रासायनिक उद्योगजगतातील कोल्हापुरी ब्रँड :  केमलिन

भाडेतत्त्वावरील छोट्याश्या जागेत सुरू झालेली पंपबांधणीची कंपनी आज जगभरातील तब्बल २७ देशांमध्ये पंपांची निर्यात करते आहे. वडिलांचा लघुउद्योग सातासमुद्रापार नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कोल्हापुरातील मिलिंद आळवेकर. रासायनिक उद्योगात लागणाऱ्या पंपांची निर्मिती आणि पुरवठा या उद्योगातील आळवेकर यांच्या ‘के मलिन’चे व्यावसायिक यश अद्वितीय आहे. आधी ज्या कारखान्यात चटकन गंज पकडणारे सल्फ्युरिक ॲसिड, ओलियम, क्लोरो सल्फोनिक ॲसिड्स, द्रव सल्फर यांसारखे द्रव पदार्थ वापरले जात, तेथे उपयोगी पडतील असे उभ्या आकाराचे सेंट्रिफ्युगल सम्प पंप्स आळवेकर यांनी पहिल्यांदा भारतात बनविले. तोपर्यंत अशा दर्जाची उत्पादने फक्त परदेशांतच होत असत. त्यामुळे तेथून पंप आयात करण्याशिवाय पर्यायही नसे. या समस्येवरचा प्रभावी तोडगा ‘केमलिन’मुळे भारतीय कं पन्यांना मिळाला. सुरुवातीला या पंपांच्या गुणवत्तेविषयी कंपन्यांना खात्री पटवून देणे आणि ऑर्डर मिळविणे, यासाठी भरपूर मेहनत करावी लागली. एकदा वापर सुरू झाल्यानंतर ‘केमलिन’च्या उत्पादनांविषयी कंपन्यांमध्येविश्वास निर्माण होऊ लागला आणि त्यानंतर हळूहळू त्यांनी विदेशी कं पन्यांना देत असलेल्या पंपांच्या ऑर्डर्स ‘के मलिन’ला देण्यास सुरुवात के ली. हा प्रवास खूप मोठा आणि महत्त्वाचा होता.

जवळपास १९८० च्या दशकात भारतातील बहुंताश पंप हे परदेशातून आयात होत होते. त्याच किंबहुना, त्याहून अधिक दर्ज्याचे पंप भारतात तयार व्हावेत, यासाठी बाळासाहेब आळवेकर यांनी कोल्हापुरात पाया रचला. त्याही पुढे जात त्यांचे चिरंजीव मिलिंद आळवेकर यांनी सध्या अमलात आलेली ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना त्या वेळी रुजवली. त्यातही त्यांनी जन्मभूमी असलेल्या कोल्हापुरातच पंपबांधणी झाली पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्या वेळी दुर्गम किंवा माहीत नसलेल्या कोल्हापूरसारख्या शहरात फॅक्टरी सुरू करण्याचे धाडस केले. पंपाचे छोटे छोटे पार्ट्सच नव्हे, तर संपूर्ण पंपबांधणी कोल्हापुरात करण्यास सुरुवात केली. हे पंप गुणवत्तापूर्ण व्हावेत, यासाठी कष्ट उपसले. हे पंप घेण्यासाठी विविध फॅक्टरी मालकांचा विश्वास मिळविण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली. त्यांनीही हार न मानता विदेशी पंपांना तोडीस तोड भारतीयच नव्हे, तर कोल्हापुरी पद्धतीचा गुणवत्तापूर्ण पंप साकारला. सुरुवातीला एक-दोन पंपांपासून सुरू झालेला प्रवास आज विविध प्रकारांतल्या शेकडो पंपांपर्यंत पोहोचला आहे. ‘केमलिन’ने पाच हजार मिमी खोलीच्या खड्ड्यात वापरता येतील असे पंप बनविण्यात यश मिळविले. त्यामुळे धोकादायक ॲसिड, गरम क्षार अशा द्रव्यांसाठी ‘केमलिन’चे पंप औद्योगिक कंपन्यांकडून आवर्जून विकत घेतले जातात. हे पंप बनविण्यासाठी सुयोग्य धातूंचा मिलिंद यांनी कसून अभ्यास केला. त्यांचे कामातील सातत्य, प्रामाणिकपणा, सचोटी आणि गुणवत्तापूर्ण काम यांमुळे त्यांना यात यश आले. हे पंप बाजारात आल्यानंतर पदरेशाहून हे पंप आणण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे साहजिकच परदेशी चलनाची बचतही झाली. आज ‘केमलिन’चे पंप केवळ भारतातच नव्हे, तर २७ देशांमध्येनिर्यात होतात.

मानवी जीवनाला रसायन कितीही घातक असले, तरी त्याशिवाय दैनंदिन जीवन अशक्य आहे. त्यासाठी काळजी, आवश्यकता, तीव्रता आणि दाब कमी जास्त करून रसायनांचा वापर हा मानवी जगण्याला अक्षरशः वरदान ठरू शकतो. खते, केमिकल्स, औषधे निर्माण, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, साखर उद्योग, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आणि कागद व प्रक्रिया उद्योगातील रसायनांच्या वापरातून महाराष्ट्राच्या औद्योगिक व कृषी विकासाला बळ लाभले आहे. या रसायनांचा त्यातील अचूक वापर करण्यासाठी लागणारे पंप ३५ वर्षांपूर्वी बाळासाहेब आळवेकर यांनी बनविण्यास सुरुवात केली. आणि प्रत्येक टप्प्यावर तंत्र, शास्त्र आणि अनुभव यांचा अचूक संयोग साधत रसायन प्रवाह संयमित ठेवणाऱ्या ‘जगात भारी’ पंपाची निर्मिती आणि त्याचा विद्यमान उद्योग कोल्हापुरात होतो आळवेकर यांच्या ‘केमलिन कंपनी’तून.

जवळपास २ प्रकारचे पंप आणि ४१ साईजेस आणि ४ प्रकारचे व्हॉल्व २६ साईजेसमध्ये हे जणू औषधी खतांमधील रासायनिक मात्रा सूक्ष्म पातळीवर प्रवाहित करतात. आणि ही अचूकता जगभरातल्या मोजक्याच पंपांमध्ये आहे. त्यामध्ये ‘केमलिन’च्या पंपाचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि शेकडोंना रोजगार देत मिलिंद आळवेकर यांनी ‘केमलिन’चा नावलौकिक जगभर पसरवला आहे. या लौकिकामध्ये जिद्द, कष्ट आणि ज्ञानसाधनेचा प्रवास जाणून घेणे रसायनशास्त्र माहीत नसणाऱ्या व्यक्तींसाठीही प्रेरणादायी आहे.

बाळासाहेब आळवेकर यांनी इंडियन नेव्हल डॉकयार्डमधून मरीन इंजिनीअरिंगचा कोर्स पूर्ण केला होता. पुण्यातील एका पंपबांधणी करणाऱ्या कंपनीमध्ये ते नोकरीला होते. त्यांनी १९७० च्या दशकात नागाळा पार्कात भाडेतत्त्वावर जागा घेऊन जुन्या मशिन्सच्या आधारे अनुभवाच्या बळावर पंपबांधणीला सुरुवात केली. त्यासाठी ड्राफ्ट्समन, फिटर अशी आयटीआय झालेली मुले घेतली आणि छोटेखानी उद्योग हळूहळू जमेल तसा विस्तारित केला. स्वतःचे पोटपाणी भरत आणखी चार-पाच कुटुंबांचे पोट भरणारा हा रोजगार पंपांचा कारखाना म्हणून परिसरात ओळखला जाऊ लागला. तेव्हा मार्केटिंग, ब्रँडिंग, चेन सप्लायर अशा संकल्पना कोल्हापुरात फारशा नव्हत्या. अशा स्थितीतही त्या पंपांची भक्कम बांधणी आणि वाढती गरज त्यामुळे घेतलेल्या उत्पादनाची विक्री होत होती. त्यामुळे त्यांना या व्यवसायातील नवक्षितिज खुणावत गेले. त्यांचे वय आणि अनुभव वाढत गेला, मुलेही मोठी झाली. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच मिलिंद आळवेकर यांना सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले. मिलिंद यांनीही उत्साहाने प्रवेश घेतला.

