chaitanya-institute-2

मनोरुग्णांसाठी ‘चैतन्य’दायी आसरा : चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल

‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ हा संदेश संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून खूप वर्षांपूर्वी दिला आहे. पण जच्या स्पर्धा, जागतिकीकरण, औद्योगिकीकरणाच्या काळात जो तो धावतोय. परिणामी माणूस एकटा पडत चाललाय. याचाच परिणाम मनाच्या रोग्यावर होतोय. नैराश्याने ग्रस्त लोकांचे प्रमाण वाढतेय. अशा व्यक्तींना गरज असते कु टुंबाबरोबरच एका सशक्त सामाजिक आधाराची. शपातळीवर मानसिक रुग्णांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था मोलाची कामगिरी करीत आहेत. पुण्यातील ‘चैतन्य इन्स्टिटयूट फॉर मेंटल हेल्थ’चे नाव आणि कार्यही या संस्थांमध्ये आदराने घ्यावे असेच आहे.

शारीरिक व्याधींचे निदान आणि उपचार करणे सोपे असते, कारण त्याची लक्षणे दिसतात, त्रास जाणवतो. पण मनाचे आजार जसे सहज दिसत नाहीत, तसेच ते सहज स्वीकारलेही जात नाहीत. तरी गेल्या काही वर्षांमध्येविविध माध्यमांतून होत असलेल्या जागरूकतेचा परिणाम म्हणून लोक याबाबत साक्षर होऊ लागले आहेत. परिणामी मेंटल हेल्थ केअर आणि रिहॅब सेंटरमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दोन-तीन दशकांत वाढले आहे. अर्थात, ही आजच्या काळातील महत्त्वाची गरज झाली आहे. अशी सेंटर्स म्हणजे मानसिक रुग्णांसाठी आधार केंद्र ठरत आहेत. ही वस्तुस्थिती सांगत आहेत पणु्यातील ‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’चे सर्वेसर्वा रॉनी जॉर्ज.

‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’ १९९९ पासून मनोरुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. रॉनी जॉर्जयांच्या कल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून ही संस्था आज मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधारस्तंभ बनली आहे. मनोरुग्णांना त्यांचे सामान्य आयुष्य परत मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी, समस्या येतात. त्यावर मात करण्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग, प्रयत्न करावे लागतात, याची प्रचिती ‘चैतन्य’मधील कार्यपद्धती बघितल्यानंतर जाणवते.

‘चैतन्य’ची कोअर टीम आणि स्टाफ मेंबर

हक्काचे घर

‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’ ही मानसिक रुग्णांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. येथे रुग्णांच्या निवासाची, उपचारांची सोय तर केली जातेच, पण त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी बनवून समाजात एक सामान्य व्यक्ती म्हणून वागणूक मिळावी, यासाठी सेर्वार्नथा प्रयत्न केले जातात. मानसिक रुग्णांना योग्य मानसिक उपचार आणि सामाजिक वागणूक मिळावी व त्यांचे पुर्नवसन व्हावे, या दृष्टिकोनातून या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे संस्थापक रॉनी जॉर्ज यानी सागिंतले. ‘चैतन्य’चे वैशिष्ट्य म्हणजे, येथे रुग्णांच्या निवासाची उत्तम व्यवस्था केलेली असून, रुग्णाला त्याच्या गरजेनुसार डॉक्टर, सल्लागार, औषधे आणि उपचार पुरविले जातात. स्किझोप्रेनिया, मुड डिसऑर्डर, पर्सनलिट डिसऑर्डर, सबस्टन्स डिसऑर्डर, जेरियाट्रिक डिसऑर्डर असे अनेक मानसिक आजार आहेत, त्या आजारांचे निदान करणे, त्यामागील कारणांचा शोध घेणे आणि योग्य उपचारांच्या माध्यमातून रुग्णाला त्याचे सामान्य आयुष्य परत मिळवून देणे, हा ‘चैतन्य’चा मुख्य उद्धेश आहे.

