‘शुअर सक्सेस’ हाच मूलमंत्र

साखर, वीज व इथेनॉल निर्मिती तंत्रज्ञानात एस. एस. इंजिनियर्सची दमदार वाटचाल

एस. एस. इंजिनियर्स. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या भोसरी एमआयडीसीतील नावाजलेली कंपनी. अवघ्या ३३ वर्षात जागतिक स्तरावर पोहचलेलं विश्‍वसनीय नाव. कंपनीच्या नावातच यशाचे गमक आहे, ते म्हणजे ‘एसएस’ अर्थात ‘शुअर सक्सेस’. मग, तो साखर उद्योग असो की वीजनिर्मिती प्रकल्प. त्यासाठी लागणाऱ्य तंत्रज्ञानात खात्रीशीरपणे यश संपादन करणारी कंपनी, असा लौकिक आहे. इतकेच नव्हे तर, ‘शुअर सक्सेस’ हाच कंपनीचा मूलमंत्र आहे. त्यावर टाकलेला प्रकाशझोत…

‘एसएस’ची झेप

३९

साखर कारखान्यांची उभारणी

२७०

मिल्स

१०७

बॉयलर्स

३९

सहवीजनिर्मिती
प्रकल्प

३००

ग्राहक कारखाने
(पेक्षा अधिक)

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर १० मध्ये एस. एस. इंजिनियर्स कंपनी आहे. तिचे संस्थापक शहाजीराव भड. त्यांच्याशी संवाद साधताना अतिशय मधूर शब्द कानावर पडतात. जणूकाही साखर कारखाना उभारता उभारता त्या उसाचा नि साखरेचा गोडवाच त्यांच्या शब्दांत व स्वभावात उतरलेला आहे, याची जाणीव ऐकणाऱ्याला होते. अर्थात, याला कारणही तसेच आहे, तेम्हणजेगाव सोडून ४०-४५ वर्ष झालेतरी, गावाच्या मातीशी घट्ट जोडलेली नाळ.

गौडगाव ते भोसरी

बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) तीन-साडेतीन हजार लोकवस्तीचं गौडगाव हे शहाजीराव भड यांचं मूळगाव. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. वडिलोपार्जित शेती बेताचीच. त्यातही नेहमीच दुष्काळी भाग. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी सतत दोन हात करणे नशिबी आले. पण, त्या विरुद्ध लढण्याचे बळही तिथचे मिळाले. शेताच्या बांधावरून, शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक खाचखडगे तूडवत साखर उद्योग व सहवीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लोबल तंत्रज्ञानापर्यंत पोहचला आहे. त्यांच्या या यशाचा आलेख तरुणाईपुढे मांडताना थोडा इतिहासही पहावा लागणार आहे. कारण, शहाजीराव यांचे प्राथमिक शिक्षण गौडगावातच झाले. जुनी अकरावी अर्थात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. पुणेशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगलेगुण असल्यानेनोकरीचा प्रश्‍न सुटला होता.

अनुभवांची शिदोरी

इंजिनिअरची पदवी मिळाल्यानंतर वालचंदनगर इंडस्ट्जरि मध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून शहाजीराव रुजूझाले. तिथे साधारण पाच वर्ष काम केले. त्यानंतर जे. पी. मुखर्जी ॲंड असोसिएटमध्ये सल्लागार म्हणून पाच वर्ष काम केले. डिझाईन इंजिनिअर व सल्लागार हा दहा वर्षांचा कालखंड त्यांच्यासाठी जगाकड डोळसपणेपहायला शिकवणारा ठरला. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली. काही वर्षेउद्योगांना तांत्रिक सल्ला दिल्यानंतर ते प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रात उतरले. अंगभूत संशोधक वृत्ती, सतत नवनव्या कल्पनांचापुरस्कार आणि त्या तडीस नेण्यासाठीची जबरदस्त इच्छाशक्ती, तिला सचोटी आणि दूरदृष्टीची जोड या गुणांचा समुच्चय म्हणजेच शहाजीराव होत. अंगभूत गुण व अनुभवांची शिदोरी या जोरावरच,एक खेड्यातलं शेतकरी कुटुंबातलं पोरगंते जागतिक स्तरावरस्वतंत्र ओळख असलेल्या कंपनीचे निर्माते अशी त्यांची यशस्वी वाटचाल झाली आहे.

