कृषी क्षेत्राला ‘वरद’चे वरदान

जालना शहर बियाणे उद्योगाचे माहेरघर, तशी आज स्टीलनगरी म्हणूनही नावारूपास आलेली. जालन्याच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोलाची भर घालणाऱ्या उद्योगामध्ये वरद फर्टिलायझर्स हे नावही ठळकपणे पुढे येते. राजस्थानमधून सव्वा शतकांपूर्वी आलेले मानधनी कुटुंब जालना जिल्ह्यात स्थायिक झाले, येथील मातीशी त्यांची नाळ जुळली. सुरवातीच्या काळात पूर्वज शेती करत असल्याने शेतीला लागणारे बियाणे, खते आणि फर्टिलायझर्स या बाबींशी संबंध आला. त्यामुळे फर्टिलायझर्सची निर्मिती का करू नये, या संकल्पनेतून १९८९ मध् चार ते पाच जणांना सोबत घेऊन वरद फर्टिलायझर्सची जालना औद्योगिक वसाहत येथे सुरवात झाली. मागील ३२ वर्षांपासून वरद फर्टिलायझर्स हे ब्रॅंड संपूर्ण राज्यात नावारूपाला आले आहे.

मानधनी कुटुंबाचा संघर्षमय प्रवास

मानधनी कुटुंब हे मूळ राजस्थान राज्यातील आहे. १२५ वर्षांपूर्व हे कुटुंब जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे आले. रामनिवास मानधनी यांनी जालना येथे पदवी शिक्षण पूर्ण केले; परंतु कुटुंबातील इतर सदस्य हे शेती करत असल्याने रामनिवास मानधनी यांच्याकडे शेतात लागवड करणारे बियाणे, खते, फर्टिलायझर्स खरेदीसंदर्भात गावातील शेतकरी विचारणा करत असत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल विक्री करणे आणि शेतकऱ्यांना बियाणे, खत, फर्टिलायझर्स उपलब्ध करून देत. या सर्व घटनाक्रमांमध्ये रामनिवास मानधनी यांनी १९६२ मध्ये उसनवारी करून एक हजार ८०० रुपयांमध्ये संतोष बीजभांडारची सुरवात केली. औरंगाबाद येथून माल खरेदी करून जालना येथे तो विक्री करणे, असा खडतर प्रवास त्यांचा सुरू झाला. संतोष बीजभांडार सुरू झाल्यानंतर विविध कंपन्यांची एजन्सी त्यांना मिळाली. मात्र, त्या काळात फर्टिलायझर्सचा सतत तुटवडा निर्माण होत असे. शेतकरी मिळेल तेथून फर्टिलायझर्स खरेदी करत असत. त्यामुळे वर्ष १९८८ मध्ये चार ते पाच जणांना सोबत घेऊन जालना येथे फर्टिलायझर्सनिर्मिती उद्योग सुरू करण्याचा विचार मांडला. त्या काळात शासन व प्रशासनाच्या नियमावली पूर्ण करून वर्ष १९८९ मध्ये वरद फर्टिलायझर्सचा रामनिवास मानधनी यांना परवाना मिळाला. अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी वरद फर्टिलायझर्स कंपनी सुरू केली. आर्थिक अडचणीवर मात करत हा उद्योग सुरु केला. त्यानंतर वरद फर्टिलायझर्स हे नाव हळूहळू राज्यभर ब्रॅंड म्हणून नावारूपाला आले.

राज्यात त्या काळात फर्टिलायझर्समिळत असल्याने गावागावांत फर्टिलायझर्स घेऊन जाणाऱ्या रामनिवास मानधनी यांचा सत्कार केला जात असे. संपूर्ण राज्यात १२०० ते १४०० डिलर्सचे जाळे त्यांनी निर्माण केले. वरद फर्टिलायझर्सचा ब्रॅंड राज्यभर रामनिवास मानधनी यांनी निर्माण करून स्टील, बियाणे उद्योगासह फर्टिलायझर्समध्ये जालन्याचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. त्यामुळे राज्याच्या विविध ठिकाणांवरून जालना येथील वरद फर्टिलायझर्स खरेदीसाठी येण्यास सुरवात झाली. आज वरदचे १३४ उत्पादन बाजारपेठेत उपलब्ध आहे. शेतीच्या बियाणे, खतामध्ये ‘वरद’ ब्रॅंड शेतकऱ्यांच्या मनामनांत घर करून बसला आहे.

