उद्योजक राहुल पापळ, कन्या राजस, आई आशा आणि पत्नी अक्षदा पापळ

लाडाची कुल्फी : भारतातील सर्वात मोठी कुल्फी आऊटलेट चेन

पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीत कमतरता असतानाही मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर रोजगार-व्यवसायासंदर्भात छोटे छोटे प्रयोग करीत राहुल पापळ यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली. अगदी कंपनीतील मार्केटिंग हेड पदापर्यंत मजल मारली. मात्र त्यांच्यातील अंगभूत गुणवत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी, सतत डोक्यात अभिनव कल्पना आणि विचार घोळत असल्यामुळे त्यांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आवडत्या कुल्फीचा ट्रेंड निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जवळ होतं-नव्हतं ते पणाला लावून ‘लाडाची कुल्फी’ नावाचा ब्रॅन्ड सुरू केला.

आज या ब्रॅन्डची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. महाराष्ट्र आणि बेळगाव येथे एकूण मिळून चारशे शाखा कार्यरत असून, दिल्लीपासून केरळपर्यंत सुमारे दोन हजार शाखा प्रस्तावित आहेत. शेकडो युवकांना या शाखांद्वारे आत्तापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. आता ‘लाडाची कुल्फी’ ही ‘इंडियाज लार्जेस्ट चेन आफ कुल्फी आऊटलेट्स’ बनली आहे. इयत्ता आठवीत दोनदा अपयश आले, तरी निराश न होता आणि कसलाही तक्रारीचा सूर न लावता स्वतःची खरी क्षमता ओळखून ठामपणे वाटचाल करीत राहिल्याने राहुल आज पाच कंपन्यांचे मालक आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील प्रत्येक देशात ‘लाडाची कुल्फी’ पोहोचविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हे करताना त्यांनी अनेक युवक, तरुण आणि विशेषतः महिलावर्गाला स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

संघर्षमय बालपण

उद्योजक राहुल पापळ हे मूळचे पुण्यातील बिबवेवाडी गावठाणचे. तेथील ‘सीताराम आबाजी बिबवे शाळे’त आणि ‘यशवंतराव चव्हाण शाळे’त त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. वडील शिवाजी चंद्रकांत पापळ हे सुतारकाम करीत असत. त्यांनी शाळेजवळच पानपट्टी सुरू केली. त्या वेळेस राहुल त्यांना मदत करायचे. राहुल यांना आठवीच्या परीक्षेत दोन वेळा अपयश आले. त्यामुळे त्यांनी ‘सरस्वती विद्या मंदिर रात्रशाळे’त शिक्षण घ्यायचे ठरविले, परंतु तेथेही त्यांच्या पदरी अपयश आले. अशातच वडील शिवाजी पापळ यांचे अकाली निधन झाले. आई आशा यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलली. घरी राहूनच फुलांचे हार ओवून त्या विक्री करीत असत. त्यांनी मुलाला परोपकार आणि मदतशीलतेच्या संस्कारांची शिदोरी दिली, त्यामुळे ऐन उमेदीच्या वयात राहुल यांनी समाजकार्याचा वसा घेतला. मात्र मराठी तरुणांनी केवळ सण-उत्सवाच्या मागे न धावता पैसे कमवून मगच समाजकार्य करावे, अशी शिकवण दुर्गमहर्षी गुरुवर्य दिवंगत प्रमोद मांडे, मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड यांनी राहुल यांना दिली. ‘खिशात गांधी आणि डोक्यात शिवाजी महाराज हवेत’ या प्रवीणदादा गायकवाड यांच्या वाक्याने राहुल यांचे जीवनच बदलले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती यांच्या संपर्कात आल्यावर राहुल यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.

