डॉ. चारुदत्त आपटे यांनी 1986च्या सुमारास पुण्यात न्यूरो सर्जन म्हणून प्रॅक्टीस सुरू केली. त्यावेळी पुणे अगदीच छोटं होतं. जनरल हॉस्पिटल्स, जनरल प्रॅक्टीशनर्सहोते, मात्र एखाद्या विशिष्ट वैद्यकशाखेतील तज्ज्ञ असण्याचे किंवा त्या विशिष्ट शाखेला वाहिलेले हॉस्पिटल नव्हते. स्पेशालिटीला फारसा मान नव्हता. स्पेशालिटी तज्ज्ञांना कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नव्हते. अशा काळात पाच सहा वर्षे प्रॅक्टीस केल्यानंतर आपण इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे वेगळे काहीतरी सुरू करावे असा विचार सुरू झाला. यातूनच 1994 मध्ये डॉ. आपटे आणि त्यांच्या तीन चार सहकाऱ्यांनी मिळून हर्डीकर हॉस्पिटलमध्येजागा भाड्याने घेऊन तिथं पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजीची स्थापना केली. ‘सह्याद्रि’चं बीज ईथेच रोवलं गेलं होतं. समाजानं आणि डॉक्टरांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजीला भरभरून पाठिंबा दिला. त्यानंतर दहा वर्षांनी डॉ. आपटे यांनी रुग्णांना वेगवेगळ्या आजारांवरील प्रगत उपचारांच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात आणि वेगवेगळ्या स्पेशालिटी तज्ज्ञांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे या ध्येयातून स्पेशालिटी हेल्थकेअरची मध्यवर्ती संकल्पना असलेले सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्या क्षेत्रात कमतरता आहे, प्रगत उपचारांची सोय नाही त्या सुविधा सुरू करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध झाली पाहिजे, तिथं पोहोचणं सहजसुलभ असलं पाहिजे, जबाबदार आरोग्य व्यवस्था असली पाहिजे. या तीन महत्त्वाच्या तत्वांवर सह्याद्रिची पायाभरणी करण्यात आली.
रुग्णांचा पाठीराखा : सह्याद्रि हॉस्पिटल
राकट देशा कणखर देशा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं ते या भूमीला लाभलेल्या सह्याद्रीच्या भक्कम डोंगर रांगांमुळे. महाराष्ट्राच्या भूमीचं रक्षण करणारे सह्याद्रीचे कडे आजही छातीचा कोट करून उभे आहेत. हेच नाव धारण करणारे सह्याद्रि हॉस्पिटल्स आरोग्य सेवा क्षेत्रात हीच भूमिका बजावत आपले नाव सार्थ करत आहे. कोणत्याही संकटात रुग्णांच्या पाठीशी सह्याद्रि हॉस्पिटल्स अगदी ठामपणे उभे असते. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या अनेक आरोग्य सेवा उपलब्ध करून एक नवा मापदंड ‘सह्याद्रि’नं प्रस्थापित केला असून, जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविणारे शहर म्हणून पुण्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची ओळख बनविण्यात सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी हॉस्पिटल्सची श्रंखला ‘सह्याद्रि’नं उभी केली आहे. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखानाच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने...
सर्वांसाठी आरोग्य सेवा हेच ध्येय
स्वतंत्र जनरल प्रक्टीस करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांशी किंवा छोट्या हॉस्पिटल्सशी स्पर्धा न करता त्यांना पूरक ठरेल असे प्रगत आणि एकात्मिक व्यासपीठ निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. छोटी नर्सिंग होम चालवणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यानं रुग्णावर उपचार करताना मर्यादा येत असत, मग असे रुग्ण मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागत असत. ही अडचण दूर करून डॉक्टरांना सह्याद्रिमध्ये येऊन आपल्या रुग्णावर आवश्यक उपचार करता यावेत असा विचार यामागे होता. यातूनच 2004 मध्ये डेक्कन इथलं सह्याद्रि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहिलं. या हॉस्पिटलमध्ये न्युरो सायन्स, ह्रदय शस्त्रक्रिया, कर्करोग अशा खास वैद्यक शाखेतील उपचारांसाठी अत्याधुनिक उपचार यंत्रणा, उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ, अन्य पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. 100 ते 125 रुग्ण क्षमता असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये एका ठराविक प्रकारच्या आजारांवर उपचार होण्याची सुविधा निर्माण करण्याऐवजी सर्व प्रकारच्या आजारांवरील प्रगत उपचार यंत्रणा आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला.
