कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार साहेब यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करावेत असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला तातडीने आणि सर्वप्रथम प्रतिसाद अभिजीत पाटील यांनी दिला. उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात त्यांनी अवघ्या १५ दिवसांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प यशस्वी केला. त्यामुळे श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील धाराशिव कारखाना एक प्रकारे देशात रोल मॉडेल ठरला..
साखर उद्योगातील रोल मॅाडेल ‘डीव्हीपी उद्योग समूह’
अवघ्या पाच वर्षांत एक दोन नव्हे तर तब्बल चार साखर कारखाने यशस्वीरित्या चालविणारे डी.व्ही.पी. उद्योग समूहाचे आणि धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे साखर उद्योगातील विश्वासार्ह ब्रँड नेम झाले आहे. एकीकडे अनेक साखर कारखाने अडचणीत असताना पंढरपूरचे अभिजीत पाटील हे जिद्दीने, कठोर परिश्रमाने आणि नियोजनपूर्वक काम करत आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी त्यांच्याकडे कुतुहलाने आणि आदराने पाहू लागले आहेत. व हजारो तरुण आयकाॅन म्हणून त्यांच्याकडे पाहात आहेत.
डीव्हीपी उद्योग समूहाची वाटचाल …
पंढरपूर तालुक्यातील छोट्याशा देगाव सारख्या गावातून तरुण ज्याला कोणताही राजकीय वारसा नाही. वडील वकिल क्त्षेरात कार्यरत असताना 2006 रोजी वडीलांचे छत्र हरवले. कुटुंबात मोठा असल्याने कुटुंबाची पूर्णतः जबाबदारी अभिजीत पाटील यांच्यावर पडली. ग्रामीण भागातील तरुण घरात असलेला ट्रॅक्टर घेवून २००७ साली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास वाहतूक ठेकेदार ते २०१७ रोजी स्वतःच्या साखर कारखान्याचा स्वतः चेअरम हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. गावातील तरुण एकत्रित येत उद्योगाची नांदी हातामध्ये घेवून तरुणांच्या हाताला काम देणं हाच मनातमध्ये कायम विचार असायचा. शेतीशी निगडीत असणारा सोनालीका ट्रॅक्टर विक्रीचा व्यवसाय सुरु केला. हाटेल, गुळ यनिुट, पंढरपूरमध्ये पुण्या मंबईच्या धर्तीवर डीव्हीपी मॉल मल्टिप्लेक्स उभारणी केली. अशा मध्च २०१७ श्री. अभिजीत पाटील यांनी १२ वर्षापासून बंद असलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखाना २४ जुलै २०१७ मध्येविकत घेतला. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी भाग असून त्या भागामध् काम करण् ये याची संधी धाराशिव साखर कारखान्याच्या माध्यमातून तेथील हजारो तरुणांच्या हाताला काम तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीचा ऊस दर देवून व ऊसाचे बिल वेळच्यावेळी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहे. या संधीचे सोने केले. त्यानंतर ३ सप्टेंबर २०१८ मध्ये नाशिक येथील देवळा सटाणा येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्तवार घेवून तेथील शेतकऱ्यांना व न्याय देण्याची भमिूका अभिजीत पाटील व संचालक मंडळाने पार पाडली. दोन साखर कारखान्याच्या यशा नंतर २६ जुलै २०१९ मध्ये नांदेड (लोहा) येथील बंद असलेला व्येंकटेश्वरा साखर कारखाना विकत घेवून सुरु केला. हा कारखाना सुरु झाल्याने परिरातील उद्योग व्यवसायला आणखी चालना मिळाली.
धाराशिव साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती प्रकल्प उभा केला. येथे दररोज ४५ हजार लिटर डिस्टलरी व ६० हजार लिटर इथेनालची निर्मिती केली जाते. मराठावाड्यातील यशस्वी उद्योग नंतर मुळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे असलेल्या अभिजित पाटील यांना कर्मभूमी पंढरपूर परिरासत एकादा साखर उद्योग सुरु करावा अशी त्यांची तळमळ होती. योगायोगाने दुष्काळी सांगोला तालुक्यातील १२ वर्षापासून बंद अवस्थेत असलेला सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरु केला. साखर कारखाना सुरु करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेवून अवघ्या ३५ दिवसात कारखान्यात उसाचे गाळप सुरु केले. त्यानंतर माजी कृषी मंत्री शरद पवार यांनीही बंद पडलेला साखर कारखाना सुरु केल्याबद्दल त्यांनी अभिजित पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून अभिनंद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळावा, ऊसाचे बिल वेळेवर मिळावे असे श्री. अभिजीत पाटील यांना कायम वाटायचे. ते ऊस वाहतूक ठेकेदार होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तसेच वाहतूक ठेकेदार यांची होणारी आर्थिक कुचंबना, राजकीय अडचणीमुळे होणारा त्रास त्यांना पहावत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देता यावा यासाठी आपली संस्था असावी अशी त्यांची भावना असायची. त्याच उदात्त हेतूमुळे हा सुवर्णयोग आला आणि जुलै २०१७ पासून श्री. अभिजीत पाटील यांनी उस्मानाबाद, नाशिक, नांदेड व सोलापूर अशा चार जिल्ह्यात साखर कारखाने विकत घेतले. एकापाठोपाठ शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली.
