४ रोजी ‘अक्षय्य तृतीये’च्या मुहूर्तावर केली.

‘प्रो ग्रेसिव्ह’ म्हणजेप्रगतिशील. प्रगतिशील म्हणजे काळाशी सुसंगत असेधोरण अवलंबणे. या प्रगतिशील शिक्षणामध्ये नवनवीन कल्पनांचा समावेश केला जावा, या हेतूने संस्थेचे नाव ‘प्रोग्रेसिव्ह’ हे ठेवले. ‘मॉडर्न’ या शब्दाचा अर्थ आधुनिक असा आहे. कोणत्याही शिक्षणसंस्थेने ‘मॉडर्न’ असणे म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानांनी समृद्ध होऊन, आधुनिक साधन सामग्रीचा उपयोग करुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे होय. त्यामुळे संस्थेच्या पहिल्या
शाळेचे नाव मॉडर्न हायस्कूल असे ठेवले. ‘प्रोग्रेसिव्ह’ आणि ‘मॉडर्न’ हे दोन शब्द आजही संस्थाचालकांच्या दृष्टीने परवलीचे आहेत. या दोन शब्दांमध्येच संस्थेच्या ध्येय धोरणांची संकल्पना स्पष्ट आहे.

‘ज्ञानमयो भव!’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. ज्ञानाची कास धरण्याचा संदेश देणारी त्यासाठी सुयोग्य मार्ग दाखविणारी ‘प्रोग्रेसिव्ह’ संस्था, एकविसाव्या शतकातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि सक्षमता निर्माण करणारे एक समृद्ध व संपन्न ‘ज्ञानकेंद्र’ आहे. ‘विद्यार्थी’ हा केंद्रबिंदू मानून या शिक्षणसंस्थेत देण्यात येणाऱ्या शिक्षणाची, ज्ञानाची दिशा सातत्याने विद्यार्थीभिमुख ठेवलेली आहे. अध्ययन-अध्यापनाची ही शिक्षण प्रक्रिया संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगर्भ तर आहेच, त्याबरोबरच ती संस्कारगर्भ असावी यासाठी संस्थाचालक, शिक्षक हे सारेजण सजग आणि प्रयत्नशील असतात.आधुनिकतेबरोबरच गुरुजनांनी घालून दिलेले आदर्श, संस्कार, मूल्ये व परंपरा गेली ८७ वर्षे संस्थेने कसोशीने जपल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर सदैव सातत्याने उंचावत ठेवला आहे.

या शिक्षणसंस्थेचे सर्व व्यवहार ‘स्वच्छ’ आणि ‘पारदर्शक’ आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाचे बाजारीकरण किंवा व्यापारीकरण होऊ द्यायचे नाही, याकडे संस्थेचा नेहमीच कटाक्ष आहे. गेली ८७ वर्षे ही महत्त्वपूर्ण तत्त्वे सर्वांनीच कसोशीने पाळली आहेत. ही शिक्षणसंस्था शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था असून आज २०२१ या वर्षामध्ये सुद्धा संस्थेचा कारभार शिक्षकांमार्फतच केला जातो. संस्थेच्या नियामक मंडळातही सर्व स्तरातील कर्तबगार व्यक्ती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचा भर १९६९ पर्यंत शालेय शिक्षणावर अधिक होता. या दरम्यान संस्थेच्या ५ शाळा सुरु झाल्या. १९७० मध्ये मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य, शिवाजीनगर, पुणे ५ या महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेच्या दिवसापासून स्वतःच्या मालकीच्या इमारतीत सुरु झालेले हे पहिलेच महाविद्यालय!

