स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाज हा शेतीवरच अवलंबून होता. शहरीकरण नसल्याने बहुतांश लोकसंख्या खेड्यांत राहात होती. अशा परिस्थितीत काळाची पावले ओळखून काही उद्योगपतींनी आपल्या उद्योगाला लोकाभिमुख बनवून रोजगार तर मिळवून दिलाच; शिवाय त्या काळातील सामाजिक बदलांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लोकहितार्थ सुरू झालेल्या या उद्योग परंपरेत प्रामुख्याने सर धनजीशा कू पर यांच्या ‘कू पर उद्योग समूहा’चे नाव हे घ्यावे लागेल. ब्रिटिश राजवटीत तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषविले होते. तत्पूर्वी ते तत्कालीन साताऱ्याचे सलग १० वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच कृषिप्रधान समाजाला गती देण्यासाठी लोखंडी नांगराची निर्मिती के ली, तसेच देशातील पहिले डिझेल इंजिन बनविण्याचा मानही त्यांनाच जातो. शंभर वर्षांपूर्वी सर धनजीशा कू पर यांनी सातारा येथे सुरू के लेल्या ‘कू पर उद्योग समूहा’ने आज शतकी मजल गाठत जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटविली आहे.
कूपर कॉर्पोरेशन : समाजाभिमुख उद्योगाची शताब्दी
समाजशील उद्योजकता (सोशल एंटरप्राईज) या ध्यासातून सुरू झालेल्या उद्योग समूहाचा प्रवास सर धनजीशा कूपर-नरिमन कूपर-फरोख कूपर ते आज जाल कूपर व मनीषा एफ. कूपर या चौथ्या पिढीने समर्थपणे पेलला आहे. सातारा शहरात उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून आपल्या कल्पक दूरदृष्टीने सर धनजीशा कूपर यांनी समाजाला नवी दृष्टी देण्याचे अमूल्य कार्य केले. ब्रिटिश राजवटीच्या आव्हानात्मक काळात उद्योग समूह सुरू करून तो वाढविणे हा एक प्रकारचा धाडसी पराक्रमच सर धनजीशा कूपर यांनी केला. एकीकडे कृषिप्रधान भारतीय समाजाचे प्रतीक असणाऱ्या नांगराची निर्मिती करणारे उद्योजक आणि समाजाला शिक्षणाच्या माध्यमातूनच पुढे नेता येईल, हा विचार करून साताऱ्याचे नगराध्यक्ष असताना केलेली प्राथमिक शिक्षणाची सक्ती, अशा दोन विचारांना पुढे घेऊन जाणारे सर धनजीशा कूपर हे अद्वितीय असेच व्यक्तिमत्त्व होते.
पाण्यासाठी तलाव आणि डिझेल इंजिन
सर धनशीजा कूपर यांनी १९२२ मध्ये ‘सातारा इंडस्ट्रियल वर्क’ या नावाने कंपनी सुरू केली. कालांतराने, म्हणजेच १९२८ मध्ये त्या कंपनीचे नाव ‘कूपर इंजिनिअरिंग’ असे करण्यात आले. त्यात त्या काळी शेतीला लागणाऱ्या नांगरासह इतर उपकरणे तयार केली जात. हे काम पुढे नेताना त्यातील तज्ज्ञांची आवश्यकता भासल्याने सर धनशीजा कूपर यांनी परदेशी तंत्रज्ञांना देखील पाचारण केले होते. सातारा जिल्ह्याचा काही भाग दुष्काळी पट्ट्यात येतो, त्यात प्रामुख्याने माण-खटाव भागांचा उल्ख करता येईल. राज्यात या भागातील परिस्थितीची कायम चर्चा असते. या समस्येचे गांभीर्य शंभर वर्षांपूर्वीच ओळखून सर धनजीशा कूपर यांनी राजेवाडी, पिंगळी, मायणी आणि राणंद या ठिकाणी लोकांसाठी तलाव निर्माण करून लोकांची तहान तर भागवलीच, शिवाय शेतापर्यंत पाणी पोचविण्याचीही व्यवस्था केली. तलावातील पाणी उपसण्याकरिता डिझेल इंजिन बनविले, त्यामुळे शेतीला आणखी बहर आला.