पहिली दोन-तीन वर्षे थिअरी, प्रॅक्टिकल हे जोडकाम शास्त्र समजून घेण्यात गेली. पण थिअरी आणि प्रॅक्टिकलला निरीक्षण, श्रवण आणि कृतीची जोड लाभली, तरच ‘मेकॅनिकल हँड’ तयार होतो. मग तो कारागीर असो किंवा अभियंता, तो शिक्षणातच तयार होतो. मिलिंद यांनी पंपजोडणी, बांधणीचे काम समजून घेतले, तशी त्यांची कल्पक दृष्टी व्यापक बनली. बाबा बनवितात तो पंप, भारतातील पंपांची गरज आणि जगभरातील पंपविषयक तंत्रज्ञान समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. यातून अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या जिज्ञासेतून ते मुंबईत गेले. त्या वेळी मुंबईतील ‘व्हीजेटीआय’मध्ये पंपविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी ‘इंडियन पंप मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ने केली होती. त्या मागणीनुसार सुरू झालेल्या अभ्यासक्रमात १९८३ मध्येमिलिंद यांनी प्रवेश घेतला. तेथे जगभरातील पंपांचे तंत्रज्ञान आणि त्याची भारतातील गरज यांचे पृथ:करण त्यांच्या डोक्यात होऊ लागले. रसायनांचा अचूक पुरवठा करणारा पंप अधिक भक्कम व औद्योगिक जगतात कसा उपयुक्त ठरेल, यासाठी ‘व्हीजेटीआय’मधील ज्ञान आणि घरचा अनुभव उपयुक्त ठरला. शिक्षणातून ज्ञान मिळते, अनुभवातून व्यवसाय विस्तारित करण्याची ‘आयडिया’. ती त्यांना सापडली आणि तीच ऊर्जा घेऊन त्यांनी कोल्हापुरातील कारखान्याचे रूपांतर ‘युनिट’मध्ये करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. काही काळ नागाळा पार्कमध्येच पंपबांधणीचे काम सुरू ठेवले. त्यानंतर त्यांनी कागलमध्ये जागा घेतली आणि युनिट सुरू केले. पंपांची बांधणी करताना हे पंप किफातशीर दरात भारतातील कंपन्यांना कसे मिळतील, याचा अभ्यास सुरूच ठेवला. त्याचवेळी हे पंप वर्षानुवर्षे सुरळीत चालावेत, अशी पंपांची रचना केली. त्याचा मेंटेनन्सही कमी यावा, त्यासोबतच हे पंप इतर पंपांच्या पार्ट्समध्‍येही व्यवस्थित बसले जातील आणि पंपांची दुरुस्ती करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास कमी वेळात हे पंप दुरुस्त करता यावेत, या साऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत त्यांनी गुणवत्तापूर्ण पंप आकाराला आणले. पंपांमधून उच्च तापमान असलेली ॲसिड्स, रासायनिक द्रव्यांचे वहन होणार आहे, हे जाणून घेऊन त्यानुसार पंपांचे मटेरियल वापरणे. काही पंपांची घर्षणाने झीजही होऊ शकते, हे टाळण्यासाठी त्याचे मटेरियल निवडणे, गुणवत्तापूर्ण पद्धतीने त्याची बांधणी करणे, असे आव्हानात्मक टप्पे त्यांनी नेहमीच पूर्ण केले. हे काम एका दिवसात, दोन-चार महिन्यांत झाले नाही, तर त्यासाठी आळवेकर पिता-पुत्रानी अनेक वर्षांची मेहनत घेतली आहे.

