स्टील उद्योगातील महाराष्ट्राचा 'आयकॉन'

प्रत्येकाच्या आयुष्यात एक हक्काचे घर असावे, असे स्वप्न असते. हे डोक्यावरचे छत उभारणीसह वर्षानुवर्षे ते तग धरून उभे राहण्यासाठी उत्तम गुणवत्ता असलेल्या स्टीलची (सळईची) गरज असते. देशात अनेक ठिकाणी स्टील उद्योग सुरू आहेत. या स्टील उद्योगांमध्ये जालना स्टील उद्योग देशात अग्सर आहे. रे येथील स्टील उद्योगातून देशासह परदेशात स्टील जाते. परंतु, हे वैभव एका दिवसात प्राप्त झालेले नाही, त्याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत. याच गुणवत्चते्‍या जोरावर स्टील उद्योगात मागील ३० वर्षपांसून राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राठी स्टीलचा डंका साता समुद्रापार वाजत आहे

राठी स्टील अँड मेटल प्रा.लि. चा ३० वर्षांचा प्रवास

जालना हे आज जगभरात स्टीलनगरी म्हणून ओळखले जाते. या स्टील उद्योगामध्ये अनेकांनी भरारी घेतली आहे. या गतिमान स्टील उद्योगात तग धरून राहण्यासह तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत प्रत्येक जण धावत आहे. जालना स्टील उद्योगामध्ये मागील तीस वर्षांपासून गुणवत्तेच्या जोरावर हा ब्रॅंड देशात नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाऊन पोचला आहे. या स्टील निर्मितीची सुरवात ही खूप संघर्षमय झाली. तीन दशकांपूर्वी काही मित्र, नातेवाईक, युवक एकत्र आले आणि पारंपरिक व्यवसाय न करता काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. प्रत्येकाने आपापल्या परीने भांडवलाची जुळवाजुळव करत स्टील उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जुनी औद्योगिक वसाहत येथे जागा भाडेतत्त्वावर घेऊन रोलिंग मिल सुरू केली. या काळात प्रतिदिन उत्पादन क्षमता ही २५ टन होती. परंतु, त्या काळी आरसीसी बांधकामांसाठी मोठा खर्च येत होता. त्यात ग्रामीण भागात माती आणि चुन्यामध्ये घरांचे बांधकाम होत होते. केवळ शहरी भागांमध्ये काही प्रमाणात आरसीसी बांधकाम होत होते. त्यामुळे सुरुवातीचा काळ स्टील कंपनीसाठी खूप खडतर होता. स्टील अर्थात लोखंडी सळईची मागणीही नव्हती. त्यामुळे उत्पादित केलेल्या सळईची विक्रीही होत नव्हती. त्यात बाजारामध्ये नाशिक, मुंबई येथील स्टीलला अधिक मागणी होती. त्यामुळे स्टीलच्या दर्जात सुधारणा करणे गरजेचे होते. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी भांडवलाची गरज होती. मात्र, त्या काळात भांडवलाची खूप अडचण होती. प्रत्येकांनी घरातून काही पैसे घेऊन हा व्यवसाय सुरू केला होता. त्यात बॅंकाही स्टील कंपन्यांना कर्ज देण्यास तयार नव्हत्या. अशात स्टील उद्योग उभा करून तो बाजारामध्ये स्थिर करण्याची कसरत केली जात होती. या खडतर प्रवासानंतर बाजारात तेजी आल्याने सळईची मागणी वाढण्यास सुरवात झाली. या काळात स्टील उद्योगाची गतिमानता दिसू लागल्याने बॅंकाकडून कर्जमिळाले. त्यामुळे वर्ष २००३ मध्ये कंपनीने औद्योगिक वसाहतीत सळई निर्मितीचा मोठा उद्योग सुरू केला. येथे प्रतिदिन ३०० टन उत्पादन क्षमता होती.