कंपनीची उभारणी

भोसरी एमआयडीसीत एस. एस. इंजिनियर्स नावाने शहाजीराव यांनी १९८७ मध्ये स्वतःचा कारखाना उभारायला सुरुवात केली. १९८८ च्या पहाटे अर्थात जानेवारीत त्यांचेकाम सुरू झाले. ‘शुअर सक्सेस’ म्हणजेच ‘नेहमीच यशाची खात्री’ हाच मूलमंत्र त्यांनी स्विकारला होता. त्यांचे उद्योग क्षेत्रातील पाऊलच मुळात यशाची पूर्ण खात्री बाळगणारे आत्मविश्‍वासपूर्ण होते. त्यामुळेच त्यांनी कंपनीचे नावही ‘शुअर सक्सेस’ म्हणजेच ‘एस. एस. इंजिनियर्स’ निश्‍चित केले. अवघ्या २० कामगारांना सोबत घेऊन त्यांनी उद्योगाची वाटचाल सुरू केली. हळूहळू कंपनीचा विस्तार होत गेला. पर्यायाने कामगारांची संख्याही वाढत गेली. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मोठी यत्रे बनविण्यास सुरवात केली. गेल्या तीन दशकात कंपनीने‘ साखर कारखान्यांच्या मशिनरी आणि वीज निर्मिती प्रकल्पाचेपरिपूर्ण सोल्शन’ यू असा लौकिक मिळवला आहे.

‘आर ॲंड डी’ स्थायीभाव

स्वातंत्र्यपूर्व काळात वालचंद समूहाने देशातील खासगी साखर कारखानदारीचा पाया घातला. याच परिसरात उद्योगाचे बाळकडू घेतलेल्या शहाजीरावांनी जगाच्या साखर उद्योगाला व वीजनिर्मितीला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले. उद्योगाचा व्याप वाढवत नेला. त्यामध्ये शंभर अभियंत्यांसह पाचशेपेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत. शहाजीरावांचा हा सारा प्रवास काळाचे भान सतत ठेवत चालणाऱ्या, सतत आव्हाने पेलणाऱ्या सेनापतीचा आहे. इतकेच नव्हे तर, ‘रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट’ हाच त्यांचा स्थायीभाव आहे. याच जोरावर अल्पावधीत त्यांनी घेतलेली भरारी केवळ त्यांच्या तांत्रिक ज्ञानामुळे शक्य झाली आहे. कारण, ज्ञान तांत्रिक असो की कमर्शिअल, दोन्ही क्षेत्राचा स्वतःला अनुभव असल्याने ते त्वरीत निर्णय घेत गेले. यामुळे अवघ्या काही वर्षात लहान स्पेअर पार्टस ते संपूर्ण कारखाना निर्मितीपर्यंतचा प्रवास शक्य झाला. अतिशय अल्प कालावधीतील ही वाटचाल खरोखरच थक्क करणारी आहे.