व्यवसायाची मुहूरमेढ

कुटुंबाला हातभार लागावा व कष्टाचे मोल समजावे, या हेतूने आई आशा यांनी राहुल यांना औषध कंपनीत कामासाठी पाठविले. येथेच योगायोगाने त्यांना सेल्समन म्हणून कामाची संधी मिळाली. मार्केटिंगचा कसलाही अनुभव नसताना राहुल सलग १० वर्षे केवळ गुणवत्तेच्या जोरावर कंपनीत अव्वल राहिले. पुढे आईस्क्रीमच्या एका कंपनीत ते नोकरी करू लागले. कष्टाच्या बळावर त्यांची नियुक्ती एरिया मॅनेजर म्हणून झाली, परंतु कमी पगार आणि अपेक्षा यांचा ताळमेळ बसेना. कशाबद्दलही तक्रार करत न बसता प्रयोगशील वृत्ती व जोखीम घेण्याची तयारी या जोरावर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. पत्नी अक्षदा यांचे दागिने गहाण ठेवून २०१७ मध्ये त्यांनी बिबवेवाडी परिसरात ‘स्पीडो इंटरनेट’ची सुरुवात केली. पुढे तुटपुंज्या पैशांत आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करीत असतानाही सतत नवनव्या कल्पना त्यांच्या डोक्यात रुंजी घालायच्या. मग इंटरनेटच्या व्यवसायातून जमा झालेली काही रक्कम आणि जवळच्या शिल्लक पैशांमधून त्यांनी ‘लाडाची कुल्फी’ नावाचा ब्रॅन्ड सुरू केला. ध्येयावर लक्ष आणि निर्धाराने पाय रोवून काम करण्याच्या त्यांच्या गुणांमुळे ‘लाडाच्या कुल्फी’ने बाळसे धरले आणि हळूहळू व्यवसायाचा विस्तार होऊ लागला.

‘लाडाची कुल्फी’चे उत्पादन सुर

मित्र सोहनलाल भाटी यांच्याबरोबर त्यांनी पुण्यातील कात्रज तळ्याजवळील जागेत आईस्क्रीमची फॅक्टरी सुरू केली. त्यासाठी सोहनलाल यांनी स्वतःजवळील काही रक्कम, तर राहुल यांनी इंटरनेटच्या व्यवसायामधील पैसे टाकून उत्पादन सुरू केले. मैत्रीला जागत राहुल यांनी भाटी यांच्याकडेच पुढे फॅक्टरी चालविण्याची जबाबदारी सोपविली. सुमारे एक हजार चौरस फुटांच्या जागेत आईस्क्रीमचे उत्पादन सुरू झाले. व्यवसायाचा विस्तार झाल्याने आता १८ हजार चौरस फुटांच्या जागेत उत्पादन सुरू झाले. भविष्यात व्यवसायाची वाढती गरज म्हणून ६० हजार चौरस फूट जागेत फॅक्टरी चालविण्याचे नियोजन आहे. या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांना कुटुंबाचे मोलाचे सहकार्यमिळाले. या व्यवसायात राहुल यांची बहीण शीतल व तिचे पती अभय चव्हाण आणि सर्व भाऊ-बहिणी, तसेच पापळ कुटुंबातील अरुण पापळ, गौरव पापळ, संगम पापळ व आशिष पापळ यांसह सर्व काका यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. त्याबरोबरच ॲड. नीलेश मांढरे, उमेश देवकर, चेतन घाडगे, अनिकेत यादव, राहुल नलावडे आणि बिबवेवाडी गावठाणातील असंख्य मित्रपरिवारही कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिला.

पुण्यातील पहिली शाखा

उत्पादन आणि मागणी वाढू लागल्यानंतर पुण्यात ‘लाडाची कुल्फी’ची पहिली शाखा ७ एप्रिल २०१८ रोजी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अवघ्या दोन वर्षांत ‘लाडाची कुल्फी’च्या दीडशे शाखा झाल्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनला संधी मानून त्यांनी वितरकांची यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला. ब्रॅन्डिंग आणि डिझाईनमध्येबदल केले. याच काळात अनेक व्यवसाय-उद्योगांमध्ये कामगारकपात, वेतनकपात होत असताना राहुल यांनी मात्र कामगारांचे संसार सांभाळले. माणुसकी जपत त्यांना वेतन, बोनस आणि दोन वेळचे जेवण दिले. त्यामुळे कामगारांचे ‘लाडाची कुल्फी’शी आपुलकीचे नाते तयार झाले आहे. आज ‘लाडाची कुल्फी’च्या जवळपास ४०० शाखा झाल्या आहेत. तसेच दिल्लीपासून केरळपर्यंत दोन हजार शाखांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. शॉप्स, फूड ट्रक (स्थिरगाडी) आणि ॲपे रिक्षाच्या माध्यमातून ‘लाडाची कुल्फी’ ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. आता ‘लाडाची कुल्फी’ हा ‘इंडियाज लार्जेस्ट चेन आफ कुल्फी आऊटलेट्स’ असा ब्रॅन्ड झाला आहे. ‘लाडाची कुल्फी’ म्हणजे सर्वांच्या ‘जिभेवर रेंगाळणारी चव’ ठरली आहे.

