ग्लोबल व्हिलेजमधील ग्रामीण औद्योगिकीकरणाचे शाश्‍वत मॉडेल : पयोद इंडस्ट्रीज

विकास...प्रगतीबाबत अर्थशास्त्रात गुरुत्वाकषरणाचा सिद्धांत माडला जातो. विकास वरून खाली पाझरत पसरतो; मात्र विकासाच्या सधी तळागाळात झाल्या तरच तो विकास अधिक शाश्‍वत ठरतो. समन्यायी ठरतो. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या, उद्योगाच्या संधीच्या या वाटा ग्रामीण भागात तयार झाल्या तर शहरीकरणाच्या भविष्यातील अनेक समस्यांचा प्रतिबंध ठरू शकतो. या विचाराचे मॉडेल म्हणून पयोद इंडस्टीजचा उल्लेख करावा लागेल. सागली जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या कवठेमहाकाळ तालुक्यातील हिंगणगाव जगाच्या नकाशावर आले ते पयोद इंडस्टीजचामुळे; एका जिद्दी, धडपड्या तरुणाच्या करत्तृ्वामुळे. देवानंद लोंढे असे त्या ‘मॅजिक मॅन’चे नाव. पयोद म्हणजे पाणी घेऊन आलेला एक ढग. दुष्काळी भागासाठी या ढगाच महत्व वेगळच. पयोद इंडस्टीजचाम्हणजे या दुष्काळी भागासाठी समृद्धी घेऊन येणारा ढग ठरावा हेच ध्येय... पयोदची वाटचाल हे जागतिकीकरणाच्या वर्तमानातील ग्रामीण महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचे यशस्वी मॉडेल ठरावे असेच आहे..

गरिबीतून वाटचाल

दुष्काळी भागातील कष्टकरी, मजूर कुटुंबातून आलेले देवानंद लोंढे आज यशोशिखरावर आहेत; मात्र त्या आधी त्यांनी पराकोटीचे अपयश पाहिले आहे. मात्र न खचता पुन्हा नव्या उमेदीने ते भरारी घेत राहिले. या संकटप्रप्रसंगाट त्याचा मागे ठामपणे उभ्या राहिल्या त्या अर्धगिांनी स्नेहल. देवानंद यांचेचे बालपण हलाखीत गेले. सैन्यातून यातून निवृत्त वडिलाना अवघी ८० रुपये पेन्शन होती. आईसह रोज एकाच्या बाधावर मजुरीला जाऊन गुजराण करण्याशिवाय या कुटुंबाला पर्याय नव्हता. शनिवार-रविवारसह इतर सुटीदिवशी शेळ्या राखण्याचे काम देवानंद लोंढे करीत. हा सारा काळ शिकण्याचा होता, अनुभवाचे धडे देणारा होता, असं श्री लोंढे आवर्जून सागतात.

…अन् ठिणगी पेटली…

कवठेमहाकाळला साखर कारखाना सुरू झाला. सैनिकी पार्श्वभूमी असल्याने वडिलाना रोज ७ रुपये पगाराची नोकरी मिळाली. चागल्या मित्रांच्या सगतीमुळे दहावी झाली. आधीच्या बॅचची बरीचशी मुले चागले गुण  मिळाल्यामुळे इंजिनिअरिंगला गेल्याने लोंढेही त्याच मार्गाने गेले. पदवीनतर नोकरीसाठी वडील ज्या कारखान्यात होते, त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे गेले. मर्जीतील मुलाला घेण्यात आले. तेंव्हाच लोंढे यानी निश्चय केला की, या पुढे राजकीय व्यक्तीकडे नोकरी मागायची नाही. करायचे ते स्वतःच्या हिंमतीवर. बाधकाम व्यावसायिकाकडे अकुशल काम करणाऱ्यावर देखरेख करण्याचे काम मिळाले. गाढवे हाकण्याचे काम मिळाले, असं मित्र हिणवायचे. ही गोष्ट त्यांना खटकली. शिक्षण योग्यतेनुसार काम मिळावे म्हणून मित्रांच्या ओळखीने त्यांनी पुणे गाठले. सर्व्हेचे काम मिळाले. वसई-विरारला जागतिक बॅंकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या टोपोग्राफी सर्व्हेचे काम केले. ते इतके चागले झाले, की टाटा कन्सलटन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची प्रशसा केली. इंगीनीरिंग केल्याचे सार्थक झाले. हा क्षण नवी उमेद देणारा, स्वतःला सिद्ध करणारा होता.

