पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील
‘डीपीयू’ : भारताचा नावाजलेला शैक्षणिक ब्रँड
बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आशीर्वादाने डॉ. पी. डी. पाटील यांनी डॉ. सौ. भाग्यश्रीताई पाटील यांच्यासोबतीने १९८४ मध्येपिंपरीत इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून प्रवास आरंभ केला. अथक परिश्रम आणि परिपूर्णनियोजनाच्या बळावरआज डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू) आणि युनिटेक सोसायटीने उच्च शिक्षणाच्या विद्याशाखा असलेल्या ३०हून अधिक संस्थांचे जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल उभे केले आहे. सर्व विद्याशाखांमधून २० हजारांवर विद्यार्थी दरवर्षी इथे उच्चशिक्षण घेतात.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २००३ मध्ये अभिमत विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) म्हणून ‘डीपीयू’ला मान्यता दिली. नव्या काळाशी सुसंगत अशा शिक्षणासाठी पुढील ५० वर्षांचे भान ठेवून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने नवनवे अभ्यासक्रम, संशोधनासाठी पायाभूत सुविधा उभारल्या. नवी शैक्षणिक आव्हाने पेलत ‘डीपीयू’ने शिक्षणाची परिपूर्ण ‘इकोसिस्टीम’ विकसित केली. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अभिमत विद्यापीठ म्हणून ‘डीपीयू’चा गौरव २०१७ सालीच झाला आहे. आज ‘डीपीयू कॅम्पस भारतातील एक नावाजलेला शैक्षणिक ब्रँड बनला आहे.
‘Empowerment through Knowledge’ अर्थात ‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून मेडिकल कॉलेजपाठोपाठ डेंटल कॉलेज, नर्सिंग, फिजिओथेरेपी, बायोटेक, ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर, ऑप्टोमेट्री अॅण्ड व्हिज्युअल सायन्स, डिस्टन्स लर्निंग, सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंग, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक अशी ९ महाविद्यालये/संस्था ‘डीपीयू’अंतर्गत सुरू झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी संपूर्ण भारतातून तसेच सौदी अरेबिया, मॉरिशस, मस्कत, दुबई आदी देशांतून तसेच आयुर्वेद शिणासाठी अमेरिका, ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल व युरोपीय देशांतून विद्यार्थी येतात. सर्व संस्थांच्या इमारती, पायाभूत सोयी-सुविधा आणि शिक्षण सुविधांचा तसेच वसतिगृहांचा दर्जा शब्दशः ‘वर्ल्ड क्लास’ आहे. ‘डीपीयू’ला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) ३.६२ एकत्रित पॉइंट्स ग्रेड सरासरीसह दुसऱ्या सायकलमध्ये (सीजीपीए) ‘अ’ श्रेणी प्राप्त आहे. ‘यूजीसी’ कडून कॅटेगिरी-१ अभिमत विद्यापीठ गटात स्थान मिळाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘डीपीयू’ला देशात डेंटल विभागत तिसरे, ‘मेडिकल’मध्ये २४ वे, विद्यापीठ म्हणून ४६वे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२० मध्ये एकूण श्रेणीत देशात ७५ वे स्थान दिले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ‘आयएसओ ९००१: २०१५ आणि १४००१: २०१५’ प्रमाणित तसेच ग्रीन एज्युकेशन कॅम्पस आहे. ‘यूजीसी’च्या निवासी विद्यापीठे श्रेणीत डॉ. डी वाय. पाटील विद्यापीठ, २०१९ मध्येच देशातील ९व्या क्रमांकाचे स्वच्छ विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठ ‘वन डिस्ट्रीक्ट वन ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड्स २०२१’ चे राष्ट्रीय मानकरी आहे.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. सौ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९९६ पासून गेल्या २५ वर्षांत उत्तुंग झेप घेतली. ‘एमबीबीएस’ची विद्यार्थीक्षमता आता २५० वर गेली आहे. २१८ एम.डी. आणि एम.एस., २२ एम. सीएच./डी.एम. (सुपरस्पेशालिटी), सर्व मेडिकल स्पेशालिटीसाठी पीएच.डी. प्रोग्राम, ३१ विषयांसाठी फेलोशिप आणि १९ विषयांसाठी सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत.
