सहकारातून विकास हे आर्थिक क्षेत्रातील धोरण बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे राबवून देशातील एकमेवद्वितीय असा प्रकल्प म्हणून ओळख मिळवणारा हा प्रकल्प आहे. पुण्यातील हा यशस्वी प्रयोग संपूर्ण राज्यासाठी व टाऊनशीप धोरणासाठी पाऊलवाट ठरला. पुणे, महाराष्ट्र आणि देशभरातील बांधकाम विश्वासाठी अनोख्या ठरलेल्या ऑन आयडिया कॉल्ड मगरपट्टासिटी विषयी…
सहकारातून सामान्यांची स्वप्नपूर्ती… ऑन आयडिया कॉल्ड मगरपट्टासिटी - शेतकऱ्यांसह सर्वंकष विकासाची संकल्पना
ऑन आयडिया कॉल्ड मगरपट्टासिटी या संकल्पनेबद्दल अधिक विस्ताराने सांगावयाचे झाल्यास प्रकल्प विकसनासाठी शेतजमीन सोबतच प्रकल्पात भूमिपुत्रांना बरोबरीने सहभागी करून घेत, त्यांना शेअरहोल्डगिं देवून, त्यांना नफ्यात भागीदार करून एक इन्क्लुसिव्ह ग्रोथ मॉडेलवर काम केले गेले. लँड पुलिंगच्या आधारे शेतकऱ्यांसह जमीन एकत्र करणे, जमिनीच्या प्रमाणात संबंधीत शेतकऱ्याला नफ्यामध्ये भागीदारी देणे आणि त्याला तिथे उद्योजक होण्यासाठी प्रेरित करणे, प्रशिक्षण देणे, पाठबळ देणे अशा सकारात्मक संकल्पनेवर आधारित हेमॉडेल विकसित व यशस्वी झालेले आहे. विशेष म्हणजे या संकल्पनेला जगभरातून सर्वमान्यता व त्याचे अभिनंदन झाले आहे. होते आहे. या सर्व प्रयत्नांच्या आधारेशेतकऱ्यांचा व कुटुंबाचा आर्कथि स्तर कसा वाढविता येऊ शकतो…? त्यातून विकासाच्या नव्या संधी, संबंध परिसराचाच कसा विकास घडवून आणता येऊ शकेल…? हे`मगरपट्टा सिटी`नेसंपूर्ण जगालादाखवून दिले.
पार्श्वभूमी व वाटचाल
साधारण १९८७ मध्ये पुण्याचा विकास आराखडा मंजूर झाला होता. त्यात दर्शविण्यात आलेल्या विकासाची क्षमता असलेल्या भागांमध्ये हडपसरचा भाग प्राधान्यानेपाहिला जात होता. परिणामी हडपसर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर इमारती उभ्या राहण्यास सुरवात झाली. मात्र त्यात अधिकृतपणा आणि नियोजनाचा अभाव दिसत होता. शेतकऱ्यांच्या हाती पैसा येऊ लागला खरा…पण काही अपवाद शेतकऱ्यांनी दूरदर्शीपणा दाखवत गुंतवणूक केली. मात्र बहुतांश शेतकरी मंडळी त्याचा योग्य विनियोग न करता खर्चावरच भर दिला. आर्थिक नियोजनाअभावी नंतरच्या काळात त्यांची अवस्था दयनीय झाली. हे चित्र अस्वस्थ करणारे होते. भूमीपूत्र शेतकऱ्यांचा शाश्वत आर्थिक विकास साधला जाणे आणि त्याच माध्यमातून या परिसरातील आर्थिक, सामाजिक, औद्योगिक स्वरुपाचे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे त्या भागातील धुरिणींनी वाटू लागले. त्यातूनच नवनवीन संकल्पनांचा विचार समोर आला खरा पण त्यात सक्रिय पुढाकार घेत श्री. सतीश मगर यांनी नवी पायवाट घालून देण्याच्या इराद्यानेप्रयत्न सुरू केले… अल्पावधीतच त्यांनी मगरपट्टा परिसरातील १२० शेतकरी कुटुंबांतील ८०० जणांना एकत्र आणले. त्या बळावर `मगरपट्टा टाऊनशीप डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड` (सध्याची मगरपट्टा सिटी ग्रुप) ही कंपनी स्थापन केली. यातूनच ३ डिसेंबर १९९९ मध्ये `मगरपट्टा सिटी`ची संकल्पना मूर्त रूपात आली. आणि याच कंपनीच्या माध्यमातून ४३० एकरावर शेतकऱ्यांची देशातली पहिली इंटीग्रेटेड टाऊनशीप उभी राहण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ झाला.
