ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा मौज मस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा
शाळेबाबतच्या या चार ओळीतून तिचे आयुष्यातील स्थान किती महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात येते. शाळा चांगली तर विद्यार्थीही चांगले घडतात. अशा शाळांतून घडलेले विद्यार्थी वयैक्तिक आयुष्यासोबतच समाज निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतात. विद्यार्थ्यांना कवेळ सोयी-सुविधा न देता, त्यांना एक जबाबदार आणि चांगला व्यक्ती करण्याची जबाबदारी शाळेवर असते. त्यामुळेच पालक आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत दाखला कसा मिळेल यासाठी प्रयत्नरत असतात. विद्यार्थ्यांना त्यात चांगले वातावरण मिळावे, सोयी-सुविधा आणि त्यांच्यावर संस्कार व्हावेत या उदेयशाने डॉ. राजाभाऊ टाकं साळे यांनी नागपुरात अकरा वर्षांपूर्वी ‘सेंट पॉल स्कूल’ सुरू केली. शाळा २.७५ एकरात विस्तारली आहे. १६० वर्गखोल्या आहेत. त्यातून ७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेचे कार्य एवढयावर थांबलेले नाही. काही वर्षांपूर्वी धामना येथे सेंट पॉल इंटरनॅशनल स्कुलची स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व-सुविधायुक्त असलेल्या वातावरणात शिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे.