गोयल कुटुंब हे मूळचे हरियाणातील सोनिपतचे. ‘गोयल गंगा ग्रुप’चे अध्यक्ष जयप्रकाश गोयल हे पाच भावांमध्ये सगळ्यात थोरले आहेत. त्यांच्या वडिलांचा कपड्याचा आणि धान्याचा व्यवसाय होता. घरची शेतीवाडीही होती. पंजाब विद्यापीठातून बी. कॉम. केल्यावर त्यांनी काही काळ दिल्लीत सहकार मंत्रालयात ऑडिटर म्हणून नोकरीही केली, पण सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा व्यवसायाकडे होता. त्यामुळेच त्यांनी नोकरी सांभाळत दिल्लीत ऑईल ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्यासोबत त्यांनी जमिनीचे व्यवहार बघण्यास सुरुवात केली. त्यांचे काका त्या वेळी पुण्यात किराणा मालाचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या सल्ल्यावरून जयप्रकाश गोयल हे १९७७ मध्ये पुण्यात आले. त्यांनी काकांसोबत पुण्यात सुरुवातीला रसायनांची फॅक्टरी सुरू केली. नंतर कन्फेक्शनरी युनिटही सुरू केले. दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या चारही भावांना पुण्यात बोलावून घेतलं. त्यांनाही व्यवसायात सामावून घेतलं. १९८० च्या सुमारास त्यांनी ‘गोयल डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स’ या नावाने बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. रास्ता पेठेतील ‘त्रिमूर्ती टॉवर्स’ हा त्यांनी साकारलेला पहिला प्रोजेक्ट होता. या प्रकल्पात सात मजल्यांच्या तीन इमारतींचा समावेश होता. त्यानंतर पुढचा प्रकल्प कोथरूडमध्ये साकारण्यात आला आणि पुण्यातील विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक म्हणून ‘गोयल गंगा समूहा’ची घोडदौड सुरू झाली.

गोयल गंगा ग्रुप : हजारो पुणेकरांचे घराचे स्वप्न साकारणारा समूह
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख उपनगरांमध्ये गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने उत्तमोत्तम गृहप्रकल्प साकारत असले ला अग्रगण्य समूह ही ‘गोयल गंगा ग्रुप’ची प्रमुख ओळख. रास्ता पेठे त १९८० मध्ये साकारले ल्या ‘त्रिमूर्ती टॉवर्स’ या पहिल्या प्रकल्पाद्वारे सुरू झाले ली ही घौडदौड आज पुण्यासह मुंबई, नागपूर आणि बेंगळुरु या शहरांमध्येही सुरू आहे. ‘गोयल गंगा ग्रुप’ने आजवर साकारले ल्या प्रकल्पांचा एकत्रित विचार करता, एक कोटी चौरस फु टांपेक्षा अधिक बांधकाम साकारले असून, सध्या दर पाच वर्षांना हा समूह ५० लाख चौरस फू ट क्षेत्रफळाचे नवीन प्रकल्प साकारत आहे. आजवरच्या या सगळ्या प्रवासाविषयी ‘गोयल गंगा ग्रुप’चे मॅनेजिंग डिरेक्टर अतुल गोयल यांच्याशी के ले ली विशेष बातचीत.