चौथ्या पिढीतही उद्योजकतेचा वारसा
तत्कालीन परिस्थितीत मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना सर धनजीशा कूपर यांचा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर असायचा. त्यातही ब्रिटिश राजवटीत भारतीय व्यक्तीने एखादा उद्योग सुरू करणे सोपे नव्हते; पण त्यांनी आपल्या नेतृत्वकुशल गुणांनी उद्योग सुरू करून तो यशस्वी करून दाखविला. कोणतेही उद्योग हे तेथे राबणाऱ्या हातांमुळे मोठे होत असतात, त्यामुळे कामगार आणि कर्मचारी वर्गाला जोडून ठेवण्याची कूपर घराण्याची परंपरा आज त्यांच्या चौथ्या पिढीतही कायम आहे. आजही कंपनीत सलग २०-३० वर्षे काम करणारे ४०० पेक्षा जास्त कर्मचारी व कामगार आहेत. एकाच कुटुंबातील तीन पिढ्या कूपरमध्ये काम करीत आहेत.
‘कूपर कॉर्पोरेशन’चे सध्याचे नेतृत्व
उद्योगासोबत समाजकारण या कूपर घराण्याच्या समृद्ध वारशाचे नेतृत्व सध्या या घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी फरोख कूपर करीत आहेत. ते आज या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. धनजीशा कूपर यांच्यातील जिद्द आणि चिकाटी त्यांच्या पुढील पिढ्यांतही दिसते, तसेच उद्योगाप्रति असणारी निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीही नव्या पिढीत दिसते. सर धनजीशा कूपर यांचे पुत्र नरिमन हे वडिलांसोबत राहून काम शिकले. वडिलांसोबत काम करताना त्यांच्या विचारांचा वारसाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजला. नरिमन कूपर हे वडिलांच्या प्रत्येक कामात अग्सर रे असत. त्यामुळे ‘कूपर उद्योग समूह’ वाढविण्यात नरिमन यांचे मोठे योगदान आहे. हा गुण त्यांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजेच त्यांचे पुत्र फरोख कूपर यांच्यातही उतरल्याचे दिसते.
त्यामुळेच कंपनीला शतकापर्यंत नेण्यात उच्चशिक्षित फरोख कूपर यांचा मोठा वाटा आहे. फरोख कूपर यांनी अगदी तरुण वयात आपल्या या कौटुंबिक व्यवसायात कारकिर्दीची सुरुवात करीत आपली मुद्रा उमटवली. ‘सुज्ञपणे बनविलेली योजनाच तुम्हाला मोठे बनवू शकते,’ या विचारांनी ते काम करतात. कंपनीच्या उत्कर्षात फरोख यांच्या पत्नी मारूख यांची साथ देखील महत्त्वाची ठरली. या दोघांचे शिक्षण लंडनमध्ये झाले होते. मात्र त्यांची ओळख १९७५ च्या सुमारास मुंबईत झाली. कालांतराने विवाह झाल्यावर मारूख साताऱ्यात आल्या. त्यांनीही कूपर घराण्याचा उद्योग आणि समाजकारणाचा वारसा पुढे नेण्यात स्वतःला झोकून दिले. त्यातूनच पुढे ‘कूपर फाउंड्री उद्योग’ सुरू झाला.
‘कूपर कॉर्पोरेशन’ची उत्पादने
शेतीच्या नांगर निर्मितीपासून सुरुवात करून आज प्रामुख्याने इंजिन, जेनसेट आणि इंजिनाचे सुटे भाग बनविणारी, देशात आघाडीवर काम करणारी कंपनी म्हणून ‘कूपर उद्योग समूहा’चा लौकिक आहे. यात प्रामुख्याने कॉम्प्रेसर, ट्रॅक्टर, पंप, संरक्षण क्षेत्रातील वाहने आणि ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील वाहनांसाठी अत्याधुनिक इंजिन्स बनविली जातात. देश-विदेशांत प्रामुख्याने ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील सुटे भाग बनविणारी महत्त्वाची अग्सर कंपनी रे म्हणून लौकिक आहे. इंजिनसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादनही कंपनी करते. उच्च कार्यक्षमतेची डिझेल इंजिन्स, तसेच बायो आणि नॅचरल गॅसवर चालणारे जेनसेट कंपनीकडून बनविले जातात. सध्या कंपनी ३ एच.पी. ते ६०३ एच.पी. इंजिन व जेनसेटची निर्मिती व वितरण करीत आहे.