प्रत्यक्ष अनुभवातून वाटचाल

साखर उद्योगातील प्रत्कये यांत्रिकी निर्मितीबाबतचेपरिपूर्ण ज्ञान शहाजीरावांनी फिल्डवर उतरून घेतले आहे. म्हणजेच आधी स्वतः काम केले आणि नंतर इतरांकडून करून घेतले. त्यामुळेच नवे तंत्र व वास्तव यांचा मेळ जमून आला आहे. त्यातूनच त्यांनी साखर कारखान्याच्या वेगवेगळ्या विभागात तांत्रिक उभारणीत हातखंडा मिळवला आहे. यामध्ये मिल, बॉयलर, टर्बाइन, प्रोसेस इक्विपमेंटस् डिस्टिलरी आदी तांत्रिक बाबींचा समावेश आहे. आजवर त्यांनी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत ३९ साखर कारखान्यांची उभारणी केली आहे. तीनशेहून अधिक कारखान्यांच्या उभारणीत त्यांचे योगदान राहिले आहे. माणूस व यंत्र यामध्ये परस्पर मूक संवाद असतो, हा फिडबॅक ते सतत घेत असतात. त्यातूनच नेहमी डेव्हलपमेंटच्या भूमिकेत असतात. ते स्वतःलाच स्वतःचे स्पर्धक मानतात. त्यामुळेच आपल्या कंपनीच्या मशिनरीपासून जास्तीत जास्त कार्यक्षमता कशी मिळवता येईल, यासाठी निरंतर संशोधन सुरू असते. त्यांनी अनेक प्रकारच डिेझाईन बनवले आहेत. शिवाय, जगभरातील साखर कारखानदारीचे ‘अपडेट’ त्यांच्याकडे असतात. हेच व्हॅल्यू तेपुढच्या पिढीलाही शिकवत आहेत.

जागतिक पातळीवर ठसा

साखर कारखानदारीतील अनेक मोठे प्रकल्प ‘एसएस’ने उभारले. नफेखोरीचा दृष्टिकोन न ठेवता प्रसंगी अनेक वेळा स्वतःचे नुकसान सहन केले.पण, मशिनरीची उभारणी पूर्ण करून दिली. ‘एसएस’ची गुणवत्त माहिती असल्यामुळेच कारखान्यांचे संचालक वा प्रशासन पुन्हा पुन्हा त्यांनाच ऑर्डर देत आहेत. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर त्यांचा भर राहिला आहे.पैशापेक्षा दिलेल्या मशिनरीचा रिझल्ट व पाळलेल्या शब्दाचा आनंद त्यांना महत्त्वाचा वाटतो. आज साखर उद्योगातील सर्व मशिनरी यनिटचे उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी असे स्थान ‘एसएस’ने प्राप्त केले आहे. साखर उद्योग व वीजनिर्मिती क्षेत्रातील विश्‍वासार्हता कंपनीने प्राप्त केली आहे. ‘एसएस’ची वाटचाल आता ग्लोबल होत आहे. आज जगातील साखर कारखानदारीत ‘एसएस’ने दमदार ठसा उमटवलेला आहे, यात संदेह नाही.

संशोधन आणि विकास

कंपनीकडे ५० कॅड इंजिनियसची टीम सज्ज आहे. जगात वेगान होत असलेल्या तंत्रज्ञानातील बदलावर व सुधारणांवर ती लक्ष ठेवून असते. संशोधन व विकास या गोष्टींचा आधार घेऊन मशिनरीमध्ये वेळोवेळी सुधारणा घडवून आणल्या आहेत. कामाची उत्कृष्ट पात्रता असल्यामुळे एस.एस. इंजिनियर्सला भरपूर ऑर्डर आहेत.

महाराष्ट्रात माळे गावचा उच्चांकी दर

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे को-जनरेशन मे. एस. एस. इंजिनियर्सने के ले आहे. २०११-१२ या एकाच हंगामात कारखान्याने ४० कोटी रुपयांची वीज निर्मिती के ली. त्यामुळे त्यांना कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उसाला प्रतिटन २३७५ रुपये असा उच्चांकी भाव देता आला. मा. शरद पवार यांचे मार्गदर्शन या कारखान्याला लाभले, ज्यामुळे को-जनरेशन क्षेत्रात कारखान्याला आघाडीचे स्थान प्राप्त झाले आणि तो इतर कारखान्यांनाही प्रेरणादायी ठरला. त्याबद्दल तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते शहाजीराव भड यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व राज्य बॅंकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील उपस्थित होते.