या शहराच्या नियोजनासाठी आम्ही चंदीगढ, बंगळुरू, दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मलेशिया सिंगापूर व अमेरिका आदी देशांमधील प्रगत शहरांचा अभ्यास आम्ही केला. तिथल्या गोष्टी इथेजशाच्या तशा न लागू शकता तिथल्या गोष्टी आपल्या गरजांनुसार बदलून घेत त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. लोकांना शहरांतर्गत सर्व आधुनिक सुविधांनी युक्त शहराची ही संकल्पना नवीन होती. पण ज्यावेळेस ती रूळायला लागली, ज्यावेळी याची सुरुवात झाली त्यावेळी लक्षात आले. मी ५ ते १० मिनिटांत मी कामाच्या ठिकाणी जावू शकतो. मला वाहतूक कोंडीचा कसलाच त्रास नाही. आपली मुलेसेफ झोन मधून सायकलीवरून शाळेत जावू शकतात. त्यानंतर तेइथल्या ऐसपैस बागेत खेळू शकतात. माझ्या घरातील वृद्ध आई-वडिल शहरात मोकळे पणाने फिरू शकतात. आणि विशेष म्हणजे हे सगळे सीसीटीव्ही मॉनिटर्ड आहे. चोवीस तास सुरक्षा इथे उपलब्ध आहे. इथल्या सर्व गोष्टी नियंत्रित आहेत. इथल्या सुख-सुविधा, सुरक्षा आणि अनेकविध सेवांमुळे इथले जीवनामान अधिक सुसह्य आहे त्यावेळी प्रतिसाद वाढत गेला. आजही तो कायम आहे. सध्या याच संकल्पनेवर आधारित सिंहगड रोडवरील सुमारे साडे सातशे एकरावर नांदेडसिटी, पुणे सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर येथे रिव्हर व्ह्यू सिटी, या टाऊनशीपचे काम सुरू असून नांदेडसिटीमध्ये सुमारे अकरा हजारांहून अधिक कुटुंब समाधानानेनांदत आहेत. यासोबतच त्यापाठोपाठ मगरपरट्टा सिटी जवळच नोव्हा नामक गृहप्रकल्प, हडपसर -महम्मदवाडी भागाच्या सीमेवर कम्फर्ट होम्स, या नवीन संकल्पनेसह उभारल्या जाणाऱ्या गृह प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे.
नवसंकल्पनेतून उद्योजकही तयार झाल
मगरपट्टा सिटीतील निवासी प्रकल्पांच्या बांधकामास सन २००० मध्ये सुरुवात झाली. हेशहर उभेकरताना ऑन आयडिया कॉल्ड मगरपट्टासिटीच्या या प्रक्रियेत या सर्वांना सामावून कसेघेता येईल, यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. रस्ते निर्मिती, इमारतींची उभारणीच्या प्रक्रियेतील कामे, लँडस्केपिंग, फॅब्रिकेशनपासून अशा अनेकविध व्यवसायांत भागीदारांनाच उतरवणे गरजेचे असल्याचे श्री. मगर यांना जाणवले. त्यामुळे भागीदारांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होण्या बरोबरच ते उद्योजक बनतील याची काळजी घेतली. यासाठी भागीदार शेतकऱ्यांना या आवश्यकते नुसार व्यावसायिक कामांचे प्रशिक्षण देखील दिले. याशिवाय कंपनीचे भागधारक असलेले शेतकऱ्यांना लाभांश देखील मिळतो तो वेगळा… ही प्रत्येक टाऊनशीप नव्या आधुनिक व स्मार्ट शहरांसाठी सुविधा, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, समान व अखंडित पाणीवाटप, सातत्यपूर्ण वीजपुरवठा या व अशा अनेक गोष्टीसंबंधाने नवी पायवाट घालून देणाऱ्या आहेत. या प्रयोगाच्या यशाने पुणे महानगराच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे रोवले गेले. आणि हीच गोष्ट एक पुणेकर म्हणून अभिमानाने मिरवावी अशी आहे
नांदेडसिटी व रिव्हरव्ह्यु सिटी ग्राहकांच्या पसंतीचे प्रकल्प…