उत्पादनांचे डिझाईन आणि गुणवत्ता कायम राहण्यासाठी ‘केमलिन’च्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात

औद्योगिक क्षेत्रातील रसायनांसाठी लागणारे पंप बनविताना त्यांचे पहिले प्राध्यान्य होते ती म्हणजे गरज. रासायनिक खतांच्या, औषध निर्माण क्षेत्रासाठी लागणाऱ्या रसायने वहन करणारे पंप सारखे, तर काही अंशी बदल असणारे असतात. ते प्रत्येक रसायन, त्याची घनता, त्यावर असणारा वायूचा दाब यांमुळे त्याची वहनप्रक्रिया वेगवेगळी असते. तशीच विशिष्ट कालावधीनंतर पंपाच्या बॉडीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. लूज कनेक्शन, पंक्चर यांसारख्या तांत्रिक बिघाडातून मोठे धोके व हानी होण्याची शक्यता असते. तेच टाळण्यासाठी बुशिंग, फिटिंग आणि त्यासाठी लागणारे मटेरियल हे अगदी अचूक व दीर्घकाळ टिकाऊ राहील, याकडे विशेष लक्ष दिले. ज्यांनी हे पंप त्यांच्या कामासाठी वापरले तेथे सुरक्षिततेची हमी त्यामुळे देता आली आणि प्रत्यक्ष ‘केमलिन पंप’ वापरताना त्याची प्रचिती वापर करणाऱ्या कंपन्यांना आली.

सुरुवातीच्या काळात पंपांचे डिझाईन करणे, त्याची निर्मिती करणे, त्याचे टेस्टिंग करणे, ग्राहकांच्या फॅक्टरीमध्ये हा पंप जोडून देणे, पंपांविषयी मार्केटिंग करणे आणि विक्रीपश्चात सेवा देणे या इतक्या जबाबदाऱ्या मिलिंद यांनी एकहाती सांभाळल्या. १९८०-९० च्या दशकात कोल्हापूरला येण्यासाठी फारशा सुविधा नव्हत्या. अशा काळात येथे बनलेले पंप तुम्ही घ्या, हे सांगणे खूपच आव्हानात्मक असल्याचे मिलिंद सांगतात. ‘रासायनिक उद्योग क्षेत्रात विशेषतः विदेशी कंपन्यांकडून बनविलेले पंप कंपन्यांमध्ये बसविले होते. अशा प्रकारच्या पंपांची आम्ही निर्मिती करतो, त्याची ऑर्डर आम्हाला द्या, हे सांगण्यासही मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलताना आम्ही सुरुवातीला विदेशी कंपन्यांच्या पंपांमधील काही बूशवरील असे पूरक पार्ट आम्ही देऊ, अशी मागणी केली. त्यामध्येयश आल्यानंतर आम्हीही असे पंप तयार करतो, आमच्याकडून एक पंप घ्या, असा प्रस्ताव कंपन्यांना देत होतो. त्यांची गरज लक्षात घेऊन त्या पंपाची सर्व छोटी-मोठी माहिती घेऊन कोल्हापुरात येऊन पंपबांधणीची प्रक्रिया सुरू करायचो. सुरुवातीला एक पंप दिल्यानंतर आमच्या उत्पादनांविषयी कंपन्यांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला आणि त्यानंतर हळूहळू त्यांनी विदेशी कंपन्यांना देत असलेल्या पंपाच्या ऑर्डर्स रद्द करून ‘केमलिन’ला देण्यास सुरुवात केली. केरळ, तमिळनाडू, गुजरात येथील मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये परदेशी पंप बदलून ‘केमलिन’चे पंप बसविणे सुरू झाले,’ अशी माहिती त्यांनी दिली.