सर्व क्षेत्रात निष्णात

कंपनी इंडस्ट्रियल बॉयलर, सहवीजनिर्मिती प्रकल्प, विस्तार आणि अत्याधुनिकरण, डिफ्जर्स, केनयुमिलिंग प्टलॅंस्, सट्रिें ट्रिफ्गल मशिन्स, इलेयुक्ट्रिकल व ऑटोमेशन या क्षेत्रात निष्णात आहे. संपूर्ण कारखाना उभारणीसाठीचे डिझाईन उत्पादन, पुरवठा व उभारणी करते.

विक्रमांची हॅट्ट्रीक

  • सन २००२-०३ मध्ये पाच ‘ट ये र्नकि’ साखर कारखाना उभारणी
  • सन २००४-०५ मध्ये बजाज हिंदस्थान कंपनीचे १० हजार मेट्रिक क्षमतेचे तीन कारखाने उभारणी
  • सन २०१४-१५ मध् पाच कारखाने उभारणी

साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन व प्रकल्प उभारणीतील कौशल्याबद्दल नवी दिल्ली येथील दि शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे शहाजीराव भड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.

डिप्युझन आणि इथेनॉल प्रकल्पाबाबत शहाजीराव भड यांच्यासोबत चर्चा करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी साहेब. शेजारी विद्याधर अनास्कर साहेब व अभिषेक डोळे साहेब.

मालेगाव सहकारी साखर कारखाना येथे सहवीजनिर्मितीचा ‘बेस् को-जनरेशन परफार्मन्स ॲवार्ड’ तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते स्विकारताना शहाजीराव भड.

सन २०१०-११ मध्ये सोलापूर येथील सिद्धनाथ शुगर फॅक्टरीने ३० x ६० मिलवरती चाचणी गळीत हंगामात पाच लाख टन साखरेचे उत्पादन केले. त्या बद्दल तत्कालीन मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना शहाजीराव भड.

नवी दिल्लीतील सहकारी साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष कलाप्पाण्णा आवाडे व बबनदादा शिंदे यांच्या हस्ते साखर उद्योगातील सहयोगाबद्दल डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनचा (डीएसटीए) ‘द लाईफ टाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार स्विकारताना शहाजीराव भड.

परदेशात निर्यात व अभियांत्रिकीतील अतुलनीय योगदानाबद्दल २००८-०९ चा ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार रिझर्व बॅंकेचे डेप्युटी गव्हनर एच. आर. खान यांच्या हस्ते स्विकारताना एस. एस. इंजिनियर्सचे शहाजीराव भड.

साखर उद्योगातील सहयोगाबद्दल भारतीय शुगरतर्फे ‘द लाइफ टाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे साहेब यांच्या हस्ते स्विकारताना शहाजीराव भड.

नॉर्थ इंडियन शुगरन्स अँड शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन अँड नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट इंडियाचा ‘द बेस्ट इंडस्ट्रियल एक्सलन् ॲवार्ड’ धामपूर शुगर मिलचे श्री विजय गोयल साहेब व डीसीएम श्रीराम ग्रुपचे अजय श्रीराम साहेब यांच्या हस्ते स्विकारताना शहाजीराव भड.

साखर कारखानदार म्हणतात…

मुधोळ येथील आमच्या निराणी शुगर लिमिटेडची उभारणी ‘एस.एस. इंजिनियर्स’ नेकेली. त्यांच्या कामाबाबत समाधानी आहोत. इथे कोजनरेशन प्रकल्पाचेकाम सुरू आहे. मिलची कॅपॅसिटीपाच हजारांपासून १५ हजार टनापर्यंत वाढविली आहे. साई प्रिया शुगर्सव एम. आर. एन. शुगर या दोन कारखान्यांची रिपीट ऑर्डर ‘एसएस’ला दिली आहे. कारखानदारीतील मार्गदर्शक असेत्यांचेकाम आहे.

– मुरुगेश निराणी,
अवजड उद्योगमंत्री, कर्नाटक

आमच्या वाटेगाव शाखेची उभारणी एस.एस. इंजिनियर्सने उत्तम केली. साखर उद्योगात नवीन तंत्रज्ञान त्यानी सर्वत्र पोहोचविले. त्याचा चांगला फायदा कारखान्यांना होतो आहे.