बियाणे उद्योगातही प्रवेश

वरद फर्टिलायझर्सच्या यशानंतर रामनिवास मानधनी यांनी वर्ष १९८५ मध्ये नांदेड येथे संतोष हायब्रीड सीड्स कंपनी सुरू केली. धनलक्ष्मी सीड्स ब्रॅंड निर्माण केला. शेतकऱ्यांची गरज ओळखून त्याप्रमाणे उत्पादन करणारे ब्रॅंड म्हणून वरद नावारूपाला आले आहे. मागील चार वर्षांमध्ये पेस्टीसाईड उत्पादन निर्मितीकडेही ‘वरद’ वळले असून, त्याचाही प्रकल्प सुरू केला आहे.

नवीन संशोधनावर भर

पुणे येथे आरएनडी सेंटर अर्थात संशोधन व विकास केंद्र सुरू केले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी संशोधन केले जात आहे. पन्नास किलोचा युरिया खरेदी करून घेऊन जाणे त्रासदायक आहे. तेच गुणधर्म एका छोट्या बाटलीत मिळाले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे संशोधन सध्या सुरू आहे. तसेच आयआयटीच्या सहकार्याने ड्रोनच्या माध्यमातून शेतामध्ये खताची फवारणी करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यातील काही अडचणी दूर करण्याचे काम सुरू झाले आहे.

स्टील उद्योगातही भरारी

रामनिवास मानधनी यांनी वरद फर्टिलायझर्स उद्योग सुरू करून तो नावारूपाला आणला. या उद्योगात सध्या मानधनी यांची दुसरी पिढी म्हणजे योगेश मानधनी हा उद्योग सांभाळत आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर योगेश मानधनी यांनी वरदच्या ब्रॅंडला अधिक मोठे करण्याचे काम केले आहे. तसेच स्टील उद्योगातही योगेश मानधनी यांनी वेगळे स्थान निर्माण केले. आज ते महाराष्ट्र स्टील असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. विदर्भातील वर्धा येथे SMW इस्पात प्रा.लि. ही स्टील कंपनी योगेश मानधनी यांनी सुरू केली, हा देशात सर्वांत मोठ्या स्टील उद्योगांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. उत्पादनाची गुणवत्तता आणि नवनवीन तंत्रज्ञानाची जोड या जोरावर हा उद्योग भरारी घेत आहे. श्री. मानधनी यांची तिसरी पिढीही या क्षेत्रात दमदार वाटचाल करीत आहेत. या पिढीच्या प्रतिनिधी धनश्री या ही जबाबदारी पार पाडताहेत. नव्या पिढीच्या नवीन विचारांचा उद्योग वाढीसाठी उपयोग करून घेतला जात आहे.

उद्योगासाठी महाराष्ट्र अनुकूल राज्य

महाराष्ट्रात उद्योगासाठी सर्वांत चांगले वातावरण आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यापेक्षा अधिक उद्योग महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे वरद फर्टिलायझर्स, SMW इस्पात प्रा.लि. स्टील उद्योग सुरू करू शकलो, असे योगेश मानधनी नमूद करतात. आमचा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झाला, या मातीत आमची जडणघडण झाली, याचा अभिमान असल्याचे योगेश सांगतात.

जपलीय सामाजिक जाणीव

मानधनी कुटुंबीयांनी सामाजिक जाणीवही जपलेली आहे. जमुनाबाई जगन्नाथ मानधनी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. तसेच मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पुढाकार तसेच कोरोना काळात ऑक्सिजन वाटपातही योगदान देत आहे. कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. ही बाब लक्षात घेत SMW इस्पात प्रा.लि. या स्टील कंपनीत अवघ्या १८ दिवसांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आला. तेथून दररोज ५०० ऑक्सिजन सिलिंडर वैद्यकीय कामासाठी मोफत दिले जात आहे. वर्धा येथे शंभर खाटांचे कोरोना रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत; तसेच औषधी, जेवणही दिले जाते. रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जात आहे.

आधुनिक शेतीचा दिला जातोय संदेश

वरद फर्टिलायझर्सच्या माध्यमातून आधुनिक शेतीचा संदेश दिला जात आहे. तिसऱ्या पिढीच्या माध्यमातून माती परीक्षणावर भर दिला जात आहे. वरदकडून शंभर ते सव्वाशे जणांची टीम तयार केली, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती परीक्षण केले जाते. तसेच सोशल मीडिया, वेबसाइटच्या माध्यमातून वीस लाख शेतकरी जोडले गेले आहेत. तसेच ‘समृद्ध बळीराजा’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक पिकाला लागणारे खत, बियाणे त्याची माहिती व मात्रा यासंदर्भात माहिती शेतकऱ्यांपर्यंत पुरविली जात आहे.

सेंद्रिय खताची निर्मिती

देशात सुरवातीच्या काळात उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा (फर्टिलायझर) वापर होत होता. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. परंतु, जमिनीचा पोत कमी होत असल्याचे लक्षात येऊ लागले. त्यामुळे वरद फर्टिलायझर्सकडून वर्ष २००४ मध्ये सेंद्रिय खत (ऑर्‍गॅनिक फर्टिलायझर्स) निर्मितीचा निर्णय घेतला. परंतु, याचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये फारशी जागृती नव्हती. त्यामुळे वरदकडून सेंद्रिय खताचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आज वरदच्या सेंद्रिय खताची मागणी वाढली आहे.

कर्मचारी बनलेत ‘वरद’चा अविभाज्य घटक

वर्ष १९८८-१९८९ मध्ये जे कर्मचारी वरद फर्टिलायझर्समध्ये जोडले गेले ते आजही कार्यरत आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांच्या मुलांना योग्य शिक्षणाची दिशा देण्यात आली. अनेक कर्मचाऱ्यांची पुढची पिढी वरदसह स्टील कंपनीसोबत कार्य करत आहेत. ते मानधनी ग्रुपसोबत जोडले गेले आहेत. नवीन प्रयोग राबवीत असताना कर्मचाऱ्यांनीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. आज कर्मचारी ‘वरद’चा अविभाज्य घटक बनलेले आहेत.

एकाच छताखाली सर्वकाही

शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, औषधे याच ठिकाणी उपलब्ध झाले तर सोयीचे होईल. ही बाब लक्षात घेऊन तशी व्यवस्थाकरण्यात आली. वरद फर्टिलायझर्सकडून कपाशीमध्ये लागवडीपासून काढणीपर्यंतच्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या. अगदी लागवडीसह काढणीपर्यंतचे तंत्रज्ञानाद्वारे उत्पादनाची हमी वरदकडून दिली जाते. त्यासाठी प्रत्यक्ष शेतीची माहिती, प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविली जात आहेत.

शेतकऱ्यांसाठी अप निर्मिती सुरु

वरद’कडून शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक माहिती देणार नवीन अॅप तयार केले जात आहे. हे अॅप तयार करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. प्रत्येक पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंतची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या काढणीपर्यंतची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या उत्पादन केलेला शेतीमाल कुठे विकला जाऊ शकतो याची माहिती दिली जाणार आहे. तसेच मंडईतील सर्व कृषिमालांचे दररोजचे भावफलक यात उपलब्ध होणार आहेत. शासकीय अनुदान, कृषी बातम्या, कृषी चर्चाशेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. तसेच वरदच्या तज्ज्ञांकडून हेल्पलाइनद्वारे मदत केली जाणार आहे. वरद अॅग्रिमित्र असा नवा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व बाबी विनाशुल्क असणार आहेत.

रामनिवास मानधनी यांचा प्रवास

रामनिवास मानधनी यांचा जन्म हा जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे झाला. त्यानंतर जालना येथे त्यांचे शिक्षण झाले. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी या व्यवसायाला सुरवात केली. त्यानंतर संतोष बीजभांडार सुरू केले. संतोष ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी वर्ष १९८५ मध्ये नांदेड येथे संतोष हायब्रीड बियाणे कंपनी, वर्ष १९८८ मध्ये वरद फर्टिलायझर्स, त्यानंतर बिझनेस पार्क, वर्ष २००८ मध्ये महालक्ष टीएमटी स्टील कंपनी सुरू केली.

