परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्दीने परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत ज्यांच्यात असते, तेच शून्यातून विश्व निर्माण करतात. निरंजन मेहता यांनी चार वर्षांपूर्वी स्वतःची ‘हीट एक्सचेंजर सर्व्हिसेस-प्रॉडक्ट्स कं पनी, प्लेटेक्स इंडिया’ सुरू करण्यासाठी आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांची आजवरची सगळी वाटचाल थक्क करणारी आहे. ‘प्लेटेक्स इंडिया’च्या प्रेरणादायी वाटचालीचा हा सविस्तर आढावा.
प्लेटक्स इंडिया : हीट एक्सचेंजर सेवा क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड
‘एक कल्पना तुमचे जीवन बदलू शकते’, या म्हणीचे जिवंत उदाहरण आहे ‘प्लेटेक्स इंडिया’. कोणत्याही उद्योजकासाठी नावीन्यपूर्ण कल्पना आणि बाजाराची गरज समजून घेणे महत्त्वाचे असते.
जर तुम्ही ग्राहकाची काळजी घेतलीत, तर तो तुमच्या व्यवसायाची काळजी घेईल. ‘प्लटेक्स इंडिया’ या तत्त्वाचे पालन करते, त्यामुळे ‘प्लटेक्स इंडिया’ भारतातील अग्रगण्य ऑनसाईट सेवा देणाऱ्यांपैकी एक बनली आहे. डेअरी, साखर, फार्मास्टयुिकल, कृषी, ऑटोमोबाईल इत्यादी उद्योगांमध्येहीट एक्स्चेंजरची आवश्यकता असते. भारत सरकार ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’सारखे उपक्रम घेत असले, तरी हीट एक्स्चेंजर बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य आहे, भारतीय कंपन्यांना फारसे स्थान नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांची विक्रीपश्चात सेवा लगेच उपलब्ध होत नाही आणि सुटे भाग चढ्या किमतीत विकले जातात, तरीसुद्धा भारतीय ग्राहकांचा कल बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेच आहे. त्यामुळे ग्राहकांच्या या अडचणीवर व्यावसायिक उपाय शोधत ग्राहकांना वर्षातील ३६५ दिवस चोवीस तास सेवा पुरवता आली तर…?
निरंजन मेहतांच्या डोक्यात आलेल्या या बिझनेस आयडियातून त्यांनी १८ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘प्लटेक्स इंडिया’ची स्थापना केली. एका फाऊंड्री इंडस्ट्रीतलाहीट एक्सचेंजर खराब झालाहोता. तो दुरुस्त करण्याची १५ हजार रुपयांची पहिली ऑर्डर त्यांच्या कंपनीला चार वर्षांपूर्वी मिळाली. या पहिल्या ऑर्डरनंतर पुढच्या तीन महिन्यांत कंपनीला तब्बल ७७ लाखांच्या ऑर्डर्समिळाल्या,
त्या केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर! याचं कारण म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विक्रीनंतरच्या सेवेचा कालावधी किमान सहा आठवडे असताना ‘प्लटेक्स इंडिया’ देशाच्या कानाकोपऱ्यात कोठेही अवघ्या तीन ते चार दिवसांत सेवा पुरविते. आज ‘प्लटेक्स इंडिया’चे भारतात ६५० हून अधिक ग्राहक आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास ५० ग्राहक आहेत. ‘प्लटेक्स’चे एकच उद्दिष्ट आहे, की हीट एक्सचेंजर कोणत्याही कार्यक्षमतेच्या समस्येशिवाय कार्यरत स्थितीत असावे. त्याच्या यंत्रणेत काही समस्या असल्यास, ‘प्लटेक्स’ आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष किंवा कॉलद्वारे २४ X ७ X ३६५ दिवस सेवा प्रदान करेल.
तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे मेहतांचे मूळ गाव. तेथे निरंजन मेहतांच्या वडिलांचे घड्याळाचे दुकान होते. त्यांची आई मंगल मेहता या उच्चशिक्षित असून, त्यांनी बी.ए., एम.ए., बी.लिब., बी.पी.एड., एलएल.बी. केले असून, लवकरच त्यांची पीएच.डी.ही पूर्ण होणार आहे. त्यामुळेच पतीच्या अकाली निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आल्यावर न डगमगता त्यांनी पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी कंबर कसली. मेहता कुटुंबीय त्यांच्या मामांकडे- डॉ. विकास शहा यांच्याकडे- वालचंदनगरला वास्तव्यास आले. डॉ. शहा हे पेशाने डॉक्टर असले, तरी सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ‘पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघा’चे ते अध्यक्ष होते. तसेच ‘दक्षिण भारत दिगंबर जैन महासभे’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. मेहतांच्या आईने आधी बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. या वेळी त्या तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये नोकरीही करीत होत्या. त्यानंतर त्यांनी बारामती-वालचंदनगर-अकलूज असा रोजचा दीडशे किमी प्रवास करीत बी.पी.एड. पूर्ण केले. यानंतर त्यांना वालचंदनगर येथील वर्धमान शाळेत नोकरी लागली आणि कुटुंबात आथिर्क स्थैर्य आले. निरंजन मेहता यांचा धाकटा भाऊ डॉ. राकेश आणि त्यांची पत्नी डॉ. शीतल हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर असून, ते बारामतीत स्थायिक आहेत. बारामतीजवळ भवानीनगर परिसरात ते प्रॅक्टिस करतात. त्यांचे यशश्रीहॉस्पिटल हे परिसरात लोकप्रिय आहे.
सातवी ते दहावीपर्यंत निरंजन वालचंदनगर येथील श्री वर्धमान विद्यालय व तात्रिं क शाळा येथे होते, म्हणून दहावीनंतर ते वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये बेंच फिटर अँप्रेन्टिस म्हणून रुजू झाले. त्यांना ३०० रुपये स्टायपेंड मिळत असे. शिकाऊ म्हणून काम करीत असतानाच त्यांना या क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि नंतर त्यांनी अँप्रेन्टिस कालावधीनंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर ते ‘पीआयजीओ’ कंपनीतील संशोधन आणि विकास विभागात रुजू झाले. तेथे वर्षभर अनुभव कमावल्यावर ते पुन्हा वाचलंद इंडस्ट्रीजमध्येनियोजन अभियंता म्हणून काम पाहायला लागले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले आणि या शहरात पारी कंपनीत त्यांनी करिअरची सुरुवात केली. आपल्या एकूण १८ वर्षांच्या नोकरीच्या अनुभवात त्यांनी पारी, ट्रँटर आणि एचआरएस अशा वेगवेगळ्या कंपन्यांत अनुभव संपादन केला. पारी ही ऑटोमेशन अँड रोबोटिक्समधील नावाजलेली कंपनी आहे, तर ट्रँटर इंडिया ही प्ट ले हीट एक्सचेंजर (पीएचई) क्षेत्रातील, आणि एचआरएस ही शेल अँड ट्ब यू हीट एक्सचेंजर उत्पादनातील नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
अशी सुचली बिझनस आयडिया…
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येविक्री विभागात काम करताना त्यांचा ग्राहकांशी नेहमीच संपर्क यायचा. यातून त्यांना ग्राहकांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षाही कळायच्या. २०१७ मधल्या अशाच एका प्रसंगातून त्यांना स्वतःची कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली.
