स्पर्शही न करता असाध्य आजार बरे करणारे स्वयंपूर्ण उपचार ‘निरामय’चा ऊर्जा आविष्कार

शारीरिक किंवा मानसिक त्रास झाल्यानंतर गोळ्या-औषधं, इंजेक्शन, हॉस्पिटलायझेशन, ऑपरेशन हा मार्ग सर्वांना माहिती आहे. मात्र निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारपद्धतीने मात्र या सर्वांना बाजूला ठेवत रुग्णाला स्पर्शही न करता, असाध्य आजार बरे करण्याची किमया साधली आहे. या उपचारांतून शरीरास ऊर्जा व मनाला शांती मिळते. आजपर्यंत अनेक रुग्णांच्या शरीरातील दोष दूर झाले आहेत. विशेष म्हणजे रूग्ण कुठेही असला तरी फोनवरून उपचार घेऊ शकतो.

स्वयंपूर्ण उपचारांचा आधार काय?

योगशास्त्र आणि निसर्गोपचारावर आधारीत स्वयंपूर्ण उपचार निसर्ग नियमांनुसार कार्य करतात. संपूर्ण निसर्ग हा आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांनी बनलेला आहे. मनुष्य हा देखील निसर्गाचाच भाग असल्याने ही पाच तत्त्वे मनुष्यामध्येही आहेत. शरीरातील टणकपणा म्हणजे पृथ्वी तत्त्व आहे. ओलसरपणा म्हणजे जल तत्व. गरमपणा म्हणजे अग्नी तत्व आणि लवचिकता व आकुंचन प्रसरण म्हणजे वायू तत्व. तर काशाशिवाय काही निर्माणच होत नाही. ही पाच तत्त्व अन्नातून शरीराला मिळतात, जी शरीराचे पोषण करतात. तसेच वातावरणातून या पाच तत्त्वांची ऊर्जा शरीरातील नाड्यांद्वारे प्रवाहीत होते, जी शरीराला प्राण/चैतन्य पुरविते. जेव्हा शरीरातील एखादे तत्त्व कमी होते किंवा वाढते तेव्हा दोष म्हणजेच आजार निर्माण होतो. उदाहरणार्थ – हाडे ठिसूळ झाली म्हणजे शरीरात पृथ्वी तत्त्व कमी झाले. कोणतेही तत्त्व कमी-अधिक झाले तर त्याचा मनावर देखील परिणाम होतो. कमी झालेले पृथ्वी तत्व आत्मविश्वास कमी करते. शांत स्वभाव असणारी व्यक्ती जर चिडचिड करू लागली तर समजावे अग्नीतत्व वाढलेले आहे. त्या व्यक्तीस त्याचवेळी उष्णतेचे विकारही जाणवू लागलेले असतात. शरीरातील एखादे तत्त्व जेव्हा वाढते तेव्हा तिथले इतर एखादे तरी तत्त्व कमी झालेले असते हे निश्चित. अग्नि तत्त्व वाढते तेव्हा मुख्यत्वे जल तत्त्व कमी होते. पृथ्वी तत्त्व कमी होते तेव्हा बहुतांशी वायू तत्त्व आणि अग्नि तत्त्व वाढलेले असते. ऊर्जेमार्फत पाच तत्वांचा समतोल राखण्याचे काम निरामयचे ‘स्वयंपूर्ण उपचार’ करतात. या उपचारांतून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळू शकते.

नक्की हे घडते कसे?