एवढ्यावर मिलिंद थांबले नाहीत, तर त्यांनी जगातील बदलत्या तंत्रज्ञानानुसार पंपांच्या उत्पादनांमध्ये बदल केले. त्याहीपुढे त्यांनी एक पाऊल टाकले. १९९९ च्या सुमारास त्यांनी भारतातील पहिले कम्प्युटराईज्ड पंप टेस्टिंग यशस्वी केले. यापूर्वी पंपांचे टेस्टिंग करताना वेळ लागायचा, शिवाय मर्यादाही होत्या. त्यात अचूकता कमी होती. यावर पर्याय म्हणून त्यांनी कम्प्युटराईज्ड टेस्टिंग पंप तयार केल्यामुळे १०० टक्के अचूक परिणाम दर्शविल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनात मोठा फायदा होऊ लागला आणि वेळेचीही मोठ्या प्रमाणात बचत झाली. त्यासोबतच पंप खेचू शकणाऱ्या द्रव्याचा प्रवाह, त्याचा दाब आणि तापमान, एवढेच नव्हे तर पंप चालविण्यासाठी लागणारा विद्युत दाब, विजेचा प्रवाह या गोष्टी नियंत्रित करता येऊ लागल्या. सुरुवातीला ‘केमलिन’ व्हर्टिकल पंपाची निर्मिती केली होती. आणि २००५-०६ नंतर त्यांनी कमी जागेत बसणाऱ्या हॉरिझाँटल पंप निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. हे पंपही त्यांनी उत्तम गुणवत्तेच्या जोरावर निर्माण केले.

एवढ्यावर मिलिंद थांबले नाहीत, तर त्यांनी जगातील बदलत्या तंत्रज्ञानानुसार पंपांच्या उत्पादनांमध्ये बदल केले. त्याहीपुढे त्यांनी एक पाऊल टाकले. १९९९ च्या सुमारास त्यांनी भारतातील पहिले कम्प्युटराईज्ड पंप टेस्टिंग यशस्वी केले. यापूर्वी पंपांचे टेस्टिंग करताना वेळ लागायचा, शिवाय मर्यादाही होत्या. त्यात अचूकता कमी होती. यावर पर्याय म्हणून त्यांनी कम्प्युटराईज्ड टेस्टिंग पंप तयार केल्यामुळे १०० टक्के अचूक परिणाम दर्शविल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनात मोठा फायदा होऊ लागला आणि वेळेचीही मोठ्या प्रमाणात बचत झाली. त्यासोबतच पंप खेचू शकणाऱ्या द्रव्याचा प्रवाह, त्याचा दाब आणि तापमान, एवढेच नव्हे तर पंप चालविण्यासाठी लागणारा विद्युत दाब, विजेचा प्रवाह या गोष्टी नियंत्रित करता येऊ लागल्या. सुरुवातीला ‘केमलिन’ व्हर्टिकल पंपाची निर्मिती केली होती. आणि २००५-०६ नंतर त्यांनी कमी जागेत बसणाऱ्या हॉरिझाँटल पंप निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. हे पंपही त्यांनी उत्तम गुणवत्तेच्या जोरावर निर्माण केले.

कंपन्यांची गरज विचारात घेऊन ‘केमलिन’ने पंपांची निर्मिती केली आणि पुरवठा केला. आणि दीर्घकाळ वापरानंतरही सुस्थितीत सुरू असल्याने ज्या कंपन्यांनी केमलिन पंप घेतला, वापर सुरू केला त्यांच्या उत्पादनात भर पडून नुकसान टाळण्यास मदत झाली आहे. अशा सर्व बाजूंनी तांत्रिकदृष्‍ट्या भक्कम पंपांचा लौकिक भारतासोबतच परदेशांतही पोहोचला. विदेशातील औद्योगिक विशेषतः रासायनिक उद्योग जगतातील पंपांची गरज ओळखून मिलिंद यांनी अभ्यास सुरू केला. उत्पादकांशी चर्चा, त्यांची गरज, बदलते तंत्रज्ञान आणि रसायनांचा होणारा परिणाम यांचाही स्वतंत्र अभ्यास केला आणि त्यामुळेच अभिमानाची बाब म्हणून कोल्हापूरच्या मातीतील ‘केमलिन ब्रँड’चा तयार झालेला पंप जगभरातील २७ देशांमध्येनिर्यात होतो आहे. सध्या ‘केमलिन’मध्येमिलिंद यांच्यासोबत पत्नी संगीता या ह्युमन रिसोर्स आणि फायनान्स विभाग, कन्या उमा या सेल्स विभाग आणि जावई रवी हे प्रॉडक्शन विभाग पाहतात. दुसऱ्या पिढीतील उमा आणि रवी यांच्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा व्यवसायातील प्रभावी वापर आणि गुणवत्तापूर्ण पंपनिर्मितीला मोठा हातभार लाभला आहे.

