रेडिमेड कपड्यांचा राजा : 'कॉटनकिग'

'कॉटनकिं ग' हा गरजेतून सुरू झालेला व्यवसाय. कॉटनचे कपडे वापरणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची इच्छा मनाशी बाळगून हा ब्रँड सुरू झाला. ‘कॉटनकिं ग’चा व्यवसाय आता अनेक राज्यांत पसरला आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांत ‘कॉटनकिं ग’च्या शाखा आहेत. ‘कॉटनकिं ग’च्या कामाचा व्याप सोप्या शब्दांत सांगायचा, तर या कारखान्यात दररोज २५,००० मीटर कापडापासून १२,००० कपडे बनविले जातात आणि त्या कपड्यांना एक लाख बटणे लावली जातात.

रेडिमेड कपड्यांसाठीची पहिली गरज म्हणजे उत्तम कापड. कॉटनकिंग खुल्या बाजारातून कापड खरेदी करत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या कापडासाठी ते वेगवेगळ्या कापड मिलसोबत करार करतात. उदाहरणार्थ – डेनिमच्या कापडासाठी ‘अरविंद मिल्स’, सुटिंगसाठी ‘वर्धमान’, एअरोसॉफ्ट कापडासाठी ‘डेन्व्हर’ यांच्यासोबत ‘कॉटनकिंग’चा करार आहे. विशिष्ट स्पेसिफिकेशन्स देऊन हवे तसे कापड बनवूनही घेतले जाते. विशिष्ट प्रकारचा धागा, विशिष्ट पोत, वीण, सरफेस फिनिशिंग अशा अनेकविध कॉम्बिनेशन्सच्या कापडांचा यात समावेश आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेली अचूकता हे ‘कॉटनकिंग’च्या यशाचे गमक आहे. ‘कॉटनकिंग’च्या बारामती येथील प्लांटमध्ये एकाच छताखाली सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. कापड आल्यानंतर त्याच्या कटिंगपासून कपडे तयार होईपर्यंतच्या सगळ्या गोष्टी इथे एकाच छताखाली पार पाडल्या जातात. त्यामुळे निर्मिती प्रक्रियेवर शंभर टक्केनियंत्रण राखता येते. अर्थातच त्यामुळे गुणवत्ताही कायम राखली जाते.

क्वालिटी चेक होऊन आलेल्या कापडावर ‘कॅड’द्वारे मार्कर प्लॅन बनवला जातो. तो स्प्रेडिंग आणि कटिंग मशीनमध्येफीड होतो. त्याआधारे एकावर एक ठेवलेल्या कापडाच्या थरांचे कटींग होते. कापडाचा फॅब्रिक विभाग नंतर कटिंग विभागातून हे कापलेले कापडाचे तुकडे प्रॉडक्शन फ्लोअरवर जातात. या कापडाच्या तुकड्यांपासून छोटे भाग, मोठे भाग बनवले जातात आणि हे सगळे पुढे असेंब्ली लाईनमध्ये जाते. इथे एका हँगरला एका कपड्याचे छोटे-छोटे पार्ट अडकवलेले असतात. हे हँगर पुढे पुढे सरकत जातात. ज्या कारागिराचे जे काम असेल ते, उदा. कॉलर लावणे, खिसा जोडणे वगैरे, ते पूर्ण करून तो पुन्हा त्या हँगरला जोडतो आणि हँगर पुढच्या सेक्शनकडे जातो आणि पुढचा कारागीर त्याची प्रक्रिया पूर्ण करतो.

या अत्याधुनिक मशीनमुळे कामाची गती वाढते. माणसाचा विचार केला तर सकाळी त्याचा कामाचा वेग चांगला असतो, दुपारी तो थोडा सुस्तावतो आणि संध्याकाळ होईपर्यंत त्याची एनर्जी पूर्ण संपत आलेली असते. पण मशीन दिवसभर एकाच गतीने काम करत असल्यामुळे ते च्यासोबत काम करणाऱ्या माणसालाही जागरूक राहून त्याच गतीन काम करायला लावते.

शिवून पूर्ण झाल्यावर प्रत्येक कपड्याचे इन्स्पेक्शन केले जाते. त्याची शिलाई, बटण, काज, कॉलर अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची तपासणी केल्यानंतर तो कपडा पॅकिंग करून पुढे वेअर हाऊसला पाठवला जातो.

शिवून पूर्ण झाल्यावर प्रत्येक कपड्याचे इन्स्पेक्शन केले जाते. त्याची शिलाई, बटण, काज, कॉलर अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची तपासणी केल्यानंतर तो कपडा पॅकिंग करून पुढे वेअर हाऊसला पाठवला जातो.