काळानुरूप पुण्याचा पसाराही वाढत होता त्यामुळे एकाच ठिकाणी हॉस्पिटल उभारून सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे हब अँड स्पोक मॉडेलवर भर देण्यात आला आणि मुख्य हॉस्पिटलच्या सभोवती आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर विविध भागांमध्ये सह्याद्रिच्या शाखा किंवा कम्युनिटी हॉस्पिटल्स उभारण्याची सुरुवात करण्यात आली.
कर्वेरोडवरील मुख्य सह्याद्रि हॉस्पिटल उभारल्यानंतर दोनच वर्षात थरूडला पौड रोडवर वनाजजवळ सह्याद्रि हॉस्पिटल सुरू झाले. त्यानंतर अल्पावधीतच कसबा पेठ, नगर रोड, बिबवेवाडी आणि हडपसर इथं हॉस्पिटल्स उभारण्यात आली. हळूहळू पुण्याच्या विकसित झालेल्या महत्त्वाच्या भागांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्याची गरज भासू लागली. कारण पुण्यातील वाहतूक कोंडी, झालेला विस्तार यामुळे तातडीच्या वेळी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वाढत होता. त्यामुळे रुग्णाला 10 ते 15 मिनिटात सर्व प्रकारच्या उपचार सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचता आलं पाहिजे या उद्देशानं स्पेशालिटी हब्ज उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यामुळे डेक्कन सारखीच नगर रोड आणि हडपसर इथं सह्याद्रि हॉस्पिटल्सची सर्व सुविधायुक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभी राहिली. पूर्वी पुण्यात उपचारासाठी राज्यातील इतर भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड होती. उत्तर महाराष्ट्रातून नाशिक भागातून मोठ्या संख्येनं रुग्ण पुण्यात येत, पण दीर्घकाळ उपचारासाठी इथं राहण्याचा खर्च मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबाला परवडण्यासारखा नव्हता, हे लक्षात घेऊन ‘सह्याद्रि’नच त्यांच्यापर्यंत पोहोचायचे ठरवले आणि प्रथम नाशिकमध्ये सह्याद्रि हॉस्पिटल उभे राहिले. त्याचबरोबर कराडसारख्या शहरात कर्करोग, मेंदू, ह्रदय आदी आजारांवर उपचार सुविधा उपलब्ध नव्हत्या. या भागात बहुतांश लोक शेतकरी असल्यानं या मध्यमवर्गीय लोकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी पुण्या-मुंबईला जावे लागत असे. त्यांना ते परवडत नसे. त्यामुळं इथंही सर्व अत्याधुनिक उपचार सुविधांनी सुसज्ज सह्याद्रि हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मेंदू, ह्रदय अशा अनेक दुर्मीळ शस्त्रक्रिया आता इथंही होऊ लागल्या आहेत. कराड शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांना सहजपणे प्रगत उपचार मिळणे शक्य झाले आहे.
आठ हॉस्पिटल्सची श्रृंखला
आज पुण्यात डेक्कन जिमखाना, नगर रोड, कोथरूड, बिबवेवाडी, कसबा पेठ आणि हडपसर या भागात सहा आणि कराड व नाशिक इथं प्रत्येकी एक अशी आठ सह्याद्रि हॉस्पिटल्सची श्रृंखला उभी राहिली आहे. या आठ हॉस्पिटल्सची मिळून एकूण क्षमता सुमारे 900 बेड्सची आहे. 2000 वैद्यकीय तज्ज्ञ, 2600 कर्मचारी असा प्रचंड पसारा असलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांवर उपचार करण्यात आले असून, राज्यातील आरोग्य सेवेला एक प्रगत आणि बहुआयामी चेहरा देण्यात सह्याद्रि हॉस्पिटल्सचा मोठा वाटा आहे.
भविष्यातील योजना
सह्याद्रि हॉस्पिटल्सची ही श्रृंखला अशीच विस्तारत नेण्याचा डॉ. चारुदत्त आपटे यांचा मानस असून, पायाभूत सुविधा सुधारण्या वर आणि आपल्या हॉस्पिटल्सची क्षमता वाढवण्या वरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुढील वर्षभरात २५० पेक्षा अधिक बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये जसे ठाणे आणि मुंबई इथे हॉस्पिटल्स उभारण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू असून, या भागातील रुग्णांना ही चांगल्या उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांना एका क्लिकवर किंवा बोटांच्या टोकावर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवरही भर दिला जात आहे. यासाठी हॉस्पिटलची आयटी प्रणाली अपग्रेड करण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्या साठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणणारी तसेच एक कुटुंब अशी संस्कृती जपणारी सह्याद्रि हॉस्पिटल्स राज्यात अनेक ठिकाणी उभी राहतील.