‘चैतन्य’मध्ये निवासी व्यवस्था असल्याने रुग्णाला जीवनाची पुनरच्र ना करण्यासाठी आणि त्याच्या आजाराबद्दल अधिक विचार करण्यासाठी जागा, वेळ मिळतो. याला योग्य उपचारांबरोबर, चांगल्या आचार-विचारांची, योग्य मार्गदर्शनाची साथ लाभते. त्यामुळे रुगणला आजारातून बाहेर पडण्यास मदतच होते. जे अनेक रुग्णांना घरात किंवा कुटुंबीयांकडून मिळत नाही, ते येथे मात्र डॉक्टर, सल्लागार, मामा-मावशी, सहकारी यांच्या माध्यमातूनमिळते. म्हणून रुग्णांना हे आपले हक्काचे घर वाटते. ‘चैतन्य’च्या पणु्यात कोंढवा, कात्रज, वारजे येथे शाखा आहेत, तर गोव्यात थिविम, केरळमध्ये कोचिन आणि नेपाळमध्ये काठमांडू येथे शाखा आहेत.

उत्तम निवास व्यवस्था

ज्या मनोरुग्णांना कमी किंवा जास्त कालावधीसाठी उपचारांची आवश्यकता असते, त्यांची येथे निवासी व्यवस्था केली जाते. परुुष आणि स्त्री रुग्णांसाठी येथे स्वतंत्र निवासी सोय आहे. रुग्णाची मानसिक-शारीरिक गरज लक्षात घेऊन त्यानुसार त्याची राहण्याची व्यवस्था केली जाते. येथील खोल्या भरपुर उजेडासह हवेशीर आहेत. जनरेटरची सोय आहे. चोवीस तास पाण्याची सुविधा आहेच. मनोरंजन आणि मनोविकासासाठी येथे वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि टीव्हीची सोयही आहे. स्वच्छ आणि नीटनटेके स्वयंपाकघर आहेच. शिवाय छान सजविलेला प्रसन्न डायनिंग हॉल आहाराचे महत्त्व आधोरेखित करतो. येथे वेगवेगळे भारतीय पदार्थ बनविले जातात, ज्यात संतुलित आहाराचा समावेश विशेषत्वाने केला जातो. ‘चैतन्य’मध्ये संपूर्ण भारतातून रुग्ण येत असल्यामुळे संपुर्ण भारतातील वेगवेगळे पदार्थ येथे बनविले जातात. याशिवाय सण-उत्सवाच्या काळात विशेष बेत आखला जातो. तर ज्या व्यक्ती आपले कपडे धणु्यास समर्थनाहीत, त्यांच्यासाठी लॉन्ड्रीची सुविधाही देण्यात येते. थोडक्यात, रुग्णाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी ‘चैतन्य’चे व्यवस्थापन दक्ष असते.

मनोसामाजिक पुनर्वसन म्हणजे काय?

मनोसामाजिक पुनर्वसन म्हणजे काय? मनोरुग्णांचे मनोसामाजिक पुनर्वसन करणे आवश्यक असते. पण मनोसामाजिक पुनर्वसन म्हणजे नेमके काय, या संकल्पनेचा विस्तार करताना रॉनी जॉर्ज यानि सागिंतले, की मनोसामाजिक पुनर्वसन म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. मनोसामाजिक पुनर्वसन म्हणजे मनोरुग्णांना त्यांचे स्वतःचे भविष्य निवडण्याची क्षमता विकसित करण्यासाठी सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि इतर कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम बनविणे. स्किझोफ्निरे या आणि मुड डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींमध्ये दीर्घकालीन अपंगत्वाची लक्षणे कायम राहतात किंवा त्यांना आजारपणाच्या घटनांच्या पुनरावृत्तीचा अनुभव येतो. या समस्यांच्या वाढत्या प्रमाणाची तीव्रता लक्षात घेऊनच मनोसामाजिक पुनर्वसन क्षेत्राचा जन्म झाला. दीर्घकालीन मानसिक आजारांच्या निराकरणासाठी दीर्घकाळ उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. जगात गंभीर मानसिक आजार होण्याचे प्रमाण एक लाखामागे पस्तीस जण असे आहे, त्यांच्यासाठी पुनर्वसन आवश्यक आहे. यापैकी ऐंशी टक्के समस्या प्रभावीपणे हाताळल्या जाऊ शकतात. त्यामुळे मनोरुग्ण पुनर्वसन ही एक प्रक्रिया आहे, जी व्यक्तीला हॉस्पिटलायझेशनसाठी पर्याय शोधण्यास मदत करते. ही अतिशय अवघड आणि क्लिष्ट कामगिरी ‘चैतन्य’मध्ये गेली तेवीस वर्षे बजावली जात आहे. अवघड आणि क्लिष्ट यासाठी, कारण प्रत्येक रुग्ण, त्याचा आजार, समस्यांची गुंतागुंत, रुग्णाचा प्रतिसाद आणि एकूण परीस्थिती निराळी असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना आखाव्या लागतात. अर्थातच हे कोणा एकाचे काम नव्हे, त्यासाठी ‘चैतन्य’मधील तज्ज्ञ मंडळींची टीम अव्याहतपणे काम करते.

