‘मेरिगोल्ड’मधील मिमोसा हॉल

मेरिगोल :  सोनेरी स्वप्नांची सोबत

पाच सुसज्ज बँक्वेट्स हॉल, पुरणपोळी-श्रीखंड पुरीपासून पंजाबी, इटालियन, कॉन्टिनेन्टलपर्यंत वेगवेगळे तब्बल १,००० प्रकारचे मेन्यू आणि एकाच दिवशी पाच हजार लोकांची भोजनाची व्यवस्था होईल अशी किचन व्यवस्था… हे वर्णन कोणत्या पंचतारांकित हॉटेलचे नसून, पंचतारांकित सुविधाही थिट्या पडतील अशा ‘मेरिगोल्ड बँक्वेट्स अँड कन्व्हेन्शन्स’चे आहे. शंतनु देशपांडे या मराठी उद्योजकाने पाहिलेले आणि मोठ्या नजाकतीने प्रत्यक्षात उतरविलेले स्वप्न म्हणजे ‘मेरिगोल्ड बँक्वेट्स !

आज पुण्यामध्ये एखादा घरगुती लग्नसोहळा असो किंवा एखादी जंगी परिषद राज्यस्तरावर भरविणे असो. उचित स्थळ आणि खानपानसेवा ह्यांचे नाना पर्याय उपलब्ध होतील. छोटेखानी मंगलकार्यालये ते भव्य लॉन्स. जिलेबी-मठ्ठ्याचे पारंपारिक जेवण ते इंटरनॅशनल कुझिन. पवित्र घरगुती वातावरण ते व्यापारी झगमगाट. पैसे टाकल्यावर सगळे मिळते.

मेरिगोल्ड : नावीन्यपूर्ण व्हेन्यू

पण हे सगळे पर्याय एकाच परिसरात देऊ शकणारा एखादा व्हेन्यू मिळवायचा असेल तर?

तर मात्र तुम्हाला थेट बावधनला जाऊन तेथील ‘मेरिगोल्ड बँक्वेट्स’चीच निवड करावी लागेल. तेथे तुमच्या बजेटमध्ये, तुमच्या पसंतीचा पर्याय तुम्ही निवडू शकाल. शंतनु देशपांडे या मराठी उद्योजकाने पाहिलेले आणि मोठ्या नजाकतीने प्रत्यक्षात उतरविलेले स्वप्न म्हणजे ‘मेरिगोल्ड बँक्वेट्स अँड कन्व्हेन्शन्स सेंटर’. श्री. शंतनु देशपांडे आणि त्यांची कन्या व्यक्तिश: लक्ष घालून ‘मेरिगोल्ड’चे नियोजन पाहतात.

रिअल इस्टेट ते हॉस्पिटॅलिटी

शंतनु देशपांडे हे मूळचे बांधकाम उद्योगातले. ‘देशपांडे बिल्डर्स’ या आपल्या व्यवसायातून त्यांनी सदाशिव-कसबा या पेठांमध्ये, विठ्ठलवाडी-माणिकबाग-कोथरूड अशा पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्प यशस्वी केलेले आहेत. मयूरा अपार्टमेंट, काश्यप अपार्टमेंट, श्वेतांबरी, डीबीज् कोरल, डीबीज् डायमंड असे अनेक प्रकल्प त्यांच्या नावावर आहेत. पौड रस्त्याच्या उड्डाणपुलावरून जाताना, दशभुजा मंदिराच्या सान्निध्यातील ‘देशपांडे पुरम’ची उंच पाटी सहज दिसणारी आहे.

पण असे कितीही कोरल-डायमंडस म्हणजे ‘हिरेमोती’ हाताळले, तरी ‘देशपांडेबिल्डर्स’ला खरी ओढ होती ती चोख, शंभर नंबरी सोन्याची! ‘मेरिगोल्ड’ची! त्यातूनच २०१५ मध्ये त्यांनी डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या भव्यतेच्या पार्श्वभूमीवर ‘मेरिगोल्ड बँक्वेट्स’चं सोनेरी स्वप्न साकार करायला घेतले. साडेतीन वर्षांच्या प्रयासानंतर २०१९ मध्ये ते पूर्णत्वाला नेले आणि पुणेकरांसाठी एक देखणे समारंभस्थळ उभे राहिले. त्यात छोट्या मंगल कार्यालयांमधील खासगीपण, मांगल्य होते. भव्य लॉन्सची हिरवी माया होती. विशाल सभागृहांचा थाटमाट होता आणि पंचतारांकित सोयीसुविधा तर जागोजागी होत्या, आहेत, असतील, वाढत राहतील.