मगरपट्टासिटीनंतर सिंहगड रोडवर ७५० एकराहून अधिक क्षेत्रावर उभा राहत असलेली नांदेडसिटी टाऊनशीप व सोलापूर रोडवर लोणी काळभोर येथे नुकतीच सादर झालेला रिव्हरव्ह्यू सिटी हे दोन्ही टाऊनशीपचेप्रकल्प ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. नांदेडसिटीमध्ये अकरा हजारांहून अधिक समाधानी ग्राहक हिरव्यागार निसर्गाच्या सहवासात आनंदी जीवनजगतआहेत. तिथे सध्या कलाश्री, बागेश्री या इमारतींमध्ये २ व २.५ बीएकचकेच्या सदनिका तर निसर्गसंपन्न अशा या नांदेडसिटीत पण `लॅव्हिश लिव्हग` िं देणाऱ्या `रिदम` या प्रकल्पात बंगलो प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नांदेडसिटीमध्चये २६ एकरावर स्वतंत्र २४०० ते५२०० स्क्वेअर फुटां दरम्यानचे रिदम I, रिदम II, आणि रिदम III असे बंगलो प्लॉटस् इथे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेआहेत. तर सोलापूर रोडवर लोणी काळभोर येथे ५०० एकरावर नुकत्याच लाँच झालेल्या रिव्हरव्ह्यू सिटीला देखील मोठा प्रतिसाद लाभतो आहे. तिथे फाल्कनटॉवर्स या पहिल्या इमारतीमध्ये २,२.५ व ३ बीएचकेच्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
टाऊनशीप संकल्पना म्हणून मगरपट्टासिटी ग्रुप व शहर व्यवस्थापनातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आराखडा
- सर्व भागांचे नियोजन
- कचरा व सांडपाणी व्यवस्थापन
- शहरातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन
- कम्युनिटी इंगेजमेंट
- रस्तेव वाहतूक नियोजन
- प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार
- पाणी वितरण व्यवस्था
- सौर ऊर्जा निर्मिती व व्यवस्थापन
- हाऊसकिपिंग व फॅसिलिटी मॅनेजमेंट
- ग्रीन कव्हर व लॅण्डस्केपिंग
- सुरक्षा
- आरोग्य सुरक्षा
- प्रशिक्षण व कौशल्य विकसन
- तक्रार निवारण
- नागरिकांशी संवाद
- उत्तम प्रशासन व नैतिक मुल्यांची जपणूक करीत शहराच्या संस्कृ तीची निर्मिती…
घरासोबत सुविधा व निसर्गसंपन्न शहर मोफत
या सोबत शहराच्या दृष्टीनेजसेशाश्वत विकास महत्त्वाचा असतो तसेच नागरिकांच्या दृष्टीने शाश्वत जीवन देखील तितकेच आवश्यक आहे. ते आम्ही मगरपट्टासिटी, नांदेडसिटी मध्ये उपलब्ध करून दिला आहे. घराच्या जवळच शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, रूग्णालय या आधुनिक व पायाभूत सुविधा आणि त्यासोबत कामाचे ठिकाण देखील. यामुळे जीवनमान अधिक सुसह्य बनले. `बाय द पीपल, फॉर द पीपल आणि ऑफ दपीपल…` या शाश्वत जीवनासाठी आम्ही एक शहर व्यवस्थापन व्यवस्था निर्माण केली. ज्यात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असेल. त्यांचा सहभाग आणि समन्वय शहर व्यवस्थापनाच्या रूपाने आम्ही सहकार्य करतो हे या मॉडेलचे वैशिष्ट्य आहे. ही व्यवस्था नागरिकांचे सामाजिक व सांस्कृतिक सहजीवन उंचावण्यास मदतीची ठरते. आणि शहरसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेशहर अर्थव्यवस्थेला चालना देणारी गोष्ट… त्यासाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था उभ्या केल्या, भागीदार शेतकऱ्यांना, नागरिकांना संधी उपलब्ध करून दिल्या ज्यामुळेशहराच्या सकल उत्पन्नातील नागरिकांचा वाटा अधिक महत्त्वाचा व अधोरेखित झाला.