मानसोपचार पुनर्वसनात लक्षणे नियत्रणं, प्रतिबंध किंवा पुनरुत्थान कमी करण्यासाठी प्रयत्न आणि दीर्घकाळ आजारी रुग्णांच्या कार्यक्षमतेचे ऑप्टिमायझेशन करण्यासाठी विकारांवर सातत्याने आणि अनिश्चित उपचारांवर भर देणे गरजेचे असते. पुनर्वसन ही एक साहाय्यक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रुग्णाला त्याची हरवलेली कौशल्येविकसित करण्यासाठी आणि त्याच्या लपलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. जेणेकरून तो समाजाचा कार्यक्षम सदस्य बनू शकेल. हे जाणूनच मनोरुग्णांचे आयुष्य जेवढ्या विविध गोष्टींनी आनंदी, मजेदार करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न ‘चैतन्य’च्या माध्यमातून केला जातो. त्यासाठी जवळच्या ठिकाणी सहल जाते, कॅम्पचे आयोजन केले जाते. चांगले चित्रपटही मनावर सकारात्मक परिणाम करतात, म्हणून रुग्णांना चित्रपट बघण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. मग त्यासाठी कधी थिएटरची निवड केली जाते, तर कधी ‘चैतन्य’मध्येच चित्रपट दाखविले जातात. ‘चैतन्य’मध्ये प्रोजेक्टरचीही सोय आहेच. येथे प्रत्येक सणही अगदी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ‘चैतन्य’मध्ये विविध जाती-धर्माचे लोक गणु्यागोविंदाने राहतात. त्यामुळेच येथे गणेशोत्सव, दिवाळी, ईद, नाताळ, ओणम असे सगळे सण साजरे होतात. त्याचबरोबर प्रत्येक रहिवाशाचा वाढदिवसही येथे आठवणीने साजरा केला जातो.

पुनर्वसन योजना प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या आजाराचा प्रकार, कालावधी, सामाजिक-सांस्कृतिक घटक, तीव्रता, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादिवरील अवलंबून असते. आधी सागिं तल्याप्रमाणे, पुनर्वसन प्रक्रियेत टीम वर्क महत्त्वाचे ठरते. ‘चैतन्य’मधील सर्व कर्मचारीवर्ग ही कामगिरी चोख बजावतो. त्यासाठी महिन्यातून एकदा येथे डॉक्टर, समुपदेशक, रुग्ण आणि कुटुंबीय एकत्र येऊन रुग्णाच्या प्रगतीचा आढावा घेतात व त्यानुसार पुढील नियोजन करतात

‘चैतन्य’चे कात्रज येथील सेंटर
‘चैतन्य’चे कोंढवा येथील सेंटर
इंटरनॅशनल ‘योगा डे’

उपचार आणि उपक्रमांची सांगड

कोणताही आजार बरा करण्याचे एक सूत्र असते. पण रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देते, यावर उपचारांची दिशा ठरते. मानसिक आजारांमध्ये तर उपचार पद्धती ठरविणे किंवा एकाच उपचार पद्धतीवर अवलंबून राहण्याने अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणूनच रुग्णांना वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते, त्यांच्यासाठी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले जातात, त्याचबरोबर आर्टथेरपी, ग्रुप थेरपी, मनोरंजन थेरपी, इनडोअर गेम्स, ग्रुप मीटिंग इत्यादी उपचार पद्धतींची मदतही घेतली जाते.