आंतरराष्ट्रीय एनजीओ सोबत काम

आपत्ती निवारणासाठी देशातंर्गत, परदेशातील नैसर्गिक किवा मानवनिर्मित आपत्तींचा अभ्यास सुरू झाला. कारगिल यद्धातील स्थलातंरित लोकाचे पुनर्वसन असो किवा त्सुनामी, गुजरात भूकंप किवा आसाम, बिहार, बगाल ते बागलादेशातील महापूर अशा प्रकारच्या आपत्तींतून सावरण्याचा वस्तुपाठ मिळाला. आतरराष्ट्रीय पातळीवर मनुष्यनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण झाले. अफगाणिस्तान ते आफ्रिकन महापूर, रेफुजी कँप, दुष्काळ, भूकबळी अशा आपत्ती निवारण कार्यक्रमात त्यांना युसेड (USAID), यनिु सेफ (UNICEF), ऑक्सफॅम (Oxfam) अशा आतरराष्ट्रीय स्तरावरील एनजीओंसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी आला.

मुळांकडे धाव….

ज्या भागातून आलो त्या भागातही काही बदल घडवण्याचा विचार मनात घर करून होता. रोजगारासाठी दरवर्षी स्थलातर. शहराकडे पुरुष आणि गावाकडे महिला. दुष्काळी भागातील महिलासाठी काही करू शकतो का, असा विचार यायचा. आशा घेऊन येणारा तो ढग म्हणजेच ‘पयोद’. रोजगाराच्या रूपाने या भागात तो यावा. २००८ मध्ये अमेरिकन सरकारच्या आतरराष्ट्रीय विकास निधी सस्थेसोबतची साथ सोडली. महिलाना घरबसल्या रोजगार देण्याचा विचार घेऊनच ते गावी परतले. पयोदची स्थापना केली. तीच पयोद इंडस्टीज. गावातच एक बंद सूत गिरणी होती. सोयीसुविधा असलेली दोन एकर एनए जागा विकत घेतली. शेतमजूर ते कारखान्याचे मालक या वडिलाच्या प्रवासातील हा मोठा टप्पा होता. इमारत घेतली तेव्हा लोकानी वेड्यात काढले, इथे करायचे काय हे ठरले नव्हते.

जे करायचे ते उत्तम

देवानंद यानी ‘पयोद’चा संकल्प सोडताना उद्दिष्टे मनाशी ठरवली होती. जे उत्पादन बनवू त्याला जास्तीत जास्त मागणी हवी. जास्तीत जास्त महिलाना रोजगार देता आला पाहिजे. जे उत्पादन बनवू ते पर्यावरणपूरक असावे. उत्पादन असे असावे ज्याला परदेशातही मागणी असावी. गावात बसूनही परदेशी चलन कमावता येईल. खेड्यात बसूनही परदेशी चलन कमवता येते, तरुणाना हा एक संदेश देता येईल. कोणाच्या तरी उपजीविका सुरक्षित करतील. ज्याकडे बघताच एक सामाजिक सदेश जावा- आपली सामाजिक, आर्थिक पत निर्माण होण्याकरिता कोणीतरी हात देत आहे. या विचारातून पर्याय आला हातमोजे (हॅंडग्लोव्हज्) चा पर्याय.

चीनची भेट

पर्यावरणपूरक निकषात बसणाऱ्या ग्लोव्हजची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे सुरू केले. हा प्रॉडक्ट छोटा. आपल्याकडे तो कोणी करीत नाहीत. हे प्रॉडक्ट चायनीज कंपन्या बनवत. मग माहिती घेण्यासाठी चायनीज कंपन्यांना भेट देण्याचे ठरले. चीनमध् काही कंपन् ये यांना भेटीही दिल्या. काहीमध् काम करण्यासाठी होकार मिळाला. माहिती चुकीची दिली गेल्याने समाधान झाले नाही. पुढे काय, हा मोठा प्रश्न होता. एक शिलाई मशिन मार्केटमधून खरेदी केले. जमेल तसे मशिन, प्रॉडक्टची माहिती करून घेतली. प्रॉडक्ट मार्केटमधील ग्लोव्हजशी जोडून पाहिले. अर्धवट ज्ञान घेऊन आणि अजून एक मशिन विकत घेऊन त्यासह गावाकडचा प्रवास सुरू झाला.

प्रशिक्षणापासून श्रीगणेशा

खऱ्या व्यावसायिक कामास सुरवात झाली. दोन मशिनवर प्रशिक्षणास सुरवात होताच दोन महिला प्रशिक्षणाला पहिल्यांदाच आल्या. एक होती विधवा आणि दुसरी परित्यक्‍ता. या दोघींना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यासोबत इतर महिलाना जोडण्यास सुरवात झाली. परदेशातून हे जोडप भरपूर पैसे घेऊन आले आहे, असे म्हणून जास्तीच्या रोजदारीची मागणी, येण्या-जाण्यासाठी गाडीची व्यवस्था अशा मागण्या वाढतच चालल्या. दोन तासाच्ं या प्रशिक्षणासाठी १०० रुपये आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था असल्याने संख्या वाढू लागली. मग आणखी १० मशिन्स मागवल्या. प्रशिक्षण जोमात चालू होते; पण जमलेली पुजी संपत चालली होती. मग सुरवातीला पत्नी स्नेहलचे दागिने, मग पुन्हा आईच दागिनेही विकावे लागले.

जपानची पहिली ऑरर्ड…

एकदा का जपानबरोबर काम सुरू केले तर गुणवत्ता हा विषयही निकाली निघेल. म्हणून जपानला उत्पादन पाठवले. पण निर्यातदाराकडून सर्व सॅम्पल्स कचऱ्याच्या कुंडीत टाकल्याचा मेल आला. हे वाचून पायाखालची जमीन सरकली. मग टेक्सटाईल डिझाईन इन्स्टिट्टमधून आणि गारमेंट इंडस्टीजमध्ये काम करणार्य लोकाना नियक्तु केले. योगय काळजी घेत पुन्हा सॅम्पल बनवून पाठवली गेली. सुदैवाने पहिली ४०० डझन ग्लोव्हज् जोडीची ऑर्डर मिळाली.

४ तालुके, २५ गावे, ५०० महिला

ग्रामीण भागातून जपानमध्येयेणाऱ्या भारतीय हँडग्लोव्हजची कंपनी पाहण्यासाठी मग JICCA ची टीम, नवीन खरेदीदार कंपनीला भेट देण्यास येऊ लागले. उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची गरज भास लागली. ज्या पूर्ण प्रशिक्षित महिला होत्या, त्यांना संधी दिली. तुमच्य घरूनच काम केले तर कंपनीकडे येण्याचा वेळ वाचेल, प्रवासाचे पैसेही वाचतील. सोयीनुसार काम करता येईल. पण काही अटी घातल्या. जर मशीन घरी दिली तर त्यासाठी वीज पाहिजे. पुरेशा जागेसह घरी धूर, धूळविरहित परिसर पाहिजे. ज्यांच्याकडे या सोयी होत्या त्या महिला घरी मशीन घेऊन जाण्यास तयार झाल्या. व्यवस्था नसणाऱ्यांना काही अटींवर विजेची सोय, गॅस, फरशीची व्यवस्था कंपनीने करून दिली. प्रत्येक घरात वीज, गॅस सुविधा आधीच पोहोचल्या. अशी घरे आता उत्पादन केंद्रे झाली आहेत. स्वतःचे काम करत शेजारीण, शिकणाऱ्य मुली तसेच गरजूंना कौशल्य प्रशिक्षण देऊ लागली. बघता बघता चार तालुके आणि २५ गावे आणि ५०० महिलांपर्यंत कामाच्या रुपान ‘पयोद’चा विस्तार पोहोचला.