६० प्रकारच्या कुल्फी, आईस्क्रीम

‘लाडाची कुल्फी’मध्ये शाही मलई, मॅंगो, गुलकंद, पिस्ता, चॉकलेट, रेड पेरू, चिकू, सीताफळ, जामून अशा ११ प्रकारच्या फ्लेवरच्या कुल्फीचे उत्पादन फॅक्टरीमध्ये केले जाते. स्ट्रॉबेरी कुल्फीची चवही लवकरच ग्राहकांना चाखायला मिळणार आहे. आपण करीत असलेल्या सर्वच कुल्फी, आईस्क्रीमच्या उत्पादनांमध्ये ट्रान्सफॅट आणि पाण्याचे प्रमाण शून्य असेल, याची काळजी राहुल यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे. पाश्चराईज्ड दूध न वापरता कच्चे दूध, साखर आणि फळांचा पल्प असे नैसर्गिक मिश्रण असल्याने ‘लाडाची कुल्फी’ची उत्पादने आरोग्यदायी ठरली आहेत. विशेष म्हणजे, अगदी हिवाळ्यातही तुम्ही मनोसक्त आईस्क्रीम, कुल्फीचा आस्वाद घेऊ शकता. ‘आरेंज नागपूर’, पेरू, चिकू, गुलकंद इत्यादी ११ फ्लेवरच्या कुल्फी, तसेच ग्राहकांच्या मागणीवरून मटका ड्रायफ्रूट कुल्फी हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन त्यांनी बाजारात आणले आहे. याशिवाय, मिल्कशेक, मस्तानी, कॉकटेल आणि खास मधुमेहींसाठी उत्तम दर्जाचे ‘शुगर फ्री’ आईस्क्रीमदेखील ‘लाडाची कुल्फी’ची खासियत ठरली आहे. फूड ट्रकपासून सुरुवात झालेल्या ‘लाडाची कुल्फी’चे आज सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात प्रीमियम शॉप आहे. गरिबांपासून मध्यम वर्गीय, श्रीमंत, सिनेअभिनेते, राजकारणी यांच्यामध्ये ‘लाडाची कुल्फी’ लोकप्रिय झाली आहे. सध्या या फॅक्टरीत ६० प्रकारच्या कुल्फी आणि आईस्क्रीमची निर्मिती केली जाते. सर्वच उत्पादनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे आणि त्यामुळे ‘लाडाची कुल्फी’कडे त्यांची पावले पुन्हा पुन्हा वळतात. ही गोष्ट लक्षात घेऊन ‘माझा ग्राहक हाच देव’ अशी मनाशी खूणगाठ बांधून ‘लाडाची कुल्फी’चे गुणवत्ता नियंत्रण आणि मूल्यवर्धन याकडे राहुल स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असतात.

अत्याधुनिक फॅक्टरीमध्ये कुल्फीचे उत्पादन
अत्याधुनिक फॅक्टरीमध्ये कुल्फीचे उत्पादन
अत्याधुनिक फॅक्टरीमध्ये कुल्फीचे उत्पादन

नवीन उद्योजक घडविण्याचे स्वपं

कमीत कमी खर्चात रोजगार निर्मिती करून नवीन उद्योजक घडविणे, हे ध्येय उद्योजक राहुल पापळ यांनी ठेवले आहे. विदेशातील उद्योग आपल्या देशात पिझ्झा, बर्गर विकतात. मग आपल्या देशातील पारंपरिक मटका कुल्फीला आधुनिक रूप देत सर्वत्र का पोहोचवू नये, असा विचार कायम त्यांच्या मनात घोळत असतो. मराठी माणसानेही स्वतःचा व्यवसाय करावा, अशी त्यांची तळमळ आहे. उद्योग सुरू करताना काय केले पाहिजे, यापेक्षा कोणत्या चुका करू नये, हे नवउद्योजकांना ते समजावून सांगत आहेत. तसेच स्वतःची बलस्थाने, कामातील अडथळे, संधी आणि त्रुटी यांवर तरुण, होतकरू उद्योजकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्या दृष्टीने चार वर्षांपासून व्यावसायिक परिषदा आणि वार्षिक स्नेहमेळावे भरविले जात आहेत. त्यात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील अनेक उद्योजक आणि नव्याने व्यवसाय सुरू करण्याची ऊर्मी असणारा तरुणवर्ग उपस्थित असतो. या मेळाव्यात वर्षभरात उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांना सन्मानित केले जाते.

