वास्तुकलेला (अर्कीटेक्चर) सर्व कलांची जननी म्हटले जाते आणि म्हणूनच ज्या वास्तुमध्ये रहिवाशांना आनंद, समाधान, सुखाची अनुभूती येते तेच कोणत्याही वास्तुविशारदाचे खरे यश म्हणता येईल. या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या पुण्यातील मोजक्या नावांत विश्वास कुलकर्णी (व्हीके ) यांचा अग्रक्रमांक लागतो . गेली ५० वर्षे आर्किटेक्ट म्हणून काम करणारे व्हीके आणि त्यांची टीम (व्हीके ग्रुप) आता आर्किटेक्चरसह (ए), एन्व्हायर्नमेंट (ई), इंटिरीअर डिझाईन (आय), ऑपरेशन्स (ओ) आणि अर्बन प्लॅनिग व लँडस्केप (यू) अशा संलग्न क्त्षे रांमध्येही आपला ठसा उमटवीत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिराच्या डिझाईनपासून सौदी अरेबियात विकसित होत असलेल्या ‘द लाईन’ या रस्तेविरहित स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या‘व्हीके ग्रुप’चा आजपर्यंतचा हा प्रवास…