आत्मनिर्भर नारीशक्त

ज्यांना काम करावयाचे आहे पण सुविधा नाही, छोटे घर आहे, त्यांना इंदिरा आवास, रमाबाई आवास, प्रधानमंत्री आवासशी जोडले गेले. जनधन योजनेतून महिलांची बॅंक खाती उघडण्यात आली. सुकन्या, जीवन ज्योती, जीवन सुरक्षा, अशा शासनाच्या योजनांशी महिला जोडल्या गेल्या आहेत. तालुक्यात ‘पयोद’ परिवाराची सदस्य म्हणून वेगळी पत तयार झाली. कंपनीमध्येयेताना स्वतःचे वेगळे पाणी घेऊन येणाऱ्या, जातीपातीची चर्चा करणाऱ्या, भेदभाव मानणाऱ्य आता एक परिवार बनू लागल्या. या सर्व महिलांच्या नोंदणीकृत कंपन्य तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या उद्योग विभागान हँडग्लोज अँड सॉक्स औद्योगिक क्लस्टर घोषित केले आहे. दुष्काळी तालुक्यातील १ हजार महिला उद्योजिका निर्माण करण्याचे उद्दिष्ट ‘पयोद’ परिवाराचे आहे. हर प्रकारचे, हर तऱ्हेचे हँडग्लोव्हज येथे बनवले जातील. हँडग्लोज म्युझियम बनवण्याचा मानस लोंढे दांपत्याने केला आहे. महिला आता नोकरी देणाऱ्या झाल्या. त्यांची वाटचाल ‘नारी ते नारायणी’ अशी सुरू आहे.

यशाबरोबरच कौतुकाची थाप…

अपार संघशातून उभारलेल्या कामाची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय वृत्तपत्रे, मॅगेझिनने, अगदी फोर्ब्ज, वॉशिंग्टन पोस्टनी ‘पयोद’च्या कार्याची दखल घेतली आहे. आतरराष्ट्रीय संकल्प (सामाजिक उद्योजकता) फोरमच्या सेमी फायनलिस्ट असून १ हजार प्रोजेक्टमधून पहिल्या ७ मध्ये ‘पयोद’ आहे. विविध शासकीय विभाग, वित्तीय संस्था नाबार्ड, मीडिया हाऊसकडून दिले जाणारे पुरस्कार कामाची पोचपावती ठरले आहेत. यावर्षीचा झी यवुा सन्मान, आयबीएन लोकमत प्रेरणा पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले आहेत.

टाटांचा परिसस्पर्श

देवानंद लोंढे यांची उद्योगपती रतन टाटा यांच्याशी भेट म्हणज परिसस्पर्श ठरली. त्यांच्याबरोबरचे हस्तांदोलन हा सर्वांत मोठा पुरस्कार ते मानतात. आज टाटा समूहाच्या १५ कंपन्यांबरोबर ‘पयोद’ जोडले आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत जपान दौऱ्यादरम्यान कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरणप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेल हॅण्डग्लोव्हज पयोदचे होते. देवानंद यांच्यासाठी तो समाधानाचा क्षण होता. या मातीतल्या लोकांच्या हातून तयार झालेले हॅण्डग्लोव्हज निर्यात केल्यानंतर सातासमुद्रापार आपल्याच मुख्यमंत्र्यांनी घालावेत. एका परदेशी कार्यक्रमातील हा क्षण हिंगणगाव पंचक्रोशीसाठीही अभिमानास्पद होता.

जापनीज आले हिंगणगावच्या माळावर…

मोठ्या ऑर्डरची वाट पाहणे सुरूच होते. आणि एक दिवस जापनीज खरेदीदाराचा फोन आला. मेलही आला. कंपनी आणि सेटअप पाहणार असल्याचे कळवले. मग पुन्हा तयारी. जापनीज हिगंणगावच्या माळावर आले. त्यांनी कंपनी, सेटअप आणि उद्देश बघून तब्बल २४ हजार डझन ग्लोव्हजची पहिलीच ऑर्डर दिली. पाठवलेले ४०० डझन ग्लोव्हज त्या गुणवत्तेचे बनवले होते. गुणवत्तेचे तर प्रमाणपत्र मिळालेच; पण मोठ्या संख्येच्या ऑर्डरमुळे ६० दिवसांत द्यावयाच्या कंटेनरला सहा महिने लागले. सुदैवाने डेबिट पडले नाही. कारण भारतातून पहिल्यांदाच हे उत्पादन जपानमध्ये जात होते. धनत्रयोदशीला पहिला कंटेनर अगदी वाजत-गाजत गावाच्या वेशीतून जपानकडे रवाना झाला.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