प्रोफेशनल आणि हेल्थ सायन्स शिक्षण
विद्यापीठात मेडिसिन, दंतशिक्षण, आयुर्वेद, होमिओपॅथी, व्यवस्थापनशास्त्र, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि ऑप्टोमेट्री या विषयांवर ११९ शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत. ११ अंडरग्रॅज्युएट, ६८ पोस्टग्रॅज्युएट, ८ पीएच. डी. १ इंटिग्रेटेड मास्टर्स, १ डिप्लोमा (डेंटल), १४ पीजी डिप्लोमा (१२ मेडिकल + २ ऑप्टोमेट्री), ४ सुपर स्पेशालिटी (एम. सीएच / डीएम) आणि ११ फेलोशिप्स (१ दंत + १० वैद्यकीय) पर्याय उपलब्ध आहेत. डेंटल कॉलेज नॅशनल अँक्रिडेशन बोर्डाने नामांकन दिलेले महाराष्ट्रातील पहिले दंतमहाविद्यालय आहे. ‘डीपीयू’मध्ये ४८०० हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ६४२ हून अधिक फॅकल्टी मेंबर कार्यरत आहेत. फॅकल्टी डेव्हलपमेंट आणि रिसर्च प्रोग्रामसाठी टिचींग, रिसर्च आणि कन्सल्टन्सी स्वरूपात जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, सिनसिनाटी युनिव्हर्सिटी, वेन स्टेट युनिव्हर्सिटी (अमेरिका), स्कोवडे युनिव्हर्सिटी स्वीडन, लंडन स्कूल ऑफ ट्रेनिंग, हाँगकाँग युनिव्हर्सिटी, थमसाट, राजभट युनिव्हर्सिटी थायलंड, प्राज मॅट्रिक्स पुणे, एनसीसीएस पुणे, स्कोव्हडे व ओरेब्रो युनिव्हर्सिटी स्वीडन, नॅशनल स्कूल ऑफ इंजिनिअर्स, ट्युनिशिया यासारख्या संस्थांशी शैक्षणिक, औद्योगिक आणि संशोधन सहयोग आणि सामंजस्य करार केले आहेत.
वर्ल्ड सायन्टिस्ट अॅन्ड युनिर्व्हसिटी रँकिंग २०२१ या जागतिक स्पर्धेत विद्यापीठाच्या ४८ संशोधकांना मानांकन मिळाले. मेडीकल सायन्समध्ये ४१ संशोधकांना, बायोटेक्नॉलॉजी आणि आयुर्वेदात ३ संशोधकांना, अर्थ सायन्समध्ये दोघांना स्थान मिळाले आहे. १८१ देशांतील १० हजार ६६५ विद्यापीठांतील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांमधून ही निवड व रँकिंग झाले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर
डॉ. पी. डी. पाटील आणि डॉ. डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या कल्पक नियोजनातून सुमारे साडेआठ लाख चौरस फूट क्षेत्रावरील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुण्यातील नावाजलेले आरोग्य केंद तर आहेच पण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी प्राप्त, अल्ट्रा-मॉडर्न, अत्याधुनिक सुविधा असलेले ‘एनएबीएच’ मान्यताप्राप्त हे २०११ बेड्सचे हॉस्पिटल भारतातील नामांकित सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपैकी एक आहे. बेसिक व सुपरस्पेशालिटी २३ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), १७५ आयसीयू बेड्स, ३० मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, रोबोटिक सर्जरी विभाग, ८० स्पेशलाइज्ड आउटपेशंट सल्लासेवा, आशियातील पहिले अत्याधुनिक थ्री-टी विडा ‘एमआरआय’, १२८ स्लाइड्स सीटी स्कॅन, आपत्कालीन रेडिओलॉजी, अवयव प्रत्यारोपण, मेंदू व मणके शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, आयव्हीएफ व एंडोस्कोपी यासाठी अत्यंत हायक्लास सुविधा येथे आहेत. तपासणीसाठी रोज ३५०० बाह्यरुग्ण असतात. ज्या नवजात बालकांना आईचे दूध मिळत नाही त्यांच्यासाठी २०१३ साली यशोदा मातृ दूग्ध पेढी (ह्यूमन मिल्क बँक) स्थापन केली. आजवर १३ हजार मातांनी दान केलेल्या तीन हजार लीटरच्या वर संकलित दूधापैकी २४०० लीटर दूध १९ हजार गरजू बालकांना देण्यात आले.