राजेशाही अनुभूती व देखणी कलाकृती

‘मेरिगोल्ड’अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे, ५, ५०, २००, २५०, ३००, ६००, १,२०० आणि २,००० लोकांची एकाच वेळी सोय होऊ शकेल या क्षमतेचे पाच आलिशान बँक्वेट्स हॉल आहेत. प्रत्येक हॉलला फुल्ली कव्हर्ड व्हरांडा आहे. प्रत्येक हॉलसमोर त्याच्यापुरते लॉन अशी सगळी आकर्षक रचना आहे. एकाच परिसरात एवढे हॉल्स असूनही प्रत्येकाला संपूर्णप्रायव्हसी मिळते. प्रत्येकाची एंट्री-एक्झिट वेगळी आहे. प्रत्येक हॉलसाठी भोजनाचा स्वतंत्र प्रशस्त विभाग आहे. प्रत्येक हॉलमधली प्रकाशयोजना हवी तशी प्रखर किंवा सौम्य करण्याची सोय आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच अनेक प्राचीन शिल्पे, पुतळे, भित्तिचित्रं, क्युरियोज आहेत. या सगळ्यामुळे ‘मेरिगोल्ड’मध्ये कोणतेही कार्य, समारंभ सेलिब्रेट करताना संपन्न, राजेशाही अनुभवाची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. खरेतर डोंगरउतारावरच्या या जागेवर इतके देखणेकाही उभारता येईल, असेकुणाला वाटलेही नसेल. पण ‘मेरिगोल्ड’ने नैसर्गिक चढ-उतारांचा अगदी १०० टक्के वापर करीत डोंगरमाथ्यावर ६० हजार चौरस फुटांचे शोभिवंत लॉन साकारले आहे.

नजाकतीचे काम

येथील एकेक गोष्ट जगभरातून पारखून-निरखून आणलेली आहे. फ्लोअरिंगमध्ये गालिचासारखी डिझाईन्स बनवून घेतली आहेत, तसेच अनोख्या पद्धतीने लाकडी सीलिंग्ज बनविलेली आहेत. लिफ्ट एखाद्या शो-पीससारखी आकर्षक आहे. जागोजागी ठेवलेल्या वस्तू जगभरातून विचारपूर्वक मिळवून आणलेल्या आहेत. सर्व एअरकंडिशनर्समध्ये ओडर-फ्री परफ्युम तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. दिवे-पंखे-पडदे हे सुरू-बंद, कमी-जास्त करण्यासाठी त्यांच्या स्वयंचलित यंत्रणा बसविलेल्या आहेत, त्या आय-पॅडवरून वापरता येतात. लग्नाच्या होमातील धूर कोंडलाय, भटारखान्यात शिजणाऱ्या अन्नाचे वास पसरलेत, पंचारतीच्या ज्योती पंख्याच्या थेट वाऱ्यानेथरथरताहेत किंवा व्यासपीठावरून बोलणाऱ्याचा आवाज विचित्रपणे घुमतोय, अशी समारंभांमधील नेहमीची संकटं या परिसरात कधीच येणार नाहीत, असा पक्का बंदोबस्त केलेला आहे. ‘मेरिगोल्ड’मध्ये अप्रिय क्षण येणारच नाही.

सुग्रास भोजन व शिस्तबद्ध नियोजन

अर्थात, समारंभाची लज्जत वाढते ती तेथील खाण्यापिण्याच्या चोखंदळपणामुळेच. पाहुण्यांची नजर कितीही निवली, मन कितीही सुखावले, तरी पोटाकडून समाधानाची पावती यायलाच हवी.

