२०१९ मध्ये यश फर्टिलिटीचेअत्याधुनिकीकरण हाती घेण्यात आले होते. यामध्ये गेल्या दोन वर्षांत प्रयोगशाळेची रचना, प्रयोगशाळेतील निर्जंतुकीकरण करणारी उपकरणे तसेच गर्भनिर्मितीसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा यांचेआधुनिकीकरण करण्यात आले. प्रयोगशाळेतील हवा पूर्णतः निर्जंतुक व अतिशय शुद्ध असावी लागते. त्यासाठी हवेचे विशिष्ट प्रकारेअभिसरण करून वातानुकूलित करण्यासाठी विविध एअर हॅण्डलिंग युनिट वापरलेआहेत. जेणेकरून बाहेरील जीवाणूव विषाणू प्रयोगशाळेत प्रवेश करू शकत नाहीत. याखेरीज स्त्रीबीज व शुक्रजंतू यांचा संयोग घडविण्यासाठी जपानमधील प्रसिद्ध निकॉन या कंपनीचेदोन भव्य ‘मायक्रोमॅन्युप्युलेटरर्स’ प्रयोगशाळेत बसवलेआहेत. या प्रयोगशाळेत गर्भाची वाढ नैसर्गिक होण्यासाठी विविध प्रकारचे५ इनक्युबेटर्स सज्ज आहेत. प्रयोगशाळेतील गर्भाची वाढ दर ८ तासांना तपासण्यासाठी ‘टाईम लॅप्स’ स्वतंत्र यंत्रणा वापरण्यात येते. यश फर्टिलिटी सेंटरमध्ये यशस्वीतेचेहेप्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे.टेस्ट ट्यूट बेबीउपचाराचेयश आणखी वाढविण्यासाठीनवनवीन औषधनिर्मिती करूनत्यांचे पेटंट घेण्याची प्रक्रिया पत्की हॉस्पिटलद्वारेसुरू आहे.
कोल्हापूरच ‘पत्की हॉस्पिटल’ वंध्यत्वचिकित्साशास्त्रातील पायोनिअर
महाराष्ट्राच्या स्थापनेची ६१ वर्षेपूर्ण होण्याचे औचित्य साधूनराज्यातील विचारवंत, आघाडीचे उद्योजक आणि वैद्यकीय क्षेत्रातील ६१ महाब्रँड्सचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फेसन्मान करण्यात येत आहे. महाराष्ट्राचेनाव संपूर्ण देशभरात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरनेऊन ठेवणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजेडॉ. सतीश पत्की.
पत्की हॉस्पिटलची अत्याधुनिक लॅब
डॉ. सतीश पत्की व डॉ. उज्ज्वला पत्क
प्रत्येक रुग्ण संदर्भग्रंथच
येणारा कोणताही रुग्ण आमच्यासाठी संदर्भग्रंथ असतो. अशा रुग्णांना उपचार सेवा देताना आम्ही वाचलेल्या क्रमिक अभ्यासातील पुस्तकांइतकेच महत्त्वपूर्ण अनुभव आम्हाला वेळोवेळी येतात. तोच अनुभव आम्हाला समृद्ध करतो. तो किती वाचावा, किती अभ्यासावा तेवढेकमीच असते. म्हणूनच रुग्णसेवा हीच आम्हाला संशोधनाची ऊर्जा देत राहते, असा अनुभव डॉ. पत्की दाम्पत्य अनेकदा बोलून दाखवते. यातूनत्यांची संशोधनाचीदृष्टी अधोरेखित होते. त्याचा वेध घेताना अनेक पैलूंचेदर्शन घडते, अभ्यासक्रमापलीकडील त्यांची व्यापकता दर्शवते. पत्की दाम्पत्यानेव त्यांच्या परिवारानेकेलेल्या बहुविध संशोधनाच्या छटा सर्वसामान्य व्यक्तींपासून तेउच्चविद्याविभूषितांनाही अनुभवसंपन्न करणाऱ्या व आत्मविश्वासाला बळकटीदेणाऱ्या ठरत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना पुढेआलेल्या संशोधकीय छटांचे विस्तार रूप असेः
आव्हाने पेलत संशोधनाचा मुहूर्त साधला…
१९८० चेदशक. ज्या काळात संगणक विकसित झालेला नव्हता, अशा काळात कोल्हापुरात चार खाटांचेछोटेनर्सिंग होम डॉ. पत्की दाम्पत्याने सुरू केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असताना त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी करण्याचेस्वप्न पाहिले; मात्र ही अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात साकारण्याचा प्रवास सोपा नव्हता. पण केवळ जिद्द, अथक कष्ट करण्याची तयारी व आईवडिलांच्या संस्कारांच्या शिदोरीमुळे त्यांचेहेस्वप्न सत्यात