मराठी माणसाला नोकरीचा मोह सोडवत नाही आणि तो आपणहून व्यवसायात उतरत नाही, हा समज खोटा ठरवत ‘रांजेकर समूहा’चे प्रमुख रवींद्र रांजेकर यांनी १९८८ मध्ये बांधकाम व्यवसायात पदापर्ण केले. त्यापूर्वी पाच वर्षे ते किर्लोस्कर कन्सल्टंट्समध्ये उत्तम नोकरी करीत होते. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या रांजेकर यांनी १९८८ मध्ये ‘यश असोसिएट्स’ या नावाने स्वतःचा बांधकाम कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे वडील श्री. नारायण रांजेकर हे देखील सिव्हिल इंजिनीअर होते. ते पाटबंधारे खात्यात होते. रवींद्र रांजेकरांनी व्यवसाय करावा, यासाठी ते स्वतः जितके आग्रही होते तितकेच त्यांचे वडीलही आग्रही होते. व्यवसायाचे तेच पॅशन आज रांजेकरांच्या तिसऱ्या पिढीतही आले असून, रवींद्र रांजेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध रांजेकर हे व्यवसायाची धुरा आज समर्थपणे सांभाळत आहेत. व्यवसायाबद्दल आजोबांचे विचार नेमके कसे होते, ते सांगताना अनिरुद्ध रांजेकर म्हणतात, “आजोबा स्वतः नोकरी करीत असले, तरी आपल्या मुलाने व्यवसायात उतरावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ते म्हणायचे व्यवसाय असा करा, की लोकांनी आपले नाव घेतले पाहिजे. सचोटीने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करीत स्वतःचे गुडविल निर्माण करण्याचा मंत्र आजोबांनी दिला.”
रांजेकर रिऑल्टी : रिडेव्हलपमेंटमधील अग्रगण्य समूह
पुण्यात ‘रिडेव्हलपमेंट’ हा आजच्या घडीला कळीचा शब्द झाला असताना सोसायट्यांचा पुनर्विकास वेळेआधी पूर्ण करून ग्राहकांना घराचा ताबा देणारा समूह अशी रांजेकर रिऑल्टीने स्वतःची खास ओळख निर्माण के ली आहे. सहकारनगर, कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे, बाणेर, औध अशा पुण्याच्या प्रमुख उपनगरांमध्ये आज ‘रांजेकर समूहा’चे प्रकल्प वेगात सुरू आहेत. सिव्हिल इंजिनीअरिगचा तीन पिढ्यांचा वारसा असले ला हा समूह म्हणजे बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, उत्तम दर्जा आणि चोख नियोजन असा खास त्रिवेणी संगमच! ‘रांजेकर समूहा’ची आजवरची वाटचाल आणि नवीन वर्षातील प्रकल्पांचा आढावा...
सुरुवातीची वर्षे
सुरुवातीची वर्षे रवींद्र रांजेकर यांनी कॉन्ट्रॅक्टिंगची सेवा सुरू करीत बंगले, तसेच रहिवासी आणि औद्योगिक इमारतींची कामे घ्यायला सुरुवात केली. सन १९९० ते २००३ दरम्यान त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात १०-१२ प्रकल्प साकारले. व्यवसाय बांधकामाचा असला, तरी व्याजावर किंवा उसने पैसे घेऊन धंदा करायचा नाही, हे व्यवसायाचे सूत्र रांजेकरांनी अगदी पहिल्या दिवसापासून पाळले. अशा प्रकारे पुण्यात कॉन्ट्रॅक्टिंगच्या व्यवसायात स्थिरस्थावर होत असतानाच सन २००३ मध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे त्यांना ‘लवासा प्रकल्पा’साठी रस्ता बांधण्याचे काम चालून आले. टेमघर धरणापासून ते एंट्री प्लाझापर्यंत असा एकूण साडेआठ किमी अंतराचा रस्ता साकारण्याचे साडेसहा कोटी रुपयांचे हे मोठे कंत्राट होते. वास्तविक रांजेकरांकडे तेव्हा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक यंत्रणा नव्हती, कामगार नव्हते. पण त्यांची इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी आणि नोकरी-व्यवसायातील अनुभव या जोरावर त्यांना हे कंत्राट मिळाले. ‘लवासा’ प्रकल्प हा कंपनीच्या प्रगतीमधील मैलाचा दगड ठरला. कारण रस्त्याचे काम तर रांजेकरांनी योग्य वेळेत पूर्ण केलेच, पण त्या जोरावर त्यांना लवासा’तली अनेक कामे मिळाली.
“रस्तेबांधणीसाठी दर्जेदार साहित्य, कामाचा योग्य दर्जा राखण्याची निष्ठा आणि उत्तम तंत्रज्ञान वापरले, तर रस्त्याला खड्डे पडत नाहीत, हे आम्ही सिद्ध करून दाखविले. त्यामुळेच त्यानंतर ‘लवासा’तील एकामागोमाग एक कामे मिळत गेली. २००१ ते २०१० दरम्यान आम्ही दोन ते अडीच लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या इमारती आणि उद्याने अशा पायाभूत सुविधा ‘लवासा’मध्ये साकारल्या.” अनिरुद्ध रांजेकर सांगत होते.
३०
वर्षांची परंपरा
१३
पुनर्विकास प्रकल्पांची पूर्तता
१० लाख
स्क्वेअर फुटांचे चालू व नवीन येणारे बांधकाम
पुण्यातील सेकंड इनिग
‘लवासा’तील बांधकामाचे प्रकल्प वेगात सुरू असतानाच २०१० मध्ये पर्यावरणासंबंधी कारणे दाखवून ‘लवासा’ प्रकल्प थांबविण्यात आला. आला. त्यामुळे रांजेकरांनी परत एकदा पुण्यातील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. एकाच प्रकल्पावर कधी अवलंबून राहायचे नाही म्हणून, ‘लवासा’त मोठी कामे करीत असतानाही पुण्यातसुद्धा प्रकल्प सुरू होते. त्यामुळे ‘लवासा’ अचानक बंद पडले, तरी पुण्यातील प्रकल्प सुरू असल्यामुळे व्यावसायिक वा आर्थिक कोंडी झाली नाही. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अनिरुद्ध हे एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. वास्तविक पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांना अमेरिकेतील विख्यात होमलँड सिक्युरिटीज या कंपनीकडून नोकरीची चांगली ऑफर होती. पण परदेशात नोकरीचा पर्याय स्वीकारण्यापेक्षा मायदेशी परतून वडिलांसोबत स्वतःला व्यवसायात झोकून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे व्यवसायाला आणखी बळ मिळाले. पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना ते वडिलांना मदत करीत असल्याने त्यांना व्यवसायाची चांगली ओळख होती.
पुनर्विकासातील श्रीगणेशा
पुण्यात बांधकाम व्यवसाय सुरू करताना नवीन प्रकल्पांबरोबरच पुनर्विकासाच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला.
“पुण्यातील रिडेव्हलपमेंटचे क्षेत्र २०१२ सालानंतर खऱ्या अर्थाने विकसित व्हायला सुरुवात झाली. ४०-५० वर्षे जुन्या इमारतींच्या जागी अद्ययावत सुविधांनी युक्त नवीन अपार्टमेंट्स साकारू लागल्या. भव्य एन्ट्रन्स लॉबी, मोठी प्रशस्त घरे, मेकॅनाईज्ड पार्किंग अशा आधुनिक घरांना मागणी वाढू लागली. अशातच आमच्याकडे सहकारनगरमधील एक स्कीम चालून आली.” अनिरुद्ध रांजेकर सांगत होते.
सहकारनगरमध्ये श्री. गद्रे यांचा ‘शकुंतला’ हा बंगला होता. त्या जागी नवी कोरी अपार्टमेंट साकारण्याची योजना होती. सहकारनगर परिसरात अगदी मोक्याच्या जागी ही प्रॉपर्टी असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक हे पुनर्विकासाचे काम मिळविण्यासाठी इच्छुक होते.