कोरोनाकाळात अभूतपूर्व कामगिरी
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने गेल्या दीड वर्षांच्या करोना महामारीच्या काळात शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. डॉ. यशराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर्स, सपोर्ट स्टाफ अक्षरशः रात्रंदिवस झटत होते. करोना रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेचे ८७२ बेड, ७० आयसीयू बेड, व्हेंटीलेटरसह ३८ बेड, ऑक्सिजनयुक्त ३८२ बेड आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ३९८ बेड राखीव होते. पिंपरीतील पोलिसांसाठी व्हेंटिलेटर बेडसर ३० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड उभाला होता. चाचण्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. महापालिकेच्या सहकार्याने विशेष ‘कोवीड वॉर रुम’ हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. लसीकरणाचे स्वतंत्र केंद्र सुरू आहे.
ठळक पुरस्कार व सन्मान
- २०१९ मध्ये आयुष मंत्रालय आयोजित केलेल्या स्पर्धेत ६५३ खासगी हॉस्पिटल्समध्ये स्वच्छतेत देशात पहिले.
- हॉस्पिटलला आयुष मंत्रालयाच्या कायाकल्प योजनेचा २०१९-२० चा देशात पहिला पुरस्कार.
- हेल्थकेअर प्रोव्हायडर असोसिएशनचा प्रथम राष्ट्रीय ग्रीन पुरस्कार.
- गुणवत्तापूर्ण रक्तदाब तपासणीबद्दल ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नोंद.
- सर्वाधिक रुग्णांना सेवा देणारे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचेधर्मादाय रुग्णालय.
- ब्युरो व्हेरिटासचे पर्यावरणपूरक प्रमाणपत्र.
२०१७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. पी. डी. पाटील. सोबत तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे.
करिअर घडविणाऱ्या संस्था
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीअंतर्गत इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, विधी, कला-वाणिज्य-विज्ञान, एम.बी.ए., हॉटेल मॅनेजमेंट, बी-स्कूल, पब्लिक स्कूल आदी १४ संस्था आहेत. इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग, आय.टी., ई. अँड टी.सी., इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रीकल, ऑटोमेशन व रोबोटिक, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व डेटा सायन्सं विद्याशाखा आहेत. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने व्यावसायिक अभ्यासक्रम गटात ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार मिळाला आहे. तयार मनुष्यबळमिळण्यासाठी जॉन्सन कंट्रोल्स, बॉश, टाटा ग्रुपच्या टीएल मॅन्यु. सोल्यूशन लि. आदींनी कॉलेजमध्येच स्वतःच्या लॅब्स स्थापित केल्या आहेत. जगप्रसिद्ध गुगल कंपनीने प्राध्यापकांसाठी क्लाऊड कम्प्युटिंग, मशिन लर्निंग, आर्टिफिशीयल इन्टेलिजेन्स आदी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण द्यायला सुरवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे जॉब व चांगल्या पॅकेजचा लाभ मिळतो. शिक्षणानंतर चांगल्या नोकऱ्या मिळाव्या यासाठी सुसज्ज ट्रेनिंग अँड एम्पॉलयमेंट विभाग आहेत. एका विद्यार्थिनीची मायक्रोसॉफ्टनं नुकतीच निवड केली. तिला जवळपास वार्षिक ४३ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. अडोबी कंपनीने इंटर्नशिपसाठी निवडलेल्या एका विद्यार्थीनीला महिन्याला एक लाख मानधन मिळेल. ही झाली ठळक उदाहरणं, याशिवाय गेल्या २५ वर्षांत हजारो मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा अॅनॅलिटीक्स, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन, मॅनेजमेंट, लॉ, फार्मसी, बायोटेक, हॉटेल मॅनेजमेंट, मेडिकल सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रातील बहुतांश कंपन्या दरवर्षी कॉलेजमधून मोठ्या प्रमाणावर निवड करतात.
