मेटारोल इस्पात ‘स्टील उद्योगातील रोलमॉडेल

पारंपरिक व्यवसायाला फाटा देत उद्योग क्त्षेरात काहीतरी वेगळे करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने काही तरुणांनी एकत्र येऊन स्टील उद्योगात उतरण्याचा निरय्ण घेतला. त्यानंतर वर्ष १९९६ मध्ये नऊ जणांनी एकत्र येऊन औद्योगिक वसाहत येथे एक प्लॉट घेतला. सर्वप्रथम स्टील उद्योगात माऊली स्टीलच्या रूपाने इंगट बनवण्याची कंपनी सुरू केली. त्यानंतर सुरू झालेल्या या उद्योगाने मेटारोल इस्पातच्या रूपाने भरारी घेतली आहे. अर्थात, यामागे अथक परिश्रम, स्टील उद्योगक्त्षेराला दिशा देण्याची प्रखर इच्छाशक्तीही आहे.

स्टीलनिर्मितीचा प्रवास थक्क करणारा

औद्योगिक वसाहतीत माऊली स्टीलमध्ये सुरवातीला तीन हजार टन इंगट तयार केले जात होते. विशेष म्हणजे स्टील उद्योगाचा कुठलाही अनुभव नसताना केवळ इच्छाशक्ती व मेहनतीच्‍या जोरावर स्टील उद्योगात उतरून शिकत, सावरत वाटचाल सुरू केली. इंगटच्या पुढची पायरी म्हणून पिळदार सळई निर्माण करण्याचा विचार या नऊ जणांनी केली. ही पिळदार सळई तयार करणारी बंद पडलेली एक मिल वर्ष १९९९ मध्ये चालविण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली. त्यानंतर ही मिल खरेदी करण्याचा प्रस्ताव बॅंकेकडे ठेवला आणि वर्ष २००३ मध्ये एक रोलिंग मिल विकत घेऊन पिळदार सळई निर्माण करण्यास सुरवात झाली. हा व्यवसाय पुढे जात असताना २००४ मध्ये स्टील उद्योगावर असलेल्या एका चर्चासत्रात सहभागी झाल्यानंतर जर्मनी येथे टीएमटी बार सळई वापरली जात आहे. ही सळई गंजरोधक, अधिक मजबुती, अधिक गुणवत्ता देणारी आहे. त्यामुळे जर्मनीची उपकंपनी असलेल्या एच. अॅण्ड के. स्टील कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर महाराष्ट्रात टीएमटी स्टील निर्मितीचा पहिला प्रकल्प जालना येथे सुरू केला.

सुरवातीला टीएमटी स्टील हे बाहेरून कडक व आतून नरम असल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले, त्यामुळे पुणे येथे इंजिनिअर, प्राध्यापक, बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन टीएमटी स्टील संदर्भातील चर्चासत्र आयोजन केले. या चर्चासत्रानंतर पुणे व परिसरातून टीएमटी स्‍टीलची मागणी वाढली. त्यानंतर २००५ मध्ये इंगटपेक्षा बिलेटची मागणी अधिक असल्याने ते निर्माण करण्यात सुरुवात केली. त्या वेळी ती भारतातील सर्वांत मोठी कंपनी होती. देशामध्ये वर्ष २००८-०९ नंतर २५ मजल्‍यांच्‍या इमारती बांधण्यासाठी परवाने मिळाली. त्यामुळे शुद्ध स्टीलची गरज असल्याने लॅडर रिफायनरी करण्यास सुरू केले. त्यानंतर स्टील रिफायनर करून स्टील निर्मितीस सुरवात केली. परिणामी स्टीलची गुणवत्ते वाढ झाली. त्यामुळे २५, ५० मजल्‍यांच्‍या इमारतीसाठी सदरील स्‍टील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्‍याने मोठी मागणी वाढली. तेव्हाची माऊली स्टील ते आजची मेटारोल स्टील निर्मितीचा प्रवास थक्क करणारा असून मेटारोलमध्ये सर्व प्रकारच्या सळया आज आपल्‍या देशातील जवळपास सर्वच राज्यांत तसेच इतर देशांमध्येही जात आहेत.