ग्रामीण भागातील उपेक्षित तसेच कौशल्य अगी असलेल्या महिलाना घरबसल्या रोजगाराची सधी देऊन लोंढे दापत्याने त्यांच्या आयुष्यात बहार आणली आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट आहे. ग्रामीण भागाला त्यांच्यारुपाने एक परिस गवसला आहे.

– शेखर गायकवाड,
साखर आयक्तु , महाराष्ट

लोंढे दापत्याने मायभूमीचे पाग फेडण्यासाठी लावलेला हा उद्योगरुपी वेल आज गगनावरी गेल्याचा सार्थ अभिमान आहे. उच्चशिक्षित असूनही प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत कष्ट, मेहनतीने उभारलेला हा प्रकल्प नव उद्योजकाना प्रेरणादायी आहे.

– पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे,
सस्थापक -चेअरमन (DICCI)

स्वतः ची क्षमता समाजात मेहनतीने सिध्द करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे देवानद लोंढे होय. आपल्या नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु असतो. सकुंचित वृत्तीने न राहता आपल्या सोबत सर्वांचे भले व्हावे, हा त्यांचा दृष्टिकोन उमद्य स्वभावाचे दर्शन घडवणारा आहे.

– विठ्ठल कामत,
चेअरमन, विठ्ठल कामत आणि आर्चिड हॉटेल.

शब्द देताना विचारपूर्वक देऊन त्या शब्दाला जागणारे लोंढे दापत्य आहे. सुखासीन नोकरी व छानछोकी आयुष्य जगणे शक्य असताना काहीतरी नवे घडवण्याची उमेद घेऊन त्यांचा प्रवास सुरु झाला. तो अनत काळ सुरु राहावा, त्यातून नवनिर्माण व्हावे, याच सदिच्छा.

– मयूर व्होरा,
चेअरमन, मॅप्रो/p>

देवानद व अश्विनी याच्ं या १९९२ सालापासूनच्या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत. पाणी, आपत्ती व्यवस्थापन विषयावर त्यांनी केलेले काम आदर्शवत आहे. त्यानतर उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली झेप थक्क करणारी आहे. सातासमुद्रापार जाताना त्यांनी जपलेले समाजभान आज दुर्मिळ आहे. महिलामध्ये उद्योजकता निर्माण करुन त्यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरुप दिले आहे.

– प्रसाद सेवेकरी,
आतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सल्लागार

कापूस न पिकणाऱ्या ग्रामीण भागात कॉटेज इडस्ट्री सुरु करुन ती गुणवत्तापूर्णा चालवण्याचे काम लोंढे दापत्याने केले आहे. तळागाळातील गोरगरीब जनतेला यानिमित्ताने आत्मनिर्भर होता आले. इतरापेंक्षा वेगळे क्षेत्र निवडून त्यात नाव कमावण्याचे कौशल्य त्यांनी साधले आहे.

– डॉ. संजय बेलसरे,
मुख्य अभियंता, जलसपदा विभाग, नाशिक

दुसरी पिढी कायर्रत

देवानंद लोंढे यांचे चिरंजीव पयोद एम.आय.टी. पुणे येथून पॉलिमर इंजिनिअरिंग करत आहेत. पदवीचे शेवटचंवर्ष संपण्यापूर्वी तो हि या उद्योग जगतात पाऊल ठेवत आहे. पयोद व त्याचे मित्र मिळून स्वतःचा प्लास्टिकचे उत्पादन करणारा उद्योग पुढील वर्षाअखेरीस उभा करत आहेत. मेंढ्यांच्या लोकरवर देखील अभ्यास चालू आहे. लोकर व अन्य हाय परफॉर्मन्स पॉलिमर फायबर्सह्यांचे मिश्रण करून त्याचे उत्पादन हे थंड भागात सेवा देणाऱ्या सैनिकांसाठी वापरण्याचा मानस आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याची तयारी तो करत आहे. तो वेगवेगळ्या कंपन्यांना भेट देत आहे. सॅमसोनाइट ह्या कंपनीचे ग्लोबल सी.ई.ओ रमेशजी टेंनीवाला मार्गदर्शन करत आहेत.