सध्या आठ तासांत १२,००० कपडे तयार होतात. ही क्षमता १५,००० पर्यंत नेण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या मशीन्स ‘कॉटनकिंग’ आणत आहे. या नव्या ऑटोमेशनमध्येही क्षमता २०,००० कपड्यांपर्यंत नेण्यासाठीची तजवीज करून ठेवण्यात येणार आहे.

फक्त गुणवत्ता नव्हे तर त्यातही एकसारखेपणा हवा असेल तर त्यासाठी ऑटोमेशन गरजेचे आहे. जसजसा व्यवसायाचा पसारा वाढतो तसे ऑटोमेशनमुळे तुम्हाला गुणवत्ता आणि गुणवत्तेतील सातत्य टिकवून ठेवता येते. काही व्यक्तींच्या कौशल्यांवर अवलंबून राहणे यामुळे टाळता येते.

‘कॉटनकिंग’ची बारामतीतील फॅक्टरी ही ‘ग्रीन फॅक्टरी’ आहे. फॅक्टरीच्या संपूर्ण छतावर सोलर पॅनेल बसविलेले आहेत. फॅक्टरीसाठी लागणारी सुमारे ८५ टक्के वीज इथेच तयार केली जाते. उरलेली २० टक्के वीज ‘महावितरण’कडून खरेदी केली जाते.

ही फॅक्टरी ‘झिरो डिस्चार्ज’ फॅक्टरी आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पूर्ण क्षमतेने वापर केला जातो. एकदा वापरलेले पाणी ‘इटीपी’, ‘एसटीपी’द्वारे पुनर्वापरायोग्य बनवले जाते आणि त्याचा पुन्हा वेगळ्या कामासाठी वापर केला जातो.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणातही ‘कॉटनकिंग’चे योगदान आहे. येथील कारागीरांमध्ये ७० टक्के महिला आहेत. बारामतीच्या आसपासच्या भागातून अकुशल महिलांना इथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ शिकाऊ आणि नंतर स्वतंत्र कारागीर म्हणून त्यांना इथेच नोकरी दिली जाते.

सध्या ‘कॉटनकिंग’ची २१० पेक्षा जास्त दुकाने आहेत. परंतु बाजाराची मागणी लक्षात घेता पन्नास कोटींची गुंतवणूक करून एक लाख २० हजार चौरस फुटांच्या नव्या इमारतीद्वारे फॅक्टरीचा विस्तार करण्याचा ‘कॉटनकिंग’चा मानस आहे. चांगल्या कॉटनचे, चांगल्या प्रतीचे, चांगले कपडे सातत्याने पुरविणे हाच ‘कॉटनकिंग’चा ध्यास आहे

महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट ठेवत कॉटनकिंगच्या बारामती येथील फॅक्टरीत ७० टक् मके हिला कर्मचारी आहेत

…१००% कॉटन म्हटलं, की कॉटनकिंग!

नुसतं कॉटन नव्हे…१०० % कॉटन!

ग्राहकांना १००% कॉटनचे उत्तम कपडे देणारा ब्रॅंड म्हणून ‘कॉटनकिंग’ची ओळख आहे. खरं तर `१००% कॉटन` म्हटलं की ‘कॉटनकिंग’ हाच ब्रॅंड नजरेपुढे येतो. ‘कॉटनकिंग’च्या लोकप्रियते मागचं हे एक महत्त्वाचं कारण होय. हीच ओळख, हेच कारण या ब्रॅंडला देशात अग्रगण्य बनवते, ग्राहकांना विश्वास देते. कॉटनची शुद्धता, गुणवत्ता आणि वैशिष्टय जपत या ब्रॅंडने ग्राहकांच्या मनात आणि शरीरावरही कायमच आपलं स्थान निर्माण केलं आहे. १००% शुद्धतेचा हाच आग्रह ‘कॉटनकिंग’ला इतरांपेक्षा वेगळं राखतो. ग्राहकांसाठी उत्तमोत्तम व्हरायटीज समोर आणताना, `१००% कॉटन` हे सूत्र कायम केंद्रस्थानी असते. आता, हाच शुद्धतेचा वसा नव्या दमाने, नव्या ढंगाने पुढे घेऊन जाण्याचे ‘कॉटनकिंग’ने ठरविले आहे.