योगेश मानधनी यांची वाटचाल

जालना आणि मुंबई येथील उद्योगपती योगेश मानधनी हे आघाडीच्या स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्लँट मेसर्सचे प्रमोटर डायरेक्टर आहेत. एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि. (संगम स्टील), वर्धा (महाराष्ट्र) व वरद फर्टिलायझर्सप्रा. लि. जालना येथे संचालकही आहेत. संतोष ग्रुप व वरद ग्रुपअंतर्गत विविध व्यवसायांचेही ते नेतृत्व करीत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या योगेश यांनी रासायनिक अभियांत्रिकी आणि एमबीए (वित्त) विषयातील पदवी प्राप्त केलेली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रया अग्रगण्य संघटनेच्या ११ व्या अध्यक्षपदाची त्यांनी धुरा सांभाळली. त्यानंतर २०२०-२०२२ कार्यकाळासाठी ते पुन्हा निवडून आले आहेत. भारतीय व्यापारी चेंबरचे कार्यकारी समिती सदस्य; तसेच मेटल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या फेरस स्टील आर्मचे कमिटी सदस्य आहेत. तसेच स्टील मंत्रालयाने या उद्योगाबाबतीत राष्ट्रीय धोरण तयार करताना योगेश मानधनी यांच्या विविध सूचनांचाही विचार केलेला आहे.

पटकाविले विविध पुरस्कार

वरद फर्टिलायझर्सच्या प्रारंभीच्या काळात विविध उत्पादने गावागावांत पोचविली गेली, विशेष म्हणजे यासाठी परिश्रम घेणाऱ्या रामनिवास मानधनी यांचा प्रत्येक ठिकाणी सत्कार झाला. तसेच प्रत्येक कृषी विभाग, प्रत्येक बाजारपेठ, जिल्ह्यात त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. पुढे महावितरणच्या वतीने महाराष्ट्राचा बेस्ट कस्टमरचा पुरस्कार उद्योगाला मिळाला आहे; तसेच रामनिवास मानधनी यांचा वर्ष २००० मध्ये आर.आय. अध्यक्ष प्रशस्तिपत्र पुरस्कार, सेवा उद्धरण पुरस्कार, ड्रग गैरवर्तन प्रतिबंधक पुरस्कार, वर्ष २००८ मध्ये सत्यनारायण कलानी ट्रस्टचा सेवागौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कारांप्रमाणेच शेतकरी, ग्राहकांचे प्रेम, आपुलकीही त्यांनी अनुभवली.

नवीन पिढी ही शेतीकडे आता उद्योग म्हणून पाहत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादन घेऊन त्याची मार्केटिंग करून उत्तम अर्थार्जनाचा उद्योगहोणार आहे. त्यामुळे पुढील काळात आधुनिक शेती करणाऱ्यांना समाजामध्ये खूप मान मिळणार आहे.