या विषयी बोलताना निरंजन मेहता म्हणाले, “मी ज्या कंपनीत कामाला होतो, तेथे आम्ही २०१६ मध्ये एका ग्राहकाला एक हीट एक्सचेंजर विकला होता. त्यामध्ये २०१७ मध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्या ग्राहकाने कंपनीच्या ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार केली. मी तेव्हा सेल्समध्ये असल् याने आलेली तक्रार नोंदवून घेत ती सर्व्स हि विभागाकडे पाठवायची इतकेच माझे काम होते. पण कंपनीचा व्याप मोठा असल्याने त्या तक्रारीचे निवारण व्हायला किमान चार आठवडे वेळ लागणार होता. त्या ग्राहकाच्या फ्लॅटमध्ये तेवढ एकच हीट एक्सचेंजर असल्याने त्याचे दिवसाला ३५ हजार रुपयांचे नुकसान होत होते. त्या ग्राहकाची अडचणीची परिस्थिती ओळखत मी स्वतः त्याच्या प्लँटमध्ये गेलो आणि त्याला दोन तासांत बंद पडलेला हीट एक्सचेंजर सुरू करून दिला. अप्रेन्टिसशिपला असताना फिटर म्हणून काम केले असल्याने मला हाताने काम करण्याची सवय होती. त्यामुळेच कमी वेळेत हीट एक्सचेंजर दुरुस्त करू शकलो. यामुळे त्या ग्राहकाचे समाधान तर झालेच, पण मला एक उत्तम बिझनेस आयडिया मिळाली.
सुरुवातीचा खडतर काळ
२०१८ मध्ये निरंजन मेहता यांनी आपली नोकरी सोडली, तेव्हा त्यांना ३५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज होतं. कोणत्याही नवीन व्यवसायात सुरुवातीचा काळ खडतर असतो. मेहता यांना याचा प्रत्यय आला. जरी त्यांना हीट एक्सचेंजर्सचा मोठा अनुभव होता, तरीही ग्राहक स्टार्टअप कंपनीला संधी देण्यास टाळाटाळ करीत होते. ही परिस्थिती पहिले तीन महिने कायम राहिली. त्यानंतर एकेक करत हीट एक्सचेंजर देखभाल-दुरुस्तीच्या ऑर्डर्समिळत गेल्या आणि पुढच्या सहा महिन्यांतच व्यवसायाचा पसारा प्रचंड वाढला. जेएसडब्लू स्टील, आदित्य बिर्ला ग्रुप, अल्ट्राटेक सिमेंट, कॅडबरी इंडिया, दीपक नोव्होकेम, व्हॅरॉक, संजय घोडावत ग्रुप, पीडीलाईट, किर्लोस्कर ब्रदर्स, एमटीआर, फिनोलेक्स, वारणा दूध, मेरिको इंडस्ट्रीज, कॉस्मोफिल्म, मेनन अँड मेनन अशा अनेक नामांकित ग्राहकांना ‘प्लेटेक्स इंडिया’ने सेवा पुरवायला सुरुवात केली. विश्वास निर्माण झाल्याने याच ग्राहकांनी ‘प्लेटेक्स इंडिया’ला नवीन प्लेट एक्सचेंजरचे उत्पादन करण्याची विनंती केली आणि कंपनीने स्वतःचे उत्पादन करायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत ‘प्लेटेक्स इंडिया’ने दोन हजारांपेक्षा जास्त हीट एक्सचेंजरचे डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्स्टॉलेशन केले आहे आणि त्यातील एकाही हीट एक्सचेंजरमध्ये आत्तापर्यंत कसलीही अडचण आलेली नाही. त्यामुळेच ‘प्लेटेक्स इंडिया’ ही इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचे उत्पादन करीत आहे, हे स्पष्ट होते.
ऑल ब्रँड पीएचई स्पेअर्स
सर्व्हिसिंग व्यवसायाने आघाडी घेतल्याने हे लक्षात आले, की प्रत्येक क्लाएंट वेगळेवेगळ्या ब्रँडचे हीट एक्सचेंजर्स वापरत आहे आणि स्पेअर्स पटकन उपलब्ध करून देणे इतके सोपे नव्हते. ही गरज लक्षात घेऊन, ‘प्लेटेक्स इंडिया’ने सर्व ब्रँडचे सर्व सुटे भाग, प्लेट हीट एक्सचेंजर्स वाजवी दरात सहज उपलब्ध केले आहेत.