त्यामुळे देशामध्ये सर्वांत मोठी सळई उत्पादक कंपनी म्हणून राठी स्टील नावारूपाला आले. याच कालखंडात देश सर्वांगीण विकासाकडे झेपावत होता. अन्य उद्योगांबरोबरच बांधकाम क्षेत्राही बदल होत होते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात स्टीलच्या मागणीत वाढ झाली. ही मागणी वाढत असताना स्टील कंपन्यांना गुणवत्तेमध्येही बदल करावे लागले.

आरसीसी बांधकामामध्ये मोठ्या इमारतींमध्ये अधिक मजबूत स्टीलची मागणी वाढत होती. त्यामुळे स्टील निर्मितीचे नवे क्रांतिकारी संशोधन होण्यास सुरुवात झाली. यामध्ये ही कंपनी अग्रेसर होती. कंपनीने ॲडव्हान्स रोलिंग मिल सुरू केली. त्यामुळे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे कंपनीच्या उत्पादनाला सुरवात झाली. केवळ यावर न थांबता कंपनीने सळई उत्पादनामध्येपश्चिम भारतात जर्मन थर्मेक्स तंत्रज्ञानाचा सर्वांत पहिला परवाना मिळवला. या नवीन तंत्रज्ञानामुळे मजबूत आणि दर्जेदार सळई असलेले आयकॉन स्टीलचे उत्पादन करण्यास राठी स्टील व मेटल प्रायव्हेटलिमिटेड कंपनीने सुरवात केली. त्यानंतर गुणवत्ते सुधारणा करून एफई-५००, एफई-५००डी, एफई ५५०, एफई ५५० डी यासह सीआरएस टीएमटी सळई निर्मितीस प्रारंभ केला. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांत या स्टीलला मोठी मागणी आहे. कंपनी हॉटबिलेटच्या साहाय्याने उत्पादनाचे प्रमाण वाढवत आहे.

icon-steels-img-8

टीएमटी स्टील बार क्षेत्रात अग्रगण्य ब्रॅंड

नवीन तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर टीएमटी स्टील बार निर्माण क्षेत्रात अग्रगण्य ब्रँड म्हणून या कंपनीची ओळख निर्माण झाली. जालना या स्टीलच्या राजधानीत आपला वेगळा ठसा निर्मितीसाठी संशोधन, गुणवत्ता यावर कंपनीचा भर राहिला आहे. त्यासाठी सिव्हिल इंजिनिअर्स, बांधकाम मिस्त्री यांच्यासाठी मेळाव्यांचे देखील आयोजन करून त्यांच्या मागण्यांचाही विचार करण्यास सुरवात केली. या चर्चेत काही बांधकामामध्ये शक्ती असलेल्या सळयांची मागणी पुढे आली, तर काही बांधकामामध्ये लवचिक सळईची गरज जास्त असते, असे पुढे आले. त्यामुळे कंपनीकडून या दोन्ही बाबींचा विचार करून डीएस गुणवत्ता असलेल्या सळईचे उत्पादन सुरू केले आहे. विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये अमेरिका, युरोप येथे डक्टिलिटी आणि शक्तीच्या संतुलनाला खूप महत्त्व दिले जाते. भारतात उंच पूल, इमारती व विविध प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. या बांधकामांमध्ये सळयांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे डीएस गुणवत्ता असलेल्या आयकॉन स्टीलची मागणी वाढली आहे. मजबुती आणि हवी तशी लवचिकता असलेल्या डीएस उत्पादन केलेल्या सळयांना बांधकाम क्षेत्रात मोठी मागणी आहे.

महत्त्वाच्या प्रकल्पात आयकॉनचा वापर

कंपनीचे स्टील सामान्य नागरिकांपासून ते उद्योजकांपर्यंत वापरत आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, हिरानंदानी, शापूरजी पालनजी, रिलायन्स, रावका ग्रुप, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, यांसारख्या मोठे उद्योगही कंपनीच्या स्टीलचा वापर करतात. गुजरात राज्यातील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर निर्मितीतही या स्टीलचा वापर केला आहे. तसेच रिलायन्स ग्रुपसाठी काकीनाडा येथील समुद्राच्या आतमध्ये असलेल्या प्रकल्पासाठी गंजरोधक स्टील निर्मिती करून दिले आहे, हे विशेष.

