कॉन्फिडंस ग्रुपचा ‘२२ राज्यांमध्ये विस्तार’

आमच्या व्यवसायातील प्रत्येक युनिट प्रत्येक सामान्य नागरीकांच्या गरजा पूर्ण करु शकेल, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात आहोत. एका शहरातुन सुरु झालेला या प्रकल्पाने आता २२ राज्यांना व्यापले आहे. बॉटलिंग प्लांट्स, सिलिंडर मॅनुफॅसिटुरिंग यूनिट, ऑटो एलपीजी डिस्पसिेंग स्टेशन, गो गॅस डीलरशिप किंवा गो गॅस इलीटच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रमुख शहरात, प्रत्येक प्रमुख जिल्ह्यात आणि प्रत्येक घरापर्यंत पाहोचण्याचा कंपनीचा मानस आहे. लवकरात लवकर हे उद्दीष्ट गाठण्याच्या प्रयत्नात कंपनी आहे. यासाठी संपूर्ण पारदर्शी वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्या नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी डीलर्सला कुठलीही अनामत रक्कम देण्याची गरज नाही. केवळ एका कराराच्या माध्यमातून कोणीही कंपनीचा डीलर बनू शकतो.

उत्साह आणि उत्कठता आवश्‍यक

नितीन खारा म्हणाले, आपल्या ब्रँडला नंबर वन बनविणेजितके सोपे आहेतितकेच कठीण मिळवलेला क्रमांक टिकवून ठेवणे आहे. गॅस सिलिंडरची निर्मिती करीत नंबर एक क्रमांक दीर्घकाळ टिकवून ठेवणारी ‘गो गॅस’ ही एकमेव कंपनी आहे, याचा मला अभिमान आहे. तरुणांमध्ये उत्साह उत्साह आणि उत्कटता असायला हवी. जीवनामध्ये चढ-उतार येतच असतात. मात्र, आपल्याला सकारात्मक विचारांसह समोर जात राहणे आवश्‍यक आहे. गॅस सिलिंडर तयार करणारी कॉन्फिडंस कंपनी सर्वात मोठी आहे. कंपनीचे १६ प्लँट आहेत. इंडियन ऑइल, भारत गॅस, हिदुस्थान पेट्रोलियम या तीनही शासकीय कंपन्यांशिवाय खासगी कंपनीना देखील सिलिंडरचा पुरवठा केला जातो. गो कंपन्या व्यतिरिक्त कंपनी स्वतः बड्या खासगी कंपन्यांना गॅस सिलिंडर देखील पुरवते. कंपनी स्वत: गो गॅसच्या नावावर एलपीजी सिलिंडर देखील पुरवते. त्यांनी सांगितलेनव्वदच्या दशकात गॅस कनेक्शन मिळणे खूप कठीण काम मानले जात होते. या काळात आम्ही कंपनीची पायाभरणी केली. हे कनेक्शन १० हजार ते १५ हजार रुपये देऊन ब्लॅक मार्केट मधून गॅस कनेक्शन घ्यावे लागत होते. प्रथम आम्ही गॅस चुल बनविण्यास सुरुवात केली. १९९३ साली जेव्हा बदल घडून आले त्यानंतर गॅस सिलिंडर वितरणाचा व्यवसाय सुरु झाला. आज संपूर्ण देशात कंपनीचे
५८ बॉटलिंग प्लांट आहेत.

प्रत्कये किचनला ब्लास्ट प्रुफ बनविण्याचे स्वप्न

देशातील प्रत्येक किचनला ब्लास्ट प्रुफ बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून २०१७ साली कंपनीने कम्पोजिट एलपीजी सिलिंडर बनवायला सुरुवात केली. कम्पोजिट गॅसचे तीन वैशिष्ट्य आहेत. लोखंडाच्या सिलिंडरच्या तुलनेत कम्पोजिट सिलिंडरचे वजन तुलनेनेअर्धे असते. त्यामुळे, या सिलिंडरला उचलताना कंबरेवर अत्यंत कमी प्रमाणात ताण येतो. दुसरे वैशिष्ट म्हणजे ब्लास्ट प्रुफ सिलिंडर. आपण वृत्तपत्रामध्ये सिलिंडरच्या झालेल्या स्फोटामुळे जिवितहानी आणि वित्त हानी झाल्याच्या बातम्या नेहमी वाचतो. मात्र, या कंम्पोजिट सिलिंडरचा स्फोट होत नाही. तसेच, आग लागल्यानंतर देखील या सिलिंडरमुळे कुठलेही नुकसानहोत नाही. या वैशिष्ट्यामुळे आज अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरेंट्स लोखंडाच्या सिलिंडर एवजी कम्पोजिट गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत. काहींनी तर आपल्या प्रतिष्ठानामध्ये याबाबत फलकसुद्धा लावला आहे. तीसरे वैशिष्ट्य म्हणजे या सिलिंडरचे पारदर्शी असणे.

बॉटलिंग प्लांट्स

देशामध्ये एलपीजीच्या अखंडीत वितरणासाठी १५० एलपीजी कॅरियर्स कॉन्फिडंस ग्रुप या खासगी क्षेत्रामध्ये भारतातील सर्वात मोठा एलपीजी बॉटलिंग नेटवर्क आहे. संपूर्ण देशामध्ये ग्रुपचे ५८ फुटी फंक्शनल एलपीजी बॉटलिंग प्लांट्स आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्कृष्ट सुरक्षेची विशेष काळजी घेत तयार करण्यात आलेल्या एक एक बॉटलिंग प्लांटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे, या बॉटलींग प्लांटमध्ये भारतातील प्रमुख इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, एचपीसीएल सारख्या पीएसयु कॉन्फिडंस समुहावर पूर्ण विश्‍वास ठेवतात.

५० लाख सिलिंडरच दरवर्षी उत्पादन

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील बुरुजवाडा गावामध्ये सिलिंडर निर्मितीच्या १५ व्या युनिटसह समुहाची वार्षिक सिलिंडर निर्माण क्षमता ५० लाख सिलिंडर झाली आहे. दशका पूर्वी सुरवात झालेल्या या प्रवासात नागूर, मुंबई, हैद्राबाद, जलपाईगुडी, बाजपूर या प्रमुख शहरांसह गुजरात आणि झारखंडमध्ये सुद्धा सिलिंडर मॅनिफॅक्चुरिंग युनिट्स आहे. हे युनिट्स भारतगॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसाठी सिलिंडर बनवितात. आजच्या घडीला कॉन्फिडंस ग्रुपची उत्पादन क्षमता संपूर्ण भारतामध्ये सर्वांत जास्त आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेमुळे सुरवातीपासून जुळलेला ग्राहक आज देखील टिकून आहे

२०९ ऑटो एलपीजी डिस्पेसिंग स्टेशनमुळे पर्यावरणाची रक्षा

सरकारच्या अथक प्रयत्नानंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये बस, टॅक्सी, ऑटो आदी सार्वजनिक वाहनांना पेट्रोल आणि डिझेलवर निर्भर राहण्याऐवजी फक्त एलपीजी गॅसवर ही वाहनेचालविण्याची परवानगी देण्यात येत आहे. जुन्या वाहनांना देखील आता एलपीजी वाहनांमध्ये रुपांतरीत केल्या जात आहे. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या मागणीला कॉन्फिडंस ग्रुप पूर्ण करीत आहे. तमिलनाडु, कर्नाटक, तेलंगना अशा राज्यांनी तीन चाकींसाठी एलपीजी अनिवार्य केले आहे. पर्यावरणाची चिंता करणाऱ्या सर्व समुहांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यामुळे, कॉन्फिडंस ग्रुपवर अधिकाधिक ॲटो एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन सुरु करण्यासाठी दबाव टाकण्यात येतो आहे. सध्या ग्रुपचे १९४ ऑटो एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगना, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्‍चिम बंगाल आणि मध्यप्रदेश येथे कार्यरत आहेत. लवकरच २०० नवे स्टेशन सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

४ ते ३३ किलो क्षमतेमध्ये उपलब्ध

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा विविध क्षेत्रासाठी एलपीजी सिलिंडर बनविणे कॉन्फिडंस ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. गो गॅसच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे गॅस सिलिंडर वीओटी आणि एलओटी दोनही प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पंश्‍चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये कॉन्फिडंस नेटवर्कच्या माध्यमातून सिलिंडर सहज प्राप्त होतात. ग्राहकाच्या गरजेनुसार विविध क्षमतेमध्ये हेसिलिंडर उपलब्ध आहेत. कमी वापर करणाऱ्या बॅचलर्स सारख्या ग्राहक वर्गासाठी कमीत कमी ४ किलो आणि मोठ्यात मोठ्या व्यावसायीक गटासाठी ३३ किलो क्षमतेचेसिलिंडर उपलब्ध आहेत.

याशिवाय, ८ किलो, १२ किलो, १५ किलो, १७ किलो आणि २९ किलो क्षमतेचेसिलिंडर उपलब्ध आहेत. यामुळे, ग्राहक आपल्या आवश्‍यक्तेनुसार सिलिंडरची निवड करु शकतील. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, एन. सी. आर. सह देशातील अन्य २२ राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक ब्लॉक आणि परीसरामध्ये कॉन्फिडंस ग्रुपचेसिलिंडर उपलब्ध आहेत.

ॲटो एलपीजीचा पर्याय

प्रदूषण ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने प्रदूषण वाढविण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे, ऑटो एलपीजी वितरण केंद्रांचेनेटवर्क ही काळाची गरज आहे. प्रदुषण पसरविणाऱ्या पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून तुम्हाला ऑटो एलपीजीचा वापर करता येईल. एलपीजी एक क्लीन इंधन आहे. विशेष म्हणजेहे इंधन आपल्या बजेटमध्ये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीला पर्याय म्हणून देखील ‘ॲटो एलपीजी’चा वापर होऊ शकतो. ऑटोचे इंधन म्हणून एलपीजी आता सहज उपलब्ध असून ऑटो एलपीजीमध्ये कंव्हर्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दशकांपासून एलपीजीशी संबंधित व्यवसायाचा कॉन्फिडंस ग्रुपला अनुभव आहे. तसेच, ॲटो एलपीजी डिस्पेंसींग स्टेशनबाबत तंत्र व व्यावसायिक दृष्टीकोनातून कौशल्य आहे. त्यामुळे, आम्ही आत्मविश्‍वासाने परीपूर्ण आहोत. म्हणूनच, आम्ही देशातील प्रत्येक ठिकाणी ऑटोमोटिव्ह इंधन म्हणून एलपीजी उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. या नवीन उपक्रमात आमच्यासोबत सामील होण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करतो.

कॉन्फिडंस ग्रुप एका दृष्टीक्षेपात

  • कॉन्फिडंस पेट्रोललियम नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची रजिस्टर यादीतील ही एक कंपनी असून एलपीजी क्षेत्रातील देशामधील जगविख्यात कंपनी आहे.
  • या दशकाच्या अखेरीस एलपीजी व सीएनजी संबंधित व्यवसायात जगातील सर्वात मोठी कंपनी होण्याचे एक स्वप्न
  • एका छताखाली सिलिंडर उत्पादन सुविधा देणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी
  • भारतातील २२ राज्यात सुमारे ५८ बॉटलिंग प्लांट असणारी देशातील एकमेव खासगी कंपनी
    • देशभरात स्टँडअलोन स्वरुपातील २०९ गोगॅस ऑटो एलपीजी वितरण कें द्र असलेली भारतातील आघाडीची ऑटो एलपीजी साखळी
    • गो गॅस पॅक एलपीजीचे २७ वितरण कार्यालय असलेले देशव्यापी नेटवर्क
    • कॉन्फिडेंस ग्रुपने सीएनजी सिलिंडरची निर्मिती करीत सीएनजीच्या रिंगणात प्रवेश के ला आहे. यासाठी बेंगळुरू येथे १०० सीएनजी स्शन उभारण् टे यासाठी गेल या गॅस वितरण कंपनी बरोबर करार केला आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

देशासह विदेशामध्ये कॉन्फिडंस ग्रुपचा पताका रोवला जावा या महत्वाकांशेत कॉन्फिडंस ग्रुप आहे. ‘सकाळ माध्यम समुहा’सोबत विशेष चर्चा करताना नितीन खारा यांनी कॉन्फिडंसच्या भल्या मोठ्या विस्तारावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, वेगाने पावले टाकत आमच्या कं पनीने ५८ शहरामध्ये बॉटलिंग प्लांट्स स्थापन केले आहेत. यामध्ये खासगी आणि पब्लीक सेंटरच्या अधीन असलेल्या सर्व मोठ्या कं पन्यांसाठी कॉन्फिडंस ग्रुपतर्फे बॉटलिंग करण्यात येत. खासगी आणि पब्लीक सेक्टर कंपन्यांसाठी बॉटलिंग के ल्या जात. कॉन्फिडंस ग्रुपकडे स्वत:च्या मालकीची १५० एलपीजी कॅ रियर्सची फ्लीट आहे. यामुळे, एलपीजीच्या वाहतुक करण्याचा खर्चनियंत्रणात राहतो. इतर कु णाकडे अशा फ्लीट नाहीत. देशामध्ये आज २२ कोटी एलपीजीचे उपभोक्ते आहेत. यामध्ये, दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ होते आहे. या मागणीला पूर्ण करण्यासाठी कॉन्फिडंस ग्रुप योगदान देत आहे.

– नितीन खारा,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कॉन्फिडंस पेट्रोलियम इंडिया लिमिटेड

पारदर्शी, वजनाने हलके आणि स्फोट रोधक या तीन वैशिट्यांनी परिपूर्ण असलेल्या कम्पोजिट सिलिंडरचे उत्पादन संपूर्ण भारतात फक्त कॉन्फिडंस ग्रुपतर्फे केले जाते. याचा फायदा असा की कोणत्याही क्षणी सिलिंडरमध्येकिती गॅस उरला आहे, हे आपण बघू शकतो. सिलिंडरच्या पारदर्शी भागाकडे बघून ही माहिती मिळू शकते. दुसरे महत् वाचे म्हणजे हा ग्रुप ‘गो गॅस’ ब्रँडने एलपीजीचे वितरण करते. भारतातील अनेक शहरामध्ये नुकतेच ‘गो गॅस एलीट’च्या नावाने कम्पोजिट सिलिंडरच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. एलीट सिलिंडरला घरात, पिकनिकसाठी, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्येवापर के ला जाऊ शकतो. ४ किलोपासून ३३ किलोपर्यंतच्या विविध वजनाचे हे सिलिंडर घरगुती, व्यापारी आणि व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त आहेत. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या यादीत असलेला कॉन्फिडंस ग्रुप उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहे. भारतातील इंधनाच्या क्षेत्रामध्ये कॉन्फिडंस ग्रुप हे एक महत्वाचे नाव आहे. लवकरच या नावाचा उल्लेख संपूर्ण देशासह विदेशामध्येही होईल, असा विश्‍वास आहे.

– इलेश खारा,
संचालक, कॉन्फिडंस पेट्रोलियम इंडिया लिमिटेड

English