घरचा वैद्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा ब्रँड ‘शारंगधर’

प्रमुख वैद्यकशास्त्रे डॉक्टरांना माहीत पाहिजतच. ज्या रुग्णाला जी पॅथी योग्य असल, ती ठरवून त्याप्रमाणे डॉक्टरांनी उपचार करावेत. कारण कोणतच औषध अलोपॅथी किंवा आयर्वेदिक असे नसते, औषध हे औषधच असते. त्याचा कसा, कधी, कोणासाठी आणि कशासाठी वापर करायचा, हे डॉक्टरांनीच ठरवायला हवे. आरोग्य विषयात डॉक्टर किंवा वैद्य यांचे महत्त्व व योगदान कुठेच कमी होत नसते. परंतु, संगणक किंवा वाहन इ. दररोजच्या वापरातल्या वस्तूंच्या बिघाडावरील जुजबी उपाययोजनांची माहिती जशी आपण करून घेतो, त्याचप्रमाणे शरीरात होणाऱ्या बिघाडांवरील काही साध्या सोप्या व नैसर्गिक असल्याने अत्यंत सुरक्षित अशा आयर्वेदिक औषधांची माहिती करून घेऊन, आपण आपले आरोग्य तंदुरुस्त ठवू शकतो.

अशी झाली ‘शारंगधर’ची सुरुवात…

डॉ. जयंत अभ्यंकर यांचे’ आई आणि वडील दोघेही आयुर्वेदातील डॉक्टर होते. त्याची इच्छा होती, की आपणही आयुर्वेदक औषधे तयार करणारी कंपनी काढावी. त्याचवेळी धाकटा मुलगा जयंत यांना आयुर्वेदामध्ये रस असल्याचे त्यांनी वडिलांना सांगितले. वडिलांनाही हे ऐकून उत्साह आला, परंतु फक्त त्या विषयातील रस उपयोगाचा नव्हता, तर त्यातील ज्ञान म्हणजेच पर्यायानेशिक्षण घेणे गरजेचे होते. तेव्हा जयंत यांनी नुकतेच आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून छोटी नोकरी सुरू केली होती. पण आयुर्वेदामध्ये असलेला त्यांचा रस कमी होत नव्हता. यामुळेच त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळवला. पुन्हा एकदा नवे शिक्षण म्हणजे नवी सुरुवातच होती. बारावीला पडलेल्या चांगल्या गुणांच्या आधारावर त्यांना अष्टांग आयुर्वेदीक महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. सहा ते साडे सहा वर्षांचा हा संपूर्ण अभ्यासक्रम होता. त्यांनी १९८५ मध्ये आयुर्वेदाला प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी जयंत आणि वडील भालचंद यांनी मिळून अवघ्या सातशे फूट जागेत ‘शारंगधर फार्मास्युटिकल’ नावान औषधांचे उत्पादन सुरू केले. नवनवीन कल्पना आणि धोका घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जयंत यांची वृत्ती असल्याने त्यांनी ते कसब आयुर्वेदातही लावायला सुरवात केले. विविध प्रयोग करून ते लोकांपर्यंत पोचविण्याच ते प्रेयत्न करू लागल.

शिक्षण संपल्यानंतर प्रॅक्टिस

डॉ. जयंत यांचे शिक्षण संपपेर्यंत व्यवसायाचा थोडा जम बसला होता. शिक्षण संपल्यानंतर व्यवसायात पूर्णवेळ लक्ष घालून, तोच पुढे न्यायचा असा त्यांचा विचार होता. तेव्हा वडील भालचंद्र यांना निवृत्तीचे वेध लागले होत. मात्र, तरीही मुलाने थेट व्यवसायात न येता, लोकांचे प्रश्‍न/आजार काय आहेत, त्यावर कोणते उपाय करायला हवेत हे जाणून घ्यायला हवे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे वडिलांनी डॉ. जयंत यांना सुरुवातीचे काही वर्षे प्रॅक्टीस करण्यास सांगितले. वडिलांच अनुभवातून आलेले हे बोल प्रमाण मानून त्यांनी शिक्षण संपल्यानंतर टिळक रस्त्यावर एक छोटासा दवाखाना सुरू केला. दिवसाचे ४ ते ५ तास दवाखाना आणि त्यानंतर व्यवसाय पाहणे, असा दिनक्रम सुरू झाला. सलग पाच ते सहा वर्षे हे केल्यानंतर दवाखाना आणि व्यवसाय या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. कारण दिवसभर विविध मानसिकता असलेले रुग्ण तपासणे आणि त्यानंतर व्यवसायाचे गणित, या परस्परविरुद्ध गोष्टी पाहणे थोडे अवघड जात होते. तोपर्यंत त्यांची पुरेशी प्रॅक्टिसही झाली होती. आलल्या रुग्णांचे आजार, त्यांची मानसिकता, त्यावरील उपाय हे सर्व त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे नंतर प्रॅक्टिस सोडून ते पूर्ण वळे व्यवसायाकडे वळाले.