हॅंडग्लोव्हज् क्लस्टर

ग्रामीण महिला आतरराष्ट्रीय दर्जाचे प्रॉडक्ट बनवायला शिकल्या. स्वयंरोजगाराबरोबर नवं उद्योजकाना आत्मनिर्भर करण्याच्या उद्शाने त्यांनी पाऊल पुढे टाकावयास हवे, असे मत लोंढे यानी व्यक्त केले. त्यांच्याकडे काम करणाऱ्या १०० महिलाची “ग्रामीण पर्सनल प्रोटेक्‍टिव्ह ॲण्ड हायजिन प्रॉडक्ट फाऊंडेशन” ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. औद्योगिक विकास समूह (MSI- CDP) योजनेंतर्गत १०० महिलाच्ं या स्वत:च्या मालकीच्या कंपन्या उभ्या रहात आहेत. महिलाना आंर्थिक सक्षमतेकडे नेण्याचे काम भविष्यात ह्या सर्व महिला उद्योजक करतील असा विश्वास त्यांना वाटतो. त्यासाठीच कंपनीची टॅग लाईन “The Leader Of Village” अशी आहे. एका महिला उद्योजक कंपनीने १० लोकाना रोजगार उपलब्ध करून दिला तर भविष्यात १००० रोजगार निर्मिती होईल. त्यातील १० महिला उद्योजकाचे कवठेमहाकाळ MIDC मधे टेरी् टॉवेल्स, Stand Up India योजनेतून एका महिला उद्योजिकेचे सर्जिकल कॉटनचे निर्मितीचे यनिुट उभे रहात आहे. सागली जिल्ह्यातील सर्व नवं उद्योजकाना प्रोत्साहन, मार्गदर्शन, R&D साठी Rural Industrial Incubation Center उभारण्याची सकल्पना आहे.

‘ब्ल्यू व्हिलेज’ संकल्पना

सेंटर फॉर अक्वेटिक लायव्हलीहूड (जलजीविका) आणि एस. एन. रास. प्रा. लि.(पयोद ची सलंग्न संस्था) या संस्था मत्स्य उत्पादन वाढ, उपजीविका यावर अभ्यास करत आहे. ग्रामीण उद्योजकता वाढीसाठी प्रयत्नात आहे. आरएएस (रिर्सक्युलेट अक्वाकल्चर सिस्टिम) या आधुनिक तंत्रज्ञानाने कमी जागेत, घराच्या स्लॅबवरही मत्स्य उत्पादन घेता येते. वाहतुकीसाठी नीलवाहन, तर मत्स्यविक्रीसाठी कंटेनर मॉडेल तयार केले असून जिवंत मासे विक्रीसाठी ठेवण्याची व्यवस्था होते. याला पेटंट मिळाले आहे. ‘अक्वेरीया २०१९’ हैदराबाद प्रदर्शनात पुरस्कार मिळाला असून बायोटेक्नॉलॉजी मंत्रालयाकडून बेस्ट स्टार्टअप अवॉर्डमिळाल आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा, राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्डयांनीही मान्यता दिली असून या अंतर्गत सबसिडीही मिळू शकते. २० मागासवर्गीय तरुणांचे प्रकल्प उभे रहात आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून अनुदानही उपलब्ध होणार आहे. हिंगणगाव राष्ट्रीय नीलक्रांती अभियानांतर्गत ‘ब्ल्यूव्हिलेज’ करण्याचा ‘पयोद’चा मानस आहे. होतकरू तरुणांसाठी अक्वा उपजीविका कौशल्य स्कूल व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.

ऑफिस / फॅक्टरी – मु.पो. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली. महाराष्ट्र ४१६४०५,

संपर्क – ९८२२१९१२३३, ८८०५८५७५६६,

ई- मेल : payodindustries@yahoo.com, devanandlondhe@gmail.com,

वेबसाईट – www.payodindustries.com

English