व्यवसायातील टर्नग पॉईंट
जयप्रकाश गोयल यांचे थोरले सुपुत्र अतुल गोयल यांनी १९९९ मध्ये व्यवसायात पदार्पण केले. सिव्हिल इंजिनीअरिंग आणि एम.बी.ए.च्या शिक्षणाचा प्रत्यक्ष फिल्डवर उपयोग करीत त्यांनी कन्स्ट्रक्शन मटेरियल टेक्नॉलॉजीत अनेक अद्ययावत बदल घडवून आणले. त्याचसोबत त्यांनी वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये आणि व्यवस्थापनातही आमूलाग्र बदल केले. याच दरम्यान समूहाने ‘गोयल गंगा ग्रुप’ या नवीन ब्रँडनेमद्वारे आगेकूच सुरू केली. योगायोगाने १९९९ सालीच ‘गोयल गंगा ग्रुप’ने बिबवेवाडीत ‘गंगा धाम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लाँच केला. हा व्यवसायातील मोठाच टर्निंग पॉईंट ठरला. या प्रकल्पात एकूण ३२ एकर जागेवर १० लाख चौरस फूट क्षेत्र विकसित करण्यात आले, त्यामुळे १,५०० कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले. सध्या ‘गंगा धाम’च्या नवीन फेजचे काम सुरू असून, यामध्ये तीन नवीन टॉवर्स साकारले जात आहेत. तर ‘गंगा धाम’बरोबरच ‘गंगा सॅटेलाईट’ प्रकल्पही वेळेत पूर्ण करण्यात आला. दरम्यान, ‘गोयल गंगा ग्रुप’ने आयएसओ सर्टिफिकेशन प्राप्त केले आणि कंपनी उभारत असलेल्या प्रकल्पांतील बांधकामाच्या गुणवत्तेला आणि दर्जाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दाखवून दिले.
पर्यावरणपूरक बांधकामांना आधीपासूनच प्राधान्य
पर्यावरणपूरक बांधकामाचे सरकारी धोरणही जेव्हा अस्तित्वात नव्हते, तेव्हा समूहाने रेन वॉटर हार्वेस्टिंग, झीरो गार्बेज, झीरो डिस्चार्ज अशा लोकोपयोगी योजना विविध प्रकल्पांमध्ये राबवायला सुरुवात केली होती. सिंहगड रस्ता परिसरात साकारण्यात आलेल्या ‘गंगा भाग्योदय’ या प्रकल्पात व्हर्मीकंपोस्टचा विशेष प्रकल्प साकारण्यात आला आहे. आपल्या प्रकल्पांमध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पनेशी निगडित नवनवीन उपक्रम राबविण्यावर सातत्याने भर देत असल्याने २००७ मध्ये ‘गृह’ या केंद्रीय यंत्रणेने ‘गोयल गंगा ग्रुप’ला विशेष मानांकन दिले. या प्रकारचे मानांकन मिळविणारा हा पहिला समूह ठरला आहे. ‘गंगा धाम’ आणि ‘गंगा सॅटेलाईट’नंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत अनेक गृहप्रकल्प मार्गी लावण्यात आले. गुणवत्तापूर्ण काम आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावर ‘गोयल गंगा ग्रुप’ने गृहप्रकल्पांचे शतक पार केले आहे. बेंगळुरुमध्ये लेमनट्री ब्रँड अंतर्गत पहिल्यांदा १२० खोल्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलचा प्रकल्प उभारण्यात आला. २००४ पासून अतुल गोयल यांनी केंद्र सरकारसोबत मेट्रोसंबंधीच्या प्रकल्पांवर काम करायला सुरुवात केली असून, सध्या ते नागपूरमधील रिटेल प्रोजेक्टवर काम करीत आहेत. जवळपास १,५०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. नागपूरमधील मेट्रो जंक्शनला जोडणारा आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरचा मध्य भारतातील हा पहिला प्रकल्प पूर्णपणे आधुनिक पद्धतीने उभारण्यात आला आहे.
शहराच्या परिघासोबत विस्तारलेला व्यवसाय
विस्तारलेला व्यवसाय विमाननगर, वानवडी ही आज शहरातील प्रमुख उपनगरे असली, तरी १९९२ नंतर ती अधिकृतपणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. १९८७ आणि १९९२ च्या विकास आराखड्यानंतर महापालिकेची हद्द आणि शहराचा विस्तार वाढत गेला. त्याचप्रमाणे ‘गोयल गंगा ग्रुप’नेही शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये प्रकल्प साकारण्यास सुरुवात केली. त्या काळी नागरिकांना लिफ्टचीही सवय नव्हती. लिफ्टने जायला लोक बिचकायचे. कारण त्या वेळी लिफ्टला बॅकअप सिस्टिम नव्हती. एकदा वीज गेली, की ती परत येईपर्यंत लिफ्टमध्येअडकून राहायला लागायचे. त्यामुळेच ‘गंगा धाम’ प्रकल्पात १९९९ मध्ये पहिल्यांदा डीजी जनरेटर बॅकअपसह लिफ्टची सोय उपलब्ध करण्यात आली.