योग्य आहार, विहार आणि विचार ही आरोग्याची त्रिसूत्री आहे. आहार अयोग्य असेल तर योग्य प्रमाणात सप्तधातू (पंचतत्त्व) निर्माण होत नाहीत. अतिरिक्त निर्माण झालेले तत्त्व शरीरात पसरते व इतर तत्त्व कमी करते. अपुरी ताकद मिळालेली पेशी नाड्यांमधुन प्रवाहित होणारा प्राण योग्य प्रमाणात ग्रहण करू शकत नाही. योग्य विहार म्हणजेच आवश्यक चलन-वलन नसेल तर सांधे अशक्त होऊन तिथे वात अडकतो कारण गतीशीलता हा वायूचा स्वभाव आहे. तसेच पचनावरही परिणाम होतो. विचार चुकीचे असतील तर आचार आणि उच्चारही चुकतात. प्रत्येक उच्चारातून निर्माण होणारी चुकीची स्पंदने नाड्यांमध्ये अवरोध निर्माण करतात. ज्यामुळे नाड्यांमधून वाहणारी ही पाच तत्त्वांची ऊर्जा अनेक ठिकाणी अडकते ज्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे नाड्या, चक्र व प्राणमय कोशामध्येनिर्माण झालेले अवरोध म्हणजेच साठलेली अतिरिक्त ऊर्जा स्वच्छ केली जाते, वातावरणात मुक्त केली जाते. तसेच शरीरास आवश्यक ऊर्जा वातावरणातून पुरविली जाते. ज्यामुळे शरीर व मनावर चांगला परिणाम दिसून येतो. हे ऊर्जा उपचार असल्यामुळे रूग्णाला स्पर्श करण्याची गरजच नाही किंवा कोणते औषधही दिले जात नाही. उपचार घेते वेळी रूग्णाने ध्यानस्थ बसणे एवढेच आवश्यक असते. ऊर्जा कुठूनही कुठेही क्षणार्धात पोहोचते, त्यामुळे रूग्ण कुठेही असला तरी फोनद्वारे उपचार घेऊ शकतो. मोबाईलप्रणाली ज्या तत्त्वावर काम करते, त्याच तत्त्वावर ही उपचारपद्धती कार्यरत आहे. जसे की, मोबाईल नंबर डायल केला की क्षणार्धात जगाच्या पाठीवर कुठेही संपर्क साधता येतो. आपल्या मोबाईलमधून निघालेल्या टेलिकम्युनिकेशन लहरी, हजारो मैल दूर असणाऱ्या सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपित होऊन दुसरीकडे जोडल्या जातात. आपले संभाषण सुरू होते तेव्हा त्या ध्वनीलहरी याच प्रणालीतून पलिकडे पोहोचतात. स्वयंपूर्ण उपचारातही असेच घडते. गुरूत्वाकर्षणामुळे जसे आपण जमीनीशी बांधलेले आहोत, तसेच युनिव्हार्सल कनेक्टिव्हिटीमुळे एकमेकांशी सांधलेले आहोत. या कनेक्टिव्हिटी मार्फत हे उपचार केले जातात. यासाठी उपचार घेणाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असते व त्यासाठी त्याने फोन करणे गरजेचे असते.

स्वयंपूर्ण उपचाराची कार्यप्रणाली

निसर्गोपचार आणि योगशास्त्र यांचा समावेश असलेले ऊर्जाउपचार म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. कोणताही आजार तेव्हाच जडतो जेव्हा शरीर किंवा मनात दोष निर्माण होतात. ॲलोपथीमध्ये रूग्णाच्या शरीराचे रोगनिदानशास्त्रीय (पॅथालाॅजीकल) अभ्यास करून रासायनिक औषधे दिली जातात. आर्युवेदात त्रिदोषांचा (वात, पित्त, कफ) अभ्यास करून औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. तसेच स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्वांचा अभ्यास करून त्याच्या संतुलनासाठी रुग्णाला ऊर्जा दिली जाते. ज्यामुळे दोषनिवारण होऊन शरीर व मन हळूहळू पुन्हा सक्रिय होऊ लागते. आजार हळूहळू बरा होत जातो. आहाराकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असते.

रुग्णाची ग्रहणशीलता महत्त्वाची

आजार बरा करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असते ती रुग्णाच्या ग्रहणशीलतेची. मन सकारात्मक असेल तरच शरीर योग्य ग्रहण करते. मनाची ताकद (विलपाॅवर) चांगली असणारी व्यक्ती मोठ्या आजारावरही मात करते. मात्र मन कमकुवत असेल तर साधे दुखणेही रौद्र रूप धारण करू शकते. कोणतीही क्रिया करताना आधी मनात विचार करावा लागतो. विचाराप्रमाणे शरीर कृती करते. त्यामुळे रुग्णाने उपचार घेताना सकारात्मक विचार केल्यास शरीराची ग्रहणशीलता वाढते. रुग्ण लवकर रोगमुक्त होऊ शकतो.