शारंगधर ऋषींवरून कंपनीचे नाव

डॉ. जयंत म्हणाले, ‘‘आपल्या अनेक ऋषिमुनींनी आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर त्याची समाजासाठी असलेली गरज त्यांनी ओळखली आणि ते ज्ञान सर्वांसाठी खुले केले. अनेक ऋषींनी यामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. आमच्या कंपनीचे नाव शारंगधर ऋषी यांच्या नावावरून घेण्यात आले आहे. ते थोर आयुर्वेदिक औषधनिर्माणशास्त्रज्ञांपैकी एक होते, ज्यांनी आयुर्वेदच्या इतिहासात प्रथमच पारंपरिक आयुर्वेदिक औषध तयार करण्याच्या योग्य कार्यपद्धती व शर्तींचे मानदंड आखले. अशाप्रकारे, आयुर्वेदाच्या पारंपरिक ज्ञान आणि माहितीच्या आधारे आधुनिक उत्पादन पद्धतींचेमिश्रण करून आयुर्वेदाला सोईस्कर पण प्रभावी स्वरूपात ओळख करून देऊन आम्ही आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करीत आहोत.’’

२००३ वर्ष ठरले ‘माइलस्टोन’

अभ्यंकर यांनी १९८५मध्ये सुरू केलेला व्यवसाय हळूहळू वाढत असला, तरी त्याने म्हणावा तसा वेग घेतला नव्हता. त्यामुळे उत्पादनांना प्रसिद्धीही मिळत नव्हती. त्यावेळी हळूहळू बड्या कंपन्यांनी जाहिरात करण्यास सुरुवात केली होती. व्यवसायासाठी नवे प्रयोग करण्याची आणि धोका पत्करण्याचा डॉ. जयंत यांचा स्वभाव असल्याने त्यांनी सर्वस्व पणाला लावून आपल्या व्यवसायाची जाहिरात करायचे ठरवले. त्यांनी २००३मध्ये जाहिरात केली. त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल याची शाश्‍वती डॉ. जयंत यांना नव्हती. जाहिरातीला प्रतिसाद यायला सुरुवात झाला, तेव्हा तेवढ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची क्षमताही कंपनीची नव्हती. पण हळूहळू उत्पादनांची मागणी वाढली आणि पुरवठादेखील वाढला. कंपनीचा विस्तार पुण्याबाहेरही वाढू लागला. संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या ठिकाणी ‘शारंगधर’ची उत्पादने उपलब्ध होऊ लागली.

परदेशांतही आयुर्वेदाची गोड

व्यवसाय महाराष्ट्रात आणि हळूहळू देशातही वाढू लागला. तेव्हा डॉ. जयंत अभ्यंकर यांना परदेशांत व्यवसाय वाढवायचे वेध लागले. पहिली ऑर्डर मिळविणे तसे फारच कठीण होते. प्रचंड प्रयत्नांती त्यांना जपानमधून एक ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर एअर इंडियाच्या विमानातून जपानच्या ओसाकाला पाठवायची होती. ऑर्डर पाठवायची वेळ आली, तेव्हा नेमका एअर इंडियाचा संप सुरू झाला होता. त्यामुळे ऑेर्डर कशी पाठवावी, या विचारात असलेल्या डॉ. जयंत यांनी कॅथे पॅसिफिक या विमानान आपली पहिली ऑर्डर परदेशात, म्हणजेच जपानला पाठविली. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये ही ऑर्डर जायला दोन दिवस उशीर झाला होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा उशीर नव्हता. पण तरीही त्या जपानी कंपनीने त्यांना दीड लाखांचा दंड सुनावला. आपली कोणतीही चूक नाही, हे माहीत असूनही डॉ. जयंत यांनी तो दंड तक्रार न करता भरला आणि जपानमध्ये भारतीय निर्यातदारांबद्दलचे असलेले सर्व गैरसमज मोडून काढले. त्यानंतर जपानी कंपनीशी असलेले त्यांचे संबंध दृढ झाले.

डॉ. जयंत म्हणतात, ‘‘परदेशातूनही मालाला मागणी वाढली आहे, कारण तथील लोकही आता केमिकल्सला कंटाळले आहेत. त्यामुळे ते आयुर्वेदाला महत्त्व देतात. जेव्हा ते आपल्याकडून अशी अपेक्षा ठेवतात, तेव्हा आपणही त्यांच्या अपेक्षेला उतरून चांगले काहीतरी द्यावेयाच्या प्रयत्नात आम्ही असतो. आज अमेरिकेसारख्या देशातही मालाची निर्यात केली जात आहे.’’

sharangdhar-img-2

सुवर्णा अभ्यंकर

पत्नीचाही व्यवसायात सहभाग

‘शारंगधर’ उद्योगाला डॉ. जयंत अभ्यंकर यांच्या पत्नी सुवर्णा अभ्यंकर यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. सुवर्णा या एका मध्यम वर्गीय नोकरदार कुटुंबातून आलेल्या आहेत. परंतु उद्योगामध्ये पत्नीचा सहभाग असला पाहिजे, त्यांनाही व्यवसायातील व्यवहारांची माहिती पाहिजे, या विचारांनी डॉ. जयंत अभ्यंकर यांनी सुवर्णा यांना या उद्योगात सहभागी करून घेतले. डॉ. जयंत अभ्यंकर यांच्यामते, प्रत्येक स्त्री मध्ये ‘मल्टी टास्किंग मॅनेजमेंट’ची क्षमता असते. त्या पुरुषांपेक्षा जास्त शिस्तबद्ध असतात. या गुणांचा उद्योगात खूपच उपयोग होतो, आणि तो तसा झालाही. डॉ. जयंत अभ्यंकर यांनी सुवर्णायांच्यावर दाखविलेला विश्वास, दिलेले स्वतंत्र अधिकार त्यांनी गेल्या २० वर्षांत सातत्याने सार्थ करून दाखविले आहेत. त्यामुळे त्यांना ‘महिला उद्योजक’ हा पुरस्कार आणि ओळखही मिळाली आहे. डॉ. जयंत अभ्यंकर यांच्या याच विचारधारेमुळे ‘शारंगधर’मध्ये महत्त्वाच्या जवळजवळ ४० टक्के पदांवर महिला आहेत. त्याही सुवर्णा आणि डॉ. जयंत अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमतेने काम करीत आहेत.

दुसरी पिढीही व्यवसायात

डॉ. जयंत अभ्यंकर यांचा मुलगा पार्थ यानही वडिलांना हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. कुठलाही व्यवसाय हा ‘मॅनेजमेंट’वर चालतो. ज्या व्यवसायाचे व्यवस्थापन उत्तम, त्या व्यवसायाचा लवकर विस्तार होतो आणि यशही लवकर मिळते अशी खात्री असल्याने पार्थन नुकतेच ‘मॅनेजमेंट’ मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, डिजिटायझशनचे महत्त्व ओळखून, दुसरी पिढी कंपनीचा डिजिटल युगात आपला विस्तार करीत आहे. डॉ. जयंत म्हणाले, ‘‘सध्या पार्थ आणि मी कंपनीला डिजिटली ओळख मिळवून देण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करीत आहोत. ऑनलाइन औषधांना तुलनन कमी प्रतिसाद असला तरी, काही लाइफस्टाइलशी निगडित उत्पादनांसाठी हे माध्यम नक्कीच उपयोगी पडू शकते. व्यवसायासाठी नवा बदल नहमीच स्वीकारायला हवा आणि आमचा तसा स्वभाव असल्याने आणखी विस्तार करण्याच्या विचारात आम्ही आहोत.’’

sharangdhar-img-3

पार्थ अभ्यंकर

सर्वांसाठी मोफत डॉ. हेल्थलाइनची सुविधा

आयुर्वेदाबाबत अनेक प्रश्‍न लोकांना असतात, त्यांची झटपट उत्तरे त्यांना मिळायला हवीत या उद्देशाने ‘शारंगधर’ने मोफत ‘आयुरेखा’ नावाची डॉ. हेल्थलाइनही सुरू केली आहे. 95 95 100 500 या क्रमांकावर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत फोन करून आपण आरोग्यविषयक व त्यावरील आयुर्वेदिक उपचारासंदर्भात प्रश्‍न विचारू शकता. यावर तुम्हाला लगेचच उत्तर देण्याची सोय करण्यात आली आहे. रविवारी ही सेवा बंद असते.