देखभालीच वार्षिक कंत्राट
‘प्लेटक्स इंडिया’कडून इतकी तत्पर सेवा मिळत असल्याने काही मोठ्या कंपन्यांनी ‘प्लेटक्स’ला त्यांच्या प्टमलँ धील सर्व हीट एक्सचेंजरच्या वार्षिक देखभालीचे कंत्राट दिले आहे. याचा फायदा म्हणजे, ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या हीट एक्सचेंजरच्या स्पेअर्सची इनव्हेंटरी स्वतःजवळ बाळगावी लागत नाही. कारण आवश्यक सर्व स्पेअर्सची इनव्हेंटरी आणि त्याच्या गुंतवणुकीचा खर्च ‘प्लेटक्स’ उचलते. परिणामी ग्राहकांच्या इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टमध्ये बचत होते.
सेवेसह नविन हीट एक्सचेंजरची रचना, उत्पादन, पुरवठा
हीट एक्सचेंजरच्या स्पेअर्स आणि सर्व्हिसिंगसह यशस्वीसुरुवात केल्यानंतर, ‘प्लेटेक्स इंडिया’ने आता गॅस्केटेड प्लेट हीट एक्सचेंजर, स्पायरल हीट एक्सचेंजर, शेल आणि ट्यूब हीट एक्स्चेंजर, फिनन्ड ट्यूब हीट एक्सचेंजर, हीट रिकव्हरी सिस्टम यांसारख्या हीट एक्सचेंजर्सच्या निर्मितीमध्येप्रवेश केला आहे. जो हीट एक्सचेंजर अमेरिकेतून आयात करायला दोन कोटी रुपये खर्चयायचा, त्याच दर्जाचा हीट एक्सचेंजर केवळ १७ लाख रुपयांत ‘प्लेटेक्स’ने विकसित करून इन्स्टॉल केला असून, गेली दोन वर्षे तो व्यवस्थित चालत आहे.
क्लीन इन प्लेस सिस्टिम
हीट एक्सचेंजर सर्व्हिसिंग करताना दरवेळी त्यातील गॅस्केट बदलावेच लागतात. त्यामुळे गॅस्केटचा खर्च हीट एक्सचेंजर दुरुस्तीचा अनावश्यक खर्चहोऊन बसतो. ज्या प्लँटमध्ये दहापेक्षा जास्त हीट एक्सचेंजर आहेत, त्या ठिकाणी गॅस्केटचा अनावश्यक खर्च वाढत जातो. त्यामुळे हीट एक्सचेंजर न उघडताच साफ करता येऊ शकतील का, या विचारातून ‘प्लेटेक्स इंडिया’नं ‘क्लीन इन प्लेस’ (सीआयपी) ही विशेष सिस्टीम डिझाईन केली. हीट एक्सचेंजर दुरुस्त झाला का, हे तपासण्यासाठी ही सिस्टिम प्रेशरड्रॉप टेक्नॉलॉजीवर काम करते. ही सिस्टिम ट्रॉलीवर बसविलेली असल्याने संपूर्ण प्लँटमधले हीट एक्सचेंजर दुरुस्त करता येतात. इतकेच नाही, तर एरवी जेव्हा हीट एक्सचेंजर दुरुस्तीला एक-दोन दिवसांचा कालावधी लागतो, तेथे या सिस्टीममुळे हीट एक्सचेंजर अवघ्या तीन ते चार तासांत साफ होऊन ग्राहकाला वापरता येतो. ‘प्लेटेक्स इंडिया’ने गेल्या वर्षभरात ८० सीआयपी सिस्टीम्स विकल्या आहेत. यावरून सीआयपी सिस्टीमला असलेली मागणी आणि त्याचे लाभ लक्षात येतील.
डंप कंडेन्सर
हे शेल आणि ट्ब यू प्रकाराचे उपकरण आहे. तथापि, हे कारखान्यात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त वाफेच्या उष्मा एक्स्चेंजर पुनर्प्राप्तीसाठी डिझाईन केलेले आहे. स्टीम जी वातावरणात सोडली जाते, ती तिथेच असते. डिस्टिलरी आणि पॉवर जनरेशन इंडस्ट्रीजमध् वये ापर खूप प्रभावी आहे.