संशोधन व विकासावरही भर

मागील तीस वर्षांपासून राठी स्टीलने गुणवत्ता वाढीवर अधिक भर दिला; तसेच नवीन ब्रॅंड विकसित केले. संशोधन व विकासावरही भर दिला आहे. आयआयटीचे तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थी या सर्वांच्या मदतीने कंपनीत अद्ययावत प्रयोगशाळेची निर्मिती करून येथे सळईवर संशोधन करून डीएस सळई तयार करण्यात आली. डीएस सळई तयार करण्यासाठी पाणी अतिमहत्त्वपूर्ण असल्याने कंपनीत आरओ प्लांट बसविला. सळईनिर्मितीत बिलेटच्या तापमानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तापमान नियंत्रणासाठी फर्नेस उभारून त्यासाठी लागणारे अत्याधुनिक पी.एल.सी. या ठिकाणी बसविण्यात आले.

एक गाव, एक डिलर

एक गाव एक डिलर ही संकल्पना राबवत कंपनीने डिलर्सचे विस्तृत नेटवर्क तयार केले आहे. परिणामी ब्रँड म्हणून आयकॉन स्टील अल्पावधीतच गाव-खेड्यात जाऊन पोचले आहे. ग्लोबल टू लोकल या संकल्पनेआधारे शहरापासून ते गाव-खेड्यातील सामान्य माणसाच्या घरापर्यंत कंपनीचे स्टील पोचले आहे.

सामाजिक कामात पुढाकार

राठी स्टीलने व्‍यवसायासोबतच सामाजिक कार्यासाठीही पुढाकार घेतलेला आहे. जलसंधारण, वृक्षारोपण, डेन्स फॉरेस्ट निर्मिती असे पर्यावरणविषयक प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच बेटी बचाओ ही मोहीम राज्यभर त्यांनी हाती घेतली. गावागावांत, शहराशहरात कंपनीने बेटी बचाओ संदेश देत पथनाट्य, मोबाइल व्हॅनद्वारे जनजागृती केली; तसेच विविध सामाजिक संस्थांना सामाजिक कार्यासाठी सतत आर्थिक मदतही केली जाते. रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रल व कंपनीच्या सहभागातून यंदा हजारो वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक कार्य

नव्या तंत्रज्ञानाची दारे खुली झाल्याने गुणवत्ते आणखी सुधारणा झाली आहे. त्यामुळे पीळदार सळयांऐवजी अधिक मजबूत, ५०० ग्रेडच्या, हॉट ब्लेड इत्‍यादी प्रकारच्या सळयांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. सल्फर, कार्बन, फॉस्फरस कमी करत भारतातील खाणीतून निघालेल्या उत्कृष्ट प्रकारच्या स्पंज (कच्चा लोह) आयर्नद्वारे सळईचे उत्पादन केले जाते.

दुसऱ्या पिढीचे व्हिजन

एखाद्या ब्रॅंड निर्मितीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्या ब्रॅंडवर ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करता येत नाही. आयकॉन स्टील कंपनीमध्ये दुसऱ्या पिढीच्या खांद्यावर हळूहळू काही जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. दुसऱ्या पिढीलाही गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये, हा मूलमंत्र दिनेश राठी यांच्याकडून दिला जात आहे.

राठी स्टील एक कुटुंब

कंपनीमध्ये जे कर्मचारी रुजू झाल्यानंतर ते आतापर्यंत कधीच सोडून गेले नाहीत. एक कुटुंब म्हणून येथील कर्मचारी वर्षानुवर्षे येथे काम करत आहेत. लॉकडाउनमध्येही एकही कर्मचारी कमी केला नाही. तसेच उत्पादन बंद असताना देखील सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्याबरोबर त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत कंपनी पुढे असते. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे.

