सामाजिक सुधारणांचे प्रणेतेआणि दूरदृष्टीचे नेते सहकारमहर्षी जयवंतराव भोसले(आप्पा) यांनी ग्रामीण भागातील सामान्य जनतेला गुणवत्तापूर्णआरोग्यशिक्षण आणि आरोग्यसेवा देण्याच्या उदात्त हेतूने१९८४ साली कराड (जि. सातारा) येथेकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात कृष्णा वैद्यकीय शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेत सुरवातीला एम.बी. बी.एस. अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’कडून वेळोवेळी मिळालेल्या मान्यतेनुसार विविध नवनवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्से आरोग्यदायिनी ज्ञानगंगा
कृष्णा अभिमत विद्यापीठाने परंपरागत शिक्षण पद्धतीऐवजी नवीन अभ्यासपद्धती आणि संकल्पनांना प्राधान्य देण्याचेउद्दिष्ट ठेवून वाटचाल केली आहे. आरोग्यसेवेतील उदयोन्मुख आव्हानांची
पर्त ूता करण्यासाठी कृष्णा अभिमत विद्यापीठातील पदवीधरांना सक्षम बनविले जात आहे, तसेच स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय गरजांबरोबरच अलीकडील सर्व जागतिक ट्रेंड दर्शविणाऱ्या अध्यापन
शिक्षणपद्धतीचा अवलंबही केला जात आहे. यासाठी अनुभवी, तज्ज्ञ शिक्षकवर्ग, अत्याधुनिक तंत्रज्ञान व शैक्षणिक साधनेही याठिकाणी पुरविली जातात. ‘विद्यापीठ हेसंशोधनाचेमाहेरघर असून, कुठलेही ज्ञानहेसंशोधनातूनच विकसित होत असते’,हेलक्षात घेऊन कृष्णा अभिमत विद्यापीठही नेहमीच आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधन कार्यासाठी प्रोत्साहित करत असते.
आरोग्य विज्ञानात झपाट्यानेहोत जाणारेबदल लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याच्या दृष्टीनेभारत सरकारनेसंस्थेला अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सिटी) दर्जा बहाल करण्याचा निर्णय घेतला आणि भारत सरकारच्या शिफारशीवरून विद्यापीठ अनुदान आयोगानेव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने२४ मे२००५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचेननुसार कृष्णा वैद्यकीय शिक्षण संस्थेला अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर संबंधित डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, इंडियन नर्सिंग कौन्सिल, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट अँड ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यासारख्या संबंधित वैधानिक परिषदेची मान्यता घेऊन दंतचिकित्सा, नर्सिंग आणि फिजिओथेरपी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
सन २००५ साली डॉ. सुरेश भोसलेयांनी कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. कुलगुरू या नात्याने त्यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठात दंतवैद्यकशास्त्र, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि बायेकेमिस्ट्रि या नव्या विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना प्रारंभ केला. त्यांनी सक्षमतेवर आधारित अभ्यासक्रमाची रचना, उत्कृष्ट अध्यापन पद्धतीचा अवलंब आणि स्वतंत्र व सशक्त संशोधन संचालनालय यांच्या सहाय्यानेवैद्यकीय क्षेत्रात संशोधनाभिमुख वैज्ञानिक शिक्षणपद्धतीची पायाभरणी केली.
सध्या कुलपती म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुरेश भोसलेयांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा अभिमत विद्यापीठानेकौन्सिलच्या गरजांनुसार केवळ पायाभूत सोयी आणि शैक्षणिक स्त्रोतांचा विस्तारच केला नाही, तर संबंधित कौन्सिलच्या निर्णयानुसार आरोग्यसेवा व आरोग्य शिक्षणातील प्रगतीसाठी नवनवीन उपकरणे व अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंबही करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या संख्येत वाढ झाली असून, विद्यापीठाशी संलग्न अधिविभागांमध्येही नवनवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सुपरस्पेशालिटी डॉक्टरल अभ्यासक्रम आणि ११ विषय विभागात पीएच.डी. अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. समाजाच्या बदलत्या गरजा, रूग्ण सहभाग आणि वैद्यकीय शाखांमधील विद्यार्थ्यांच्या अपेक्षा ध्यानात घेऊन सातत्यानेआरोग्य विज्ञान शिक्षणात आवश्यक तेबदल केले जात आहेत.