क्लीन वॉटर सोल्यूशन
उद्योग क्षेत्रात पाण्याचा दर्जायोग्य राखणे हे आव्हान असते. पाण्याच्या प्रक्रियेसाठी खूप जास्त खर्च येतो. हे टाळण्यासाठी क्लीन वॉटर नावाची एक सिस्टीम ‘प्लेटक्स’ने डिझाईन केली आहे. ती सिस्टीम कूलिंग टॉवरसोबत लावली जाते, त्यामुळे ग्राहकाच्या प्टमलँ धील पाईपलाईन, हीट एक्सचेंजर आणि इतर उपकरणे कधीही खराब होत नाहीत. उलट त्या पाण्यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे अणू-रेणू हे कूलिंग टॉवरमध् परत ये येतात. त्यामुळे कूलिंग टॉवरचे केमिकल डोझिंगसुद्धा करण्याची गरज पडत नाही. एक वर्षात जेवढे केमिकल कूलिंग टॉवरच्या पाण्यात टाकले जाते, तेवढ्याच पैशात ही सिस्टीम इन्स्टॉल करता येते. म्हणजेच या सिस्टीमचा ‘आरओआय’ हा फक्त एक वर्षाचा आहे.
पंचवार्षिक नियोजन
सर्व प्रकारच्या हीट ट्रान्स्पर प्लेट आले णि गॅस्केटचे स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपनीच्या दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ‘प्लेटक्स’चे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’च्या धर्तीवर शंभर टक्के भारतीय बनावटीचा हीट एक्सचेंजर विकसित करण्याचे ‘प्लेटक्स’चे ध्येय आहे. ‘प्लेटक्स इंडिया’ देशभरात डीलर नेटवर्कही विकसित
करीत आहे. त्यासाठी नवीन उद्योजकांना संधी देण्याची ‘प्लेटक्स इंडिया’ची पसंती आहे. यामध्ये राज्यस्तरीय पातळीवर सुपर स्टॉकिस्ट, तर जिल्हा स्तरावर डीलर नेमले जात आहेत.
‘महाएक्स्पो’, ‘महाटेक’ यांसारख्या विविध औद्योगिक प्रदर्शनांमध् ‘प्लेटक्स इंडिया’ दरवर्षी सहभागी होते. इंडस्ट्री आऊटलूक या उद्योगविश्वातील आघाडीच्या मॅगझिनने प्लेट हीट एक्सेंजर क्षेत्रात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे भारतीय उत्पादक या पुरस्काराने कंपनीला गौरविले आहे. कंपनीची गेल्या चार वर्षांतील वाटचाल बघता यापुढेही कंपनीची यशोगाथा आणि घौडदौड सुरूच राहील, याविषयी शंका नाही.
मी आयटी इंजिनीअर असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माझे करिअर अगदी उत्तम सुरू होते. ‘प्लेटक्स’ची वेगाने होणारी वाढ बघता २०२१ मध्ये मी या कंपनीत रुजू झाले. कंपनीतील एचआर, ॲडमिन, फायनान्स अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी संपूर्ण टीमसह मी आज सांभाळते आहे. आजच्या तरुणाईला माझे सांगणे आहे, की व्यवसायाच्या क्षेत्रात आज अनेक संधी आहेत. त्याचा नक्की विचार करा. तसेच करिअरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कष्ट उपसावे लागले, तरी मागे हटू नका. कोणतेही काम हलके समजू नका.
– जागृती मेहता,
एचआर अँड फायनान्स डायरेक्ट
कुंटुरतांडा या नांदेडमधील छोट्या गावातून मी पुण्यात आलो. माझे शिक्षण मेकॅनिकल फिटर असले, तरी प्रत्यक्ष ऑनसाईट कामाच्या अनुभवामुळे मी आता २० लोकांची संपूर्ण सर्व्हिस टीम हँडल करतोय, कंपनीच्या विकासाबरोबर मीदेखील घडतोय, याचे मला मनापासून समाधान आहे.