– रामनिवास मानधनी,
वरद फर्टिलायझर्स

वरद फर्टिलायझर्सची वैशिष

  • वरद फर्टिलायझर्सची वर्ष १९८९ मध्ये सुरवात.
  • गावागावांत जाऊन के ला उत्पादनाचा प्रचार व प्रसार
  • वर्ष १९६२ मध्ये सुरू के लेले संतोष बीजभांडार आजही जनसेवेत
  • वरद फर्टिलायझर्स या ब्रॅंडचा ३२ वर्षांपासून दबदबा
  • नांदेड येथे वर्ष १९९५ मध्ये संतोष हायब्रीड सीड्स कंपनी
  • ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सची वर्ष २००४ पासून निर्मिती
  • एकाच छताखाली बियाणे, खत, औषधी उपलब्ध
  • तंत्रज्ञान राबवून उत्पादनाची दिली जातेय हमी
  • बांधावर जाऊन माती परीक्षणावर दिला जातोय भर
  • स्टील उद्योगातही घेतली भरारी
  • कोरोनाकाळात वर्धा येथे दैनंदिन ५०० ऑक्सिजन सिलिंडरचा वैद्यकीय कामासाठी मोफत पुरवठा
  • वर्धा येथे शंभर खाटांच्या कोविड रुग्णालयाची सुरवात, मोफत उपचारासह औषधी, जेवणही
  • कृषी विभागाकडून, प्रत्येक बाजारपेठे त कं पनीचा गौरव
  • महावितरणकडून महाराष्ट्राचा बेस्ट कस्टमर पुरस्कार
  • पुणे येथे संशोधन व विकास केंद
  • नॅनो तंत्रज्ञानाच्या संशोधनावर काम सुरु
  • ड्रोनच्या माध्यमातून शेतामध्येखताची फवारणीचे संशोधन सुरु
  • आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना के ले जातेय साक्षर
  • तिसऱ्या पिढीकडे उद्योगाची जबाबदारी
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून वीस लाखांपेक्षा अधिक शेतकरी वरदसोबत जोडलेल
  • ‘वरद’ची शंभर ते सव्वाशे जणांची टीम माती परीक्षणासाठी बांधावर
  • शेतकऱ्यांसाठी विशेष अॅपची निर्मिती सुरु
  • अॅपच्या माध्यमातून कृषिमालाचे भाव, कृषिमाल विक्रीचे ठिकाण, शेतीविषयक चर्चासत्र, शासकीय अनुदान आदींची माहिती मिळणार

रामनिवास मानधनी यांनी भूषविलेली पदे, जबाबदाऱ्या

  • अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा कार्य समिती सदस्य (वर्ष २००६ ते आतापर्यंत)
  • अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा छात्रावास योजना विकास समिती राष्ट्रीय संयोग योजना (वर्ष २००७ ते आतापर्यंत)
  • अखिल भारतीय माहेश्वरी एज्युके शनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे
  • व्यवस्थापकीय विश्वस्त, सेठ गंगाधर बन्सीलाल राठी माहेश्वरी छात्रावास (वर्ष २००७ ते आतापर्यंत)
  • सचिव, अखिल भारतीय माहेश्वरी एज्युके शनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या श्रीमती के सरबाई सोनी माहेश्वरी छात्रावास (वर्ष २०१९ ते आतापर्यंत)
  • विश्वस्त, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा मुखपत्र माहेश्वरी पत्रिका (वर्ष २०१३ ते २०१६)
  • सदस्य, अखिल भारतीय माहेश्वरी सेवा सदन पुष्कर व्यवस्थापकीय समिती (वर्ष २००४ ते २००७)
  • श्री आदित्य विक्रम बिर्ला स्मारक व्यापार सहयोग कें द्र व्यवस्थापकीय समिती सदस्य (वर्ष २०१०), उपसमिती सदस्य (वर्ष २०१२ ते २०१५)
  • संस्थापक सदस्य, कोषाध्यक्ष, श्री बांगड माहेश्वरी वैद्यकीय कल्याण संस्था (वर्ष२०१२ ते २०१५)
  • बद्रीलाल सोनी शिक्षा सहयोग केंद्र संस्थापक विश्वस्त (वर्ष२००७), व्यवस्थापकीय विश्वस्त (२०११ ते २०१३), व्यवस्थापकीय समिती सदस्य (२०१३ ते २०१६)
  • राजस्थानी यात्रा संघ, तिरुपती बालाजी भोजनालय प्रमुख (वर्ष २००८-२०११), उपाध्यक्ष (वर्ष २०११-२०१४), अध्यक्ष (वर्ष २०१४ ते २०१६)
  • अध्यक्ष, जालना रोटरी क्लब ऑफ जालना (वर्ष १९९९ ते २०००)
  • संस्थापक सदस्य, जालना जिल्हा माहेश्वरी शिक्षण सहयोग केंद्र (वषे २०१२)
  • विश्वस्त, माहेश्वरी भवन जालना व नांदेड
  • सभासद, मराठवाडा उद्योग व कृषी चेंबर
  • सभासद, महाराष्ट्र आर्क थि विकास परिषद
English