श्री विठ्ठल सेवेस तत्पर…
महाराष्ट्रावर अफजलखान आणि औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळात हिंदू मंदिरात तोडफोड आणि नासधूस करण्याचा प्रकार घडत होता. या दोन्ही आक्रमणांच्या वेळेस खबरदारी म्हणून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठल मूर्ती देगाव गावचे सूर्याजी पाटील (अभिजीत पाटील यांचे 13 वे वंशज) यांच्याकडे संरक्षणासाठी दिली होती. ही श्री विठ्ठल मूर्ती सूर्याजी पाटील यांच्या वाड्याच्या तळघरात ठेवली होती. पुढे मूर्ती त्यांच्या स्वतःच्या शेतातील बारव विहिरीमध्ये पाण्याखाली सुरक्षितपणे ठेवली. मूर्तीच्या सुरक्षिततेकरिता सदर विहिरीतील पाण्याच्या वापर थांबविला होता. आक्रमणाचे संकट टळल्यानंतर विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवकालीन तळघर व विहीर आजही देगाव गावात अस्तित्वात आहे.”
वाटेतील अडचणींवर केली मात…
श्री. अभिजीत पाटील यांचा ऊस वाहतूक ठेकेदार ते स्वमालकीच्या साखर कारखान्याचे चेअरमन हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. साखर कारखानदारीतील माहिती नव्हती, साखर उद्योग अगदीच नवीन होता. त्यावेळी कारखान्यातील सर्व बारकाव्यांवर लक्ष देवून मशिनरी, प्रशासन, शेती विभाग, तोडणी वाहतूक यत्रं णा व कुशल निर्व्यसनी कामगार घेवून वर्षाला एक साखर कारखाना सुरु करण्याचे धाडसी काम केले. सोबत असलेल्या 170 मित्रांच्या सहकार्यांतून शक्य झाल्याचे अभिजीत पाटील नेहमीच बोलतात. या सर्व गोष्टी नवीन होत्या. त्या समजून घेणे व मार्गी लावणे महत्वाचे होते. काही साखर कारखानदारांनी वेळेवर ऊस बिले न दिल्यामुळे नवीन कारखानदारांवर शेतकरी विश्वास ठेवत नव्हते. कारखाना चालविण्यासाठी खेळते भांडवल उभा करणे अशा अनेक अडचणी समोर होत्या. मात्र सहकाऱ्यांच्या साथीने व काटेकोर नियोजनामुळे या सर्व अडचणींवर श्री. पाटील यांनी मात केली.
नवीन ध्येय धोरणे…
सध्याच्या काळात साखर कारखानदारी टिकवायची असेल तर साखर उत्पादनाबरेबरच इथेनॉल, वीज निर्मीती, CNG गस, ऑक्सिजन प्रकल्प असे बायप्रोडक्ट उभारले तरच ऊस उत्पादकांना न्याय देता येणार आहे. त्यामुळे भविष्यात नवीन प्रकल्प उभे करणे व चालू प्रकल्पांमध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मशिनरीमध्ये ऑटोमायझेशन व तांत्रिक बदल करत कमी कामगारांवर जास्तीतजास्त उत्पन्न कसे वाढवता येईल. येणाऱ्या काळाची गरज ओळखून साखरे बरोबरच सोयाबीन मिल, स्पिनिंग मिल, दुध व प्रक्रिया व्यवसाय अशा विविध शेती व शेतकर्ऱ्यांशी निगडीत असलेल्या उद्योग उभारणी करण्याचे धोरणे स्विकारले आहे. तसेच शेतकरी व तरुण यांच्यामध् आये र्थिक समृध्दी आणण्यासाठी सतत प्रयत्न करणे तरुणांना व्यवसाय उद्योग उभारण्यासाठी मदत केली.