गुजरातच्या कच्‍छमध्ये मेटारोलचे स्टील

वर्ष २००२ मध्ये गुजरात राज्यातील कच्‍छ येथे भूकंप झाला होता. हा भूकंप एवढा तीव्र होता की, या ठिकाणी असलेल्‍या आरसीसी इमारतीही कोसळल्‍या होत्‍या. यानंतर तज्‍ज्ञांकडून याची समीक्षा केली असता असे दिसून आले होते की, कमकुवत स्‍टील वापरल्‍यामुळे या इमारती जमीनदोस्त झाल्‍या होत्‍या. तेथे शासनकर्त्यांनी त्‍यास पर्याय म्‍हणून FE ५०० ग्रेड असणारेच स्‍टील इथून पुढे बांधकामासाठी वापरण्यात यावे, असे स्‍पष्ट निर्देश दिले होते. त्‍यानुसार गुजरात राज्‍यात देशातील तीन ते चार FE ५०० स्‍टील उत्‍पादन करणाऱ्या कंपन्‍यांकडून स्‍टील मागणी करण्यात आली होती. त्‍यावेळी मेटारोलचे स्‍टील खूप मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. त्‍यानंतर या ठिकाणी कंपनीच्‍या स्‍टीलला मोठी मागणी वाढली. त्‍यास आजपर्यंत भरघोस प्रतिसाद मिळत आहे. गुणवतापूर्ण स्‍टीलमुळेच कच्‍छ (गुजरात) येथील सर्व बांधकामे व नर्मदा कॅनॉलचा सर्वाधिक भाग हा मेटारोल स्टीलने उभारण्यात आलेला आहे. दरम्‍यानच्‍या काळात आम्‍ही वापरत असलेले तंत्रज्ञान महाराष्ट्रातील इतर कंपन्‍यांना देण्यात येऊ नये यासाठी कंपनीने वर्षाला ठराविक रक्कम कंपनीस रॉयल्‍टी वाढवून द्यावी, अशी अट घातली; परंतु वापरत असलेले तंत्रज्ञान केवळ मेटारोल कंपनीपुरतेच न ठेवता इतर स्‍टील कंपन्‍यांनाही मिळावे, यासाठी कंपनीने पुढाकार घेतला. त्‍यामुळे आता देशात गुणवत्तापूर्ण टीएमटी स्टीलची निर्मिती करणाऱ्या कंपन्‍यांमध्ये वाढ झाली आहे. याचा आजही आत्मिक आनंद असल्याने कंपनीचे संचालक मंडळ नमूद करते.

तंत्रज्ञानामुळे प्रदूषणावर नियंत्रण

आधुनिकतेच्‍या युगात स्टील उद्योगातील होणारे बदल लक्षात घेऊन २०१४ मध्ये हॉट रोल्ड बिलेट रोलिंग तंत्रज्ञान वापरण्यास सुरू केले. त्यामुळे स्टीलसाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कोळसा व ऑइल यांची बचत झाल्याने प्रदूषणावरही नियंत्रण मिळविण्यात यश आले.

संघर्षातूनही उद्योग नावारूपाला

कोणताही उद्योग सुरू करताना भांडवल असणे गरजेचे आहे. त्यावेळी सर्वांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. त्यामुळे अनेकांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरविले. ही मिल बॅंकेकडून घेताना काही ठराविक रक्कम भरण्यासाठीही मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले होते. परंतु, सर्वजण एकत्र असल्‍याने ती वेळ कशीबशी निघून गेली. पुढील काळात बँकेने करत असलेले काम, गुणवता लक्षात घेऊन पुन्‍हा कर्जपुरवठा केला. दरम्‍यानच्‍या काळात स्‍टील उद्योगामध्ये तेजी-मंदीचा काळ होता. वर्ष १९९६ ते २०२१ म्‍हणजे आजपर्यंतच्‍या २५ वर्षांच्‍या कालखंडात चार ते पाच वेळा मंदीच्‍या झळा सोसाव्‍या लागल्‍या आहेत. त्‍यामुळे मोठ्या संघर्षातूनही हा उद्योग आज नावारूपाला आला आहे व सुस्‍थितीत आजही प्रगतिपथावर आहे.

ग्राहकांचा विश्‍वास

वर्ष १९९६ मध्ये सुरू केलेली स्टील उद्योग आज प्रत्येकाच्या मनामनात आहे. बांधकाम क्षेत्रात आज ग्राहक बाजारामध्ये प्रामुख्याने मेटारोलच्‍या स्‍टीलची मागणी करतात. त्‍यामुळे ग्राहकांच्‍या मनात आम्‍ही विश्‍वास निर्माण करण्यात यशस्‍वी झालो आहोत याची ही पोहच पावतीच आहे.