या पहिल्या प्रकल्पाविषयी बोलताना अनिरुद्ध रांजेकर म्हणतात, “शकुंतला प्रकल्पाचे संपूर्ण काम आम्ही १८ महिन्यांत संपवत फ्लॅट्सचा ताबा दिला. अतिशय नियोजनबद्ध रीतीने साकारलेला हा प्रकल्प म्हणजे सहकारनगर परिसरातील आमची जणू ओळखच होऊन गेली. या कामामुळे याच परिसरातील आणखी दोन बंगल्यांची पुनर्विकासाची कामे चालून आली आणि त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही.”
सहकारनगरनंतर औंध येथील गुलमोहर पार्क परिसरातून पुनर्विकास प्रकल्प हाती आला. तो एरिया इतका प्रीमियम होता, की नवीन इमारत साकारताना अधिकाधिक फ्लॅट्स विकसित करण्याचा पुनर्विकासातील पारंपरिक दृष्टिकोन बाजूला ठेवत ३.५ बीएचकेच्या प्रत्येकी तीन हजार चौरस फुटांच्या अतिशय ऐसपैस सदनिका या प्रकल्पात साकारल्या. २०१६ मध्ये पूर्ण झालेल्या या स्कीमने ‘रांजेकर रिऑल्टी’ला प्रशस्त, देखणी घरे साकारणारा समूह अशी ओळख मिळवून दिली.
कोथरूडमधील पहिली स्कीम
कोथरूडमधील पहिली स्कीम रांजेकरांची रिडेव्हलपमेंटमधील घौडदौड सुरू असतानाच कोथरूड परिसरातील बेडेकर गणपती शेजारील ‘भाग्यश्री’ ही अपार्टमेंट पुनर्विकासासाठी त्यांच्याकडे आली. या इमारतीचा पुनर्विकास करणे हे आव्हानात्मक होते. कारण येथील प्रत्येक फ्लॅट वेगवगेळ्या क्षेत्रफळाचा होता. त्यामुळे सर्व सभासदांच्या सूचना विचारात घेऊन पुनर्विकास साकारताना बांधकाम व्यावसायिकाला प्रचंड लवचीकता ठेवायला लागणार होती. रांजेकरांनी हे आव्हान स्वीकारले आणि अवघ्या १७ महिन्यांत पुनर्विकासाचा हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यात आला. त्यानंतर कोथरूडमधीलच आयडियल कॉलनीतील ‘मेघराज अपार्टमेंट’चा पुनर्विकासाचा प्रकल्प मिळाला. हे काम सुरू असतानाच कोरोनाचा मार्च २०२० मधील पहिला लॉकडाऊन सुरू झाला. पण कोविड काळातील सगळी अनपेक्षित आव्हाने पेलून अवघ्या साडेसतरा महिन्यांत हा संपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला. कोरोनाच्या अनपेक्षित अडथळ्यामुळे पुनर्विकासाचे काम रखडणार, हे ‘मेघराज अपार्टमेंट’च्या सभासदांनी जणू गृहीत धरले होते. पण त्यांच्या सगळ्या प्रश्नांची-चिंतांची सोडवणूक करण्यासाठी ‘रांजेकरां’तर्फे दर पंधरवड्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग सुरू करण्यात आली. इतकेच नाही, तर ऑक्टोबर २०२० मध्ये नव्याने बांधलेल्या प्रत्येक फ्लॅटची ऑनलाईन सफर घडवीत सभासदांनी सांगितलेले
बदल करून घेतले.
“कोरोनाच्या अभूतपूर्वस्थितीमुळे उद्भवलेल्या ज्ञात-अज्ञात संकटांवर मात करून ‘मेघराज अपार्टमेंट’ आम्ही सभासदांना ठरलेल्या मुदतीपूर्वी हस्तांतरित केली. हस्तांतराचा सोहळा अतिशय हृद्य असा होता. एरवी बिल्डर म्हणून आम्ही सोसायटीतील सभासदांना भेटवस्तू देतो; पण ‘मेघराज सोसायटी’ने आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली.” अनिरुद्ध रांजेकर सांगत होते.