साखर उद्योगातील संस्थेचे स्थान…
अभिजीत पाटील यांनी डिव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून चार बंद पडलेले साखर कारखाने सुरु केले. चार जिल्ह्यात बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरु करुन, कारखाना चालवणारा माणूस ही ओळख अभिजीत पाटील यांची बनलेली आहे. आज देशातील साखर कारखानदारी अडचणीत आहे असे सांगितले जात असतानाच श्री. अभिजीत पाटील हे बंद पडलेले कारखाने विकत किंवा चालविण्यास घेऊन नियोजनबद्ध यत्रं णा राबवून आणि काटकसरीने कारभार करून सुस्थितीत आणत आहेत. सर्व कारखाने उत्तम प्रकारे चालवित आहेत. त्यामुळे साखर उद्योगात श्री. पाटील आणि धाराशिव साखर कारखाना हा एक विश्वासार्ह ब्रँड तयार झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा जाणवू लागला त्यावेळी राष्ट्रवादी काग्ँसचे अध्यक्ष श्री. शरद पवार साहेब यांनी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन प्लांट उभे करावेत असे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद देत श्री. अभिजीत पाटील यांनी देशातील पहिला ऑक्सिजन प्लांट उभा केला. साखर कारखान्यांनी आता पर्यंत शेतकर्यांना समृध्द केले. जेव्हा वेळ आली तेव्हा कारखान्याने प्राणवायू बनवण्याचे काम देखील केले. नेहमीच महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम कोरोना काळात प्राणवायू निर्माण करुन सिध्द केले आहे. त्यामुळेच धाराशिव साखर उद्योग हा देशासाठी रोल मॉडेल ठरला आहे.
सामाजिक उपक्रम…
समूहाच्या वतीने दरवर्षी अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले जाते. मुलामुलींना शालेय साहित्य, सायकल वाटप, तसेच मोठ्या प्रमाणात दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. हे काम करत असताना सांगली, कोल्हापूर, महाड, सातारा, या ठिकाणी पूरपस्थितीमुळे अनेक संकट आली. त्यावेळी अनेकांचे संसार उघडे पडले. त्यावेळी हजारो कुटुंबाना मदत पुरवण्याचे काम केले. शाळांना ई लर्निंग, प्रोत्साहान म्हणून संगणक भेट देणे, शुध्द पाणी पिण्यासाठी फिल्टर बसवण्यात आले. गणवेश वह्या वाटप करुन समाजिकतेचा वसा जपला आहे. कोरोनामध्ये डीव्हीपी उद्योग समूहाने फार मोठे काम उभा केले असून कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये डाॅक्टर, पोलिस, आरोग्य विभाग जे भितीच्या वातावरणामध्ये आपले कर्तव्य चोख पार पाडत असताना सर्वत्र लाॅकडाऊन असताना घरी जाता येत नसल्याने स्वतःच्या हाॅटेल कामत मधून सकाळचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण जवळ पास आठ महिने सहाशे लोकांना पुरवण्याचे काम केले. गोरगरीबांना अन्नधान्याचे किट वाटप केले. त्याच बरोबर कोरोना विषयी जनजागृती व्हावी या करीता वाईस काॅलद्वारे अडीच लाख लोकांना संपर्क केला. गावोगावी थर्मल स्कॅनिंग, मास्क वाटप केले. हे करत असताना उस्मानाबाद जिल्ह्यात टेस्टींग लॅब सुरु करण्यासाठी मशिन देवून मोठे योगदान पार पाडले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख रुपये दिले. नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने लोकांच्या सेवेसाठी वाॅर रुम उभा केली. राम मंदिर उभारणीसाठी हातभार म्हणून एक लाख रुपयांचा निधी दिला. कोरोनाकाळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी आदर्श सरपंच भाष्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. एकरी शंभर टन उत्पादन घेता यावे यासाठी शेतकर्ऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभा करावा. या करीता उद्योग व्हा… यासाठी मेळावे घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून एमपीएसीचे विद्यार्थी निरास होवून उत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्या कुटुंबास एक लाख रुपयांची मदत केली.अशा मध्येच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने स्वतःचा डीव्हीपी माॅल रिकामा करुन रुग्णांसाठी शंभर बेडचे हाॅस्पिटल उभे केले.
कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम…
अभिजीत पाटील यांनी कर्मचारी हा एक कुटुंबातील सदस्य मानून त्यांच्यासाठी कायम हिताचे उपक्रम हाती घेतले. कारखाना कर्मचारी हा कारखान्याच्या प्रमुख अंगापैकी एक अविभाज्य घटक आहे. हे लक्षात घेऊन कामगारांच्या हिताचे उपक्रम कायमस्वरूपी राबविले जात असून, कारखान्याने व कामगारांनी मिळून सुकन्या योजना चालू केली आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याच्या पत्नीस कन्यारत्न जन्मल्यास त्या मुलीच्या नावे २५००० रुपयांची FD केली जाते. तसेच शिल्लक रकमेतून कर्मचान्यास मुलांच्या विवाहासाठी व उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. बाहेर गावाहून येणाऱ्या कामगारांना सुरक्षेसाठी हेल्मेट वाटप करण्यात येते. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य मानून कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांचा वाढदिवस साजरा केला जातो. कर्मचान्यांना गाळप हंगाम संपल्यानंतर बोनस, बक्षीस दिले जाते व कर्मचार्ऱ्यांना सन्माची वागणूक दिली जाते.
संस्थेचे महाराष्ट्राच्या वाटचालीतील योगदान…
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध् साखर उद् ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साखर कारखाना व त्याच्याशी निगडीत असणाऱ्या राज्यातील फार माठे अर्थकारण टिकून आहे.चार जिल्ह्यातील चारही ही बंद पडलेले साखर कारखाने सुरु करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. जवळपास अडीच हजार कर्मचार्यांना सुमारे 1400 वाहतूक ठेकेदार व 15 हजार ऊस तोडणी मजूरांना काम दिले जाते. धाराशिव साखर कारखाना यनिुट १, २, ३ व 4 च्या माध्यमातून ३५ ते ४० हजार ऊस उत्पादक, सभासद, वाहन ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी व कारखानगडीत असणाऱ्या सर्व घटकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो.
सांगोला तालुक्यातील बारा वर्षापासून बंद अवस्थेतील सांगोला सहकारी साखर कारखाना 35 दिवसात सुरू करून मोळी पूजन प्रसंगी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, चेअरमन अभिजित पाटील व इतर.
सन्मान व पारितोषिके
- ऑल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशन राष्ट्रीय निर्माण रतन पुरस्कार
- सकाळचा युथ इन्सपिरेटर अवॉर्ड
- दिव्य मराठी प्राऊड महाराष्ट्रीयन अॅवार्ड सकाळ एक्सलन्स ॲवार्ड 2019
- दैनिक नवराष्ट्र वृत्तसमूह यांचा आदर्श उद्योजक
- ठाणे येथील शिवसेनेचा कोविड योध्दा पुरस्कार
- दैनिक पंढरी भूषणचा ‘पंढरी भूषण’ पुरस्कार
संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये…
अभिजीत पाटील यांच्या सोबत त्यांचे 170 मित्र परिवार यांनी एकत्रितपणे डीव्हीपी उद्योग समूहाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. चार जिल्ह्यातील चार साखर कारखाने घेवून धाराशिव साखर कारखाना युनिट 1, 2 ,3 व 4 हे अल्पावधित नावारूपास आलेले श्री. अभिजीत पाटील यांची दुरदृष्टी व खंबीर मित्रांची साथ संस्थेवर असलेले प्रेम आणि कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा यातून हा उद्योग दरवर्षी प्रगती करत आहे. कामातील प्रामाणिकपणा यामुळेच चार साखर कारखाने प्रगतीपथावर आहेत. ऊस वाहतूक ठे केदार ते चार साखर कारखान्यांचा चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास सुरु आहे.