उतरले. त्यासाठी येणारेप्रत्येक आव्हान मोठ्या हिंमतीनेपेलत डॉ. सतीश पत्की यांनी पत्नी डॉ. सौ. उज्ज्वला यांच्या सोबतीनेकोल्हापुरात संशोधनाचेदरवाजेखुलेकेले. प्रारंभीच्या काळात प्रयोगासाठी पुण्याहून उंदीर आणून त्यांनी संशोधन केले. १९९६ मध्ये त्यांना या प्रयोगाचा सूर प्रयोगशाळेत गवसला आणि कोल्हापुरात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. अथक परिश्रमाद्वारेडॉ. पत्की यांनी या प्रयोगाची यशस्वीता ७० टक्क्यांपलीकडेनेण्यात यश मिळवले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड फलदायी
१९९६ मध्ये कोल्हापुरात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म डॉ. पत्की यांनी यशस्वी केला. त्यापाठोपाठ रशियातील एका दाम्पत्यानेवंध्यत्व निवारणावर युरोप आणि रशियामध्ये प्रयत्न केले. यात टेस्ट ट्यूब बेबीचे १८ प्रयोग झाले; मात्र त्यात अपयश आले. अशा एका रशियन महिलेला डॉ. पत्की हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी प्रयोगातून अपत्यप्राप्तीचेसुख मिळवून दिले. त्यानंतर आणखी एका ५४ वर्षीय महिलेस टेस्ट ट्यूब बेबीद्वारेअपत्यप्राप्ती देण्याचा प्रयोग यशस्वी करीत डॉ. सतीश पत्की यांनी टेस्ट ट्यूब बेबी या प्रयोगाच्या शाखा रुंदावल्या आणि जगभरातील वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. पुढे ‘मायक्रोमॅन्युप्युलेशन’, ‘ब्लास्टोसिस्ट’ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर, टेस्ट ट्यूब बेबीद्वारे तिळ्यांचा जन्म, सरोगेट मदर तंत्रज्ञान अशा अनेक प्रयोगांमध्ये डॉ. पत्की यांनी कोल्हापूरचेच नव्हे, तर भारताचेनाव सातासमुद्रापार नेले. म्हणूनच आज कृत्रिम गर्भधारणेच्या म्हणजेच आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत टेस्ट ट्यूब बेबी प्रकल्पाची यशस्वीता वाढवली. त्यांच्या या किमयेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन (एएसआरएम) या संस्थेनेघेतली. ‘टेस्ट ट्यूब बेबी – अत्याधुनिक तंत्रज्ञान’ या संशोधन विषयावर ‘एएसआरएम’ या संस्थेनेडॉ. पत्की यांचेव्याख्यान घेतले. त्यासोबत ‘फर्टिलिटी स्टरीलिटी २०२० अबस्ट्रॅक्ट बुक’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये त्यांचा संशोधन निबंधही प्रकाशित केला.
गर्भ गोठवून दाम्पत्यांच्या सोयीनुसार बाळाचा जन
पत्नीची स्त्रीबीजेव पतीचेशुक्रजंतूयांच्या संयोगातून निर्माण झालेला गर्भप्रयोगशाळेत ५ दिवस वाढविण्यात येतो. त्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या ‘ब्लास्टोसिस्ट’ या तंत्रज्ञानाद्वारे गर्भाची निर्मिती होते. त्यानंतर तयार झालेला गर्भ उणे १९६ डिग्री सेंटिग्रेड इतक्या कमी तापमानामध्ये गोठवण्यात येतो. यानंतर भविष्यात मातेच्या गर्भाशयाचे वातावरण उपचाराद्वारेपूर्णतः पोषक बनवले जाते. त्यात आधी गोठविलेला गर्भ पुन्हा कार्यान्वित करून त्यांचेरोपण केले जाते. उपचारामधील या अंतिम व महत्त्वाच्या टप्प्यामध्ये हेरोपण यशस्वी होण्यासाठी गर्भावर ‘सॅटर्न लेसर’ या अमेरिकन उपकरणाद्वारेप्रक्रिया करण्यात येते. रोपण झालेल्या गर्भाचेमातेच्या गर्भाशयामध्ये सुयोग्य पोषण व्हावेयासाठी आधुनिक औषधोपचारांची जोडही दिली जाते. सध्याच्या कालावधीत अनेक दाम्पत्ये करिअर घडविण्यात व्यस्त असतात. अशा वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना पुढेढकलले जाते. अशा दाम्पत्यांसाठी हे फ्रिजींग तंत्रज्ञान खुबीनेवापरले जाते.