पुणेनेहमीच ‘फोकस्ड एरिया’
रुपये ५० ते ७० लाख या बजेटमधील टू बीएचके फ्लॅट हा ‘गोयल गंगा ग्रुप’चा प्रमुख सेगमेंट आहे. या विषयी माहिती देताना अतुल गोयल म्हणतात, “पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र झपाट्याने वाढत असून, दरवर्षी एक लाख नवीन घरे साकारली जातात. पुणे मेट्रोपॉलिटन रीजनचा विचार करता, चहूदिशांनी आमचे नवीन प्रकल्प येत आहेत. दर तीन ते पाच वर्षांत ५० लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र विकसित करण्याचे उद्दिष्ट आम्ही गाठत आहोत. पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट हे अतिशय उत्तम आहे. मुंबई आणि बाकी मेट्रो शहरांचा विचार करता, येथे आम्ही पुण्यातील बिल्डर कमी मार्जिनमध्ये खूप चांगली क्वॉलिटी देतो. मुंबईत जो दर्जा २० हजार ते ५० हजार रुपये प्रति चौरस फूट इतका दर असलेल्या एरियात मिळतो, तोच पुण्यात सहा ते सात हजार रुपये प्रति चौरस फूट दरात मिळतो. त्यामुळेच वास्तव्यासाठी उत्तम शहर असा पुण्याचा नावलौकिक राज्यातच नाही, तर देशात कायम आहे. त्यामुळेच आम्ही बाकी शहरांतही प्रकल्प साकारत असलो, तरी पुणे हा आमच्यासाठी नेहमीच फोकस्ड एरिया आहे आणि पुढेही राहील.”
कोविडोत्तर काळात रिअल इस्टे तेजीत
रिअल इस्टेट क्षेत्रात २०१२ पासून जे मंदीचे मळभ साचून राहिले होते ते २०२० नंतर दूर झाले, असे निरीक्षण नोंदवत अतुल गोयल म्हणाले, की कोविड आणि लॉकडाऊनमुळे लोकांना घराचे महत्त्व ठळकपणे जाणवले. एरवी कॉर्पोरेट कल्चरमध्येदिवसभरात मिळून आठेक तासच घरी असणारी नोकरदार मंडळी वर्षभर घरात अडकून पडली. त्यामुळे लोकांनी मोठे घर घेण्याला पसंती दिली. लोकांना स्पेसचे महत्त्व नव्याने उमजले. याचीच परिणती म्हणजे फर्स्ट बायर्ससोबतच दुसऱ्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे टू बीएचके बरोबरच थ्री बीएचकेचीही मागणी वाढली. त्यामुळेच ‘गोयल गंगा’च्या नव्याने साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमध्येटू बीएचकेइतकेच
आता थ्री बीएचकेचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे.
भारतीय बाजारपेठेला मोठी संधी
युरोपमध्येदीर्घ काळापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि वर्तविण्यात येत असलेल्या दुष्काळाच्या चिंतेमुळे युरोपसह अमेरिकेतही सध्या स्लोडाऊनचे वारे वाहताहेत. ट्विटर-फेसबुकसह अनेक जागतिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करीत आहेत. मात्र जागतिक पटलावरील या मंदीसदृश परिस्थितीमुळे भारतीय उद्योगांना आणि बाजारपेठेला संधी मिळू शकते, असे महत्त्वाचे निरीक्षण अतुल गोयल यांनी नोंदविले. “भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे. आपली बाजारपेठ प्रचंड मोठी असल्याने देशांतर्गत मागणीही सातत्याने वाढत आहे. परदेशी नोकऱ्या धोक्यात आल्याने रिव्हर्स मायग्रेशन सुरू झाले आहे. याचा फायदा भारतातील आयटी, रिटेल, लॉजिस्टिक्स, टोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना मिळतो आहे. कारण यापूर्वी ज्या संधींच्या शोधात भारतीय तरुणाई परदेशी जात होती, त्याच तोडीच्या संधी आज देशात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा भारताचा असेल.”