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या प्रगतीस १९८६ पासून अधिक वेग आला. विशेषतः १ जानेवारी १९९४ पासून पुण्यातील सुप्रसिद्ध नामांकित शल्यचिकित्सक आणि मॉडर्न हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रा.डॉ. गजानन र. एकबोटे यांनी संस्थेच्या नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारला. प्रा. डॉ. एकबोटेयांना द्रष्टेपणाचे वरदान आहे. त्यांची सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद, वैद्यक विद्याशाखेचे अधिष्ठाता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्रकुलगुरु, व्यवस्थापन परिषदेवर माननीय राज्यपालांचेप्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये “सर्जरी” विषयाचे प्राध्यापक, भारतातील विविध विद्यापीठांच्या अधिकार मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या नियोजन मंडळाच्या अनेक समित्यांवर सन्माननीय सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व कार्याध्यक्षपदी असल्याने आणि नियामक मंडळाने त्यांना मोलाची साथ दिल्याने संस्थेचा विकास १९९४ पासून वेगाने झाला. संस्थेच्या प्रगतीत गुरुवर्य विष्णू त्र्यं. ताटके, गुरुवर्य मो. गो. चाफेकर, डॉ. माधव नामजोशी, रवी किराड, बाळासाहेब हगवणे, अॅड. बाबासाहेब चव्हाण, श्री. सुरेश तोडकर, अॅड. दादासाहेब बेंद्रे, अॅड. माणिकराव पाटील, प्रा. डॉ. श्री. अरविंद पांडे, प्रा. श्री. प. स. चिरपुटकर, प्रा. सीताराम रायकर, प्रा. डॉ. प्रकाश दीक्षित, श्री. शरद इनामदार, प्रा. शामकांत देशमुख, प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे, श्री. मच्छिंद्र कांबळे, श्री. दीपक मराठे, सौ. मोनिका वैद्य, श्री. दत्तात्रय पाटोळे, श्री. राजन देवकाते व संस्थेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. दूरदृष्टी, कार्यकुशलता, अचूक निर्णयक्षमता ह्या अनेकविध गुणवैशिष्टयांनी परिपूर्ण असलेले, सर्वांगीण विकासाची सातत्याने स्वप्ने बघणारे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कष्टांची तमा न बाळगणारे, सर्वांना बरोबर घेऊन प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणारे, ऊर्जास्रोत बनलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. एकबोटेयांच्या मार्गदर्शनामुळे ज्ञानविज्ञान क्षेत्रातील कर्तृत्व क्षितिजावर संस्थेच्या यशस्वितेचे इंद्रधनुष्य उमटले आहे, ही अभिमानाची, आदराची व आनंदाची बाब आहे.

संस्थेच्या ६२ पेक्षा अधिक शाखा

आज संस्थेच्या ६२ शाखा पुणेशहर आणि जिल्हा परिसरात कार्यरत आहेत. शिशु विद्या मंदिर ते पदवी-पदव्युत्तर म्हणजे कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र महाविद्यालय (केवळ महिलांसाठी), व्यवस्थापन, आरोग्यविज्ञान इत्यादी सर्व विद्याशाखांच्या महाविद्यालयांत सुमारे ६०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्था आता वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार आहे. मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५ या महाविद्यालयाला नुकतीच ‘स्वायत्तता’ मिळाली आहे. स्वायत्ततेतून महाविद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रम, अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन, परीक्षा-पद्धती, मूल्यमापन याकडेविशेष लक्ष पुरवीत आहे. महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या B.Sc. (Blended) या अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी सुमारे ४ वर्षांपूर्वीच करार झाला आहे. अनेक परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक करार करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. प्रतिवर्षी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत आणि सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या पदवी-पदव्युत्तर परीक्षेच्या गुणवत्ता यादीत असतात. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात संस्थेचेप्रतिनिधित्व करतात. गेली ५ वर्षे मॉडर्न महाविद्यालय, पुणे ५ या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचा ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय (क्रीडा)’ हा क्रीडा विषयक पुरस्कार मिळत आहे. अनेक सांस्कृतिक कलादर्शन स्पर्धांमध्येविजेतेपद मिळवित आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या खालील महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “सर्वोत्ष्टकृ महाविद्यालय” हा पुरस्कार मिळालेला आहे.

  1. मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) शिवाजीनगर, पुणे ५
  2. मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे १६
  3. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५
  4. मॉडर्न फार्मसी महाविद्यालय, निगडी, पुणे ४४

संस्थेच्या महाविद्यालयात प्राचार्य आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या अनेक व्यक्तींना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्राचार्य, सर्वोत्ष्टकृ प्राध्यापक, नाविन्यपूर्ण कार्य करणारे प्राध्यापक, सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी हे पुरस्कार मिळालेले आहेत. संस्थेच्या विविध महाविद्यालयातील सुमारे २०० हून जास्त प्राध्यापकांना पीएच.डी. ची पदवी संशोधन करून मिळालेली आहे. विविध महाविद्यालयात निरनिराळ्या विषयांची सुमारे २५ हून अधिक संशोधन केंद्रे (Research Centers) अस्तित्वात आहेत. अनेक महाविद्यालयांना केंद्रिय, राज्यस्तरीय संस्थांकडून अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय Conferences आयोजित करण्यासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. आत्तापर्यंत निरनिराळ्या विषयांवर सुमारे १५ आंतरराष्ट्रीय, ५० हून जास्त राष्ट्रीय, २०० हून जास्त राज्यस्तरीय Conferences आयोजित करण्यात आली आहेत.

संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्येविद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सातत्यानेप्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणेया शाळा-महाविद्यालयांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. या अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाचा लाभ घेणेशक्य झाले आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर

संस्था संचलित शाळा महाविद्यालयांमध्येविद्यार्थ्यांना विषयाबद्दल व अभ्यासात गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीने अनेक नवनवे उपक्रम राबविले जातात. शाळा-महाविद्यालयांमधून Smart Class Rooms, Common Research Facilities, Digital Libraries, Modern Laboratories, E-learning, E-content Development, ICT Facility, Wi-Fi Campus, Digital Classroom, Virtual Laboratory, Online Learning Management Systems (LMS) या प्रकारच्या सोयी-सुविधा अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संस्था संचलित महाविद्यालयातून प्रवेशाचे कामकाज हे पूर्णपणे online पद्धतीने राबविण्यात येत आहे व पालकांना अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी Digital Payment (Net Banking, RTGS, Debit Card, Credit Card) चा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. संस्थेच्या शाळा-महाविद्यालयातून प्रवेश, प्रशासकीय कामकाज, ग्रंथालयाच्या सुविधा, Digital पद्धतीने देण्यात आल्या आहेत व त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाविद्यालयामध्येविद्यार्थ्यांच्या संबंधीचे जुने दस्तावेज हे Digital पद्धतीने संकलीत करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर जुन्या दस्तावेजाचे Digitization महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. संस्था संचलित महाविद्यालयामधून ग्रंथालयामार्फत E-books, E-journals, E-periodicals तसेच Centralized Repository सारख्या सुविधा विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचेविद्यार्थ्यांना तसेच M.Phil., Ph.D. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयातील उत्तम दर्जाची व काळानुरूप आधुनिक उपकरणे, Electronic Gazettes, प्रयोगशाळा या विकसित करण्यात आल्या आहेत. मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५ येथे Common Sophisticated Instrumentation Facility जास्तीत जास्त संशोधकांना संशोधन करण्यासाठी चालना मिळावी म्हणून सुमारे २.० कोटी रुपयांचा निधी वापरुन विकसित करण्यात आली आहे. त्याचादेखील लाभ हा संशोधन व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना होत आहे.

संस्थेच्या अनेक महाविद्यालयातून विद्यापीठ मान्यताप्राप्त ४०हून अधिक संशोधन केंद्रे असून विविध विषयांचे संशोधन हे तज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने केले जात आहे. त्याचा समाजास मोठा फायदा होत आहे. संस्थेच्या अनेक माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी राजकीय, उद्योग, अर्थ, वैद्यकीय, क्रीडा, न्याय व विधी आदी क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्यामध्ये बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार सुभाष कुल, जालिंधर कामठे (राजकीय), विजय केळकर (अर्थतज्ञ), अरविंद इनामदार, पी.एस. पाळंदे, श्रीमती शांता राव-शास्त्री, जयंत उमराणीकर, सुनील दाढे, सुभाष देवरे, अविनाश धर्माधिकारी, सदानंद दाते, विनोद लोखंडे (आय.पी.एस.), अरुण फिरोदिया, बाबा शिदोरे, सतीश पाषाणकर, अविनाश वार्देकर (उद्योग), डॉ. गजानन एकबोटे, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. अशोक कानिटकर, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. सतीश कर्णिक, डॉ. अजित गोळविलकर, डॉ. चारुदत्त आपटे (वैद्यकीय), सौदामिनी देशमुख (पहिल्या महिला वैमानिक), श्रीरंग इनामदार, अलका दिघे, निशा कुलकर्णी, साधना राहतेकर, अनिता पवार, उज्ज्वला निकम, दिपाली राक्षे, सुनीता देशपांडे, अतुल वाकणकर (क्रीडा), त्यागराज खाडीलकर, सचिन जांभेकर, गगनविहारी बोराटे, मृणालिनी ढवळे, स्वरूपा खोपकर (कला) आदींचा समावेश आहे.

गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार सोहळा.