या दृष्टीने २२० उत्कृष्ट लोकांची टीम १,००० पेक्षा अधिक पदार्थांचा मेन्यू देण्यासाठी येथे जय्यत तयार ठेवण्यात आली आहे. ‘मेरिगोल्ड’च्या उद्घाटनापासूनच पुण्या-मुंबईतील मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सचे शेफ्स, केटरर्स आपली सेवा द्यायला इच्छुक होते. पण टीम ‘मेरिगोल्ड’ एका मुद्द्यावर अगदी ठाम होती. तो म्हणजे, त्यांना जेवणाच्या मेन्यूत वेस्टर्नकुकिंगचा वानवळा द्यायचा होता, तसेच मराठमोळ्या भोजनाचा आस्वादही द्यायचा होता. इटालियन-फ्रेंच कुझिन असावे, तसेच मोदक-पंचामृतासह पंचपक्वानांचे सुग्रास जेवणही त्यांना ठेवायचे होते. त्यामुळेच ‘मेरिगोल्ड’ने स्वत:ची शंभर शेफ्सची सुसज्ज फौज उभी केली. ‘मेरिगोल्ड’मध्ये चार सुसज्ज किचन्स साकारलेली आहेत. यातील सगळ्यात मोठे किचन ७,५०० चौरस फुटांचे आहे. सकाळी चार आणि संध्याकाळी चार अशी एका दिवसात आठ फंक्शन्स धरली, तरी एका दिवसात पाच हजार लोकांची भोजनाची व्यवस्था होऊ शकेल अशी यंत्रणा आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी ‘मेरिगोल्ड’मध्ये बुकिंग करताना ग्राहकांना अपेक्षेपेक्षा अधिक मेन्यूजची व्हरायटी दिली जाते. विशेष म्हणजे, ग्लोबल टू लोकल अशी संपूर्ण व्हरायटी यात उपलब्ध आहे. शिवाय ऋतुमानानुसार मेन्यूज बदलत असतात. उदा. थंडीच्या दिवसांत उंधिओ असतो, तर उन्हाळ्यात आमरस, मस्तानी असेडेझर्टस्‌चे पर्याय असतात. तुमच्या कार्यक्रमात महाराष्ट्रीय मेन्यू असो, साऊथ इंडियन असो की काँटिनेन्टल, ‘मेरिगोल्ड’मध्ये १०० टक्के ऑथेंटिक टेस्ट मिळते. काँटिनेन्टल रेसिपीज् बनविण्यासाठी क्रूझवर अनुभव कमावलेले स्पेशल शेफ्स आहेत; तर जिलेबी, रबडी अशी उत्तर भारतीय पक्वान्ने बनविण्यासाठी थेट बनारसमधून आलेला हलवाई आहे. दाक्षिणात्य मेन्यूज तयार करणाऱ्या शेफ्सची वेगळी टीम नेमलेली आहे.

‘मेरिगोल्ड’मधील गोल्डनरॉड हॉल

हे सगळेयोजले असले, पैसा-कष्ट पुरेपूर वापरण्याची तयारी असली, तरी कोणत्याही समारंभाच्या आयोजकावर एक प्रकारचा ताण असतोच. सगळ्या यंत्रणा काम करतील ना? सर्व सुविधा पुरेश्या ठरतील ना? आयत्या वेळी आव्हाने उभी राहणार नाहीत ना? ‘मेरिगोल्ड’मध्ये शिरतानाच कोणाही आयोजकानेया चिंता बाहेर ठेवायच्या असतात. ‘मेरिगोल्ड’मध्ये वर्षभरात शेकडो समारंभ होत असतात. लग्नसराईत एकेका दिवशी शेकडो माणसांसह अनेक लग्नकार्येही पार पडतात. पण कोणाचीही कणानेही गैरसोय होत नाही. कारण येथे समारंभ ठरवितानाच ‘टीम-मेरिगोल्ड’चे संपूर्ण सुसज्ज नियोजन सोबतीला असते. हेनियोजन करणारे, किचन, सर्व्हिस, इव्हेंट ऑर्गनायझर, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, व्हॅले, इंजिनीअरिंग, फ्रंट ऑफिस, बॅक ऑफिस, आय.टी. असे स्वतंत्र विभाग येथे काम करतात. प्लॅनिंग टीम या विभागांचा आणि समारंभाच्या यजमानांचा समन्वय साधायला नेहमी उपलब्ध असते. ‘विसरले, चुकले, वाटले, अंदाज आला, शक्यता होती’ अशा मोघम शब्दांना येथेथारा नसतो. तर सभारंभातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा तपशील ठरविलेला असतो आणि तो त्याच क्रमाने पार पाडला जातो.

सर्व प्रकारच्या इव्हेंटसाठी साजेसे

एवढ्या सगळ्या सरंजामानंतर येथे फक्त लग्नकार्येच व्हावीच, असा सीमित विचार असणे शक्य नव्हते. येथे म्युझिक कॉन्सर्ट, प्रदर्शने, परिषदा आणि चित्रपटांचे शूटिंगही व्हावे हे उद्दिष्ट होते. म्हणून ‘मेरिगोल्ड’ साकारतानाच ही वास्तू आणि येथील प्रत्येक हॉल बहुउद्देशीय असणार, याचे उत्तम नियोजन ‘टीम मेरिगोल्ड’नेकेले होते. त्यामुळेच वेगवेगळ्या कार्यांबरोबरच सांगीतिक मैफिली, फॅशन शो, वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, कॉर्पोरेट इव्हेंट्स, चित्रपटांचे शूटिंग आज ‘मेरिगोल्ड’मध्ये अगदी दिमाखात पार पडतात. संगीत मैफल आयोजित करायची, तर ध्वनिव्यवस्था अगदी उत्तम असावी लागते. ‘मेरिगोल्ड’च्या प्रत्येक हॉलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावत अशी ऑडिओ व्हिज्युअल यंत्रणा साकारण्यात आली असून, राहुल देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांचे सांगीतिक कार्यक्रम आजवर येथेझाले आहेत. प्री-वेडिंग शूटसाठीही तरुणाईची आज ‘मेरिगोल्ड’ला मोठी पसंती मिळत आहे.

