एका खासगी कंपनीत नोकरीसाठी मुलाखत सुरू होती. अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केलेला एक तरुण मुलाखतीसाठी खुर्चीवर बसला होता. मुलाखत घेणाऱ्याने विचारले, ‘हीनोकरी का करायची आहे? तो तरुण म्हणाला,स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी अनुभव पाहिजे म्हणून काही काळासाठी ही नोकरी करणार आहे. त्याचेस्पष्ट उत्तर ऐकून मुलाखत घेणारेच गोंधळले. त्यांनी त्या तरुणाला त्यांच्या वरिष्ठांकडे पाठवले. तेथेही या तरुणाने तितक्याच ठामपणेतेच उत्तर दिले. त्याचा आत्मविश्वास पाहून त्यांनी त्याला ती नोकरी दिली. नऊशेरुपयेपगाराची नोकरी त्या तरुणाला मिळाली. मात्र आज तो वर्षाला ११८ कोटी उलाढाल असणाऱ्या कंपनीचा मालक आहे. पश्चिम महाराष्राट्तील प्रमख निर्यातदार आहे. एक नोकरदार तेमालक हा यशस्वी उद्योजकाचा त्याचा प्रवास ‘मार्व्हलस’ म्हणजेच अद्भूत आहे.
संग्राम विष्णू पाटील हेत्यांचेनाव. हा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटातील कथेसारखा जरी वाटला तरी तो तितका सोपा आणि सरळ नाही. संग्राम यांनी आपल्या करत्तृ्वाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. अनेक संकटांवर मात करून उद्योग क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. सांगली जिल्ह्यातील कुंडल हे संग्राम पाटील यांचेमूळ गाव. लाड-पाटील हेत्यांचे गावातील आडनाव. या कुटुंबातील बाबूराव लाड हे स्वातंत्र्य सैनिक आणि सरकारचेसदस्य होते. औंध संस्थानचे महसूलमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचेपुत्र विष्णू पाटील हेप्रख्यात वालचंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे सिव्हिल इंजिनिअर होते.पुढेते शासकीय सेवेत रुजूझाले. संग्राम पाटील हे त्यांचे चिरंजीव. संग्राम यांचा जन्म १३ सप्टेंबर १९६५ मध्ये झाला. यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर आणि पुण्यात झाले. पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये तेहोते. त्यानंतर त्यांनी एम.आय.टी महाविद्यालयातून १९८७ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवून उत्तम गुण मिळवून घेतली. संग्राम यांचे आजोळ कोल्हापूर आहे. त्यांचेमामा मानसिंगराव जयसिंगराव जाधव हेएकदा संग्राम यांना म्हणाले, ‘आपल्या कष्टाचा उपयोग दुसऱ्यांना मोठे करण्यात झाला. पुढच्या पिढीने स्वतःहून मोठे झाले पाहिजे.’ त्यांचेहे वाक्य संग्राम यांना भावले. आपण उद्योजक व्हायचे हे त्यांनी ठरवले. शिक्षण झाल्यावर अनुभवासाठी काही काळ नोकरी केली. त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एम. आय. डी. सी.मध्ये एक प्लॉट घेऊन ठेवला होता. संग्राम यांनी १९९० साली स्वतःची मार्व्हलस इंजिनिअर्स प्रा.लि. ही कंपनी सुरू केली. त्यावेळी टाटा, महिंद्रा यांच्या सारख्या मोठ्या कंपन्या कास्टगिं विकत घ्यायच्या आणि मशिनिंगसाठी दुसरीकडे पाठवायच्या. त्यांना फिनिशिंग केलेल्या प्रॉडक्टची गरज होती. चाणाक्ष संग्राम पाटील यांनी हे ओळखलेआणि कास्टगिं मशिनिंग करण्याचेकाम सुरू केले. संग्राम यांचेकाम जरी स्थानिक स्वरूपात सुरू असलेतरी त्यांचा दृिष्टकोन व्यापक होता. जागतिक बाजारपेठेतील संधी ओळखूनत्यांनी १९९५-९६ पासून निर्यात करण्यास सुरुवात केली. त्यांनी इटलीमधील कंपन्यांना पुरवठा करण्यास प्रारंभ केला. काही वेळा त्यांना नुकसानही सहन करावेलागले. पण संकटांशी दोन हात करत त्यांनी निर्यात सुरू ठेवली. आज ते इटली सोबत फ्रान्स, ब्राझील, रशिया, चीन, रुमेनिया या दशे ांमधील कंपन्यांबरोबर व्यापार करत आहेत. त्यांच्या एकूण उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादने ते निर्यात करतात. संग्राम यांच्यातील व्यावसायिक कसब ओळखून इटली येथील विमरकट्टी यांनी स्वतःसाठी स्वतंत्र मशिन शॉप सुरू करण्याची मागणी केली. यासाठी व्यावसायिक भागिदारी करण्याची तयारीही दर्शवली. संग्राम यांनी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी एका परदेशी कंपनीबरोबर भागिदारी करून ‘मार्व्हलस मशिनिस्ट प्रा.लि.’ ही कंपनी सुरू केली. ही भागिदारी इतकी पारदर्शक आहेकी विमरकट्टी यांच्या निधनानंतरही त्यांची पुढची पिढी या कंपनीच्या माध्यमातून संग्राम यांच्याबरोबर व्यवसाय करत आहे. संग्राम यांच्या व्यावसायिक यशातील पुढचा टप्पा म्हणजे स्वतःची फौंड्री सुरू करणे. व्यवसायासाठी त्यांना कास्टगिं बाहेरून आणावेलागे. त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. इतरांवरचेहे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी ६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून २०१० मध्ये कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत ‘मार्व्हलस विमरकट्टी फौंड्री प्रा. लि.’ ही नवी कंपनी सुरू केली. यामुळेएकाच छताखाली सर्व गोष्टी होऊ लागल्याने संग्राम यांना व्यवसायात स्थिरता आली. आज त्यांच्या ‘मार्व्हलस इंजिनिअर्स प्रा. लि.’, ‘मार्व्हलस मशिनिस्ट प्रा. लि.’, ‘मार्व्हलस विमरकट्टी फौंड्री प्रा. लि.’ या तीन कंपन्या आहेत. यामध्ये सुमारे ५०० कामगार काम करतात. वाहन उद्योगासाठी लागणारे २७० प्रकारचे पार्टस्तेबनवतात. २०२१ साली संग्राम पाटील यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे ११८ कोटी इतकी आहे. पुढील वर्षभरात प्लाँट आणि यंत्रसामुग्रीमध्ये २० कोटींची गुंतवणूक त्यांच्याकडून केली जाणार आहे. त्या जोरावर २०२४-२५ पर्यंत मार्व्हलसची एकूण वार्षिक उलाढाल २०० कोटी करण्याचेउद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे.