चारित्र्यवान आणि कुशल तरुण पिढी घडविणारी  ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात मोठे प्रभावी साधन आहे, हे ओळखून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ (AISSMS) ही संस्था आजही त्यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक कार्याचा भक्कम वारसा पाठीशी घेऊन वाटचाल करीत आहे.

जागतिक स्थित्यंतराच्या काळात विद्यार्थी कुशल आणि स्वावलंबी होतील, हा विचार कें द्रस्थानी ठेवून AISSMS गेली अनेक वर्षे विविध उपक्रम व कार्यक्रम राबवीत आहे. त्यातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण जडणघडण होऊन ते भविष्यातील आव्हाने सहजपणे पेलण्यास सज्ज होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उच्च नैतिक मूल्ये रुजविण्याचे आणि त्यांचे चारित्र्य घडविण्याचे कामही विविध उपक्रमांमधून जाणीवपूर्वक करण्यात येते. जगभरात नावलौकिकास प्राप्त झालेल्या, नवी पिढी घडविणाऱ्या AISSMS या संस्थेच्या आजवरच्या प्रवासाचा हा आढवा.

महाराष्ट्राला सामाजिक सुधारणेचा आणि शिक्षणाचा अमूल्य असा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अनेक घडामोडी आपल्या देशासाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. याच परंपरेतील एक अग्रगण्य नाव म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेली ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ अर्थात AISSMS. श्री. शाहू छत्रपती महाराज हे ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’चे अध्यक्ष; तर श्री. मालोजीराजे छत्रपती संस्चे मानद थे सचिव आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीपथावर आहे.

या संस्थेने पारंपरिक शैक्षणिक वारसा जपत असताना त्याला आधुनिकतेची जोड देऊन शतकोत्तर मजल मारली आहे. संस्थेच्या पुण्यातील ‘एसएसपीएमएस’च्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील पहिला अश्वारूढ पुतळा संस्थेचा मान बिंदू आहे. १९१७ मध्ये स्थापन झालेली ही संस्था सर्वसामान्य विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा पुढे नेत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी या संस्थेचे मा. थे पदाधिकारी व शिक्षकवृंद अहोरात्र झटत आहेत. अगदी आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ही संस्था केजी टू पी एच डी पर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण देण्यामध्ये अग्रेसर आहे. संस्कडे थे शंभर वर्षांची वैभवशाली परंपरा, भव्य वास्तू, काळानुरूप पायाभूत सुविधांबरोबरच जवळपास १,२०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि त्यामुळे १४ हजारांहून अधिक विद्यार्थी संस्चथे्या विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.

पुण्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हटले जाते, या उक्तीला अनुरूप ज्ञानार्जनाचे कार्य या संस्थेत होत असते. केवळ पुणे आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील विद्यार्थी या संस्थे अभिमानाने प्रवेश घेतात. विद्यार्थ्याला वर्गखोलीतील शिक्षणाबरोबर बाहेरच्या जगाशी ‘कनेक्ट’ राहता येईल, अशा रीतीने येथील शिक्षणाची रचना आहे. आजच्या काळात संशोधन आणि नूतन पद्धतीस (इनोव्हेशनल) अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना योग्य दिशा देऊन त्यांचा सर्वगांणी विकास साधण्याची परंपरा संस्थे अनेक दशके जपलेली आहे. संस्थे्चया वतीने सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्याद्वारे आजवर अनेक पिढ्यांना उद्योग आणि विविध क्षेत्रांसाठी घडविण्याचे काम संस्थे अविरत सुरू ठेवले आहे. त्यामुळेच येथे शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी जगभर नावलौकिक प्राप्त केलेला आहे.

विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी कुशल बनविण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षक-प्राध्यापक म्हणून शिकविले जात नाही, तर त्याला आपल्या परिवाराचाच भाग मानले जाते, एका मित्रासारखे प्रोत्साहन दिले जाते आणि एका हितचिंतकाप्रमाणे त्या विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन हिताचा विचार केला जातो. त्यामुळेच वर्षानुवर्षे संस्थेचे विद्यार्थ्यांसोबतचे नाते टिकून आहे.

दर्जेदार शिक्षणातून समाजाची सेवा करणे, या उद्देशाने संस्ची वाटचाल सुरू आहे. ‘ऑल थे इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ कायम शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन या उद्देशाने काम करीत आहे. संस्कृती, मूल्ये आणि नैतिकता या संस्थेत रोवलेल्या बिजांमुळे आज ही संस्था मूल्यवर्धन करणारी दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. या ठिकाणी कार्यानुभवावर आधारित शिक्षण देऊन उद्योगाला पूरक असे व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने विद्यार्थ्यांना घडविले जाते. तसेच भविष्यातील आव्हानानुसार विद्यार्थ्यांना तयार केले जाते.

सचोटी, निष्पक्षता, पारदर्शकता आणि उच्च दर्जाच्या नैतिकतेचे प्रतीक असलेले दूरदर्शी असे व्यवस्थापन, ही या संस्ची मोठी ताकद आहे. सध्या सगळे जग एका मोठ्या स्थित्यंतरातून जाते आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी अनुकूल गोष्ट म्हणजे देशात तरुणांची मोठी संख्या. देशाच्या या मनुष्यबळाला कुशल बनविण्याबरोबरच त्याच्यामध्ये उच्च नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी संस्थेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यवेधी पिढी घडविण्यासाठी येथील शिक्षकवृंद अहोरात्र कार्यरत असतो. यातही संस्चथे्या व्यवस्थापनाकडून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कायम मौल्यवान मार्गदर्शन आणि वेळोवेळी भक्कम असा पाठिंबा असतोच.

संस्थेशी निगडित सर्व घटकांशी मजबूत आणि सुदृढ नातेसंबंध जपले जावेत, यासाठी संस्था कायम कटिबद्ध असते. येथील  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नाते हे एका टीमप्रमाणे असते. त्यामुळे संस्था सातत्याने शिक्षणासह विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याच्या कामात आघाडीवर आहे. संस्थेचे  व्यवस्थापन व शिक्षकवर्ग यासाठी पुढाकार घेत असल्याने स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो. अनेक उपक्रम-कार्यक्रमांचे संपूर्ण नियोजन व जबाबदारी विद्यार्थ्यांकडे दिली जात असल्याने त्यांच्यामध्येनियोजन, संघटन, टीमवर्क, नीटनेटकेपणा अशा गुणांचा विकास होतो. असंख्य संधींतून नेमक्या भविष्यवेधी संधी मिळविता याव्यात, यासाठी संस्था कायम प्रयत्नशील असते. यातूनच विद्यार्थ्यांना आपले विचार समाजासमोर आणण्याची संधी ‘आयडिया मंच’मधून मिळत असते. यातून असंख्य विद्यार्थी हे आजच्या समाजातील विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त करतात आणि त्याला पर्यायही सुचवितात. या वर्षी ‘आयडिया मंच २.०’च्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘माझ्या काल्पनेतील आधुनिक भारत’ हा विषय ठेवण्यात आला होता.

नवनवीन उपक्रम आणि भविष्यवधी संशोधन

अलीकडच्या काळात संस्थेतर्फे संशोधन स्पर्धा, विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी संमेलन, इंजिनीअरिगं टुडे, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण, वर्ल्ड ब्रेड डे, राष्ट्रीय प्रोग्रामिगं स्पर्धा, शिवांजली, अलाक्रिटी, आतिथ्य महोत्सव यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.

एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी’ च्या वतीने आयोजित केलेल्या प्रश्नमंजषुेत रोख ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवून संस्चथे्या नावलौकिकात भर घातली; तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘आविष्कार’ या राज्यपातळीवरील संशोधन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. भोपाळ इथे झालेल्या ‘खेलो इंडिया यथू नॅशनल गेम्स’मध्ये संस्चथे्या माहिती-तंत्रज्ञान विभागातील उमर अन्वर शेख या विद्यार्थ्याने सुवर्णपदक मिळवून क्रीडा क्षेत्रातही ठसा उमटविला.

या सगळ्या नावीन्यपूर्ण आणि संशोधनपर उपक्रमांमधूनच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी रिमोट रॉकेट लाँचर तयार केला, बॅटरीवरील एलईडी दांडिया बनविल्या, विद्यार्थ्यांकडूनच पूर्णवेळ रेस्टॉरंट चालविण्याच्या अभिनव प्रयोग देखील करण्यात आला, संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॅकेथॉन स्पर्धेत यश मिळविले, विद्यार्थ्यांनी इको फिल्टरही निर्माण केला. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच ‘आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण संस्थे’ च्या (आयपीए) राष्ट्रीय प्रश्नमंजषूा कार्यक्रमात यश मिळविले आहे. संस्चथे्या विविध विभागांत महिन्याभर सातत्याने विविध उपक्रमांची रेलचेल असतेच, त्यात प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिकल शिक्षण असो अथवा वेबिनार असो, सातत्याने हे उपक्रम सुरू असतात. अगदी सामाजिक उपक्रमांतही येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी अग्रेसर असतात. सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थी आघाडीवर असतात.

‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ ही केवळ शैक्षणिक संस्था नसून, परंपरा आहे. सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून देशासमोर एक आदर्श निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांतून ही संस्था निर्माण झाली. त्यांच्या विचारांतूनच आजही ही संस्था कार्यरत आहे. एकेकाळी जनसामान्यांना आपल्या आवाक्याबाहेर वाटणारी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यात ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’सारख्या संस्थांचा मोलाचा वाटा आहे. गेल्या शंभर वर्षांत येथील विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेबरोबरच देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे. सर्वसामन्यांचे हित जपत कायम गुणवत्तापूर्णशिक्षणाची कास धरणारी ही संस्था आपल्या पुढील शतकी वाटचालीत या वैभवशाली परंपरेला नव्या उंचीवर नेईल.

जागतिक कीर्तीच्या कंपन्यांत काम करण्याची संधी

उत्तम शिक्षण , जीवनविषयक मूल्यांची जोपासना व एकसंघरीतीने काम करण्याची प्रवृत्ती यांमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना जागतिक कीर्तीच्या कं पन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. यात कॉलेज ऑफ इंजिनीअरिगच्या विद्यार्थ्यांना गोदरेज, सिमेन्स, टेक महिंद्र, टाटा ऑटोकॉम्प, एल अँड टी इन्फोटेक, इमर्सन, वेरीटास, वोडाफोन, कोलर, विप्रो, परी, यूटीएस ग्लोबल, ईटन, सुझलॉन, लॉरीयल, सायबेज, आयसीआयसीआय बँक इत्यादी कं पन्यांत संधी मिळालेल्या आहेत.

कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड के टरिग टेक्नॉलॉजीतील विद्यार्थ्यांना ताज, शेरटन, हिल्टन, आयटीसी, जे. डब्लू. मॅरिएट, द ओबेरॉय ग्रुप, मॅकडोनल्डस, द अॅड्स (एमा रे र ग्रुप), स्टारबक्स इत्यादी नामांकित हॉस्पिटॅलिटी कंपन्यांनी सामावून घेतले, तर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सन फार्मा, कॉग्निझंट, लुपिन, डॉ. रेड्डीज, ग्लेनमार्क, अलाईड ॲनॅलिटिक्स, सीरम, एमक्यूअर, सॅनोफी ॲव्हेंटिस, ॲक्युटी सोल्यूशन या बहुराष्ट्रीय औषध निर्माण कं पन्यांत नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

एलजी, टाटा मोटर्स, एसीई कु दळे कार, महिद्रा, पियाजिओ, भारत फोर्ज या कं पन्यांनी AISSMS च्या इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना तर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील के पजेमिनी, विप्रो, एल अँड टी इन्फोटेक, जॉन्सन कं ट्रोल्स, नीलसॉफ्ट, टेक महिंद्र, कॉग्निझंट, फोर्ब्स मार्शल, सिमेन्स, टीसीएस इत्यादी कं पन्यांनी AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना संधी दिली.

टाटा पॉवर, टेक महिन्द्र, आयसीआयसीआय प्रुडेंशियल, बजाज फिनसर्व्ह या कं पन्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील (MBA) विद्यार्थ्यांना, तर इन्फोसिस, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, जॉनडियर, विप्रो, विशय काँपोनेन्ट्स, एल अँड टी इत्यादी कंपन्यांनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मालोजीराजे छत्रपती, मानद सचिव, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी

संस्थेची मूल्ये

  • नेतृत्व आणि  सांस्कृतिक वारसा
  • प्रामाणिकपणा आणि सचोटी
  • विचार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य
  • प्रोत्साहन आणि उत्कृष्टता
  • जबाबदारी आणि पारदर्शकता

संस्थेची ठळक वैशिष्टये

  • दर्जेदार शिक्षणाचा शभं रहून अधिक वर्षांचा वारसा
  • पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ला
  • विस्तृत कार्यक्षेत्रात अव्याहत कार्यरत
  • आठ महाविद्यालये, चार शाळा आणि तीन कॅम्पस
  • सर्व कॅम्पस शहराच्या मध्यवर्ती भागात

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा

  • संस्थेत शिक्षण घेण्यास उत्सुक असणाऱ्या  आर्थिकदृष्ट्या मागास गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाहाय्य, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा
  • सर्व सोयींनी युक्त अशा प्रयोगशाळा
  • महाविद्यालयीन स्तरावरील संशोधनासाठी सोयी
  • विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे  आयोजन
  • विद्यार्थ्यांसाठी मोठी क्षमतेची सुविधा युक्त  वसतिगृहे