– सचिन पवार,
सर्व्हिस इंजिनीअर
हीट एक्सचेंजर ऑनसाईट सर्व्हिसिगं एक विशेष प्रक्रिया
‘प्लेटेक्स इंडिया’ची ३५ लोकांची टीम ही फक्त हीट एक्सचेंजर सेवेत विशेष अनुभवी असल्याने कोणत्याही राज्यातून ब्रेकडाऊनचा फोन आल्यावर ‘प्लेटेक्स’ची सर्व्हिस टीम व्हॅनसह निघते. ज्या कामाला एरवी आठ दिवसांचा कालावधी लागला असता, ते काम ‘प्लेटेक्स’च्या अनुभवी टीममुळे तीन ते चार दिवसांत पूर्णहोते. ‘प्लेटेक्स इंडिया’ने हीट एक्सचेंजरच्या ऑन साईट सेवेसाठी तीन सुसज्ज सर्व्हिस व्हॅन तयार केल्या असून, त्यामध्ये हीट एक्सचेंजर दुरुस्तीची सर्व उपकरणे समाविष्ट केलेली आहेत. इतकेच नाही, तर हीट एक्सचेंजर दुरुस्त केल्यावर त्याचे डेंटिंग-पेंटिग करून पुढच्या सर्व्हिसिंगची तारीखही टाकली जाते. काम करीत नसलेल्या हीट एक्स्चेंजरमुळे उत्पादनात होणारे नुकसान आम्हाला समजते, म्हणून मॉडेल, ॲप्लिकेशन आणि इतर तांत्रिक तपशील समजून घेतल्यावर आम्ही ग्राहक साईटसाठी त्वरित प्रारंभ करण्यास प्राधान्य देतो. दस्तावेजीकरण, पेमेंट या दुय्यम गोष्टी आहेत, हीट एक्सचेंजर सुरू करणे महत्त्वाचे असते.
‘बाह्य तपासणी, डिसेम्बली, प्लेट क्लीनिंग, नवीन गॅस्केट इन्स्टॉलेशन, डाई पेनिट्रेशन टेस्टिंग ही कामे साईटवर केली जातात. तथापि, आम्ही हीट एक्सचेंजरची फ्रेम आणि प्रेशर प्लेट देखील साफ करतो आणि तेच पुन्हा पेंट करतो, त्यामुळे हीट एक्सचेंजर पुन्हा नवीन दिसतो. पेटिंगमुळे स्टीलच्या सौम्य भागावरील गंज दूर होण्यास मदत होते आणि त्याचे आयुष्य वाढते.
‘प्लेटेक्स इंडिया’चे सध्या पुण्यात दोन, तर बेळगाविमध्ये एक असे एकूण तीन उत्पादन प्रकल्प आहेत. गुजरातमधील वडोदरा, तर महाराष्ट्रात सांगली येथे सेवा विभाग आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत ‘प्लेटेक्स इंडिया’च्या हीट एक्सचेंजरच्या किमतीत तब्बल ४० टक्क्यांचा फरक आहे. नवीन ऑर्डर केल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डिलिव्हरीचा लीड टाईम हा १२ आठवड्यांपासून सुरू होतो. मात्र ‘प्लेटेक्स इंडिया’तर्फे केवळ तीन दिवसांत डिलिव्हरची प्रक्रिया सुरू होते. तसेच त्यासोबत दोन वर्षांची वॉरंटी आणि एक ऑनसाईट सर्व्हिसिंग मिळते. कंपनीतर्फे सुरुवातीच्या काळात महिन्याला चार-पाच हीट एक्सचेंजर्सचे उत्पादन केले जायचे, ते आज महिन्याला चारशेपर्यंत वाढले आहे. भारतीय उद्योजकांनी स्थानिक पातळीवरील उत्पादकांवर विश्वास ठेवून त्यांना काम दिले, तर भारताचा औद्योगिक विकास उत्तम होईल. तसेच विक्रीपश्चात सेवाही चांगली मिळेल. ‘प्लेटेक्स’सारख्या संपूर्ण भारतीय कंपन्यांवर विश्वास ठेवल्यास ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या सरकारच्यामहत्त्वाकांक्षी योजनांनाही चालना मिळेल.