शारंगधरचे आगामी प्रकल

  • नवीन संकल्पनेवर आधारित ‘शारंगधर हले्थ फार्म’ लवकरच सासवडजवळ सुमारे १ एकर परिसरात कार्यन्वित होत आहे.
  • येणाऱ्‍या काळात ‘शारंगधर आयुर्वेदक पंचकर्मक्लिनिक’ फ्रेंचाइजी स्वरूपात देणे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करणार आहेत. सध्या ५ शहरांमध्येया क्लिनिक फ्रेंचाइजी सुरू झाल्या आहेत.
  • ‘शारंगधर नॅचरल्स रिटेल आउटलटे्स’ फ्रेंचाइजी स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात देण्यास सुरुवात केली आहे.

काढे-चूर्णांचे गोळ्यांमध्ये रूपांतर

पूर्वी रुग्णावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करताना मोठ्या प्रमाणात काढे, चूर्णयांचा वापर केला जायचा; पण ते खाण्यासाठी सोयीचे नसायचे. या उपायांमुळे अनेकदा रुग्णदेखील कंटाळायचे. बाजारात टिकून राहायचे असल्यास काढे, चूर्णयांचे स्वरूप बदलायला हवे, ही गरज डॉ. जयंत यांनी ओळखली. चूर्ण आणि काढेयांचे रूपांतर गोळ्यांच्या स्वरूपात करायचे, असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी गोळ्यांमध्ये रूपांतर केले. या प्रयोगामुळे ‘शारंगधर’च्या औषधांना लोकांकडून अधिक पसंती मिळू लागली. तरीही ही औषधे लोकांपर्यंत कशी पोचवायची किंवा कशावर कोणती औषधे घ्यावीत याचे ज्ञान लोकांना देणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी छोटी पुस्तिका तयार केली. ‘घरचा वैद्य’ या पुस्तिकेमुळे प्रत्येकजण आपापला वैद्य बनू लागला आणि कोणत्या आजारावर कोणती औषधे घ्यावीत हे लोकांना कळू लागले. ‘शारंगधर’ डोक्यापासून पायापर्यंत उपचार करू शकतील अशा उत्पादनांची निर्मिती करते. स्वतःच उत्पादने घेत असल्याने ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करण्यावर कंपनीचा अधिक भर आहे. यातूनच नावीन्यपूर्ण उत्पादने बनविली जातात, जसे की च्यवनप्राश हेदाणेदार स्वरूपामध्ये आणले गेले. तसेच गुलकंददेखील ‘कुलकंद’ या नावानेदाणेदार स्वरूपामध्ये आणले आहे. कंपनीचे ब्रीदवाक्यच ‘रोगाचा समूळ नाश’ हे असल्याने औषधे ही अखंड स्वरूपातील वनस्पतींपासून बनविली जातात. सुरुवातीपासूनच आयुर्वेद औषधांवर एक्स्पायरी डेट घालणारी ‘शारंगधर’ ही पहिली आयुर्वेदिक कंपनी आहे.

पुरस्कार आणि सन्मान

  • ‘शारंगधर’ला ‘बेस्ट हेल्थ के अर ब्रँड इन आयुर्वेदा’ हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
  • माजी कॅ बिनेट मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार देण्यात आला आहे.
  • शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘बेस्ट ब्रँड इन आयुर्वेदा’ने सन्मानित करण्यात आले आहे.
  • ‘मराठी आंत्रप्रेन्युअर नेटवर्क फोरम’च्या वतीने ‘आदर्श उद्योजक’ पुरस्कारानेही डॉ. जयंत अभ्यंकर यांना गौरविण्यात आले आहे.