कंपनी बनली आहे कुटुंब

स्टील उद्योग सुरू करताना केवळ पैसा कमवावा ही एकमेव उद्देश नव्हता. त्यामुळे कंपनीमध्ये काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हे एक कुटुंब बनले आहेत. दुसऱ्या पिढीला स्टील उद्योग देताना केवळ पैशाच्या मागे न लागता गुणवत्ता कायम ठेवणे तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्‍मसात करून त्‍याची निर्मिती करण्याचा मूलमंत्र दिला जाणार आहे. ग्राहकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून जोपर्यंत व्‍यवसाय केला जात नाही, तोपर्यंत त्‍यामध्येयशस्‍वी होता येत नाही.

रोजगारासह कुशल मनुष्यबळ निर्मिती

स्टील उद्योगामध्ये दोन पद्धतीचे काम असतात. एक म्हणजे हॉट वर्क व कोल्ड वर्क. पूर्वी स्टील कंपनीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार अशा इतर राज्यातील मजूर काम करत होते. परंतु, शासनाच्या निर्देशानुसार ८० टक्के रोजगार हा स्थानिक लोकांना देण्याचा निर्णय पाळला जात आहे. तसेच स्टील उचलण्यासाठी मनुष्यबळाचा वापर न करता मशिनरीच्‍या साहाय्याने हे काम केले जात आहे. तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्टील रोलिंग मिल हा अभ्यासक्रमही शासनाला तयार करून देण्याबाबतही सहकार्य केले आहे. राज्यातील स्टील उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ येथे निर्माण झाले पाहिजे, त्या दिशेने मेटारोलची वाटचाल सुरू आहे.

लक्ष्मी कॉटस्पीनची घोडदौड

स्टीलसोबत इतर उद्योगातही काही तरी नवीन करावे अशा विचाराने वर्ष २००७ मध्ये मराठवाड्यात पहिल्‍यांदाच लक्ष्मी कॉटस्पीन लिमिटेड नावाने मिल सुरू करण्यात आली. कपडानिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चामालावर या ठिकाणी प्रक्रिया करण्यात येते. सुमारे ३० हजार क्विंटलची निर्मिती करणारी मिल असून, मराठवाड्यातील ही पहिली खासगी मिल आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कापसावर आधारित काही उद्योग असावा, या हेतूने लक्ष्मी कॉटस्‍पीनची निर्मिती करण्यात आलेली आहे. या उद्योगाचीही घोडदौड सुरू आहे.

ज्ञानदानाचेही कार

मेटारोल कंपनीच्या माध्यमातून वर्ष २००४ मध्ये ऋषी विद्या फाउंडेशन ही शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी या शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. गतवर्षी या संस्‍थेची पहिली दहावीची बॅच निघाली आहे. आजमितीला या शाळेच्‍या तीन सुसज्ज इमारती उभारण्यात आल्‍या असून, यातून गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे काम अविरत सुरू आहे.

जलसंवर्धनावर भर

जालना जिल्‍हा हा अवर्षणप्रवण क्षेत्रात काही प्रमाणात मोडतो. त्‍यातल्‍या त्‍यात शहरातील पिण्याच्‍या पाण्याची अत्‍यंत गंभीर समस्‍या काही वर्षांपूर्वी होती. संपूर्ण स्‍टील उद्योगासह इतर उद्योगांना पाणी विकत घ्यावे लागत होते. पाण्याच्‍या बाबतीत आपण स्‍वयंपूर्ण असावे, या हेतूने कंपनीच्‍या परिसरात जागा विकत घेऊन या ठिकाणी १२ कोटी लिटर क्षमतेचे प्रशस्‍त शेततळ्याची निर्मिती केली आहे. त्‍याचबरोबर पाण्यासाठी काम करणाऱ्या शहरातील अनेक सामाजिक संस्‍थांसह नदी-नाले खोलीकरणासह इतरही कामे केली असून, अनेक कामांना आर्थिक साहाय्यही केले आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

उच्च दर्जाच्या स्टील निर्मितीसाठी उच्च प्रतीचा कच्चामाल व टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या बाबींवर सतत लक्ष केंद्रित करून उच्च प्रतीच्या स्टीलची निर्मिती केली जात आहे; तसेच नवनवीन तंत्रज्ञानही आत्मसात केले आहे.

– आशिष भाला,
संचालक, मेटारोल इस्पात प्रा. लि.