उत्पादनातील विविधता
उद्योगाचे विस्तारीकरण हे मोठ्या धोरणातून घडते. नांगर ते अद्ययावत इंजिन असा प्रवास केलेल्या ‘कूपर उद्योग समूहा’ने आज ११ युनिट्स उभे केली आहेत व ३,००० कुटुंबांना प्रत्यक्ष, तर ४,००० पेक्षा जास्त कुटुंबांना व्हेंडरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. साताऱ्याची ‘पेन्शनरचे’ शहर ही ओळख मिटवून ‘उद्योगाचे’ शहर अशी नवी ओळख निर्माण केली आहे.
विस्तारीकरणात नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सन २०१५ पासून अल्युमिनिअमची लोकप्रियता व फायदे पाहता उद्योगाने लो प्रेशर , ग्रॅव्हिटी व हाय प्रेशर डाय कास्टीग प्लांटमध्ये गुंतवणूक करून उत्पादन सुरू केले. त्याचप्रमाणे मशिनिंग व फाउंड्रीच्या क्षमता वाढवीत नेल्या.
‘कूपर कॉर्पोरेशन’चे गुणवत्ता धोरण
- उत्पादकता आणि गुणवत्तावाढीसाठी प्रक्रियेत सातत्याने सुधारणा
- कामाच्या ठिकाणचे वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सोयी व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे
- प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांना सक्षम करणे
- कामाच्या ठिकाणी ऑटोमेशनचा अंगीकार करणे
दिग्गजांच्या सहवासाने फुलले व्यावसायिक आणि सामाजिक जीवन
सर धनजीशा कूपर यांचे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांशी घनिष्ठ संबंध होते, आजही या दोन्ही घराण्यांतील संबंध हे तेवढ्याच ताकदीने टिकून आहेत. सर धनजीशा कूपर यांनी उद्योगपती वालचंद हिराचंद यांच्यासोबत प्रवासी कार आणि डिझेल इंजिन बनविण्यासाठी एकत्रित काम केले, त्यामुळे पुढे या दोन दिग्गजांना भारतातील ऑटोमोबाईल युगाचे प्रणेते म्हणूनही ओळखले जाऊ लागले. सर धनजीशा कूपर हे ‘इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (आय.एम.टी.एम.ए.) या प्रथितयश संस्थेचे प्रमुख संस्थापक सदस्य होते. या संस्थेने नुकतेच २०२३ या अमृतमहोत्सवी वर्षात सर धनजीशा कूपर यांना ‘कॉफी टेबल बुक’ व ‘लघु चित्रफीत’ या माध्यमातून अभिवादन केले. सर धनजीशा कूपर हे या संस्थेचे संस्थापक-अध्यक्षसुद्धा होते व या संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. संस्थेचे डायरेक्टर जनरल व सी.ई.ओ. यांच्या वतीने संस्थेचे डायरेक्टर श्री. पेंडसे यांनी स्वतः साताऱ्याला येऊन फिरोज कूपर यांना मानचिन्ह व कॉफी टेबल बुक प्रदान केले. १९४६ साली स्थापन झालेली ही संस्था मशिन टूल उद्योगातील एक अग्रणी संस्था असून, ही संस्था ‘इमटेक्स्ट’ या नावाने आशियातील सर्वात मोठी प्रदर्शने दरवर्षी भरवीत असते. सर धनजीशा कूपर यांनी या संस्थेच्या उभारणीच्या माध्यमातून भारतातील नव्हे, तर आशियातील ऑटोमोबाईल युगाचा पाया रचला. ‘रयत शिक्षण संस्थे’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे देखील सर धनजीशा कूपर यांच्या उद्योगाशी संबंधित होते. मात्र कर्मवीरांना काही कारणास्तव दीर्घकाळ काम करता आले नाही, त्यानंतर मात्र त्यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना करून शैक्षणिक कार्य पुढे वाढवीत नेले. सर धनजीशा कूपर यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक प्रसाराला कायम सक्रिय पाठिंबा देऊन मैत्री जपली. फरोख कूपर यांनी हे संबंध सतत वृद्धिंगत ठेवले.
सन्मान व पुरस्कार
श्री.फरोख कूपर यांना व ‘कूपर समूहा’ला औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात सतत सन्मान मिळाला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘सी.ई.ओ.मॅगझिन’, ‘सकाळ माध्यम समूह’, ‘पुणे शेतकी विद्यापीठ’, ‘सातारा नगरपरिषद’ यांनी श्री. फरोख कूपर यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर ‘जॅग्वार’, ‘हार्ले डेव्हिडसन’, ‘टाटा कमिन्स’, ‘आदित्य बिर्ला ग्रुप’, ‘द मशिनिस्ट प्रकाशन ग्रुप’ यांनी औद्योगिक क्षेत्रातील अति उत्कृष्ट निर्मिती, क्वॉलिटी, सेवा व नावीन्याबाबत गेल्या २० वर्षांत अनेक पुरस्कार दिले आहेत.