आयुर्वेदालाही ‘ब्रँड’ म्हणून स्वीकारायला हवे

डॉ. जयंत म्हणाले, ‘‘आयुर्वेद हे पारंपरिकरीत्या चालत आलेले असले, तरी त्याला ब्रँड म्हणून स्वीकारले गेलेले नाही. आम्ही नवी सुरुवात केली होती, तेव्हा लोक शेवटचा पर्याय म्हणून आयुर्वेद दवाखान्यात उपचारासाठी येत असत. अर्थात, आता युग बदलले आहे. झटपट उपायांसोबत काही दुष्परिणामही असतात, हे लक्षात आल्यानंतर आता लोक आयुर्वेदाकडे चांगल्या हेतूने पाहायला लागले आहेत. आयुर्वेदिक उपचारांचे दुष्परिणा नसतात, हे त्याचे कारण. असे असले तरी, अजून आयुर्वेदिक औषधांना हवा तसा दर्जा मिळालेला नाही. यामुळे तो ‘ब्रँड’ म्हणून ओळखला जात नाही. आज एकूण औषधांच्या व्यवसायात आयुर्वेदिक औषधांचा वाटा केवळ ०.५ टक्के आहे. हे प्रमाण सुधारायचे असल्यास त्याला स्टँडर्डरायजेशन, तसेच ब्रँड म्हणून स्वीकारले गेले पाहिजे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे जसे गरजचे आहे, त्याप्रमाणे आयुर्वेदिक वैद्यांनीही त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. काही ठिकाणी ॲलोपॅथीचे उपचार गरजेचे असतील, तर तसे रुग्णांना सुचवले पाहिजे. त्यातच रक्त तपासणीचा अहवाल अनेक आयुर्वेदिक वैद्य गृहीत धरत नाहीत. आयुर्वेदिक वैद्य म्हणजे नाडी तपासणी, हेच सूत्र तिथे लागू केले जाते. परंतु, नाडीमधून प्रत्येक वैद्यालाच संपूर्ण माहिती मिळतेच असे नाही, त्यामुळे गरज असल्यास त्यांनी रक्त तपासणीचे अहवालही पाहायला हवेत आणि त्यापद्धतीने उपचार करायला हवेत.’’

केमिकलविरहित ब्रँडची ओळख

डॉ. जयंत म्हणाले, ‘‘अनेक लोक आम्हाला म्हणतात, तुम्ही शाम्पू तयार करा, इतर उत्पादने तयार करा; पण आम्ही त्यांना स्पष्ट नकार देतो. कारण काही गोष्टी या केमिकलचा वापर न करता तयार होऊ शकत नाहीत. किंवा तयार के ल्या गेल्या तरी त्यांचा पुरेसा फे स होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेला उतरतातच, असे होत नाही. त्यामुळे आमचे उद्दिष्ट ठरलेले आहे, कोणतेही उत्पादन तयार करताना त्यामध्ये जराही केमिकल्सचा वापर न करता तयार करायचे. किं बहुना आम्हाला केमिकलविरहित उत्पादने असा ब्रँड तयार करायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. लोकांना काय हवे आहे त्यापेक्षा आवश्‍यकता कशाची आहे, यावर आमचे कायम लक्ष राहील. अशीच उत्पादने आम्ही केमिकल्सविरहित स्वरूपात बनविण्याचा प्रयत्न करू.’’

शेतकऱ्यांशी हमीभावाचा केला थेट करार

आपण आपल्या ग्राहकांना कोणता माल विकत आहोत, हे आपण कोणत्या दर्जाचा कच्चा माल खरेदी करीत आहोत, यावर अवलंबून असते. खात्रीचा कच्चा माल मिळावा यासाठी ‘शारंगधर’कडून आयुर्वेदिक वनस्पती, बी-बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जाते. तसेच, कच्चा माल खरेदी करणार याची खात्री शेतकऱ्यांना देण्यासाठी ते थेट करारही करतात. डॉ. जयंत म्हणतात, ‘‘आमच्या ग्राहकाने आमचे उत्पादन योग्य दरात विकत घेतल्यानंतर आम्हाला चांगला नफा होत असल्यास, आम्ही त्यामध्ये शेतकऱ्याचाही विचार करतो. इतर लोक त्या कच्च्या मालाचे किती रुपये मोजतात हे आम्हाला महत्त्वाचे नसते. आम्हाला योग्य नफा मिळाल्यास तो पुढे शेतकऱ्यांनाही मिळावा अशी आमची भावना असते.’’

कंपनीची उत्पादने व उपक्रमांच्या माहितीसाठी :

०२०-२६९३०६२१ / 7875787511 | www.sharangdhar.com |

For Franchisee Enquiries :Marketing@sharangdhar.com

मराठी