सेवेतून नात्यांची वीण घट
पत्की हॉस्पिटलनेगेल्या ३५ वर्षांत फक्त वैद्यकीय सेवा दिली नाही, तर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत आपुलकीचेनाते जोडले. हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचेपहिलेछायाचित्र टिपले जाते. ज्या दिवशी आई व बालकाचा डिस्चार्ज होतो, त्या दिवशी डिस्चार्ज कार्डवर आईसह बाळाचा पहिलावहिला फोटो छापला जातो. जेणेकरून पालकांसह त्या बालकालाही आपल्या पहिल्या फोटोमुळेआठवणी अविस्मरणीय ठेवता येतील. त्यासोबतच येथे जन्मलेल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पोस्टाद्वारेशुभेच्छा कार्ड पाठवले जाते. जेणेकरून बाळासह पालकांचेहॉस्पिटलशी ऋणानुबंध कायम राहतात.
लॉकडाउनमधील शुश्रूषेसह जन्मसोहळ
गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाला. या लॉकडाउनमुळे सर्वत्र शुकशुकाट होता. तसाच हॉस्पिटलमध्येही नवजात बालकासह मातेला पाहायला येणाऱ्या नातेवाईकांचा ओघ थांबला. त्यामुळेबाळ – बाळंतिणीची काळजी घेण्याची जबाबदारी संपूर्ण हॉस्पिटलच्या टीमकडे आली. कधी कधी तर बाळ-बाळंतिणीसोबत कोणीच नसल्यानेहॉस्पिटलच्या संपूर्ण टीमनेयानवजात बाळासह मातेला घरच्यासारख्या सुविधा पुरवल्या. एका महिलेचा पती पोलिस म्हणून कर्तव्य बजावत होता. त्याचवेळी त्या महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. ती महिला हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून दाखल झाली. तिची सुखरूप प्रसूतीही झाली. पोलिस असणाऱ्या पतीला आपल्या बाळाचा चेहराही पाहता आला नाही; परंतुहॉस्पिटलच्या टीमनेत्यांना व्हिडिओ कॉलवर बाळासह मातेची भेट घडवून आणली. कठीण प्रसंगात सेवेच्या पलीकडे जात हॉस्पिटलनेमाणुसकीचेनातेअधिक घट्ट केले. लॉकडाउन काळात पहिल्या ५१ दिवसांत ९९ प्रसूती यशस्वी केल्या.
नवनवीन संशोधनाचा ध्यास
कोरोना झाल्यानंतर शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. कोरोनानेमृत झालेल्या व्यक्तीचेशवविच्छेदन करता येत नाही. याला पर्याय शोधत गरोदरपणामध्ये कोरोनावर मात केलेल्या महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांची वार व नाळ यावर त्यांनी संशोधन सुरू केलेआहे. वारेमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनतात का? याचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळेअशा बालकांवरपुढील उपचार करण्यास मदत होईल.