सह्याद्रिची संस्कृती
सह्याद्रि हॉस्पिटलची संस्कृती ही त्याच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे. इथे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, इतर कर्मचारी यांच्यात वरिष्ठ -कनिष्ठ असा भेदभाव केला जात नाही. कोणत्याही हॉस्पिटलच्या यशात डॉक्टर्सची भूमिका 30 टक्के तर उर्वरीत लोकांची भूमिका 70 टक्के असते, यावर सह्याद्रिचा विश्वास आहे. इथे सर्व सहकारी आहेत. हेच सूत्र सगळ्यांना बांधून ठेवते. कोणत्याही कठीण काळात हॉस्पिटलचा कारभार अगदी सुरळीतपणे चालतो. त्यामुळेच आज 4 ते 5 हजार लोकांचे हे कुटुंब अगदी सुरळीतपणे एकत्र कार्यरत आहे. सह्याद्रि हॉस्पिटल्सचा गेल्या सोळा वर्षांमधील विस्तार बघितला तर पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा अशी त्यांची कामगिरी आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात अशी ख्याती मिळवणे हे आजच्या काळात अतिशय आव्हानात्मक आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर
आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सह्याद्रिनं जनजागृतीसाठी, सल्ला सेवेसाठी तसेच व्यवस्थापनासाठी याचा व्यापक वापर करण्यास सुरुवात केली आहे. पेपरलेस यंत्रणा निर्माण करण्याकडे वाटचाल सुरू आहे. सह्याद्रि व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर करत आहे. विविध तज्ञांचे ब्लॉग, यू ट्यूब व्हिडीओ आणि इतर सोशल मीडिया टूल यांच्या साह्यानं विविध आजार, त्यांची माहिती, उपचार पद्धती, उपलब्ध यंत्रणा, याबाबत माहिती दिली जाते. तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे घेतली जातात. त्यामुळे अनेक लोकांना घरबसल्या मार्गदर्शन मिळते. ऑनलाइन क्लिनिकसाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. कोरोना साथीच्या काळात अनेकांना ही सेवा वरदान ठरली आहे. यामुळे डॉक्टर आणि रुग्णांना संवाद राखण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यास मदत झाली आहे.
समवेदना
सर्वांना परवडणाऱ्या दरात आवश्यक त्या उपचार सुविधा मिळाले पाहिजेत हे ध्येय असणाऱ्या डॉ. चारुदत्त आपटे यांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजीचा जम बसल्यानंतर गरीब रुग्णांच्या उपचारासाठी ’समवेदना’ नावाचा उपक्रम सुरू केला. या संस्थेद्वारे गरीब रुग्णांना वेळीच योग्य उपचार व आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. लोकांमध्ये विविध आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवले जातात.
कौशल्य विकासासाठी कार्य
वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची टंचाई जाणवत आहे. कोविड संकटामुळे ही बाब अधिक स्पष्टपणे दिसून आली. या क्षत्रेतील हा दुष्काळ दूर करण्यासाठी आणि तरूणाईला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत कौशल्य विकासासाठी एक खास कॉलेज सुरू करण्यात आलं आहे. जिथे दहावी पास मुला मुलींना रुग्ण सेवा, होम हेल्थ केअर, रेडीओलोजी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्त घेणारे कुशल तंत्रज्ञ अशा कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इथं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के रोजगाराची हमी देण्यात येणार आहे.
कोविड काळातही ‘सह्याद्रि’ सज्ज
कोविड-19 च्या जागतिक साथीच्या महासंकटात लोकांचे जीव वाचवण्यासाठी ‘सह्याद्रि’ धावून आले. अत्यंत निष्ठेन त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. कोविडच्या रुग्णांसाठी सर्व सुरक्षा उपायोजना करण्यात आल्या. सह्याद्रिनं स्थानिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांशी सहकार्य करून कोविड केअर सेंटर्स उभारण्यास मदत केली. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या काळात रुग्णसंख्या वाढत असताना लक्षणं न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणं दिसणाऱ्या लोकांसाठी ऑनलाइन सल्ला आणि होम वेल कोविड पके जेस म्हणजेच घरीच राहून काळजी घेण्याकरता विशेष सेवा उपलब्ध केली. यामुळे हॉस्पिटल्सवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळाली आणि गंभीर रुग्णांना जागा मिळण्यास मदत झाली. लक्षण जाणवत असलेल्या रुग्णांच्या चाचणीसाठी घरीच नमुने घेण्याची सोयही सह्याद्रिनं उपलब्ध करून दिली होती. याचाही अनेक रुग्णांना फायदा झाला. या काळात अन्य रुग्णांना तसंच तातडीच्या उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यासाठी संसर्ग होऊ नये यासाठी अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करणं आवश्यक होतं. यासाठी हॉस्पिटलची संक्रमित (कोविड) आणि नॉन-इन्फेक्टेड (नॉन-कोविड) अशा दोन भागात विभागणी करण्यात आली. त्यासाठी स्वच्छतेचे आणि इतर नियमांची काटेकोर अंमल बजावणी करण्यात आली. दोन्ही विभागातील कर्मचारी वेगळे ठेवण्यात आले.
हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रवेशाचे मार्ग वेगळे ठेवण्यात आले. नियमित तपासणी करण्यात आली. सुरक्षा नियमांच्या प्रभावी अंमलबजावणी करता वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आलं. ताण वाढण्याच्या काळात कर्मचाऱ्यांना प्रणा रे देण्यासाठी, त्यांची उमेद टिकवन ठेवूण त्यासाठी विविध उपाययोजना, उपक्रम राबवण्यात आले. कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिला. त्यामुळे या साथीच्या काळात आजपर्यंत भरपूर रुगन्याना लाभ झाला आहे, अशी माहिती सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. अबरारअली दलाल यांनी दिली. सध्या वैद्यकीय सेवा क्षेत्रात रिमोट हेल्थकेअर मॉडेल अंतर्गत टेलिमेडिसिन आणि टेलि-कन्सल्टेशनकडे कल वाढत आहे. टेलिमेडिसीनमुळे शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांचा वेळ वाचतो. त्यामुळे या सुविधेचा प्रसार वाढवण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यांमधील लहान, मोठ्या शहरांमध्ये विविध तपासणी शिबिरे घेण्यात येत असून, तेथील स्थानिक रुग्णालयांशी ओपीडीसाठी करार करण्यात आल्यानं रुग्णांना लाभ होत आहे.
अत्याधुनिक उपचार : स्पर्धेच्या जगात किफायतशीर किमतीत अत्याधनिुक उपचार आणि गुणवत्तापूर्ण सुविधा देणं हे खुप कठीण आहे. डॉ. आपटे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रिनं हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेललं आहे. एका छोट्या हॉस्पिटलपासुन आठ हॉस्पिटल्सची श्रृंखला निर्माण करण्यापर्यंतचा सह्याद्रि हॉस्पिटलचा प्रवास अतिशय प्रणादायी आहे. आज सह्याद्रि हॉस्पिटल्स हे देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील पश्चिम भागातील सर्वांत महत्त्वाचे आणि आघाडीचे केंद्र आहे.
उल्लेखनीय कामगिरी
- पश्चिम भारतातील सर्वात वेगाने वाढणारे अवयव प्रत्यारोपण कें द्र- यकृत, मूत्रपिडं, स्वादपिुडं आणि बहु-अवयव प्रत्यारोपणासाठी सर्वसमावेशक सुविधा- केवळ चार वर्षात 200 हून अधिक यकृत प्रत्यारोपण
- हृदय आणि फु फ्फुस प्रत्यारोपण सुविधा.
- आशियातील सर्वाधिक सीटी अँजियोग्राफी करण्यात आलेले हॉस्पिटल
- ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ स्वीकारणारे खासगी क्षेत्रातील पहिले हॉस्पिटल; राज्य सरकारची महात्माज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उपलब्ध.