‘हे तर पुण्याचे वैभव’
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या भेटीनंतर मी थक्कच झालो. ऑपरेशन थिएटर्समध्ये प्रवेश केल्यानंतर आपण भारतात आहोत, याचा विसर पडला. मी जगभरात अनेक हॉस्पिटल बघितली आहेत, मात्र एकाच इमारतीत एवढ्या मोठ्या संख्येने सुसज्ज आणि प्रसन्न ऑपरेशन थिएटर्स मी बघितलेली नाहीत. ग्रंथालय व इतर सुविधा बघून मला वाटले की पुढच्या जन्मात इथेच प्रवेश घ्यावा. असे हॉस्पिटल भारतात व तेदेखील पुण्यात आहे, हे शहराचं वैभव आहे. नुसता पैसा आणि इच्छाशक्ती असून चालत नाही, त्यासाठी डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारखा दृष्टिकोन असलेली व्यक्ती हवी असते.
पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती,
संस्थापक-अध्यक्ष, संचेती हॉस्पिटल, पुणे
‘आपल्या देशात हे दुर्मीळ’
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कॅम्पस पाहून मी चकीत झालो. आयुष्यातला तो दिवस मी विसरू शकणार नाही. मोठं स्वप्न पाहिल्याशिवाय अशा गोष्टी साध्य होत नाहीत. डॉ. पी. डी. पाटील यांची दूरदृष्टी काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. आपल्या देशात अशा संस्था दुर्मीळ आहेत. हे पाहिल्यावर मी असं म्हणेन, की आपण ‘वर्ल्ड क्लास स्टॅण्डर्ड’ गाठले आहे.
पद्मभूषण डॉ. विजय भटकर,
कुलपती, नालंदा विद्यापीठ, बिहार
‘आजच्या तरुणांच्या स्वप्नांना ‘डीपीयू’ ताकद देत आहे.’
स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम,
दिवंगत माजी राष्ट्रपती
‘डीपीयू’ने शिक्षण व वैद्यकीय विज्ञान ही मानवी सेवा पूर्ण केली आहे.
भारतरत्न प्रा. सी. एन. आर. राव,
ज्येष्ठ शास्त्रज्ञ’
‘हे विद्यापीठ एक अनुकरण करण्यायोग्य शैक्षणिक मॉडेल आहे.’
पद्मविभूषण, डॉ. के. कस्तुरीरंगन,
ज्येष्ठ शास्त्रज्ञ
‘डीपीयू’ने उत्कृष्टतेचे नवे मानक सिद्ध केले आहे.’
पद्मविभूषण, डॉ. रघुनाथ माशेलकर,
ज्येष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. पी. डी. पाटील : ‘डीपीयू’ची प्रेरक शक्त
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून संस्था कशा उभाराव्यात व यशस्वीपणे चालवाव्यात, याचा वस्तुपाठ डॉ. पी. डी. पाटील यांनी महाराष्ट्रापुढे घालून दिला आहे. डॉ. पाटील यांनी ३७ वर्षांपूर्वी शिक्षणक्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याचा निश्चित दृष्टिकोन ठेवला आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि अन्य संस्थांचा विशाल वटवृक्ष वाढवत नेला. स्वतः बी. एस्सी., एलएल.बी. आणि पीएच.डी. असल्याने शिक्षणाविषयीची त्यांची आस्था व दूरदृष्टी निरनिराळ्या विद्याशाखांच्या वाढीत प्रतिबिंबित झाली आहे. पायाभूत सुविधांची गुणवत्ता, परिपूर्णता, प्राध्यापकांची क्षमता, विद्यार्थ्यांची कामगिरी यावर डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी आजवर अतोनात भर दिला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘डीपीयू’च्या नवनव्या विद्याशाखांना वेळोवेळी या निकषांच्या आधारेच मान्यता दिली.