तीन पिढ्यांवर उपचार करणार पत्की हॉस्पिटल
पत्कीहॉस्पिटलमध्ये आजवर सुमारेतीस हजारांपेक्षा अधिक बालकांनी जन्म घेतला. २५-३० वर्षांपूर्वी पत्कीहॉस्पिटलमध्ये जन्मलेली बालकेआता पालक या भूमिकेतून हॉस्पिटलमध्ये येतात. आपला जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला त्याच हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलांचा जन्म व्हावा, यासाठी ही पिढी आग्रही आहे. त्यामुळेच आता ‘तीन पिढ्यांवर उपचार करणारेपत्की हॉस्पिटल’ अशी ख्याती कमावली आहे. विशेष म्हणजेज्याप्रमाणे रुग्णांची दुसरी पिढी पत्की हॉस्पिटलमध्ये येत आहे, त्याचप्रमाणेडॉक्टरांचीही दुसरी पिढी उपचार करण्यासाठी सज्ज आहे. त्यांची कन्या डॉ. श्वेता पत्की-कुलकर्णी यांनी नवनव्या संकल्पना अमलात आणून पत्की हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणासाठी विशेष लक्ष घातले. अमेरिकेतील प्रसिद्ध अशा क्लिव्हलँड क्लिनिकमध्ये त्यांचेप्रशिक्षण झालेआहे. काही महिलांमध्ये वरचेवर गर्भपात होणे किंवा व्यंग असलेली मुले जन्माला येणेअसे घडते. अशा महिलांसाठी पत्की हॉस्पिटलमध्ये खास ‘बीओएच’ विभाग कार्यान्वित आहे. या विभागामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या, जेनेटिक टेस्ट व समुपदेशन केले जाते. या विभागाची जबाबदारी डॉ. श्वेता पत्की-कुलकर्णी पूर्णवेळ सांभाळतात. तसेच गरोदरपणात आरोग्याची काळजी, गर्भसंस्काराचेवर्ग यासंदर्भात त्या आठवड्यातून एकदा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या गरोदर महिलांशी संवाद साधत असतात. कोरोनाचा संसर्ग वाढूलागला तसेत्यावर मर्यादा येऊ लागल्या. त्यावर पर्याय शोधत डॉ. श्वेता स्वतंत्र यूट्यूब चॅनेल सुरू करून त्याद्वारेगरोदर महिलांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचेपती डॉ. श्रीस्वरूप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदरपणातील गुंतागुंती, वाढलेला रक्तदाब, मधुमेह अशा अनेक रुग्णांवर उपचारासाठी एक पथक कार्यरत आहे. डॉ. श्रीस्वरूप कुलकर्णी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामधून आय.सी.यू. उपचारांसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेआहे. त्यामुळेपत्की हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांवरील पचाराचेसुलभीकरण झालेआहे. तर येणाऱ्या काळात डॉ. सतीश पत्की यांचे चिरंजीव डॉ. सुहृद पत्की व स्नुषा डॉ. आदिती पत्की हेदेखील पत्की हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीममध्ये सहभागी होत आहेत. डॉ. शिवांजली खाडे, डॉ. आदिती कुलकर्णी, डॉ. विवेक हावळ, डॉ. वैशाली मानेव इतर तज्ज्ञ कौन्सिलर्स अशी सर्व टीम सदैव उपलब्ध असेल.
डॉ. सतीश पत्की व डॉ. उज्ज्वला पत्की यांना मिळालेले पुरस्कार
- कोल्हापूर भूषण पुरस्कार
- फाय फाउंडेशन पुरस्कार
- डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
- कोरियन पुरस्कार
- यंग सायंटिस्ट ॲवॉर्
- गोयल गंगा पुरस्कार
- डॉ. तामस्कर पुरस्कारी
- धन्वंतरी पुरस्कार
डॉ. सतीश पत्की आणि डॉ. उज्ज्वला पत्की यांची संशोधन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम नोंद झालेली संशोधन
- पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म – १९९६
- युरोप व रशियामध्ये १८ वेळेस टेस्ट ट्यूब बेबीद्वारे अयशस्वी ठरलेल्या रशियन महिलेस टेस्ट ट्यूब बेबीद्वारे अपत्यप्राप्ती – १९९७ (या घटनेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.)
- ५४ वर्षीय महिलेस टेस्ट ट्यूबद्वारे अपत्यप्राप्ती – १९९८
- गर्भ गोठविण्याच्या यशस्वी तंत्रज्ञानामधून टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म – १९९९
- इक्सी (मायक्रोमॅन्युप्युलेशन) तंत्राद्वारे टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म – १९९९
- टेस्ट ट्यूब जुळ्या व तिळ्या बालकांचा जन्म – १९९९
- सरोगेट मदर तंत्रज्ञान यशस्वी – २००५
- मातेच्या गर्भाशयामध्येस्टेम सेल्सचे अस्तित्व सिद्ध करणारे संशोधन – २००८
- मातेच्या दुधामध्ये स्टेम सेल्सचे अस्तित्व सिद्ध करणारे संशोधन – २००९
- २५ वर्षांमध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या जुळ्या व तिळ्या बालकांचा स्नेहमेळावा व संशोधन – २०१३ (या संशोधनाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.)