बाळासाहेब आळवेकर यांनी सुरू केलेला पंपांचा लघुउद्योग पोटापाण्याचा आधार होता. त्याला मिलिंद यांनी सातत्य, जिद्द, नवतंत्रज्ञान आणि कृतीची जोड देत एका सुस्वरूप उद्योगाला पुर्नजन्म दिला आणि या उद्योगातून ‘केमलिन’ पंपासोबतच कोल्हापूरची ओळख जगभर नेण्यात ते यशस्वी झाले. १९८० च्या दशकात ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न फक्त पाहिले नाही, तर ते आळवेकर यांनी अमलातही आणले. यापूर्वी चीनमध्ये तयार झालेल्या पंपांना जगभरातून मागणी होती. त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी पावले उचलली. त्याचे यश म्हणून इंडोनेशिया, सौदी अरेबिया यांसारख्या चीन निर्यात पंपांच्या ठिकाणी ‘केमलिन’चे पंप वापरले जाऊ लागले. भविष्यात पंप क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासोबतच चीनमध्येही ‘केमलिन’चे पंप बसावेत, या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.

‘केमलिन पंप्स आणि वॉल्व्ज प्रा. लि.’ ही कंपनी आमच्या सोल्शन्स यु प्रदान करण्याच्या उद्देशाने १९८७ मध्ये स्थापना झाली. कंपनी ग्राहकांच्या विशिष्ट औद्योगिक गरजांमध्ये बसणारे औद्योगिक पंप, व्हॉल्व्ज आणि इतर पंपिगं उपकरणे तयार करते. आमचे मुख्या लय कोल्हापुरात आहे याचा अभिमान वाटतो. व्यावसायिक ऑपरेशन्स, अफाट अभियांत्रिकी ज्ञान आणि कौशल्य या बाबतीत उच्च नैतिकता प्रस्थापित करण्याची आमची इच्छा आणि वेळेवर वितरण प्रदान करण्याची आणि गुणवत्ता सेटची मानके राखण्याची प्रामाणिक वचनबद्धता यांमुळे हे साध्य झाले आहे.

मिलिंद आळवेकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक

कर्मचारीवर्गामध्ये कौटुंबिक नात असेल, तर कोणताही व्यवसाय भरभराटीला येण्यास कोणीही रोखू शकत नाही. कर्मचाऱ्यांमध्ये संघ म्हणून काम करण्याची वृत्ती वाढविली पाहिजे. कर्मचाऱ्यासोबतच आम्ही त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी घेतो. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे, वार्षिक समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. ‘केमलिन’मध्ये प्रारंभी रुजू झालेले कर्मचारी आजही सेवा देत आहेत, हेच आमचे यश आहे. व्यावसायिक तत्वे सांभाळत असताना ‘केमलिन’च्या पुरवठादारांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या कामाचे पैसे त्यांना वेळेत मिळावेत, याबाबी ‘केमलिन’न चोख पाळल्या आहेत

संगीता आळवेकर,
कार्यकारी संचालक – फायनान

‘केमलिन’ने भारतासो बतच परदेशांतही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. ग्राहकांची गरज
ओळखून त्यांना आवश्यक असा पंप तयार करून देताना ‘केमलिन’ कोणत्याही प्रकारची तडजोड करीत नाही. त्यामुळे औद्योगिक जगतातील रासायनिक कंपन्या ‘केमलिन’चे पंप विकत घेण्यासाठी आग्रही असतात. ‘केमलिन’चेमुख्य कार्यालय कोल्हापुरात असून, देशभरातील विविध राज्यांमध्ये ‘केमलिन’चे अभियंते पंप पुरवठा करण्यासोबतच ऑर्डर्सही आणतात. त्यासोबतच मोरोक्को, दक्षिण आफ्रिका येथे ही
‘केमलिन’चे एक कार्यालय सुरू केले असून, २७ देशांमध्ये ‘केमलिन’ ब्रँडचे पंप निर्यात होत आहेत. व्यवसायाचेविस्तारीकरण करीत असताना उच्च तापमानात हे पंप कसे कार्यक्षम राहतील, अशा पंप निर्मिती आव्हानात दर्जेदार पंप उपलब्ध करून देण्यासाठी ‘केमलिन’ नहेमीच प्रयत्नशील असत.