आर.एस.पापळ मार्केटिग प्रा. लि.ची स्थापना

‘लाडाची कुल्फी’ला सुरुवात केल्यानंतर राहुल पापळ यांनी अन्य ब्रॅन्डची निर्मिती व त्यांच्या संवर्धनाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामध्ये, ‘ब्रॅन्ड+’, ‘स्पीडो इंटरनेट’, ‘स्टेप अप कॉफी’, ‘ओरा केक’ आणि ‘महालक्ष्मी फूड्स’ यांचा समावेश आहे. त्यापैकी ‘ब्रॅन्ड+’ या कन्सल्टिंग सर्व्हिसेसला सुरुवात झाली आहे. यामध्ये ग्राहकांना स्ट्रॅटेजी प्लॅनिंगबरोबरच उत्पादनांचे ब्रॅन्डिंग, तसेच सल्ला सेवा दिली जाते आहे. आत्तापर्यंत अनेक लहान-मोठ्या कंपन्यांची कामे ‘ब्रॅन्ड+’च्या माध्यमातून झालेली आहेत. हे सर्व ब्रॅन्ड एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने १० आॅक्टोबर २०२० ला ‘आर. एस.पापळ मार्केटिंग प्रा.लि.’ची स्थापना करण्यात आली. भविष्यात ‘आर.एस. ग्रुप’ला सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्या जोडल्या जाणार आहेत.

सामाजिक कार्यातही पुढाकार

दुर्गमहर्षी दिवंगत प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘झुंजार शिलेदार सेवा संस्थे’च्या माध्यमातून राहुल पापळ यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्या वेळी गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेबाबत बोलताना मांडे यांनी, एकेका उद्योजकाने गड-किल्ले दत्तक घेतले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे नमूद केले होते. तोच विचार राहुल यांच्या मनात आजही रुंजी घालतो. ‘जो छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतो. त्याने गरीब असू नये,’ अशी राहुल यांची धारणा आहे. त्या दृष्टीने उद्योगाचा विस्तार करीत असताना महाराजांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून किल्ला दत्तक घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी आपल्या व्यवसायाच्या सीएसआर फंडाची रक्कम ते गड-किल्ल्यांसाठी राखून ठेवत आहेत. भविष्यात अशाच विचारांतून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३५० उद्योजकांनी एक-एक किल्ला दत्तक घेण्याची तयारी ठेवली, तर या कार्यासाठी सरकारवर पैसे मागण्यासाठी अवलंबून राहावे लागणार नाही, असे ते आवर्जून सांगतात.

कुटुंबाचे भक्कम पाठबळ

‘लाडाची आईस्क्रीम’चा विस्तार करताना राहुल पापळ यांना कुटुंब आणि मित्रांचे भरभक्कम पाठबळ मिळत आहे. आई आशा यांच्याकडे वित्त नियोजन, पत्नी सौ. अक्षदा यांच्याकडे गुणवत्ता नियंत्रण आणि कस्टमर केअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय त्या बिबवेवाडी शाखेचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. मित्र सोहनलाल भाटी यांच्याकडे आईस्क्रीम, कुल्फीच्या उत्पादनाची (कूलकिंग) तर प्रविण कोकाटे हे जनरल मॅनेजर (एचआर ॲन्ड आपरेशन) म्हणून काम पाहत आहेत. स्वतः राहुल पापळ हे संशोधन व विकास, मार्टिकेग आणि ब्रॅंडिंगची जबाबदारी सांभाळत आहेत.