कोरोना काळात शहर व्यवस्थापनाने घेतली नागरिकांची काळजी
कोरोना काळात शहर व्यवस्थापनाकडून काळजी कोरोना आपदेच्या काळात आपण सर्वांनी सामना केलेल्या टाळेबंदीच्या वेळी या एकीकृत व सर्वसुविधांनी युक्त शहरात राहणाऱ्या नागरिकांना इतर नागरिकांच्या तुलनेने कमी त्रासाचा सामना करावा लागला. कोरोना काळात मगरपट्टासिटी व नांदेडसिटीतील १७ हजारांहून अधिक कुटुंब बचाव व सुरक्षिततेच्या दृष्टीनेमगरपट्टासिटी व नांदेडसिटी व्यवस्थापन पूर्णपणेसक्रिय होते. स्थानिक प्रशासनाने शिफारस केल्याप्रमाणे सर्व निवासी व व्यावसायिक इमारतींमधील लॉबी, लिफ्ट, लिफ्ट पॅनेल्स, एस्केलेटर, पायऱ्यांचे निर्जंतुकीकरण `अँटीव्हायरल लिक्विड`द्वारे इमारतींचे मजल्यांचे मोपिंग, टाऊनशीपमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी व निर्जंतुकीकरण, कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व अभ्यागतांची संबंधीत साधनांव्दारेकाटेकोर तपासणी केली गेली. तसेच दोन्ही शहरांमधील नागरिकांना मेल व व्हॉट्स अप संदेशाद्वारे सतत जागरूकता निर्ण मा करणारेसंदेश व त्यांचेसमन्वय केलेजात आहे. तर प्रसंगी बाधित रूग्ण व कुटुंबियांसाठी जीवनापयोगी वस्तू,औषधी संपूर्ण काळजी घेत घरपोच उपलब्ध करून दिल्या गेल्या
याशिवाय नांदेडसिटी व मगरपट्टा या दोन्ही टाऊनशीपमधील सतरा हजारांहून अधिक सदनिकाधारकांना शहर व्यवस्थापनातर्फे`वुई केअर कीट`चे वाटप करण्यात आले आहे. या किटमध्ये चार उत्तम दर्जाचे मास्क, एक हँड सॅनिटायझरची बाटली आणि कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती व आवाहन पत्रकाचा समावेश होता. विशेष म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेल्या अर्थव्यवस्थेसमोरील संकटाच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या महिला बचत गट व शेतकरी कृती गटाकडून गुणवत्तापूर्ण मास्क व सॅनिटायझर बनवून घेण्यात आलेहोते. त्यानंतरच्या कालावधीत दोन्ही शहरांमधील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची सुविधा देखील आरोग्य विभागाच्या मदतीने उपलब्ध करून देण्यात आली. कोरोनाचा सामना करताना नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंसोबत उपलब्ध करून दिल्या गेलेल्या सुविधा, आरोग्य सुविधा, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नाने इथल्या नागरिकांचे जीवन सुसह्य तर बनलेच त्यासोबत अशा सर्व सुविधांनी युक्त टाऊनशीपची गरज अधिक अधोरेखित झाली.
स्मार्ट मगरपट्टासिटी – एक ब्रँड
आज इथे आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सर्व सुविधांसह रोजगार, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश आहे, `मगरपट्टा सिटी`चेनाव, धकाम क्षेत्रातील सर्वोच्च गुणवत्ता, अनोखे व सुखकर डिझाइनचा आविष्कार आणि निर्दोष नियोजन म्हणून देखील प्राधान्यानेपाहिलेजाते, अभ्यासले जातेआहे. आणि याच बळावर `मगरपट्टा सिटी` एक `विश्वासार्ह ब्रँड` म्हणून विश्वस्त, ग्राहक, संबधीत घटक आणि नागरिकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. या संकल्पनेच्या यशस्वीतेविषयी खुद्द माजी राष्ट्रपती व श्रेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतुक केलेआहे. त्यांच्या `टार्गेट थ्री बिलियन` या पुस्तकात त्यांनी उल्लेख केला आहे. ते म्हणतात…
यासंबंधाने या विकसित शहरांच्या भविष्यवेधक नियोजनाचा विचार करता आम्ही हे शहर अधिक स्मार्ट सिटीकडे घेवून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसे नियोजन करतो आहोत. डिजटलायजेशन ऑफ डेटा हा एक महत्त्वाचा भाग आहे. इथल्या लोकांना डिजिटली कनेक्ट होता येईल. त्यांना त्यांच्यासाठी, त्यांच्या कु टुंबासाठीच्या सगळ्या सुविधा ऑनलाईन कनेक्टेड राहून सहजरित्या मिळविता येतील. त्यांचा आनंद घेता येईल असा आमचा प्रयत्न असणार आहे.
.. शाश्वत विकासाचे मॉडेल ग्रामीण भागात आर्थिक स्थिरता निर्माण करतात, हे आपण जाणतो. पण उद्योजक आणि स्थानिक समुदाय दोघांनाही उपकारक ठरेल अशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. अशी आदर्शवत व्यवस्था महाराष्ट्र राज्यात पुणे शहरानजीक मगरपट्टा सिटी ग्रुपने ४३० एकरावर यशस्वीरित्या उभारली आहे. समुदायाला भागधारक आणि विकासात भागीदार म्हणून सहभागी कसे करून घेता येईल याचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.