याशिवाय ‘चैतन्य’मध्ये उत्तम ग्रंथालय आहे, ज्यामध्ये पसु्तकांबरोबर नियतकालिकांचा समावेश आहे. ध्याकाळच्या निवांत वेळात रुग्णांना वाचनासाठी प्रोत्साहित केले जाते.‘चैतन्य’च्या प्रत्येक शाखेत सुसज्ज असे जिम आहे. मनाचा विकास हा तंदुरुस्त शरीराच्या माध्यमातूनच होतो, म्हणूनच मनाचे आरोग्य सधुारण्यासाठी शरीराच्या तंदुरुस्तीवरही भर दिला जातो. या जिमचा वापर रुग्ण नियमित यामासाठी, वजन संतुलित करण्यासाठी, वजन वाढविण्यासाठी करतात. अर्थातच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. मनोरुग्णांचे ज्ञान अद्ययावत राहावे आणि त्यांची तंत्रज्ञानाबरोबरही मैत्री व्हावी, यासाठी ‘चैतन्य’मध्ये सुसज्ज अशी कॉम्पुटर लॅबही आहे. ‘चैतन्य’मध्ये कुत्री, मांजरं पाळली आहेत, या माध्यमातून रुग्ण नकळतपणे पेट थेरपीचा अनुभव घेतात.

चोख व्यवस्थापन

‘चैतन्य’च्या माध्यमातूनविशिष्ट समहूासाठी सेवा आणि उपक्रम यांचे आयोजन केले जाते, हे आपण जाणून घेतलेच. त्यासाठी येथे विविध विभागांची रचना केली आहे. म्हणजे मनोरुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, व्यसनमुक्ती विभाग, जेरिॲट्रिक आणि डिमेन्शिया केअर युनिट, व्यावसायिक प्रशिक्षण विभाग, याशिवाय इतरही बहुआयामी सेवा परुविल्या जातात. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर काही सेवा परुविल्या जातात. यामुळे आपली कोणीतरी प्रेमाने चौकशी करीत आहे, काळजी घेत आहे, ही भावना मनोरुग्णांमध्ये निर्माण होते. ही भावनाच त्यांचा हुरूप वाढविणारी असते. म्हणूनच ‘चैतन्य’चे व्यवस्थापन रुग्णांकडे व्यक्तिगत पातळीवर लक्ष देण्यासाठी आखीवरेखीव दिनक्रम, उपक्रमांचे आयोजन, वैयक्तिक लक्ष, सामूहिक उपक्रमांचे आयोजन, रचनात्मक उपक्रमांवर भर, वर्तणुकीसंबंधीच्या समस्यांचे निराकरण, योगासन उपचार, उपचारात्मक बैठकांचे आयोजन, संगीत उपचार, ध्यानधारणा, तिरस्काराचे निराकरण, मनःशांतीसाठी प्रयत्न, व्यायाम अशा प्रकारचे उपक्रम राबविते.

कौटुंबिक पातळीवर प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक ठरते. कारण केवळ रुग्णांवर उपचार करूनकिंवा त्यांना शिक्षित करून हवा तो परिणाम साधता येत नाही. मानसिक आरोग्य हे अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंबाची साथ आणि प्रोत्साहन. हे जाणूनच ‘चैतन्य’मध्ये कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न, बदल करणे आवश्यक आहे, याविषयी कुटुंबियाना सागिंतले जाते. त्यासाठी मानसिक शिक्षण, कौटुंबिक पातळीवर प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक ठरते. कारण केवळ रुग्णांवर उपचार करूनकिंवा त्यांना शिक्षित करून हवा तो परिणाम साधता येत नाही. मानसिक आरोग्य हे अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंबाची साथ आणि प्रोत्साहन. हे जाणूनच ‘चैतन्य’मध्ये कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न, बदल करणे आवश्यक आहे, याविषयी कुटुंबियाना सागिंतले जाते. त्यासाठी मानसिक शिक्षण, पुरक उपचारपद्धती, कौटुंबिक उपचारपद्धती, समुह उपचारपद्धती आणि स्व-मदत गटांची मदत घेतली जाते. मनोरुग्णांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत कुटुंबीयांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे ‘चैतन्य’ मानते. म्हणूनच या प्रक्रियेत कुटुंबीयाना ही समाविष्ट करून घेतले जाते. यामुळे येथे कुटुंबीय ठरलेल्या वेळात रुग्ण, डॉक्टर, समुपदेशक याना भेटू शकतात आणि रुग्णाची प्रगती जाणून घेऊ शकतात. याशिवाय कुटुंबीयाना दर महिन्याला रुग्णाच्या मनो अवस्थेचा अहवालही पाठविला जातो.