श्री. फरोख कूपर यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार
- 2019 – सकाळ मीडिया ग्रुप – सातारा वैभव पुरस्कार
- 2019 – पुणे शेतकी विद्यापीठ – जीवन गौरव पुरस्कार
- २०१८ – सातारा नगरपरिषद – स्मृती सेवा पुरस्कार
- २०१८ – मॅन्युफॅक्च्युरिंग टुडे (आदित्य बिर्लाग्रुप) -उद्योजक पुरस्कार
- 2016 – कोडोली कृतज्ञता मंच – कोडोलीभूषण
- २०१५ – द मशिनिस्ट मॅगझिन – जीवन गौरव पुरस्कार
- २०१५ – छ. उदयनराजे कल्चरल फाउंडेशन – सातारा गौरव
- 2014 – राजमाता श्री. छ. सुमित्राराजे गौरव पुरस्कार
- २०११ – लाटे एज्युकेशन सोसायटी – जीवन गौरव पुरस्कार
- २००९ – ग्रामपंचायत संभाजीनगर – जीवन गौरव पुरस्कार
- २००६ – आर. एन. गोडबोले ट्रस्ट – जीवन गौरव पुरस्कार
- २००२ – मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स – उद्योगरत्न पुरस्कार
शतकी घोडदौड
- १९२२ : कूपर फाउंड्रीची स्थापना, पहिल्या भारतीय बनावटीच्या लोखंडी नांगराच्या निर्मितीला सुरुवात
- १९२३ : पॉवर ऑईल एक्सपेलर्स (भुईमूग डेकोर्टिके टर), क्रशर आणि ऊस क्रशर तयार करण्यास सुरुवात
- १९२४ : भारतातील पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती. हॅटर्सले हातमाग यंत्राच्या (पॉवर लूम्स) उत्पादनास सुरुवात
- १९३२ : इंपिरियल केइली आणि डंकन स्ट्रॅटन यांच्या सहकार्याने भारतात डिझेल इंजिनची निर्मिती
- १९४२ : सीबी, सीसी, सीडी प्रकारच्या डिझेल इंजिनांच्या निर्मितीस सुरुवात
- १९४३ : आल्फ्रेड हर्बर्टच्या सहकार्याने एनडी लेथ आणि कॅप्स्टन लेथचे उत्पादन सुर
- १९४५ : केसीईओ मॉडेल डिझेल रोड रोलर आणि कूपर बर्न टाईप रोड रोलरचे सादरीकरण
- १९४९ : टॉम क्रेव्हन यांनी डिझाईन केलेले आरसीबी/आरसीसी डिझेल इंजिन आणि मध्यम गती डिझेल इंजिनचे उत्पादन सुर
- १९५४ : CR26 रिकार्डो कॉमेट III सह CR19, CR14, CR40 आणि CR50 या डिझेल इंजिन्सचे सादरीकरण
- १९६० : कूपर मेटल्स या उद्योगाची स्थापना
- १९८२ : कूपर फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडची पायाभरणी
- २००५ : कूपर फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडचे कूपर कॉर्पोरेशनमध्ये विलीनीकरण
- २००६ : सिलिंडर हेड् सचे उत्पादन सुरू
- २००७ : रिकार्डोसोबत सर्वात आधुनिक युरो सीआरडीआय इंजिन डिझाईनसाठी करार, कूपर कार्पोरेशनच्या एक्स्पोर्ट ओरिएंटेड युनिटमध्ये काम सुरू
- २००९ : 2 सीवायएल इंजिन आणि जेनसेट प्रकल्पास केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून मान्यता
- २०१० : महाराष्ट्र सरकारतर्फे कू पर कॉर्पोरेशनला ‘मेगा प्रोजेक्ट’चा दर्जा
- २०११ : ३, ४ आणि ६ सिलिंडर इंजिन निर्मितीच्या उपक्रमास सुरुवात
- 2013 : रेल्वेसाठी लागणारे लायनर, हेड, पिस्टनसाठी लेसर-हार्डनिंग प्रकल्पाची सुरुवात
- 2014 : K-10 रोबोटिक लाईन येथे नवीन फाउंड् री प्लांट आणि मशिन शॉपची सुरुवात
- २०१५ : नवीन कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्थलांतर
- 2016 : रिकार्डोच्या सहकार्याने ३.५ ते १,००० केव्हीए क्षमतेच्या जेनसेटसाठी डिझायनिंग सेवेस सुरुवात
- २०१८ : अल्युमिनिअम उत्पादनात प्रवेश
- 2019 : मोठे इंजिन निर्मिती संशोधन प्रकल्प सुरु
- २०२१ : ट्रॅक्टरसाठी संशोधन व प्रोटो टाईप निर्मितीस प्रारंभ. ट्रॅक्टर बांधणी प्लँटची उभारणी
पथदर्शी सामाजिक जाणीव