ऑक्सिजन निर्मितीतून वाचविले शेकडो जीव…
संपूर्णदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला, लोक जीवानीशी जावू लागले, त्यावेळी देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करावे असे आवाहन के ले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत त्यावेळी अभिजीत पाटील यांनी स्वतःच्या साखर कारखान्यांत ऑक्सिजन निर्मितीचे शिवधनुष्य उचलले. साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती खरेतर हे धाडसाचे पाऊल होते. या प्रकल्पाला पूर्ण करण्यास कमीतकमी तीन महिने तरी लागतील असे जाणकारांचे मत होते. मात्र, हा प्रकल्प १५ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास श्री. अभिजीत आबा पाटील यांनी घेतला. त्यासाठी तोटा सहन करून इथेनॉल प्रकल्प बंद ठेवला. दिवसाचे चोवीस तास अविरतपणे काम करून सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये तांत्रिक बदल करून फक्त काही मोजकेच पार्टस परदेशातून मागवून संपूर्ण भारतीय बनावटीचा राज्यातील नव्हे तर संपूर्णदेशातील साखर कारखान्यातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १५ दिवसांमध्ये चालू के ला. या ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब, देशाचे कें द्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब, जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील साहेब, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे साहेब, उस्मानाबादचे पालक मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निबांळकर, आमदार कै लास घाडगे पाटील व इतर मान्यवरांनी कारखान्याचे अध्यक्ष श्री. अभिजीत आबा पाटील यांच्या धाडसाचे कौतुक केले. हा प्रकल्प संपूर्णदेशासाठी मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार काढले. हा ऑक्सिजन प्रकल्प देशासाठी दिलासादायक व इतर कारखान्यांसाठी दिशा दर्शक ठरला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्य कु टुंबातील तरुण अभिजीत पाटील सारखे मोठे उद्योजक, सामाजिक, राजकिय विविध क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतो. त्यासाठी तरुणांनी अभिजीत पाटील यांचे सारखे मोठी स्वप्ने पाहून आपली ध्ये निश्चित करुन जिद्दीने धाडसाने चिकाटीने आपल्या स्वतः बरोबर आपण या देशाचे मातीचे काही तरी देणे लागतो. म्हणून आपण आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला, आपल्या जिल्ह्याला व आपल्या तालुक्याला गावाला समृद्ध करण्यासाठी आपल्या सोबत अभिजीत पाटील यांच्या प्रमाणे निर्व्यसनी मित्रांचा समूह उभा करत आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्येप्रत्येक तरुणांनी सहभाग नोंदवावा.
देशातील पहिला ऑक्सिजन पायलट प्रोजेक्ट उभरल्याबद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया
अभिजीतजी, आपण स्वतःचे नुकसान सोसून देशातील पहिला जीव वाचवणारा प्राणवायू प्रकल्प उभा केला, त्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या वतीने धन्यवाद.!
– मा. उद्धवजी ठाकरे
(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
पवार साहेबांनी आवाहन केले आणि अभिजीत पाटील आणि त्यांच्या टीमने त्याला प्रोत्साहन देत भारतातील पहिला पायलट प्रोजेक्ट उभा केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि अभिजीतने दुसऱ्या साखर कारखानदारांना त्या प्रोजेक्ट उभारणीसाठी मार्गदर्शन करावे. अभिजीत सारखे जिद्द असणारे तरुण सहकारी काय करू शकतात याचे उत्तम
उदाहरण म्हणजे देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प!
– मा. अजितदादा पवार
(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
खूप आनंद आहे की,अभिजीत पाटील यांनी कोटीत रुपये खर्चून देशातील पहिला ऑक्सीजन प्रोजेक्ट करण्याचे धाडस दाखवले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.!
– मा. राजेशजी टोपे
(आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य)
अभिजीत पाटील साहेब यांनी पहिल्या दिवसापासून दिवस-रात्र एक करून देशातील पहिला प्रोजेक्ट आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात उभा केला. आमच्या सर्व जिल्हावासियांच्या वतीने अभिनंदन करतो, साक्षात पंढरपुरचा विठ्ठल अभिजित पाटील यांच्या रूपाने आम्हाला पावला.!
– मा. ओमराजे निंबाळकर
(खासदार, उस्मानाबाद)
मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की, चेअरमन अभिजित पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि पहिला प्रकल्प उभा केला.!
– मा. नितीनजी गडकरी
(केंद्रीय मंत्री, रस्तेवाहतूक व महामार्ग)
आमचे मित्र अभिजीत पाटीलजी यांनी स्वतःचे प्रोडक्शन बंद ठेवून फार कमी वेळेत देशातील पहिला प्राणवायू प्रकल्प उभारला. अभिजित पाटील यांनी टाकलेले हे पाऊल देशातील सर्वच साखर कारखान्यांना दिशादर्शक ठरणार आहे.!
– मा. जयंतजी पाटील
(जलसंपदामंत्री, महाराष्ट्र राज्य )
मी स्वतः जाऊन अभिजीत पाटील यांची धडाडी बघितली. ते दिवस-रात्र तेथे स्वतः उभे राहून काम करत होते. त्यांनी मला संपूर्ण प्रोजेक्टची माहिती दिली आणि अल्पावधीतच प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवला.
– मा. शंकरराव गडाख
(पालकमंत्री, उस्मानाबाद)
अभिजीत पाटील साहेबांनी अठरा दिवसात भारतातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केला, त्याबद्दल त्यांचे धाराशिव वासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार.!
– मा. कैलास पाटील
(आमदार, कळंब-उस्मानाबाद)