‘राजस’ठरली ब्रॅन्ड ॲम्बॅसिडर

राहुल आणि अक्षदा यांची कन्या राजस (वय ६) हिच्या जन्मानंतर व्यवसायाचा वेगाने विस्तार होत गेला. त्यामुळे ‘लाडाची कुल्फी’ची ती ब्रॅन्ड ॲम्‍बॅसिडरच ठरली आहे. शाळेत मित्र-मैत्रिणींमध्ये ती आत्तापासूनच ‘लाडाची कुल्फी’चा प्रचार-प्रसार करीत असते, त्यामुळे इतर सर्व संचालकांप्रमाणे तिलाही स्वतंत्र वेतन दिले जाते.

ladachi-kulfi-6

मला माझ्या कुटुंबाचा खूप अभिमान वाटतो. राहुलने प्रतिकूल परिस्थितीत हे सगळे शून्यामधून निर्माण केले आहे. त्यामध्ये राहुलला त्याच्या पत्नीचीही खंबीर साथ मिळत आहे. माझ्या कष्टाचे चीज झाले. आज आमच्या व्यवसायात अनके महिला काम करतात आणि स्वतःच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी मोलाचे योगदान देतात, ही मोठी समाधानाची गोष्ट आहे.

आशा पापळ,
संचालिका, आर.एस.पापळ ग्रुप

ladachi-kulfi-7

कस्टमर के अर विभाग सांभाळताना ग्राहकांच्या आमच्या उत्पादनांकडून अपेक्षा काय आहेत, याची नेमकी माहिती होते. कधीकधी रात्री १२-१ वाजेपर्यंत ग्राहकांचे आईस्क्रीम कुठे मिळेल याबाबत विचारणा करणारे दरूध्वनी येत असतात. काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल का, यासाठी विचारणा करीत असतात. त्यामध्ये, महिलांचेही प्रमाण लक्षणीय आहे.

अक्षदा पापळ,
पत्नी व संचालिका, आर.एस.पापळ ग्रुप

ladachi-kulfi-8

परिश्रम, सातत्य, टीम वर्क , उत्तम नियोजन, अद्ययावत तंत्रज्ञान, व्यावहारिक ज्ञान, नावीन्यपूर्णकाम, सकारात्मक विचार, वेगाने बदल स्वीकारण्याची तयारी आणि सोबतीला प्रामाणिक व कु शल सहकारी यांसारख्या गोष्टी असल्या, की कोणत्याही प्रकारची ध्यप्ये राप्ती करणे अशक्य नाही. या गुणांच्या जोरावरच आगामी काळात ‘आर.एस.पापळ ग्रुप’ जागतिक दर्जावर निश्चितच नावलौकिक मिळवेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. लॉकडाऊनच्या काळातच ‘पापळ ग्रुप’मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. दरूदृष्टी आणि ग्राहकाभिमुख विचारांनी कार्यरत असणाऱ्या ‘पापळ ग्रुप’सोबत काम करतो, याचा मला सार अभिमान वाटतो.

प्रविण कोकाट, (एमबीए-एचआर)
जनरल मॅनेजर (एचआर ॲन्ड आपरेशन्स), आर.एस.पापळ ग्रुप

निराधार महिलांसाठी आधार !

ठाण्यातील वैभवी पाटकर यांचे पती काम करीत असताना कोरोना काळात त्यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. पतीच्या कंपनीने वैभवी यांना ३ ते ४ लाखांची मदत केली, परंतु हे पैसे आयुष्याला पुरणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांचे कौटुंबिक स्नेही व ‘लाडाची कुल्फी’चे टिटवाळा येथील शाखा संचालक राजेश बेरगल यांनी पाटकर यांना ‘लाडाची कुल्फी’ची शाखा उघडण्याचे सुचविले. आज पाटकर यांचा कुल्फी विक्रीद्वारे चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह सुरू आहे. सामाजिक बांधिलकीचा विचार आणि कृतीची अशी अनेक उदाहरणे आज ‘लाडाची कुल्फी’च्या वाटचालीत आपल्याला पदोपदी दिसून येतात.

आर. एस. पापळ मार्केटिंग प्रा. लि.

  • रजिस्टर्ड आफिस : १०१, लेक ब्रीझ सर्व्हेक्र. ५०/३, वरखडे नगर, कात्रज, पुणे – ४११ ०४६
  • टोल फ्री क्रमांक : १८०० २१० ३६९६
  • वेबसाईट : www.ladachikulfi.in । www.papalgroup.com
  • ई मेल : info@papalgroup.com
मराठी