आगामी योजना

दिवसेंदिवस या बँक्वेट्स हॉल्सची मागणी वाढते आहे. पण तेवढ्यावर समाधान मानून निवांत बसणे शंतनु देशपांडेंना जमणार नाही. त्यांच्यामधील सौंदर्यासक्त कलाप्रेमी माणूस नवनवी क्षितिजेधुंडाळणारच. याच परिसरात त्यांचे ‘विंडमिल व्हिलेज’चे स्वप्न पूर्वीच साकारले आहे. पण अजूनही खूप मोठी जमीन वापरायची राहिली होती. त्या दृष्टीने किमान शंभर खोल्यांचे अद्ययावत हॉटेल, ४०,००० चौरस फुटांचे जंगल थीम रेस्टॉरंट-बारचे बांधकाम आज येथे सुरू आहे. असे भव्य हॉटेल, रेस्टॉरंट-बार पूर्णत्वास आल्यानंतरच शंतनु देशपांडे यांना खरे आत्मिक समाधान लाभेल.

स्वर्गीय अनुभवाची परिसीमा

यासोबतच येथे एक हजार गाड्या ठेवण्याची व्यवस्था आहे. तेवढी मोकळी जागा व फ्री व्हॅले सेवा ठेवल्यामुळे समारंभस्थळी येणाऱ्या लोकांना आपली वाहनेकुठे, कशी पार्क करावीत, हा प्रश्न येथे भेडसावणार नाही. आपापली सर्व व्यवधाने-वाहने-ताणतणाव बाजूला सारून माणसांना समारंभाचा संपूर्ण आनंद घेता यावा, या दृष्टीनेच येथील प्रत्येक गोष्ट योजलेली आहे, वापरली जाते आहे. असे कितीही वर्णन करून सांगितले, फोटोरूपाने दाखविले, तरी ‘मेरिगोल्ड’ ही खरेतर मनोमन अनुभवण्याची जागा आहे! सर्व रसिक, मर्मज्ञ, कलाप्रेमी मंडळींनी एखादा अनुभव घेतला, की पुन्हा पुन्हा त्यांची पावले त्या दिशेनेच वळतील, यात शंका नाही.

‘मेरिगोल्ड बँक्वेट्स’मध्ये मी आतापर्यंत तीनदा वेगवेगळ्या कारणांनी आलोय. प्रत्क वेळी ये या वास्तूच्या इंटिरीअरने, आर्कि टेक्चरने मी कमालीचा भारावून गेलोय. येथील जेवणही मला विशेषकरून आवडते. ‘मेरिगोल्ड’मध्ये माझी एक संगीताची मैफल झालीये आणि नुकतेच एका युट्ब व्हि यू डिओचे रेकॉर्डिंग झाले आहे. मला आवर्जून सांगावेसे वाटते, की येथील बँक्ट हॉलमधील अ‍ॅकॉस्टिक्स वे हे संगीतासाठी, मैफलींसाठी आणि रेकॉडर्डिंगसाठीही अतिशय उत्तम आहे. ‘मेरिगोल्ड’मध् एक सका ये रात्मक ऊर्जा असुन, ती माझ्या सारख्या कलाकरांना नवनिर्मितीसाठी कमालीची प्रोत्साहित करते.

राहुल देशपांडे, प्रसिद्ध गायक

आम्ही ‘मेरिगोल्ड’मध्ये आमचा जवळता मित्र सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्या लग्नाला गेलो होतो. हा संपूर्णव्हेन्यू खुप सुंदर आहे. जेवणाचे आणि मेनूचे तर करावे तेवढे कौतुक कमी आहे. हा सगळा परिसरच अतिशय वेल मेन्टेन्ड आहे. त्यामुळे येथे येऊन आम्हाला खुप पॉझिटिव्ह वाटले.

अर्चना निफाडकर, अंकिता जोशी

मेरिगोल्ड बँक्टवे्स अँड कन्व्हेन्शन

  • विंडमिल व्हिलेजसमोर, मुळशी रोड, बावधन बु।।, पुणे 411021
  • +91 90904 04444
  • www.marigoldbanquets.com
  • info@marigoldbanquets.com
English