‘भाग्यश्री’ आणि ‘मेघराज’च्या निमित्ताने रिडेव्हलपमेंटमधील आदर्श असे वस्तुपाठ निर्माण केल्याने कोथरूडमधील पुनर्विकासाच्या कामांचा ओघच रांजेकरांकडे सुरू झाला. रामबाग कॉलनीतील ‘अमेय अपार्टमेंट’चे काम पूर्ण झाले असून, लवकरच नवीन वास्तूचे सभासदांना हस्तांतर केले जाणार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये पुनर्विकासासाठी आलेल्या ‘अमेय अपार्टमेंट’ची हस्तांतराची मुदत मार्च २०२३ आहे. ठरलेल्या वेळेत पझेशन, हा पायंडा ‘रांजेकर रिअॅल्टी’ने सुरू केला ते येथेही प्रत्ययास येते. फक्त कोथरूडचा विचार करता रामबाग कॉलनी, आयडियल कॉलनी आणि मयूर कॉलनीमध्येमिळून तब्बल तीन लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू होत आहे.
अद्ययावत सोयीसुविधांवर भर
नवीन प्रकल्प आणि घर साकारताना ग्राहकांना संपन्न आणि सुविधायुक्त जीवनशैलीचा अनुभव मिळावा, यासाठी रांजेकर नेहमीच आग्रही असतात. कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊन्सच्या अखंड चक्रामुळे ‘वर्कफ्रॉम होम’ हा बहुतेकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होऊन गेला. हा महत्त्वाचा बदल लक्षात घेऊन रांजेकरांनीही आपल्या नवीन प्रकल्पांमध्ये घरून काम करणाऱ्या नोकरदारांसाठी स्वतंत्र खोली आणि बाथरूम देण्यास सुरुवात केली. कोथरूडमधील ‘मेघराज’, ‘भाग्यश्री’, तर मित्रमंडळ परिसरात ‘अनंत सोसायटी’त अशी सोय देण्यात आली आहे. याशिवाय पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये असतात तसे पाणी गरम करणारे सेंट्रल हीट पंप ‘रांजेकर रिऑल्टी’तर्फे साकारण्यात येणाऱ्या प्रत्येक सोसायटीत बसविण्यात येतात. पर्यावरणातील उष्णता शोषून पाणी गरम करण्याच्या तंत्रामुळे पारंपरिक बॉयलरपेक्षा सेंट्रल हीट पंप्समध्ये विजेची मोठ्या प्रमाणात बचत होते. रांजेकरांनी साकारलेल्या प्रत्येक घरात देवघरासाठी स्वतंत्र जागा असते. याशिवाय प्रत्येक फ्लॅटला उत्तम दर्ज्याची सेफ्टीडोअर्स, तसेच भव्य एन्ट्रन्स लॉबी, फॉल्ससीलिंग यांमुळे ‘रांजेकर रिऑल्टी’चा प्रत्येक प्रकल्प आगळावेगळा ठरतो.
व्यावसायिक यशाचे गमक
“महाराष्ट्रीय माणसासाठी रिडेव्हलपमेंटसारखा दुसरा उत्तम व्यवसाय नाही. कारण योग्य नियोजन आणि योग्य दरात विक्री ही भावना मराठी माणसाच्या अंगी रुजलेली असते. पुनर्विकासासाठी कोठूनही विचारणा झाली, की आधी मी स्वतः साईटला भेट देतो. या प्रकल्पात माझे घर असेल, तर मी येथे राहणार का, असा प्रश्न मी स्वतःला विचारतो. त्याचे उत्तर होकारार्थी असेल, तरच मी तो प्रकल्प स्वीकारतो. तसेच मी कधीही ग्राहकांना भारंभार आश्वासने देत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच संपूर्ण व्यवहार पारदर्शी राहतो.” अनिरुद्ध रांजेकर आपल्या यशस्वी व्यावसायिक कारकिर्दीचे गमक सांगत होते.