पद्मश्री, डॉ. डी. वाय. पाटील यांचे मार्गदर्शन आणि पत्नी डॉ. भाग्यश्री यांची मोलाची साथ या बळावर जागरूकपणे त्यांनी आपले सामाजिक भान जपले. आयुष्यात शिकण्याच्या काळात ते आता शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदापर्यंत जाण्याच्या प्रवासात स्वभावातील निर्मळता आणि दिलदारपणा त्यांनी अजिबात कमी होऊ दिला नाही. ‘डीपीयू’तील निरनिराळे विभागप्रमुख, प्राचार्य, शेकडो प्राध्यापक, विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची प्रेरक शक्ती म्हणून डॉ. पाटील खंबीरपणे उभे आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्ष व प्र-कुलगुरू डॉ. सौ. भाग्यश्रीताई पाटील आणी सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार या नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीची त्यांना खंबीर साथ आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात पार पडलेल्या भारत-अमेरिकाशैक्षणिक सहकार्य परिषदेचे कुलपति, डॉ. पी. डी. पाटील मुख्य आश्रयदाते होते. अमेरिकेतील एमआयटी, प्रिन्स्टन, फ्लोरिडा, डेन्व्हर यासारख्या आघाडीच्या विद्यापीठांच कुलगुरू, शैक्षणिक धोरण तयार करणारे अमेरिकन काग्ँस आरे णि सिनेटमधील सदस्य आणि कार्पोरेट क्षेत्रातील शंभराहून अधिक अग्रणी परिषदेला उपस्थित होते. उच्चशिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. पाटील यांचे अमेरिकन काग्ँसचरे ्या वतीने विशेष अभिनंदन करून मानपत्र देण्यात आले. डॉ. पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आजवर ‘टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम’चा ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’, भारतीय चिकित्सक रतन पुरस्कार, ‘अमेरिकन बायोग्राफीकल इन्स्टिट्ट’चा ‘मॅन ऑ यू फ द इयर’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार आदी सुमारे २० प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल सर्धवािक रुग्णांना सेवा देणारे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धर्मादाय रुग्णालय आहे. त्याचे श्रेय डॉ. पी.डी. पाटील व डॉ. भाग्यश्रीताई यांचे आहे. मराठवाडा आणि गुजरातमध्ये अनुक्रमे १९९४ व २००१ मधील भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत करताना डॉ. पाटील यांनी सामाजिक कर्तव्य पार पाडले. विद्यापीठांतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास शेकडो विद्यार्थी मोफत आणि सवलतीत शिक्षण घेत आहेत. नाणेगाव व अप्पाची वाडी ही गावे संस्थेने एकात्मिक विकासासाठी दत्तक घेतली होती. पुण्यातील जायंट्स संस्थेची आंतरराष्ट्रीय परिषदही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठानं पुरस्कृत केली होती. आळंदी आणि देहूतील पालख्यांतील वारकऱ्यांची भोजनव्यवसथा डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी करण्यात येते.
विक्रमी साहित्य संमेलन
डॉ. पी. डी. पाटील यांचे कर्तृत्व आणि व्यक्तित्व शिक्षणक्षेत्राच्या सीमा ओलांडून साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात ठळक पुढे आले आहे. पिंपरी-चिंचवड येथे २०१६ मध्ये झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद डॉ. पाटील यांनी व आयोजकत्व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने भूषवले. हे साहित्य संमेलन ‘न भूतो न भविष्यति’ असे ठरले. या संमेलनाने दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम, साहित्यिक व सिकांच्या उपस्थितीचे नवे विक्रम केले. चारच दिवसांत आठ लाख रसिकांनी संमेलनाला भेट दिली. सहा कोटींहून अधिक किंमतीच्या पुस्तकांची संमेलनात विक्री झाली. मराठी भाषाविषयक ४५० पानांचा ग्रंथ, तीन खंडातील साहित्यिक दैनंदिनी, निवडक ८९ कवितांचे पुस्तक, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांना १ हजार पुस्तकभेट, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत आदी अनेक उपक्रम स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. पाटील यांनी राबविले.