असाध्य आजारही होतात बरे

२००१ साली मेजर हार्ट ब्लॉकेज असल्यामुळे तातडीने बायपास सर्जरी गरजेची असताना डॉ. योगेश यांच्या आईने त्यास नकार दिला. ऑपशनशिवाय या ३० दिवसांपेक्षा जास्त जगणार नाहीत असे सांगूनही स्वतःच्या जबाबदारीवर त्यांना घरी आणले गेले आणि तिथून सुरु झाले शोध आणि प्रयोग. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात तेच खरे! यातूनच जन्म झाला स्वयंपूर्ण उपचारांचा. ज्याच्या परिणामस्वरूप योगेशजींच्या आई पुढे १० वर्षे निरोगी जीवन जागल्या. त्यांचा अनुभव बघून अनेकांनी या उपचारांचा लाभ घेतला. हाडांच्या ठिसूळपणामुळे मांडीचे मोडलेले हाड कधीच सांधले जाणार नाही असा रिपोर्ट असणाऱ्या मराठे आजी याच ऊर्जा उपचारांनी बऱ्या झाल्या. २००९ सालापर्यंत योगेशजी विनामोबदला हे उपचार अनेकांना देत होते. आईची आज्ञा, मराठे आजींचा आग्रह आणि अनेक रुग्णांच्या इच्छेखातर २०१० साली निरामायची स्थापना झाली. आजवर १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे. ज्या आजारावर उपाय सापडला नाही तो असाध्य. पण सापडला नाही याचा अर्थ तो नाहीच असा होत नाही. जोपर्यंत त्या उपायापर्यंत आपण पोहोचत नाही तोवरच तो आजार असाध्य असतो. ज्या आजारांवर औषध नाही अश्या वेगवेगळ्या आजारातून आजवर अनेक रुग्ण स्वयंपूर्ण उपचारांनी बरे झाले आहेत. असे काही अनुभव ‘निरामय वेलनेस सेंटर’ या युट्यूब चॅनेलवर आपल्याला पाहता येतील. रोग पाळायचा नाही तर तो बरा करायचा, या विश्‍वासावर ‘निरामय’ काम करते.

रूग्णांनी कसा करावा विचार

उपचारादरम्यान रूग्णांना एक प्रार्थना लिहून दिली जाते. त्यात त्यांना त्यांच्या आई-वडीलांचे स्मरण करण्यास सांगितले जाते. कारण आपले अस्तित्त्व त्यांच्यापासूनच आहे. ज्यांवर आपली श्रद्धा आहे अशा परमेश्वराला किंवा गुरूंना स्मरून संकल्प करायचा, माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे दोष असतील ते त्त्वरित मुळापासून नष्ट होऊ देत आणि मला संपूर्ण आरोग्य मिळू दे. हा सकारात्मक विचार करण्यासाठी त्यांना प्रेरित केले जाते. ज्यामुळे मेंदूला योग्य सूचना जाऊन पेशींकडूनही योग्य कार्य होऊ शकते. मनामध्ये जर शंका असेल किंवा नकारात्मकता असेल तर योग्य रिझल्ट मिळत नाहीत. कारण जसा विचार, तसा आचार. आणि जसा आचार तसा परिणाम होत असतो. मनाची शक्ती आपल्याला काय हवे आहे त्या विचाराला दिली तर तसे घडते. काय नको त्या विचाराला दिली तर तसे घडते. कृती आणि विचार एकाच मार्गाने गेले तर रिझल्ट लगेच मिळतात.

ऊर्जा म्हणजे काय?