प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, प्रो. ए. सोसायटी, पुणे ५

महिलांच्या मताला विशेष महत्त्व देणारी संस्था

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये महिलांचेप्रतिनिधित्व करायला मिळणे, ही मोठी गोष्ट आहे. कारण, येथे महिलांच्या मताला विशेष महत्त्व दिले जाते. संस्थेच्या सर्वशाळांमध्ये जवळपास ६० ते ७० टक्के महिला शिक्षिका आहेत. प्रा. डॉ. गजानन एकबोटेयांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याच्या प्रत्येक क्षणाची मी साक्षीदार असून त्यांची अपार मेहनत मी पाहत आहे. संस्थेत १९९३ मध्येशेवटची निवडणूक झाली, त्यानंतर आजतागायत संस्थेत निवडणूक घ्यावी लागली नाही, हेच संस्थेच्या बांधणीचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. संस्था एक कुटुंब असल्याच्या भावनेतून प्रत्येक जण झटत आहे. समर्पणवृत्तीने संस्था पुढे नेण्याचे काम सर्वांच्या सहभागातून होत आहे. आताच्या नवीन शैक्षणिक धोरणात ज्या पद्धतीचे शिक्षण, नवीन अभ्यासक्रम अभिप्रेत आहेत, ते अभ्यासक्रम संस्थेनेयापूर्वीच सुरू केले आहेत. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची विशेष परंपरा संस्थेला लाभली आहे. स्त्री शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या या संस्थेने १९४६ मध्ये पीईएस गर्ल्स हायस्कूल (शिवाजीनगर) सुरू केले. आजही पुण्यातील नामांकित शाळांमध्येया मुलींच्या शाळेचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढल्यानंतर संस्थेने महिलांसाठी बी.एड. महाविद्यालय सुरू केले. शंभर प्रवेश संख्या उपलब्ध असणारे हे महिलांसाठीचे स्वतंत्र बी.एड. महाविद्यालय आहे. त्याशिवाय, मोशी येथे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी हे फक्त महिलांसाठी काढण्यात आले.

मा. श्री. भगतसिंह कोश्यारी (राज्यपाल, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांचा CEDA तर्फे दिला जाणारा “Best Innovative College Award”
हा पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. गजानन एकबोटे व प्रा. सौ. ज्योत्स्ना एकबोटे.

प्रोग्रेसिव्ह एज्युके शन सोसायटीची वैशिष्टये

  • संस्थेचे संस्थापक गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.
  • गुरुवर्य शंकरराव कानिटकर क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
  • शिवाजीनगर येथील महाविद्यालयाच्या आवारात ११ मजली इमारत उभारणी.
  • मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर) येथे २६ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, तर ८ विद्याशाखांमध्ये संशोधन करून पीएच.डी. करण्याची संधी – महाविद्यालयातील ‘मेडिटशे न सेंटर पॉइंट’चे आकर्षण.
  • अत्याधुनिक ग्रंथालयात ई-लर्निंग साहित्याची सुविधा.
  • डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजिटल क्लासरूम, ग्रीन रूम.
  • संस्थेत २८० स्मार्ट क्लासरूम विकसित. मॉडर्न महाविद्यालय (गणेशखिंड रस्ता) येथे आठ विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, तर ६-८ विद्याशाखांमध्ये संशोधन करून पीएच.डी. करण्याची संधी उपलब्ध.
  • दादासाहेब एकबोटे संस्कृत पाठांतर स्पर्धांचे आयोजन.

प्रोग्रेसिव्ह एज्युके शन सोसायटीची वाटचाल

  • काही महत्त्वाच्या शाळांची/महाविद्यालयांची नावे : स्थापना वर
  • मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर : १९३४
  • प्राथमिक विद्या मंदिर, शिवाजीनगर : १९३६
  • सर ससून डेव्हिड वसतिगृह, शिवाजीनगर : १९४०
  • पीईएस गर्ल्स हायस्कू ल, शिवाजीनगर : १९४६ मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर : १९७०
  • मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम, पाषाण : १९७८
  • शिशूविद्या मंदिर, निगडी : १९८६
  • मॉडर्न हायस्कू ल, भोसे (ता. खेड) : १९९१
  • मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज, यमुनानगर, निगडी : १९९१
  • मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिवाजीनगर : १९९९
  • मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी (फक्त मुलींसाठी) मोशी : २००४
  • पीईएस बी.एड. कॉलेज, शिवाजीनगर : २००६
  • मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, शिवाजीनगर : २००७
  • मॉडर्न कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बायोटक्े नॉलॉजी, पौड : २००८
  • मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, शिवाजीनगर : २०१०
  • मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड कॉम्प्युटर स्टडीज, निगडी : २०१७