– जयंतराव पाटील,,
मंत्री, राजाराम बापूकारखाना, साखराळ

उगार शुगरच्या बॉयलरचे काम एस.एस. इंजिनियर्सने केले आहे. त्यांचा रिझल्टउत्तम आहे. चांगली सेवा देत आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी मिलची गाळप क्षमता दोन हजार ७०० टन होती. त्यामध्ये सातत्याने आधनिुकीकरण करून गाळप क्षमता १५ हजार टनांपर्यंत वाढवली आहे.

– राजाभाऊ शिरगावकर, ,
चेअरमन, उगार शुगर वक्स लिमिटेड

एकाच मिलिंग स्टॅंडमधून मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होण्याची क्षमता असलेली आधनिुक यंत्र सामग्री एस. एस. इंजिनियर्सने आमच्या कारखान्यास पुरवली आहे. ती कार्यक्षम तर आहेच; तिचा देखभाल दुरुस्ती खर्चही अत्यल्प आहे.

– कल्लाप्पाण्णा आवाडे, ,
संस्थापक अध्यक्ष, जवाहर सहकारी साखर कारखाना

आमच्या सेओहरा, रोसा, हसनपूर, हटा, हरगाव व सिधवलिया साखर कारखान्यांच्या उभारणीत एस. एस. इंजिनियर्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दीर्घकाळाचा विचार करून उच्च प्रतीचे साहित्य वापरले आहे. त्याचे तांत्रिक सहकार्य आजही मिळत आहे. त्यांना पुन्हा कामाची ऑर्डर देण्यास आम्ही इच्छुक आहोत.

– सी. बी. पतोडिया,,
ग्रुप प्रेसिडेंट, बिर्ला ग्रुप ऑफ शुगर इंडस्टीज

एस. एस. इंजिनियर्सच्या मशिनरीचा परफॉर्मन्स अत्तयं चांगला आहे. हा प्लॅंट उत्कृष्टपणे काम करत आहे. साखर उद्योगात या ग्रुपचे नाव त्यांच्या कामातून झाले आहे. जगातील मोठ्या कंपन्यांशी ही कंपनी कामाच्या बळावरच टक्कर देत आहे.

– बी. बी. ठोंबरे,,
अध्यक्ष, नॅचरल शुगर, उस्मानाबाद

आमच्याकडे नवीन पद्धतीची मशिनरी एस. एस. इंजिनियर्सने बसवली आहे. डिफ्युजर लावल्यामुळे कारखाना चांगल्या पद्धतीने काम करतोय. डिफ्युजरमुळे विजेचे वापर कमीत कमी झाला आहे. साखर उतारा वाढला आहे. फाउंडेशन खर्च कमी झाला आहे. मिल उभारणीत एस. एस. इंजिनियरसचा हातखंडा आहे. बदलत्या काळानुसार त्यांनी या क्षेत्रात मोठे बदल केले आहेत.

– आमदार बबनराव शिंदे ,
अध्यक्ष, इंडियन शुगर मिल, चडचण

सिद्धनाथने पहिल्याच हंगामात पाच लाख मेट्रिक टनाचे यशस्वी गाळप केले. आता तेच आमच्या दुसर्या कारखान्याची तुळजापूर येथे उभारणी करत आहे. शहाजीराव भड यांच्या अनुभवाचा फायदा मिळाला. ‘एसएस’ची सर्व्हिस उत्साहित करणारी आहे.

– आमदार दिलीप माने,,
अध्यक्ष, सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, सोलापूर

शहाजीराव भड यांच्या मार्गदर्शना खाली एस. एस. इंजिनियर्सने बजाज हिंदुस्थानचे तीन कारखाने उभे केले आहेत. सर्व मशिनरी चांगला रिझल्ट देत आहेत. भड यांचे आमच्या कारखान्याकडे वैयक्तिक लक्ष असते. त्यामुळे कोणतीच अडचण येत नाही.