मेटारोल स्टील

  • १९९६ पासून स्टील उद्योगाचा अनुभव
  • गुजरात भूकं पानंतर कच्छ शहरातील बांधकामांना मेटारोलचे स्टील
  • नर्मदा कॅनॉलचा सर्वाधिक भाग हा मेटारोल स्टीलचा पुरवठा
  • मराठवाड्यातील पहिला खासगी लक्ष्मी स्प्रिनिग मिल मेटारोलची
  • ऋषी विद्या फाउंडेशन शाळेच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची जडणघडण
  • नाले, नदी खोलीकरण कामासाठी आथिर्क मदतीचा हात

आत्मनिर्भर भारताचे ध्येय

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा के ली आहे, परदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग देशात विविध वस्तूंचे दर्जेदार उत्पादन करण्यावर त्यांचा भर आहे. ही बाब मेटारोलच्या व्यवस्थापनाने लक्षात घेतली. त्यामुळेच मेटारोल स्टील ही एकमेव भारतीय कं पनी आहे, जी हाय टेन्साइल थ्रेडेड रिबार तयार करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि एनएचएआयसाठी हे उत्पादन खुप उपयुक्त आहे. थ्रेडेड रिबार (अँकर बोल्ट) हे घाट, डोंगर आणि पदपथावरील रस्ते अपघात टाळण्यास मोठी मदत करतात. जगभरात अशा दर्जेदार स्टीलचे उत्पादन करणाऱ्या फक्त नऊ कं पन्या आहे ज्या थ्रेडेड रिबार तयार करतात. मेटारोल स्टील ही त्यापैकी एकमेव भारतीय उत्पादक आहे. भारतात या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आजपर्यंत हे बोल्ट चीन आणि इतर पाश्‍चिमात्य देशांमधून खूप जास्त किमतीवर आयात के ले जात होते. भारतात उत्पादन करून, मेटारोल स्टील आपले परकीय चलन वाचवले आहे. हे केंद्र सरकारने सुरू के लेल्या आत्मनिर्भर भारत मिशनची मूल्ये दर्शवते, असेही डी. बी. सोनी यांनी सांगितले. दरम्यान, यासाठी कं पनीचे संचालक आशिष भाला यांचा यात सिंहाचा वाटा असल्याचेही सोनी यांनी आवर्जून सांगितले. उच्च दर्जाचे अभियंते, तंत्रस्नेही कामगार आणि ग्राहकांचा विश्‍वास यावर आमच्‍या कं पनीने आजवर वाटचाल केली असून, भविष्यातही अधिक दर्जेदार उत्पादन करण्यावर आमचा भर राहणार आहे.

थ्रेडेड रिबारचे देशात पहिल्यांदाच उत्पादन

  • आत्मनिर्भर भारतासाठी मेटारोल इस्पातचे योगदान
  • चीनसह युरोपीय देशातील आयातीला देशांतर्गत पर्याय

स्टील उत्पादनात मागील २५ वर्षांपासून आघाडीवर असलेल्या जालन्यातील मेटारोल इस्पातने नेहमीच काळानुरूप बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरली आहे. याचाच एक भाग म्हणून टीएमटी तंत्रज्ञानासह मेटारोल स्टील ही देशातील एकमेव भारतीय कं पनी जी उच्च ताणक्षमतेचे हॉट रोल्ड थ्रेडेड रिबार तयार करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि NHAI साठी हे उत्पादन खुप उपयुक्त आहे. थ्रेडेड रिबार (अँकर बोल्ट) हे घाट, डोंगर आणि पदपथावरील रस्ते अपघात टाळण्यास मदत करतात. भूकंप आणि भुस्खलन होणाऱ्या भागातही टिकाव धरू शके ल अशा स्टीलची घर, इमारती बांधणीसाठी लोखंडी सळयांची निर्मिती के ली जात असल्याची माहिती कं पनी व्यवस्थापनाने दिली आहे. संपूर्ण देशात दर्जेदार स्टील निर्मितीसाठी जालना ओळखले जाते. साधारणपणे २५ वर्षांपासून मेटारोल इस्पातकडून स्टीलचे उत्पादन घेतले जात असून, त्यांनी जर्मन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २००४ मध्येच टीएमटी हे तंत्रज्ञान आणून त्यापासून उत्पादन सुरू के ले. २००४ मध्ये मेटारोल पण प्रथमच जर्मन थर्मेक्स टेक्नॉलॉजी आणि मेटारोलचे भारतीय संशोधन यांचा मिलाफ करत लवचिकता, मजबुतीसाठी नुकत्याच बाजारात आलेल्या तंत्रज्ञानाचा पाया पहिल्यापासूनच रचला आहे. आज टीएमटी सळई बार वापरून जवळपास शंभर टक्के बांधकाम के ले जाते. उच्च तंत्रज्ञानाचा वापर के ल्यामुळे मेटारोल स्टीलला ISO १४००१-२०१५ मिळाला आहे. हा ISI १७८६ आणि ISI २८३० असलेला टीयूव्ही प्रमाणित गट आहे. हा उच्चस्तरीय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याच्या सेटअपमध्ये ३० एमटी क्षमतेच्या २ इंडक्शन फर्नेसचा समावेश आहे. लॅडल रिफायनरी फर्नेस (एलआरएफ) टेक्नोलॉजीसह मेटारोल इस्पात हे महाराष्ट्रातील शुद्ध स्टीलचे अग्रगण्य उत्कृष्ट उत्पादक असून यात CASTER आणि आधुनिक रोलिंग मिलचाही समावेश असल्याची माहिती संचालक आशिष भाला यांनी दिली. मेटारोल गुणवत्ता पॅरामिटर्सशी कधीही तडजोड करत नसल्यानेच आज या कं पनीच्या उत्पादनास देशासह परदेशातून मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले. कं पनीने गुणवत्ता तपासणीसाठी तृतीय पक्ष तपासणीवर भर दिला आहे. एसजीएस इंडीया तर्फे ऑनलाईन तपासणीद्वारे उत्पादनाची गुणवत्ता राखली जाते असे मेटारोल इस्पातचे व्यवस्थापकीय संचालक डी. बी. सोनी यांनी सांगितले.