सुमारे ६० एकरच्या विस्तीर्ण जागेत पसरलेल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेल्या मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. याशिवाय अनॉटॉमी, कम्युनिटी मेडिसीन, फार्माकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि नर्सिंग इत्यादी अभ्यासक्रमात पीएच.डी. करण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यामुळेच आज या विद्यापीठाच्या कक्षेत असणाऱ्या विविध महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असून, यामध्ये केवळ देशी विद्यार्थीच आहेत असेनव्हे, तर परदेशी विद्यार्थीही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कृष्णा अभिमत विद्यापीठालाच आपली पसंती देत आहेत.
कृष्णा अभिमत विद्यापीठाने पूर्णत: संशोधनाला वाहिलेली मोलेक्युलर व ह्युमन जेनेटिक्स प्रयोगशाळा सुरू केली आहे. याठिकाणी डीएमडी थेलेसेमिया व हिपॅटायटिस सी व्हायरस यावर संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील एकमेव अशी लेड लॅब कृष्णा अभिमत विद्यापीठाने स्थापन केली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाने आत्तापर्यंत १८ पेटंटसाठी अर्ज दाखल केलेआहेत. यामुळेराष्ट्रीय स्तरावरील मोजक्या वैद्यकीय संस्थांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाची वर्णी लागली आहे. एचआयव्ही, एडस्व कर्करोगासंबंधित अनेक समाजपयोगी कार्यक्रम कृष्णा विद्यापीठातर्फेराबविले जातात. केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फेराबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठ सक्रिय सहभाग घेते.
कृष्णा हॉस्पिटल: महाराष्ट्रातील अद्ययावत आरोग्य केंद
कराडसह आसपासच्या भागातील जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी एका सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटलचा संकल्प सोडत सहकारमहर्षी जयवंतराव भोसले(आप्पासाहेब) यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून १९८२ साली कृष्णा हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवून समाजसेवेचेएक नवे पर्वच सुरू केले. आप्पासाहेबांनी साकारलेल्या या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या मल्टिस्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत, या भागातील रुग्णांची अखंड काळजी घेण्याचेकाम कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचेचेअरमन आणि कृष्णा अभिमत विद्यापीठाचेकुलपती डॉ. सुरेश भोसलेकरत आहेत.
कृष्णा हॉस्पिटल हे११०० बेडचेअसून, तेथेअनेक प्रकारच्या मल्टिस्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. क्रिटीकल केअर, इंडोस्कोपी, सर्जरी, डायलेसिस, कार्डिओलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी यासारख्या उपचार सुविधांमुळेअत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या हॉस्पिटलकडेदररोज हजारो रूग्णांचा ओढा असतो. केवळ कराडच नाही तर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातील रूग्णही येथील आरोग्य सेवांचा लाभ घेतात. कृष्णा हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभाग असून,
याठिकाणी एकूण १६ इन्क्युबेटर व २ डबल लाईट फोटोथेरपी इन्क्युबेटर आहेत. जानेवारी २००७ पासून हॉस्पिटलमध्ये हिमो डायलेसिस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी १४ ऑपरेशन थिएटर्स आहेत. डोळ्यांवरील मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे अत्याधुनिक फेको मशिनही याठिकाणी उपलब्ध आहे. याचबरोबर अद्ययावत असा एम.आर.आय. विभाग, होल बॉडी सी.टी. स्कॅन विभाग, एक्सरे विभाग, सोनाग्राफी विभागाच्या माध्यमातून रूग्णांच्या सर्वप्रकारच्या तपासण्या केल्या जातात. कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र रक्तपेढी विभाग असून, याठिकाणी सर्व अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहेत.
दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे रेडिओथेरपी केंद्र
कृष्णा रूग्णालयात आधुनिक क्ष-किरण चिकित्सा, एआरआय, सीटी, युएसजी, कलर डॉपलर, डीएसए, मॅमोग्राफी तसेच सूक्ष्म जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र व विकृतीशास्त्र यांच्या अत्याधुनिक तंत्रसाधनाने सुसज्ज अशा प्रयोगशाळा कृष्णा रूग्णालयात कार्यरत आहेत. याठिकाणी अतिदक्षता विभाग असून, त्यामध्ये ७५ हून अधिक रूग्णांची सोय करता येते. अत्याधुनिक अशी रक्तघटक पुरविणारी रक्तपेढी, कथलॅबला ॅ इंडियन मेडिकल असोशिएशनबरोबर मलेशियन मेडिकल असोसिएशनचीही मान्यता आहे. कृष्णा रूग्णालयात दररोज ८० ते१०० रूग्ण रेडिओथेरपीचा लाभ घेतात, की ज्यामुळेहेदक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेडिओथेरपी केंद्र बनलेआहे. सर्व शिक्षा अभियानाखाली जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त मुलांच्यावर मोफत शस्त्रक्रिया कृष्णा रूग्णालयात करून दिल्या जातात. प्रत्येक वर्षी कृष्णा रूग्णालयाकडेकनॅ्सरचेसुमारे१ हजार नवीन रूग्ण येतात. यापैकी हजारो रूग्णांना मोफत प्राथमिक उपचार दिले गेले आहेत.
अद्ययावत व अत्याधुनिक उपकरण
या भागातील कनॅ्सर रूग्णांना यापु र्वी उपचारासाठी पुणे, मुंबई येथे जावे लागायचे. शिवाय अलीकडे स्त्रियांमधील गर्भाशयाचा व स्तनाचा कर्करोग गंभीर रूप धारण करत आहे. अशा सर्वप्रकारच्या कर्करोगावर उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कनॅ्सर विभाग सुरू झाल्यामुळे कर्करोग शस्त्रक्रिया, किरणोपचार(रेडिओथेरपी), किमोथेरपी अशा उपचार पद्धतीद्वारे याठिकाणी कनॅ्सरवर प्रभावीपणे उपचार केले जातात. या विभागात कनॅ्सरवरील उपचारासाठी अत्याधुनिक लिनियिर अक्सीलरेटर मशिनही उपलब्ध आहे. कृष्णा हॉस्पिटल हे आता महाराष्ट्रातील एक महत्वाचे आरोग्यसेवा असून, वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख अधिक ठळकपणाने अधोरेखित करत आहे.
आरोग्यदूत डॉ. सुरेश भोसल
कृष्णा अभिमत विद्यापीठाची प्रगतीशील घोडदौड ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे, ते विद्यापीठाचेकुलपती डॉ. सुरेश भोसलेयांनी मेडिसीन विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यांचेकरिअर क्षेत्र खूपच विस्तारित असून, वैद्यकीय क्षेत्राबरोबर सहकार आणि शिक्षणक्षेत्रात त्यांनी महत्वाचेयोगदान दिलेआहे. त्यांचे विविध शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेलेआहेत. त्यांनी अनेक समुदाय प्रकल्पांची सुरवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने‘स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांमधील एचआयव्ही एडस्चे प्रमाण’, ‘कनॅ्सर जागृती, निदान आणि महिलांमध्ये कनॅ्सरचेप्रमाण रोखण्यासाठी पुर्व प्रतिबंधात्मक उपाय’ या प्रकल्पांचा समावेश आहे. १९८७ पासून पुढील १८ वर्षेत्यांनी कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राचेमेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून यशस्वी पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाला आणि नव्या वैद्यकीय सेवासुविधांसह अत्याधुनिकीकरणाला चालना मिळाली. ज्यामुळेआज कृष्णा हॉस्पिटल हेमहाराष्ट्रातील अद्ययावत आणि अतिशय महत्वाचेआरोग्य केंद्र म्हणून नावारूपाला आलेआहे. शल्यचिकित्सा विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी ‘स्तन कर्करोग शस्त्रक्रिया’ ही उपशाखा सुरू केली आणि हजारो रुग्णांवर ब्सरे्ट सर्जरी केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्सरे्ट कनॅ्सर टिश्यू बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यात इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री या तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी ‘सर्जिकल फेलो ऑफ असोसिएशन ऑफ इंडियन सर्जन्स’ची (एफ.आफ.ए.एस.) फेलोशिप प्राप्त झाली आहे.