– बी. के. अग्रवाल, प्रेसिडेंट, ,
बजाज हिंदुस्थान लिमिटेड (पॉवर)

पांडुरंग कारखान्याची उभारणी इतर कंपन्यांना देण्याऐवजी आम्ही एस. एस. इंजिनियर्सला दिली. या कंपनीचे संचालक शहाजीराव भड यांनी अत्तयं परिश्रमपूर्वक त्याची उभारणी केली. अडीच हजार टन गाळप क्षमतेचा हा कारखाना सध्या पाच हजार टन उसाचे गाळप करत आहे. पावणेदोन पट जादा क्षमता त्यांच्या मशिनरीने निर्माण करून दिली आहे. आज अखेर विनासायास मशिनरी काम करत आहे.

– आ. प्रशांत परिचारक,,
संचालक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर

सोनहिरा साखर कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाची उभारणी एस. एस. इंजिनियर्सने केली आहे. वीज सोनहिरा साखर कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाची उभारणी एस. एस. इंजिनियर्सने केली आहे. वीज नामांकित कंपनीमुळे ते शक्य झाले. पहिल्या वर्षापासूनच हा वीज प्रकल्प अखंडितपणे सुरू असून उदिष्टाप्रमणे त्यातून वीजनिर्मिती सुरू आहे.

– आ. मोहनराव कदम,,
अध्यक्ष, सोनहिरा साखर कारखाना, वांगी

‘एसएस’ विशेष

  • उच्च दाबाचे, उच्च तापमानाचे बॉयलर्स, टी. जी. सेटस्, सहवीजनिर्मिती प्रकल्प व त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा. कमीत कमी वाफे चा वापर असल्याने जास्तीत जास्त वीजनिर्मिती.
  • बगॅस सुकवण्याची खास यंत्रणा
  • कमीत कमी वीज वापरून कारखाना चालविण्याची यंत्रणा. त्यामुळे वीज शिल्लक राहते. ती नॅशनल ग्रीडला विकता येते. देशभर असे प्रकल्प उभे के ले आहेत.
  • प्रतापपूर शुगर मिलची जुनी मशिनरी हलवून त्याच ठिकाणी पूर्णपणे नवीन मिल टॅंडमचे काम कंपनीने सहा महिन्यांत पूर्ण केले. त्यावर्षीच्या गाळप हंगामासाठी कारखाना कं पनीने सज्ज ठे वला. असे काम अन्य कु ठल्या कं पनीला करता आले नाही.
  • देखभाल दरुस्ु ती खरच् अतिशय कमी
  • जास्तीत जास्त साखर उतारा
  • ऊस व बीटपासून साखर तयार करणारी यंत्रणा
  • १६० टक्के गाळप क्षमता असलेल्या सुपर स्ट्रक्चर मिलची उभारणी
  • कमीत कमी बगॅसमध्ये जास्तीत जास्त वीजनिर्मिती
  • साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञानावर भर. एस. एस. इंजिनियर्स इतके शोध भारतात अन्य कोणत्याही कं पनीने आजवर लावलेले नाहीत
  • एस. एस. इंजिनियर्सने भारतीय साखर उद्योग क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण के ले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर कारखाना उभारणी त्यांनी सुरू केली आहे.
  • कार्यक्षमता, उत्पादकता आणि फायदा या गोष्टींवर भर दिला जातो. तांत्रिक सल्लागार म्हणून काम के ले जाते. उत्कृष्ट नूतनीकरण एस. एस. कंपनीच करू शकते, असा विश्‍वास निर्माण के ला आहे. गरजेप्रमाणे काम करून देण्याची क्षमता या कंपनीमध्ये आहे.
  • प्रत्येक कारखान्याची उदिष्टे वेगळी असतात. त्या प्रमाणात आम्ही प्रत्येक मशिन कॉम्पनंटचे मायझेशन करतो. प्रत्येक प्रॉजेक्टचे डिझाईनिंग वेगळे असते. मशिनरी सुसंगत असेल तरच कारखान्याला रिझल्ट मिळतो.
English