कुटुंबाची साथ
अनिरुद्ध रांजेकर यांना व्यवसायात आपल्या कुटुंबाची भक्कम साथ आहे. अनिरुद्ध आणि त्यांचे वडील रवींद्र रांजेकर हे दोघे व्यावसायिक भागीदार म्हणून व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी बघतात. अनिरुद्ध यांच्या पत्नी आकांक्षा पेंडसे-रांजेकर या
पर्चेस विभागाची जबाबदारी सांभाळतात. तर त्यांची बहीण प्रियांका रांजेकर-जोशी या आर्किटेक्ट असून, घरांच्या इंटिरीअर डिझाईनचे काम त्या बघतात. कोणताही नवीन प्रकल्प साकारताना इंटिरीअरचा दृष्टिकोन प्रियांका यांच्यामुळे ग्राहकांना मिळतो. सारे कुटुंब हा व्यवसाय सांभाळत असल्याने ग्राहकांना समाधानकारक सेवा देणे सहज शक्य होते.
सामाजिक जाण
व्यावसायिक म्हणून कार्यरत असतानाच आपल्याला मिळणाऱ्या फायद्यातून काही भाग सामाजिक कार्यसाठी राखून ठेवला जातो आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमार्फत अनेक समाजाभिमुख कामे केली जातात. तसेच साहित्य आणि नाट्यक्षेत्राची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात देखील सहभागी होण्यातही त्यांना विशेष आनंद होतो.
प्रगतिपथावरील प्रकल
‘रांजेकर रिऑल्टी’तर्फे पौड रस्त्यावर पुण्याई सभागृहाजवळ ‘पुण्याई बिझनेस स्क्वेअर’ या सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळात साकारण्यात येणाऱ्या भव्य प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, मार्च २०२३ च्या दरम्यान त्याचे लाँचिंग करण्यात येणार आहे.
भुसारी कॉलनीत न्यू इंडिया शाळेजवळ एक एकर परिसरात प्रत्येकी ११ मजली दोन टॉवर्सच्या ‘वसुंधरा प्रकल्पा’चे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात २, २.५ आणि ३ बीएचकेचे एकूण ११० फ्लॅट्स असून, क्लब हाऊस, स्विमिंगपूल वर्क फ्रॉम होम स्पेसेससह सर्व अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचेही लाँचिंग मार्च २०२३ मध्ये करण्याचे नियोजन आहे.
कोथरूडमधील पुनर्विकासाचा एक मोक्याच्या जागेवरील प्रकल्प ठरेल असा पौड रस्त्यावरील श्रीमान हॉटेल समोरचा ११० फ्लॅट्सचा समावेश असलेला ‘उमाशंकर’ प्रकल्प. त्याचे काम ‘रांजेकर रिऑल्टी ’ला मिळाले असून, लवकरच त्याचे लाँचिंग नियोजित आहे. रामबाग कॉलनीतील ‘तीर्थ’ हा ९० फ्लॅट्सचा प्रकल्पही तीन महिन्यांच्या टेंडरिंग प्रक्रियेनंतर ‘रांजेकर रिऑल्टी’ला मिळाला आहे. याशिवाय मॉडेल कॉलनीत, तसेच सदाशिव पेठेत डाके क्लासेसच्यासमोर दोन नवीन प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. केवळपुनर्विकासाचा विचार करता ‘रांजेकर रिऑल्टी’तर्फे आतापर्यंत आठ प्रकल्प हस्तांतरित करण्यात आले आहेत, सहा प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे, तर नऊ नवीन प्रकल्प नव्या वर्षात सुरू होत आहेत. कोथरूडसह बाणेर, वारजे या उपनगरांत मिळून एकूण सात ते आठ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे नवीन प्रकल्प सुरू आहेत.