- गरोदरपणातील तणाव कमी करण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यापैकी श्री. प्यारेलाल शर्मा यांच्या सहयोगाने म्युझिक थेरपी – २०१९
सर्वांचे आधारवड ठरणारे पत्की हॉस्पिटल
पत्की हॉस्पिटलची ख्याती पाहून अनेकांना येथील उपचार परवडतील की नाही, अशी शंका वाटते; मात्र येथे ज्या रुग्णांनी उपचार घेतले त्यांचे गैरसमज आपसूक दर झू ाल्याचा अनेकांचा अनुभव आहे. बहुविध सेवा-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असूनही येथील उपचारांचा खर्चकिफायतशीर असल्याचा अनुभव रुग्णच सांगतात, तेव्हा पत्की हॉस्पिटल व्यावसायिकतेपेक्षा सेवाव्रती म्हणून कार्यरत असल्याची पावती मिळते. हॉस्पिटलच्या ओपीडीत समाजातील सर्वच आर्थिक स्तरांतील महिलांची असलेली गर्दी त्याची साक्ष देते. अनेक रुग्णांवर अत्यंत कमी खर्चात उपचार के ल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील.
केस स्टडीज
आधुनिक हिरकणीची कहाणी…
‘ती’ मूळची पुण्याची; पण लंडनमध्ये स्थायिक असलेली. लग्नाच्या दहा वर्षांनंतरही तिला अपत्य झालेलेनव्हते. लंडनसह सर्वत्र उपचार घेतले; पण उपयोग झाला नाही. त्या महिलेच्या गर्भाशयात ॲडिनोमायोसिस या उपचार न होऊ शकणाऱ्या तीव्र आजाराचे निदान झालेहोते. त्यामुळेया दाम्पत्याला अपत्य नव्हते. त्यामुळेडॉ.पत्की यांनी, ‘तुमच्या गर्भाशयात बाळ वाढू शकणार नाही; दुसऱ्या एखाद्या महिलेच्या गर्भाशयात स्वतःचेबाळ वाढविणेव तिच्या प्रसूतीनंतर अपत्यप्राप्तीचा आनंद घेणे’, या सरोगसी मदरचा पर्याय या दाम्पत्याला दिला. स्त्रीबीजेव त्यांच्या पतीचेशुक्रजंतू यांचा पत्की हॉस्पिटलच्या यश प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या संयोग घडवून आणला आणि गर्भ तयार केल्यानंतर सरोगेट मदरच्या गर्भाशयात त्याचेरोपण केले. हा प्रयोग यशस्वी झाला. डिसेंबर २०१९ ला बघता बघता हा गर्भ चार महिन्यांचा झाला. हेदाम्पत्य कोल्हापुरातच या महिलेची काळजी घेत होते; मात्र जानेवारीमध्ये काही कामानिमित्त त्यांना लंडनला जावेलागले. सरोगेट मदरची पूर्ण व्यवस्था करून हेदाम्पत्य पुन्हा लंडनला गेले. दोघेही प्रसूतीपूर्वी येथेयेणार होते; मात्र कोराना काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे भारतात येण्याचे दरवाजेबंद झाले. इकडे कोल्हापुरात सरोगेट मदर असलेल्या महिलेचा रक्तदाब वाढला आणि तिची मुदतपूर्व प्रसूती करावी लागली. बाळाचेपहिलेदर्शन व्हिडिओ कॉलद्वारेघेतले. बाळाला भेटण्यासाठी त्यांनी भारतीय वकिलातीत पाठपुरावा केला.दाम्पत्यापैकी एकालाच विमान प्रवास करण्याची मुभा मिळाली. लंडनहून मुंबई आणि मुंबईतून कोल्हापुरात आल्यानंतर चौदा दिवसांचा क्वारंटाईन काळ संपल्यावरच या महिलेला अनेक वर्षे हिरावलेला मातृत्वाचा आनंद घेता आला.