- सूर्य सह्याद्रि हॉस्पिटल वंचित वर्गातील रुग्णांसाठी समर्पित हॉस्पिटल
- ‘मिशन प्रेणा’ उपक्रमांतर्गत वंचित मुलांना मोफत कार्डियाक तपासणी आणि कार्डियाक शस्त्रक्रिया याकरता विशेष बाल हृदय शस्त्रक्रिया युनिट समर्पित
- क्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर – भारतातील चौथे हॉस्पिटल AAHRPP कडून आंतरराष्ट्रीय मान्यता
- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड : रोटरी क्लबच्या सहकार्याने 8 तासात जास्तीत जास्त अवयव दान दाते वचनबद्ध के ल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखाना
- 2004 मध्ये सुरवात
- 202 खाटांची क्षमता
- NABH नामांकन प्राप्त न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी, लिव्हर, किडनी, पॅनक्रियाज, हार्ट आणि फुफ्फुस प्रत्यारोपण, हेमेटोलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स, क्रिटिकल केअर, कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट, स्पाईन सर्जरी, मधुमेह वा हार्मोन्स उपचार सुविधा उपलब्ध.
- पुढील वर्षांत अतिरिक्त 175 खाटा उपलब
पुरस्कार
- सर्वात कमी कालावधीत NABH मान्यता मिळवणारे एकमेव हॉस्पिटल
- NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी, हेमेटोलॉजी, जनरल सर्जरी, अॅनेस्थेशिया, इंटर्नल मेडिसिन आणि रेडिओलॉजीमधील डीएनबी अभ्यासक्रम
- राष्ट्रीय अवयव आणि ऊतक संस्थेद्वारे National Organ and Tissue Transplant Organisation (NOTTO) अवयव दानासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय पुरस्कार
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड
- 2014 मध्ये सुरवात
- 130 खाटांची क्षमता.
- वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग वा प्रसूती व नवजात शिशु विभागात (NICU) विशेषता कार्डिओलॉजी, एनआयसीयू, न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी, हेमेटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, टासेक लिव्हर व्ही. किडनी प्रत्यारोपण, अशा अनेक सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध.
- पुढील वर्षांत अतिरिक्त 70 खाटा उपलब्ध
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड
- 2009 मध्ये सुरवात
- 150 खाटांची क्षमता.
- या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण (आयव्हीएफ), स्ट्रिरोग वा प्रसुती, जॉईंट रिप्लेसमेंट, न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी, कॅन्सर उपचार (रेडिएशन, मेडिकल, सर्जिकल), इंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, कार्डियाक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लॅस्टी, मल्टिट्रॉमा आणि क्रिटीकल के अर, आशा अनेक सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हडपसर
- 2009 मध्ये सुरवात, 2018 पासून सुपर स्पेशालिटी रुपात दाखल.
- 130 खाटांची क्षमता.
- कर्करोग उपचार केंद्र (मेडिकल, सर्जिकल रेडिएशन थेरेपी) उपचारात विशेषता.
- हृद्यरोग चिकित्सा / अतिदक्षता (क्रिटिकल केअर) / सर्वसमवेशक कर्करोग उपचार (वैद्यकीय, शास्त्रकृता रेडिएशन), पीईटी स्कॅन, डिजिटल मॅमोग्राफी)/ स्त्रीरोग वा प्रसुती सामान्य शस्त्रक्रिया/ अस्थिरोग चिकीत्सा आणि संयुक्त प्रतिस्थापन.
- पुढील वर्षांत अतिरिक्त 100 खाटा उपलब्ध
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक
- 2014 मध्ये सुरवात
- 108 खाटांची क्षमता
- कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, न्यूरोसायन्सेस, ट्रॉमा आणि क्रीटीकल केअर, ऑथोपिडेक आणि लिव्हर ट्रासप्लॅन्ट आशा अनेक सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध.
- पुढील वर्षांत अतिरिक्त 150 खाटा उपलब्ध
सूर्य सह्याद्रि हॉस्पिटल
- 2013 मध्ये कसबा पेठ मध्ये सुरवात
- 65 खाटांची क्षमता, 8 आयसीयु बेड्स
- प्राध्यानाने कमी उत्पन्न गटातील व गरजू रुग्णांकरीता संपूर्ण समर्पित पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल
- 2022 एप्रिल पर्यंत कमी उत्पन्न गटातील रुग्णांकरिता पहिले रेडिएशन युनिट सुरु करण्यात येत आहे.
सह्याद्रि हॉस्पिटल बिबवेवाडी
- 2009 मध्ये सुरवात
- 35 खाटांची क्षमता
- 8 आयसीयु बेड्स
सह्याद्रि हॉस्पिटल कोथरुड
- 2006 मध्ये सुरवात
- 30 खाटांची क्षमता