‘प्रोग्रेसिव्ह’ आणि ‘मॉडर्न’ ज्ञानकेंद्राची वैशिष्टये

काशी, तक्षशीला, अयोध्या, नालंदा इत्यादी अनेकविध वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन विद्यापीठांच्या ज्ञानसंपन्न वारशाची अभिमानास्पद आठवण आपणा सर्व भारतीयांच्या मनात आहे. भारतीय शिक्षणपद्धतीच्या वैभवशाली संस्कृतीची वाटचाल डोळ्यांपुढे ठेवून संस्थाचालकांनी नव्या-जुन्या, प्राचीन व आधुनिक तत्त्वांची, जीवनमूल्यांची सांगड घालत संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलताना सुसंस्कृत, चारित्र्यवान नागरिक घडविणे ह्याकडे संस्थेचे लक्ष आहे. त्यासाठी विविध उपक्रम व योजनांची कार्यवाही होते.

पर्यावरणविषयक जाणीव-जागृती

शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवर समाविष्ट करण्यात आलेला पर्यावरण हा स्वतत्रं विषय संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे. हवा-भमूी-पाणी यांचेप्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरिक्त वापर इत्यादींमुळे आज सर्वांपुढेनवी आव्हाने उभी आहेत. तत्रं ज्ञानातील प्रगती, औद्योगीकरण व शहरीकरण यात सातत्याने होणारी वाढ आणि मानवाचे कालामानानुसार बदलत जाणारे जीवन यांचा एकत्रित परिणाम होऊन पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मनुष्य आणि पर्यावरण यांतील आंतरक्रियांमुळे निर्माण झालेल्या या मस्यांचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे , त्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांचा सहभाग वाढावा व पर्यावरण संरक्षणाची वृत्ती विकसित व्हावी ही उद्दिष्टे साधण्यासाठी संस्थेकडून लक्ष दिलेजाते.

नैतिक मूल्यांचे संस्कार

शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नतैिक मल्ू यांच संस्े कार घडवून विद्यार्थ्यांना तयार करणे, ह्यासाठी संस्था नेहमीच यत्नशील असते. सातत्याने होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक बदलांना अनुलक्षून विद्यार्थ्याला सुयोग्य वळण लावून सुसंस्कृत बनविण्याचे कार्य संस्था करीत आहे. बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या भावनिक व मानसिक विकासावरही अधिक भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाच्या समृद्धीचा आणि सर्वांगीण विकासाचा विचार संस्थाचालकांच्या मनात प्रत्येक क्षणाला जागता असतो.

नवे संकल्प…

वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच ‘मॉडर्नविद्यापीठ’ उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. मॉडर्न फार्मसी महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठी हार्वर्डविद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. तसेच, बी.एस्सी. (ब्लेन्डे) अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नविद्यापीठाशी करार करण्याबाबत चर्चा सुरू आहे. M.Sc. (Animation), B.Voc. (Fashion Technology) नवीन अभ्यासक्रम संस्था सुरू करणार आहे. याशिवाय, Post Graduate Diploma in Data Science सारखा सध्या जास्त महत्त्व असलेला अभ्यासक्रम सुरू केला आहे. स्वायत्त महाविद्यालयाद्वारे सातत्याने अभ्यासक्रमात काळानुरूप बदल घडविण्यासाठी व कालानुरूप नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

‘मॉडर्न’ अभिमत विद्यापीठाचे स्वप्न

संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन र. एकबोटेयांच्या मार्गदर्शनाने भावीकाळात ‘मॉडर्न विद्यापीठ’ स्थापन व्हावे असे स्वप्न संस्थेने उराशी बाळगले आहे. संस्थेच से र्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी सारेजण यासाठी प्रयत्नशील व कृतिशील आहेत. ‘प्रोग्रेसिव्ह’ प्रगतिशील आहेच. त्याचप्रमाणे भविष्यकाळात वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय हे सुरू करण्याचा संस्थेचा विचार आहे.

‘म्हणौनी मने काया वाचा, जो सेवकु होईल इयेचा, तो स्वानंद साम्राज्याचा, चक्रवर्ती करी ‘ माउलींच्या या सिद्धांताप्रमाणे चक्षू पाहणारे अनेक कार्यकर्ते एकत्र आले आणि संस्च्थे या वेलीचा आज वटवृक्ष झाला. ही ज्ञानगंगेची कावड खांद्यावर घेऊन, ही ज्ञानाची तीर्थयात्रा आज अविरत ८७ वर्षे चालू आहे आणि भविष्यातही चालत राहणार.

English