कर्करोगग्रस्त तरुणाला होणार अपत्यप्राप्त
कोल्हापुरातीलच एका तरुणाला विवाहानंतर अवघ्या काही वर्षात कर्करोगाचे निदान झाले. दीर्घकाळ चालणाऱ्या व त्रासिक ठरणाऱ्या किमोथेरपीसारख्या उपचार पद्धतीमुळे या तरुणाच्या शुक्रजंतूंची क्षमता कमी होणार होती. कालांतराने त्यांना अपत्यप्राप्तीसाठी अडचणी येणार होत्या. ही बाब ओळखून डॉ. पत्की यांनी या तरुणाचे शुक्रजंतू गोठविण्याबाबत सुचविले. या तरुणाच्या आईवडिलांसह पत्नीनेही याला सहमती दर्शविली. किमोथेरपी तसेच कर्करोगावरील इतर उपचारानंतर हा तरुण ठणठणीत बरा झाला आहे. अनेक वर्षांपूर्वी त्याचे गोठवलेले शुक्रजंतू व पत्नीची स्त्रीबीजे यांचा पत्की हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत संयोग घडवून गर्भ तयार केला व मातेच्या गर्भाशयामध्ये त्याचे रोपण करण्यात आले. यामुळेच ही अशक्य वाटणारी गोष्ट वास्तवात आली व कुटुंबामध्ये बाळाचेआगमन झाले.
एक बाळ हरपले; पण दुसऱ्याला जगवल
डॉ. पत्की यांना ३५ वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागले. आपल्या संशोधनातील खुबीमुळे रुग्णांना आनंद प्राप्त करूनदेता आला. याचेच एक उदाहरण म्हणजेबऱ्याचदा जुळी मुले पोटात असताना क्वचित प्रसंगी जुळ्यांमधील एका बाळाचा मातेच्या गर्भाशयामध्येच नैसर्गिक मृत्यू झाल्यास दुसरेबाळ वाचविणे, हेखूप कठीण समजले जाते. मात्र, अशा परिस्थितीतही मृत्यू झालेल्या बालकास ‘जैसे थे’ ठेवून दुसऱ्या बालकाला योग्य पोषणासह त्याची पूर्ण वाढ व्हावी लागते. यात मृत्यू झालेल्या पहिल्या बाळाचा दुसऱ्या बाळावर काही परिणाम होऊ न देता पूर्ण दिवस भरल्यानंतर सुखरूप प्रसूती केली जाते. अशा दहापेक्षा अधिक घटना यशस्वी केल्याचे डॉ. पत्की सांगतात. त्याप्रमाणेच वयाची ४० वर्षे पूर्ण झालेल्या अनेक महिलांना अपत्यप्राप्तीचे सुखही पत्की हॉस्पिटलने दिले आहे.
कोरोनामधील हृदयद्रावक घटना व उपचारांची फुंकर
अगदी काही दिवसांपूर्वीचा प्रसंग. ‘त्या’ जोडप्याच्या लग्नाला १५ वर्षे होऊन गेली. अनेक उपायांनंतरही बाळाची चाहूल लागत नव्हती. मूळचेनगरचे जोडपे कोल्हापुरातील डॉ. सतीश पत्की यांचेनाव ऐकून उपचारासाठी येथे आले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचे औषधोपचार सुरू झाले. काही प्रमाणात त्याला यशही आले. डॉ. पत्की यांच्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने पतीचे शुक्राणू गोठवून ठेवले.पत्नीच्या स्त्रीबीजांसोबत पाच दिवसांचा गर्भही गोठवून ठेवला. मे महिन्यात लॉकडाउन संपला की गोठवलेल्या या गर्भाचेपत्नीच्या गर्भाशयात रोपण केले जाणार होते; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीला कोरोनाने गाठले आणि काही दिवसांतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतक्या वर्षांच्या संसारातील पतीची साथ सुटल्याने पत्नी सैरभैर झाली. फक्त एकच आशा होती, ती म्हणजे पत्की हॉस्पिटलमध्ये त्यांचा गोठवून ठेवलेला गर्भ. तत्काळ हॉस्पिटलशी संपर्कसाधून हा गर्भवाढवून पतीच्या आठवणींसोबत जगण्याची इच्छा पत्नीने व्यक्त केली. पतीचा मृत्यू झाल्यानंतरही मातृत्वाचे सुख मिळवू शकणारा हा प्रसंग फक्त पत्की हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या नवनवीन यशस्वी संशोधनामुळेच अधोरेखित झाला. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्वचिकित्सा तसेच टेस्ट ट्यूब बेबी आदी उपचारांमध्ये ‘पत्की हॉस्पिटल’ हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ब्रँड’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
जुळ्या व तिळ्यांचा स्नेहमेळावा
पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या तब्बल ४०० जुळ्या व तिळ्या बालकांचा स्नेहमेळावा हा एक अनोखा कार्यक्रम ठरला. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली.
www.patkihospitalkolhapur.com
https://www.facebook.com/patkihospitalkolhapur
https://m.youtube.com/channel/UC3ALmQg8pFYUvRypSWdlbpg