योगशास्त्रात या ऊर्जेला ‘प्राण’ म्हटले आहे. वातावरणातून हे पंचप्राण (पाच तत्वांची ऊर्जा) शरीरातील प्रत्येक पेशी श्वासरुपाने घेत असते आणि वापरून झालेली ऊर्जा उत्सर्जित करीत असते. ही क्रिया सूक्ष्म देहामध्ये अविरत सुरू असते. हा सूक्ष्म देह कुठे आहे, ते आधी समजून घेऊ. तैत्तरीय उपनिषद आणि योगशास्त्रामध्ये माणसाचे अस्तित्व हे सात कोषात सांगितले आहे. पहिला कोष म्हणजे अन्नमय कोष-अन्नावर पोसला जाणारा म्हणनू अन्नमय कोष, स्थूल देह किंवा दृष्य भौतिक शरीर. त्यानंतरच्या चार कोषांना सूक्ष्म देह किंवा ऊर्जादेह म्हटले आहे. अनुक्रमे प्राणमय कोष-प्राण किंवा ऊर्जाकिंवा चैतन्याने भरलेला कोष, मनोमय कोष-मानातील विचार व भावभावनांचा साठा असलेला कोष, विज्ञानमय कोष-अभ्यासाअंती मिळालेल्या ज्ञानाचा संग्रह असलेला कोष, आनंदमय कोष-निखळ आनंदाने भरलेला कोष. त्यानंतर येतो कारण देह म्हणजे आत्मिक कोष जिथे आत्म्याचा वास आहे आणि सातवा महाकारण देह म्हणजे पारमात्मिक कोष जिथे परमात्म्याचा वास आहे. स्थूल देहातील प्रत्येक गोष्ट वस्तूनिष्ठ आणि जड आहे. सूक्ष्म देहातील प्रत्येक गोष्ट ऊर्जास्वरूप आणि तरल आहे. कारण देह आणि महाकारण देह प्रकाशरूप आहेत. आपल्याला स्थूल देह म्हणजे भौतिक शरीर माहित आहे पण सूक्ष्म देहाची जाणीवच नाही. जसे आपल्या शरीरात अवयव आणि रक्तवाहिन्या असतात. तसेच आपल्या सूक्ष्म देहात सप्तचक्र आणि नाड्या असतात. ग्रहण केलेल्या अन्न, पाणी व श्वासावर जसे प्रत्येक अवयव वेगवेगळी प्रक्रिया करून पोषकद्रव्य, सप्तधातू शरीरास पुरवतात. तसेच ग्रहण केलेल्या ऊर्जेवर प्रत्येक चक्र प्रक्रिया करून वेगवेगळी तत्व शरीर व मनास पुरवतात. मूलाधार चक्र पृथ्वीतत्त्व, स्वाधिष्ठान चक्र जलतत्त्व, मणिपूर चक्र अग्नीतत्त्व, अनाहत चक्र वायूतत्त्व, विशुद्धी चक्र आकाशतत्त्व, आज्ञा चक्र महततत्त्व (सर्व तत्वांना नियंत्रित करणारे तत्त्व) तर सहस्रार चक्र परमतत्त्व (जीवन देणारे तत्त्व) पुरवते. अन्नातून ताकद मिळते आणि प्राण किंवा ऊर्जेतून चैतन्य मिळते. आपले विचार आणि उच्चार काही स्पंदने निर्माण करतात. जी मनोमय कोषामध्ये साठतात. अनावश्यक आणि अति विचार आणि आचार नाड्यांमध्ये अवरोध निर्माण करतात. ज्यामुळे ऊर्जा असंतुलित होते व रोग निर्माण होतो.

कसे घ्यायचे उपचार?

‘निरामय’मध्ये अपाॅईंटमेंट घेऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन डाॅक्टरांना भेटून स्वयंपूर्ण उपचार सुरू करता येतात. ज्याचे शुल्क असते ₹ 200/- मात्र. तत्पूर्वी रुग्णाचा फोटो, वैयक्तिक माहिती व आजारासंबंधी सविस्तर माहिती घेतली जाते. काही रिपोर्ट असल्यास त्यांची नोंद होते. (रिपोर्टनसतील तर ते काढण्याची आवश्‍यकता नाही.) भेटी दरम्यान डाॅक्टर हे रूग्णाच्या ऊर्जा देहाचे परिक्षण करतात. (रूग्ण इस्पितळात असेल तर त्याच्या लेटेस्ट फोटोवरून देखील ऊर्जापरिक्षण होऊ शकते) त्यातील पंचतत्वांचा असमतोल शोधून त्याच्या संतुलनासाठी दुरूनच नाड्यांची स्वच्छता केली जाते व ऊर्जा पुरवली जाते. योगशास्त्रातील मुद्राभ्यासानुसार हाताचे प्रत्येक बोट वेगवेगळे तत्त्व प्रदर्शित करते. पाच बोटांतून (नाड्यांमधून) पाच तत्त्व प्रवाहित होतात. बोटांच्या ऊर्जेद्वारे डॉक्टर रूग्णाची ऊर्जा तपासतात. साठलेली अनावश्यक ऊर्जा मुक्त करतात आणि आवश्यक ऊर्जा ही चक्रांना व सूक्ष्म देहाला पुरविली जाते. या उपचारांना 5 ते 15 मिनीटे लागतात. उपचार सुरू असताना रूग्णाला हाताची काही ठराविक मुद्रा करून, शरीर शिथील सोडून, मन शांत करून, डोळे मिटून ध्यानस्थ बसावे लागते. (रूग्ण बसू शकत नसेल तर झोपूनही उपचार घेता येतात.) पुढील उपचार फोनवरून दुरस्थ पद्धतीने दिले जातात. दररोज किती उपचार घ्यायचे हे रूग्णाचा आजर किती बळावलेला आहे आणि ऊर्जेची निकड किंवा गरज किती आहे यावर ठरते. प्रत्येक रूग्णासाठी उपचारांची वेगळी रूपरेषा असते. निरामयचे उपचारक आपण फोन केल्यानंतर त्या रूपरेषेप्रमाणे उपचार देतात. प्रत्येक फोन उपचारांचे शुल्क ₹ 50/- मात्र आकारले जातात.