समाजाचा दृष्टिकोन मनोरुग्णांच्या बऱ्या होण्याच्या प्रवासात अडसर ठरू नये, यासाठी ‘चैतन्य’च्या माध्यमातून सामाजिक पातळीवरही काही सेवा परुविल्या जातात. या सुविधांमध्ये संदर्भ सेवा, जागरूकता मोहीम, कार्यशाळा, रोजगाराच्या संधी यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या सामाजिक जागरूकता मोहिमांमध्ये ‘चैतन्य’ सक्रिय सहभाग घेते. उदाहरणार्थ, मानसिक आरोग्यविषयक साहित्य प्रकाशित करणे, या विषयावरील नाटिका-पथनाट्य सादर करणे, प्रदर्शन भरविणे, जेणेकरून मानसिक आजारांवर नियत्रणं मिळविता येते आणि मनोरुग्ण हा आपल्यातील एक घटक असून, त्याचा स्वीकार आपण करायला हवा, ही भावना समाजात रुजते.

मनोरुग्णांना कधीही तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासते, हे जाणून ‘चैतन्य’मध्ये चोवीस तास रुग्णवाहिकेची सोय केलेली आहे. त्याबरोबरच रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी, इतर गरजेच्या गोष्टींसाठी एक मिनी बसही ‘चैतन्य’मध्ये कायम असते.

मनोरुग्णांना त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कान हवे असतात, त्यांच्या भावना जाणून घेणारे मन हवे असते, त्याचबरोबर खाद्यावर ‘तलुा बरे करण्यासाठी आम्ही आहोत’ हा विश्वासाचा हात हवा असतो, हे ‘चैतन्य’मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. रुग्णास मानसिक आधार देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी वैद्यकीय उपचारांबरोबर आणि सकारात्मक चेतना निर्माण करणे हे ‘चैतन्य’चे ध्येय आहे.

मनोरुग्ण ते सामान्य माणुस

‘चैतन्य’चे अंतिम ध्येय हेच आहे, की मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना त्यांच्या कुटुंबात आणि समाजात मानाचे स्थान मिळवून देणे. त्यासाठी ‘चैतन्य’ची संपूर्ण टीम प्रयत्नशील असते. या ध्येयपूर्तीसाठी ‘चैतन्य’ने काही खास उद्दिष्टेडोळ्यांपुढे ठेवली आहेत.

१) मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींना योग्य उपचार, समुपदेशन याचबरोबर निवासी सोय उपलब्ध करून देणे.

२) मानसिक रुग्णांच्या कुटुंबास मानसिक आणि सामाजिक आधार देणे.

३) मानसिक आरोग्य जपण्यास प्रोत्साहन देणे व त्याविषयी जागरूकता वाढविणे.

४) मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या इतर संस्थांचे उत्तम जाळे तयार करणे.

अनुभवाचे बोल…

वैमानिक म्हणून काम करणारी अमृता (नाव बदलले आहे) आपल्या भावनांवरील नियंत्रण गमावून बसली होती. तिला पराकोटीचा राग येत असे. सतत चिडचिड करणे, हा तिचा स्वभावच बनला होता. यातून वागणुकीसंदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊन समस्या गुंतागुंतीची होत चालली होती. पण ही मानसिक समस्या असू शकेल, अशी साधी शंकाही तिच्या कुटुंबीयांना आली नाही. पण जेव्हा डॉक्टरांनी ही मानसिक समस्या आहे हे सांगितले, तेव्हा कुटुंबीयांसाठी हा धक्का होता. मात्र त्वरित निदान आणि ‘चैतन्य’मध्येयोग्य उपचार यामुळे ती सहा महिन्यांतच या समस्येवर नियंत्रण मिळवू शकली. आता ती ‘चैतन्य’ संस्थेत कार्यरत आहे. ती सांगते, की येथील तज्ज्ञ डॉक्टर, औषधोपचारांसह इतर उपचार पद्धती, नियमित दिनचर्या आणि कौटुंबिक वातावरण यांमुळे रुग्णास दिलासा मिळतो. दुबईतून आलेल्या रिनाची (नाव बदलले आहे) कहाणी तर फारच करुण. ती खरेतर एक दत्तक मुलगी. एका उच्चभ्रू कुटुंबात स्थिरावलेली, पण लहानपणापासूनच प्रेमाला पारखी राहिलेली. तिची आई सतत आजारी पडायची, नंतर आईला कर्करोग झाला. परिणामी रिनाच्या घरात सतत ताण. या सगळ्यात तिचे बालपण हरवले. ती एकटी पडली, निराश झाली, पुढे तिच्या वागण्यात कमालीचे बदल जाणवू लागले. तिला नैराश्याने घेरले, ती ड्रग्जच्या आहारी गेली. चोऱ्या करू लागली. अशा एक ना अनेक समस्या तिच्या बाबतीत निर्माण झाल्या. तिला नियंत्रित करणे जेव्हा घरच्यांना अशक्य झाले, तेव्हा ते तिला ‘चैतन्य’मध्ये घेऊन आले. गेली पाच वर्षे ती येथे आहे. आता तिच्या वागणुकीवर नियंत्रण तर आले आहेच, शिवाय ती तिचे महाविद्यालयीन शिक्षणही पूर्णकरीत आहे. तिला सामाजिक कार्यकर्ती म्हणून करिअर करायचे आहे.