उमा चव्हाण,
कार्यकारी संचालक – सेल्स

बदलत्या काळानुसार व्यवसायातही अपेक्षित बदल करावे लागतात. किंबहु ना, काळाच्या पुढे एक पाऊल असावे लागते. रसायनांचे वहन करणारे पंप बनविण्यासाठी आधीच्या काळी बराच वेळ खर्च होत होता. सध्या आम्ही तो वेळ कमी कसा करता येईल, याचा विचार करून कमीत कमी वेळात पंपांची निर्मिती करीत आहोत. त्यासाठी सूक्ष्म नियोजनासाठीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतो. ‘केमलिन’चेमार्केट भारतासोबतच ग्लोबलही खुले झाले आहे. त्यासोबतच कर्मचारीवर्गाला अद्ययावत ठेवणे, त्यासाठी त्यांना कौशल्याचेप्रशिक्षण देणे, या बाबी करतो. त्यामुळेच ‘केमलिन’च्या सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी प्रॉडक्शन प्लॅनिगं डॅशबोर्ड अशा नावीन्यपूर्ण संकल्पनाही ‘केमलिन’ने अंगीकारल्या आहेत.

रविभूषण चव्हाण,
सीनिअर इंजिनीअर – कोऑर्डिनशन

‘केमलिन’चे उल्लेखनीय यश

  • मिलिंद आळवेकर ही प्रतिष्ठित ‘हिंदू-हिताची शिष्यवृत्ती’ प्राप्त करणारी कोल्हापूरची पहिली व्यक्ती आहे. ज्या अंतर्गत त्यांनी जून ते डिसेंबर १९८९ या कालावधीत जपानमधील हिताची लिमिटेड, येथे पंप, व्हॉल्व्ज, ब्लोअर इत्यादींचे डिझाईन आणि उत्पादन नियोजनाचे प्रगत तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे
  • महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून त्यांना १९९१ मध्ये ‘बेस्ट स्मॉल स्केल इंडस्ट्री’ हा सन्मान
  • ‘महाराष्ट्र चेंबर’चा प्रतिष्ठित ‘दादासाहेब रावल पुरस्कार २०११’ हा पुरस्कार
  • मिलिंद आळवेकर यांना ‘मराठी विज्ञान परिषद’, मुंबईतर्फे नोव्हेंबर २०२० मध्ये पंप उद्योगातील नावीन्यपूर्ण घडामोडींसाठी प्रतिष्ठित ‘S.T. Taskar Award’ चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला
  • भारतातील प्रमुख खते आणि प्रक्रिया उद्योगासह दर्जेदार पंपांचा पसंतीचा पुरवठादार म्हणून ‘केमलिन’चे स्थान. ‘केमलिन’ आता २७ देशांमध्येनिर्यात करते आहे. कंपनीला रासायनिक आणि खत उद्योगातील प्रतिष्ठित अशा TDC समितीने देखील मान्यता दिली आहे
  • गंभीर अनुप्रयोगांसाठी यशस्वीरीत्या पंप विकसित केले आणि विविध खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील रासायनिक उद्योग, स्टील प्लांट, खत संकुलांना त्यांच्या गरजा स्वदेशी बनविण्यात मदत केली

केमलिन पंप्स अँड व्हॉल्व्ज प्रा. लि.

  • मलिन पंप्स अँड व्हॉल्व्ज प्रा. लि.
  • एफ-५, अथर्व इस्टेट, २३८/२, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६ ००३
  • फोन : +९१-२३१-२६५३१२३ / २६५१९६४
  • मोबाईल : +९१-७८२३० ३९०४०
  • ई-मेल आयडी : info@chemlinindia.com
  • वेबसाईट : www.chemlinindia.com
English