उपचार घेणे आहे सोप

एकदा समक्ष किंवा ऑनलाईन भेटल्यानंतर पुढील वेळी रूग्णाने निरामयच्या हिलिंग सेंटरमध्येफोन करायचा असतो. फोनवर रूग्णाचा नोंदणी क्रमांक आणि नाव सांगितल्यावर निरामयचे उपचारक आपल्याला ‘बसा! उपचार करूया.’ असे म्हणतात. फोन बंद करून आपण जिथे कुठे असू, तिथे 5 ते 15 मिनीटे उपचार घेण्यासाठी समान मुद्रा करून शांत बसावे लागते एवढेच. रूग्ण उपचार घेण्याच्या स्थितीत नसेल तर, त्याच्यासाठी सख्खेनातेवाईक किंवा खूप जिव्हाळ्याचे नातेसंबंध असणारी व्यक्तीही उपचार घेऊ शकते. कारण रक्ताच्या किंवा मनाच्या नात्यामुळे आपल्यात एक दृढ ऊर्जाबंध निर्माण झालेला असतो. हा कनेक्ट वापरून रूग्णापर्यंत ऊर्जा पोहोचवता येते. उदाहरणार्थ – जर रूग्ण आयसीयूमध्ये असेल किंवा मनोरूग्ण असेल तर त्याला मुद्रा करणे, शांत बसणे शक्य नाही. अशा वेळी त्या रूग्णासाठी त्याची जवळची व्यक्ती (कुठूनही लांबूनदेखील) उपचार घेते. त्या दोघांमध्ये असलेल्या ऊर्जाबंधामार्फत रूग्णापर्यंत उपचार पोहोचवले जातात. रुग्ण 24 तासात कधीही त्याच्या सोयीनुसार उपचार घेऊ शकतात.

अनुभव

गेल्या दहा वर्षांत मला तीनदा टीबी झाला. डॉक्टरांनी तर मला लोबेक्टॉमी (फुप्फुसाचा काही भाग काढू न टाकणे) करायला सांगितली होती. पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं. ऑलोपॅथीची औषधं घेऊन आणि डॉक्टरांचे सल्ले ऐकून मी वैतागले होते. ऐकायला कमी येणे, सतत वजन कमी होणे, असे दुष्परिणाम मला जाणवत होते. तेवढ्यात ‘निरामय’ संदर्भातील ले ख वाचला आणि एक शेवटचा पर्याय म्हणून याकडे पाहू लागले. माझ्या नशिबाने मला योग्य वेळी या उपचारांबद्दल कळले व माझे आयुष्यच बदलून गेले. आता मला व्यवस्थित ऐकू येते. शांत झोप लागते व वजनही वाढत आहे. डॉ. चांदोरकर मला भेटले नसते तर आज मी या सुस्थितीत नसते. १० महिने चाललेल्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे माझी फु फ्फुसे व्यवस्थित कार्यरत झाली असून माझी लोबेक्टॉमीही रद्द झाली आहे.

– अर्चना रावले, बेंगलूर

मला गरोदर राहण्यात अडचणी येत होत्या. मात्र दोष जाणण्यासाठी टेस्ट केल्या तर दोघांचे रिपोर्ट नॉर्मल येत. प्रेगन्सी राहण्यासाठी मी चार वर्षे विविध उपचार घेतले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही उलट साईट इफेक्ट होवू लागले. त्यामुळे सर्वच गुंतागुंतीचे झाले. तेवढ्यात मला ‘निरामय’बद्दल समजले. ‘निरामय’मध्ये आम्ही दिवसातून तीनदा उपचार घेवू लागलो. त्यानंतर तीन महिन्यांतच मी गरोदर राहिले. आम्हाला छान निरोगी व निरामय बाळ झाले.

– रिया गुजर, चिपळूण

दुसऱ्या डिलिवरीनंतर मला खूप त्रास झाला. २०१७ साली मी नैराश्‍यात गेले. नुसती झोपत असे व अशक्तपणाहि आला होता. सर्व टेस्ट के ल्या त्याचे रिपोर्ट नॉर्मल होते. पण निदान काही होर्इना. त्यानंतर मला ओसीडी (मनोविकाराशी संबंधित आजार) असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा आम्ही निरामयमध्ये उपचार सुरू के ले. त्यानंतर काही दिवसांतच फरक दिसायला लागला आणि आता मी पूर्ण बरी झाले. आता उलट माझ्यात पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्‍वास आला आहे.