कोरोनामुक्तीचा ‘कृष्णा पॅटर्न’
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या दुरदृष्टीतून साकारलेले आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या कु शल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले कराड येथील कृष्णा हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी एक मोठे वरदान ठरले आहे. या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सगिं स्टाफने आपल्या यशस्वी उपचाराने आत्तापर्यंत सुमारे ८,००० हून अधिक रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे. खरंतर कोरोनाविरुद्धच्या लढाईत कृ ष्णा हॉस्पिटल सुरुवातीपासूनच अग्रभागी राहिले. जेव्हा कराड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसुद्धा सापडला नव्हता, त्याच्याही पूर्वी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने कोरोनासाठी विशेष वॉर्डची निर्मिती केली. डॉक्टर्स, नर्सगिं स्टाफ यांना प्रशिक्षण दिले. सर्वाधिक व्हेंटिलेटर उपलब्ध असणारे कृष्णा हॉस्पिटल जिल्ह्यातील एकमेव आहे. वैयक्तिक लक्ष, सुयोग्य आहार, योग्य औषधोपचार, स्वच्छ वातावरण आणि पूर्णपणे मोफत उपचार यासारख्या अनेक वैशिष्ट्यांमुळे कृ ष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे मत स्वत: बरे झालेले अनेक रुग्ण व्यक्त करतात. कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलने बजाविलेली ही भूमिका सर्वच समाजासाठी आणि संस्थांसाठी प्रेरणादायी आहे. कृष्णा हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या दुरदृष्टीचे मूर्तिमंत प्रतीक ठरले. त्यांनी कृष्णा हॉस्पिटलला दिलेले ब्रीदवाक्य या कोरोना संकट काळात एक वेगळीच प्रचिती देऊन गेले.
कोविड -१९ विरोधी लढ्यात महत्त्वपूर्णसहभाग
-
- जिल्ह्यातील पहिली ‘कोविड-१९’ चाचणी प्रयोगशाळा
- जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषांनुसार स्वतंत्र ओपीडी
- जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने विकसित के लेल्या लस संशोधनात महत्वपूर्ण सहभाग
- कोरोना संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सुमारे ४० लाख रूपयांचा निधी पीएम केअर फंडाकडे सुपूर्त
- प्लाझ्मा थेरपीचाही अवलंब
- कोविड-१९ लसीकरण मोहिमेत सहभाग
- पीपीई किटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन
- पर्यावरणपूरक ‘के -बायो’मास्कचे संशोधन व निर्मिती
- वैद्यकीय उपकरणांचे संपूर्णनिर्जंतुकीकरण करणाऱ्या ‘युव्ही सेवक ३६० ओ’ या उपकरणाचे संशोधन
मेडिकल कॉलेज
स्थापना : १९८४
एम.बी.बी.एस.सह पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, मास्टर्स, पोस्ट डॉक्टरल फेलोशिप यासह पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब
दंतविज्ञान अधिविभाग
स्थापना : २००७
बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ आणि ‘मास्टर ऑफ डेंटल सर्जरी’ अभ्यासक्रम तसेच ‘ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’, ‘ओरल मेडिसीन अँड ओलॉजी’, ‘ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेन्टोफेसिअल ऑर्थोपेडिक्स’, ‘प्रोस्थोडॉन्टिक्स’, ‘ओरल अँड मॅक्सिलोफेसिअल सर्जरी’ असे विविध विभाग कार्यरत
नर्सिंग अधिविभाग
स्थापना : २००६
बी.एस्सी. नर्सगिं , पी.बी. बी.एस्सी. नर्सगिं आणि एम.एस्सी. नर्सगिं हे अभ्यासक्रम
फिजिओथेरपी अधिविभाग
स्थापना : २००६
बी.पी.टी.एच. आणि एम.पी.टी.एच. अभ्यासक्रम
बायोटेक्नॉलॉजी व फार्मसी अधिविभाग
स्थापना : २००७
एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रम
दर्जा व गुणवत्तेसाठी मानांकन
- नॅकचे ‘अ+’ मानांकन
- आयएसओ ९००१ : २००८ मानांकन
- कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राला ‘एनएबीएच’चे मानांकन
- बालरोग विभागास नॅशनल निओनॅटल फोरम ऑफ इंडियाचे मानांकन
- रक्तपेढीला ‘एनएबीएच’ मानांकन
- रोगनिदान प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ मानांकन
- कृष्णा विद्यापीठ देशातील ‘टॉप १००’ विद्यापीठांच्या यादीत
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतलेल्या ‘स्वच्छ कॅ म्पस रँकिंग २०१८’ स्पर्धेत कृष्णा विद्यापीठ देशात अव्वल