प्रवेश

निवासी म्हणूनच रुग्णांना प्रवेश दिला जातो. तत्पूर्वी रुग्णांची अवस्था कुटुंबीय, काळजीवाहक आणि डॉक्टर यांच्याकडून जाणून घेतली जाते. रुग्णाला प्रवेश देताना त्याची परत एकदा वैद्यकीय तपासणी केली जाते, यापूर्वीचे त्याचे जीवनमान आणि वैद्यकीय इतिहास यांची नोंद केली जाते. साधारण दोन आठवडे ‘चैतन्य’मध्ये राहिल्यानंतर रुग्णाला कसे वाटते, यानुसार त्याचा प्रवेश निश्चित केला जातो.

प्रशिक्षण

‘चैतन्य’च्या माध्यमातून स्वयंसेवक आणि व्यावसायिकांना रुग्णांची सेवा करताना काय काळजी घ्यावी, याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या विद्यापीठांमधील विद्यार्थी ‘चैतन्य’मध्येप्रशिक्षण घेण्यासाठी, कार्यपद्धती समजून घेण्यासाठी येतात. ‘चैतन्य इन्स्टिट्ट फॉर मेंटल यू हेल्थ’ लवकरच मनोरुग्णांचे पुनर्वसन या संदर्भातील डिप्लोमा आणि डिग्री कोर्स सुरू करणार आहे. जेणेकरून मनोरुग्णांना योग्य उपचारांबरोबरच योग्य वागणूक मिळून ते समाजात एक सामान्य व्यक्ती म्हणून वावरू शकतील.

प्रयोग

मनोरुग्णांना अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंची आवश्यकता भासतेच, तेव्हा त्यांना खरेदीचा आनंद मिळावा, विरंगुळा व्हावा आणि गरजही भागावी यासाठी ‘चैतन्य’च्या परिसरातच एक दुकानही सुरू करण्यात आले आहे. या व्यक्तींनाही हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी चमचमीत, फास्टफूड खायला आवडते. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘चैतन्य’च्या आवारातच एक कॅफेही सुरू केला आहे, त्यामुळे या रुग्णांना थोडा बदल मिळतो. या सगळ्या गोष्टी रुग्णांची मनोवस्था सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘सकाळ महाब्रँड्स’सन्मान स्वीकारताना ‘चैतन्य’चे संस्थापक-अध्ययक्ष रॉनी जॉर्ज. सोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार

फक्त लढ म्हणा..

रॉनी जॉर्ज हे ‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’ या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ते मुळचे केरळचे. लहनपणापासूनच आपण समाजासाठी काहीतरी करावे, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी त्यांचे शिक्षण सामाजिक शास्त्रात घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांना समाजातील मनोरुग्ण हा घटक उपचारांबरोबरच चांगल्या वागणुकीपासूनही वंचित आहे, ही जाणीव प्रकर्षाने झाली. तेथेच या रुग्णांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी करावे, हा विचार पक्का झाला. त्यानंतर त्या दिशेने प्रयत्नांना सुरुवात झाली. सुरुवातीला बेंगळुरुमधील पुनर्वसन केंद्रात काही काळासाठी काम केल्यानंतर ते पणु्याला आले. पणु्यातच आपल्या कामास सुरुवात करावी, हा निर्धार केला. सुरुवात अर्थातच छोट्या टप्प्यापासून झाली. आठ रुग्णांची सोय असणारे पुनर्वसन केंद्र सुरू केले. जाहिराती दिल्या. त्या जाहिरातींचा परिणाम असा झाला, की चौकशी करणारे चारशे फोन आले. पण केवळ चौकशीच. मात्र यादरम्यान जाणवले, की लोकाना खरोखरीच अशा केंद्रांची आवश्यकता आहे. लोक काय म्हणतील, या विचारामळे रुग्णांना येथे पाठविण्यास कुटुंबीय धजावत नसत. ही साधारण तेवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पहिला रुग्ण येण्यासाठी जवळजवळ सहा महिने वाट बघावी लागली. तेव्हा आमचा तीन जणांचा स्टाफ एका रुग्णासाठी काम करत होता. त्यानंतर हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. ‘चैतन्य’च्या पहिल्या स्थापना दिनी म्हणजेच सन २००० मध्ये रुग्णांची संख्या चाळीसच्या आसपास पोहोचली होती. आता ‘चैतन्य’च्या अनेक शाखा आहेत. सर्व शाखांमध्ये मिळून दोन-तीन हजार रुग्ण राहू शकतील अशी व्यवस्था आहे.