नावीन्यपूर्ण आणि आगळीवेगळी निर्मिती

‘कॉटनकिं ग’ नेहमीच काहीतरी वेगळं, नावीन्यपूर्ण उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचावं यासाठी प्रयत्नशील असतं, प्रयोगशील असतं! यापूर्वीही ‘कॉटनकिंग’ने अँटीस्टैन, एरोसॉफ्ट, कू ल स्लब्झ, इंडिगो डाय असे १००% कॉटन असलेल्या शर्टचे विविध प्रकार बाजारात आणले आहेत. २०२२ मध्ही `कॉटनकिंगची डिझाईन व रिसर्च टीम, १००% कॉटनमध्ये नवनवीन व्हरायटीज् बाजारात आणणार आहे. त्याच्या ट्रायल्स देखील झालेल्या असून त्यातून मिळालेला प्रतिसाद अत्यंत्त उसाहवर्धक आहे. त्यामुळे या नव्या खजिन्यास ग्राहकांची निश्चितच उत्तम पसंती आणि दाद मिळेल, यात शंका नाही. नवीन व्हरायटींसह येत्या आथिर्क वर्षात म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये कॉटनकिंग तुमच्या सेवेत हजर असेल.

आता ‘पुरूषही खरेदीचा आनंद घेऊ शकतात!’

‘पुरूषही खरेदीचा आनंद घेऊ शकतात!’ या वाक्याचा ‘कॉटनकिंग’ला वेळोवेळी प्रत्यय येतो. पूर्वी पुरूष नेहमीच पांढरा किंवा निळ्या रंगातील शर्ट घेणं पसंत करत. मात्र गेल्या काही दिवसांत वेगवेगळे रंग, पॅटर्न, चेक्स अशा वेगळ्या धाटणीच्या कपड्यांना पुरूषांची पसंती आहे. तसेच शोरूममध्ये उत्तम सेवा मिळावी, ग्राहकांना व्यवस्थित ट्रायल घेऊन कपडे खरेदी करता यावी यासाठी ‘कॉटनकिंग’ची सर्व दालने अद्ययावत करणार आहेत. तसेच ‘कॉटनकिंग’ आता शर्ट व पॅन्ट दोन्ही वस्त्रप्रावरणांमध्ये आणखी तीन नाविन्यपूर्ण फिट्स घेऊन येणार आहेत. त्यामुळे आता ‘कॉटनकिंग’मध्ये खरेदी करणं हा पुरुषांसाठी आनंददायी अनुभव ठरणार आहे.

पर्यावरणपूरक तरीही ट्रेंडी!

कॉटन हा मुळातच नैसर्गिक वस्त्रप्रकार आहे. त्याचा वापर हा कायमच पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक असतो. ‘कॉटनकिंग’च्या निर्मिती प्रक्रियेमध्ये पर्यावरणपूरक असण्यास अत्यत महत्त्व दिले जाते. पर्यावरणाचा ऱ्हास होईल अथवा त्यास कुठे बाधा होईल, अशाप्रकारची कोणतीही रासायनिक प्रक्रिया ‘कॉटनकिंग’च्या निर्मितीमध्ये होत नाही. म्हणूनच, ‘कॉटनकिंग’चा ग्राहक एक प्रकारे पर्यावरणरक्षणास हातभार लावतो. निसर्गाशी असणारं नातं जोपासत, त्यात असणारा गोडवा जपत ‘कॉटनकिंग’चा प्रवास डौलात सुरुच असेल… विश्वासाचा धागा मनामनात पेरत!

ग्राहकांशी संवाद कायम

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये ‘कॉटनकिंग’ने स्वतंत्र ओळख निर्माण करून ठामपणे पाय रोवले आहेत. स्वतःचे आउटलेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आवश्यक आहेत, असे ‘कॉटनकिंग’च्या प्रदीप मराठे यांचे मत आहे. त्यामुळे इतर रिटेलर डिस्ट्रिब्टयुर्सवर अवलंबून राहावे लागत नाही, ग्राहकासोबत थेट संवाद साधता येतो. यापुढेही प्रत्क मॉडेल ये ग्राहक आणि आमच्यामध्ये कोणतेही अंतर राहणार नाही, असे राहील, असेही मराठे सांगतात

मी कॉटन कपड्यांचा ग्राहक होतो. बाजारात मला हवे तसे कपडे मिळत नसत. शंभर टक्के कॉटनची हमी नाही, व्हरायटी नाही आणि योग्य किं मतही नाही हे लक्षात आले. तेव्हा आपणच ही गरज पूर्ण करणारा व्यवसाय सुरू करावा, असा विचार केला. हा व्यवसाय अनेक शहरांमध्ये चालवण्यासारखा आहे, हे जोखून मी हा व्यवसाय सुरू केला.

प्रदीप मराठे
संचालक, कॉटनकिंग

सौरउर्जेद्वारे ८५ टक् वीज के निर्मिती करणारी ‘कॉटनकिंग’ची बारामतीतील ‘ग्रीन फॅक्टरी’
कॉटनकिंगचे जनरल मॅनेजर के. बी. गायकवाड.
English