कौटुंबिक जीवन
अतुल गोयल यांच्या पत्नी अमृता यांनी स्वतःचा ‘माटी से’ हा ब्रँड सुरू केला आहे. या ब्रॅंडमार्फत वॉलआर्ट्स, फर्निचर, हस्तकला आणि सजावटीच्या अनेक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात. देशभरातील पन्नासहून अधिक कारागिरांना या माध्यमातून त्यांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अतुल गोयल आणि अमृता यांना तरुष आणि क्रितेश ही दोन मुले आहेत. तरुष यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून, क्रितेश यांनी अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतले आहे.
‘रिअल रिच’
अतुल गोयल यांचे बांधकाम क्षेत्राची सखोल माहिती देणारे ‘रिअल रिच’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. विख्यात आध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाला घर घेणे म्हणजे मोठे कठीण काम असते. १९९८ पासून शहरीकरणाने वेग घेतल्यानंतर बांधकाम क्षेत्राला मोठा वाव मिळाला. वेगवेगळ्या योजना येऊ लागल्या. मात्र यातून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये आणि बिल्डरनाही स्वतःची भूमिका समजावी या संबंधीची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायाकडे बघण्याचा समाजाच दृष्टिकोन बदलायला हवा, या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

शिक्षण-सामाजिक क्षेत्रातील योगदा
अतुल गोयल यांनी बांधकाम व्यवसायाबरोबरच समाजाच्या हितासाठीही अनेक उपक्रम राबविले आहेत. ‘गोयल गंगा फाऊंडेशन’च्या माध्यमातून ते अनेक सामाजिक संस्था, तसेच दिव्यांग, अनाथ मुले, महिला यांना वेळोवेळी मदत करीत असतात. भारतीय संस्कृती आणि मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून नवीन पिढीत रुजावीत, या उद्देशाने ‘गोयल गंगा ग्रुप’तर्फे पिंपरीत ‘जी. जी. इंटरनॅशनल स्कूल’ ही सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेची दुसरी शाखा बावधनला आहे. पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या पिंपरी, चिंचवड, रहाटणी आणि बावधन अशा चार शाखा आहेत. या शाळांत दर्जेदार शिक्षणासोबतच योग, ध्यानधारणा, वेगवेगळ्या सणांची ओळख असे उपक्रमही राबविले जातात.
अतुल गोयल यांनी आजवर अनेक संस्थांसोबत काम केले आहे. अग्रवाल समाजासाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. याशिवाय ‘क्रेडाई’मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी गृह प्रदर्शनाचा ट्रेंड सुरू केला. त्या दृष्टीने प्रदेश दौरे, स्टडी टूरचे आयोजन केले. संस्थेच्या कामात सरकारला सहभागी करून घेतले. त्यामुळे लोकांना बांधकामाची धोरणे कशी बनविली जातात आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते, याची माहिती मिळाली. उद्योगांसाठीही त्यांनी योगदान दिले आहे. ‘आंत्रप्रिन्युअर ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे केंद्र पुण्यात सुरू केले आणि या केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून भरीव योगदान दिले. ही संस्था नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेचे जगभरात सदस्य आहेत. याशिवाय अनेक संस्थांना हॉस्पिटल, शाळा बांधण्यासाठीही ‘गोयल गंगा ग्रुप’ने आर्थिक हातभार लावला आहे.