मेटारोल सळईचे फायदे

मेटारोलच टीएमटी सळई बारची शक्ती अद्वितीय आहे. उच्च दर्जाचे उत्पादन असल्यामुळे मेटारोल सळईचे वारपकर्त्यांसाठी अनेक फायदे आहे. त्याची वाकण्याची अर्थात लवचिकतेची क्षमता मोठी आहे. रिबार्सची अनेक रचना बारची लवचिकता अधिक सुलभ करते, बांधकाम कार्याला गती देते. दसरे म्हणजे युनिफॉर्म रीब पॅटर्नसिव्हील इंजिनिअर्ससाठी सर्वात जास्त श्रेयस्कर बनतो. मेटारोल सळई ही गंज प्रतिरोधक आहे. याचा अर्थ इमारतीच्या दीर्घ आयुष्याची हमी हे उत्पादन देते. भूकं प प्रतिरोधक तसेच अग्निरोधक असून भूकंप आणि आगीसारख्या नैसर्गिक आपत्तीची संकटे यापुढे सर्वत्र चिंतेचा विषय राहणार आहे हे मेटारोल सळईला त्याच्या श्रेणीमध्ये एक उत्कृष्ट उत्पादन मानले जाते.

Awards and honours

  • औरंगाबाद ब्रँड लिडरशिप अवॉर्ड्स 2019
  • ऑल इंडिया इंडक्शन फर्नेसेस असोसिएशन
  • स्टील री-रोलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
  • व्यवसाय धोरण पुन्हा परिभाषित करणे
  • स्वच्छ हरित शहर
  • बिझनेस फॉरवर्ड (डेल)
  • एच अँड के थर्मेक्स
  • सत्पत्ती 2020
  • कॉनकोर अवॉर्ड 2017
  • एनएसई नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड
  • असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स (Ocline 2011)

निर्यात करत असलेले देश

  • मलेशिया
  • बांगलादेश
  • दुबई
  • मॉरिशस
  • आफ्रिका
  • इटली
  • फ्रान्स
  • सेशेल्स

आमचे सन्माननीय ग्राहक

  • अंकोरिग एसआरएल (इटली)
  • अदानी पॉवर लिमिटेड
  • गरवारे पॉलिस्टर लिमिटेड
  • शापूरजी पलोनजी
  • एनआरबी बेअरिंग्ज
  • प्राज उद्योग
  • ग्नमा ले र्क फार्मास्टयुिकल्स लि.
  • अशोका बिल्डकॉन लि.
  • कोलते पाटील डेव्हलपर्स लि.
  • लायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
  • अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्शन (अ यू ल्ट्राटेक सिमेंट)
  • मायलेन
  • रियान पॉवरटच
  • हरमन फिनोके म लि.
  • आरआरसी बिल्डिंग आणि डेव्हलवर्स
  • विप्रो
  • सुझलॉन
  • गोदरेज
  • परांजपे स्किम
  • मॅट्रॅक्स
  • कुमार प्रॉपर्टीज
  • एबीआयएल
  • प्राईड पर्पल
  • एक्सलन्स
  • पंचशील
  • गायत्री कट्रक्शन अँण्ड लँड डेव्हलपर्स
  • मंत्रा प्रॉपर्टीज
  • हिरानंदानी गप
  • मगर पट्टा सिटी
  • सुदर्शन केमिकल
  • सष्टी कंन्टटें प्रा.लि.
English