कूपर घराणे सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घराणे आहे. एका प्रांताचे यशस्वी मुख्यमंत्री ते यशस्वी उद्योगपती ही दुर्मीळ भूमिका सर कूपर यांनी यशस्वीपणे वठविली. पूर्वापार चालत आलेली सामाजिक परंपरा आजदेखील या कुटुंबातील चौथ्या पिढीनेही जपली आहे. संकट हे मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित, त्यात ‘कूपर कॉर्पोरेशन’ आपल्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात कायम अग्रेसर असते. बदलत्या काळात उद्योगांतील स्पर्धात्मक वातावरणात सामाजिक जाणिवा खुंटण्याची शक्यता असताना ‘कूपर उद्योग समूहा’चा उद्योगातून समाजकारणाचा प्रयोग भविष्यात इतर उद्योगांना मार्गदर्शक ठरून त्यांना नवी दिशा देऊ शकेल.
सामाजिक उपक्रम
- समाजातील विविध घटकांच्या बौद्धिक विकासासाठी दोनशेहून अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयाची स्थापना केली आणि काहींना मदतही केली आहे.
- ‘कूपर कॉर्पोरेशन’तर्फे २०१३ मध्ये सातारा येथील मध्यवर्ती कारागृहात एका सुधार केंद्राची सुरुवात. त्यात ग्रंथालये आणि
एलसीडी प्रोजेक्टर, कॉम्पुटर लॅबची सुविधा. - ‘कूपर कॉर्पोरेशन’कडून सातारा सैनिकी शाळेत ‘सॅम एन. कूपर लर्निंग सेंटर’ नावाचे एक अनोखे केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध् ई-रीड ये र्स, डिजिटल क्लासरूम आणि ऑडिओ व्हिज्अल सेंटर आहे.
- सातारा आणि परिसरातील विविध सहा शाळांमध् सुमारे ये ४४ हून अधिक वर्गखोल्या या ई-लर्निंग प्रणालीसह डिजिटल
करण्यात आल्या आहेत. - अभिनेते आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन आणि इतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या जलसंधारण प्रकल्पांना आर्थिक
पाठबळ देखील ‘कूपर समूहा’कडून देण्यात आले. - राष्ट्रीय आपत्तीवेळी पंतप्रधान साहाय्यता निधीत भरीव मदत.
- विविध स्तरांतील नागरिकांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून वद्यै कीय सुविधा पुरविण्यात अग्रेसर.
- प्लॅस्टिकच्या वापराबाबत जनजागृतीचे कार्य.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहावे, यासाठी ‘नरिमन कूपर शिष्यवृत्ती’.
- महिला सक्षमीकरणासाठी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात ‘कूपर समूह’ कायम अग्सर.
कोविड काळातील मदतकार्य
- सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधकघरगुती मास्क कसे बनवावेत यावर हजारो पत्रके छापून ती आरोग्य सेवकांत वितरित करण्यात आली
- पोलिसांकरिता कोविड प्रतिकारशक्ती औषधे, पीपीई किट, फेस शिल्ड, थर्मामीटर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
- सातारा शहर आणि परिसर, तसेच सातारा एमआयडीसी भागातील सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन मोहीम राबविण्यात आली.
- सातारा जिल्ह्यातील गरीब-गरजू कुटुंबे आणि परप्रांतीय कामगारांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.
- नागरी रुग्णालयांना व्हटिें लेटर पुरवठा करण्यात पुढाकार.
- छत्रपती उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनचे वाटप.
- खटाव येथील नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनचे वाटप
- साताऱ्याच्या जम्बो कोविड रुग्णालयाला अडीच लाख रुपये किमतीची वैद्यकीय उपकरणे पुरवली
- सातारा पोलिस कोविड सेंटरला अविरत विद्युतपुरवठा व्हा व याकरिता कूपर जेनसेट पुरवला.