आयकॉन स्टीलची वैशिष्ट्ये

  • मजबूत आणि गुणवत्तापूर्ण सळई निर्माण करण्यावर भर
  • राज्य, देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठे वर पकड
  • सामान्य नागरिकांपासून मोठमोठ्या संस्थांना आयकॉन स्टीलचा पुरवठा
  • सरदार सरोवर निर्मितीतही या स्टीलचा वापर
  • रिलायन्स ग्रुपलाही पुरवठा
  • राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला स्टीलचा पुरवठा
  • सामाजिक कार्यात पुढाकार : हजार वृक्षलागवडीचा संकल्प, रक्तदान शिबिराचे उपक्रम
  • हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
  • शहराशहरात बेटी बचाओ संदेश देत पथनाटय
  • मोबाइल व्हॅनद्वारे सळईच्या माहितीसह सामाजिक जनजागृती
  • कंपनीच्या जागेत निर्माण के ला तलाव
  • आयकॉन स्टीलकडून वृक्षारोपण मोहीम
  • स्टीलसोबत वाळू, खडीची करून दिली जाते चाचणी
  • बांधकामाच्या साइटवर केली जातेय मदत
  • बांधकाम कंत्राटदार, मिस्तरी यांची घेतली जाते कार्यशाळा
  • अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन
  • कं पनीतील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी

टीएमटीची मागणी वाढली

गुजरात राज्यातील भूज येथे वर्ष २००१ मध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर गुजरात राज्य शासनाने आरसीसी बांधकामाचे नवीन धोरण ठरवीत टीएमटी बार (सळई) द्वारेच बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीएमटी बारची मागणी वाढली. या काळात या कंपनीकडून सळईवर टीएमटी बार असे नाव टाकून विक्री व उत्पादन सुरू झाले होते. त्यामुळे कंपनीने गुजरात राज्य सरकारच्या निर्णयानंतर आपले पूर्ण लक्ष उत्पादन वाढीवर केंद्रित केले. परिणामी गुजरातसह देशातील इतर राज्यांत या कं पनीच्या टीएमटी बारची लोकप्रियता वाढली.

कंपनीकडून तलावाची निर्मिती

पावसाळ्यामध्ये औद्योगिक वसाहत येथील वाहून जाणारे पाणी हे अडविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात आले आहे. कंपनीने स्वतःच्या जागेत तलाव निर्माण केले. या तलावामध्ये एक लाख १० क्युबेक मीटर एवढ्या पाण्याची साठवणूक होते. त्यामुळे वाया जाणारे पाणी अडविल्याने परिसरात त्याचा फायदा झाला आहे.

विविध पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राकडून आयकॉन स्टीलला २००७ मध्ये इंडस्ट्रीज ऑफ जालना स्टील इंडस्ट्रीज हा पुरस्कार देण्यात आला. तसेच अनेक सामाजिक संस्थांकडून कंपनीला विविध पुरस्कार देण्यात आले आहेत.

बांधकाम मिस्त्रींसाठी कार्यशाळा

सर्वसामान्य व्यक्तीकडून एकदाच घर बांधले जाते. त्यामुळे कं पनीकडून घर निर्मितीसाठी वापरण्यात येणारी वाळू, खडी यांचे प्रयोगशाळेत तपासणी करून दिली जाते. तसेच बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मिस्त्री कामगारांच्या कार्यशाळा आयोजन करून सिमेंट, वाळू, खडीचा किती प्रमाणात वापर करून मिश्रण तयार करावे याबाबत मार्गदर्शन केले जाते. शिवाय बांधकाम सुरू असलेल्या साइटवर कं पनीचे सिव्हिल इंजिनिअर देखील भेट देऊन कामाची पाहणी करतात. त्यामुळे मजबूत आणि सुरक्षित वास्तू निर्मितीसाठी आयकॉन स्टील मदत करत आहे.

विद्यार्थ्यांसाठी नियमित कार्यशाळा

इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टील उद्योगाची माहिती व्हावी, कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत तीन ते चार दिवसांची कार्यशाळा नियमित आयोिजत केली जाते. तसेच या विद्यार्थ्यांना स्टील कं पनीच्या कामकाजाची माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष कामकाज कसे केले जाते, हे दाखविले जाते. यासाठी कंपनीच्या तज्ज्ञांकडून संपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले जाते.

English