– रूपाली हजारे, कोल्हापूर

माझ्या ८० वर्षाच्या आईला एके दिवशी रात्री अचानक उलट्या सुरू झाल्या. रुग्णालयात नेले तर तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिला तीन महिन्यांनी घरी आणले पण तिला ना बोलता येईना, ना चालता. त्यावेळी माझ्या भावजयीकडू न ‘निरामय’बद्दल समजले. उपचार सुरू केल्यानंतर १५ दिवसांतच आईची हालचाल व जेवण सुरू झाले. पुढे काही दिवसात ती आमच्याबरोबर सगळे क्षण आनंदात जगू लागली.

– दीपा सबनीस, मुंबई

मी ६३ वर्षांची असून मला डायबेटीसचा त्रास होवू लागला. मणक्यातील नस दबल्यामुळे मला चालणेही मुश्‍कील झाले होते. औषधे घेऊनही फरक पडत नव्हता. ‘निरामय’चा कार्यक्रम पाहिला तेव्हा मीही उपचार घेण्याचे ठरवले. उपचार सुरू के ल्यानंतर १५ दिवसांतच मला बरे वाटायला लागले. त्यानंतर मी स्वतःचे पोळीभाजी केंद्र सुरू केले. हा माझा पुनर्जन्म असून त्याचे श्रेय ‘निरामय’ला जाते.

– ज्योती वैती, मुंबई

ऑगस्ट 2011 मध्ये मला खोकला व दम लागू लागला. सर्व तपासण्या केल्या, त्यामध्ये असे कळले की, लंग्ज फायब्रोसीस हा आजार झाला आहे. सप्टेबर 2012 मध्ये डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहिली आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू के ली, हळूहळू फरक जाणवू लागला. तीन महिने सलग ट्रीटमेंट घेतल्याने पुन्हा के लेल्या तपासण्यांध्ये फरक दिसला. त्यानंतर मी तीन महिन्यांसाठी दुबईला गेले. तिथूनही फोनवरून ट्रीटमेंट चालू होती. सलग दीड वर्षे उपचार घेऊन, या असाध्य आजारातून मी आता पूर्णपणे बरी आहे.

– कुसूम शेट्टी, मुंबई

आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नाही तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येणं, जे काही सुख आपल्या जवळ आहे ते उपभोगता येणं म्हणजे आरोग्य. शारीरिक, मानसिक आणि आंतरिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. ज्यांना असे आरोग्य हवे आहे त्यांच्यासाठी आहेत ‘स्वयंपूर्ण उपचार’.

– डॉ. अमृता चांदोरकर,
एमडी (अल्टरनेटिव्ह मेडिसिन) संचालक, निरामय वेलनेस सेंटर

आपले प्राचीन शास्त्र संपूर्णतः ऊर्जेवर आधारित आहे. मानवाने निरोगी रहावे यासाठी आखून दिलेले नियम म्हणजेच संस्कृती. याचे पालन केल्यास शरीरावर आणि मनावर अत्यंत चांगला परिणाम होतो. अभ्यासादरम्यान हे मला समजले आणि तेच सर्वांपर्यंत पोहोचावे व सर्वांना त्याचा लाभ व्हावा यासाठीच निरामयचा जन्म झाला.

– डॉ. योगेश चांदोरकर,
एमडी (अल्टरनेटिव्ह मेडिसिन) संचालक, निरामय वेलनेस सेंटर

प्राचीन शास्त्रांमागील विज्ञान काय आहे? त्याचा शरीर व मनावर कसा परिणाम होतो? याची माहिती तसेच उपचारांविषयीची माहिती, रूग्णांचे अनुभव इ. व्हिडीओ निरामय वेलनेस सेंटर या युट्युब चॅनलवर आपल्याला पहाता येतील. चॅनलला भेट देवून त्याला सबस्क्राईब नक्की करा. दर रविवारी दुपारी २.३० वाजता साम मराठीवर ‘निरामय जीवन’ हा कार्यक्रम जरूर बघा.

अपॉईंटमेंटसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

निरामयच्या शाखा :

पुणे – ७०२८०८११५८, चिंचवड – ७०२८०८११५९, मुंबई – ७०२८०८११६०, कोल्हापूर – ७०२८०८११५७

संकेतस्थळ – www.niraamay.in | मेल आयडी – niraamaywellness@gmail.com

English