संस्थेची बलस्थाने

  • गणुवत्तापूर्ण आणि अनुभवी अध्यापक वर्ग
  • नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती
  • अत्याधुनिक पायाभूत मांडणी व सुविधा
  •  विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कल्पक उपक्रम

अव्वल आणि अग्रेसर

तरुणाई हा भारताचा प्राण. तरुणाईस कुशल बनविण्याबरोबरच त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’तर्फे (AISSMS) सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यवेधी पिढी घडविण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाकडून शिक्षकांनाही मार्गदर्शन दिले जाते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध उपक्रमांत संस्थेचे विद्यार्थी कायम अव्वल आणि अग्रेसर असतात.

संस्थेचा वटवृक

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ मध्ये वसतिगृहाच्या माध्यमातून लावलेल्या AISSMS या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या शाळा-महाविद्यालये गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांसाठी समर्पित भावनेने काम करीत आहेत.

संस्थेची महाविद्यालये, शाळा व त्यांची विशेष कामगिरी

AISSMS कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग

(स्थापना १९९२ । ३० वर्षे पूर्ण)

  • NAAC A+ ग्रेड, पंचाहत्तर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्पर्धेत इंडस्ट्री इंटरफेस आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सव्विसाव्या  क्रमांकावर
  • शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलद्वरे  आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२२’चे विजते पदे
  • महाविद्यालयास ‘सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठा’द्वारे शहरी श्रेणीतील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा अध्याय पुरस्कार प्राप्त

AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी

(स्थापना १९९९ । २३ वर्षे पूर्ण)

  • l NAAC A+, NBA (५ पदवी अभ्यासक्रम), स्वायत्त महाविद्यालय मानांकित ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’शी संलग्न संस्था ‘आयसीटीई’नुसार गोल्ड रेटिंग (२०१६, २०१७, २०१८ आणि २०२०)- सीआयआय सर्वेक्षण ऑफ इंडस्ट्री लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्ट
  • टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात प्लेसमेंट साठी आघाडीच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नवव्या क्रमांकावर स्थान

AISSMS पॉलिटेक्निक

(स्थापना १९९४ । २८ वर्षे पूर्ण)

  • एनबीए मान्यताप्राप्त कार्यक्रम
  • तंत्रनिकेतन मधील अभ्यासक्रमांना NBA मानांकन तसेच MSBTE कडून अतिउत्कृष्ट दर्जा प्राप्त.

AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी

(स्थापना १९९६ । २६ वर्षे पूर्ण)

  • l NAAC A मानांकित ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’शी संलग्न महाविद्यालय
  • राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट एम. फार्म. थीसिस पूरस्कार दोनदा प्राप्त.
  • ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क २०२२’द्वारे भारतातील टॉप शभंर फार्मसी संस्थेमध्ये थान

AISSMS कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड के टरिंग टेक्नॉलॉजी

(स्थापना १९९७ । २५ वर्षे पूर्ण)

  • NAAC A, NBA (BHMCT 2022), An autonomous college ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’शी संलग्न स्वायत्त महाविद्यालय
  • भारतातील सर्वोच्च खासगी हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये आठव्या क्रमांकावर
  • हॉस्पिटॅलिटी उद्योगातील आघाडीच्या उद्योजकांसोबत तीसहू न अधिक एमओयवूर स्वाक्षऱ्या

AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – एमबीए

(स्थापना २००२ । २० वर्षे पूर्ण)

  • NAAC A+ मानांकित इन्स्टिट्ट, यू भारतातील संलग्न महाविद्यालयांमध् ये दहाव्या क्रमांकावर
  • ‘बिझनेस वर्ल्ड मॅगझिन सर्व्हे २०१८’नुसार पश्चिम विभागातील खासगी व्यवस्थापन संस्थांद्वारे अठराव्या क्रमांकावर

AISSMS कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्शन

(स्थापना २०२२)

AISSMS प्रायव्हेट इंडस्ट्रिअल ट्रेनिग इन्स्टिट्यूट

(स्थापना १९९१ । ३१ वर्षे पूर्ण)

  • आयएसओ ९००१ : २०१५ प्रमाणपत्र मिळालेले महाराष्ट्रातील पहिले आयटीआय
  • २००५ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘अ’ दर्जा प्राप्त

श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल

(स्थापना १९३२ । ९० वर्षे पूर्ण )

श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी डे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज

(स्थापना १९७२ । ५० वर्षे पूर्ण )

मराठी