 याशिवाय तज्ज्ञांची टीमही कार्यरत आहे. आवर्जून सांगावी अशी एक गोष्ट म्हणजे, येथे मनोरुग्ण राहतात, हे जरी खरे असले, तरी ‘चैतन्य’च्या कोणत्याच शाखेतील वातावरण रुग्णालयासारखे मुळीच नाही. उलट संस्थेत कौटुंबिक वातावरण राहावे, यासाठी सर्व स्वयंसेवक आग्रही असतात. ‘चैतन्य’मध्ये रुग्णांची बलस्थाने शोधण्यासाठी आणि कमतरताना पुढे वाढू न देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जातात. त्या त्या रुग्णाच्या क्षमतेनुसार त्यांना शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या निमित्ताने मला एक गैरसमज आवर्जून दूर करावासा वाटतो, की पुनर्वसन केंद्र म्हणजे पैसे कमाविण्याचा व्यवसाय असा एक गैरसमज अनेकांच्या मनात असतो, पण असे नाही. जेथे कुटुंबीय रुग्णांना वाऱ्यावर सोडतात, तेथे पुनर्वसन केंद्र त्यांचा आधार होते. त्यांच्या मानसिक-शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचे भावविश्व जपतात. त्यांना सामान्य जीवन जगता यावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अर्थातच अशा व्यक्तींना सांभाळणे, हे एक आव्हान आहे. तेथे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये समर्पण, त्याग आणि चोवीस तास सजग राहण्याची वृत्ती आवश्यक असते. म्हणून पुनर्वसन केंद्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलायला हवे, असे मला वाटते.

एक गोष्ट आवर्जून नमुद करावीशी वाटते, की मनोरुग्ण उत्तम व्यक्ती असतात. त्यांचे प्रेम, निरागसता अनमोल असते. सध्या ‘चैतन्य’मध्ये अठरा ते अठ्ठ्याऐंशी या वयोगटातील चारशे रुग्ण आहेत. त्यामध्ये परुुष-स्त्रियांचे प्रमाण साठ-चाळीस असे अनुक्रमे आहे. साधारण अडीचशे कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

सध्याच्या काळात माणूस खुप एकाकी होत चालला आहे, नैराश्याने ग्रस्त व्यक्तींचे प्रमाणही वाढत चालले आहे, अशा वेळेस माणसाला हवा असतो एक भक्कम पाठीराखा. ‘चैतन्य’च्या रूपात अनेकाना असा पाठीराखा मिळाला, ‘चैतन्य’ने त्यांच्या आयुष्यात खऱ्या आर्थाने जगण्याची चेतना फुलविली.

भविष्यातील योजना

मनोसामाजिक पुनर्वसन या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करणे

मानसिक आजार आणि संबंधित विकारांवर संशोधन करणे

भटक्या मानसिक रुग्णांसाठी निवासी देखभाल केंद्र सुरू करणे

बाल मार्गदर्शन चिकित्सालय सुरू करणे

मनोसामाजिक पुनर्वसनावर साहित्य प्रकाशित करणे

“पुढील वर्षी ‘चैतन्य’चा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना नवे भव्य संकुल १४ एकरांच्या परिसरात आकार घेत आहे. हा प्रकल्प आनंदपद्मम बिल्डर्स ही ख्रिस्त विद्यापीठ, बेंगळुरुशी निगडित बांधकाम संस्था साकारत आहे. प्रसिद्ध वास्तुरचनाकार डाॅ. अजय चंद्रन हे या प्रकल्पाचे प्रमुख असून, ते स्कूल ऑफ आर्किटेक्चर, ख्रिस्त विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) बेंगळुरु येथे प्राध्यापक आहेत.”

English