– डॉ. ए.पी.जे अब्ल कलाम,
माजी राष्ट्रपती व श्रेष्ठ शास्त्रज्ञ. (`टार्गेट थ्री बिलियन` या पुस्तकात)
शाश्वत विकास साधणारं शहर
पुणे महानगराच्या अर्थव्यवस्ला थे गती देण्यासोबतच पुण्याच्या पायाभूत सुविधांवर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता दरम्यान मगरपट्टा सिटी आज हिंजवडीनंतरची सर्वात मोठे माहिती तंत्रज्ञान केंद्र व स्वयंपूर्ण शहर म्हणून परिचीत आहे. इथे सध्या सात हजार फ्टलॅ्स, आयटी कंपन्या, आंतरराष्ट्रीय बँका, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, विमा कंपन्या, विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्कले्स, उद्यानेही आहेत. आज इथे ३५ हजार कुटुंब राहतात. इथे असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या सुमारे१ लाखांपेक्षा अधिक आहे. त्या सर्वांना आठ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकचे वेतन वितरित होते. १४ हजार कोटी रूपयांची निर्यात या शहरातून होते. तर सुविधासंपन्न नांदेडसिटीमध्ये अकरा हजारांहून अधिक कुटुंब निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर आयुष्याचा अनुभव घेत आहेत.
कार्बन फूट प्रिंट कमी करणारी, पर्यावरणपूरक, मोस्ट लिव्हेबल – मगरपट्टासिटी
मगरपट्टा सिटीने पर्यावरणाला अनुकूल विकासातून सर्वांसाठी पायवाट घालून दिली आहे. मगरपट्टा सिटीच्या एकूण क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्रफळ हिरव्यागार वनराईंनी व्यापलंय. सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, उर्जानिर्मिती आणि शाश्वत तंत्रांच्या अंमलबजावणीमुळे पर्यावरणाचेपूरक वातावरणाची इथेहमी आहे… शाश्वत शहराचा महत्वाचा भाग म्हणजे पर्यावरणपूरक शहर म्हणजेपाणी वितरण व्यवस्था, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन तेपाण पुनर्वापरासाठी तयार करणारी यंत्रणा तसेच वृक्षारोपण या गोष्टींना आम्ही प्राधान्य दिले. विशेष म्हणजे मगरपट्टासिटी एक आहे. या अनुषंगाने मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित असलेल्या.. आंतरराष्ट्रीय दर्जा व मानांकनांच्या आधारे कार्य करणाऱ्या संस्थेकडून आम्ही २०१७-१८ साली मगरपट्टा सिटीचेकार्बन फुट प्रिंटस्काढून घेतली. त्यात मगरपट्टा सिटी कार्बन पॉझिटिव्ह होतं. ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब होती.
अशा या अनोख्या मगरपट्टासिटी ग्रुपच्या शहराच्या यशस्वीतेची दखल २००८ मध्ये `सिडनी वर्ल्ड काँग्रेस ऑफ मेट्रोपॉलिस` पुरस्कारांच्या रूपाने जागतिक पातळीवर घेतली गेली. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या ‘महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च १० यशकथांमध्ये ‘मगरपट्टा सिटी’ चे सहभाग आहे. तसेच देशातील ‘मोस्ट लिव्हेबल सिटीज्’मध्ये (चांगल्या जीवनमान जगण्यासाठी असलेलेसुसज्ज असेशहर) `मगरपट्टा सिटी`ची निवड केली गेलेली आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडित गोष्टींचा विस्ताराने अभ्यास करणारी व आघाडीची सर्वेक्षण संस्था ‘जेएलएल’ने ऑक्टोबर २०१७ मध्ये केलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणातून देशभरातील ‘टॉप टेन मोस्ट लिव्हेबल सिटीज्’मध्ये ‘मगरपट्टा सिटी’ ची निवड केली आहे. त्यासोबत पुणे महापालिकेतर्फे स्वच्छ शहर, सीएनबीसी, झी बिझनेस, लोकमत, सकाळ माध्यम समूह यासारख्या मान्यवर प्रसारमाध्यमांकडून सर्वोत्तम शहर व बांधकाम कंपनी म्हणून मगरपट्टासिटी ग्रुप गौरवली गेलेली आहे.